न्यायडोंगरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्याची क्रीडा क्षेत्रात झेप
न्यायडोंगरी ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - नांदगाव तालुक्यातील श्री शनैश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित स्व. ( आण्णासो) गंगाधर शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा न्यायडोंगरी या शाळेत आज दि. १४ ला मंगळवारी रोजी शाळेतील विद्यार्थी सचिन वळवी याने राज्यस्तरीय २०० मी. धावण्याच्या स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांकाने यश संपादित केले.म्हणून त्याची जिल्हा क्रिडा प्रबोधनी नाशिक येथे निवड झाली. त्याबद्दल सचिन वळवी या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रूपचंद महारु अहिरे (माजी.ग्रा.पा.सदस्य ) होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.शनैश्वर सेवाभावी संस्थेचे सरचिटणीस अँड. अनिलदादा आहेर , तसेच गावातील व परिसरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
अॅड.अनिल आहेर यांनी आपल्या मनोगतात सचिन वळवी या विद्यार्थ्याला भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा देऊन भविष्यात जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभाग नोंदवावा व प्रकल्प कार्यालयात आपली शाळा अव्वल कशी येईल यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन देखील केले. भविष्यात आश्रम शाळेतून एकापेक्षा अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादीत करावे. यावेळी अॅड. अनिल आहेर यांनी सचिनच्या यशाबद्दल क्रीडा शिक्षक रायते सर आणि सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमासाठी परिसरातील आदिवासी बांधव , गावातील प्रतिष्ठित नागरिक,विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment