Tuesday, February 27, 2024

नांदगाव येथे बाह्य रुग्ण कक्ष (ओपीडीचे) भूमिपूजन ,




नांदगाव (प्रतिनिधी) - मराठा विद्या प्रसारक समाज संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र संचलित बाह्य रुग्ण कक्ष (ओपीडी) भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे नांदगाव तालुका संचालक  अमित  बोरसे पाटील यांनी संस्था संचलित संकुलांमधील नव्याने होत असलेल्या बदलांबाबत तसेच येणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत तसेच विकास कामांंबाबतचे धोरण स्पष्ट केले. तसेच संस्थासंचलित भरपूर विकास कामांसाठी स्थानिक ग्रामस्थ तसेच सभासद बांधवांची मदत होत असल्याचे देखील सांगितले. आयटीआय ही संस्था प्रात्यक्षिक कौशल्यांच्या आधारावर तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावीत असते. त्याचप्रमाणे आय. टी. आयचे विद्यार्थी हे शासकीय सेवेत,सहकारी सेवेत,औद्योगिक क्षेत्रात, उत्कृष्ट व्यावसायिक व उद्योजक बनून अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देत असतो.  सध्याच्या काळात तांत्रिक कौशल्य असणाऱ्या युवकांची अधिक प्रमाणात गरज असल्याने तालुक्यात जास्तीत जास्त व्होकेशनल कोर्सेस साठी जागा उपलब्ध व्हावी व जास्तीत जास्त युवकांना आपले ध्येय साध्य करता यावे . त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने नांदगाव आयटीआय येथे नवीन वास्तूचा भूमिपूजन सोहळा आयोजित करीत असल्याबाबत सांगितले. त्याचप्रमाणे नांदगाव व नाशिक हे अंतर जास्त असल्याने भरपूर गरजूंना छोट्या छोट्या आजारांचे निदान करण्यासाठी नाशिक सारख्या शहरात जावे लागते तसेच काही वेळेला तात्काळ गरज असताना देखील उपचार उपलब्ध होत नाहीत म्हणून नांदगाव तालुका व परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणून ओपीडी ची सुरुवात करीत  आहे. प्रत्येक १५ दिवसांनी संस्थेच्या तज्ञ डॉक्टर यांच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन असल्याबाबत सांगितले. संस्थेचे सरचिटणीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की,  आजच्या युगात फक्त पुस्तकी ज्ञानाला महत्व नसून आजच्या युगात टिकायचे असेल तर प्रत्येकाजवळ विज्ञानवादी धोरण हवे आणि विज्ञानवादी होण्यासाठी किमान प्रात्यक्षिक कौशल्य असावे . त्यासाठी सर्वोत्तम माध्यम म्हणजे आयटीआय होय असे नमूद केले. त्याचप्रमाणे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने विनाअनुदानित सेवकांच्या भरघोस पगारवाढीबद्दल विनाअनुदानित सेवकांमार्फत सरचिटणीस नितीन ठाकरे तसेच पदाधिकारी वर्गाचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जातेगाव येथील मविप्र समाज सभासद बांधव तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जमा केलेल्या दहा लाख रुपये पेक्षा जास्त रकमेचे धनादेश मवीप्र पदाधिकारी तसेच संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत सरचिटणीस अॅडवोकेट नितीन ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये मविप्रचे नांदगाव संचालक हे अतिशय कुशल संचालक असून नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त विकास कामे ही नांदगाव तालुक्यात सुरू आहेत .  यासाठी जो पाठपुरावा आहे तो अमित बोरसे सातत्याने करीत असतात . त्याचेच फलित नांदगाव वासियांना अनुभवायला मिळत असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष  बाळासाहेब क्षीरसागर यांनी विशद केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस अॅडवोकेट  नितीन ठाकरे , संस्थेचे सभापती  बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, उपाध्यक्ष  विश्वास बापूराव मोरे, उपसभापती  देवराम बाबुराव मोगल, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, माजी आमदार अॅडवोकेट अनिलदादा आहेर, नाशिक ग्रामीण संचालक  रमेश पांडुरंग पिंगळे, मालेगाव तालुका संचालक  रमेशचंद्र काशिनाथ बच्छाव, सटाणा तालुका संचालक डॉ.प्रसाद प्रभाकर सोनवणे,देवळा संचालक  विजय पगार,नांदगाव संचालक इंजि.  अमित उमेदसिंग बोरसे पाटील, महिला संचालिका श्रीमती शालनताई सोनवणे, सेवक संचालक  जगन्नाथ मधुकर निंबाळकर ,डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र संस्थेचे अधिष्ठाता डॉ.सुधीर भामरे, कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड संचालक  विठ्ठल (आबा) आहेर, व डॉ.पुंजाराम आहेर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष  प्रसादभैया सोनवणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल विश्वनाथ बोरसे, न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष  दिलीप देवचंद पाटील, आदर्श प्राथमिक शाळा स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम कारभारी गवांदे तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच नांदगाव तालुक्यातील सर्व संकुलांचे प्राचार्य मुख्याध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डी. एम. बिलोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य  बी. बी. अत्रे यांनी केले. कार्यक्रमासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल तसेच आदर्श प्राथमिक शाळा या तिन्ही संकुलांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता पसायदान ने करण्यात आली.

Monday, February 26, 2024

नांदगाव येथील गुप्ता मेडिकेयर मल्टीस्पेशल्टी हॉस्पिटलचे उद्घाटन,







नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं आहे, असे गौरवोदगार आमदार सुहास कांदे यांनी काढले. नांदगाव येथील गुप्ता मेडिकेयर मल्टीस्पेशल्टी हॉस्पिटल च्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,माजी सभापती विलासराव आहेर,बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर,युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष फरहान खान,केंद्रीय राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण रोंदळ,भाजपचे दत्तराज छाजेड,सागर फाटे,माजी आ.धात्रक,भास्कर कदम,संतोष गुप्ता,डॉ.परितोष गुप्ता आदींची उपस्थिती होती.
     पुढे बोलताना आमदार सुहास कांदे म्हणाले की , नांदगाव शहरात खरे तर काही व्यापारी वर्गाच्या मदतीने मीच असे एक हॉस्पिटल उभारणार होतो.आणि त्यात राजीव गांधी जीवनदायी योजना व महात्मा फुले योजनेतून मतदार संघातील गोरगरीब जनतेवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करणार होतो.मात्र आता गुप्ता कुटुंबंाने या हॉस्पिटल उभारल्याने ह्या हॉस्पिटलला वरील सुविधा येत्या वर्षात उपलब्ध करून देईन असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. यावेळी दत्तराज छाजेड, माजी आ.धात्रक,भास्कर कदम,श्री.रोंदळ यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान आ.कांदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांना उद्देशून या गुप्ता कुटुंबंांत स्त्री,पुरुष असे अनेक डॉक्टर आहेत.मात्र संतोष अण्णा एम.डी.डॉक्टर आहेत.पण ते राजकारणातले...त्यांनी ही डॉक्टर व्हायला हवे होते.पण त्यांनी राजकारणाची वाट निवडली.पण असो राजकारणात ही त्यांनी चांगला जनसंपर्क वाढवला आहे. त्यांच्या स्वप्नात ही नसताना त्यांना मी उपगराध्यक्ष पदाची संधी दिली होती.याची आठवण आ.सुहास कांदे यांनी त्यांना यावेळी करून दिली.

Thursday, February 22, 2024

नांदगाव येथे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यासाठी लाँग मार्च!! शेतकरी, कष्टकरी रॅलीत सहभागी,






नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातून आंबेडकर चौक येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . बहुसंख्य शेतकरी बांधवांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर करांना अभिवादन करुन नाशिक कडे रवाना झाले. कॉम्रेड धर्मराज शिंदे जिल्हा नेते किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हा कार्यालयावर शेतकरी , कष्टकरी येत्या सोमवारी दि. २६ फेब्रुवारी रोजी धडकणार आहे. नांदगाव येथून बहुसंख्य शेतकरी कष्टकरी बांधव हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून नाशिककडे विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च करत नाशिक जिल्ह्याकडे रवाना झाले. या लॉंग मार्च मध्ये काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी सर्वांचे स्वागत केले व जाहीर पाठिंबा दिला. मोदी सरकारचे धोरण हे कष्टकरी शेतकरी यांच्या विरोधी असून दिल्ली येथे शेतकऱ्यांवर अश्रू धूर धुराचा वापर करून गोळ्या झाडण्यात येत आहे. या दडपशाहीचा मुकाबला सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांनी केला पाहिजे भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी एकत्र आले पाहिजे.असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी आपल्या शब्दातून केले आहे. यावेळी असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

नांदगावात प्रभु श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव साजरा ,





नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात सुतार समाजाचे आराध्य दैवत प्रभु श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव सालाबादाप्रमाने नांदगाव येथील हनुमाननगर मधील श्री विश्वकर्मा महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी १०ः०० वाजता श्री विश्वकर्मा महाराजांच्या मुर्तीची विधिवित पुजा व सत्यनाराण महापुजा रमेश पेंढारकर व सौ .फुलवंता पेंढारकर यांनी सपत्नीक केली. तर महाआरती विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी सपत्नीक यांनी केली.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक ,चंद्रशेखर कवडे,अँँड सचिन साळवे, आप चे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले, संतोष गोसावी नंदू पाटील,जेष्ट पत्रकार संजीव निकम, सुरेश शेळके, पत्रकार संजय मोरे,अनिल आव्हाड, प्रमित आहेर, सचिन बैरागी, महेंद्र पगार,अनिल धामणे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.जयंतीनिमित्त समाज बांधवांना जेष्टे नेते बापुसाहेब कवडे, आमदार सुहासआण्णा कांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांनी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथींचा स्वागत विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की श्री विश्वकर्मा भगवान हे सर्व समाज्याचे दैवत आहे. तालुक्यात सुतार समाजाचे संघटन असून याचे फलित नांदगाव शहरात प्रभू विश्वकर्मा भगवान चे भव्य मंदिर उभारले असून या बरोबरच या ठिकाणी इतर विकास कामे जोमात सुरू आहे. आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मंदिर परिसरात सभामंडपसाठी निधी दिल्याबद्दल समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी उपस्थित महिलानी हळदी कुंकवाच कार्यकम झाला.उपस्थिताना विश्वकर्मा युवा मंडळाचे अशोक पेंढारकर यांच्या तर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आला.या प्रसंगी विश्वकर्मा सुतार समाज विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय कदम , संचालक नंदुलाल अहिरे,सुभाष पेंढारकर,मधुकर खैरनार,राजेंद खैरनार, दिगंबर गवळे,दयाराम सूर्यवंशी,सचिव बाबासाहेब कदम,  खजिनदार दिपक मोरे,  अशोक कदम , सोपान कदम,बाळासाहेब जाधव, सुनील शेलार ,संतोष जाधव,विश्वकर्मा युवा मंडळाचे किरण हिरे,जयवंत पेंढारकर, नरेंद्र सूर्यवंशी,सौरभ मोरे,समाधान कदम,स्वप्नील खैरनार,समाधान खैरनार, रोशन हिरे, मयूर कदम, श्री विश्वकर्मा महिला मंडळाच्या संगिता कदम,सुलोचना खैरनार,उषा पेंढारकर,सुंनदा आहिरे, विद्या कदम,पुष्पा मोरे,निता जाधव,दिपाली आहिरे,सोनाली जाधव,फुलवंता पेंढारकर,   संगिता हिरे, राणी शेलार,ज्योती शेलार आदी महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Wednesday, February 21, 2024

नांदगाव शहरातील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांची भाडेकरार लिलाव प्रक्रिया जाहीर,




नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या महात्मा फुले चौकातील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांची जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया मंगळवारी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील जैन धर्मशाळा या ठिकाणी सकाळी महात्मा फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर 2524 मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचे जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. या लिलाव प्रक्रियेसाठी इन कॅमेरा व्यवस्था ठेवण्यात येऊन मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांचे प्रमुख मार्गदर्शनात तसेच जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी नांदगाव उपस्थित होते.
लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. यावेळी तळमजल्यावरील सर्व गाळ्यांचे, पहिल्या मजल्यावरील सर्व गाड्यांचे, तसेच दुसऱ्या मजल्यावरील दोन गाळ्यांचे लिलाव झाले. यात एकूण ७३ गाळ्यापैकी ४६ गाड्यांचे लिलाव पूर्ण झाले आहेत. यशश्वी सर्वोच्च बोली आसाराम दुबे (रक्कम, 51,40000/-) यांनी लावली. सर्व प्रक्रियेत एकूण ना परतावा अनामत रक्कम ५,५०,५०,०००/- रूपये इतकी बोली लावलेली आहे. यशस्वी बोली धारकांनी व ओटे धारकांनी पुढील पंधरा दिवसात करारनामे करून द्यावे. तसेच शॉपिंग सेंटरची सर्व किरकोळ दुरुस्ती करून सर्व ओटे व गाळे लवकरच व्यवसायासाठी चालू करून देण्यात येणार आहे. लिलाव प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नांदगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, लेखापाल संतोष ढोले, लेखा परीक्षक सतीश कुमार खैरे, प्रकल्प अधिकारी आनंद महिरे, संगणक अभियंता श्रीमती रोशनी मोरे, वरिष्ठ लिपिक विजय कायस्थ, बीबी शिंदे,अरुण निकम, अंबादास सानप,रामकृष्ण चोपडे, आकाश जाधव,दीपक वाघमारे, अनिल पाटील,सुनील पवार, निलेश देवकर,यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी सर्व नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Monday, February 19, 2024

मध्य रेल्वे(मुंबई )चे जनरल मॅनेजर रामकरण यादव यांनी मनमाड वर्कशॉपला दिली भेट,




मनमाड (विशेष प्रतिनिधी ) - मध्य रेल्वे(मुंबई )चे जनरल मॅनेजर रामकरण यादव  यांनी  मनमाड वर्कशॉपला भेट दिली.यावेळी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड च्या शिष्टमंडळाने माजी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली जनरल मॅनेजर रामकरण यादव  यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक मयंकसिंग,  सिनियर सेक्सन इंजिनिअर हरिष दोंदे आदी उपस्थित होते. कामगार समस्या संदर्भात एक निवेदन दिले. या निवेदनात (१)मनमाड वर्कशॉप मधील ग्रुप डी व सी च्या रिक्त पदे भरण्यात यावे.
मनमाड वर्कशॉप मध्ये एकूण जागांपैकी ७७%पदे ही ग्रुप डी चे रिक्त आहे.२३%पदे भरली आहे.
आर.आर.बी. कडून रिक्त पदे भरण्यात यावी.
(२) नाशिक ते मनमाड या दरम्यान अनेक रेल्वे कर्मचारी हे कामानिमित्त प्रवास करतात.
पण सदर कर्मचाऱ्यांना सकाळी ८:०० येण्यासाठी असलेली देवळाली भुसावळ पॅसेंजर च्या वेळेत कोरोणा नंतर बदल करण्यात आला आहे.त्यामुळे अपडाऊन करण्याऱ्या रेल्वे कर्मचारी वर्गाला त्रास सहन करावा लागतो तरी देवळाली भुजबळ पॅसेंजर ची वेळेत बदल करून पुर्वीच्या वेळ करावी.
(३) पद्दोन्नती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी.
(४) मनमाड रेल्वे स्टेशनवर, मनमाड रेल्वे कॉलनी व मनमाड रेल्वे वर्कशॉप मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व पाणी च्या प्रश्न तातडीने मार्गी लावा
(५) मनमाड वर्कशॉप मधील जनरल विभागासाठी नवीन वर्कऑडर मिळावी किंवा नवीन काम मिळावे
शिष्टमंडळात झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, कारखाना शाखा चे खजिनदार संदिप धिवर,कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव सागर गरूड, माजी कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, माजी अतिरिक्त सचिव सुनील तगारे,विनोद खरे, संजय केदारे,विशाल त्रिभुवन,गणेश केदारे आदी होते.

मांडवड येथे शिवजयंती उत्साहात साजरी, लेझिम नृत्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण,





मांडवड (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे म.वि.प्र.समाजाचे स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड येथे "शिवजयंती" मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवप्रतिमेचे पूजन शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रशांत आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
       त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवरायांची आरती आयोजित करण्यात आली होती.क्रीडा शिक्षक संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी केलेल्या लेझीम नृत्य सर्वांसाठी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले होते. लेझीम पथकाद्वारे छत्रपती शिवरायांच्या वेशभूषे मध्ये मध्ये इयत्ता दहावीचा विद्यार्थी श्रेयस निकम तर जिजाऊंच्या वेशभूषेत इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी सिद्धी उगले ही होती. लेझीम नृत्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी केसरी रंगाचे फेटे बांधून गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी शालेय स्कूल कमिटी सदस्य रामराव मोहिते, वाल्मीक थेटे,सर्जेराव थेटे, दिलीप आहेर,अशोक निकम, बापूसाहेब आहेर,सिताराम पिंगळे तसेच पालक वर्गातून सागर आहेर,सुखदेव थेटे, दत्तात्रय थेटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे एस. एस. यांनी केले. या कार्यक्रमासाठी मविप्रचे संचालक अमित बोरसे तसेच गावातील ज्येष्ठ नेते विठ्ठल आहेर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.


पिंपरखेड येथील विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी






पिंपरखेड ( प्रतिनिधी ) - पिंपरखेड येथील कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात करण्यात आली. या विद्यालयात सकाळी ठीक ८ वा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल बोरसे तर प्रमुख अतिथी म्हणून के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे भाऊसाहेब संजय मवाळ उपस्थित होते. सुरूवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच सर्वांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली. प्रसंगी ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या विचारातून आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी सर, उपशिक्षक संजय कांदळकर,श्रीमती अलका शिंदे, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, उत्तम सोनवणे, संदीप मवाळ, आबा सोनवणे, ग्रामस्थ मधुकर घोटेकर, नाना तांदळे, दादा जाधव, मुरली आहेर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय कांदळकर यांनी केले तर आभार उत्तम सोनवणे यांनी मानले.

Saturday, February 17, 2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदगाव तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात यांची नियुक्ती,





नांदगाव ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशाने नांदगाव तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दि.१६ फेब्रुवारी राेजी पुढील प्रमाणे नवीन नांदगाव शहरातील नियुक्त करण्यात आल्या आहेत . नांदगाव शहर उपाध्यक्ष कुणाल सौंदाणे, नांदगाव शहर सचिव चेतन पेंढारकर, नांदगाव शहर संघटक पप्पू सोनवणे, नांदगाव शहर सहसंघटक किरण खंबायते, नांदगाव शहर सहसंघटक विष्णू लकडे, नांदगाव शहर विभाग अध्यक्ष उमेश जेजुरकर, यांच्या नियुक्ती करण्यात आल्या ‌. या बैठकीस शहराध्यक्ष अभिषेक विघे 
 , मनसे महिला अध्यक्षा रेखा शेलार मनसे उपस्थित होते . यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Tuesday, February 13, 2024

एच. आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे टॅलेंट हंट परीक्षेत यश,




नांदगाव (प्रतिनिधी) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तिन्ही जिल्ह्यांतून १००० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांचा रविवारी दि. ११ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत नांदगाव शहरातील एच.आर. हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांनी अव्वल शंभर क्रमांकावर नांव कोरले आहे. यात स्वलेहा शेख सलीम, मारिया साजिद तांबोळी, इक्रा रियाजुद्दीन , अनैका मोहसीन खाटिक, मुनिझा वसीम शेख, आयेशा अकबर खान अशा विद्यार्थ्यांची नावे आहेत. सहा विद्यार्थ्यांमध्ये स्वालेहा सलीम शेख ही टॉपर असुन,  तिला ११०० रुपये रोख , पदक प्रदान करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्यात एच.आर. हायस्कूलचे सईद सर , सज्जाद सर उपस्थित होते.

Sunday, February 11, 2024

नांदगाव येथे मराठा समाजाचे बेमुदत आमरण उपोषण,





नांदगाव ( प्रतिनिधी) - तब्बल ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि मराठा समाज बांधवांची साडेतीनशेच्या वर बळी गेल्यानंतर अखेर मराठा आरक्षण संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या खडतर संघर्षानंतर अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले. या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी . यासाठी सकल मराठा समाज नांदगाव तालुक्याच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण काल शनिवारी दि. १० फेब्रुवारी पासून भास्कर झाल्टे व विशाल वडघुले यांनी सुरू केले आहे. या बेमुदत आमरण उपोषणकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन मनोज दादा जरांगे पाटलांच्या सभेत हृदयविकाराच्या झटक्याने तांदूळवाडीचे कै.दादासाहेब पुंडलीक काळे यांचे दुःखद निधन झाले . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हे बेमुदत आमरण उपोषण सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. याप्रसंगी उपोषणकर्त्यांनी सकल मराठा समाज बांधवांना जाहीर आवाहन केले की, या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विधानसभेच्या व विधान परिषदेच्या मराठा आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी . यासाठी मराठा समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यातील विद्यमान आमदारांना फोन कॉल करून किंवा मेसेज पाठवून या अधिवेशनात मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडावे. तसेच या शेवटच्या अंतिम निकराच्या लढाईत मोठ्या संख्येने सामील होऊन हा लढा यशस्वी करावा ज्या समाज बांधवांना या बेमुदत आमरण उपोषणात सहभागी व्हायचे असेल . त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा . याप्रसंगी किरण जाधव,महेंद्र जाधव, विष्णू चव्हाण,गणेश काकळीज,ज्ञानेश्वर कवडे,सजन तात्या कवडे,विजय पाटील,निवृत्ती खालकर,गणेश सरोदे आणि भिमराज लोखंडे उपस्थित होते.

Saturday, February 10, 2024

आमदार सुहास कांदे यांच्या मध्यस्थीने साकोरा नवीन जल योजनेसाठी तात्काळ वीज पुरवठा देण्याचे आदेश,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मध्यस्थीने साकोरा नवीन पाणी योजनेसाठी वीज वितरण कंपनीचे तात्काळ वीज पुरवठा देण्याचे आदेश काढलं आहे. जलजीवन योजनेअंतर्गत गिरणा धरणातून पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेली आहे. मात्र मागील थकबाकी मुळे वीजपुरवठा मिळत नसल्याने ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट कोसळल्याने त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे कैफियत मांडताच ; तत्काळ वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने साकोरा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
      तालुक्यातील साकोरा गावासाठी यापूर्वी असलेल्या एका पाणी योजनेची वीज थकबाकी प्रलंबीत आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी आमदार सुहास कांदे यांनी या गावासाठी जल जीवन योजनेअंतर्गत सुमारे ४ कोटी ९२ लाख रुपये किमतीची योजना गिरणा धरणातून मंजूर करून आणली.आजमितीस ते काम पूर्ण झाले आहे.मात्र मागील थकबाकी भरल्याशिवाय नवीन योजनेस वीज पुरवठा देणार नाही,अशी भूमिका वीज वितरण कंपनीने घेतल्याने साकोरा ग्रामस्थांनां पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.
      या संतापातून ग्रामस्थ,महिला,या सर्वच घटकांनी या पाणी टंचाई विरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.तेव्हा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या मध्यस्थीने सदर ग्रामस्थांनी आ.सुहास कांदे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. तेव्हा आ.कांदे यांनी ग्रामस्थ व वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता वाटपाडे यांची बैठक घेऊन पाणी टंचाई ची सद्यःस्थिती विषद केली.
      आमदार सुहास कांदे यांनी सदर थकबाकी ग्रामपंचायतीने हप्ते करून भरून टाकावी.असे आवाहन केल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन तयार झाले.तेव्हा आमदारांच्या या मध्यस्थीनंतर नवीन योजनेसाठी वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा देण्याचे मान्य केले.व तसे मंजुरीचे पत्र ही दिल्याने साकोरा वासियांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले आहेत.

Friday, February 9, 2024

नांदगाव मध्ये सुरू असलेल्या शिवसृष्टी कामांची आमदार सुहास कांदे यांच्याकडून पाहणी,




 नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी च्या कामाची पाहणी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केली.  आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव शहरात निर्माण होत असलेल्या शिवसृष्टी चे कार्य प्रगतीपथावर सुरू आहे. नांदगाव शहरातील जुने पंचायत कार्यालय येथील जवळपास अडीच एकर जागेवर विशाल अश्वारूढ पुतळ्यासह शिवकालीन शिवसृष्टी निर्माण होत आहे. आमदार सुहास आण्णा कांदे स्वतः जातीने या कामात सतत लक्ष घालताना दिसून येतात.  सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह त्यांनी शिवसृष्टी च्या सुरू असलेल्या कामावर जाऊन पाहणी करून आढावा घेतला.  

      अडीच एकर जागेवरील शिवसृष्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी ठरणार आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची २९ फुटी असून चौथाऱ्यासह ४६ फुट इतकी आहे. तसेच शिवसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य शिव-प्रेमींना अनुभवायला मिळणार असून या शिवसृष्टीमध्ये विविध माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या कथा पाहायला वाचायला व अनुभवायला मिळणार आहे.यात महाराजांची जीवन कथा भिंतीवर साकारली जाणार आहे. शिव संग्रहालयाच्या माध्यमातून शिवकालीन हत्यारे शिवकालीन वस्तू पाहायला मिळणार आहे, यामुळे भावी पिढीला स्वराज्याचा इतिहास जवळून पाहता येईल आणि समजून घेता येईल. शिव वाचनालय यामध्ये शिवकालीन ग्रंथ वाचायला उपलब्ध करून दिले जाणार आहेत . यासह शिवसृष्टी पाहायला येणाऱ्या शिवप्रेमी साठी येथे शिवभोजनालयाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. यानंतर शिव चित्रपटगृह या संकल्पनेच्या माध्यमातून एक मिनी थियटर या ठिकाणी असणार आहे या शिव चित्रपटगृहात ऐतिहासिक चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे शिवसेनेचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी, चोळके साहेब, सदर कामाचे ठेकेदार यांच्यासह माजी आमदार संजय पवार, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील, फरहान दादा खान, उपजिल्हा प्रमुख महेंद्र दुकळे, राजेंद्र देशमुख, नंदू पाटील, सागर हिरे, प्रकाश शिंदे, प्रमोद भाबड, सुनील जाधव, शशिकांत सोनवणे,अय्याज शेख रोहित काकळीज, मंदार ढासे, आदीसह नागरिक उपस्थित होते. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सदर कामाची पाहणी करून कामाबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या.

Thursday, February 8, 2024

नांदगावच्या महाविद्यालयात रक्तदान शिबीर, अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व मराठा विद्या प्रसारक समाजाचे वैद्यकीय महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त उपक्रमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रवीण निकम ,सदस्य स्थानीय व्यवस्थापन समिती नांदगाव यांच्या हस्ते संपन्न झाले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे असे उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ.प्रवीण निकम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी नेहमी रक्तदान करून समाज कार्य करावे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन केले .जवळ जवळ वीस विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय योजना चे कार्यक्रम अधिकारी प्रा बालाजी मोरे, प्रा.कौशल्या बागुल व प्रा.बी.पी गायकवाड यांनी केले.

मनमाड मध्ये भविष्यात शिवसृष्टी प्रमाणे भीमसृष्टी उभारणार - आमदार सुहास कांदे,





मनमाड ( विशेष प्रतिनिधी) - आपल्या सर्वांना मूलभूत सुविधांच्या विकासकामांसह,आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय असलेल्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारेन असा जो शब्द दिला होता.त्याची आज आपूर्ती करताना माझा आनंद द्विगुणित झाला आहे.असे भावनिक प्रतिपादन आ.सुहास कांदे यांनी केले.
      शहरात डॉ.बाबासाहेब यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा प्रश्न गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबीत होता.तो प्रश्न महत्वाचा माणून आमदार सुहास कांदे यांनी आज त्याची पूर्तता केली.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यापीठावर पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे,राजेंद्र पगारे,बबलू पाटील,गंगाभाऊ त्रिभुवन,मयूर बोरसे,शाईनाथ गिडगे,सौ.अंजुम सुहास कांदे,फरहान दादा,उपस्थित होते.
     आमदार कांदे पुढे म्हणाले की,अनेक मोठ्या लोकांनी या मतदार संघाचे लोकप्रतिनिधित्व केले,पण ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागणी बाबत काही करू शकले नाही,ते भाग्य माझ्या वाट्याला आले.तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या.! भविष्यात शिवसृष्टी सारखीच भीमसृष्टी उभारेन.! असा शब्द देतो, असे ते शेवटी म्हणाले.
     यावेळी पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी यांनी ही आमदार सुहास कांदे यांच्या कार्याचा गौरव केला.इतिहासात प्रथमच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाल्याची घटना अलौकिक असल्याचे सांगून हा क्षण मनात साठवून ठेवा असे ते म्हणाले.तसेच आमदार सुहास कांदे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला आहे.तुम्ही भाग्यवान आहात असे ते शेवटी म्हणाले.
     या सोहळ्याला उपस्थित पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी व आ.सुहास कांदे,व सौ.कांदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.आज माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यामुळे शहरातील विविध भागातून मिरवणूक काढून लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी या मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली.यानंतर सर्वपक्षीय नेते सर्व समाजातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले भीम व आंबेडकर अनुयायी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
    मनमाडकर समाज बांधवांकडून आमदार सुहास अण्णा कांदे यांचा नागरिक सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
     लोकार्पण सोहळा सुरू असताना आकाशातून हेलिकॉप्टर द्वारे पुष्पृष्टी करण्यात आली, दोन हेलिकॉप्टर ने आकाशात सात वेळा घिरट्या मारत स्मारकावर पुष्पवृष्टी केली.लोकार्पण सोहळ्यानिमित्त कमालीचा उत्साह आनंद जल्लोष समाज बांधवांमध्ये पाहण्यास मिळाला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदगाव तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात यांची निवड,




 

नांदगाव ( प्रतिनिधी ) -  मनसे प्रमुख राज ठाकरे,  युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा संघटक ऍड. किशोर शिंदे साहेब, लोकसभा उपसंघटक ऍड गणेश सातपुते साहेब ,प्रदेश सरचिटणीस अशोक भाऊ मुर्तडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ऍड. रतनकुमार इचम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली  बुधवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा दौरा दरम्यान नांदगाव तालुका आढावा बैठक नांदगाव शासकीय विश्राम गृह येथे संपन्न झाली.पुढील प्रमाणे नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राहुल पाटील नांदगाव विधानसभा अध्यक्ष केदा भवर, कळवाडी गट नांदगाव तालुका उपाध्यक्ष, राहुल पांडे भालूर गट नांदगाव तालुका उपाध्यक्ष, गोकुळ करनर जातेगाव नांदगाव तालुका उपाध्यक्ष, या 
बैठकीस तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात ,जिल्हा संघटक सुनील कोल्हे, रेखाताई शेलार महिला नांदगाव तालुकाध्यक्ष, अभिषेक विघे नांदगाव शहराध्यक्ष , शहराध्यक्ष गौरव कांबळे,जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू,नाशिक शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे,योगेश पाटील, कुणाल साैंदाणे राहुल पांडे, राजाभाऊ माळवातकर, राहुल जाधव, गणेश देशमुख, सुनिल चव्हान रावसाहेब गरुड तालुक्यातील सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रसैनिक व पक्षाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

नांदगाव शहरात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या कडून विविध गीत सादर,



नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या कडून माता रमाई यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुप नांदगाव यांच्या वतीने दर वर्षी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्रातील जन्माला आलेल्या अनेक महापुरुषांचे प्रबोधन पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते . यंदा देखील महाराष्ट्रात प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांनी "तुम्ही खाता त्या भाकरीवर , बाबासाहेबांची सही आहे रंररर " या भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कडूबाई खरात यांच्या हस्ते माता रमाई यांना दिपप्रज्वलित करून गुलाब पुष्प वाहुन वंदन करण्यात आले.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील बुलंद तोफ भुषणजी लोंढे, विनोद शेलार (राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष),मनमाडचे नगराध्यक्ष गणेश धात्रक,नांदगावचे उपगराध्यक्ष नितिन जाधव, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ .ख्याती तुसे, हर्षद तुसे , शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता,  
शैक्षणिक,समाजिक, सांस्कृतिक, क्रिडा,क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती . यावेळी आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन कडुबाई खरात यांच्या हस्ते सर्वांचे सत्कार करण्यात आले होते. 
   तसेच नांदगाव आंबेडकर नगर येथील नव वधु वर सिध्दांत व साक्षी काकळीज यांच्या परिवाराच्या वतीने व शहरातील अनेक बहुजन समाजातील महिला मंडळाच्या वतीने कडूबाई खरात यांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर कडूबाईंच्या पहाडी आवाजत प्रबोधन गीत सादर करण्यात आले. कडूबाई हे चाहत्यांसमोर येताच फटाकेंच्या आतिषबाजीत, टाळ्यांचा,घोषणांचा एकच जोरदार आवाज घुमु लागला होता..."जय जय जय जय भिम जय भिम जय भिम " संपूर्ण परिसर दणाणुन सोडला होता या गीत गाण्यासाठी चाहत्यांनी हाजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी व बहुजन समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने या मातारमाई जयंती सोहळ्यात सहभागी झाले होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मसेवक आनंद पवार यांनी केले तर सन २००५ ते २०२४ पर्यंतचा समाजिक क्षेत्रात कार्यक्रमाचे अहवाल देखील यावेळी जनते समोर शाहू महाराज ग्रुपचे मार्गदर्शक नितिन जाधव यांनी सादर केले होते. तसेच कडूबाई खरात यांच्या सोबत लहान मोठ्यां पासुन सर्वच फॅन सेल्फीचा मनसोक्त गप्पा मारत आप आपल्या मोबाईल मध्ये एक अविस्मरणीय क्लिक कैद करतांना दिसत होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर(नाना) जाधव, उपाध्यक्ष प्रशांत गरुड, 
यादींनी मोठे परीश्रम घेतलं होतं.

Saturday, February 3, 2024

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता - भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार - सौ. अंजुम ताई कांदे,





नांदगाव (प्रतिनिधी ) -    उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी सौ. अंजुम कांदे मार्गदर्शन करताना बोलत होत्या. शासनाकडून मिळालेल्या कर्जाचा योग्य विनियोग करा,दहा पैशाचे वीस पैसे कसे होतील. याचा सारासार विचार करून व्यवसाय करा.आणि आपली आर्थिक प्रगती साधा असे आवाहन समाजसेविका सौ.अंजुम कांदे यांनी केले.
       यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या तालुकाप्रमुख सौ.विद्या जगताप, शहरप्रमुख रोहिणी मोरे,मनमाड शहर प्रमुख सौ.संगीता बागुल, बँक ऑफ बडोदा चे शाखाधिकारी मनजीत शहारे,प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी,स्वयं सहाय्यता बचत गटाचे अशोक अहिरे (साकोरा प्रभाग),भालूर प्रभाग चे दीपक सोनवणे,न्यायडोंगरी चे राहुल भदाणे,तालुका समन्व्यक अश्विनी जाधव,आदी उपस्थित होते.
       सौ.कांदे बोलताना म्हणाल्या की,ज्या जबाबदारीने कर्ज घ्याल,त्या जबाबदारीने फेडले ही पाहिजे जेणेकरून तुमची पुढची प्रगती सुखकारक होईल.तसेच या दृष्काळी तालुक्यातल्या माझ्या माता भगिनींना त्यांच्या घरातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपले आमदार सुहास कांदे यांनी व मी एक महत्वकांक्षी योजना आखली आहे.येत्या काही महिन्यात ते काम सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत.त्यासाठी दवा अन दुवा ची गरज आहे,तर दवा आम्ही देतो दुवा तुम्ही करा.! असेही त्या यावेळी म्हणाल्या.
      पहिल्या टप्यात किमान २५ हजार महिलांना रोजगार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.असे त्या शेवटी म्हणाल्या.याप्रसंगी तालुक्यातील गिरणानगर येथील ६ बचत गट तर लोहशिंगवे येथील ५ महिला बचत गटांना बँक ऑफ बडोदा कडून प्रत्येकी १ लाख ५० हजार असे १६ लाख ५० हजार रुपये कर्जाच्या धनादेशाचे वितरण सौ.अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले.

शहीद जवान संदीप मोहिते यांचे मांडवड गावात स्मारक उभारणार - आमदार सुहास कांदे,







मांडवड ( प्रतिनिधी ) - पुढच्या पिढीला शहीद संदीप मोहिते यांच्या बलिदानाची ,देशासाठी केलेल्या कर्तव्याची जाणीव रहावी,त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे उचित असे स्मारक या मांडवड गावात उभारणार असे जाहीर करून तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना श्रद्धांजली वाहिली.
        यावेळी संदीप मोहिते यांच्या बलिदानाचा गौरव करताना आ. सुहास कांदे पुढे म्हणाले की,आपले भारतीय जवान आपल्या देश बांधवांसाठी,देशासाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात.त्यांच्यामुळेच आपण आणि आई - बहीण किंवा संपूर्ण कुटुंबं सुरक्षित आहे. नांदगाव तालुक्याच्या वतीने आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार सिद्धार्थ मोरे,पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,माजी आ.अँड.अनिल आहेर, आ.संजय पवार,जगन्नाथ धात्रक,विलास आहेर,शिवसेना तालुका प्रमुख शाईनाथ गिडगे, राजेंद्र पवार,किशोर लहाने,सागर हिरे,समाधान पाटील,अंकुश कातकडे,अँड.जयश्री दौंड,राजेश बनकर,गटविकास अधिकारी संदीप दळवी,विठ्ठलं आहेर,आदिंसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.

Thursday, February 1, 2024

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी कामास दोन कोटी रुपये मंजूर,







नांदगाव ( प्रतिनिधी ) -  माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे यातून पाणी गळती होऊन अत्यंत कमी दाबाने नांदगावला पाणी मिळत असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात अडथळा होत होता. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे शहराला मिळणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे . दहेगाव धरण कोरडे असून गिरणा धरणातून महिन्यातून एकदाच आवर्तन सोडले जात असल्यामुळे माणिकपुंज धरणातून येणाऱ्या पाण्यावर भागवावे लागणार होते.  पण त्यातही नेहमीच पाणी लिक होण्याच्या समस्येमुळे शहराला प्रत्येक भागात पाणीपुरवठा करण्यासाठी २२ -  २३ दिवस लागत आहेत. 
     या सर्व पार्श्वभूमीचा अभ्यास करून आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नगरविकास विभागाकडे शहरातील पाणीटंचाईसाठी उपाययोजना म्हणून पाठपुरावा करून माणिकपुंज या तात्पुरत्या व तातडीच्या नळ योजनेच्या नव्या जलवाहिनीसाठी दोन कोटी रुपये अनुदान मंजूर करून घेतले आहे.
    काही दिवस आधीच आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून गिरणा धरण ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश मिळाला आहे .  या पाणी योजनेच्या स्वागता निमित्ताने नांदगाव शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून या योजनेचे स्वागत उत्साह साजरे केले. या योजनेचे कार्य तातडीने सुरू करण्यात आले असून वेहेळगाव ते साकोरा पर्यंत पाईपलाईन टाकली गेली आहे तसेच जलशुद्धीकरण केंद्र नांदगाव येथील जुनी पाण्याच्या टाकी मागील डोंगरावर काम सुरू झाले आहे. 
      नवीन पाणी योजनेचा आनंद नागरिकांमध्ये आहेच पण सध्या स्थितीत पाण्याचा टंचाईला सामोरे जावे लागत असताना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तातडीने माणिकपुंज धरणावरून होणाऱ्या पाणीपुरवठा साठी नवीन जलवाहिनी करिता दोन कोटी रुपये मंजूर करून दिल्याबद्दल नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...