Tuesday, February 28, 2023

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा, विद्यार्थ्यांनी सादर केले विविध विज्ञानाचे प्रयोग प्रदर्शन,




 नांदगाव( प्रतिनिधी) -  विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी नांदगाव शहरातील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून खुशबू खेमणार व भावना आबड (विद्यार्थी पालक) म्हणून उपस्थित होत्या. यांच्या हातून विज्ञान प्रदर्शन हाॅलची रिबीन कट करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विज्ञान शिक्षिका  मोहिनी देसले यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी मार्गदर्शन केले . तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वेगवेगळ्या संशोधकांविषयी माहिती दिली.या दिवशी विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन ,चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिके ,प्रश्नमंजुषा यांसारखे बरेच उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. विद्यार्थ्यांचे प्रयोग प्रात्यक्षिके बघण्यासाठी पालकही उपस्थित होते.
विद्यालयातील प्राचार्य  मणी चावला सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक यांनी मिळून यशस्वी रित्या राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा पार पाडला . सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन  सुनिलकुमार कासलीवाल , संस्थेचे सचिव विजय चोपडा, सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदिवाल, प्रशासकीय प्रमुख प्रकाश गुप्ता यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पिंपरखेड येथे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती व मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा,



पिंपरखेड , नांदगाव (प्रतिनिधी)  - नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे सोमवारी दि. २७ फेब्रुवारी  रोजी विद्यालयात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त व मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त 'कवितांचा जागर' हा कवितांवर आधारित कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून कवीवर्य दयाराम गिलाणकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक  काशिनाथ गवळी सर होते.
   प्रसंगी विद्येची देवता सरस्वतीच्या व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यालयात ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात आले होते. पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे कवीवर्य दयाराम गिलाणकर सर यांनी त्यांचे बळीचं जिनं व सप्तरंगी एकांकिकेच्या दोन दोन प्रती विद्यालयास भेट म्हणून दिल्या.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कैलास पठाडे यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष  काशिनाथ गवळी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
  भाषा हे विचार अभिव्यक्तीचे साधन असते. भाषा नसती तर आपल्याला आपले विचार मांडता आले नसते. भाषेमुळे उत्तम प्रकारे संवाद साधला जातो. आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो याचा आपल्याला सदैव अभिमान वाटला पाहिजे. मराठी ही खूप शालिन भाषा आहे त्यामुळे विसंवाद होत नाही. आपले विचार समृद्ध करण्यासाठी पाठ्यपुस्तकांव्यतीरिक्त इतर उत्तमोत्तम व दर्जेदार आणि संस्कारक्षम साहित्य वाचले पाहिजे असे मत कवीवर्य दयाराम गिलाणकर यांनी मांडले. तसेच कवीवर्य दयाराम गिलाणकर सर व मुख्याध्यापक कवीवर्य, गझलकार काशिनाथ गवळी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम, संस्कारक्षम व भावस्पर्शी कविता म्हणून दाखवल्या. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात या कवितांना प्रतिसाद दिला. शेवटी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या 'कणा' या कवितेचे सादरीकरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 
    विद्यालयाचे कला शिक्षक  लक्ष्मण जाधव यांचे फलकलेखन व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख  संजय कांदळकर यांचे योग्य आयोजन नियोजन  खूप आवडल्याचे प्रमुख पाहुणे कवीवर्य दयाराम गिलाणकर यांनी आवर्जून सांगितले. अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यालयात नियमितपणे घेतले जावेत त्यामुळे विद्यार्थ्यांना महान व्यक्तींचा परीचय होईल त्यांच्या जाणिवा समृद्ध व प्रगल्भ होत जातील अशी भावना शिक्षकांनी बोलून दाखवली. 
  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक  गोकुळ बोरसे,  संजय कांदळकर,  कैलास पठाडे,  लक्ष्मण जाधव , उत्तम सोनवणे,  संदीप मवाळ,  आबा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संजय कांदळकर यांनी व आभार  उत्तम सोनवणे यांनी मानले.

Monday, February 27, 2023

व्ही.जे.हायस्कुलचा सार्थक देवरे जिल्ह्यात “रीड टू मी” क्रीएटिव्ह चॅम्पियन स्पर्धेत प्रथम,




नांदगाव ( प्रतिनिधी) - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही. जे.हायस्कुलचा विद्यार्थी सार्थक देवरे यांनी रीड टू मी या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्र शासन आणि इंग्लिश हेल्पर या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन आणि आकलन कौशल्य सुधारण्यासाठी राज्यात शासनाच्या शाळांमध्ये ' रीडटूमी' या अँपचा वापर केला जातो.   उपक्रमाअंतर्गत इयत्ता ६वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ' रीडटूमी ' चा वापर करून, वर्गात शिकवलेल्या इंग्रजी पाठाची उजळणी विद्यार्थी कशाप्रकारे करतात यावर एक सारांशरूपी व्हिडीओ बनवायचा होता. नाशिक जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. 
     या स्पर्धेमध्ये व्ही.जे.हायस्कुल,नांदगाव शाळेतील इयत्ता इयत्ता सातवी चा विद्यार्थी सार्थक श्रीकांत देवरे या विद्यार्थ्याला जिल्ह्यात प्रथम पारितोषिक मिळाले.त्याबद्दल त्याला गोल्ड मिडल व प्रमाणपत्र शाळेचे मुख्याध्यापक मनोहर बडगुजर व पर्यवेक्षक मनोहर शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी रीड टू मी चे प्रतिनिधी विशाल गलाटे, पंचायत समिती शिक्षण विभागाचे योगेश फटांगरे त्या विद्यार्थांचे वडील डॉ.श्रीकांत देवरे उपस्थित होते.या विद्यार्थाला अनिल तांबेकर यांनी मार्गदर्शन केले.या विद्यार्थांनी मिळविलेल्या यशाबद्दल संकुल प्रमुख संजीव धामणे, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे व शाळेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी यांनी त्याचे कौतुक केले .

Saturday, February 25, 2023

ग्रामपंचायत संगणक परिचालक २७ फेब्रुवारी पासून कामबंद ठेऊन बेमुदत संपावर जाणार ,



नांदगाव( प्रतिनिधी ) -  ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून ११ वर्ष प्रामाणिक काम केलं आहे. संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना करत आहे. याच मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने २७ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व संगणकपरिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संप करणार असून १ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.
           याबाबत सविस्तर वृत्त की, संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत.परंतु शासनाने संगणकपरिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.आपले सरकार प्रकल्पात काम करणार्याि संगणकपरिचालकांवर नेहमी अन्याय करण्यात आलेला असून ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी च्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदर असलेल्या तुटपुंज्या ६००० रूपये मानधनात १००० रुपये वाढ केली.आज महागाईच्या काळात ७००० रूपयाच्या मासिक मानधनात संगणकपरिचालकानी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना वारंवार आश्वासन देऊन सुद्धा निर्णय होताना दिसत नाही.
     याआधी नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संघटनेच्या वतीने २७ व २८ डिसेंबर रोजी मोर्चा काडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्याची दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी लेखी आश्वासन दिले. त्यानुसार ११ जानेवारी २०२३ रोजी ग्रामविकासमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनेच्या मागणीनुसार शासनाने नेमलेल्या यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला . सदरची फाईल वित्त विभागास पाठवण्याचा निर्णय बैठकीत झाला, सध्या ग्रामविकास विभागाने वित्त विभागास सुधारित आकृतीबंधाची फाईल पाठवली आहे. परंतु त्यावर निर्णय होऊन निधीची तरतूद शासनाने अर्थसंकल्पातून करावी या प्रमुख मागणीसाठी २७ फेब्रुवारी २०२३ पासून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालकांना असलेली सर्व कामे बंद ठेऊन बेमुदत संप करण्यात येणार असून ०१ मार्च २०२३ रोजी राज्यातील संगणकपरिचालक हजारोंच्या संख्येने मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती व नांदगाव तालुका पूर्ण तकदी निशी मोर्चाला उपस्थित राहील असे सांगितले. नांदगाव मतदार संघाचे  आमदार सुहास आण्णा कांदे व नांदगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी व इतर पद अधिकारी यांना कामबंद व धरणे आंदोलनाचे निवेदन देण्यात आले .निवेदन देताना नांदगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ उरकुडे , तालुकासचिव श्रीकांत (नाना) जगताप , तालुका उपाध्यक्ष अरुण जाधव व इतर सदस्य उपस्थित होते . मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे नांदगाव तालुकासचिव श्रीकांत (नाना)जगताप यांनी दिली.  नांदगाव तालुका संपूर्ण ताकदीनिशी   मोर्चाला उपस्थित   राहील असे सांगितले.

Friday, February 24, 2023

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नांतून शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करण्यास मान्यता, फळझाडांची लागवड क्षेत्र वाढण्यास होणार मदत ,




  नांदगाव  ( प्रतिनिधी) -   कृषी विभागाचे प्रक्षेत्रावर शासकीय फळ रोपवाटिका प्रस्तावित करण्यासाठी  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कडून पाठपुरावा करण्यात आला होता.फळ रोपवाटिका क्षेत्र मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना आंबा कलमे , डाळिंब कलमे इत्यादी फळझाडांचे कलमे रोपे उपलब्ध होणार असून यासाठी आता तालुका किंवा जिल्हा बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. शिवाय फळझाडांची लागवड क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. 
   भविष्यात शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण, शेती प्रशिक्षण गृह प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय पद्धतीने उत्पादन वाढ करण्यासाठी मदत  होईल . नांदगाव  तालुका बीज गुणन केंद्र  या प्रक्षेत्रावर अंशतः रूपांतर करून शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करणे मान्यता मिळणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागा कडून शासन निर्णय काढण्यात आला आहे.
   नांदगाव तालुका बीज गुनन केंद्र  या प्रक्षेत्रावर अंशतः रूपांतर करून शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालक नाशिक यांच्याकडून प्राप्त झाला आहे . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड विषयाचा आढावा घेताना कलमी रोपे उपलब्ध न झाल्यामुळे प्रशासकीय मान्यता दिलेल्या क्षेत्रांपैकी कमी क्षेत्राची लागवड झाल्याचे दिसून आले आहे . त्याकरिता भविष्यात कलमे रोपांची उपलब्धता होण्यासाठी तालुका बीजगुणन केंद्र नांदगाव येथील प्रक्षेत्राचे रोपवाटिकेत रूपांतर करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी दिली आहे.

Wednesday, February 22, 2023

सोलो डान्स स्पर्धेत विद्यार्थ्यांकडून नृत्य सादर, शाळेतील ११० स्पर्धकांचा सहभाग,



नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव येथील नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल  आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूलची सोलो डान्स स्पर्धा यशस्वीरित्या घेण्यात आली .          
     विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल,  उपाध्यक्ष सरिता बागुल, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका खांडेकर , रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व पर्यवेक्षक म्हणून शिवानी गांधी या लाभल्या होत्या. त्यांनी आपल्या छोट्याशा नृत्य सादरीकरणातून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
 या स्पर्धेमध्ये एकूण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये एका विशिष्ट प्रकारचे नियमावली ठरवण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांना एका मर्यादित वेळेत आपले नृत्य सादर करावयाचे होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे वयोगटाुसार ग्रुप तयार करण्यात आलेले होते . या ग्रुपला अनुक्रमे ग्रुप ए,ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी..... ही नावे देण्यात आलेली होती. यामध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आले आणि प्रत्येक ग्रुप मधून विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून विद्यार्थ्यांना बक्षीसे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात पालकांनी प्रेक्षक म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका पिलके व नेहा यांनी केले.
     आज या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल, उपाध्यक्ष सरिता बागुल यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले.  ही स्पर्धा उत्तमरीत्या घडवून आणण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतोनात मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.

Tuesday, February 21, 2023

नांदगाव नगरपरिषद येथे अंजुमताई सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध अभियाना अंतर्गत गुणगौरव सोहळा ,


नांदगाव (प्रतिनिधी )  - नांदगाव येथे आज मंगळवारी २१ फेब्रुवारी  रोजी नांदगाव नगरपरिषद  महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत स्वच्छ भारत अभियान २०२३ माझी वसुंधरा ३.० व लोकशाही पंधरवाडा इ. शासनाच्या विविध अभियानाच्या माध्यमातून नांदगाव शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व बचत गटातील महिलांसाठी चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, निबंध,व संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विजेत्या स्पर्धकांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या केंद्रशासन पुरस्कृत उपक्रमांतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरि उपजीविका अभियान नांदगाव नगरपरिषद अंतर्गत गंगेश्वर महिला बचत गट व सिद्धेश महिला बचत गट यांना प्रत्येकी चार लाख रुपये अर्थसाह्याचा धनादेश कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. राजश्री राजेंद्र बेलदार (अध्यक्ष स्त्रीशक्ती शहर संघ) , शबाना मंसुरी (सचिव स्त्रीशक्ती शहर संघ), अलका दिलीप गायकवाड (अध्यक्ष एकविरा वस्ती संघ), रत्ना वाबळे (सदस्य नीलंबरी वस्ती स्तर संघ), कोमल भालेकर (सदस्य ज्ञानज्योती वस्ती स्तर संघ) , बेबीनंदा मोरे (निर्मिती वस्ती स्तर संघ) यांची माझी वसुंधरा 3.0 व स्वच्छ भारत अभियान २०२३ अंतर्गत नांदगाव शहराचे ब्रँड अँम्बेसिडर  म्हणून नियुक्ती केल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक, नांदगाव नगरपरिषद विवेक धांडे यांनी घोषित केले व अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 
            विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी वेळोवेळी अशा स्पर्धा घेतल्या पाहिजेत ज्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता येईल . यासाठी वेगवेगळ्या विषयांवर नियमितपणे स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. तसेच बचत गटांसाठी ४२ नवीन उद्योग व त्या उद्योग व्यवसायांचे प्रशिक्षण लवकरच सुरु करणार असल्याचे आणि महिला बचत गटांसाठी महिला बँक सुरु करणार असल्याचे अंजुमताई कांदे यांनी सांगितले. नगरपरिषद अंतर्गत रविण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम व अभियान या अंतर्गत स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिक वापरावर बंदी,आणि वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी व या अभियानाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पुढेही निरंतर असे अधिका अधिक उपक्रम सुरु राहतील असे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी केले.
  या  कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व व्ही.जे.हायस्कूलचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजीव धामणे, व्ही.जे. हायस्कूलचे मुख्याध्यापक  बडगुजर सर, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, शिक्षण मंडळाचे लिपिक अनिल पाटील, विजया धनवट , नांदगाव नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळेस उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी आनंद महिरे यांनी केले. तर आभार नगरपरिषद शिक्षण मंडळाचे शाळा क्रमांक सहा चे मुख्याध्यापक शहीद शेख यांनी केले.

नांदगावच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा,




नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये बुधवारी  दि. १५ फेब्रुवारी रोजी 'नमन एज्युकेशन सोसायटी' संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल नांदगाव आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा यशस्वीरित्या घेण्यात आली .          
     विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल,  उपाध्यक्ष सरिता बागुल, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका खांडेकर, रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  फॅन्सी ड्रेस स्पर्धा विद्यार्थ्यांची कलागुणांना वाव देण्यास मदत करते त्याचबरोबर स्टेज डेरिंग वाढवते.
      या स्पर्धेमध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषेतून समाजाला विविध संदेश देण्याचे कार्य केले. या कार्यक्रमाचे पर्यवेक्षण नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल , उपाध्यक्ष सरिता बागुल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे शाळेच्या शिक्षिका नगे व मोनाली यांनी केले. या स्पर्धेमध्ये एकूण १२५ मुलांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वयोगटा नुसार ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपला अनुक्रमे ग्रुप ए,ग्रुप बी,ग्रुप सी,ग्रुप डी या प्रकारे नाव देण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास सर्टिफिकेट वाटप करण्यात आले . प्रत्येक ग्रुप मधून प्रथम,द्वितीय तृतीय क्रमांक काढून विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
     आज या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल , उपाध्यक्ष सरिता बागुल यांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्यासपीठ निर्माण करून दिले. ही स्पर्धा उत्तमरीत्या घडवून आणण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतोनात मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.

नांदगाव येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभा मंडपाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन,



     नांदगाव (प्रतिनिधी )  नांदगाव येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा सभामंडप मंजूर करण्यात आला.आज मंगळवारी दि. २१ रोजी या सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
   याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी बापूसाहेब कवडे हे होते.मंचावर माजी नगराध्यक्ष बाळा काका कलंत्री, राजाभाऊ बनकर, बाली काका कवडे, राजाभाऊ मोरे ,विष्णू निकम, श्याम दुसाने, रमेश पगार, नांदगाव नगर पालिकेचे मुख्यअधिकारी विवेक धांडे ,राजाभाऊ मोरे ,अमृत पटेल, अनिल कळवा, राजाभाऊ देशमुख ,बाळासाहेब मोकळ, नगरसेवक वाल्मीक टिळेकर ,अमोल नावंदर, प्रकाश गायकवाड, पैठणकर तात्या, ईश्वर मोकळ, सादिक तांबोळी उपस्थित होते. 
    विष्णू निकम यांनी प्रस्तावना केली,
या मध्ये बोलताना त्यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आभार मानले, अपेक्षिले त्याहून जास्त आपण आम्हाला दिले असा दानशूर आमदार आम्ही या आधी पहिला नाही, या आधी बलाढ्य आमदार होऊन गेले पण दान करण्याची वृत्ती ही फक्त आपण दाखवली या बद्दल सावता महाराज समिती तसेच उपस्थितां कडून त्यांनी आभार व्यक्त केले. सर्व जाती पंथाला सोबत घेऊन चालणारा आमदार लाभल्याचे भाग्य आहे असेही ते म्हणाले. 
    ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी मनोगत व्यक्त करताना  आमदार सुहास आण्णा यांनी चौफेर आपले विकास कार्य सुरू ठेवले असून पाण्या सारखे पुण्याचे काम हाती घेऊन विविध योजना मार्गी लावल्या आता शेती सिंचनाला आपला मोर्चा वळवावा असे ते म्हणाले.
       आपल्या भाषणात बोलतांना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मी आमदार झालो त्याच दिवशी मी सर्व जाती धर्माचा, पक्षाचा, अगदी शेवटच्या स्थरावरच्या नागरिकाचा आमदार झालो आणि प्रत्येकाची सेवा करणे हे माझे कर्तव्य असल्याचे समजतो असे ते म्हणाले. मी आजपर्यंत मतदारसंघात अनेक विकास कामे करत असताना विविध पाणी योजना मार्गी लावल्या आता पुढचे लक्ष हे शेती सिंचनाला..असे करावे असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मला कधीही हाक द्या मी आपल्यासाठी सदैव उपलब्ध राहील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
       सुरुवातीलाच आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, ह. भ. प.गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांचे स्वागत केले . सूत्रसंचालन प्रशांत खैरनार यांनी केले तर बाळासाहेब मोकळं यांनी आभार मानले.  या प्रसंगी नांदगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघातील अपंग लाभार्थ्यांना सायकली वाटप ,


नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी स्वखर्चातून विविध लोक उपयोगी सुविधा लोकार्पण केल्या आहेत. यात २४.तास रुग्णवाहिका, २४. तास शववाहिका सेवा,२.फिरते दवाखाने, २.शासकीय कार्यालय, २.जेसीबी सेवा सुरू आहेत, सोबतच १३ फेब्रुवारी रोजी मनमाड येथे भूमिपूजन सोहळ्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० अपंग बांधवांना सायकल चे वाटप करण्यात आले. जवळपास ३००सायकल मतदारसंघात वाटप करण्यात आल्या आहेत, या मधील आज काही लाभार्थ्यांना "शिवनेरी" शासकीय विश्रामगृह नांदगाव येथे अंजुमताई कांदे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी नांदगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे हे उपस्थित होते.  यावेळी लाभार्थी नावे जयश्री प्रभाकर सुरसे (साकोरा) सुनंदाबाई राठोड (मूळडोंगरी), छगन मांगू चव्हाण (मूळडोंगरी), किसन ताराचंद चव्हाण (मूळडोंगरी), मंगलाबाई अशोक मोरे( मूळडोंगरी), बन्सीलाल सदा पिसाळ (जामदरी),  संगीता शरद निकम (जामदारी ), दादू राजेंद्र गांगुर्डे (नांदगाव) या लाभार्थ्यांना आज सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले आहेत.
      या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी च्या रोहिणी मोरे, प्रहार संघटनेचे संदीप सूर्यवंशी मिथुन पवार, कुसुमतेल सरपंच संजय पाटील, जामधरी सरपंच बाबासाहेब मोरे साकोरा सरपंच शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

Sunday, February 19, 2023

गंगाधरी सरपंच , उपसरपंचांचा आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश,



 नांदगाव, गंगाधरी( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील  गंगाधरी  ग्रामपंचायत चे राष्ट्रवादीचे सरपंच सुनील गणेश खैरनार उप सरपंच वर्षा गणेश ईघे , गणेश शिवाजी ईघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत आज आमदार निवास स्थानी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
   आमदार सुहास आण्णा कांदे शिवबंधन बांधत भगवी शाल , पुष्पगुच्छ देऊन यांचे पक्षात स्वागत केले. आपल्याला येथे मान सन्मान मिळेल, आपल्या सूचना ऐकून घेतल्या जातील तसेच विकासाकरिता सदैव आपल्या सोबत राहू अशी ग्वाही या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दिली. 
   या वेळी जिल्हा प्रमुख किरण देवरे, गंगाधरी चे शिवसेना शाखा प्रमुख दिगंबर भागवत, रमेश गांगुर्डे, राजाभाऊ देशमुख, संजय आहेर, रामहरी ईघे, भगीरथ जेजुरकर, सोपान जाधव, नाना ईघें, साहेबराव मोकळं, संदीप खैरनार, अनिल बागुल, भरत ईघें उपस्थित होते.

Saturday, February 18, 2023

महाशिवरात्री निमित्त श्री नंदेश्वर महादेव मंदिराच्या वतीने भव्य शोभायात्रा, मंदिरात भाविकांची मोठी गर्दी,



नादगाव( प्रतिनिधी) -  नांदगाव शहरातील श्री नंदेश्वर महादेव मंदिरात ओम नम: शिवाय,हरहर महादेव,बम बम भोलेंच्या गजरात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी पहाटे पासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. भक्तीमय वातावरण महापुजा करण्यात आली.
    महाशिवरात्री निमित्ताने शहरातून दुपारी नांदेश्वर महादेव पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका जय शंकर मधील बाल शंकराचे पात्र साकारणारा बाल कलाकार आरूष बेडेकर होता. माधवनाथ महाराजांच्या पालखी मागे रथावर बसून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पालखी मिरवणूक प्रमुख  मार्गाने काढून पालखीचा समारोप नांदेश्वर महादेव मंदिर येथे करण्यात आला.
पालखी समवेत मोठ्या संख्येने महिला व पुरुष, लहान मुले सहभागी झाले होते. महाशिवरात्री निमित्त शहरातील विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Friday, February 17, 2023

नांदगावला कासलीवाल विद्यालयात महाशिवरात्री व शिवजयंती उत्साहात साजरी, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आधारित पोवाडे गायली,



नांदगाव शहर (प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये शुक्रवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी सौ.क.मा. कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात महाशिवरात्री व शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक गोरख डफाळ व  विशाल सावंत  यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.शाळेच्या प्रांगणात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थी शिवाजी महाराजांच्या व माता जिजाऊंच्या वेशभूषेत आले होते. तसेच महाशिवरात्री असल्याने काही विद्यार्थी महादेवाच्या व पार्वतीच्या वेशभूषेत आले होते. प्रथम विद्यार्थ्यांचे भाषणे घेण्यात आली. हर्षवर्धन साठे,तन्वी दळवे,सायली काकळीज,पार्थवी वेताळ,यांनी शिवाजी महाराजांवर अतिशय छान प्रकारे भाषणे सादर केले.तसेच भक्ती थोरात,अन्वी पवार,खुशी जेजुरकर,लावण्या जगधने, या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज आधारित पोवाडे छान प्रकारे सादर केली.विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित विविध घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय.जय भवानी जय शिवाजी,हर हर महादेव. तसेच काही विद्यार्थी महादेव आणि पार्वतीच्या वेशभूषेत आले होते. त्यांनी महादेवावर आधारित गीते सादर केली. आणि संपूर्ण परिसर भक्तीमय,शिवमय करून टाकला. अशा दोन्ही कार्यक्रमाचा संगम विद्यार्थ्यांनी घडवून आणला. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी शाळेच्या आवर दणाणून गेले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडक्यात माहिती श्रीमती.निलोफर पठाण व संदिप आहेर सरांनी सांगितली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती मोरे,आणि विधी साळंखे यांनी केले. या कार्यक्रमात वेशभूषेत बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय, सुनील कुमार कासलीवाल, सचिव विजय चोपडा,  पी.पी गुप्ता, सरचिटणीस प्रमिला कासलीवाल, संचालक महिंद्र चांदिवाल, तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक,  विशाल सावंत व गोरख डफाळ,शाळेतील ज्येष्ठ शिक्षक  किशोर बागले. यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, विजय जाधव, तुषार जेजुरकर, श्रीमती. धन्वंतरी देवरे,निलोफर पठाण, जयश्री पाटील, आदिती चव्हाण, अनुराधा सागर,मीना सुरळकर, निकिता देशमुख,यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिंदे गटाला शिवसेना पक्षांचं नांव, चिन्ह धनुष्यबाण निर्णय जाहीर होताच नांदगावमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा,



नांदगाव शहर (प्रतिनिधी) -   केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह धनुष्यबाण निर्णय जाहीर करताच नांदगाव येथील आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालय चांडक प्लाझा या ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आला. 
  शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी,  व मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. 
   उपस्थित शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवत तसेच फटाक्याची आतिषबाजी करत आनंद साजरा केला.  या यावेळी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो, सुहास अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आमची आन-बान शान धनुष्यबाण अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

नांदगाव शहरात शिव तांडव स्तोत्राचे सामुहिक पठणाच्या उपक्रमात १०८ विद्यार्थी, महाशिवरात्री पूर्व संध्येचे औचित्य साधून नियोजन,


नांदगाव शहर ( प्रतिनिधी) - शिव तांडव स्तोत्राचे सामुहिक पठण शहरातील प्राचीन नांदेश्वर महादेव मंदिर परिसरात १०८ विद्यार्थ्यांनी केले. नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचालित व्ही.जे.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालासुरात सामुहिक स्तोत्र पठणाचा उपक्रम घेतला. महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येचे औचित्य साधून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.मृण्मयी दंडगव्हाळ व समिक्षा देसले या विद्यार्थिनींनी कथक नृत्याव्दारा तांडव नृत्य सादर केले.सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक चंद्रकांत दाभाडे व अविनाश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.संकुल प्रमुख संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे यांनी सर्व सहभागी विद्यार्थांचे कौतुक केले.

Thursday, February 16, 2023

राजापुरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेध करत राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारवरील हल्ले प्रकरणी कठोर कारवाई करावी, नांदगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोलिस उपविभागीय व तहसीलदार यांना निवदेनाद्वारे मागणी,




 नांदगाव (प्रतिनिधी ) - सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जात आहे. पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे,पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. पत्रकारांवर जीव घेणे हल्ले सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे. ही चिंतेची बाब आहे यास आळा घालण्यासाठी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि संलग्न नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस उपविभागीय अधिकारी समरसिंग साळवे व तहसिलदार डॉ सिद्धार्थकुमार मोरे यांना निवेदन देण्यात आले.
   राजापूर चे युवा पत्रकार शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटल्याची सुनावणी फास्टट्रैक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी संघटनेच्या वतीने मागणी केली असून. राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबत नाही. राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत. हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावातसेच राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली आहे. या वेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा
समन्वयक संजीव निकम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बब्बू भाई शेख नांदगाव मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश शेळके, जेष्ठ पत्रकार संजीव धामणे माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम सरचिटणीस आमिन नवाब शेख, उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव, सुहास पुतांबेकर, मोहम्मद शेख, महेश पेवाल, अनिल धामने ,परवेज शेख,भगवान हिरे, किरण डोंगरे, भारत देवरे, गणेश आहेर आदी पत्रकार हजर होते.

दुचाकीच्या समोरासमोर धडकेत नांदगावमधील दोघांचे अपघाती मृत्यू ,



नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) -  चाळीसगाव तालुक्यातील खडकी जवळील नव्या राष्ट्रीय महार्गावर काल  दुपारी दोन दुचाकींच्यात झालेल्या भीषण अपघातात नांदगाव येथील दोघे ठार झाले.
   यात ढेकू येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक व परधाडी येथील सेवानिवृत्त लष्करी जवानाचा समावेश आहे. या घटनेमुळे नांदगाव व परधाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे.  दुपारी चार वाजेच्या सुमाराला नांदगावहून चाळीसगावकडे दुचाकीने जाणाऱ्या व समोरून येणाऱ्या दुचाकीशी जबरदस्त धडक झाली.
त्यात दोघाही दुचाकीचे अतोनात नुकसान झाले व दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू झाला. चाळीसगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात ढेकू खुर्द येथील प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले योगेश आनंदा जाधव (वय -४६) हे आपले मित्र विजय सोळसे यांच्यासह नांदगाव येथील आपल्या घरून दुपारी चाळीसगावला नव्या दुचाकीने निघाले होते.
या घटनेमुळे नांदगाव व परधाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे.  दुपारी चार वाजेच्या सुमाराला नांदगावहून चाळीसगावकडे दुचाकीने जाणाऱ्या व समोरून येणाऱ्या दुचाकीशी जबरदस्त धडक झाली. त्यात दोघाही दुचाकीचे अतोनात नुकसान झाले व दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू झाला. चाळीसगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात ढेकू खुर्द येथील प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले योगेश आनंदा जाधव (वय- ४६) हे आपले मित्र विजय सोळसे यांच्यासह नांदगाव येथील आपल्या घरून दुपारी चाळीसगावला नव्या दुचाकीने निघाले होते.

Wednesday, February 15, 2023

नांदगाव तालुक्यात संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त अंजुमताई कांदे सहभागी,


नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) -  संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आज बुधवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी सौ.अंजुमताई कांदे यांनी विविध तांड्यांवर उपस्थित राहून संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सवात सहभाग घेतला.
  नांदगाव तालुक्यातील   वसंत नगर तांडा ,  ढेकू तांडा येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. ढेकू सेवागड तांडा येथील आई जगदंबा माता व संत सेवालाल महाराज मंदिर प्राणांगणात आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव प्रसंगी आवर्जून उपस्थित होत्या.
   याप्रसंगी बोलताना अंजुम ताईंनी बंजारा समाजातील मुलींना शिक्षणात प्रेरणा मिळावी म्हणून बारावी च्या परीक्षेत पहिल्या तीन मध्ये येणाऱ्या मुलींना भविष्यातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाहीर केले. बंजारा समाजाप्रती नेहमीच आमदार सुहास अण्णा कांदे व आम्हा सर्व कुटुंबीयांना प्रेम आहे आणि यापुढेही राहणार, तसेचआपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण द्या असेही आवाहन त्यांनी केले. 
बंजारा समाजातील तरुण मोठ्या संख्येने भारतीय सेनेत सेवा देत असून त्यातील काही जवान या ठिकाणी उपस्थित होते, या सर्वांचे ताईंच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला.कुमारी गायत्री सुनील चव्हाण या विद्यार्थिनीने उत्कृष्ट भाषण केले, ताईंनी तिचा सत्कार करत तिला ५०१₹ रुपयांचे बक्षीस या वेळी दिले.
    याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप मनमाड शहर प्रमुख संगीता ताई बागुल नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे, एन के राठोड, कांतीलाल चव्हाण, खूपचंद चव्हाण, भोपालाल राठोड गोरख चव्हाण, ढेकू ग्रामपंचायत सरपंच, उप सरपंच सदस्य आदींसह मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव मात्र भगिनी उपस्थित होत्या.

Monday, February 13, 2023

करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन ,


 मनमाड (विशेष प्रतिनिधी )-   मनमाड शहरासाठी बहुप्रतिक्षित असलेल्या करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी त्यांनी मनमाड शहरासाठी १ रुपयाही निधी कमी पडू देणार नाही,  असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली.केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांनीही कांदे यांचे आभार मानले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे , उद्योग मंत्री  उदय सामंत , आमदार सुहास कांदे, अंजुम ताई कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी सभापती विलास आहेर , साईनाथ गिडगे, तेज कवडे, बाळकाका कलंत्री, आनंद कासलीवाल, संजय पवार, बबलु पाटील,  शिंदे गटाचे बाळासाहेबांची  शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने आदींची उपस्थिती होती .
 

Sunday, February 12, 2023

व्ही.जे.हायस्कुल मध्ये शालेय वकृत्व व रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग , लोकशाही संवर्धन पंधरवडा शासकीय उपक्रमांतर्गत आयोजन,


 नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ  संचालित व्ही.जे.हायस्कूल  मान्यवरांच्या   उपस्थितीत ' लोकशाही संवर्धन पंधरवडा ' या शासकीय उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी वकृत्व व रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या.  विद्यार्थ्यांनी लोकशाही संवर्धन संदर्भित २५ आकर्षक रांगोळ्या काढल्या तसेच २० विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले , संकुल प्रमुख संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे बक्षिसपत्र विद्यार्थ्यांचे व सहभागी विद्यार्थांचे कौतुक केले. या स्पर्धा यशस्वीतेसाठी गुलाबराव मोरे, संगीता शिंदे, प्राजक्ता आहेर, चंद्रकांत दाभाडे, विजय चव्हाण, सुनीता देवरे, ज्ञानेश्वर डंबाळे, सुनीता कर्डिले, संध्या परदेशी यांनी परिश्रम घेतले.

Thursday, February 9, 2023

नांदगाव येथे शालेय स्तरावर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा,



नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील  नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची   प्रश्नमंजुषा स्पर्धा बुधवारी दि.८ रोजी यशस्वीरित्या घेण्यात आली .        विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत  नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल  ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी  यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यार्थ्यांची सॉफ्ट स्कील तयारी शिक्षकाकडून करून घेण्यात आली होती. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी अभ्यास विद्यार्थ्यांनी करून घेतला होता .
      या स्पर्धेमध्ये विविध राऊंडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे चार ग्रुप तयार करण्यात आले होते पहिला ग्रुप ज्यूपिटर दुसरा ग्रुप सॅटर्न तिसरा ग्रुप व्हीनस आणि चौथा ग्रुप हा मर्क्युरी होता. त्यामध्ये व्यक्तींची ओळख, फरक ओळखा, विज्ञानाशी व अबॅकसशी निगडित प्रश्न इ. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी यासाठी जी. के. राऊंड आणि ओळखा पाहू मी कोण? हे राऊंड घेण्यात आले. विद्यार्थ्यांना ही प्रश्नमंजुषा गमतीदार वाटावी आणि या प्रश्नमंजुशे चा आनंद घेता यावा म्हणून फनते जे राऊंडचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी कृती करून उत्तरे शोधायची होती चित्रे बघून कविता ओळखायची होती.
      या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल मॅम ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी  यांनी मुलांना खूप छान व्यासपीठ उपलब्ध करून दिले. 
     ही स्पर्धा उत्तमरीत्या घडवून आणण्यासाठी लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक पांडे सर तसेच रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना मॅम,जयश्री मॅम, मोनाली मॅम,अश्विनी मॅम यांनी अतोनात मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.

सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार असणे गरजेचे - डॉ.ख्याती तुसे



नांदगाव ( प्रतिनिधी ) - सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी आपल्या आहारातून सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळणे शरीराला गरजेचे असते .म्हणून आपल्या आरोग्यासाठी संतुलित आहाराची गरज आहे असे प्रतिपादन नांदगाव ग्रामीण रुग्णालय च्या अधिक्षक डॉ.ख्याती तुसे यांनी व्ही.जे.हायस्कूल येथे ‘’ जागरूक पालक ,सुदृढ बालक’’ अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन पर भाषणात सांगितले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभर ‘’ जागरूक पालक ,सुदृढ बालक’’ अभियानाला सुरवात करण्यात आली .या अभियानाचे उद्घाटन राज्यभर ठिकठिकाणी करण्यात आले नांदगाव तालुक्यात उद्घाटन व्ही.जे.हायस्कूल येथे नुकतेच संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष जगताप,गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले , शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे ,मुख्याध्यापक मनोहर बडगुजर,उपमुख्याध्यापक दिपक बाकळे,पर्यवेक्षक मनोहर शिंदे,आर.बी.एस.के.च्या आरोग्य टीमचे सर्व डॉक्टर व नर्स उपस्थित होते. या प्रसंगी डॉ.ख्याती तुसे यांनी माहिती दिली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष जगताप यांनी या अभियाना अंतर्गत 0 ते १८ वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी करणे,आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे,गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा पुरविणे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरविणे ,सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे असे उपक्रम या अंतर्गत राबविले जाणार आहे याची माहिती देऊन विद्यार्थांचे समुपदेशन केले.प्रमोद चिंचोले यांनी आरोग्य चांगले असेल तर अभ्यासातही आपण चांगली प्रगती करू शेकतो तसेच आपण विविध क्षेत्रात पुढे प्रगती कराल असे सांगितले तर संजीव धामणे यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थांना आरोग्याच्या काही समस्या असतील तर आमच्या विद्यार्थांना योग्य पद्धतीने आरोग्य विभागाने सहकार्य करावे असे सांगितले.
      यानंतर महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आयोजित झूममिटिंग व्दारे मुख्यमंत्री ,आरोग्य मंत्री , आरोग्य संचालक यांनी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करून राज्यभरातून विद्यार्थी व पालकांना यांना सहभागी करून घेतले व मार्गदर्शन केले.या ऑनलाईन उद्घाटनाला नांदगाव तालुक्यातून व्ही.जे.हायस्कूल शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक,शालेय पदाधिकारी व आरोग्य विभा गातातील पदाधिकारी झूममिटिंग व्दारे सहभागी झाले.या अभियानच्या शाळेतील उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व विद्यार्थांनी गुलाबपुष्प देऊन केले.आभार शाळेचे मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांनी आभार मानले व सूत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केले. तर ऑनलाईन व्यवस्था अनिल तांबेकर यांनी केली.कार्यक्रम यशस्वितेसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Wednesday, February 8, 2023

नांदगाव येथे शालेय क्रीडा स्पर्धां उद्घाटन सोहळा संपन्न,



नांदगाव ( प्रतिनिधी) -  नमन एज्युकेशन संचलित लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल"आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
   सोमवारी दि. ०६ फेब्रुवारी रोजी नमन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संजय बागुल संस्थापिका सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी क्रीडा शिक्षिका श्रीमती मयुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शालेय प्रांगणात शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा पार पडला‌.
               या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विष्णु निकम सर (निवृत्त क्रीडाशिक्षक) बाबासाहेब कदम आनिल धामणे तसेच शालेय संस्थापक संजय बागुल व संस्थापिका सरिता बागुल, लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर, रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्याहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे गुलाबपुष्प तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
                या क्रीडा स्पर्धा शालेय प्रांगणात मोठ्या उत्साहात भरविण्यात आल्या होत्या.सर्वप्रथम मशाल पेटवून प्रगतीचे उंच उंच शिखरे गाठण्यासाठी माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते फुगे आकाशात सोडण्यात आले.व फटाके फोडण्यात आले.आणि लेझीम पथक,सारी ड्रील,एरोबिक्स, पिरॅमिड असे विविध धमाकेदार परफॉर्मन्स प्रमुख पाहुण्यांसमोर सादर करण्यात आले.
       त्यानंतर लगेचच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेची वार्षिक दिनदर्शिका २०२३ उद्घाटन सोहळा पार पडला.आणि सांघिक खेळांना सुरूवात झाली. 'ड्रॉप रो बॉल ,व्हॉलीबॉल हे सांघिक खेळ घेण्यात आले.
          आल्हाददायक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचलन शालेय शिक्षिका ज्योती सुरसे यांनी केले.आणि उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानण्यात आले.
          हा कार्यक्रम उत्कृष्टपार पाडण्यासाठी लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले, अंकिता सरोदे ,भाग्यश्री शिंदे, धनश्री न्याहारकर ,पूनम सोमासे ,विजेता पिलके ,सुरेखा गायकवाड, नेहा पाटील, ज्योती सुरसे, वर्षा नगे ,संदीप पांडे ,राहुल उपाध्याय, मोहन सुरसे, अनिता जगधने, क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर , रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना फर्नांडिस, मोनाली गायकवाड, जयश्री चौधरी, चैताली अहिरे, रोहिणी पांडे ,अश्विनी केदारे  ,दिव्या शिंदे ‌‌, मदतनीस  अनिता नेमणार, वैशाली बागुल, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला होता.

बेकायदेशीर सरकार २-३ महिन्यात कोसळेल, शिवसंवाद यात्रेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा गद्दार आमदारांवर जोरदार निशाना,



नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिकच्या नांदगाव मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यावर हल्ला बोल केला हे गद्दारांचं सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे..२-३ महिन्यात सरकार कोसळेल,जेथे जेथे हे गद्दार जातात त्यांचे पन्नास खोके, सब ओकेच्या घोषनेने स्वागत केले जात आहे..मुख्यमंत्री अनेक वेळा दिल्लीला गेले पण एकही उद्योग आणता आला नाही.. महाराष्ट्र साठी नाही तर माझं काय होणार यासाठी दिल्लीला जातात. महाराष्ट्रातून एका पाठोपाठ एक उदयोग जात आहे मात्र यासाठी काहीही केले जात नाही सर्व उद्योग गुजरात मध्ये जात आहे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही.. त्या अगोदर सरकार कोसळेल. राज्यात आणि देशात जाती जाती धर्मा धर्मात फूट पाडली जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ही सरकारवर जोरदार टीका केली.
           शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांची शिवसांवाद यात्रा सातव्या टप्यात असुन ही यात्रा नाशिकहून मराठवाडा विभागाकडे जाताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवरील नांदगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला.या यात्रेत ते मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर ते काय बोलणार ? विषयी मोठी उत्सुकता होती यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारी यांना जाहीर करावी अशी मागणी करून खळबळ उडवून दिली. व्यासपीठावर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार नरेंद्र दराडे, जयंत दिडे,माजी आमदार अँड जगत्राथ धात्रक , माजी आमदार राजाभाऊ देशमुख, संपर्कप्रमुख अल्ताफ खान , शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,कुनाल दराडे, अद्धय  हिरे, शशिकांत मोरे , संतोष बळीद, श्रावन आढव,प्रविण नाईक  माधव शेलार आदीची उपस्थिती होती ‌ शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी प्रास्ताविक केलेे, संतोष जगताप यानी सूत्रसंचालन केले . 

नांदगावात कांग्रेस पक्षाकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत,
    -    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. पर्यावरण मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेब यांचे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने नांदगाव नगरीत आगमन झाले असता त्यांचे कवडे नगर चौकामध्ये नांदगांव तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतांना मा. आ.अँड.अनिलदादा आहेर तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांचे ही याप्रसंगी जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळेला उपस्थित काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हरेश्र्वर सुर्वे काँगेसचे शहर अध्यक्ष मनोज चोपडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती उदय पवार ,उदय पाटील,कैलास गायकवाड, डॉ.अरुण पवार ,संदीप मवाळ,सागर कांदळकर,सोमनाथ वाबळे,विलास सरोवर ,अरुण निकम ,अय्युब शेख, डॉ,पुंजाराम आहेर, डॉ.सागर भिलोरे, पुंडलिक सदगिर ,जितेंद्र देशमुख,भगवान डांगे,सुनील पवार , चादोरा गावचे सरपंच प्रवीण घोटेकर, रणखेडा सरपंच शांताराम शिंदे, विनोद पवार,दर्शन आहेर , सुषेन आहेर,भूषण आहेर ,अँड.कुनाल आहेर,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष निरंजन आहेर,सागर साळुंके,सुशील गवळी,सागर जाधव, आदिसह काँगेस पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, February 7, 2023

नांदगाव नगरपरिषद प्रशासनाने तर्फे पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत “मै भी डिजिटल ४.०” मोहिमेचा लाभ घेण्याचे पथविक्रेत्यांना आवाहन ,



 नांदगाव (प्रतिनिधी) -   नांदगाव नगरपरिषद येथे “ केंद्र शासन पुरस्कृत” प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधि ) योजनेअंतर्गत नांदगाव शहरातील लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांना डिजिटल ऑन बोर्ड चे प्रशासक तथा मुख्याधिकारी  विवेक धांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी  मुक्ता कांदे, सहायक प्रकल्प अधिकारी आनंद महिरेे ,   राहुल कुटे (कर निरीक्षक) इ. उपस्थित होते. नादगाव शहरात ३८१ पथविक्रेत्यांची नोंदणी झालेली असून, आतापर्यंत २१० पथविक्रेत्यांना रुपये १००००/- चे पहिल्या टप्प्याचे तर ८४ पथविक्रेत्यांना रुपये २००००/ चे दुस-या टप्प्याचे आणि १७ पथविक्रेत्यांना रुपये ५००००/- चे तिस-या टप्प्याचे कर्ज शहरातील बँकांमार्फत वितरीत करण्यात आले आहे. “मै भी डिजिटल ४.०” या मोहिमे अंतर्गत “ केंद्र शासन पुरस्कृत” प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधि ) योजनेअंतर्गत नांदगाव शहरातील लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांना “मै भी डिजिटल ४.०” या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन नांदगाव नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. पथविक्रेत्यांना खेळते भांडवल मिळावे या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली केंद्र शासनाची प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना सध्या राज्यात राबविली जात आहे. या योजनेचा महत्त्वाचा भाग म्हणजे पथविक्रेत्यांचे औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेशन करणे होय . लाभार्थी पथविक्रेता यांनी आर्थिक व्यवहार करताना डिजिटल साधनांचा वापर केल्यावर पथविक्रेत्यांना कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त कॅशबॅक प्राप्त होणार आहे. या कामी पीएम स्वनिधि योजनेचा लाभ मिळालेल्या पथविक्रेत्यांनी डिजिटल पेमेंट साधनांचा वापर करावा याबाबत शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे. नांदगाव शहरात दिनांक ७ फेब्रुवारी  ते  १६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत “मै भी डिजिटल ४.०” नावाची मोहीम राबविण्यात येत आहे . त्यानुसार पीएम स्वनिधि योजने अंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या परंतु अद्याप पावतो डिजिटल पेमेंट साधनांचा वापर न केलेल्या पथविक्रेत्यांनी नांदगाव नगरपालिकेच्या एनयुएलएम कक्ष येथे संपर्क साधून डिजिटल ऑन बोर्डिंग प्रशिक्षण घेऊन त्वरित त्यांना मिळालेल्या कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त डिजिटल ऑन बोर्डिंग द्वारे मिळणाऱ्या कॅश बँक याचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे जाहीर आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी  विवेक धांडे यांनी केले आहे.

Monday, February 6, 2023

नांदगाव च्या शाळेत विज्ञान प्रदर्शन , मुलां - मुलींनी केले विविध प्रयोगांचे सादरीकरण,


 नांदगाव ( प्रतिनिधी) -    नमन एज्युकेशन संचलित "लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल"आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शुक्रवार दि.०३ फेब्रुवारी रोजी नमन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संजय बागुल संस्थापिका सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शालेय प्रांगणात शालेय विज्ञान प्रर्दशन आयोजित करण्यात आले होते.
              आजच्या या विज्ञान प्रदर्शनाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रभा सुर्यवंशी शेळके .पाटील तसेच शालेय संस्थापक संजय बागुल व संस्थापिका सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्याहस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
                हे प्रदर्शन शालेय प्रांगणात मोठ्या उत्साहात भरविण्यात आले होते.शालेय प्रांगणात मंडप टाकून मुलांचे विविध मॉडेल् ,विविध प्रयोग व्यवस्थित रित्या मांडण्यात आले होते.मुलां- मुलींनी अतिशय सुंदर पणे आपआपल्या प्रयोगांचे सादरीकरण केले.शाळेतील सर्व मुलांना विज्ञान प्रदर्शन दाखविण्यात आले. त्यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्माननीय प्रमुख अतिथी तसेच सन्माननीय संचालक संजय बागुल संचालिका सरिता बागुल यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.अशा रितीने अतिशय आल्हाददायक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
           कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचलन शालेय शिक्षिका जयश्री चौधरी यांनी केले व सर्वांचे आभार मानले.
सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेस भरभरुन प्रतिसाद दिला.
          हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यासाठी लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले अंकिता सरोदे भाग्यश्री शिंदे धनश्री न्याहारकर पूनम सोमासे विजेता पिलके सुरेखा गायकवाड नेहा पाटील ज्योती सुरसे वर्षा नगे संदीप पांडे राहुल उपाध्याय मोहन सुरसे अनिता जगधने क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड जयश्री चौधरी चैताली अहिरे रोहिणी पांडे अश्विनी केदारे ,दिव्या शिंदे ‌ तसेच मदतनीस अनिता नेमणार, वैशाली बागुल, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला.

हनुमान नगर येथे सुतार समाज्याचे आराध्य दैवत प्रभु श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सवात साजरी,


 नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये शनिवारी दि. ०४  रोजी सुतार समाज्याचे आराध्य दैवत प्रभु श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव सालाबादाप्रमाने हनुमाननगर येथील श्री विश्वकर्मा महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी १०ः०० वाजता श्री विश्वकर्मा महाराज मुर्तीची विधिवित पुजा व सत्यनाराण महापुजा भारत शेलार व राणी शेलार यांनी सपत्नीक केली तर महाआरती विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी सपत्नीक यांनी केली.
    यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपा माजी तालुकाध्य दत्तराज छाजेड,चंद्रशेखर कवडे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,जेष्ट पत्रकार सुरेश शेळके,संजय मोरे,अँँड सचिन साळवे,शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील जाधव,सर्जेराव पाटील, नंदू पाटील,बाळासाहेब खैरणार आदी उपस्थित होते.
जयंतीनिमित्त समाज बांधवांना जेष्टे नेते बापुसाहेब कवडे,आमदार सुहास कांदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांनी शुभेच्छा दिल्या..या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथींचा सत्कार विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख अतिथी दत्तराज छाजेड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की श्री विश्वकर्मा भगवान हे सर्व समाज्याचे दैवत आहे तालुक्यात सुतार समाज्याचे संघटन असून याचे फलित नांदगाव शहरात प्रभू विश्वकर्मा भगवान चे भव्य मंदिर उभारले असून या बरोबरच इतर कामे जोमात सुरू आहे. आमदार सुहास कांदे यांनी मंदीर परिसरात सभामंडपसाठी निधी दिला त्याबद्दल समाज्याच्या वतीने आभार मानले.श्री विश्व कर्मा सुतार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष संजय कदम यांनी नांदगाव तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दत्तराज छाजेड यांनी सत्कार केला. यावेळी उपस्थित महिलानी हळदी कुंकवाच कार्यकम झाला.उपस्थिताना विश्वकर्मा युवा मंडाळा तर्फ महाप्रसाद वाटप करण्यात आला.या प्रसंगी विश्वकर्मा सुतार समाज विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय कदम उपाध्याक्ष प्रा.वात्मिक जाधव,सचिव बाबासाहेब कदम खजिनदार दिपक मोरे संचालक नंदुलाल अहिरे,सुभाष पेंढारकर,मधुकर खैरनार,राजेंद खैरनार,दिगबर गवळे,दयाराम सूर्यवंशी,बापु जाधव, अशोक कदम सोपान कदम,बाळासाहेब जाधव, सुनील शेलार ,संतोष जाधव,विश्वकर्मा युवा मंडळाचे किरण हिरे,जयवंत पेंढारकर चंद्रकांत गवळे,नरेंद्र सूर्यवंशी,सौरभ मोरे,समाधान कदम,लखन ठाकरे,स्वप्नील खैरनार,समाधान खैरनार, मयूर कदम,महिला संगिता कदम,सुलोचना खैरनार,उषा पेंढारकर,सुंनदा आहिरे,मनिषा कदम,विद्या कदम,पुष्पा मोरे,निता जाधव,दिपाली आहिरे,सोनाली जाधव,फुलवंता,पेंढारकर,वर्षा मोरे,आदी माहिला मोठया संख्येने उपस्थितत होते.



आज नांदगाव येथे माता रमाई जयंतीनिमित्त "मी रमाई " चित्रपटाचे आयोजन ,



नांदगाव (प्रतिनिधी) -  त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्त ७ फेब्रुवारी रोजी आई इंटरनॅशनल फिल्म प्रॉडक्शन एकपात्री संकल्पनेतून मराठी चित्रपट "मी रमाई' दाखवण्यात येणार असल्याचे राजर्षी शाहू महाराज सामाजिक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. नांदगाव शहरात प्रथमच माता रमाई यांच्या जयंती निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक संघटनेच्या वतीने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रियांका उबाळे यांच्या उपस्थितीत "मी रमाई" चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यावेळी माता रमाई यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले आहे. श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर कंपाउंड नांदगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sunday, February 5, 2023

उद्या नांदगाव मध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा शेतकरी संवाद दौरा,

            

नांदगाव ( प्रतिनिधी) -  शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे हे उद्या मंगळवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनला शेतकरी संपर्क दौऱ्या निमित्त नांदगांव च्या जैन धर्मशाळा येथे येत आहे.  त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  हेही शिव सेनेच्या अनेक मान्यवरासोबत उपस्थितीत राहणार आहेत.  शेतकरी संवाद दौऱ्याची अशी माहिती  तालुक्यातील पदाधिकार्यांनी दिली आहे. शेतकरी प्रश्नावरून सरकार चे लक्ष वेधणार आहे.  राज्यात सत्तांतर झाल्यानंतर  युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा यानिमित्ताने नांदगाव दौरा महत्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्रा तील बंडखोरी केलेल्या आमदारांचा मतदार संघ ते पिंजून काढत आहे.  शेतकरी मेळाव्यातून बंडखोर आमदारांवर काय भाष्य करता अख्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतील .

नांदगाव शहरातील चौकाचौकात राज्य गीतांचे सामुहिक गायन,



नांदगाव (प्रतिनिधी) -  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक संचलित व्ही.जे.हायस्कूल नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी स्वानंद उपक्रमांतर्गत नांदगाव शहरातील चौकाचौकात राज्य गीतांचे सामुहिक गायन केले.इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. महाराष्ट्र शासनाने या गीताला नुकताच राज्य गीतांचा दर्जा दिला आहे.या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कलाशिक्षक चंद्रकांत दाभाडे यांनी केले. नांदगाव संकुल प्रमुख संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे, अविनाश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Thursday, February 2, 2023

नांदगाव शहरातील संगिता सोनवणे यांची महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा योजनेसाठी ब्रँड अँम्बेसिडर म्हणून नियुक्ती,



: नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील  विविध समाजपयोगी उपक्रमाची तसेच समाजेसेवेची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा २०२३- २४ योजनेसाठी नांदगाव नगर परिषदेच्या वतीने ( “ब्रँड अँम्बेसिडर " ) म्हणून समाजसेविका संगिता सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपासक व सेवेकरी संगीता सोनवणे यांच्या निवडीने  सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
  त्यांनी नांदगाव नगरपरिषद परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले असून, यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, विविध सामाजिक संस्थांतर्फे समाजभूषण व अभिमान महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता नांदगाव नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ आणि  वसुंधरा अभियान अंतर्गत संदेश/पर्यावरणाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजसेविका संगिता सोनवणे यांनी सांगितले की, "  शहरातील स्वच्छतेत तसेच पर्यावरण जागृतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.


दैनिक सकाळचे बातमीदार बाबासाहेब कदम यांना २०२२-२३ चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे घोषणा लवकरच मान्यवरांच्या हस्ते होणार गौरव,

          बाबासाहेब कदम,   पत्रकार 

 नांदगाव (प्रतिनिधी ) - नाशिक जिल्ह्यातील क्रियाशील पत्रकारांची एकमेव संघटना असलेल्या नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि.नाशिक चे सन्माननीय २०२२-२३ च्या जीवनगौरव व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांनी जाहिर केले.ज्येष्ठ पत्रकार स्व.गंगाधर खुटाडे व ज्येष्ठ पत्रकार स्व.सुरेश अवधूत यांचे स्मरणार्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार अनुक्रमे ओझरमिग येथील दै.'लोकमत'चे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघ व वाडीवर्हे येथील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार स्व.अशोक शिंदे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे.
            नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त गत वर्षभरात जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून तसेच विविध घडामोडिंचे उत्कृष्ट वृत्तांकन करुन त्यांना न्याय मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या पत्रकारांचा पुरस्काराने गौरव करण्यात येतो.त्याच बरोबर पत्रकारितेत ३० वर्षाहून अधिक योगदान देणारे व वयाची साठी ओलांडलेल्या [६० वर्ष ] ज्येष्ठ पत्रकारांना 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
    उर्वरित पुरस्कारार्थींमधे बाबासाहेब कदम (सकाळ-नांदगाव), भास्कर भोये (देशदूत-सुरगाणा),सुनील घुमरे(पुण्यनगरी-जानोरी ता.दिंडोरी),संदीप पाटील (देशदूत-कळवण),राकेश आहेर (लोकमंथन-देवळा),हर्षल गांगुर्डे (सकाळ-चांदवड),योगेश अडसरे (लोकनामा-करंजी),विलास पगारे (गावकरी-येवला),अनिल गांगुर्डे (पुढारी-वणी),श्रीमती सोनाली गोरवाडकर (नगारा-मालेगाव),भिमा शिंदे (देशदूत-पाटोदा),चंद्रकांत जगदाळे (पुढारी-निफाड),समाधान तुपे (दिव्य मराठी-सिन्नर)मंगेश शिंदे(सकाळ ईगतपुरी),लियाकतखान पठाण (गावकरी-नाशिक ग्रा)राहुल बोरसे(सकाळ-त्र्यंबकेश्वर),राजेंद्र खुले(लोकनामा-नाशिक शहर),मायकल जाॅन खरात (प्रहार-नाशिक शहर),वैभव पवार (उत्कृष्ठ वृत्तवाहिनी प्रतिनिधी-खामखेडा) तर उत्कृष्ठ तालुका मराठी पत्रकार संघ पुरस्काराचे चांदवड तालुका मराठी पत्रकार संघाचा समावेश आहे.
    लवकरच मान्यवरांच्या हस्ते  पुरस्कारप्राप्त पत्रकारांना समारंभपूर्वक गौरविण्यात येणार असल्याची माहिती यशवंत पवार व आण्णासाहेब बोरगुडे यांनी दिली.





Wednesday, February 1, 2023

नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात ,

नांदगाव ( प्रतिनिधी) -  आज  बुधवारी दि.१ फेब्रुवारी रोजी नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एम.जे. कासलीवाल एज्युकेशन संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल यांनी भूषविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत स्कूलचे प्राचार्य मनी चावला यांनी गुलाबपुष्प देऊन केले .कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने तसेच वर्ग ६वी व ३रीच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या प्रार्थना गीताने झाली. यानंतर शालेय क्रीडा शिक्षक बागुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी रेड, ग्रीन, ब्ल्यू, यलो या हाऊस प्रमाणे संचलन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी लाल फीत कापून तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय ध्वज फडकवत श्रीफळ वाढवत, मशाल पेटवून केले. त्यानंतर संस्थेचे चेअरमन मा.सुनीलकुमारजी कासलीवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा खेळाची शपथ दिली.
या कार्यक्रमांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कबड्डी खो-खो, रनिंग रेस, डॉजबॉल, लिंबू चमचा, पोते उडी याप्रमाणे अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध विद्यार्थी आपले कौशल्य दाखवीत मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.
       या कार्यक्रमासाठी मनमाड शहराचे प्रसिद्ध उद्योजक श्री. सुदेश अरोरा तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्रभाऊ चांदिवाल तसेच सौ.क मा. कासलीवाल माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डफळ सर ,सावंत सर शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शालिनी गोयल व सुदर्शन चोळके यांनी केले तर आभार शालेय क्रीडामंत्री अनुष्का सोनवणे यांनी मानले.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...