Thursday, December 23, 2021

नांदगांव रेल्वे स्थानकांचे काम युद्धपातळीवर सुरू, रेल्वे थांबेही अजूनही प्रतिक्षायादीतच !!

नांदगांव रेल्वे स्थानकांचे काम युद्धपातळीवर सुरू, रेल्वे थांबेही अजूनही प्रतिक्षायादीतच !!



नांदगांव ( परवेज शेख ) - नांदगाव रेल्वे स्थानकांचे काम युद्धपातळीवर सुरु असून , नवीन पादचारी पूलावर गर्डर टाकाण्यात आले. रेल्वे प्रशासनाने ४ तासांचा मेगा ब्लॉक घेतल्याने ४८ टन वजनाचे चार गर्डर टाकण्यात आले.  जुन्या रेल्वे स्टेशन पादचारी पूल १०० वर्ष झाले असून, मुदत संपल्याने नविन पूल बांधण्यासाठी २०२० पासून काम हाती घेण्यात आले. कोरोना प्रार्दुभावामुळे हे कार्ये थांबण्यात आले होते. ९ महिने नंतर हे काम सुरू झालेले आहे.  हा पूल १८० मी लांबीचा असून, जानेवारीत महिन्यात रेल्वे महाव्यवस्थापक रेल्वे स्टेशनच्या पाहणीसाठी येत आहे. दोऱ्यापूर्वी पादचारी पूलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. या मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील नाशिक- मनमाड - नांदगांव , चाळिसगांव - भुसावळ दरम्यान धावणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्या अप डाउन एक्सप्रेस मंगळवारी दि. २१ रोजी  चार तासापासून विविध रेल्वे स्थानकांत थांबण्यात आल्या.
      रेल्वे थांब्यासाठी अनेक संघटनेतर्फे निवेदने दिली गेली. पण प्रवाशासाठी अजूनही मागणी मान्य झाली नाही. लॉकलाउन लागल्याने तब्बल १० गाड्याचा थांबा रद्द करण्यात आला. कोरोनाचे कारण देत सध्या येथे दोनच नागपूर सुपर फास्ट, महाराष्ट्र एक्सप्रेस थांबा देण्यात आलेला आहे . कोरोना उद्रेक कमी झाल्याने अजूनही काशी , झेलम, महानगरी, कामायनी, जनता, कुर्शीनगर, ईत्यादी गाड्याचा थांबा प्रतिक्षायादीतच आहे. नजिकच्या चाळिसगांव जं. ईथे चाळिसगांव -धुळे डेमू सुरू झाली आहे. नांदगाव रेल्वे स्टेशनवर अनेक  गाड्याचे थांबे पूर्ववत झाले तर नोकरदार, विद्यार्थी, कामगार, चाकरमान्यांना यांचा फायदा होईल. रेल्वे स्टेशनवर दोन्ही बाजूने शेड बसवले ,तर  उन्हाच्या झळा बसणार नाही अशी मागणी प्रवाशीवर्ग करत आहे

नांदगांव मध्ये ओबीसी समाजाच्या वतिने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक न घेण्यासाठी दिले निवेदन

नांदगांव मध्ये ओबीसी समाजाच्या वतिने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक न घेण्यासाठी दिले निवेदन






नांदगाव ( महेश पेवाल ) - नांदगाव मध्ये ओबीसी समाजाच्या वतिने आंदोलन करण्यात आले.  केंद्र सरकारने शासनाने इम्पिरिकल डाटा देण्यास नकार दिल्याने ओबीसी समाजावर अन्याय होणार असल्याने जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तोवर जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत म्हणून समता परिषद च्या वतीने तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले.    सुप्रीम कोर्टाने २७% आरक्षण करण्याच्या दिलेल्या निर्णयामुळे राज्यातीलच नाही तर देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आलेले आहे. ओ.बी.सी. समाजाला हक्काचे आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकार करत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने बुधवारी दि.२२ डिसें. रोजी तहसीलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात आले. 
“नो रिजर्व्हेशन,नो इलेक्शन” ही भूमिका समता परिषदेने घेतली आहे, तसेच केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात इम्पेरीकल डाटा देण्यात टाळाटाळ करत आहे, केंद्र सरकारने ओ.बी.सी समाजाचे हक्क डावलण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ झालेल्या या आंदोलन प्रसंगी विजय पाटील, नगरसेवक वाल्मिक टिळेकर,शिवा सोनवणे,महेंद्र गायकवाड , गौतम जगताप, अय्युब शेख ईत्यादी समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Thursday, December 16, 2021

एसटी धावत नाही, रेल्वे थांबत नाही !

   एसटी धावत नाही, रेल्वे थांबत नाही !

नांदगांव ( प्रतिनिधी - महेश पेवाल ) - गेल्या अनेक दिवसापासून एसटी कर्मचार्याचा संप सुरूच आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टीमेटची मुदत संपली असून एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी रस्त्यावर धावत नाही. प्रवास करण्यासाठी रेल्वे आहे मात्र नांदगांव रेल्वे स्टेशनला थांबणार्या रेल्वे गाड्या कमी आहे. मग प्रवास कसा करायचा असा प्रश्न सर्व सामान्य करीत आहे. 
     खाजगी वाहनाने प्रवास करणे महाग असल्याने सर्व सामान्य नागरिक प्रवास कसा करणार रेल्वे प्रशासनाने चाळिसगांव- धुळे अशी मेमू रेल्वे सेवा सुरू केली . ही मेमू रेल्वे सेवा मनमाड - धुळे अशी सुरू केली तर रेल्वे प्रशासनाला फायदा होईल आणि मनमाड -  नांदगांव च्या परिसरातील प्रवाशाना सोय होईल चर्चा सर्वसामान्य नांगरिक करीत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लांबणार ?

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लांबणार ?



नांदगाव ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - नांदगाव मनमाड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील ओबीसी गटाचा आरक्षण रद्द केल्याने आता ओबीसी गटातील उमेदवारी करण्यासाठी जनरल गटातून उमेदवारी करावी लागेल. त्यामुळे ओबीसी गटातील इच्छुक असलेले उमेदवार नाराज झाले आहे. ओबीसी आरक्षण लागु करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र निवडणूक आयोग ओबीसी आरक्षण वगळ्ता निवडणुका घेण्यास ठाम आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असाच खोळबून ठेवल्यास स्थानिक स्वराज्याच्या संस्था निवडणुका किती लांबतील याकडे सर्वच राजकीय नेत्याचे लक्ष लागले आहे .

Wednesday, December 15, 2021

नांदगावला बिबट्या चे वावर

नांदगावला बिबट्या चे वावर


नांदगाव ( प्रतिनिधी - महेश पेवाल  ) -  मनमाड - नांदगांव रोड लगत बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे पसरले असून , हा बिबट्या वनविभागाच्या आवारात आल्याने नांदगाव शहरात पहिल्यादाच  बिबट्या दर्शन झाल्याने शेतकर्याची झोप उडाली आहे.  सोमवारी दि. १३ डिसें. रोजी रात्री एकच्या सुमारास ईश्वर मोकळ हे नाशिक ते नांदगाव प्रवास करत असताना वनविभागाच्या कार्यालयाजवळ मनमाड - नांदगाव बस थांब्याजवळ  बिबट्या रस्त्यावरून जाताना दिसला. ईश्वर मोकळ यांनी तात्काळ पाठेमागून येत असलेले डॉ. सुरेश गायकवाड फोन वरून सावध केले. बिबट्याने पूढे जून्या पंचायत समितीच्या आवातून पळ काढला. जेथे बिबट्याने पसार झाला त्याजवळच लोकवस्ती असून , सद्या खरीप हंगाम चालू असल्याने शेतामध्ये कांदालागवड सुरु आहे ,यामुळे शेतकर्याची झोप उडाली आहे.
         नांदगावचे वनपरिक्षेत्राचे अधिकारी चंंद्रकांत कासार यांनी सांगितले की  लोकांनी दिलेल्या माहितीनूसार जवळच असलेल्या कवडे पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेरात फूटेज पाहण्यात आले असून, त्यात स्पष्ट दिसत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोन कर्मचारी नेमण्यात आले आहे. महाविद्यालय, जुन्या पंचायत समिती च्या आसपास परिसराचा निरिक्षण केले जाणार आहे.

Tuesday, December 14, 2021

न्यायडोंगरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्याची क्रीडा क्षेत्रात झेप

न्यायडोंगरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्याची क्रीडा क्षेत्रात झेप  




न्यायडोंगरी ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - नांदगाव तालुक्यातील  श्री शनैश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित स्व. ( आण्‍णासो) गंगाधर शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा न्यायडोंगरी या शाळेत आज दि. १४  ला मंगळवारी रोजी शाळेतील विद्यार्थी सचिन वळवी याने राज्यस्तरीय २०० मी. धावण्याच्या स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांकाने यश संपादित केले.म्हणून त्याची जिल्हा क्रिडा प्रबोधनी नाशिक येथे निवड झाली. त्याबद्दल सचिन वळवी या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  रूपचंद महारु अहिरे (माजी.ग्रा.पा.सदस्य ) होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.शनैश्वर सेवाभावी संस्थेचे  सरचिटणीस अँड. अनिलदादा आहेर ,  तसेच गावातील व परिसरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
      अॅड.अनिल आहेर यांनी आपल्या मनोगतात सचिन वळवी या विद्यार्थ्याला भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा देऊन भविष्यात  जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभाग नोंदवावा व प्रकल्प कार्यालयात आपली शाळा अव्वल कशी येईल यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन देखील केले. भविष्यात आश्रम शाळेतून एकापेक्षा अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादीत करावे. यावेळी अॅड. अनिल आहेर यांनी  सचिनच्या यशाबद्दल क्रीडा शिक्षक रायते सर आणि सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
           सदर कार्यक्रमासाठी परिसरातील आदिवासी बांधव , गावातील प्रतिष्ठित नागरिक,विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगांव शहरातील ई. १ लीची नगरपालिका शाळा १३ डिसें. पासून‌ सुरू

नांदगांव शहरातील ई. १ लीची नगरपालिका शाळा १३ डिसें. पासून‌ सुरू

नांदगांव ( प्रतिनिधी - परवेज शेख) - कोरोना लॉकडाऊन नंतर नुकतेच शासनाने शहरी भागात इ. १ ली शाळा काल दि . १३ डिंसे पासून सुरु करण्याच्या निर्देश दिल्याने  नांदगांव शहरातील नगरपालिका शाळा सुरू झाली. शहरातील शिवाजी चौकातील सावित्रीबाई कन्या विद्यालय इमारतीत उर्दू माध्यमाची शाळा क्रं.८ सुरू झालेली आहे. यावेळी मोठ्या उत्साहात सर्व विद्यार्थी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
       या अगोदर शाळेची साफसफाई, निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्व विद्यार्थी तोंडावर मास्क, सोशल डिस्टंसिग इत्यादीचे पालन केले. शाळेत विद्यार्थाना नवीन पाठ्य पुस्तके वाटप करण्यात आलेली आहे. पहिल्याच दिवशी चॉकलेट देऊन स्वागत झाल्याने मोठा आनंद घेतला. शाळा नियमित पणे सुरु झालेली असून, शाळेच्या मुख्याध्यापक शाहिद अख्तर , सर्व शाळेचा स्टाफ उपस्थित होते.
         आज दि. १४ डिंसे. ला प्रशासन अधिकारी निर्मला चंद्र मोरे, गणेश पाटील यांनी शाळेस भेट दिली. 

Monday, December 13, 2021

नांदगाव शहरातील येवला रोड, ईतर भागातील नवीन रस्ता बनविण्याची मागणी

नांदगाव शहरातील येवला रोड, ईतर भागातील नवीन रस्ता बनविण्याची मागणी

नांदगांव ( प्रतिनिधी - परवेज शेख ) -  नांदगांव शहराच्या जुन्या रेल्वे गेट ते बेलदार वाडी पर्यंत येवला रोड व तालुक्यातील काही भागातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून सुधारणा त्वरित हाती घेऊन नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. रस्त्याची मोठी चाळण झालेली आहे , मोठ- मोठे खड्डे पडले असून नागरिकांना व वाहनांना  वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे यातूून अपघात घडत आहेत.                                            रस्त्याच्या दोन्ही बाजूनी येड्या बाभळी मोठ्या प्रमाणार वाढल्याने वाहन चालकांना पुढील रस्ता दिसेनासा झाला आहे. रस्त्याच्या कडेला गटार नसल्याने  मोठ्या प्रमाणात  रस्त्याच्या बाजूला चिखल साचला आहे. नवीन रस्त्याची मागणी पूर्ण न  झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला . यावेळी माहिती साठी आमदार सुहास आण्णा कांदे , नांदगांव तहसिलदार , पोलीस निरीक्षक नांदगांव यांना निवेदनांची प्रत देण्यात आली. निवेदनावर संतोष गुप्ता , सतिष आहिरे, ज्ञानेश्वर पवार, जहिर सौदागर, संतोष बनगर यांच्या स्वाक्षर्या होत्या. 

Sunday, December 12, 2021

नांदगाव मध्ये मकाच्या कंसात आढळलं साडेपाच फूट कोब्रा जातीचे सर्प

नांदगाव मध्ये मकाच्या कंसात आढळलं साडेपाच फूट कोब्रा जातीचे सर्प
 

नांदगाव ( प्रतिनिधी - महेश पेवाल ) - नांदगावचे माजी नगराध्यक्ष चेतन  पाटील यांच्या शेतात मका काढणी चालू असताना,  मका च्या ढीग मध्ये भला मोठा साडेपाच फुट कोब्रा साप दिसल्याने,  चेतन पाटील यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला बडोदे हे  तात्काळ वेळेवर पोहोचले आणि मोठ्या शिताफिलीने हा साप वेवस्तीत पकडून थोडक्यात माहिती दिली,"  हा कोब्रा जातीचा विषारी साप आहे शेती नागरटी चालू आहे त्यामुळे शेती उघडकीस आल्यामुळे सापांना लंपन नसल्यामुळे साप बाहेर पडतात. त्यामुळे आपलं घर परिसर स्वच्छ ठेवा. साप भक्ष शोधत आपल्या घर किंवा परिसरात येतात सापाला न मारता सर्पमित्रना संपर्क करा अशी माहिती सर्पमित्र विजय बडोदे यांनी दिली आणि साप निसर्गमुक्त करण्यात आले.
   


  

Monday, December 6, 2021

नांदगाव शहरासह तालुक्यात महापरिनिर्वाण दिन साजरा

नांदगाव शहरासह तालुक्यात महापरिनिर्वाण दिन साजरा

  



नांदगाव ( प्रतिनिधी - महेश पेवाल ) - नांदगाव शहर आणि तालुक्यात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. नांदगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंबेडकरी नांगरिक शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते बहुसंख्येने अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीभेद निर्मूलन, समतेचा मार्ग देशाला दाखवला. समाजातील उपक्षित घटकांना मानवी हक्क आणि शिक्षणाचा अधिकार मिळवून दिले. 
 यावेळी तहसिलदार सिध्दार्थ मोरे, पोलिस निरिक्षक अनिल कातकाडे , नांदगाव नगरपालिकेचे मुख्यधिकारी विवेक धांडे उपस्थित होते. 

स्व सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वकील दिन साजरा

 स्व सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वकील दिन साजरा

नांदगांव ( प्रतिनिधी - महेश पेवाल ) - देशातील न्यायदानाच्या प्रकियेत वकिलाची भुमिका क़ायम महत्वाची ठरलेली आहे. वकिलाला पंडित संबोधले जाते असे प्रतिपादन न्यायाधीश शरदजी दुबाले यांनी मनोगत व्यक्त केले.   घटना समितिचे पहिले अध्यक्ष डॉ राजेन्द्र प्रसाद यांच्या जन्म दिनानिमित देशात वकिल दिन साजरा करण्यात येतो, त्याचे औचित्य सांधुन नांदगांव शहरातील प्रथमच श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था/स्व सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संस्थेच्या वतीने नांदगांव कोर्टातील दालनात वकिल दिन  मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या वतीने सर्व वकिलाचा सत्कार करण्यात आला.  यावेऴी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानीय ज्येष्ठ  विधितज्ञ जयकुमार कासलीवाल हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगांव न्यायलयाचे न्यायधीश शरद दुबाले स्व सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय  संस्थेच्या उपाध्यक्षा सुशिला पारख , प्रतिष्ठित व्यापारी शामभाऊ पारख , अनिल करवा, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण,  रमाकांत सोनवणे उपस्थित होते. वकिल संघाचे अध्यक्ष अॅड गजानन सुरसे यांनी  स्वागत केले.   नांदगांव न्यायलयाचे अॅड अमोल आहेर, अॅड आहेर , अॅड युनिस शेख, अॅड महेश पाटिल, अॅड कासलीवाल, अॅड दराडे, अॅड अनिल शिंदे, अॅड जयेश पाटिल, अॅड बिंन्नर ,अॅड सोरंभ कासलीवाल, अॅड सरोदे, अॅड घुगे , अॅड सचिन साऴवे, यांनी सुत्रसंचालन केले तर सस्थेच्या वतीने आभार अनिल धामणे यांनी मानले.

Sunday, December 5, 2021

नांदगांव शहरात चोरीचे सत्र सुरूच

नांदगाव शहरात चोरीचे सत्र सुरूच


नांदगाव ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - नांदगाव शहरातील 
काही भागात चोरी चे सत्र सुरुच असून , गेल्या काही दिवसा पासून नांदगाव शहरात मध्यरात्री  चोरी झाली असून , शनिवारी ( दि. ४ डिसें ) रोजी मध्यरात्री च्या सुमारास चोरट्यानी दहेगाव नाका परिसरातील किराणा दुकानासमोरील एचएफ डिलिक्स मोटार  सायकल गाडी नं.  MH.41.AN.9251  या नंबरची मोटार सायकल चोरट्यानी  चोरून‌ नेली. नांदगाव शहरात मागील ५ ते ६ पूर्वी मेडीकल दुकाने, घर अशा अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले असून पोलीसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करीत आहे. 

Saturday, December 4, 2021

मनमाड मध्ये पसरली दाट धुक्याची चादर, रेल्वे वाहतूक धीम्या गतीने

 मनमाड मध्ये पसरली दाट धुक्याची चादर, रेल्वे वाहतूक धीम्या गतीने 

मनमाड ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - मनमाड शहरात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरल्याने रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. जम्मू काश्मीर, महाबळेश्वर ईथे जसे दाट धुका असतो तसाच काहीसा मनमाड सह आसपास च्या परिसरात दिसून आला. रस्त्यावरून जाणार्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. चालकाना  वाहनांचे हेड लाईट चालू ठेवून धीम्या गतिने वाहन चालविणे भाग पडले. रेल्वे सेवेवर यांचा परिणाम झाल्याने वेळापत्रक  कोलमडले. भारतातून मुंबई कडे  येणार्या गाड्या उशिराने धावत होत्या.   रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या मुळे प्रवासांचे हाल झाले. सलग चार पाच दिवसात पाऊस, त्यात दाट धुका , शेतीपिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सलग‌ पडलेल्या पाऊसाने रब्बी पिक गहु, मका, कांदे, व फळबागावर मोठा फटका बसेल या चितेंत बळीराजा आहे . पिके पाऊसात भिजल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागेल . 

         मनमाडसह ग्रामिण भागात धूक्यामूळे वाहने धीम्या गतिने चालत होती. रस्त्यावरून वाहन चालवताना समोरील येणार्या गाड्या दिसाव्यात यासाठी हेड लाईट चालू करण्याची चालकावर आली होती. पाऊसा सोबत थंडी असल्याने लोकांनी स्वेटर , कानटोपा, मफलर घालून घराबाहेर निघाले. या थंडीमुळे तापमानाचा पारा घसरत चालला आहे. दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे  रेल्वे सिग्नल बरोबर दिसत नसल्याने भारतातून मुंबई कडे येणार्या गाड्या धीम्या गतीने धावत होत्या. 

Friday, December 3, 2021

अवकाळी पाऊस पडल्याने शेती पिकांचे नुकसान

 अवकाळी पाऊस पडल्याने शेती पिकांचे नुकसान



मनमाड ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - तालुक्यात ढगाळ वातावरण , २४ तासापासून जास्त वेळ सुरू झालेला पाऊसाने शेतकर्याच्या हातातोडांशी  आलेल्या पिकांचे नुकसान केले.  अवकाळी पाऊसाने रब्बी पिकांचे जास्त नुकसान केल्याने कांदे, गहु, मका, हरभरा सोबतच फळबागांवर नुकसान झालेले आहे. सरकारने शेतकर्याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. याआधी पाऊसाच्या महिन्यात अतिपाऊसामूळे  शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकरी कधी अस्मानी- सुल्तानी संकटात सापडलेला असुन,  यंदा पाऊस चांगला झाल्याने रब्बी पिकांचे चांगले उत्पादन निघेल अशी आशा होती, पण सलग चार दिवसाच्या पाऊसाने व बदलेला हवामाना मुळे काढून टाकलेला कांदा, मका ओला झाल्याने प्रचंड नूकसान झाले. तसेच कांद्याचे उळे, हरभरा, गहू व द्राक्षबाग मोठ्या प्रमाणावर फटका बसला. चाळीत ठेवलेला कांदा ओला झाल्याने त्याला कोंब येण्यास सुरूवात झालेली आहे . यामुळे शेतकरी वर्गाला जास्त आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. रब्बी पिकांपासून उत्पन्न मिळेल अशी आशा होती पण अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.



Wednesday, December 1, 2021

ॲक्टीग मॉडलिंग मध्ये नोमान शेख प्रथम

ॲक्टीग मॉडलिंग मध्ये नोमान शेख प्रथम

 

मनमाड (प्रतिनिधी - परवेज शेख ) -  नाशिक च्या गुप्ता गार्डन गंगापुर रोड येथे झालेल्या एम आर मिस एम आर एस अँन्ड किड्स २०२१ महाफायनली मध्ये झालेल्या कार्यक्रमात नोमान नदीम शेख याने यश संपादन केले. या मुलाने ॲक्टीग मॉडलीग मध्ये प्रथम पारितोषिक मिळवत नांव लौकीक केले. या मुलांची पुढील कार्यक्रमात निवड झालेली असून , एवढ्या लहान वयात ॲक्टिग मॉडलिंग स्पर्धेत यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नांदगावचे खेळाडु चमकले

 राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नांदगावचे खेळाडु  चमकले

नांदगाव ( प्रतिनिधी- परवेज शेख ) - गोवा राज्याच्या म्हापसा येथे राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्र संघाने  किक बॉक्सिंग स्पर्धेत तब्बल ६४ सुवर्ण पदके मिळवत भारतात पहिली चॅम्पियनशिप पटकावली. नांदगाव च्या खेळाडूनी या स्पर्धेत सहभाग घेत सुवर्णपदक मिळवले, या कामगिरी केल्याने सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होतंय. या स्पर्धा गोव्याच्या म्हापसा येथे २६ ते २८ नोव्हेंबरला संपन्न झाल्या. 

        नांदगाव स्पोटर्स फाउंडेशनच्या खेळाडूनी किक बॉक्सिंग  स्पर्धेत मोठं यश मिळवले. या स्पर्धेत मेघा पवार ६५ किलो वजनी गटात, ४२ किलो वजनी गटात योगेश चंडाले, सार्थक माताडे यांने  ६३ किलो वजनी गटात यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. तर ५० किलो वजनी गटात माधुरी ठोंबरे, श्रुती बोगीर ४७ वजनी गटात, साईप्रसाद पाटील यांनी रौप्य पदक मिळवले, श्रेया पाटील ४७ वजनी गटात ब्रॉन्ज मेडल पटकावले. या खेळाडुनी  स्पर्धेत मोठे यश मिळवत राज्यासह जिल्हा, तालुक्याचे नांव लौकीक केले. सर्व खेळाडुना नांदगाव स्पोटर्स फाउंडेशनचे प्रशिक्षक पृथ्वीराज वडघुले याचे मार्गदर्शन मिळाले. 




नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...