Tuesday, August 29, 2023

नांदगाव येथील कमलाबाई कासलीवाल विद्यालयाचे शिक्षक किशोर बागले यांचे अल्पशा आजाराने निधन,



नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील कमलाबाई कासलीवाल विद्यालयाचे शिक्षक किशोर शंकरराव बागले (५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी बजावली आहे.काही महिन्यांपूर्वी त्यांची मणक्याची शस्रक्रिया झाली होती तेंव्हा पासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर मंगळवारी रात्री नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. नांदगाव येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, सुनील कासलीवाल, जे.टी.कासलीवाल स्कूलचे प्राचार्य मनी चावला, कासलीवाल विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार,शिक्षक, यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Monday, August 28, 2023

आमदार सुहास आण्णा कांदे यांचा जलजीवन मिशन कामांचे लोकार्पण व पाहणी दौरा, नागरिकांना मतदार संघात २४ तास शुद्ध पाणी पुरवठा मिळणार,


 

नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील कासारी व बोलठाण घाटमाथा परिसरात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा पाहणी दौरा आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केला. 
    कासारी येथील इंदिरानगर, जातेगाव येथील वसंतनगर व चंदनपुरी तांडा येथील कामांचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. या योजने अंतर्गत नागरिकांना २४ तास शुद्ध पाणी मिळणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचा स्त्रोत म्हणून विहीर, पाण्याची टाकी, पाईप लाईन व गावं अंतर्गत वितरण व्यवस्था या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 
   आमदार सुहास आण्णा कांदे यांनी यावेळी उपस्थित महिलांचे अभिनंदन केल. ग्रामीण भागात असलेली वन वन पाहता आता जलजीवन मिशन अंतर्गत २४ तास पाणी उपलब्ध झाले असून माझ्या माता माय माऊलींचे पाण्याची आज पासून थांबलेली आहे असे त्यांनी सांगितले.
   मतदार संघातील प्रत्येक घराघरात पाणी पोहोचवण्याचे माझे स्वप्न असून या मार्गाने मी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याची आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनोगतात सांगितले.
         या वेळी घाटमाथ्यावरील ढेकू,जातेगाव,बोलठाण, रोहिला,येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामांची पाहणी करून काम चांगल्या प्रतीचे व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामाबाबत असलेल्या अडचणी समजून घेत त्याही तात्काळ सोडवण्याचे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी दिले.
      यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अर्जुन पाटील, नागापूर सरपंच राजेंद्र पवार, जिल्हाप्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, बोलठाण सरपंच वाल्मिक गायकवाड, अनिल रिंढे, रफिक पठाण, दत्तात्रय निकम ,गुलाब चव्हाण, संजय बोरसे, संजय पवार, मनोज रिंढे, गोकुळ कोठारी, बापूसाहेब जाधव, शुभम आव्हाड, आण्णा मुंढे, सौ.अनिता संतोष सरपंच कासारी इप्पर, काशिनाथ काळे, सोनाली राठोड, नितीन शेरेकर, अंबादास पवार, तुळशीराम शिंगाडे, नाना राठोड, प्रकाश चव्हाण, ईश्वर राठोड, भाऊसाहेब चव्हाण,अनिल अरबुज, सरपंच ठकुबाई पवार, अवधूत गायकवाड, सचिन गायखे, भगवान गायखे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, अशोक बिन्नर उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग नांदगांव यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

नांदगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद चव्हाण तर, व्हा. चेअरमनपदी प्रियंका पाटील यांची निवड, आमदार सुहास कांदे यांच्या कडून शाल - पुष्पगुच्छ देऊन सत्कार,


नांदगाव( प्रतिनिधी ) - आज  नांदगांव तालुका व क.महा.सेवक सह.पतसंस्थेचे चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवडणूक, निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत विघ्ने  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . माध्यमिक आश्रमशाळा टाकळी बु. येथील शिक्षक प्रमोद चव्हाण यांची चेअरमनपदी तर  व्ही. जे.हायस्कूल नांदगांव येथिल शिक्षिका श्रीमती प्रियंका पाटील यांची व्हा. चेअरमनपदी तर सर्जे. दादा माध्य. विद्यालय जामदरी येथील शिक्षक आनंद चकोर यांची कार्यवाहपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीप्रसंगी संस्थेचे संचालक महेंद्र जाधव, श्रीमती पल्लवी पाटील,अशोक मार्कंड, संतोष इप्पर, योगेश पगार, जिभाऊ खताळ, संजय पवार व कैलास पाटोळे उपस्थित होते.
तसेच संस्थेचे मा.कार्यवाह व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नांदगांव तालुकाअध्यक्ष  बाळासाहेब भोसले, मा.चेअरमन राजेंद्र देवरे, राजेश हिरे, पंजाबराव आहेर यांनी उपस्थित राहून व मा. सभापती विलास आहेर यांनी फोनकरुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. नांदगाव विधानसभा मतदारसंघ संघाचे  आमदार  सुहास आण्णा कांदे यांनी  नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी भेच्छा दिल्या.

Saturday, August 26, 2023

शालेय पोषण आहार समितीच्या महिलांचे विविध मागण्यांसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन, कर्मचाऱ्याचा प्रश्न आगामी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्याचे दिले आश्वासन,




नांदगाव (प्रतिनिधी ) - शालेय पोषण आहार समितीच्या महिलांना अगदी तुटपुंज्या स्वरूपात मानधन मिळते यात वाढ करावी . महिलांना सुरक्षिता द्यावी विमा संरक्षण द्यावे यासह शिपाई पदावर नियुक्ती द्यावी या मागण्यांसाठी आधारवड महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष संगीता सोनवणे ,अलका आयनोर ,आशा काकळीज, यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी राज्याचे हेविवेट नेते अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले . शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा केली.  यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. यासाठी मी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करेल असे सकारात्मक उत्तर दिले. यावेळीं महिलांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी संगीता सोनवणे, आशा काकळीज ,अलका आयनोर रत्ना सोनवणे,  संगीता मोकळ यावेळी उपस्थित होते.

Friday, August 25, 2023

पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवानी नांदगावला ईदगाह मैदानावर केली विशेष सामूहिक नमाज अदा, अल्लाह मेघ दे पाणी भेज दे असें म्हणत केली दुवा,




नांदगाव (प्रतिनिधी) - पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटल्या नंतर ही नांदगांव मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात समाधान कारक पाऊस झालेला नाही. पावसा अभावी पिके करपू लागली असून शहरा पासून गाव खेड्या पर्यंत पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे.पाऊस पडावा यासाठी नांदगावला ईदगाह मैदानावर विशेष सामूहिक नमाजचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. नांदगाव शहरातील मौलानाच्या नेतृत्वाखाली विशेष नमाज अदा करून पावसासाठी दुवा करण्यात आली.  मनमाड शहरातील सर्व मस्जिदी मध्ये सलग तीन दिवस विशेष नमाज आणि दुवा करण्यात आली . ईदगाह मैदानावर रमजान ईद आणि बकरी ईद ह्या दोनच नमाज अदा केल्या जातात मात्र नैसर्गिक आपत्ती आल्यास ती दूर व्हावी यासाठी विशेष नमाज अदा केली जाते.

Tuesday, August 22, 2023

राष्ट्रीयकृत बँक मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी शेतकरी व सामान्य ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी : आ.सुहास आण्णा कांदे




नांदगाव (प्रतिनिधी) - शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथील मा.बाळासाहेब ठाकरे सभागृहात आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱ्यांची विविध विषयांवर बैठक घेतली. 
     गेल्या अनेक दिवसांपासून नांदगाव मधील बँक कर्मचारी ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करत नाही, सहकार्य करत नाही किंवा उद्घटपणे वागतात अशा तक्रारी आमदार संपर्क कार्यालयात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर  आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. 
    या वेळी उपस्थित सर्व बँक मॅनेजर यांना सद्यपरिस्थिती पाहता ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना कर्ज प्रकरण असो वा इतर काहीही काम असो आपण सहकार्याची भूमिका घेऊन काम करावे अशी सूचना केली. आपण कर्मचारी आहात आणि गाव आमचे आहे तेंव्हा आपण सामंजस्य घेऊन प्रत्येक ग्राहकाला समजून घ्या त्याला मदत करा असे आवाहन केले. ग्राहकांना त्रास होईल असे कोणी कर्मचारी वागत असेल तर त्याला तशी ताकीद द्या असे या वेळी सांगितले. 
    या बैठकीत स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, महारष्ट्र ग्रामीण बँक, एच डी एफ सी बँक, युनियन बँक आदी बँकेचे मॅनेजर यावेळी उपस्थित होते.

नांदगाव येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन आढावा बैठक संपन्न ,



नांदगाव (प्रतिनिधी ) -  नांदगाव विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत २७ गावांमध्ये विविध कामे सुरू असून या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती.  या वेळी बिडीओ  गणेश चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, सर्व गावांचे ग्रामसेवक तसेच ठेकेदार उपस्थित होते. काम कुठपर्यंत आले, स्थानिक समस्या, इतर अडचणी व कामाचा वेग यावर चर्चा झाली. 
     आमदार सुहास आण्णा कांदे यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावे येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील. ग्रामीण भागातील जनतेस तात्काळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून कोणतीही काटकसर न करता काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. 
   नांदगाव तालुक्यातील  वसंतनगर, चंदनपुरी, कसाबखेडा, चींचविहिर, रोहिले बु, साकोरा, तळवाडे, न्यायडोंगरी, अनकवाडे रामनगर तांडा, रागुविर तांडा, कासारी इंदिरानगर, पानेवाडी, बेजगाव, वंजारवाडी, कुसुमतेल, माळेगाव कऱ्ह्यात, भार्डी, सावरगाव, कोंढार, नागापुर, जातेगाव, मोहेगाव, ढेकू, बोलठाण, मळगाव या गावात काम सुरू आहे. यामध्ये गावात विहिर, गाव अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था, पंपगृह, पंपिंग मशिनरी, टाकी आदींचा समावेश असणार आहे. गुरुवार पासून या सर्व गावात भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार असल्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले या वेळी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी उपस्थित राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Monday, August 21, 2023

नांदगाव येथील श्री नांदेश्वर महादेव मंदिरात हजारो भाविकांची गर्दी,


नांदगाव( प्रतिनिधी) - नागपंचमी व पहिला श्रावणी सोमवार ५० वर्षांनी पहिल्यांदाच असा योग आल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या शुभ सणावर महिलांनी नागदेवतेची मंदिरात पूजा केली.तर काही ठिकाणी वारुळा जवळ पूजा करत नाग देवतेला दूध व लाया अर्पण करून पूजन करण्यात आले.
  मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात आध्यात्मिक शक्ती, अपार संपत्ती आणि इच्छित फळ प्राप्त होते. तर दुसरीकडे  राज्यभरात पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी असल्याने मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. 
  नांदगाव येथील श्री नांदेश्वर महादेव मंदिरात हजारो भाविकांनी उपस्थितीती लावली. उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांत समाधानाचे वातावरण दिसत होते.
    पहाटे नांदेश्वर महादेव मंडळाचे सेवेकरी यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा संपन्न झाली. त्यानंतर मुर्तीची विधीवत पूजा करण्यात आली.दुपारी शहरातून जय नांदेश्वर महाराज यांच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.सायंकाळी मंदिराच्या परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे पासूनच दर्शनासाठी जय नांदेश्वर महादेव मंदिरात खास करून महिलांची मोठी गर्दी झाली होती.

साप चावल्यावर मांत्रीका कडे जाणे ही सगळी अंधश्रद्धा - सर्पमित्र विजय बडोदे, नागपंचमीच्या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन,


 

नांदगाव (प्रतिनिधी ) -  नागपंचमी निमित्ताने नांदगाव मधील सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक व्ही.पी.सावंत सर यांच्या मार्गदर्शनाने सर्पमित्र विजय बडोदे यांनी सापाबद्दल अंधश्रद्धा सर्पदंश झाल्यावर काय करावे सापांचे किती जाती आहे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. नाग मण्यार घोणस फुरसे हे विषारी साप आहे बाकी बिनविषारी साप आहे अशी सर्प जनजागृती करण्यात आली . साप हा शत्रू नाही आपला मित्र आहे. उंदीर आपल्या घरात शेतात अन्नधान्याची नासाडी करतात . त्यांना कमी प्रमाणात करणारे हे साप जमिनीचा महत्वाचं घटक आहे . समतोल राखतो सापाला केस असतात साप दूध पितो सापाला मारताना थोडासा लागलं आणि तो बचावला तर डोक धरतो सापाच्या डोक्यावर मणी असतो ही सगळी अंधश्रद्धा आहे असं काही नसतं . साप चावल्यावर मांत्रीका कडे गेलो तर मंत्र मारून आणलं का माणूस वाचतो हे सगळं चुकीच आहे .सर्पदंश झाल्यावर एक उपचार आहे,   आपल्या आरोग्य रुग्णालयात अँटिव्हीनियं मोफत मिळते  अशी माहिती देण्यात आली .साप दिसल्यावर सापाला मारू नका सर्पमित्रणा संपर्क करा अशी माहीती सर्पमित्र विजय बडोदे  यांनी दिली . शाळेकडून सर्पमित्र विजय बडोदे यांचा श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार कण्यात आले.

मनमाडच्या माहीने इंग्लिश मॅरेथॉन राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक,




मनमाड( विशेष प्रतिनिधी)  - नुकताच नाशिक येथे पार पडलेल्या इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धेत मनमाडच्या माही सुरज अरोरा हिने तृतीय पुरस्कार मिळवत मनमाड शहरासह नाशिक जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.  मनमाड येथील  शान क्लासेसतर्फे यानिमित्ताने एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी माहीला रोख रक्कम व प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.या पुरस्काराबद्दल माहीचे मनमाड शहरातील सर्व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
           नाशिक येथे शनशाईन एज्युकेशन हबतर्फे इंग्लिश मॅरेथॉनच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या . या स्पर्धेत मनमाड येथील माहिशान क्लासेसच्या वतीने १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . यात माही सुरज अरोरा हिने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावत मनमाड शहरासह नाशिक जिल्ह्याचे नाव रोशन केले. यासह इतर विद्यार्थ्यांनी देखील पुरस्कार पटकावले या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर नाशिक येथील सचिन जाधव जयेश सर मिनाक्षी महाना सौ. पूनम पाटील,सौ. रवींद्रकौर कांत, सूरज अरोरा, जावीद शेख ,सौ.निलम अरोरा,सुशिल अरोरा आदीजन उपस्थित होते सचिन जधाव यांनी इंग्लिश स्पिकिंग व व्याकरण चे उपस्थितांना मार्गदर्शन केले.व इंग्रजी अगदी सोपी भाषा असुन त्यावर आपण सहज प्रभुत्व प्राप्त करू शकतो असेही सांगितले.राज्यस्तरीय स्पर्धेतील गुणवंत विदयार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.या विद्यार्थ्यांना यशोदीप शिंदे यांनी सहकार्य केले.

नांदगाव येथील मविप्र संस्थेच्या महाविद्यालयात समाजदिन साजरा,




 नांदगाव( प्रतिनिधी ) - मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन समारंभ येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मविप्रचे माजी शिक्षणाधिकारी प्रा. अशोक सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म वि प्र संचालक अमित बोरसे पाटील होते. मविप्रचे आद्य संस्थापक बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतःच्या जीवाचे रान करून समाजात शिक्षणाचा प्रसार करत होते. सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव कर्मवीरांवर होता. सयाजीराव गायकवाड, धारचे राजे श्रीमंत पवार, वाघ गुरुजी इत्यादी त्यागमूर्तींच्या सहकार्याने मविप्रची वाटचाल सुरू झाली. सर्व कर्मवीरांनी मविप्रच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. या वाटचालीत नांदगाव तालुक्याचे कै. वामन आप्पा पाटील, कै. भास्कर पाटील, कै. लीलाताई पाटील माजी खासदार कै. आण्णासाहेब कवडे यांचेही योगदान असल्याचा उल्लेख प्रा. सोनवणे यांनी केला बदलत्या काळाप्रमाणे नवीन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असा आवर्जून उलेख केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते व मविप्रचे माजी संचालक कै. साहेबराव (आण्णा) आनंदा पाटील यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ सभासद दत्तात्रय पांडुरंग पाटील यांच्या हस्ते मविप्र ध्वजारोहण करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव च्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व समाजगीत सादर केले. उपस्थित सभासदांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सरस्वती पूजन व सर्व कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले नाशिक येथील उद्योगपती डी. एस. रिंढे यांच्या आर्थिक मदतीने महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यांनी केले याप्रसंगी गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार जगन्नाथ धात्रक विलास आहेर ,डी एस रिंढे, सतीश पावशे व मविप्र सभासद बांधव व्यासपीठावर उपस्थित होते. विजय काकळीज ,अशोक जाधव यांनी मविप्र सभासदांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित सर्व मविप्र सभासदांचा सत्कार डी. व्ही. गोटे, बी. बी. आथरे, के. के. तांदळे यांच्या हस्ते करण्यात आला. मविप्र संचालक श्री अमित बोरसे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मविप्र समाज कार्यकारिणीने नांदगाव तालुक्यातील सभासद, सर्व शाखा व विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले त्याची माहिती उपस्थितांना दिली. नांदगाव तालुक्याला शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आणण्याचा मानस अमित बोरसे पाटील यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती पवार व डी.एस .भिलोरे यांनी केले तरआभार प्रदर्शन उप प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी केले.

Sunday, August 20, 2023

नांदगाव तालुक्यातील गिरणानगर ग्रामपंचायत चे सरपंच , उप सरपंचसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश,




नांदगाव (प्रतिनिधी ) -  नांदगाव विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत गिरणानगर ता.नांदगाव सरपंच सौ.अनिता राहुल पवार व उप सरपंच अनिल म्हसू आहेर यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. 
   आमदार निवासस्थानी आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . 
      या प्रसंगी बोलतांना आमदार सुहास कांदे यांनी कांदे कुटुंबीय व शिवसेना परिवारावर विश्वास ठेऊन मोठ्या संख्येने पक्षात केल्याबद्दल आभार मानले. मी प्रत्येक सूख दुःखात आपल्या सोबत राहील असा विश्वास दिला. तसेच गिरणानागर ग्रामपंचायत मध्ये विकास कार्य करताना आपल्याला जी जी मदत लागेल, जेजे विकास कार्य करायचे असेल याची यादी द्या आपण त्वरित सर्व कामे सुरू करू असेही आश्वासित केले. 
             या प्रसंगी प्रवेश करणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे सरपंच सौ.अनिता राहुल पवार, उप सरपंच अनिल म्हसू आहेर, राहुल पवार, रवींद्र पवार, गणेश आढाव, अनिल आहेर, बंडू शिंदे, अनिल सोर, विजय सोर, आनंद आहेर, सागर पवार, भाऊसाहेब महाजन, मंगेश सरोदे, देवेंद्र सोनावणे, बापू पवार, संदीप शेवाळे, सतीश शेवाळे, तेजस पवार, संदीप खैरनार यांनी प्रवेश केला. 
      यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान खान, प्रमोद भाबड, किरण आण्णा कांदे, भावराव बागुल, किरण देवरे, काशिनाथ देशमुख, संदीप खैरनार, सुनील जाधव, दीपक भाऊ मोरे, रमेश मामा काकळीज, शशी सोनवणे, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार सुहास कांदे यांच्याकडुन शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शालेय साहित्याचे वाटप, शहरातील शाळेच्या इमारतीचे कामे प्रगतीपथावर,


नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही  सौ.अंजुम कांदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 
आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुम कांदे प्रत्येक वर्षी न. प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शालेय साहित्याचे वाटप करत असतात.  शुक्रवारी दि. १८ ऑगस्ट रोजी शिवनेरी शासकीय विश्रागृह येथे  नगरपरिषद  शाळेतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात  होते. या वेळी सौ.अंजुम कांदे यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. 
     याप्रसंगी बोलताना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या . तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क आहे .पण त्यासाठी त्याला वातावरणही तसेच पाहिजे. म्हणून लवकरच सर्व विद्यार्थ्यांना नूतन शाळा इमारत पाहायला मिळणार असल्याचे सांगितले. 
     सौ. अंजुम कांदे यांनी मागील वर्षी सर्व शाळांची पाहणी केली होती .या पाहणी दरम्यान सर्व शाळांच्या इमारतींची परिस्थिती अतिशय दयनी असल्याचे त्यांच्या लक्षात आले . ही   बाब त्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांना सांगितल्यानंतर तात्काळ नांदगाव व मनमाड शहरातील नगरपरिषद शाळांकरिता दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.  या सर्व शाळांची काम प्रगतीपथावर असून बहुतेक शाळांची कामे पूर्णत्वाकडे आहे. 
   नांदगाव येथील गांधीनगर न .प .शाळेचे सुरू असलेल्या कामावर सौ अंजुम कांदे यांनी भेट दिली असता कामाची पाहणी केली.
    याप्रसंगी सौ.अंजुम कांदे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष उज्वला खाडे, तालुका प्रमुख विद्या जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे, तसेच नगरपरिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र मोरे, शाहिद अख्तर, दीपक मोरे , गंभीर त्रंबक अहिरे, नगर पालिकेचे गणेश पाटील, व इतर मराठी व उर्दू माध्यमाचे शिक्षक वृंद उपस्थित होते तर सूत्रसंचालन राजेंद्र मोरे सरांनी केले.

Friday, August 18, 2023

नांदगाव मध्ये आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे तालुकास्तरीय आढावा बैठक,



नांदगाव ( प्रतिनिधी) - अनेक दिवसांपासून शेतकरी राजा पावसाकडे आस लावून बसला असून पाऊस नसल्यामुळे तो हवालदिल झाला आहे . अजून पंधरा दिवस पाऊस पडला नाही तर दुष्काळी परिस्थिती ला सामोरे जावें लागू शकते. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून  आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नांदगाव येथे शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे तालुकास्तरीय सर्व विभागांच्या मुख्य अधिकारी वर्गांची आढावा बैठक घेतली.
   या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.  अपुरा मॉन्सूनमुळे निर्माण पीक परिस्थिती,  शहरातील नगरपरिषद  व ग्रामीण भागातील पाणी पुरवठा ,  शासकीय योजना चा लाभ घेतांना नागरिकांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना, चर्चेदरम्यान येणारे इतर अनुषंगिक विषय आढावा घेण्यात आला.
   या वेळी येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहण्यास सूचना केल्या. 
निसर्गचक्र आपल्या हातात नसले तरी येणाऱ्या काळातील संकटांवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने हिरीरीने काम करावे असे आवाहन वजा सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. 
     या प्रसंगी तहसीलदार, बिडीओ, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, महावितरण, भूमी अभिलेख, इरिगेशनचे, पंचायत समिती, तहसील, बांधकाम विभाग, नगरपालिका उपस्थित होते.

  ( आमदार सुहास आण्णा कांदे यांनी 
दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने कामाला लागण्याच्या सूचना करताना)
------------------------------------------
- पाणीटंचाई , चारा याबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना >

      नांदगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी टँकरचे प्रस्ताव तयार करावें, धरणातील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा, अशा सूचना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आढावा बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. 
       शासकीय विश्रागृहावरील हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात  नांदगाव तालुका पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली.

कोपरगांव तालुक्यात पवित्र कुरआन पाकची काही समाजकंटकाकडून विटंबना, नांदगावात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चा,






 नांदगाव (प्रतिनिधी ) - अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात काही समाज कंटकांनी मुस्लिम धर्मियांचे धार्मिक ग्रंथाची विटंबना केली. यासह मणिपूर येथील महिलांवरील अत्याचार तसेच ख्रिश्चन समाजाचे धार्मिक स्थळाची तोडफोड यासह इतर मुद्द्यावर मुस्लिम बांधवांच्या वतीने नांदगाव शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. सर्व सर्वपक्षीय नेत्यानी भाषण करून आरोपींना अटक करून कारवाईची मागणी केली.
 यावेळी पोलिस निरीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी जवळपास सर्वच राजकिय पक्षांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाची सुरुवात जामा मस्जिद, महात्मा फुले चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अशी होत गेली. 
        नांदगाव कांग्रेस चे मनोज चोपडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. विविध जातीजातीत , धर्म - धर्मात तेढ निर्माण होईल असे षडयंत्र  रचले जातंय. त्यामुळे देश अधोगती जाणार आहेत.  जगात इस्लाम धर्म अमन, शांती मानत आलेला आहे. आपल्याला खरं देशभक्त कोण यांचा पुरावा द्यावा लागत आहे." सारे जहाँ से अच्छा हिन्दुस्तान हमारा" हे गीत मुस्लिमाने लिहिले आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील गावात काही विकृत मानसिकतील लोकांनी पवित्र कुरआन शरीफ फाडले . यावेळी त्यांनी कुराण मधील आयतीचा संदर्भ दिला. या घटनेचा निषेध करत प्रशासनाला सांगितले की अशा समाजकंटका विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रसिद्ध शायर राहत इंदोरीचा, उँचे उँचे दरबारो से क्या लेना , नंगे - भूखे गरीबों से क्या लेना , अपना खालीक अफजल है, आतीजाती सरकारों से क्या लेना शायरीतून मत व्यक्त केले. या मुक मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच आरपीआयचे नाना जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मणिपूर घटनेविषयी बोलताना, मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार करण्यात आले. तेथे त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. ख्रिश्चन धार्मिक स्थळांवर हल्ले करण्यात आले. यावेळी त्यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केला.  या मोर्चात वंचित चे बाळा बोरकर , आरपीआयचे नाना जाधव, कांग्रेस चे मनोज चोपडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संतोष गुप्ता, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे फिरोज शेख यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. या मोर्चात माजी नगरसेवक याकुब शेख, मुश्ताक शेख, जमेअत उलमा हिंदचे सेक्रेटरी जावीद सय्यद , तौसीफ शेख, आबीद सय्यद, हाफीज अश्पाक साहब, इब्राहिम शेख, रियाज कुरैशी, नाज शेख, आसीफ शाह, साजीद शाह इत्यादी समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Thursday, August 17, 2023

पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे निवेदन,



नांदगांव(  प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले आणि निष्क्रिय ठरणारा पत्रकार हल्ला विरोधी कायदा याविरोधात मराठी पत्रकार परिषद मुंबई व नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि. नाशिक संलग्न नांदगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी रोजी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविले जावेत व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई व्हावी आदी मागण्याचे निवेदन, नांदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांना देण्यात आले.
  महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. मात्र राज्यात या कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने कायदा कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात सुमारे दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले आहेत, मात्र केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केला आहे. त्यातही एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने हा कायदा कमकुवत ठरत आहे. नुकतेच पाचोरा येथील एका पत्रकारास पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ करून गुंडांकडून त्यांच्यावर हल्ला केला आहे. या प्रकरणातही आमदार पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही. पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबावेत व लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याचे निर्देशात आले आहे यामुळे कायदाचा धाक कोणाला राहिला नाही या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे संबंधित यंत्रणेला द्यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार संजीव धामणे, जेष्ठ पत्रकार विजय चोपडा, पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारी सदस्य बब्बू भाई शेख, नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश शेळके सरचिटणीस आमीन शेख माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम, उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव, भगवान हिरे, भरत देवरे, मोहम्मद भाई शेख, सुहास पुणतांबेकर, रोहित शेळके, अनिल धामणे, महेश पेवाल,परवेझ
शेख, राईस शेख, जुनेद शेख, अझर शेख, आवेस कुरेशी आदींची पत्रकार उपस्थिती होती.

Wednesday, August 16, 2023

नांदगाव तालुक्यातील मंथन प्रज्ञाशोध परीक्षा मधील गुणवंतांचा आदर्श प्राथमिक शाळा येथे गुणगौरव संपन्न,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव  तालुक्यातील येथील आदर्श प्राथमिक शाळा येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षा मधे नांदगाव मधील विविध शाळेतील १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. त्यांचा कौतुक सोहळा ट्रॉफी , प्रमाणपत्र देऊन साजरा करण्यात आला. या प्रसंगी आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव चे मुख्याध्यापक तांदळे सर तसेच कमलाबाई कासलीवाल शाळेचे मुख्याध्यापक सावंत छाजेड विद्यामंदिर चे प्रसाद बुरुकुल माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव येथील अनिल नागरे सर तसेच जिल्हा परिषद शाळा ठाकरवाडी येथील मुख्याध्यापक सतीश बिरारी आदर्श कोचिंग क्लासेस च्या संचालिका श्रीमती तवले व परीक्षा केंद्राचे संचालक पंकज सोनवणे व उपस्थित होते. यावेळी आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव येथील विद्यार्थी राज अरुणकुमार जाधव , राजवीर वीरेंद्र तवले , छाजेड विद्यामंदिर येथील रुद्रांश सचिन जाधव , स्वराज चेतन निकम, वेदश्री प्रसाद बूरुकुल, रिशिता शैलेश टिळेकर, व्ही जे हायस्कूल येथील देवांश चंद्रशेखर चव्हाण, श्रुती बिभीषण मोरे , जिल्हा परिषद शाळा महाजन वाडा येथील अद्विक विशाल सावंत , जिल्हा परिषद शाळा नायडोंगरी येथील कृष्णा कैलास बोरसे, लिट्ल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल येथील स्वरा सतीश बिरारी, जे टी के इंग्लिश मिडीयम स्कूल येथील आर्या ललित पगार , समृध्दी प्रवीण सौंदाने,माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव येथील यज्ञेश अनिल नागरे , न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील आरुषी गणेश बोरसे व वर्धमान हायस्कूल मालेगाव येथील यश समाधान पवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी आदर्श प्राथमिक शाळा चे शिक्षक जाधव चव्हाण.सुभाष पवार व सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले, तर जाधव सर यांनी आभार मानले.

Tuesday, August 15, 2023

नांदगाव मधील व्ही.जे. हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, एन.सी.सी पथकाचे संचलन,




नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव मधील व्ही.जे.हायस्कूल येथे भारताचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न झाला.शाळेचे मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आला.प्रसंगी पा.शि.संघ उपाध्यक्ष डॉ.गणेश चव्हाण,उपमुख्याध्यापक दिपक बाकळे,पर्यवेक्षक मनोहर शिंदे,माजी शिक्षक शाम सोनस भास्कर मधे,गुलाब मोरे .उपस्थित होते यांनतर मान्यवरांच्या उपस्थित भारतमाता पूजन करण्यात आले.मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांनी संदेश दिला या संदेशात पर्यावरण जनजागृती करून पर्यावरणाची जोपासना करणे , स्वच्छता संदर्भात जनजागृती करणे या गोष्टीचा विद्यार्थांनी अंगीकार केल्या पाहिजे व मोबाईलचा गरजेपुरता वापर करण्याचे सांगितले.त्यानंतर मुख्याध्यापकांनी एन.सी.सी. पथकाचे निरीक्षण करण्यात आले. एन.सी.सी. शिक्षक राजेश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. च्या विद्यार्थांनी सुंदर असे संचलन केले व ध्वजाला मानवंदना दिली . या संचलनात विद्यार्थिनीचा यात सहभाग होता.हे संचलन पाहण्यासाठी नांदगाव मधील मोठ्या सांगणे नागरिक,आजी माजी विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते. त्यानंतर ज्ञानयात्री अंकाचे प्रकाशन करण्यात आले या अंकाची माहिती प्रविण अहिरे यांनी दिली.राज्य गीताचे समुहगायन करण्यात आले.व देशभक्तीपर गीत सादर केले.या गीताना राजेश भामरे , प्रियंका पाटील,निवेदिता सांगळे,सुनिता देवरे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रियंका पाटील यांनी केले आभार अनिल तांबेकर यांनी मानले.या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील क्रीडा शिक्षक खंडू चौधरी,सुनिता देवरे,राजेश भामरे,सांस्कृतिक प्रमुख प्रियंका पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Monday, August 14, 2023

नांदगांव तालुका असमाधान कारक पावसामुळे नांदगांव तालुका दुष्काऴग्रस्त जाहिर करावा, निवेदनाद्वारे मागणी,



नांदगाव ( प्रतिनिधी ) - नाशिक जिल्ह्यातील सर्वत्र पावसाची परिस्थिती वाईट आहे . त्यात नांदगांव तालुक्याची परिस्थती अत्यंत चिंताजनक झालेली आहे. येणारे दिवसात परिस्तिस्ती अत्यंत गंभीर स्वरूपाची होणारी असल्याने या वस्तुस्थिती शासनाचे लक्ष घालुन वरील, त्वरित चारा छावणी सुरु करण्यात याव्यात . ग्रामीण भागात पाणी टॅक्कर ने पुरवठा सुरु करण्याची गरज आहे. शेती पंपावरील वीज बील माफ करुन,  परिस्तिथीला अनुसरून नांदगांव तालुका दुष्काळी जाहीर करावा म्हणून, उद्धव शिवसेना तालुक्याच्या वतीने नविन तहसील कार्यालय प्रवेशद्वार पासुन असंख्य शेतकरी बांधव, नांदगाव तहसील कार्यालय येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना, निवेदन देण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, संतोष बऴीद, प्रविण नाईक नांदगांव,तालुका प्रमुख संतोष गुप्ता, सुनील पाटिल संजय कटारिया, विनय आहेर शशिकांत मोरे,शिवसेना शहर प्रमुख श्रावण आढाव सह असंख्य शिवसैनिकांनी नांदगाव तहसील कार्यालय येथे घोषणा देत परिसर दुमदुमन टाकला होता.

नांदगाव मध्ये भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडीने वाहनांच्या लांबच लांब रांगा, रेल्वेच्या चुकीमुळे वाहनचालकांना कायमची अडचण, हुतात्मा चौकात दिशादर्शक फलक लावण्याची गरज,



नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात रोज होणाऱ्या वाहतूक कोंडी पासुन मुक्तता व्हावी या हेतूने रेल्वेच्या वतीने सबवे निर्मिती करण्यात आली . मात्र सबवे निर्मिती करतांनाच चुकीच्या पध्दतीने करण्यात आला. यावेळी नांदगाव करांनी विरोध देखील केला , मात्र विरोधाला न जुमानता रेल्वेच्या वतीने सबवे बनवण्यात आला. मात्र पावसाळ्यात पाणी इतर वेळी वाहतूक कोंडी यामुळे नांदगावकर त्रस्त झाले असुन रेल्वेच्या चुकीचा फटका मात्र नांदगावकराना बसत आहे . यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्य नांदगावकर जनतेकडून करण्यात येत आहे. 

हुतात्मा चौकात दिशादर्शक फलक बसवावा > 

- नांदगाव शहरातून जाणारा महामार्ग मनमाड मालेगाव येथून येतो इथून येणाऱ्या नागरिकांना पूर्वीच्या रेल्वे गेट ची सवय असल्याने अनेक अवजड वाहने त्याच दिशेने जातात. मात्र गेल्या दोन वर्षापासून येथील रेल्वे गेट काढून रेल्वेने सबवे अर्थात भुयारी मार्ग बनविला आहे .या महामार्गातून अवजड वाहने जाण्यास मनाई आहे. मात्र याची अनेक वाहनचालकांना माहिती नसल्याने अनेक वाहने सभेपर्यंत जाऊन पुन्हा माघारी घ्यावी लागतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते हा प्रकार थांबवण्यासाठी हुतात्मा चौकात दिशादर्शक फलक लावावे यावर स्पष्टपणे भुयारी मार्गाकडे व उड्डाणपुलाकडे असा उल्लेख करावा अशी नांदगावकरांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

Sunday, August 13, 2023

जातेगांव येथे वन्यजीव संरक्षण संस्था शाखेतर्फे जनता विद्यालयात शून्य सर्पदंश अभियान , विद्यार्थ्यांना चित्रफीत दाखवून प्रबोधन,



नांदगाव ( प्रतिनिधी)  -  नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर निसर्गरम्य परिसरात असलेले जातेगाव हे पिनाकेश्वर महादेवाचे प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते. याठिकाणच्या निसर्गाचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था शाखा नांदगाव तर्फे जनता विद्यालयात शून्य सर्पदंश अभियान राबवण्यात आले . विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर द्वारे सापांचे चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी आपल्या भागात आढळणाऱ्या विषारी, नीम विषारी, आणि बिनविषारी सापांची माहिती वन्यजीव संरक्षण संस्था नांदगाव शाखाध्यक्ष प्रभाकर निकुंभ यांनी माहिती देताना सांगितले की, साप हा मानवी अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आणि शेतकऱ्याचा मित्र कसा आहे व सापांची गरज का आहे याचे महत्त्व पटवून दिले. संस्थेचे उपाध्यक्ष मंगेश आहेर, पवन झाडगे, ललित मोकळ, मिथुन राठोड यांनी अनावधानाने सर्पदंश झालाच तर दंशानंतर प्रथमोपचार कसा करावा हे प्रात्यक्षिका द्वारे करून दाखवले. सर्पदंश पीडित व्यक्तीला लवकरात लवकर उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करावे तसेच कुठल्याही बाबा, बुवा किंवा मांत्रिक, तांत्रिक, आयुर्वेदिक उपचार मंदिर ठाणे किंवा दर्गा मध्ये घेऊन जाऊ नये जेणेकरून कुठलीही जीवित हानी होणार नाही. सर्पदंशावर प्रभावी औषध म्हणून A.S.V. (ऑंटी स्नेक व्हेनम)हे औषध ग्रामीण रुग्णालयात मोफत मिळते हे औषध सर्प दंशालवर प्रभावी ठरते. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी जातेगाव, बोलठाण. येथील स्थानिक सर्पमित्र रामेश्वर सोनवणे, सागर यादव, सोमनाथ येवले ,मयूर हसवाल तसेच डोंबिवलीचे सर्पमित्र ऋषिकेश सुरसे मयूर आहेर यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमासाठी जनता विद्यालयाचे प्राचार्य डी.वाय‌ चव्हाण, वा.य. पी. चव्हाण, उमेश निकम, राहुल निकम, युवराज काळे, आप्पा सोनवणे, गोरख धोबी आदी उपस्थित होते.

Tuesday, August 8, 2023

श्रीरामनगर ग्रामपंचायत येथे आ. सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन,




 नांदगाव (प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून श्रीरामनगर ग्रामपंचायत येथे विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी घंटा गाडी, ग्रीन जीम, लहान मुलांसाठी खेळणी, सौर ऊर्जा प्रकल्प या विकास कामांचे लोकार्पण, तसेच काँक्रीट रस्ता चे भूमीपुजन आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे होते. मंचावर छत्रपती पुरस्कार विजेते विष्णु निकम सर, माजी सभापती सूमन निकम, सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच सौ शुभांगी महाजन, सदस्या सौ कमल राऊत, सदस्या सौ नंदा खैरनार, माजी नगराध्यक्ष प्रदीप कासलीवाल उपस्थित होते. प्रास्ताविक  विष्णू निकम सर यांनी केले , सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक अतुल सोनवणे यांनी केले. या प्रसंगी माजी सभापती सुधिर देशमुख, शहर प्रमुख सुनिल जाधव, अतुल निकम, सदस्य सागर राऊत , सदस्य शुभम महाजन , वाल्मिक राऊत, सुधाकर राऊत, पप्पू महाजन, विजय महाजन, बाळू चौले, नंदकिशोर शर्मा आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगाव बस आगारात वाहतूक अधिकाऱ्याची आदिवासी विद्यार्थ्यांला शिवीगाळ, शाळकरी विद्यार्थ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये भरवली शाळा, संबंधितावर पोलिसांनी नोंदविला गुन्हा ,




 नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव बस स्थानकाजवळ सोमवारी दि. ७ अॉगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज( ठाकरवाडी ) या ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी मुले - मुली हे घरी जाण्यासाठी एस.टी.बस मध्ये बसण्यासाठी गेले. तेथील एसटी महामंडळाच्या वाहतूक निरीक्षक अधिकारी विनोद इपर यांनी विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यास मजाव करून विरोध केला.त्यावरून शालेय विद्यार्थ्यांनी जाब विचारला असता , त्याचा राग येऊन अधिवासी विद्यार्थ्यांना जातीवाचक अशोभनीय शिवीगाळ करून विद्यार्थ्यांना दमदाटी,शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात घडली.सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच आदिवासी समाज संघटना कार्यकर्त्यांनी बस स्थानकात धाव घेतली . सहायक वाहतूक निरीक्षक असलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी मोठा जमाव बसस्थानकात जमा झाला. पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी करत घटनेचा व्हिडिओ तपासून संबंधितांवर गुन्हा रजिस्टर नंबर ३३३ भांदवी कलम २९४, ३२३,५०४,५०६,गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे.  गुन्हा दाखल झाल्या नंतर अधिवासी बांधवांचा जमाव माघारी फिरला. नांदगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजु मोरे पुढील तपास करीत आहे.

Monday, August 7, 2023

नांदगाव तालुक्यातील टाकळी येथे कोब्राने चक्क कोब्रा सापाला गिळले, वनविभागात नोंद करून विषारी सापाला पकडून केले निसर्गमुक्त,


 

नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील टाकळी येथे कोब्राने चक्क कोब्रा सापाला गिळला आहे . टाकळी येथील सागर पवार पहाटे विहिरी जवळ मोटर चालू करायला गेले.  त्या वेळेस त्यांना विहिरीत एक मोठा साप पाण्यात पडलेला दिसला . सागर यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला . बडोदे यांनी विहिरीत बघितलं तर साडे पाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप पडलेला होता . त्याला बाहेर काढलं आणि पकडत असताना कोब्रा सापाने आपल्याच प्रजातीचा कोब्रा सापाला पोटातून बाहेर काढलं हा प्रकार बघितल्या वर बरेच लोकांनी गर्दी केली. बडोदे यांनी माहिती दिली असता कोब्रा सापाला भक्ष बनवतो . आपण ऐकलं पण आपल्याच प्रजीचा साप भक्ष बनवताना बघायला मिळत नाही . हा दृश्य दुर्मिळच आहे ,आता पावसाचे दिवस आहे.  पाणी बिळात शिरतात आणि साप बाहेर निघतात आपलं परिसर स्वछ ठेव्हा पाळा पाचोळा साफ करा साप कुठे पण आसरा घेतो साप दिसल्यावर मारू नका , सर्पमित्रना संपर्क करा अशी माहिती सर्पमित्र विजय बडोदे यांनी दिली आणि वनविभाग नोंद करून निसर्गमुक्त करण्यात आले.

Sunday, August 6, 2023

नांदगाव मधील रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये फ्रेंडशिप डे उत्साहाने साजरा,




  नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये काल शनिवारी  दि. ५ ऑगस्ट रोजी नमन एज्युकेशन सोसायटी'  संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव यांनी "फ्रेंडशिप डे" उत्साहाने साजरा करून घेतला .  विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल मॅम, रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी मॅम यांच्या नेतृत्वाखाली या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
 शाळेमध्ये फ्रेंडशिप डे चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी घरून फ्रेंडशिप बँड आणलेले होते . त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना बँड बांधून मैत्री दिवस साजरा केला. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका मॅडम तसेच संस्थाचालक यांना देखील फ्रेंडशिप बँड बांधून फ्रेंडशिप डे अति उत्साहाने साजरा केला.
      अशा पद्धतीने अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी एकमेकांना फ्रेंडशिप डे बँड बांधून तसेच शिक्षकांनी एकमेकांना फ्रेंडशिप डे बांधून अतिशय उत्साहाने हा दिवस शाळेत साजरा केला.

Friday, August 4, 2023

'अमृत भारत स्थानक योजनेत नांदगाव , मनमाड रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याने कायापालट होणार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची माहिती,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत  स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. या योजनेतून नाशिक जिल्ह्यातील  मनमाड रेल्वेस्थानक आधुनिकीकरण  रु.४४.८० कोटी, नांदगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण  रु. १०.१४ कोटीचा  निधी मंजूर करण्यात आला असून  या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास  होऊन रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दिली आहे. 
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनमाड  रेल्वे स्थानकावर रविवारी (दि. ६) सकाळी ९ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मनमाड येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार ,   नांदगाव विधानसभा  मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे देखील उपस्थित राहणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील ५०८  रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.  या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, रेल्वे राज्यमंत्री दर्शना ज़रदोष यांची उपस्थिती असणार आहे. या योजनेअंतर्गत विविध अद्यावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरीकांकडुन सर्व स्तरावर आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे. स्थानक  प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहे.विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतीक्षागृह स्वच्छतागृह, नवीन फूटओवर बीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे.   जिल्ह्यातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी होण्यासाठी रेल्वेस्थानकांचा  पुनर्विकास करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याने  डॉ. पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्रालायचे आभार व्यक्त केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक विधान, मनोहर भिडे यांच्यावर कठोर कारवाई करावी नांदगाव कांग्रेसचे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांना निवेदन सादर,






नांदगाव (प्रतिनिधी) - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रीय युवक कॉंग्रेस पक्ष नांदगाव तालुका यांच्यातर्फे अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या बद्दल अत्यंत अवमान कारक विधान करून त्याचां अपमान केला आहे.संभाजी भिडे सारखे व्यक्ती राष्ट्रपित्या बद्दल टीका टिप्पणी करतो हि गोष्ट संपूर्ण देशासाठी लाजीरवाणी आहे.सर्व धर्म समभाव हि आपल्या देशाची खरी ओळख आहे.पण ही ओळख पुसण्याचा संभाजी भिडे सारख्या मनुवादी प्रवृत्तीचा प्रयत्न आहे.भिडेच्या या मणूवादी वक्तव्याचा तिव्र निषेध नांदगाव तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.संभाजी भिडे यांच्यावर कठोर  कार्यवाही करण्यात यावी यासाठी व तसेच मणिपुर येथील महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचार  विरोधात कठोर कार्यवाही करणे बाबतचे निवेदन मा.आमदार अनिलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनखाली कॉंग्रेस पक्षा तर्फे निवेदन  तहसिलदार डॉ,सिद्धार्थ मोरे यांना देण्यात आले. यावेळी  तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे ,शहरअध्यक्ष मनोज चोपडे,कृ.उ.बा समितीचे संचालक दर्शन आहेर,अय्युब शेख ,राजेंद्र लाठे,डॉ.सागर भिलोरे,पुंडलिक सदगिर,सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष निरंजन आहेर,सागर साळुंके,राहुल परदेशी ,सागर आडकमोल,फैसल शेख साजिद शेख ,अमित आहेर ,अभिजीत सूर्यवंशी, आदी उपस्थीत होते.

Wednesday, August 2, 2023

पिंपरखेडच्या विद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊसाठे जयंती उत्साहात साजरी,




पिंपरखेड (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील विद्यालयात लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असल्याने विनम्र अभिवादन करण्यात आले. तर लोकशाहीर आण्णाभाऊसाठे जयंती मंगळवारी दि. १ अॉगस्ट रोजी साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गोकुळ बोरसे हे होते. अध्यक्षांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रेयस चव्हाण, आदेश घोटेकर, समृध्दी गरूड, शांभवी गरूड, पुष्कर इंगळे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी, उत्तम सोनवणे व गोकुळ बोरसे यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर भाष्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलका शिंदे, कैलास पठाडे, आबा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, August 1, 2023

वादग्रस्त वक्तव्य केल्याने मनोहर भिडे याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी नांदगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषदेचे निवेदन,



नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मनोहर भिडे याने महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने याविरोधात  नांदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी व   तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले. मनोहर भिडे याच्या कडुन वारंवार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे . काही दिवसांपूर्वी भिडे याने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले . त्यानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी वादग्रस्त भाष्य केले आहे. मनोहर भिडे याच्याकडून महापुरुषांचा होत असलेल्या वाद वादग्रस्त भाष्यमुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत आहे. तरी मनोहर भिडे याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे . यावेळी शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटी, अ.भा. म. फुले समता परिषद तालुकाध्यक्ष अशोक पाटील , महिला तालुकाध्यक्ष योगिता पाटील, मा. नगरसेवक वाल्मीक टिळेकर , मा. नगरसेवक विलास राजुळे , राजेंद्र लाठे, शहराध्यक्ष अरुण पाटिल , ओ. बी. सी. सेल तालुकाध्यक्ष रवींद्र सुरसे , दीपक खैरनार किसनराव जगधने, प्रशांत बोरसे, राजेंद्र सावंत, दत्तू पवार, अ.भा. म. फुले समता परिषद शहराध्यक्ष शिवा सोनवणे , धीरज मोकळ, महेश पवार, सचिन देवकाते, विद्यार्थी तालुकाध्यक्ष दया जुन्नरे , सचिन जेजुरकर, रिंकू जाधव, चंद्रकला बोरसे, अलका आयनोर, माणिक बाविस्कर, शंकर शिंदे, देवदत्त सोनवणे, भास्कर सुरसे, बापू बिन्नर, संपत पवार, तानसेन जगताप, भीमराव बेंडके, चिंधा बागुल, दत्तात्रय महाजन, बाबाजी शिरसाठ, गुलाब महाजन, विश्वास अहिरे, सुनील सरोदे, अरुण सोनवणे, शुभम बोरसे, रोहित बोरसे, पुरुषोत्तम बागुल, मनोज चोपडे, नरहरी थेटे, विलास कोतकर, भास्कर निकम, सुनील निकम, श्रावण पवार, दीपक बर्डे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...