Wednesday, July 27, 2022

केंद्र , राज्य सरकारच्या योजनेपासून वंचित ठेवल्याने भाजप ने नांदगाव तहसिलदार यांना दिले निवेदन, भाजप ओबीसी मोर्चा शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार,



नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील म.रा.वि.वि कंपनी मर्यादीत नांदगाव विभाग येथे केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या जन उपयोगी योजना आहेत, या योजनेचा नांदगाव तालुक्यातील शेतकरी , व्यापारी, ग्राहक यांना योग्य लाभ मिळत नसल्याने या संर्दभात भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री संजय सानप यांनी  नांदगाव तहसिलदार यांना निवेदन दिले. निवेदनात  तालुक्यात कोठलीच योजना राबवली गेली नाही. केद्र सरकारच्या अनेक योजना जे जाणुनबूजून  ग्राहकापर्यंत पोहचविल्या नाही. या बाबतीत प्रयत्न झाल्याने , शेतकरी , व्यापारी , ग्राहक हे विचारण्यासाठी गेले असता त्या़ंना उडवाउडवींची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे  शेतकऱ्याना केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित रहावे लागले. नांदगाव तालुक्यात अंदाधुंदी वीज बिल तसेच शेतकऱ्यांचे पैसे घेऊन वीज बिले दिले जात नाही. अजून प्रकार चालू आहे की बाह्यस्त्रोत कर्मचारी भरतीत भ्रष्टचार, म.रा.वि.वि.कंपनी मर्या. अधिकारी मोठ्या प्रमाणावर खाजगी कॉन्ट्रक्ट  देतात यांचीही उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पत्रात केली आहे. 
       नांदगाव तालुक्यात अंदाधुंदी वाढीव वीज बिले कशी येतात, जे मिटरचे रिडींग घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते योग्य प्रकारे काम करत नसल्याने त्यांची चौकशी करून ग्राहकांना अश्वस्त करावे , ग्राहकाला वाढीव बिलामुळे मनस्ताप सहन करावा लागत असून, तो पूर्ण होरपळला जात आहे. या प्रकाराला लवकर आळा घालण्यात यावा. अशा निष्क्रीय  अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी , यासाठी भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा शिष्टमंडळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नांदगाव तालुक्यातील प्रश्नावर कार्यवाही करण्यात यावी यासंर्दभात भेट घेणार आहेत.

Tuesday, July 26, 2022

मनमाडच्या सैफ तांबोळीची कॉमनवेल्थ गेम जिम्नास्टिक या प्रकारात भारताच्या संघात निवड, निवडीने सर्वत्र होतोय कौतूक,



मनमाड (प्रतिनिधी)-  इंग्लंड  येथील बर्लिन्गम होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम साठी जिम्नास्टिक या प्रकारात मनमाडच्या सैफ तांबोळी याची निवड झाली असून नुकताच तो इंग्लंडला रवाना झाला आहे. इंग्लंड मधील बर्लिन्गम येथे गुरुवारी २८ तारखेपासून कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. यासाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे या निवडीचे मनमाड शहरासह नाशिक जिल्ह्यातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जिम्नास्टिक या प्रकारात महाराष्ट्राचा पहिला खेळाडू म्हणून सैफची निवड झाली आहे.
          इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम साठी भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत यात सर्व प्रकारच्या खेळाडूंचा समावेश आहे. जिम्नास्टिक या प्रकारात भारताच्या संघात मनमाडच्या सैफ तांबोळीची निवड करण्यात आली असून तांबोळी हा महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू आहे .भारतीय नेव्ही मध्ये कार्यरत असलेला सैफ हा जिम्नास्टिक प्रकारात उत्कृष्ट खेळाडू असून भारतीय संघ निवडल्यानंतरही प्रशिक्षकांनी पुन्हा त्याची संघात निवड केली आहे. इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम मध्ये तो भारताचा प्रतिनिधित्व करणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील सादिक तांबोळी यांचा सैफ हा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्याला जिम्नास्टिकची आवड होती या खेळाची आवड बघून तांबोळी यांनी त्याला पुढे मदत केली व याच खेळाच्या जोरावर सुरुवातीला विभाग , राज्य , आंतरराज्य तदनंतर देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याला भारतीय नेव्ही मध्ये नोकरी मिळाली. नोकरी करत असताना त्याने आपला सराव सुरूच ठेवला याचे फळ म्हणून आज तो कॉमनवेल्थ गेम साठी निवड झाली. कॉमनवेल्थ गेम मध्ये मेडल मिळवण्याची आशा त्याच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे. कॉमनवेल्थ गेम मध्ये मेडल मिळाले तर भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी देखील त्याची निवड होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातून इथपर्यंत कामगिरी करणाऱ्या सैफचे सर्वस्तरातुन कौतूक होत आहे.

Sunday, July 24, 2022

मनमाड शहरातील रस्त्याचे काम त्वरित चालू करावे वंचितचे मुख्यधिकारी यांना निवेदन,

        निवेदन देताना वंचितचे पदाधिकारी

 मनमाड ( प्रतिनिधी) -   मनमाड शहरातील गुरुद्वारा ते पाकीजा कॉर्नर येथील सिमेंट काँक्रीटचे रोडचे काम महालक्ष्मी माता मंदिर ते पाकीजा कॉर्नर या अपूर्ण रोडचे काम बरेच दिवसांपासून बंद पडलेले आहे .या रस्त्यावरून रहदारी जास्त प्रमाणात आहे. हा रस्ता पुढे जाऊन अमरधाम कडे जातो. तसेच उपजिल्हा रुग्णालय शाळा बँक इत्यादी ठिकाणाकडे जात असून यावरील रहदारी जास्त प्रमाणात आहे, व याच रस्त्याचे काम रखडलेले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित चालू करण्यात यावे. या  रस्त्याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी मनमाड शहर शाखेच्या वतीने तीव्र स्वरूपाच्या आंदोलन घेण्यात येईल, असे निवेदन  मुख्याधिकारी  मनमाड नगरपरिषद यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष आम्रपालीताई निकम, तसेच शहर सचिव अनवर मंसूरी ,शहर उपाध्यक्ष गणेश भाऊ एलींजे, पी. आर. निळे,अमोल केदारे ,मच्छिंद्र भोसले ,साहेबराव अहिरे, प्रकाश नावकर ,वाल्मीक पाटील, संदीप पवार, निलेश निकम, सागर गाडे, राकेश पगारे ,राकेश शिलावट, रोहित संसारे, सौरव डोळस, सागर केदारे, रोहित कडवे, मनोज गरुड, सुनील अहिरे, बापू अहिरे ,गणेश निकम ,लकी निकम, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Saturday, July 23, 2022

नांदगावच्या नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल यांची रेल्वे स्थानकास प्रत्यक्ष भेट ,

    
नांदगाव ( प्रतिनिधी) -  नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल च्या मुली - मुलीनी नांदगाव  रेल्वे स्थानकास ला प्रत्यक्ष भेट दिली. आज  विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत  नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सरिता बागुल मॕम  ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी मॕम यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली. 
        शाळेच्या नविन शैक्षणिक वर्षात २३  जुलै रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशनला प्रत्यक्ष भेट दिली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात रेल्वे स्टेशन तसेच तेथील कार्यपद्धती याची माहिती असणे आवश्यक आहे. फक्त पुस्तक किंवा चित्रांवरून माहिती सांगणे हे मुलांच्या जास्त लक्षात आले नसते त्यामुळे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मुले जेव्हा बघतात तेव्हा ते त्यांच्या जास्त स्मरणात  राहतात. म्हणूनच मुलांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी ही प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यात आली. सर्वप्रथम तिकीट बुकिंग ऑफिस, नंतर ऑपरेटर ऑफिस, आर पी एफ ऑफिस, वेटिंग रूम यांची माहिती देऊन त्यांची कार्यपद्धती मुलांना समजून सांगण्यात आली.  विश्वजित मीना यांनी प्रत्यक्षात भेट दिली.  सर्वेश यादव  यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सर्व ऑफिस दाखवून त्याबद्दल मुलांना सर्व माहिती सांगितली. तसेच तेथील सर्व कर्मचारी वर्गाकडून मुलांना बिस्कीट पुडा देऊन मुलांचे कौतुक करण्यात आले. 
          ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी , प्रिया गरूड ,रूपाली शिंदे  ,एडना फर्नांडिस  ,मोनाली गायकवाड  ,सुषमा बावणे   , चैताली अहिरे , रोहिणी पांडे , तसेच  मदतनिस छाया आवारे, मंजू जगधने, रविंद्र पटाईत ,तसेच ड्रायव्हर मंगेश शिंदे, विनोद चौधरी, बाळू गायकवाड, सागर कदम, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल,  यांनी  अतोनात मेहनत घेऊन आजची ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात आली.

Friday, July 22, 2022

मनमाडमध्ये शिवसंवाद यात्रेतून आदित्य ठाकरे यांचे बंडखोर आमदारांवर टिकास्त्र,

       शिवसैनिकांशी संवाद साधताना                     आदित्य ठाकरे.


मनमाड ( प्रतिनिधी) - मनमाडमध्ये शिवसेनेचा शिवसंवाद यात्रा पार पडली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषणातून बंडखोर आमदारांवर टिकास्त्र सोडलं. "  गद्दारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला व त्यांच्या खुर्चीवर बसले. त्यांना उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही. ४० गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाही. गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला? सत्तेत होते तेव्हा अडीच वर्ष गप्प का राहीले? पक्षाचा आदेश सर्वोच्च असतो तो तुम्ही का पाळला नाही? त्यामुळे शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही, असे खडे बोल आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सुनवाले आहेत. मनमाडला आयोजित शिव संवाद यात्रेनिमित्ताने ते बोलत  होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
        राज्यातील सरकार वर  आदित्य ठाकरे यांनी भाष्य  केलं,  आमदार विकले गेले, लिहून घ्या. हे तात्पुरते अल्पमतातील सरकार आहे. मी विकलो गेलो नाही, आमदार विकले गेले. राजकारण घाणेरडे झालं, माणुसकी तोडून राजकारण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे भेटत नव्हते, असा आरोप केला. पण, दोन गंभीर शस्त्रक्रिया झाल्या म्हणून भेटले नाही, त्यांचं दुःख मी बघितलं. मुलगा म्हणून मी जवळ होतो. आजारी असतांनाही उद्धव ठाकरेंनी काम थांबवले नाही. महाराष्ट्राची सेवा थांबविली नाही. आजारपणाचा फायदा घेत गद्दारांनी आमदार जमविले. ते आमदार विकले गेले, असा टोला बंडखोर आमदारांना लगावला आहे. पुढे होणाऱ्या विधानसभा, लोकसभेत पुन्हा ताकद दाखवा'गद्दार नेते गेले. मात्र, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागावे. पुढे होणाऱ्या विधानसभा, लोकसभेत पुन्हा ताकद दाखवा. तुम्हा शिवसैनिकांना पुन्हा नव्याने संधी उपलब्ध होणार आहे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. यावेळी नांदगाव तालुक्यातून अनेक शिवसैनिक शिवसंवाद यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

 

      

Monday, July 18, 2022

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद रॅली संपन्न

 नांदगाव (प्रतिनिधी)-  राज्यात झालेल्या सत्ता नाट्य नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक भूमिकेत आले असून बंडखोर झालेल्या मतदारसंघातील शिवसेना आमदार व त्यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्याचा धडाका शिवसेनेच्या वतीने लावण्यात आला असून, याच धर्तीवर नांदगाव तालुक्यातील पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आल्या. यात आमदार सुहास कांदे यांच्या जागेवर जिल्हाप्रमुख म्हणून मनमाडची माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांची वर्णी लागली असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुख पदी अल्ताफ बाबा खान यांच्या खांद्यावर धुरा देण्यात आली आहे. तर नांदगाव तालुका प्रमुख म्हणून संतोष अण्णा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज या सर्व शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नांदगाव तालुक्यातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन रॅली केली. आज हा सायंकाळी चार वाजता नवनिर्वाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, महात्मा फुले पुतळा, तसेच अहिल्यादेवी चौक अभिवादन करत शिवस्मृती मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅली करण्यात आली. यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख अल्ताफ बाबा खान, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक , तालुकाप्रमुख संतोष अण्णा गुप्ता, नांदगाव तालुक्याचे संपर्कप्रमुख प्रवीण नाईक, मनमाडची माजी नगराध्यक्ष दिलीप सोळशे,  शशिकांत मोरे, सुनील पाटील, एडवोकेट सुधाकर मोरे, मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख संतोष अण्णा बळीत, शैलेश सोनवणे ,सनी फसाटे, प्रमोद पाचोरकर, संजय कटारिया, लिकायत शेख, ससमाधान देतकार , प्रदीप सूर्यवंशी,  भरत आप्पा मोकळ, राजाभाऊ चिते, संतोष बच्छाव, बाळासाहेब गुंजाळ ,शरद गुजर, दिलीप नंद, न्यानेश्वर पवार,  चंदू चव्हाण , नामदेव बोराडे, दत्तू चोळखे आदी उपस्थित होते.








Friday, July 15, 2022

गावाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या सूचना


नांदगाव( प्रतिनिधी) - नाशिक  जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड  यांनी नांदगाव दौरा केला.  आज नांदगाव येथे तालुकास्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले की,  कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही गावाला दुषित पाण्याचा पुरवठा होता कामा नये, टीसीएल चा वापर योग्य प्रमाणात व नियमितपणे करावा, मुदतबाह्य टीसीएल चा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.
      यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, गट विकास अधिकारी गणेश चौधरी उपस्थित होते.

नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक , रास्तारोको करत केली मागणी!!


हिसवळ खुर्द ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द ईथे  गिरणा धरणावरील ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या सदोष यंत्रणेमुळे हिसवळ खुर्द , हिसवळ बु. ग्रामस्थांना पावसाळ्यात पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो.  अनेक वेळा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने  संतप्त ग्रामस्थांनी नांदगाव -  मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन केले .  ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेतुन सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली . यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ढवळे साहेब, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कापसे साहेब, नांदगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरवाडकर , पो. बोगीर , पो. सोनवणे, हिसवळ खुर्द चे सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, सदस्य नानासाहेब आहेर, सुदाम आहेर, बंडूकाका आहेर, लखन आहेर, शांताराम लोखंडे, संदीप कदम, संदीप आहेर, माजी सरपंच विजय आहेर, माझे सरपंच मोहन दादा आहेर, माजी सरपंच संजय बापू आहेर,हिसवळ बु. सरपंच बाळू नाना बेंडके, रवींद्र देशमुख, श्रावण भालेराव, राजेंद्र करवर यासह, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचीही गाडी ग्रामस्थांनी अडवली व आपले संपूर्ण समस्या त्यांच्यासमोर मांडली. यातून अधिकारी लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढण्याचेही  आश्वासन बनसोड यांनी ग्रामस्थांना दिले.

Thursday, July 14, 2022

नांदगाव , मनमाड ईथील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक राज्य निवडणूक आयोगाकडुन स्थगित ...!!

नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव , मनमाड ईथील  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक जाहीर झाली असताना, राज्य निवडणूक आयोगाने मात्र  राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय केला आहे . स्थगित करण्यात आलेल्या निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. या निर्णयानंतर निवडणूक जाहीर करण्यात आलेल्या क्षेत्रांत लागू करण्यात आलेली आचारसंहिता लागू राहणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. 
   काल राज्य सरकारने आता नगराध्यक्ष, सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून करायचा निर्णय घेतल्याने, नेमका पुढचा बॉस कोण याचा विचार आता जनतेला करावा लागणार आहे.   सद्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे. त्यासाठी आता १९ जुलै ही तारीख देण्यात आली आहे. तोपर्यंत नव्या निवडणुका जाहीर करू नयेत, असे कोर्टाने म्हटले होते. त्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ८ जुलै रोजीच्या पत्राद्वारे राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात १ जुलै रोजी विशेष अनुमती याचिकेवरील सुनावणी झाली. त्यावेळी शासनाने इतर मागासवर्ग आयोगाने मागासप्रवगाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी १९ जुलै रोजी ठेवली आहे.
     निवडणुक स्थगित झाल्याने नांदगाव , मनमाड मध्ये  उमेदवारीवरून मात्र पेच आहे. राज्यातील सत्ता बद्दल झाल्याने होणाऱ्या पालिका निवडणुकीत काय परिणाम होतील येणारा काळ ठरवेल.  पुन्हा निवडणूका कधी जाहीर होतात याकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नजरा लागल्या आहे.  नांदगाव , मनमाड मध्ये पक्षाचे टिकट मिळण्यासाठी सगळ्येच आजी माजी नगरसेवक, युवक सज्ज आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका सत्ताधारी पक्षांपासून इतर सर्वच पक्षांनी घेतली आहे. त्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी महत्वाची मानली जात आहे.

Wednesday, July 13, 2022

नांदगाव नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कडुनिंबाच्या वृक्षांची लागवड


नांदगाव( प्रतिनिधी) -  नांदगाव नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत व स्वाध्याय परिवाराच्या माधववृंद उपक्रमांतर्गत  मंगळवारी १२ जुलै रोजी नांदगाव शहरातील महाजनवाडा परिसरातील स्वाध्याय केंद्रासमोर कडुनिंबाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी वृक्षांचे पूजन मुख्याधिकारी  विवेक धांडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व स्वाध्याय परिवारातील सदस्य व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

Saturday, July 9, 2022

नांदगाव, मनमाड नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं, पुढील महिन्यातील १८ ला मतदान, १९ अॉगस्टला मतमोजणी..!

नांदगाव / मनमाड ( प्रतिनिधी) - आगामी होणाऱ्या नांदगाव , मनमाड नगरपरिषदेची निवडणुक पुढील महिन्यातील १८ अॉगस्ट ला होणार असून, तर मतमोजणी १९ अॉगस्ट आहे. 
   महाराष्ट्र राज्यातील ९२ नगरपरिषद आणि ४ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर निवडणुक आयोगाकडून कार्यक्रम जाहिर करण्यात आला.  नांदगाव , मनमाड नगरपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीचे पुढील महिन्यातील १८ ऑगष्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगष्ट ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया २० जुलै पासून सुरू होणार आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशा नुसार २२ जुलै ते २८ जुलै पर्यत नामनिर्देशन पत्र भरावयाचे असून २९ जुलै रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी आहे.  तर  ४ ऑगष्ट माघारी ची तारीख असून ५ ऑगष्ट रोजी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे . निवडणुकीचे मतदान १८ ऑगष्ट रोजी  होणार असून, १९ ऑगष्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
    काही दिवसापुर्वी नांदगाव (क) नगरपरिषदेत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानूसार , १ ते १० प्रभागाचे आरक्षण निश्चीत करण्यात आले. आगामी निवडणुकीत १० प्रभाग असुन यापुढे  नव्या प्रभागरचनेनुसार  नगरपरिषदेत २० सदस्यसंख्या असतील.  आधी सदस्यसंख्या १७ होती.  प्रत्येक प्रभागात दोन सदस्य निवडुन येतील. महिलासाठी १० राखीव जागा असल्याने पुढील समीकरणे काय असेल येणारा काळ ठरवेल.
    मनमाड (ब) नगरपरिषदेत एकूण 16 प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनेक ठिकाणी महिलांना आरक्षण मिळाल्याने विद्यमान आणि काही भावी नगरसेवकाचा हिरमोड झाला आहे. मनमाड शहरात नव्या प्रभाग रचनेत एकूण ३३ नगरसेवक  असणार आहेत. निवडणुकीसाठी असणारे आरक्षण जाहीर झाल्याने ईच्छुकांनी नेतेमंडळी कडे भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. 
    नांदगाव , मनमाड नगरपरिषदेची तारखा जाहिर झाल्याने नेतेमंडळी, कार्यकर्ते ही प्रचारासाठी व्यस्त आहे. राज्यात नवीन सरकार विराजमान झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक आणखी चुरशीची होणार आहे.   नांदगाव , मनमाड नगरपरिषदे च्या  निवडणुकीत विविध पक्ष जोर लावणार असून , सत्ता कोणाकडे जाते मतदारराजा मतपेटीतून ठरवेल.

Friday, July 1, 2022

नांदगाव मध्ये आमदार सुहास कांदे समर्थकांनी केला जल्लोष


नांदगाव (प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयातील  मिठाई वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.  यावेळी याप्रसंगी 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या , विजय असो 'एकनाथ शिंदे यांचा विजय असो..' अशा घोषणा देण्यात आल्या ‘आमदार सुहास कांदे  तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ हे , यावेळी उपस्थिती माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, तेज कवडे, तालुकाप्रमुख किरण देवरे, शहराध्यक्ष सुनील जाधव , विष्णू निकम ,डॉ सुनिल तुसे, सुधीर देशमुख, प्रदीप कासलीवाल, आनंद कासलीवाल, अमोल नावंदर, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब शेवरे, नंदू पाटील, प्रमोद भाबड, सागर हिरे नितीन सोनवणे , अरुण भोसले, संतोष भोसले, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रोहिणी मोरे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...