Wednesday, November 30, 2022

लिव्ह - इन - रिलेशनशिप कायदा रद्द करण्यात यावा यासाठी नांदगावात मोर्चा,



नांदगाव( प्रतिनिधी ) : -   लव्ह जिहाद,धर्मांतर गोवंश हत्याबंदी यासंदर्भात कायदा करण्यात यावा या मागणीसाठी नांदगाव येथे हिंदुत्ववादी संघटनांतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. येथील मनमाड चौफुली येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली शहरातील विविध मार्गावरून हा मोर्चा हुतात्मा स्मारक येथे आणण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत लवकरात लवकर या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी महिला पुरुष यांच्यासह सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
             सध्या देशात व राज्यात लव्ह जिहाद प्रकरण मोठ्या प्रमाणात घडत असुन अनेक हिंदू मुलींना फूस लावून त्यांचे धर्मांतर करण्यात येत आहे यासह गोवंश हत्याबंदी धर्मांतर बंदी कायदा करण्यात यावा यासाठी हिंदू संघटना आक्रमक झाल्या असुन राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहे. आज नांदगाव येथे देखील सकल हिंदू समाजातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला होता.येथील मनमाड चौफुली वरील अहिंसा चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली शहरातील शनी मंदिर,मोठी होळी,छत्रपती शिवाजी महाराज चौक,कासार गल्ली फुले चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हुतात्मा चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले यावेळी दत्तराज छाजेड,संगिता सोनवणे,सागर फाटे, विकास शार्मा. सुमित गुप्ता संजय सानप डॉ आंनद पारख डॉ श्रीकांत देवरे सचिन पवार .महेश पैठणकर आदींनी भाषण करत लव जिहाद बद्दल कठोर कायदा करण्याची मागणी केली.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणुन मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tuesday, November 29, 2022

नांदगावतील नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल यांची ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्ष भेट,




 नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये   'नमन एज्युकेशन सोसायटी' संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव यांची ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे प्रत्यक्ष भेट देण्यात आली .         विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 
 नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सरिता बागुल ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली. 
         मंगळवार  दि.  २९ नोव्हेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे प्रत्यक्ष भेट दिली. विद्यार्थ्यांना रुग्णालयाची प्रत्यक्षात माहिती मिळण्यासाठी ही भेट घडवून आणण्यात आली. रुग्णालयात गेल्यावर सर्वप्रथम मुलांना सांगण्यात आले की आपण रुग्णालयामध्ये का जातो, आपल्याला काही दुखापत झाली तरच आपण दवाखान्यात जातो. पण तिथे गेल्यावर आपल्याला काय करावे लागते याची सर्व माहिती देण्यात आली. तर सर्वप्रथम   
नाव नोंदणी करावे
डॉक्टर कडून तपासणी करून घ्यावे
दिलेली औषधी घेणे तसेच स्वतःची काळजी घेणे, आणि नेहमी पोषक आहार घेणे इत्यादी माहिती देण्यात आली. तसेच डॉक्टरांनी प्रथमोपचार कसे करावे आणि त्यासाठी लागणारे साहित्य या सर्वांची डॉ. ख्याती तूसे तसेच तेथील नर्स यांनी प्रत्यक्षात भेटून आम्हाला माहिती दिली. शाळेच्या वतीने त्यांना थँक्यू कार्ड देण्यात आले. 
          ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड सुषमा बावणे चैताली अहिरे अश्विनी केदारे रोहिणी पांडे अश्विनी पाटील मॅम तसेच मदतनिस वैशाली बागूल , ज्योती सोनवणे, रविंद्र पाटील तसेच ड्रायव्हर , विनोद चौधरी, बाळू गायकवाड, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल, सागर कदम यांनी अतोनात मेहनत घेऊन आजची ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात आली.

Monday, November 28, 2022

नांदगाव मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना १३२ व्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार अर्पण,



नांदगाव (प्रतिनिधी)  -  आज नांदगाव शहरात श्री संत सावता माळी युवक संघ नांदगाव तसेच अखिल भारतीय समता परिषद नांदगाव शहर यांनी शिक्षणाचे जनक, महामानव, क्रांती सुर्य, भारतरत्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथी निमित्त नांदगाव येथील फुले चौकामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला .
त्याप्रसंगी संतोष अण्णा गुप्ता, डॉक्टर वाय पी जाधव, नगरसेवक वाल्मीक टिळेकर, सागर आहेर, अशोक  पाटील,वाल्मीक जगताप सर ,मनोज चोपडे,सुधाकर निकम, श्रावण  आढाव, सचिन  जेजुरकर, संजय  पवार, बाळासाहेब महाजन,समाधान आहेर,महेश भाऊ पवार, कचरू भाऊ त्रिभुवन, देविदास रासकर,बाळासाहेब खैरनार सर,सुगंधा  खैरनार, चंद्रकला बोरसे,अलकाबाई आयनोर इत्यादी नागरिक उपस्थित होते.

Sunday, November 27, 2022

विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी मोबाईलपेक्षा जास्त वेळ मैदानी खेळाकडे लक्ष केंद्रित करावे - आमिन शेख



मनमाड(विशेष प्रतिनिधी):- सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवतात हे त्यांच्या दृष्टीने घातक असुन अभ्यासा बरोबर मैदानी खेळ खेळण्यासाठी वेळ देऊन आपली बौद्धिक तसेच शारीरिक क्षमता वाढवणे गरजेचे आहे असे मत पत्रकार आमिन शेख यांनी सेंट झेवीयर हायस्कूल येथे व्यक्त केले वार्षिक क्रीडा महोत्सव निमित्ताने उदघाटक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळ आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग असुन याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी मंचावर मुख्याध्यापक 
माल्कम नातो, सिस्टर ज्योत्स्ना, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना निकाळे मॅडम, मनमाड चर्चचे धर्मगुरू सन्माननीय फादर सहायराज,संत झेवियर इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापक श्री रॉल्फी सर, पी टी ए संघाचे उपाध्यक्ष श्री संजय बोरसे, एसएमसीच्या प्राधिकरण अधिकारी सौ. पुष्प लताताई मोरे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ.शुभदा वाघ , दक्षता समितीच्या उपाध्यक्ष श्रीमती आशा वाघ, करुणा हॉस्पिटलच्या सुपीरियर सिस्टर रोज,करुणा नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या सिस्टर जिशा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
              सुरुवातीला आमिन शेख यांनी क्रीडा ध्वजाचे रोहण आणि क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केले.त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी गटनिहाय संचलन करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. प्रणव देवकर या विद्यार्थ्याने खेळाडूंना खेळाची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री पारखे मॅडम व हेमंत वाले सर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.एलिझाबेद शेल्टे मॅडम यांनी केले. याप्रसंगी स्वप्निल बाकळे व अजिंक्य जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी रिबिन कवायतीचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले तर सुधाकर कातकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली शालेय लेझीम पथकाने विविध रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापक फादर माल्कम नातो व सिस्टर ज्योत्स्ना यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रकाश नान्नोर सरांनी करून दिली. त्यानंतर क्रीडा महोत्सवाचे मार्शल सुधाकर कातकडे सर यांच्या देखरेखीखाली व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने क्रीडा महोत्सव अंतर्गत लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, धावणे, लंगडधाव ,दोरीवरील उड्या, भालाफेक, रिले माजी विद्यार्थ्यांसाठी धावण्याच्या स्पर्धा आदी स्पर्धा संपन्न झाल्यात. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या क्रीडा महोत्सवासाठी पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, November 26, 2022

नांदगाव तालुक्यातील आदिवासी वस्ती व बंजारा तांड्यावरील सभामंडप चे भूमिपूजन अंजुम कांदे यांच्या हस्ते संपन्न,


  नांदगाव (प्रतिनिधी)  -   मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वस्ती व बंजारा तांड्यावरील सभामंडप चे भूमिपूजन अंजुम  कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मूलभूत सुविधा (२५/१५) अंतर्गत मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वस्ती तसेच बंजारा तांडा वर सभा मंडप मंजूर करण्यात आलेले आहे. या सभा मंडपांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर व उद्या रविवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलेला आहे.
   आज शनिवार रोजी मतदारसंघातील जवळपास २० आदिवासी वस्ती व बंजारा तांडा येथील सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.
ढोल ताशांच्या गजरात औक्षण करत प्रत्येक गावागावात गावकऱ्यांनी  अंजुम कांदे यांचे स्वागत केले. आदिवासी महिला माय भगिनी व बालगोपाळांसोबत सौ अंजली कांदे यांनी संवाद साधला यावेळी उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता. 
नांदगाव तालुक्यात आदिवासी वस्ती व बंजारा तांडा दीडशे सभागृह देण्यात येणार असून या सभागृहांमध्ये वधू वर कक्ष तसेच भोजन कक्षाची व्यवस्था असणार आहे. 
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी प्रत्येक आदिवासी वस्तीवर तसेच बंजारा तांडा वस्तीवर सभागृह मंजूर केल्यानंतर त्वरित आपल्या स्वखर्चातून भगवान वीर एकलव्य तसेच संत सेवालाल महाराज यांची भव्य आकर्षक मूर्ती भेट दिली आहे तसेच या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय थाटामाटात नांदगाव येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मागील महिन्यात साजरा केला होता.   लवकरच ही सभा मंडप बांधून तयार होतील आणि पुन्हा एकदा त्या सर्व मुर्त्यांची स्थापना त्याच उत्साहात करण्यात येणार आहे. 


Thursday, November 24, 2022

नांदगाव येथील प्रमोद भाबड यांची जिल्हा मजूर संघ निवडणुकीत बिनविरोध निवड,



 नांदगाव (प्रतिनिधी) -     नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन च्या पंचवार्षिक निवडणुकीत नांदगाव तालुका प्रतिनिधी म्हणून गुलाब प्रमोद सुदामराव भाबड यांची  बिनविरोध निवड झाली. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी हरेश्वर सुर्वे ,व अनुजा सुशेन आहेर यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने  गुलाब  भाबड यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.
या प्रसंगी तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी प्रमोद भाऊ भाबड यांचे अभिनंदन केले, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
          या वेळी ज्ञानदेव  आहेर, हरेश्वर सुर्वे, नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास  आहेर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण दादा देवरे, नगराध्यक्ष राजेश कवडे, जी. प. सदस्य रमेश काका बोरसे, माजी सभापती सुभाष कुटे, विष्णू निकम सर, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर  लहाने, नांदगाव नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज दादा कवडे माजी उपसभापती राजेंद्र सांगळे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर संजय सांगळे, मनमाड चे माजी नगराध्यक्ष योगेश उर्फ बबलू  पाटील, संजय आहेर, अविनाशभाऊ इप्पर, सुनिल शेलार राजेंद्र पवार, अमोल शेठ नावंदर, राजेंद्र देशमुख, आनंद शेठ कासलीवाल आदि यावेळी उपस्थिती होती .

नांदगावतील स्मशानभूमी रस्त्याच्या पुलासाठी 'तिरडी' आंदोलनाने सर्वाचे लक्ष वेधले,



नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील मुख्य स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी पूल नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून शाकंबरी नदीवर पूल व्हावा, अशी मागणी केली असून, 'तुम्ही-आम्ही नांदगावकरां'च्या वतीने अभिनव पद्धतीने प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढत सरनावर बसून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
यावेळी रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करावे, प्रशासनाचा धिक्कार असो.. अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. स्मशानभूमी रस्त्यावर विसावापर्यंत प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
   विसाव्याजवळ प्रतीकात्मक तिरडी उतरवून आंदोलनही करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल चोळके यांनी सांगितले की, ५६ खेडी योजनेची पाइपलाइन अडथळा ठरत असल्याने संबंधित विभागाकडे पाइपलाइन स्थलांतर करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने पुलाचे काम थांबले आहे.
    याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांचे प्रतिनिधी म्हणून सुनील जाधव व सागर हिरे यांनी सांगितले की, ५६ खेडी योजनेच्या पाइपलाइन स्थलांतरासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले. आंदोलनात नांदगावकर यावेळी उपस्थित विजय पाटील, संतोष गुप्ता, वाल्मिक टिळेकर, जगताप सर, विशाल वडघुले, प्रवीण सोमासे, सागर आहेर, विकास भावसार, अवि महाजन, शरद महाजन, मधुकर खैरनार, श्रावण आढाव, अशोक पाटील, बाळासाहेब देहाडराय, समाधान आहेर, बापू वडाळकर, राजाराम खैरनार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, प्रकाश चव्हाण, पंडित गायकवाड, अर्जुन गायकवाड, निंबा वडाळकर, बापू सोमासे, नांदगावकर सहभागी झाले होते.

Sunday, November 20, 2022

नांदगांव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत जनता विद्यालय,मांडवडच्या मुलींच्या संघाला मिळाले विजेतेपद,

      
 मांडवड, नांदगाव (प्रतिनिधी)   -  नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज,संचलित स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय,मांडवड शाळेत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक,तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय नांदगाव व स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय,मांडवड यांच्या संयुक्त विद्यामाने नांदगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.याप्रसंगी नांदगाव तालुक्याचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी, नांदगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. ईश्वर पाटील, मांडवड गावचे ज्येष्ठ नेते विठ्ठल आहेर, शिवबा ग्रुपचे संस्थापक अशोक भाऊ निकम, संस्थेचे सभासद प्रशांत आहेर,रामराव मोहिते,प्रकाश आहेर,वाल्मीक थेटे हे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सदर कबड्डी स्पर्धेमध्ये वय वर्षे 14,17,19 वयोगटातील तालुक्यातील मुलांचे 55 संघाने यावेळी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. उत्कृष्ट आयोजनामुळे स्पर्धेला अधिकच रंगत या ठिकाणी दिसून आली. या  कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती असलेले गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्ती जोपासण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस. एस.यांनी केले.नांदगाव तालुका म.वि.प्र.संचालक  अमित बोरसे पाटील यांनी क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व उत्कृष्ट आयोजनाबद्दल मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षक संदीप आहेर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. 14 वर्षे आतील मुलांच्या स्पर्धेमध्ये व्ही.एन.नाईक हायस्कूल वेहेळगाव संघ प्रथम क्रमांक तर सेंट झेवियर हायस्कूल मनमाडच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला,17 वर्षा आतील मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगाव संघाने प्रथम क्रमांक तर छत्रे हायस्कूल मनमाडच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला,19 वर्षातील मुलांच्या स्पर्धेमध्ये महात्मा गांधी जुनियर कॉलेज मनमाड च्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक जनता विद्यालय भालूर या संघाने मिळविला दुसऱ्या दिवशी झालेल्या तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटांमध्ये जनता विद्यालय जातेगाव प्रथम क्रमांक तर क.मा.का.विद्यालय नांदगाव द्वितीय क्रमांक मिळविला 17 वर्षे वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक स्व शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड तर द्वितीय क्रमांक व्ही. जे.हायस्कूल नांदगाव संघाने मिळविला 19 वर्षातील मुलींच्या अंतिम सामन्यांमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगावच्या संघाने प्रथम क्रमांक तर महात्मा गांधी जुनिअर कॉलेज मनमाडच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला तिन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले व उपस्थित सर्व मान्यवरांनी नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र तिन्ही संघांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी केले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय त्रिभुवन सुधाकर कातकडे यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून कामकाज बघितले स्पर्धा आयोजनासाठी स्व शरद अण्णा आहेर जनता विद्यालय मांडवडच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

Saturday, November 19, 2022

नांदगाव च्या इंद्रायणी नगर येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती उत्साहात साजरी,


 
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव च्या शहरातील इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट) येथे शनिवारी दि. १९ ला  झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाच्या वतीने त्यांची जयंती परिसरातील महिला मंडळाच्या व जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत राम मंदिर येथे साजरी करण्यात आली. 
सविस्तर वृत्त असे की झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाच्या वतीने परीसरात थोर समाज सुधारक व विचारवंत यांच्या जयंती,सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि ते अन्याय विरोधात दंड ही पुकारत असतात प्रत्येक क्षेत्रात हे महिला मंडळ पुढाकार घेत असतात. आज राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी परिसरातील जेष्ठ नागरिकांना आमंत्रीत करुन या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन जेष्ठ नागरिक एकनाथ आहेर तसेच विश्वनाथ शेरेकर यांनी केले तर जेष्ठ नागरिक कचेश्वर गीते आणि शिवाजी जाधव यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच महिला मंडळाचे अध्यक्ष जानवी शर्मा यांनी ही पुष्प हार अर्पण केला.
उपस्थित मान्यवरांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले कचेश्वर गिते यांनी झाशीच्या राणी यांनी अतिशय कठीण संघर्ष केला तर प्रत्येक संघर्षाला मात देत विजय प्राप्त केला तुम्ही ही संघर्ष केला तर विजय निश्चित असेल आम्ही ही सोबत आहोत असे त्यांनी त्यांच्या भाषणातून संबोधित केले त्यांच प्रमाणे रिपाइंचे महावीर जाधव यांनी आपल्या भाषणातून थोडक्यात त्यांचा जीवनपट सांगत राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई १९नोव्हेंबर १८३५ ते जून १७/१८५८..या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ. स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या.सर्वांनी संघटित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रत्येक संघटनाला झाशीच्या राणी प्रमाणे आपण सर्व मिळून संघर्षावर मात करूया महिला मंडळाच्या अध्यक्ष 
जान्हवी शर्मा यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन आम्ही हा संघर्ष हाती घेऊन यशस्वीपणे संघर्षावर मात करत मार्ग काढण्यासाठी सदैव तत्पर आहोत तरी आम्हाला वरीष्ठ ,जेष्ठ परिसरातील नागरिकांनी तरुणांनी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन साथ द्यावी अशी अपेक्षा त्यांनी परिसरातील जमलेल्या जनते समोर मांडत व्यक्त केली आहे. या कार्यक्रमास जेष्ठ महिला शेरेकर आजी,मांडे आजी,गिते आजी,शेरेकर आजी, उपस्थितीत होते महिला मंडळाच्या पदाधिकारी कविता आहेर,मयूरा फोफलिया,शिल्पा महाजन, राखी जाधव,ज्योति क़ाळे,मंदा कुमावत,मंदा चव्हाण यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले होते तर सूत्रसंचालन जयश्री इपर यांनी केले तर आभार शितल मांडे यांनी मानले.

Thursday, November 17, 2022

नदीपात्रातून जाणाऱ्या स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी तिरडीयात्रा आंदोलन, नांदगावच्या नागरिकांचा प्रशासनाला इशारा,




नांदगाव (प्रतिनिधी) - शहरातील एकमेव असलेल्या समशानभूमीकडे जाणान्या रस्त्यावर पुलासह रस्ता व्हावा, यासाठी लक्ष वेधण्यासाठी तिरडीयात्रा व प्रतिकात्मक सरणावर बसून आंदोलन करण्याचा इशारा तुम्ही आम्ही नांदगावकरांच्या वतीने वाल्मिक टिळेकर, सागर आहेर, विशाल बडले, प्रवीण सोमासे, संतोष गुप्ता आदिंनी दिला आहे. हे आंदोलन २४ नोव्हेंबरला होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य समशानभूमी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. याच सत्याला पुढे एकलव्य वस्ती, वडाळकर वस्ती, पठाडे वस्ती आदी नागरी वसाहती असून, आदिवासी बांधवांच्या वस्तीकडे जाणान्या रस्त्याची चाळण झाली आहे.
     पुल नसल्याने पाण्यातून अंत्ययात्रा करावी लागत असल्याच्या घटना नित्याच्याच बनल्या आहेत. पूल नसल्यामुळे नदीपात्रातूनच मार्ग काढावा लागतो याविरोधात लक्ष वेधण्यासाठी यात्रा व प्रतीकात्मक सरचार बसून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणेला त्याची दखल प्यावी लागेल, असे दिसते विवेक हॉस्पिटल ते स्मशानभूमी रस्ता अशी तिरडीयात्रा काढण्यात येणार आहे.

नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन


नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये आज गुरुवार  दि. १७ नोव्हेंबर रोजी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
 शिवसेना संपर्क कार्यालय चांडक प्लाझा नांदगाव येथे सकाळी नांदगाव शहर शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहून हिंदुरुदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुल अर्पण करत अभिवादन केले. 
अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. 
         या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, सागर हिरे, प्रशांत पगार, एन के राठोड, भाऊराव बागुल, प्रकाश शिंदे, वाल्मीक निकम, कांतीलाल चव्हाण,बापू जाधव, नितीन सोनवणे, रवी खटके, परवेझ पठाण, शाम हिरे, आरिफ शेख, जय जाधव, सद्दाम शेख, अजय मोरे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या नांदगाव शहरप्रमुख रोहिणी मोरे, उपशहर - तब्बसुम सय्यद , शहरसमन्वयक भारती बागोरे, भालूर गट प्रमुख सुनिता महाले, भालुर गणप्रमुख  अर्चना सोनवणे, शहरसमन्वयक  उषा पगारे, शोभा गरुड, योगिता भाबड, अलका जेजुरकर, भारती बोरसे, सोनिया सोर, अनिता मैंद, वैशाली गेंद, गिता शिंदे, शोभा मांडवडे, सविता पगार, रेणुका बाहिकर, रेखा पाटील, आशा पगारे भिमाबाई पगारे, व खुशाली सोनवणे, निकिता महाले आदींची उपस्थिती होती.

नांदगाव शहरात क्षेत्र भेटीतून विद्यार्थ्यांना दिला प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव ,



 नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील सौ .कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थी दैनंदिन व्यवहारात पारंगत व्हावे तसेच कायदा व सुव्यवस्था यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाला अनुसरून विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस ला भेट देऊन तेथील कामकाज कसे चालते याविषयी माहिती जाणून घेतली. डाक सहाय्यक दत्तात्रय भावसार यांनी विद्यार्थ्यांना टपाल कार्यालयातील कामकाज कशाप्रकारे चालते याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष टपाल कार्यालयातील व्यवहार कसा चालतो याविषयी माहिती मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.पी. सावंत  यांनी डाक कार्यालयाला विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली.या भेटीत विद्यार्थ्यांनी आपले काही प्रश्न सुद्धा विचारले आणि आपले ज्ञान वृद्धिंगत केले. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी व मुलांना सुरक्षिततेची जाणीव होण्यासाठी आणि शस्त्रांची माहिती मिळावी यासाठी पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेट देण्यात आली. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील  यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रांची अतिशय उपयुक्त माहिती सांगितली तसेच रायफल चालवण्याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखविले तेथे उपस्थित मोरेदादा यांनी विद्यार्थ्यांना सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली. तसेच पोलिस कर्मचारी सोनवणे , मुंडे  यांनी सहकार्य केले .शाळेने राबवलेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन सुनिलकुमार कासलीवाल,सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता,सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल,संचालक महेंद्र चांदिवाल,मुख्याध्यापक व्ही.पी .सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिध्दार्थ जगताप,ईश्वर फणसे,अभिजित थोरात,विजय जाधव,श्रीमती. धन्वंतरी देवरे,निलोफर पठाण,जयश्री चोळके,अनिता पवार,वैशाली शिंदे,यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tuesday, November 15, 2022

शालेय पोषण आहार महिलांचे मानधन वाढविण्याची निवेदनात मागणी,



नांदगाव (प्रतिनिधी) - तालुक्यातील विविध शाळेतून शालेय पोषण आहार अंतर्गत काम करणाऱ्या महिलांना आशा वर्कर यांच्या धर्तीवर मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी योजनेत काम करणाऱ्या महिलांनी केली. याबाबत शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किशोर सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
   निवेदनात म्हटले आहे, की आम्ही भांडे धुण्यापासून ते खिचडी यासह इतर माध्यान्ह भोजन शिजवून वाटप करून साफसफाई करण्यापर्यंत हे सर्व काम करतो. या कामाच्या मोबदल्यात आम्हाला केवळ एक हजार ५०० रुपये महिना मिळतो. याशिवाय शासन जे काही अन्नधान्य व इतर वस्तू पाठवते ते कंत्राटदारामार्फत पाठवत असते. यामुळे याचा दर्जा देखील अतिशय निष्कृष्ट आहे. तसेच, मदतनीस महिलांना तेल व रोज लागणारा भाजीपाला विकत घ्यावा लागतो. मात्र याचा पगार देखील महिन्याच्या महिन्याला होत नसल्याने ते घेण्यासाठी देखील अडचणी आहेत. यामुळे मानधनात आशा वर्कर यांच्या धर्तीवर वाढ करावी यासह वेळेवर बिल अदा करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संगीता सोनवणे, आशा काकळीज, तब्बसुम शेख, सरला मोढे, नपीसा जाकीर शेख, वंदना बाहिकर, शोभा बाहिकर, पुष्पा वाघ, बेबीबाई शिंदे, शोभा सूर्यवंशी, हिराबाई आहेर, मंगलाबाई जक्कल आदी उपस्थित होते.

Monday, November 14, 2022

मनमाड येथे ख्रिस्ती बांधवातर्फे हंगामाचा सण साजरा,



मनमाड(विशेष प्रतिनिधी):- मनमाड येथील संत बार्णबा चर्च मध्ये हंगामाचा सण(उपकार स्तुती दान) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील ख्रिस्ती बांधवांनी आज हंगामातील पहिले धान्य फळ प्रभू येशुला अर्पण करत हा सण साजरा केला यावेळी संत बार्णबा चर्चचे मुख्य पाळक रेव्हेरेंट फिलिप वरा यांनी प्रार्थना करत सर्व धान्य पालेभाज्या फळे आशिर्वादित केले यानंतर या सर्व वस्तुंची विक्री करून मिळणारे पैसे हे चर्चला दान म्हणुन देण्यात आले.
           नाताळचा सण साजरा करण्याअगोदर नोव्हेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा हंगामाचा सण साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची आगळीवेगळी परंपरा असून दर वर्षी प्रमाणे यंदा ही आज (रविवार) चर्चच्या आवारात हंगाम सण (उपकार स्तुती दान) म्हणून हा सण साजरा करण्यात आला.मनमाड शहरातील कॅम्प परिसरात असलेला संत बार्णबा चर्च हा इंग्रजांच्या काळात बांधलेला आहे त्यावेळी कॅम्प भागात मोठ्या प्रमाणात इंग्रज राहत होते प्रथानेसाठी त्यांनी हा चर्च बांधल्याचे वयवृद्ध लोक सांगतात हा चर्च ब्रिटीश कालीन असल्याने तो सर्वात जुना मानला जातो.या चर्च मध्ये गेल्या अनेक वर्षा पासून नोव्हेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वार्षिक हंगामाचा सण साजरा करण्याची प्रथा असून त्याला धर्मिक महत्व देखील आहे दरवर्षीप्रमाणे यंदा ही आज रविवारची सामुहिक प्रार्थना झाल्यानंतर चर्चच्या आवारात हा सण साजरा करण्यात आला. त्यात कोंबडी पासून बोकड पर्यंत,अन्न धान्य पासून भाजीपाला पर्यंत यासह इतर सर्व खाद्य पदार्थ आणि विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती या आगळ्यावेगळ्या वस्तू खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांची झुंबड उडाली होती.विशेष म्हणजे इतर बाजार प्रमाणे या बाजारात वस्तूंची विक्री केली जात नाही तर त्यांचा लिलाव केला जातो.लिलावातून मिळणारी रक्कम समाजउपयोगी कामासाठी वापरली जात असल्याने समाज बांधव जास्तीत जास्त बोली लावून वस्तू खरेदी करतात.या बाजाराचे संयोजन चर्चचे पाळक रेव्हेरेंट फिलिप वरा,सेक्रेटरी शैलेश जाधव,खजिनदार मनीष अहिर, चर्च कमिटी सदस्य निलेश सपकाळे,प्रशांत केदारी,अरुण मोहन,विश्वास बत्तीसे, आशिष चर्वतूर, राजु शिंदे,सीमा देठे,सुमन रणदिवे,कल्याणी कदम,प्रमिला देठे,सचिन पवार यांच्यासह सदस्य आणि समाज बांधवांनी केले होते.

Wednesday, November 2, 2022

गिरणानगर ग्रामपंचायत येथें कायदे विषयक जनजागृती अभियान,



गिरणानगरनांदगाव ( प्रतिनिधी)  - पॅन इंडिया अंतर्गत नांदगाव विधी सेवा समिती व वकील संघ याच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २ नोव्हेंबर रोजी गिरणानगर ग्रामपंचायत येथें  कायदे विषयक जनजागृती अभियान संपन्न झाले. नांदगाव कोर्टाचे न्यायाधीश एस.जी.दूबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे सर पी. एल.व्ही.डॉ.गुप्ता, ॲड.विद्या कसबे, सामाजिक कार्यकर्ते सुमित सोनवणे व नांदगाव कोर्टाचे ज्यु. क्लार्क एस. ए.मोरे यांचे स्वागत सरपंच सौ.अनिता पवार यांनी केले. या प्रसंगी ॲड. पी.एस.पवार यांनी लहान मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध व लहान मुलांचे हक्क या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.उमेशकुमार सरोदे पाटील यांनी केले.  
  या कार्यक्रमास गिरणांनगर चे ग्रामसेवक डॉ. गोकुळ खैरणार, सदस्य श्री सुनील सोनवणे, योगेश दळवी, सचिन आहेर ,राहुल पवार, सिद्धेश सोनवणे , सागर आहेर,अभय देशमुख,गणेश अमुक, राजू गोफने,उमेश उगले,सागर शिंदे,प्रशांत गवांदे ,संदीप भदाने, तसेच गिरणांनगर चे ग्रामस्थ व बचतगटाच्या महिला मोठया प्रमाणत उपस्तीत होत्या

नांदगाव शहरात प्लास्टिक विक्रेत्यांकडून ५००० रुपयांचा दंड वसूल, ३ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त, नगरपरिषद पथकाची कारवाई,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद प्रशासन तर्फे प्लास्टिक पिशव्या न वापरण्यास सांगितले जात असताना, नांदगाव नगरपरिषदेच्या पथकाने आज दि. २ नोव्हेंबर रोजी शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांस ५०००₹ रूपयांचा दंड केला आहे. तसेच ३ किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. यापुढे शहरात प्लास्टिक बंदीची कारवाई सुरु राहणार आहेत असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नांदगाव नगरपरिषद प्रशासन ने आवाहन केले की नागरिकांनी प्लास्टिक विक्री व वापर टाळावा अशा सुचना केल्या आहेत. प्लास्टिक बंदीच्या कारवाई साठी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक राहुल कुटे, विजय कायस्थ, रामकृष्ण चोपडे, निलेश देवकर, सुनिल‌ पवार, अंबादास सानप, श्रीमती विजया धनकट यांच्या पथकाने केली.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...