Wednesday, March 29, 2023

नांदगाव येथे जागतिक शून्य कचरा दिन साजरा, शहरातील विविध भागात स्वच्छता मशाल जनजागृती,



नांदगांव (प्रतिनिधी) -  नगर परिषदेच्या वतीने बुधवारी  दि. २९ मार्च रोजी स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा ३.० आणि DAY-NULM यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक  धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वछोत्सव २०२३ व जागतिक शून्य कचरा दिन* साजरा करण्यात आला. यात नांदगाव शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरण, स्वच्छतागृहाची स्वच्छता, हँडवॉश, तसेच दैनंदिन निर्माण होणारा कचरा ओला व सुका कचरा, सॅनिटरी व घरगुती घातक कचऱ्याचे प्रकार , वेस्ट टू वेल्थ, होम कंपोस्ट, प्लास्टिक बंदी व कापडी पिशवीचा वापर याबाबत सविस्तर माहिती देऊन शहर स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील विविध भागात 
स्वच्छता मशाल जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिला बचत गटातील महिलांना व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी स्त्री शक्ती स्तर संघ, एकविरा वस्ती सर संघ, नांदेश्वरी वस्ती स्तर संघ, नीलंबरी वस्ती स्तर संघ, वैष्णवी वस्ती स्तर संघ, ज्ञानज्योती, निर्मिती,व सारनाथ या वस्ती स्तर संघातील बचत गटातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.राहुल कुटे, (प्र. स्वच्छता निरीक्षक), गौरव चुंबळे (सिटी कॉर्डिनेटर) ,आनंद महिरे (सहा. प्रकल्प अधिकारी),  विजया धनवट (समूदाय संघटक),  बिजला गंगावणे (क्षेत्रीय समन्वयक) यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजश्री बेलदार, संगीता सोनवणे, अलका गायकवाड, रत्ना वाबळे, अलका पांडे, योगिता काळीज या स्वच्छता दूतानी विशेष परिश्रम घेतले.

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील रुग्णांना आता पर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त मदत ,




नांदगाव ( प्रतिनिधी) -  मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत १ जुलै २०२२ ते १ मार्च २०२३ या आठ महिन्यात नांदगाव विधानसभा मतदार संघातील गरजू रुग्णांना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या शिफारशी ने संवेदनशील मुख्यमंत्री माना  एकनाथ शिंदे  यांच्या अर्थसहाय्य करण्यात आले. 
   मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्य व शासकीय सुविधा संबंधी मोफत सेवा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. सोबतच विशेष शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शिफारस करून रुग्णांना मदत केली जाते. मागील ८ महिन्यात आता पर्यंत १२ लाख १० हजार रुपयांचा निधी विविध रुग्णांना मिळाले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी  माहिती पत्राद्वारे आमदार सुहास आण्णा कांदे यांना दिली.

Tuesday, March 28, 2023

एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांनी दिली नांदगाव रेल्वे स्थानकास भेट,



नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये  शुक्रवार दि. २४ रोजी मार्च व्हीजे हायस्कूल मधील एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांनी स्वानंद उपक्रम अंतर्गत नांदगाव रेल्वे स्टेशन येथे भेट दिली. आमच्या अंगवळणी पडलेल्या परंतु आजही तेवढंच आकर्षण असलेल्या रेल्वेला जाणून घेतांना विद्यार्थ्यांना वेगळाच आनंद वाटला. रेल्वे यंत्रणेचा एक भाग म्हणून आरपीएफ आणि जीआरपीएफ  विभागाकडे तितक्याच जबाबदारीने पाहिले जाते. प्रवासी असतील नाहीतर रेल्वेची संपत्ती... यावर अहोरात्र निगराणी ठेवण्याच्या कामात या खाकी वर्दीधारी मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. नांदगाव विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र कोर  याबाबत अधिक विस्तृत बोलत होते. रेल्वे सुरक्षा, अपघात आणि उपचार, रेल्वेचे नियम, कामाच्या वेळा आणि जबाबदारी यावर अत्यंत मोकळेपणाने संवाद साधतांना त्यांना विशेष आनंद होतो. २६/११ च्या वेळी ते स्वतः ताज रेस्क्यू टिममध्ये होते. तिथला अनुभव रंजक पद्धतीने कथन करतात. याच अनुषंगाने एन.सी.सी च्या विभागाचे काम देखील त्यांनी जाणून घेतले. विद्यार्थ्यानी परेड करून छोटासा 'डेमो' त्यांना दिला त्यावेळी त्यांचे शालेय दिवस त्यांना आठवल्याचे कोर सर सांगतात. त्यांचे सहकारी खान साहेब आणि हवालदार घुगे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना लाभले. या व्हिडीओग्राफी मध्ये  डंबाळे सर ,खडवी सर आणि श्रीयुत नंनावरे यांचे सहकार्य लाभले होते.काहीतरी नवीन शिकल्याचा भाव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होता. विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष   संजीव धामणे , मुख्याध्यापक बडगुजर सर, शालेय पदाधिकारी  बाकळे सर,  शिंदे सर,  श्रीवास्तव सर यांचे या उपक्रमास मार्गदर्शन लाभले.

Monday, March 27, 2023

कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना निवेदन, भारतीय जनता पक्षाच्या या कृतीचा तीव्र विरोध केला,



नांदगाव (प्रतिनिधी) -  कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रकार हा संविधानावर आधारित लोकशाही व्यवस्थेची हत्या करण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या कृतीचा तीव्र निषेध केला. याबाबात नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांची काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी दर्शन आहेर, तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सागर साळुंके, अनुसूचित जाती सेल तालुकाध्यक्ष देविदास दिवे, शहराध्यक्ष रोहित जाधव यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Friday, March 24, 2023

नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला शासनाची मंजुरी , आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश,



   नांदगाव (प्रतिनिधी)  -  महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून , नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला शासनाची मंजुरी मिळाली आहे. गिरणा धरण ते नांदगाव शहर पाणी पुरवठा योजनेमुळे शहरवासीयांची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. पुढील वीस वर्षांपर्यंतची वाढती लोकसंख्या विचारात घेवून पाण्याचे आरक्षण करण्यात आलेले आहे.
     गिरणा धरणाच्या उदभव क्षेत्रात एक कोटी ४९ लाख रुपये खर्चाची २५ फूट व्यासाची जॅकलीन, पाण्याचा उपसा करण्यासाठी दीड कोटी खर्चाच्या २२५ अश्व शक्तीचे विद्युत पंप,
गिरणा धरणापासून ते नांदगांव ग्रामीण रुग्णालया मागील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंत एक फूट दोन इंच व्यासाची एकूण साडे 28 किलोमीटर लांबीची १९ कोटी ९७ लाख ६० हजार रुपये खर्चाची मुख्य जलवाहिनी,
दररोज साठ लाख लिटर पाणी शुद्धीकरण करण्यासाठी ३ कोटी ७८ लाखांचे जलशुद्धीकरण केंद्र,
     शुद्धीकरण झालेले पाणी शहरात वितरणासाठी शहराअंतर्गत ३ किलोमीटर अंतराची जलवाहिनी, असा या प्रकल्पाचा आराखडा असून हा सर्व प्रकल्प संपूर्णपणे सौरऊर्जेवरचा असल्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे होणारा त्रास कमी होणार आहे.
१ कोटी १५ लाख रुपये खर्चाचे लक्ष्मीनगर व ग्रुपकृपा नगर येहे प्रत्येकी चार लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. 
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पहिल्या दिवसापासूनच मतदार संघातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत आणि यामध्ये मोठे यशही मिळवले आहे. 
   मनमाड शहरासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना, धर्मवीर आनंद दिघे ७८ खेडी पाणी पुरवठा योजना, दहिवाळ सह २६ गाव पाणी पुरवठा योजना या योजना आधीच मार्गी लागल्या असून यांचे काम सुरू झाले आहे. 
    आता नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर झाली असून लवकरच ही योजना पूर्ण होणार आहे या अनुषंगाने आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाचा पाणी प्रश्न भविष्यात सुटण्यास मदत होणार आहे. 
   मनमाड नांदगाव शहरा सोबतच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील गावागावात या योजनांमुळे पाणी येणार असून गावातील नागरिक, माता भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत.

आजपासून पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ,

 


नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव  तालुक्यात गुरुवारी (ता. २३) सायंकाळी चंद्रदर्शन झाले. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली. आज (शुक्रवारी) पहिला रोजा (उपवास) आहे. चंद्रदर्शन होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या.
  
मुस्लिम बांधव ठेवणार महिनाभर रोजा

     शांतता, प्रेम, बंधुभाव, त्याग व उपासनेचा प्रतीक असलेल्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजे करुन अल्लाहच्या इबादत (प्रार्थनेत) मध्ये असतात. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव पहाटे सुर्योदयापुर्वी सहेरी करून उपवास धरतात. तर संध्याकाळी सुर्यास्तावेळी इफ्तार करुन उपवास सोडला जातो. यामध्ये संपुर्ण दिवसभर पाणी, अन्न काही घेतले जात नाही. घरोघरी व मशिद मध्ये कुरान पठण करुन मुस्लिम बांधव पाच वेळची नमाज अदा करत असतात. 
रात्री तराहवीची विशेष नमाज अदा केली जाते. ज्यामध्ये कुरानच्या पारेचा समावेश असतो. नमाजनंतर मशिदमध्ये जे पठण झाले त्याचा अर्थ देखील मौलाना विशद करत असतात. या महिन्यात मोठ्या प्रमाणात दान-धर्म केले जाते.

     इस्लाम धर्मात पवित्र 'रमजान'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत (उपासना) केली जाते. मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात.
रोजाबरोबरच नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना आदींमार्फत परमेश्वराची इबादत केली जाते. मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरीत्या परिभाषित करण्यात आले आहे. यासाठी मुस्लिम असणेच पुरेसे नाही तर मुलभूत पाच कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. पहिले इमान (प्रामाणिकपणा) दुसरे नमाज, तिसरे रोजा, चौथे हज आणि पाचवे जकात. इस्लाममध्ये सांगण्यात आलेले हे पाच कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम, सहानुभूती, मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगतात.

रोजाचा मूळ उद्देश - 
    रमजानमध्ये रोजा या शब्दाला आरबी भाषेत सोम म्हणतात, याचा अर्थ थांबणे. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस ‘रोजा’ (उपवास) करणारे सर्व ‘रोजेदार’ दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत. यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची फार आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक शुचिभरूत वळण लाभतं. मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो. त्याचप्रमाणे ‘ इबादत’ (उपासना) करण्यासाठीसुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते. संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासनामय, प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो.
'रमजान' मांगल्याचे प्रतिक आहे. त्यामुळे याला कृपाप्रसादाचा महिनाही म्हणतात. पवित्र कुराणाचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रींपेक्षा वरचढ ठरली आहे. रमजातमध्ये रोजे अनिवार्य आहेत. या रात्रीत जादा नमाज अदा करणे म्हणजे अल्लाहच्या समीप जाणे होय. नफील नमाजचा (जादा नमाज) मोबदला फर्ज (अनिवार्य नमाज) इतका दिला जातो तर फर्ज (अनिवार्य) नमाजचा मोबदला सत्तर पटीने जास्त असतो.

रमजान महिन्याचे तीन हिस्से - 
    रमजान इस्लामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना असतो. रमजान महिन्याचा पहिला दशक 'कृपेचा', दुसरा दशक 'क्षमेचा', तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून 'मुक्ततेचा' मानला जातो. या काळात अल्लाह त्यास क्षमादान देईल व नरकापासून सुटका करून मुक्ती देईल. त्यामुळे वर्षभरातील अन्य अकरा महिन्यांत मिळणार्‍या नेकी (पुण्याई) पेक्षा रमजानमध्ये मिळणारी नेकी  ही तब्बल सत्तर पटीने जास्त असते. त्यामुळे मुस्लिम बांधव जास्तीतजास्त नेकी कमाविण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात संसार, व्यापार आदींचा त्याग करून अल्लाहस शरण जातात.


Thursday, March 23, 2023

व्हि.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे नववर्षीय गुढी बनविण्याचा उपक्रमात उत्साहात सहभागी,




नांदगाव( प्रतिनिधी ) - गुढी बनविणे कार्यशाळा मंगळवारी दि.२१ मार्च रोजी चित्रकला विषया अंतर्गत गुढी तयार करणे ही एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली.  कलाशिक्षक शशिकांत खांडवी,ज्ञानेश्वर डंबाळे, चंद्रकांत दाभाडे, विजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना गुढी तयार करण्याचे मार्गदर्शन केले. यात ३१ विद्यार्थांनी एक दिवसाच्या कार्यशाळेत सर्व कलाकुसर आत्मसात करून सुंदर अशी गुढी तयार केली.विद्यार्थांनी तयार केलेली गुढी विद्यार्थी आप-आपल्या घरी उभी करणार आहेत या कार्यशाळेला शालेेय समिती अध्यक्ष  संजीव धामणेे, मुख्याध्यापक बडगुजर सर,  उपमुख्याध्यापक बाकळे सर,  पयवेक्षक शिंदेे, भास्कर मधेे, मिलिंद श्रीवास्तव ,गुलाब पाटील,यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले व विद्यार्थांनी बनविलेल्या गुढीचे कौतुक केले.

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये निरोप समारंभ उत्साहात ,



नांदगाव (प्रतिनिधी) - मंगळवार  दि. २१ मार्च रोजी  'नमन एज्युकेशन सोसायटी' संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव शाळेमध्ये गुड बाय पार्टी घेण्यात आली. 
    विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल, उपाध्यक्षा सरिता बागुल ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . विद्यार्थ्यांचे परीक्षा संपून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची छोटीशी सुट्टी देण्यात येते यानिमित्ताने हा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला. या गुड बाय पार्टीमध्ये विद्यार्थ्यांना लिटिल कृष्णाचा एक चित्रपट दाखवण्यात आला. सर्व शिक्षकांनी मिळून मुलांसाठी एक हसी की आदालत नावाचे नाटक सादर केले. तसेच शाळेचे अध्यक्ष बागुल तसेच बागुल यांच्या तर्फे मुलांसाठी आईस्क्रीम वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना भेटवस्तू देऊन बाय-बाय केले. नाचून गाऊन मुलांनी आज मनसोक्त आनंद लुटला या कार्यक्रमाचे औचित्य साधत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्षा सरिता बागुल इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना अबॅकस स्पर्धेचे बक्षीस वितरण केले . या स्पर्धेचे नियोजन व्यवस्थित पार पडण्यास अबॅकस टिचर श्रीमती निशिगंधा काकळीज यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री चौधरी यांनी केले. 
   हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका रोहिणी पांडे, अश्विनी केदारे, दिव्या शिंदे, एडना फर्नांडिस, मोनाली गायकवाड,   चैताली अहिरे, जयश्री चौधरी, मदतनिस वैशाली बागूल, छाया आवारे, अनिता नेमणार, ज्योती सोनवणे, रवींद्र पटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला .

कोंढार येथील विठ्ठल रखुमाई मंदिरा साठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून तात्काळ सभामंडप मंजूर,



नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) -    आमदार सुहास अण्णा कांदे यांनी कोंढार येथील विठ्ठल रखुमाई मंदिरासाठी तात्काळ सभामंडप मंजूर केला आणि लगेचच या सभामंडपाचे भूमिपूजन नारळ फोडून करण्यात आले. 
    आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघात मोफत फिरता दवाखाना व मोफत शासकीय कार्यालय सुविधा कॅम्प आज नांदूर व कोंढार या गावात आयोजित करण्यात आलेला असता येथील नागरिकांनी सभा मंडपाची मागणी केली. सदर बाब आमदार साहेबांना फोनवर कळविण्यात आली आणि त्यांनी त्वरित मंजुरी देत सभामंडपाचे भूमिपूजन करून घ्या असे सांगत दोन महिन्यात सभामंडप पूर्ण होईल असे आश्वासन दिले. आमदार साहेब यावेळी अधिवेशनासाठी मुंबई येथे असून देखील ग्रामस्थांच्या मागणी त्वरित मान्य करत जबाबदार कुटुंबप्रमुख असल्याचे उदाहरण स्पष्ट केले. या मुळे उपस्थित गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
     या प्रसंगी प्रमोदभाऊ भाबड, शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, राजेंद्र पवार, डॉ.सांगळे, किशोर लहाने,उत्तम पाटील,आप्पा कुनगर, रघुनाथ पारेकर, पिंटू व्हडगर, संजय आहेर, सोमनाथ घुगे, सरपंच रेखा समाधान शेंडगे, उप सरपंच सिताराम शेरमाळे, समाधान शेंडगे, संजय खांडेकर, नारायण शेंडगे, खंडू भाऊ खेमनार, संजय गोटे, जिभाऊ गोटे, सोमा गोटे, सोमनाथ हाके, सोहन हाके, दत्तू सातपुते, पांडूरंग पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.

Tuesday, March 21, 2023

नांदगांव तालुका शिवसेनेच्या संघटकपदी शिवाजीराव वाघ यांची नियुक्ती,




नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगांव तालुका शिवसेनेच्या संघटक पदी शिवाजीराव वाघ यांची नियुक्ती शिवसेना जिल्हा प्रमुख गणेशजी धात्रक व तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांनी पत्राद्वारे केली. शिवाजी राव वाघ हे पिपरी हवेली या शाखेचे शिवसैनिक असून त्यांच्या  नियुक्ती चे सर्वत्र स्वागत होत आहे.  त्यांच्या नियुक्ती बद्दल माजी आमदार राजाभाऊ देशमुख , उपजिल्हा प्रमुख संतोष बळिद , सहसंपर्क पिंटू भाऊ नाईक, संजय कटारिया, उप तालुका प्रमुख शशिकांत मोरे, बाळासाहेब चव्हाण, शहर प्रमुख श्रावण आढाव, माधव शेलार ,महिला आघाडी शहर प्रमुख लताताई कळमकर, विभाग प्रमुख अशोक चोळके, भावडू गीते आदींनी अभिनंदन केले.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला व्ही.जे. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सामुहिक महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे पठण,



   नांदगाव ( प्रतिनिधी)  -  गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला स्वानंद उपक्रमांतर्गत व्ही.जे.हायस्कूल, नांदगाव या विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थीनींनी सामुहिक महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे पठण नांदगाव शहरांचे ग्राम दैवत एकवीरा देवी मंदिर परिसरात केले.वर्ग गटांना श्लोक देऊन, गटा गटाने श्लोक पठण झाले. उपक्रमांत १२० विद्यार्थींनींनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थीनीना मार्गदर्शन कलाशिक्षक चंद्रकांत दाभाडे यांनी केले. निवेदिता सांगळे, नितीन भांड , अविनाश सोनवणे यांनी सहकार्य केले. संकुल प्रमुख व शालेय समितीचे अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे यांनी उपक्रमाचे व सहभागी विद्यार्थींनींनी चे कौतुक केले.

Sunday, March 19, 2023

गारपीट मुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामा तत्काळ करण्याचे आदेश दिले - आ.सुहास आण्णा कांदे




नांदगाव  ग्रामीण( प्रतिनिधी ) -  नांदगाव तालुक्यात शनिवारी गारपीट व अवकाळी पाउस झाला, या पावसात अनेक शेतकऱ्याचे शेतमालाचे मोठे नुकसान झालेले आहे. पावसाने २१ गावातील २४०० हेक्टर क्षेत्रावरील गहू मका कांदा या पिकांना अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे गहू पिकाचे तसेच रांगडा व उन्हाळी कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सलग सहा दिवसांपासून पाचही महसूल मंडळात अवकाळी पाऊस पडत आहे.या मुले शेतकरी हवाल दिल झाला असून शासनाने या परिस्थितीची तात्काळ दाखल घेऊन पंचनामे करून घेणे गरजेचे असल्यामुळे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामा करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत.   या प्रसंगी शेतकऱ्यांनी धीर सोडू नये असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.

Saturday, March 18, 2023

नांदगाव येथे शिवसैनिकांची मालेगाव सभेच्या नियोजनासाठी बैठक संपन्न, सभेत जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन,



 नांदगाव ( प्रतिनिधी) -  काल शुक्रवारी दि. १७ मार्च रोजी नांदगांव येथे मालेगाव येथील २६ तारखेला  शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिकानीं सहभागी व्हावे या साठीचे नियोजन करण्यासाठी शिवसैनिकांच्या बैठकीत  माजी आमदार राजाभाऊ देशमुख, तालुका प्रमुख संतोष गुप्ता, संजय कटारिया, देशमुख सर यांनी केले . या कार्यक्रमात शशिकांत मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक जाधव, शहर प्रमुख श्रावण आढाव, महिला आधाडीच्या लता ताई कळमकर, विधानसभा संघटक संतोष जगताप ,शिवाजी वाघ , ज्ञानेश्वर पवार, सीताराम राठोड आदी सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

कॉर्फ बॉल स्पर्धेत नांदगाव महाविद्यालयाचे यश , दोघेही खेळाडूंचे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कॉर्फबॉल (मिक्स) स्पर्धेसाठी निवड ,




 नांदगाव (प्रतिनिधी)  -  अगस्ति कला, वाणिज्य आणि दादासाहेब रूपवते विज्ञान तंत्रज्ञान महाविद्यालय अकोले, अहमदनगर येथे झालेल्या आंतर विभागीय कॉर्फबॉल मिक्स स्पर्धेमधून नांदगाव महाविद्यालयातील  कार्तिक सुरेश औशीकर(M.Com-I) व कोमल भागीनाथ बच्छाव (SYBCom) या दोघांची निवड अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कॉर्फबॉल (मिक्स) स्पर्धेसाठी करण्यात आली. 
     या स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवड झालेल्या संघाचा रिपोर्ट ३ मार्च २०२३ रोजी व संघ सराव दि. ०३ ते ०५ या दरम्यान करून घेण्यात आला.  या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ पुण्याहून जयपूरला दि.०५ मार्च २०२३ रोजी रवाना झाला.
 स्पर्धा ही अपेक्स विद्यापीठ, जयपूर येथे दि. ०७ ते १० मार्च २०२३ या दरम्यान घेण्यात आली . या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
    महाविद्यालयातील खेळाडूंच्या या उत्कृष्ट कामगिरीकरता मविप्र संचालक  अमित बोरसे, प्राचार्य डॉ. एस एन शिंदे उप-प्राचार्य डॉ. संजय मराठे कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य आर.टी.देवरे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. लोकेश गळदगे, उप-प्राचार्य दयाराम राठोड , दिलीप आहेरराव यांनी अभिनंदन केले.

Wednesday, March 15, 2023

नांदगावात थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल ताशांचा गजर, नगरपरिषद प्रशासन कारवाई आणखी तीव्र करणार,



नांदगाव शहर (प्रतिनिधी) -   नांदगाव नगरपरिषदेच्या वतीने आज दि. १५ मार्च पासून ज्या नागरिकांनी वारंवार सांगूनही घरपट्टी, पाणीपट्टी, जागाभाडे, गाळाभाडे भरलेले नाहीत अश्या नागरिकांच्या घरासमोर ढोल ताशांचा गजर करण्यात आला.यापुढेही अशीच कारवाई तीव्र करून नळ कनेक्शन कट करणे,मलमत्तेवर बोजा चढवून मालमत्ता जप्त करणे अशी कार्यवाही करण्यात येणार आहे. सदरील वसुली पथकात मुख्याधिकारी विवेक धांडे, प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, अनिल पाटील,बंडू कायस्थ,रामकृष्ण चोपडे, निलेश देवकर, रोशनी मोरे, गौरव चुंबळे, प्रकाश गुढेकर, वाल्मिक गोसावी यांचा समावेश होता.

मांडवडमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून नांगरिकासाठी मोफत विविध सेवा,


  मांडवड , नांदगाव (प्रतिनिधी) -   आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत विविध सेवा पुरविण्यात येत आहेत. आज नांदगाव तालुक्यातील मांडवड गावात हा कॅम्प लावण्यात आला होता. २ दवाखाना, २ शासकीय सुविधा कार्यालय, डॉक्टर, सिस्टर, डोळ्यांचे डॉक्टर, सेतू प्रतिनिधी, आशा ताई, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते असा ताफा नागरिकांच्या सेवेत आज कार्यरत होता. 
   सकाळी १० वाजता उपस्थितांच्या हस्ते नारळ फोडून आजच्या कॅम्प ची सुरुवात करण्यात आली. पी.आर.पाटील सर यांनी आपल्या मनोगतात सर्व सुविधांबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली, सर्व टीम चे स्वागत केले तर आमदारांचे आभार मानले.
      मांडवड , लक्ष्मीनगर, आझादनगर तसेच मांडवड गावातील नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला.५३० नागरिकांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला तर डोळ्यांची तपासणी केली, यात ३०६ नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले यात मोठ्या संख्येने वयोवृध्द, व महिलांनी सहभाग घेतला, यात ६६ जणांना डोळ्यांची शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून लवकरच त्यांचे मोफत ऑपरेशन केले जाणार आहे. या शिवाय २६४ जणांनी सेतू सुविधांसाठी संपर्क केला. यामध्ये रेशन कार्ड संबंधित अडचणी तर निराधार योजना, पेन्शन योजनेसाठी अनेकांनी कागदपत्र जमा केली.
    मोफत आरोग्य सेवा, डॉक्टरांचा सल्ला, औषधे, डोळ्यांची तपासणी, ड्रॉप, चष्मा, सेतू सुविधांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आभार मानले. तर मांडवड येथील ग्रामपंचायत सरपंच, उप सरपंच, कर्मचारी, तसेच गावातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
डॉ.संकेत मार्कंड, डॉ.कीर्ती आहेर, डॉ. आशा जगताप, डॉ.राहुल पाटील यांनी रुग्ण तपासणी केली.
     या प्रसंगी मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड, जिल्हाप्रमुख किरण देवरे, सरपंच अंकुश डोळे, उपसरपंच विठ्ठल आहेर, अशोक निकम, योगेश आहेर, डॉ.प्रवीण निकम, सागर आहेर, सुधीर देशमुख, पी.आर.पाटील सर, भावराव बागुल, सुनील जाधव, आण्णा मुंढे, लक्ष्मी नगर सरपंच शंकर उगले, अंकुश उगले, रमेश घाडगे, कैलास आहेर, त्रंबक आहेर, सुदाम आहेर, वाल्मीक काकळीज, वाल्मीक थेटे, सर्जेराव थटे, गोरख थेटे, मच्छिंद्र निकम, रंगनाथ पिंगळे, साहेबराव गरुड, बापू हांडे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या कॅम्प साठी प्रकाश शिंदे, निशांत बोडके, महेंद्र आहेर, सतीश बोरसे, गणेश खैरनार,भरत पारख, ओमकार चिकने, यांनी मेहनत घेतली .



Monday, March 13, 2023

राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार २०२३ चा सामाजिक कार्यकर्त्या संगिता सोनवणे यांना मिळाला,


नांदगाव ( प्रतिनिधी) -   नांदगाव येथील शिवकन्या  संगीता सोनवणे यांना जळगाव येथील वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर संचलित एम के व्हेंचर जळगांव आणि साहित्य सरिता मंच तर्फे राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार २०२३ मिसेस युनिव्हर्स संगीत खैरनार व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सौ सोनवणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याआधी पनवेल, मुंबई, ठाणे ,औरंगाबाद ,नांदेड, नाशिक आदी ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकतेच नांदगाव नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियानचे ब्रँड आंबेसिडर म्हणुन त्यांची नियुक्ती केली आहे.सौ सोनवणे यांना मिळालेल्या या पुरस्काराची नांदगाव तालुक्यातील जनतेसह संपूर्ण जिल्ह्यातील शिवप्रेमीनी दखल घेतली असुन सर्व थरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.सौ सोनवणे या कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतात शिवपूजा हा नित्यक्रम याशिवाय अनेक गरजूंना देखील कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता मदत करत असतात.

Sunday, March 12, 2023

आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर,




    नांदगाव (प्रतिनिधी)  -  अर्थसंकल्प २०२३ मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते पूल यावर लक्ष केंद्रित करत पाठपुरावा केला असता , तब्बल २१२ कोटींची कामे मंजूर करून घेण्यात यश मिळवले.     
           नांदगाव मतदार संघातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते . तसेच अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.  पावसाळ्याच्या कालावधीत नदी नाल्यांना पूर आल्यामुळे वाहतूक बंद होऊन अनेक गावे व वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे रस्त्यावर पूल बांधणे रस्त्यांची सुधारणा होणे आवश्यक होते. यासाठी आमदारांनी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांचे व पुलांचे कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने नांदगाव मतदार संघातील राज्य मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची सुधारणा व पुलांच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला .त्यापैकी नांदगाव तालुक्यात ७९ कोटी दहा लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी ३२ कोटी ६५ लक्ष तर इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांसाठी ४५ कोटी ४५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघातील व मालेगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी १२४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. 
   रस्त्यांच्या व पुलांच्या कामांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतीमाल ने आण करण्यासाठी तसेच नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर होणार असल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


Friday, March 10, 2023

आरोग्यवर्धीनी केंद्र कळमदरी येथे जागतिक महिला दिन निमित्त विविध स्पर्धेंचे आयोजन,



  नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी) -   जागतिक महिला दिनानिमित्त कळमधरी महिला कर्मचारी यांसाठी रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा , संगीत खुर्ची स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व स्पर्धांचा महिलांनि आनंद घेतला विजयी स्पर्धकांस मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
    कार्यक्रमास कळमदरी सरपंच मनोज पगार,जामधरी सरपंच बाबासाहेब मोरे ,वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील ,डॉ पवार ,समुदाय आरोग्य अधिकारी वैभव पाळंदे,आरोग्य सेविका डोंगरे ,गटप्रवर्तक आहेर ,आशाताई दीपाली पाटील वर्षा शेवाळे ,संगीता विसपुते,सविता पवार,अश्विनी मोरे ,सुवर्णा देवरे वैशाली आहेर शिक्षिका सुरवसे अंगणवाडी सेविका रंजना पवार ,नलिनी पवार ,सुनीता पवार ,भारती आहेर,उषा मगर आदी उपस्थित होते.

नांदगावला शिवसेनेतर्फे विविध मागण्यांचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन,



नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नांदगांव तालुका पक्षाच्या वतीने वाढलेले गॅस डिझेल पेट्रोल व जीवनावश्यक वस्तूंचे कमी करून शेतमालाला व कांदा कापूस यांना मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे शेती व शेतकरी याना शेतमालाला योग्य भाव मिळणे न मिळाल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीमळविषयी योग्य धोरण राबवून शासनाने शेकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा पिकविम्याच्या व अनुदानाच्या थकीत रकमा शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावा. नार पार च्या डीपीआरमध्ये नांदगांव तालुक्याचा समावेश व्हावा शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत चालू करावा आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार सिद्धार्थ मोरे  याना देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता, शहर प्रमुख श्रावण आढाव, महिला आघाडी शहर प्रमुख लताताई कळमकर ,
विभाग प्रमुख अशोक चोळके ,सुरेश खेरणार ,नुरा खान ज्ञानेश्वर पवार ,समाधान इप्पर ,दिलावर इनामदार, किशोर साळवे, तेजस बोराळे दुर्गेश ठाकरे ,बाळासाहेब रसाळ आदींची उपस्थिती होती.

Friday, March 3, 2023

कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात 'पक्षीवाचवा' अभियानाला सुरुवात,



 पिंपरखेड, नांदगाव  ( प्रतिनिधी) -  आज शुक्रवारी दि. ३ मार्च  रोजी विद्यालयात 'जागतिक वन्यजीव दिनाचे' औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे 'पक्षी वाचवा' अभियानाला सुरुवात झाली. या प्रसंगी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी प्लॅस्टिकच्या डब्यापासून तयार केलेले कृतिम पाणवठे विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी सर यांचे हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात लावलेल्या झाडांच्या फांद्यांवर टांगण्यात आले. त्यात पाणी व बाजूला असलेल्या कप्प्यात पक्षांसाठी धान्य टाकण्यात आले. धान्य तेही विद्यार्थ्यांनी घरून आणले होते. सध्या नैसर्गिक पाणवठे आटले असून पाण्या अभावी पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे असे उपक्रम महत्वाचे आहेत. 
   या उपक्रमात मुख्याध्यापक  काशिनाथ गवळी सर यांच्या संकल्पनेतून २०१४ पासून ते आजतागायत म्हणजे सलग ९ वर्षांपासून चालू आहे. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी देखील अनुकरण करत आपापल्या घरी, वाडी वस्तीवर असे कृतिम पाणवठे तयार केले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांबद्दल, प्रेम, आपुलकी व जिव्हाळा निर्माण होऊन भूतदया हा सद्गुण वाढीस लागेल व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाबद्दल त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण होईल, विद्यार्थी संस्कारक्षम होतील अशी आशा मुख्याध्यापक काशिनाथ गवळी यांनी यावेळी व्यक्त केली. असा उपक्रम सर्वत्र राबवला गेल्यास येत्या काळात घटत जाणाऱ्या पशुपक्षांबाबत आशादायक वातावरण निर्माण होईल असेही ते म्हणाले. संस्थेच्या संचालक मंडळाने या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. 
    यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गोकुळ बोरसे,  संजय कांदळकर,  अलका शिंदे,  कैलास पठाडे,  उत्तम सोनवणे,  लक्ष्मण जाधव संदीप मवाळ  आबा सोनवणे ई. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

Thursday, March 2, 2023

मनमाड नगर परिषद शाळा इमारतीचे नूतनीकरणाच्या कामाची अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन,




नांदगाव , मनमाड ( प्रतिनिधी ) -   आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत नांदगाव व मनमाड शहरातील नगरपरिषद शाळा इमारतींच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
      मनमाड शहरातील विविध नगरपरिषद शाळांना भेट दिल्यानंतर शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे निदर्शनास  आले . तसेच इमारत परिसरात सुशोभीकरण करणे व उत्तम वातावरण असणे गरजेचे असल्याचे संकल्पना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे मांडली असता या विषयाची तात्काळ दखल घेत निधीसाठी पाठपुरावा केला होता. नगर विकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेत मनमाड सह नांदगावच्या नगरपरिषद शाळांना एकूण दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
    भूमिपूजन झाले असून लवकरच शाळांचे नूतनीकरण करण्यात येईल आणि स्वच्छ सुंदर असलेल्या इमारतीत शिक्षण घेण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होईल, असे अंजुम कांदे यांनी सांगितले.  
     विविध शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी स्वागत केले. आमदारांच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या शाळांच्या इमारत नूतनीकरणाबद्दल शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आभार मानले होते.
  याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, मनमाड शहरप्रमुख मयूर बोरसे, बांधकाम विभागाचे खैरनार शिक्षण अधिकारी चंद्र मोरे , महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्या जगताप मनमाड शहर प्रमुख संगीता बागुल,नाझमा मिर्झा, मोहिनी राजाभाऊ अहिरे,मंदा भोसले,शाहीन शेख, सरला गोगळ, अलका कुमावत, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे,डॉ.वर्षा झाल्टे, गालिब शेख, आमीन पटेल, वाल्मीक आप्पा आंधळे, अज्जू शेख,लाला नागरे, दिनेश घुगे,गोविंद रसाळ, धिवर बाबुजी, रुपेश आहीरे, रवि खैरनार ललित रसाळ, गोकुळ परदेशी, अमजद पठाण, मिलिंद उबाळे, लोकेश साबळे, सचिन दरगुडे, आनंद दरगुडे,अजिंक्य साळी, राहुल साबळे दीपक जोरणे, विलास परदेशी , मोहसीन पठाण , मजहर खान, अरबाज शेख, निसार पठाण, चैतन्य परदेशी, जमीर शेख, आसिफ शेख, जय अहिरे, जॉनी जॉर्ज, प्रमोद अहिरे,विलास परदेशी,अज्जू पठाण,नितीन राजपूत,बाजीराव चव्हाण, अर्जुन सोनवणे ,संदीप निकम,गुलाब जाधव,आनंदा गवळी, नितीन वामने, निलेश व्यवहारे, कुणाल विसापूरकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...