Wednesday, May 31, 2023

नांदगावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमिपूजन आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते संपन्न, येत्या दोन महिन्यांत स्मारक बांधून पूर्ण होणार,


 नांदगाव (प्रतिनिधी)  - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमिपूजन आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले. गेल्या पंन्नास वर्षांपासून ची धनगर समाजाची मागणी आमदार सुहास कांदे यांनी  पूर्ण केली . या बद्दल समस्त धनगर समाज हे कधीच विसरणार नाही असे मत बोलतांना राजेश शिंदे यांनी व्यक्त केले. 
      येत्या दोन महिन्यात स्मारक बांधून पूर्ण होईल व तो ही कार्यक्रम जल्लोषात करू असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले .
    या प्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळा जनतेला पाहण्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आला होता. यळ कोट यळ कोट जय मल्हार घोषणेने परिसर दणाणून गेला. .  धनगर समाजा तर्फे आमदार सुहास आण्णा कांदे यांचा घोंगडी व फेटा देऊन सत्कार करण्यात आला तर आमदार कुटुंबियांकडून पूजेला बसणाऱ्या सर्व जोडप्यांना पैठणी व घोंगडी भेट देण्यात आली.
     या प्रसंगी आमदार सुहास कांदे, अंजुम कांदे यांच्यासह साईनाथ गिडगे, शिवाजीराव गायकवाड, काशीनाथ काळे, नंदू खरात, सागर गोयंकर, भगवान सातपुते, देवीदास मार्तंड, महेंद्र दुकळे, रंगनाथ चव्हाण आदी अकरा जोडप्यांच्या हस्ते सपत्नीक प्रारंभी विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार सुहास कांदे, अंजुम कांदे यांनी पूजेला बसलेल्या जोडप्यांचा पैठणी व घोंगडी भेट देऊन सत्कार केला. माजी उपनगराध्यक्ष शिवाजी पाटील, गंगादादा कर्नर आदानी धनगर समजाबांधवांच्या वतीने प्रलंबित प्रलंबित मागणी पूर्ण केल्याबद्दल आमदार सुहास कांदे यांचा पिवळा फेटा बांधून पारंपरिक घोंगडी व काठी देऊन सत्कार केला. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, फरहान खान, मा. नगराध्यक्ष राजेश कवडे, किरण देवरे, प्रमोद भाबड, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील, बाजार समितीचे संचालक समाधान पाटील, एकनाथ सदगीर, यज्ञेश कलंत्री, विष्णू निकम, सुधीर देशमुख, भास्कर नाईकवाडे, आनंद कासलीवाल, सागर हिरे, राजाभाऊ जगताप, रघुनाथ पारेकर, शंकर पारेकर, पपू कुनगर, वनाजी आयनोर, सुनील सोर, रमेश सोर आदी उपस्थित होते. राजाभाऊ देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. राजेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गणेश चव्हाण यांनी आभार मानले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर कठोर कारवाई करावी, नांदगावचे तहसीलदार यांना निवेदन,



 नांदगाव (प्रतिनिधी)  - आज बुधवारी  दि. ३१ मे रोजी नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने, असंख्य कार्यकर्त्यांनी महात्मा फुले पुतळ्याचे पुजन करण्यात आले.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स'आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे संदर्भात आंदोलन करून नांदगावचे  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलं आहे. शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. 'सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय' अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे.सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल 'इंडिक टेल्स' च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहु -आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा  तीव्र निषेध करण्यात आला.
  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे.ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.
 तरी,सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी असे आंदोलकानकडुन आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनानंतर नायब तहसीलदार चेतन कोनकर  यांना निवेदन देण्यात आले . त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजुभाऊ पाटील, समता परिषद तालुका अध्यक्ष अशोक भाऊ पाटील, मराठा विद्या प्रसारक संचालक अमित भाऊ पाटील, विनोद शेलार,राष्ट्रवादी महीला तालुकाध्यक्ष योगीताताई पाटील,शहराध्यक्ष अरुण पाटील, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, दिपक खैरनार,सोपान पवार,विलास राजोळे, पाटील,राजेंद्र लाठे,नारायण पवार, सुगंधा खैरनार,चंद्रकलाबाई बोरसे,अलकाबाई आयनोर,राहुल खैरनार,किसन जगधने,दारासिंग भिडे, बाळासाहेब देहाडराय, गणेश जेजुरकर, मंजूर शेख, बाळू माळी,बापू पवार, कैलास महाजन, समाधान जाधव,शुभम शिंदे, देवदत्त सोनवणे, नसीर पठाण,फैजल शेख, गुलाब महाजन,विलास रासकर, शरीफ शेख, अक्षय जाधव, विजय महाजन,अंबादास सोनवणे, सुनील किरकिरे, सतीश पगारे, नंदू राजोळे, शंकर शिंदे, दत्तात्रय महाजन, पंडित सोमासे,अण्णा जाधव, राहुल पीरनाईक, राजू कायस्थ, संजय पाटील, रिंकू जाधव, माणिक बाविस्कर,दत्तू दैने, पांडुरंग माळी, जिभाऊ माळी,वाळूबा माळी,सुरज पाटील,सागर आहेर, सलमान खान,चंद्रकांत त्रिभुवन, दिलीप सुरसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.  या वेळी सदर बाबीचा तीव्र निषेध करण्यात आला.

Tuesday, May 30, 2023

नांदगावच्या नाग्या - साक्या पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात एका लहान बालिकेसह तीघांचा मृत्यू ; तर सात जण गंभीर जखमी,



नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगावच्या नाग्या - साक्या पुलावरून कार कोसळून अपघातात तीन ठार , सात जखमी झाले आहेत. अपघातात एका लहान बालिकेचा समावेश आहे.  जालना येथून लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत असतांना अपघात घडला होता.नांदगाव - मालेगाव रस्त्यावर असलेला अरुंद पुल आहे . त्या पुलाजवऴ आजु -  बाजुला कुठेही फलक  लाईट नसल्याने समोरच्या प्रवाशी यांना अदांज न आल्याने मोठा अपघात  मध्यरात्री  घडला .नांदगांव पोलिस वेऴेवर हजर होउन जखमी ना पुुढील उपचार करीता नांदगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी तातडीने जखमींना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात  हलविण्यात आले. नांदगांव पोलिस वेऴेवर हजर होउन जखमी ना पुुढील उपचार करीता नांदगांव ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आले. पोलिस निरीक्षक रामैश्वर गाड़े यांच्या मागदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे. 

Friday, May 26, 2023

नांदगाव च्या कला ,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाची एचएससी बारावीच्या निकालाची ९७% टक्केवारी, यंदा परिक्षेत मात्र मुलांनी तिन्ही शाखेत मारली बाजी,

 

Thursday, May 25, 2023

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेवेला सुरूवात , मोफत वैद्यकीय सेवेचा अनेक रुग्णांनी घेतला लाभ, ,



  नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी)   -  डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी  ४५ जेष्ठ नागरिकांची पहिली बॅच  नाशिक साठी रवाना झाली. या प्रसंगी नगराध्यक्ष राजेश जी कवडे यांनी श्रीफळ वाढवून सर्व रुग्णांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.      आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून सुरू असलेली आरोग्य सेवा अंतर्गत मोफत डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन करून देण्यात येत आहेत. मोफत फिरता दवाखाना अंतर्गत गावागावात कॅम्प लावले जात असून या प्रसंगी मोफत डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मे दिले जात आहे, या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशन सांगितले असतील त्या रुग्णांना मोफत ऑपरेशन, प्रवास, चहा, नाश्ता, जेवण दिले जात आहे. नाशिक येथील प्रसिद्ध डॉ. प्राची पवार यांचे मणिशंकर आय हॉस्पिटल येथे ऑपरेशन केले जाणार आहे. 
     आमोदे, बोराळे, मांडवड, परिसरातील ४५ पेशंट  ऑपरेशन साठी नाशिक येथे रवाना झाले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर सर्वांना सुखरूप आप आपल्या गावी सोडविण्यात येणार आहे. 

नांदगाव शहरातील पात्र दिव्यांगांना " दिव्यांग निधी" मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या हस्ते प्रदान,


नांदगाव( प्रतिनिधी)  आज गुरुवारी दि. २५ मे  रोजी नांदगाव नगरपरिषदे मार्फत नांदगाव शहरातील पात्र दिव्यांगांना सन २०२२- २३ या आर्थिक वर्षातील दिव्‍यांग निधी रक्कम रुपये ४,०१,९५६/- इतकी रक्‍कम एकुण १०७ दिव्यांगांना दिव्यांग निधी म्‍हणुन नांदगाव नगरपरिषदे कडुन मुख्याधिकारी तथा प्रशासन  विवेक धांडे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी नांदगाव नगरपरिषदेचे लेखापाल  संतोष ढोले, अंबादास सानप, विजय कायस्‍थ, निलेश देवकर, चोपडे ,वाघमारे यांचेसह शहरातील  धनालाल पगारे, गांधीभाऊ, नंदभाऊ , परदेशीभाऊ व इतर दिव्‍यांग बांधव उपस्थित्त होते. या प्रसंगी दिव्‍यांगानी मुख्‍याधिकारी तथा प्रशासक यांचे आभार मानले.

Wednesday, May 24, 2023

मनमाड शहरात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांची बैठक,



मनमाड (विशेष प्रतिनिधी)  -   मनमाड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 
    आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालय मनमाड येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी  सचिन पटेल ,पाणीपुरवठा विभागाचे काजवे साहेब व संबंधित अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. 
    याप्रसंगी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या. सद्यस्थितीत होत असलेले समारंभ व इतर अत्यावश्यक बाबींसाठी योग्य ती पावती घेऊन पाणी उपलब्ध करून देण्यासाठीच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. 
रोटेशन हे पूर्ण क्षमतेने व संपूर्णपणे मिळवण्यासाठी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकाऱ्याना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. या सोबतच वॉलमन ची बैठक घेऊन वाया जाणारे पाण्याचे नियोजन करण्यासाठी सूचना करण्यात आल्या. बैठकीस उपस्थित सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गास नागरिकांची गैरसोय होऊ नये व सुरळीत पाणीपुरवठा व्हावे म्हणून सूचना केल्यानंतर लवकरच मनमाड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

-   बैठकीतील विशेष मुद्दे - 
१) पाणी रोटेशन कधी येणार तोपर्यंत ची व्यवस्था करणे. सध्या पाणी किती दिवस पुरेल.
२) रोज नगरपालिका ट्रॅक्टर चालू करून समारंभ व इतर जरुरी ठिकाणी देण्यासाठी पावती घेऊन पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे.
३) वॉलमनची बैठक घेऊन वाया जाणारे पाणी पुरवठा नियोजन करण्यासाठी सूचना देणे.
४) रोटेशन लवकर मिळण्यासाठी इरिगेशनच्या गोवर्धने साहेब व अधिकारी वर्गाशी बोलून जास्त प्रमाणात पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
        

Saturday, May 20, 2023

नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती पदी अर्जुन बंडू पाटील तसेच उपसभापती पदी पोपट सानप यांची निवड,



  नांदगाव (प्रतिनिधी)   - नांदगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड संपन्न झाली. सभापतीपदी जातेगाव चे अर्जुन बंडू पाटील तसेच उपसभापतीपदी वेहेळगावचे पोपट सानप यांची निवड झाली.  
      आमदार सुहास अण्णा कांदे व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे हार पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले. 
       याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे व आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.बैठकीला समाधान पाटील, कैलास पाटील, सतीश बोरसे, दर्शन आहेर, साहेबराव पगार, जीवन गरुड, अलकाताई कवडे, मंगलाताई काकळीज, अमित बोरसे, अनिल वाघ, अनिल सोनवणे, यज्ञेश कलंत्री,
अमोल नावंदर, नीलेश इप्पर आदी उपस्थितीत होते. नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींनी आभार मानत सर्वाना सोबत घेत शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत कारभार करण्याची ग्वाही दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे प्रमोद भाबड, माजी सभापती तेज कवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, राजाभाऊ पवार, राजाभाऊ देशमुख, दत्तात्रेय निकम, डॉ. प्रभाकर पवार आदी उपस्थितीत होते.

Friday, May 19, 2023

श्री क्षेत्र शनी महाराज मंदिर संस्थान नस्तनपूर येथे शनी महाराज जन्मोत्सव साजरा, समाजप्रबोधनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन,


  
  नस्तनपुर , नांदगाव  (प्रतिनिधी) – श्री क्षेत्र शनी महाराज मंदिर संस्थान नस्तनपूर येथे शनी महाराज जयंती निमित्ताने गाथा पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार लोकांनी ७ दिवस येथे कीर्तन सेवा दिली. त्यात ह.भ.प परिमल महाराज जोशी,इंद्रजीत रसाळ,चतुर महाराज शास्त्री,ज्ञानेश्वर महाराज तांबे,बाळासाहेब महाराज रंजाळे,सोपान दादा कन्हेर आदी लोकांनी कीर्तन सेवा केली. जन्मोत्सावाच्या पूर्वसंध्येला समाजप्रभोधनकार निवृत्ती   इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन झाले . या कार्यक्रमानिमित्त मंदिराची आकर्षक सजावट व मंदिर परिसरातील हिरवाईने नटलेला मंदिर परिसर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. ह.भ.प वैराग्यमूर्ती तुकारक महाराज जेऊरकर यांच्या प्रेरणेने गेल्या २० वर्षापासून गाथा पारायण सोहळा संपन्न होत आहे. त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने सदरील सदरील सोहळ्याची सांगता करण्यात आली.व्यासपीठ नेतृत्व ह.भ. प.ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी, शंकर महाराज शास्त्री ,भीमराव महाराज शेवरे यांनी केले.दुपारील नैवद्य व महापुजेचा मान शिर्डी येथील सचिन अरविंद थोरात या दाम्पत्यांना मिळाला.महाप्रसादाचे आयोजन नागपूर येथील उद्योजक दीपक जैस्वाल यांच्या वतीने करण्यात आले होते.याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष मा.नारायण भाऊ अग्रवाल जन सेक्रेटरी मा.आ.अँड.अनिलदादा आहेर,विश्वस्त खासेराव सुर्वे उदय अप्पा पवार डॉ.शरद आहेर आदी उपस्थित होते कार्यकम यशस्वीतेसाठी गाथा पारायण उत्सव समिती सदस्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त आदी सहकार्य केले.

मनमाड नगरपालिकेने सुरळीत पाणीपुरवठा संदर्भात पर्यायी व्यवस्था करावी - कांग्रेस शहराध्यक्ष नाजीम शेख




मनमाड ( विशेष प्रतिनिधी) -    मनमाड शहरातील पाणीप्रश्न काही नवीन नाही यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होऊन धरण ओव्हरफ्लो सुद्धा झाले. पण नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा मुळे व नियोजनशून्य कारभारामुळे मनमाड शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.  शहरातील प्रत्येक नागरिकाला किमान मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिकेची असून एन उन्हाळ्यात २० ते २२ दिवसाआड पाणीपुरवठा करून नगरपालिका प्रशासन आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहे.
  जर वाघदर्डी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध नाही, तर आजपर्यंत नगरपालिकेने रोटेशनसाठी शासनदरबारी किती पाठपुरावा केला ? जोपर्यंत रोटेशन मिळणार नाही तोपर्यंत मनमाडकरांना तहानलेलेच सोडणार का ? वाघदर्डी धरणात पाणीसाठा उपलब्ध नाही तर नगरपालिकेने टँकर ने पाणीपुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था आजपर्यंत उपलब्ध का केली नाही ? पर्यायी व्यवस्थेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला की नाही ?असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येत आहे.
नियमित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे, नगरपालिकेने किमान १० दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा करावा धरणात पाणीसाठा शिल्लक नसेल तर नगरपालिका प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून टँकरद्वारे प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक घरात पाणीपुरवठा करावा. नगरपालिकेने पाणीपुरवठ्याच्या बाबतीत योग्य समाधानकारक निर्णय न घेतल्यास शहरातील तमाम नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात पुन्हा एकदा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा मनमाडचे  नगरसेवक तथा काँग्रेस चे शहराध्यक्ष नाजीम शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

Thursday, May 18, 2023

नांदगाव शहरातील संरक्षक भिंतीचे अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न,



नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगाव शहरातील वीरशैव लिंगायत / जंगम/ गवळी समाज बांधवांच्या मागणी नंतर आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ समाज स्मशानभूमी संरक्षक भिंतीसाठी १५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. 
      या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन आज अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
     या प्रसंगी बोलतांना सोमनाथ घोंगाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले, आमच्या समाजाची २५ वर्षापासूनची मागणी आज पुर्ण झाली आज पर्यंत आमचा संख्येने कमी असल्याने आमच्या समाजाकडे कोणीही लक्ष दिले नाही पण आमदार सुहास आण्णांनी मात्र आमची मागणी तात्काळ पूर्ण केल्याचा आम्हाला मोठा आनंद होत आहे, आम्ही सतत आण्णांच्या पाठीशी होतोच आणि या पुढेही राहू असे मत या वेळी सोमनाथ घोंगाणे यांनी व्यक्त केले. 
 यावेळी  अंजूमताई कांदे यांचा सत्कार सुचीत्रा जंगम , मनीषा जंगम , रोहीणी जंगम यांनी केला.
    या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रोहिनीताई मोरे, भाउराव बागुल, रोहित काकलीज, सोमनाथ घोंगाणे, वैजीनाथ जंगम, शिवलींग जंगम, बाळू जंगम , गणेश जंगम, शुभम जंगम, तान्हाजी जंगम, कैलास जंगम, सतीष जंगम, विकी जंगम, तुषार जंगम, मुकेश जंगम, अरूण जंगम, छगन अप्पा गवळी ' सुशील औषीकर, राहूल पिरनाईक, राजू काटकर सर, अर्जुन गवळी, भटू औशीकर, अशोक पंगूडवाले, विश्वनाथ उचे, कैलास उचे, सुनील औशीकर, विश्वनाथ उचे, मगन ऒशीकर, तुकाराम गवळी, लहानु झारकंडे, गंगा ओशीकर 
श्रीमती लिलाबाई जंगम , सौ. कमलबाई जंगम, सौ. सुचीत्रा जंगम, शिवकन्या जंगम,मनीषा जंगम, प्रिती जंगम, रोहीणी जंगम आदी समाज बधू भगिणी उपस्थित होत्या .

Wednesday, May 17, 2023

नांदगावला लोखंडी हातोडीने वार करत युवकाची हत्या, पोलिसांनी एक संशयिताला घेतले ताब्यात,





 नांदगांव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील आनंद नगर मध्ये राहणाऱ्या वाल्मीक साहेबराव ठाकुर ( पवार) (३५ ) या युवकाची मंगळवारी दि .१६ रोजी रात्री  लोखंडी हातोडीने वार करत हत्या करण्याची घटना घडली असुन , पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करत एक संशयितांस अटक करण्यात आली  आहे.  मयत वाल्मीक ठाकुर ( पवार )  याच्यावर त्याच्या  राहत्या घरी (आनंद नगर)  त्याच्या पायांवर आणि डोक्यात लोखंडी हातोडीने वार करत गंभीर जखमी करत त्याची हत्या करण्यात आली आहे.संशयित आरोपी याच्या सासु सासऱ्यांना म्हणजेच मयत झालेल्या वाल्मीक ठाकूर (पवार)  याचे आसलेले  आई वडीलांना मयत  वाल्मीक ठाकूर (पवार) नेहमीच दारु पिऊन मारहाण करत असल्याने हि हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या घटणे नंतर घटनास्थळी पोलीसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा करत गुन्हा  दाखल केला असून  पुढील तपास  पोलिस करत आहे.


Thursday, May 11, 2023

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नांदगाव मध्ये फटाके फोडून जल्लोष,




  नांदगाव (प्रतिनिधी)  - आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय नांदगाव येथे शिवसैनिकांनी फटाखे फोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
     महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत शिंदे सरकार अबाधित असल्याचे सांगितले. गेलो काही दिवस अनेक जन हे सरकार पडेल म्हणून आशावादी होते. पण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठा विकास होत होता .हे विरोधकांना पाहवत नव्हतं शेवटी  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सरकार ला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले, अशी शिंदे गटाकडून प्रतिक्रिया दिली आहे 
    या नंतर शिवसेनेतर्फे फटाखे वाजवत, पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेनेचे भावराव बागुल, अय्याज शेख, शशी सोनावणे, शाम हिरे, गणेश कुमावत, भूषण थोरात, परवेझ पठाण, भरत पारख आदि उपस्थित होते.

Saturday, May 6, 2023

रिपाइं आठवले ( ए) गटतर्फे मनमाड मध्ये सत्कार ,



मनमाड (विशेष प्रतिनिधी) -   तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त नांदगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए यांच्या वतीने रिपाईचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मनमाड राजाभाऊ अहिरे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुकतेच नवनिर्वाचित झालेले  दशरथ भाऊ लहिरे यांचा तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन नाशिक ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष रिपाई देवीदास अण्णा मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. यावेळी (नांदगाव तालुका अध्यक्ष) राजाभाऊ पवार, (जिल्हा सचिव) गंगा दादा त्रिभुवन, कपिलजी तेलुरे (शिवसेना नेता नव्हे कार्यकर्ता), राजाभाऊ गुढेकर (मातंग आघाडी तालुकाध्यक्ष रिपाई), विनोद अहिरे (युवा शहराध्यक्ष), फिरोजभाई शेख मुस्लिम मंच मनमाड, रुपेशभाऊ अहिरे (माजी युवा जिल्हाध्यक्ष), गौतमभाई वाघ रिपाई कार्यकर्ते पंडितभाऊ भालेराव रिपाई कार्यकर्ते पप्पूभाऊ दराडे रिपाई कार्यकर्ते महेंद्रभाऊ गरुड सामाजिक कार्यकर्ते सुरेशभाऊ जगताप सामाजिक कार्यकर्ते, शकूरभाई सामाजिक कार्यकर्ते, राहुलभाई मन्सुरी व्यवस्थापक उल्केम फार्म कंपनी, चांगदेव संसारे फुलमाळी बाबा, रुक्मणी ताई अहिरे, संतोषभाऊ केदारे, सनी बागुल नांदगाव तालुका सचिव रिपाई, व आदी कार्यकर्त उपस्थित होते ‌.

Friday, May 5, 2023

नांदगावला मस्तानी अम्मा उर्स कमेटी अध्यक्षपदी वाल्मिक जगताप उपाध्यक्षपदी मुस्ताक शेख ,




नांदगाव (प्रतिनिधी)   -  नांदगाव शहरातील हिंदु मुस्लीम समाजाचे श्रध्दास्थान व ऐक्याचे प्रतिक असलेल्या मस्तानी अम्मा उसे पंच कमेटीची बैठक शकिल शेख यांच्या अध्यक्षतेखाली व रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे व माजी नगरसेवक अनिल जाधव यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत, मस्तानी अम्मा उर्स नेहमीप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरविण्याबरोबरच कार्यकारिणीही या वेळी पुढील प्रमाणे निवडण्यात आली. अध्यक्ष- वाल्मिक जगताप, उपाध्यक्ष मुस्ताक शेख, दिपक सोनवणे, खजिनदार राजाभाऊ गुढेकर, सहखजिनदार गणेश शर्मा, सल्लागार देविदास मोरे, अनिल जाधव, संजय सानप, दिनेश ओचाणी, याकुब शेख, अकिल मास्टर, शाकिर शेख, सुनिल जाधव, शरीफ शेख, रवि सानप, शकिल रंगरेज, सनी बागुल, संदल प्रमुख मुख्तारमामु शेख, अश्पाक हाजी, परवेज शेख, शाबीर शहा, अल्तमास काजी, हरिभाऊ भालेकर, मनोज भावसार, अनिल भावसार, किरण फुलारे, जाहिर सौदागर, मुज्जमील शेख, सदस्य सोनू पेवाल, अफजल शेख, अरबाज शेख, रियाण मनियार, आरवाज मनियार, सलीम पटेल, सोहेल मनियार, उस्मान मंडपवाले, बाबुभाई पठाण आदिंची निवड करण्यात आली.

Tuesday, May 2, 2023

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत परिवर्तन पॅनलला दोन अपक्षांसह १४ जागा, मोठ्या विजयाचे किंगमेकर हे माजी खासदार समीर भुजबळ हेच ठरले,



मनमाड (विशेष प्रतिनिधी)  - नांदगाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनता ही सध्याच्या नेतृत्वामुळे त्रस्त असून ग्रामपंचायत, सोसायटीसह शेतकरी बांधवांनी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलवर विश्वास दाखविला आहे. मनमाड बाजार समितीची ही निवडणूक आगामी नांदगाव मनमाड विधानसभा मतदार संघातील परिवर्तनाची नांदी आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली.
   मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय संपादित केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
   या निवडणुकीत माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, माजी आमदार अनिल आहेर, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. 
    या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. त्याबद्दल समीर भुजबळ यांनी सर्वांचे मनःपुर्वक आभार मानले. ते म्हणाले की, नांदगाव विधानसभा मतदार संघातील नागरिक हे सध्याच्या लोकप्रतिनिधीच्या गुंडगिरी आणि दबावाला कंटाळून विकासाच्या बाजूने कौल देत परिवर्तन केलं आहे. मनमाड आणि नांदगांव मतदारसंघांतील मालेगाव मध्ये परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे तर नांदगाव बाजार समितीत जरी पराभव झाला असला तरी चांगली लढत आपण दिली.अतिशय कमी फरकाने आपले उमेदवार यात पराभूत झाले असले तरी मतदारांनी दिलेला हा कौल परिवर्तनाचा कौल आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
    काल आमदार सुहास कांदे म्हणाले होते की छगन भुजबळ हे माझ्यासमोर शून्य आहे या प्रश्नावर ते म्हणाले की,आजवर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. शून्यातून सर्व निर्माण होत असते त्यामुळे आम्हाला कुणी शून्याची किंमत समजवू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी आम्हाला सभ्यतेने राजकारण करण्याची शिकवण दिलेली आहे. त्यामुळे आम्ही खालच्या पातळीवर जाऊन कुठलही भाष्य करून राजकारण करणार नाही. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करून बोलल्याप्रमाणे आता राजीनामा द्यावा म्हणजे २०२४ ला आमच्यावर जो गुलाल पडणार आहे तो २०२३ लाच पडेल अशी कोपरखळी कांदे यांना मारली.
       मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलला अपक्षांसह १४ जागा, शिंदे गट ३ तर हमाल मापारी गट अपक्ष १ जागा मिळाली आहे.व्यापारी गटातील २ अपक्ष उमेदवार यांनी समीर भुजबळ यांची भेट घेऊन परिवर्तन पॅनलला पाठिंबा जाहीर केला असल्याने भुजबळांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेल्या उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे. या निवडणुकीतील सर्व सूत्र ऐनवेळी समीर भुजबळ यांनी हातात घेतली. त्यांनी या निवडणुकीत अतिशय सूक्ष्म असे नियोजन केले. त्यामुळे महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलला भरघोस यश मिळाले असल्याने या विजयाचे किंगमेकर हे माजी खासदार समीर भुजबळ हेच ठरले आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत एकहाती सत्ता मिळवू असे म्हणणाऱ्या आमदार सुहास कांदे यांना मतदारांनी चांगलाच दणका दिला असून या निवडणुकीत त्यांचं पूर्णतः पाणीपत झालं आहे.

Monday, May 1, 2023

नांदगावात शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण, सफाई कामगारांना कपडे वाटप,




 नांदगाव( प्रतिनिधी) - आज सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने  नांदगांव शहरातील शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने महात्मा गांधी चौकात सामूहिक सोरूपात ध्वजारोपण करण्यात आले.  सोमवारी १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्य सफाई कामगार यांना कपड़े वाटप करण्यात आले. सर्वात प्रथम मेजर जगन्नाथ सालुंके यांनी कामगार दिना विषय माहिती दिली. त्यांनतर जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव नूतन अध्यक्ष यांच्या वतिने व जायंटस् ग्रुप तर्फे सफाई कामगार यांना कपड़े वाटप केले आणि मिठाई व नास्ता देण्यात आले. आलेले मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळेस् कुदरत अली शहा, नरेद्र पारख, रमाकांत सोनवणे, राजकुमार संत, आकाश पानकर, राजेंद्र भावसार, नाना गरुड़, सहेली ग्रूपचे नूतन अध्यक्षा पुष्पा दुसाने, सुशिला पारख, वैशाली दुसाने, मनिषा बोरसे, छाया परदेशी, संगिता बागोरे सर्व सदस्य उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित गुप्ता यांनी केले.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...