Saturday, September 30, 2023

नांदगावच्या रेंनबो इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांची अत्याधुनिक शेतीला प्रत्यक्ष भेट,




नांदगाव (प्रतिनिधी ) -  नांदगाव येथील ‘नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल यांची शेतात प्रत्यक्ष भेट दिली होती. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल , रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली.
    या शैक्षणिक वर्षात ३० सप्टेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी नांदगाव येथिल प्रगती शील शेतकरी दिगंबर रंगनाथ पाटील (काकळीज) यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट दिली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शेतीची  तेथील कार्यपद्धती याची माहिती असणे आवश्यक आहे. फक्त पुस्तक किंवा चित्रांवरून माहिती सांगणे, हे मुलांच्या जास्त लक्षात आले नसते. त्यामुळे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मुले जेव्हा बघतात, तेव्हा ते त्यांच्या जास्त स्मरणात राहतात. म्हणूनच मुलांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी ही प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यात आली. सर्वप्रथम शेत, शेतातील पिके, ट्रॅक्टर, तेथील जनावरे, शेती करण्यासाठी लागणारी अवजारे यांची माहिती देण्यात आली. निसर्गरम्य वातावरणात ही भेट अत्यंत आनंददायी ठरली.
मुले फुलपाखरांसारखे इकडे तिकडे बागडत आनंद व्यक्त करत होती.प्रदीप काकळीज आणि सुभद्राबाई काकळीज यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सर्व शेती दाखवून त्याबद्दल मुलांना सर्व माहिती सांगितली. तसेच त्यांच्याकडून सर्व मुलांना खाऊ चे वाटप करून मुलांचे कौतुक करण्यात आले.
ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन  ही भेट उत्तम रित्या घडवून आणली.

नांदगाव शहर भारतीय जनता पार्टीतर्फे ' मेरी माटी मेरा देश ' अभियान


नांदगाव (प्रतिनिधी)-  नांदगाव शहर भारतीय जनता पार्टी तर्फे ' मेरी माटी मेरा देश ' हे अभियान भाजपा जिल्हा नेत्या अॅड.जयश्रीताई दोंड यांच्या अध्यक्षतेखाली व शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहिद विर विरंगना सन्मान अभियान अंतर्गत ' मेरी माटी मेरा देश ' हे अभियान संपूर्ण देशात अमृत कलश यात्रा सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने आज येथील सदर अभियान महात्मा गांधी  चौकात सुरू करण्यात आले. 
यावेळी भारत माता कि जय... मेरी माटी मेरा देश... पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... भारतीताई पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... आदि घोषणा देत परिसर दणाणुन गेला होता. या अभियानाची सूरूवात येथील महात्मा गांधी चौक येथून सुरू होऊन शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, म.फुले चौक, शिवस्फूर्ती मैदान या शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात येवून  रॅलीची सांगता म.गांधी चौकात करण्यात आली. रॅली दरम्यान शहरातील चौका- चौकात नागरिकांनी रॅलीत ठेवलेल्या कलशामध्ये मुठभर माती टाकण्यात आली. याप्रसंगी जिल्हा सरचटणीस संजय सानप, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर, अनु.जाती जिल्हाध्यक्ष बाबाजी शिरसाठ, व्यापारी आघाडी संजय पटेल, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सजन कवडे, डाॅ.राजेंद्र आहेर, मनोज शर्मा, दिंनेश दिंडे, सतिष शिंदे, अॅड.उमेश सरोदे, धम्मवेदी बनकर, गणेश शर्मा, किरण पैठणकर, पप्पू भटेवरा, वंश पटाईत, सतिष अहिरे, प्रविण पवार, परसराम हरळे आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगाव येथे सकल धनगर समाजाचा आक्रोश मोर्चा, अनुसूचित जमाती संवर्गात आरक्षण मिळावे यासाठी निवेदन,


नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे नगर आरक्षणासंदर्भात  सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी) संवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे  नांदगाव तहसीलवर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील शनिमंदिर गार्डन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाजवळून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 
 येळकोट येळकोट जय मल्हार,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नांदगांव तालुक्यातील शेकडो धनगर बांधव व भगिनी हातात झेंडे व फलक घेऊन सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर मोर्चा गेल्या नंतर छोटेखाणी सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी अंँड.गंगाधर बिडगर,साईनाथ गिडगे,डॉ.गणेश चव्हाण, बाळू बोरकर,अण्णा सरोदे,, खुशाल सोर,सीताराम पिंगळे,मच्छिंद्र बिडगर, आदींची मनोगत व्यक्त करण्यात आले. यामध्ये धनगर (एस.टी) आरक्षणाची केस सरकारने फास्ट ट्रॅकवर चालवावी. सरकारी वकिलांनी न्यायालयास मागणी करावी, एसटी प्रवर्गात समावेश होईपर्यंत धनगर समाजाच्या विकासासाठी दहा हजार कोटींची तरतूद करावी, मेंढ्या व मेंढपाळांना मोफत विमा द्यावा. मेंढपाळांना मेंढपाळ सरक्षण कीट शंभर टक्के अनुदानावर द्यावे. सोलर चूल, सोलर बटरी, बैलगाडी, ताडपत्री व स्वसंरक्षणासाठी बंदूक द्यावी, मेंढ्यासाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरू कराव्यात, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, याचे प्रशिक्षण देण्यासाठी इस्राईलसारख्या देशात प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले जाते. त्याप्रमाणे मेंढपाळांना प्रशिक्षण देण्यासाठी परदेशात पाठवावे. आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
यावेळी शहरातील शिवसेना शिंदे गटाचे सुनील जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महेंद्र बोरसे,शिवसेना ठाकरे गटाचे संतोष गुप्ता,काँगेस आयचे मनोज चोपडे,वंचित बहुजन आघाडीचे एॅड.आम्रपाली निकम आदींनी पाठींबा दिला. याप्रसंगी तहसील कार्यालयाचे योगेश पाटील यांना नांदगाव तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.नांदगाव तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

नांदगाव मध्ये ईद - ए- मिलाद निमित्ताने शोभायात्रा, जुलुसमध्ये धार्मिक एकोप्याचे संदेश,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील एच. आर. हायस्कूलमध्ये ईद-ए-मिलाद शहरातील हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र साजरा केला. तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली.
इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती, ईद- ए-मिलाद निमित्त नांदगाव शहरात  शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभागी होत एकतेचा संदेश देत शिस्तबद्ध पद्धतीने ईद साजरी केली.
   हजरत  मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली . शहरातील प्रमुख मार्गाने जात हुतात्मा चौकात वीरगती प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर डॉ.  बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, गांधी चौक, अहिल्यादेवी चौक मार्गाने जात एच. आर. हायस्कूल येथे मिरवणूक सांगता करण्यात आली.
    यावेळी सर्वत्र सुख-शांती टिकून राहावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली. एच. आर. हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. येथे  पत्रकारांचा सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी नगराध्यक्ष राजेश कवडे तर पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, संजीव धामणे , वाल्मिकी जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रावण आढव,  मनोद चोपडे , संतोष गुप्ता व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावेळी नासिर पठाण, जावेद शेख , याकुब शेख, बबलू सैय्यद, आबिद सय्यद,  शरिफ शेख, अकिल मास्टर, कलिम भाई , मज्जू शेख, मोसिन खाटिक , तर अँड.युनूस शेख यांसह आदींनी परिश्रम घेतले.

Thursday, September 28, 2023

नांदगावच्या मोरया प्रतिष्ठानतर्फे शालेय मॅरेथॉन स्पर्धा,




नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात मोरया प्रतिष्ठान  (मेन रोड चा राजा ) यांच्या तर्फे  गुरूवारी   मंडळाच्या वतीने २ कि.मी.मीटर शाळेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजित करण्यात आले या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात १० ते १६ वर्षीय मुलं व मुलींनी सहभाग नोंदवला ‌ . यामध्ये रोख रक्कमेचे अनेक पारितोषिक प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले .या स्पर्धेसाठी व बक्षीस वितरणासाठी  नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी ,वामनदादा पोतदार , डॉक्टर आनंद पारख, दत्तराज जी छाजेड , प्रकाश शिंदे , गणेश सांगळे ,मुस्ताक शेख, बापू जाधव ,प्रतीक मराळकर ,मुज्जू शेख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यात मोलाचे सहकार्य  त्रिभुवन सर यांचे होते. पालकांनी या कार्यक्रमाचे तोंड करून कौतुक केले .

नांदगाव येथील दहेगाव नाका मित्रमंडळातर्फे भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन,


 
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगावचा महाराजा दहेगाव नाका मित्र मंडळ यांचे यंदाचे ४५ वे वर्ष असून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रम राबविले यात पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्या नंतर दुसऱ्या व सातव्या दिवशी संध्याकाळी एकविरा भजनी मंडळाचा भजन संध्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी येथील भाविक भक्ताने मोठ्या संख्येने भक्ती संध्याचा आनंद घेतला.
त्या नंतर आठव्या दिवशी मंडळाच्या वतीने येथील नागरिकांना विविध झाडांची रोपे वाटप करून पर्यावरणाला वाचवुया हेच अभियान चालवुया असा संदेश देण्यात आला.९ व्या दिवशी दरवर्षी प्रमाणे सत्यनारायणाची महापूजा करून,महाआरती रवी गेजगे यांच्या हस्ते करून दोन ते अडीज हजार भाविकांसाठी भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली,बंटी सोनवणे,निलेश गेजगे, सागर जाधव, बापू जाधव.प्रसाद सोनवणे महेश चौघुले,किशन गुडेकर,रवी गेजगे,प्रतिक भालेकर,गणेश जाधव,गोटु गेजगे, दर्शन शेलार, सौरभ शर्मा,आदित्य भालेकर,दत्तु काळे आदींनी परिश्रम घेतले.

पिंपरखेड येथे आमदार आपल्या दारी महाशिबिर ,





नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी) -  नांदगाव तालुक्यातील रणखेडा, चांदोरा, पिंपरखेड, पिंपरखेड तांडा, आटकाट तांडा, जळगाव खुर्द, डॉक्टर वाडी, बाबुळवाडी, चिंचविहीर ,जळगाव खुर्द व पोखरी आदि गाव मिळून  पिंपरखेड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरखेड ग्रामपंचायत समोरील प्राणांगणात  आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी परिसरातील गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सुविधांचा लाभ घेतला. 
     आमदार आपल्या दारी या अभियान अंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
     मोफत डोळे तपासणी, आरोग्य तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत रेशन कार्ड व इतर शासकीय दाखले काढून दिली जातात. मतदारसंघातील प्रत्येक गावात आमदार आपल्या दारी अभियान राबवले जात असून आता पर्यंत हजारो नागरिकांनी लाभ घेतला आहे, 
      या प्रसंगी मा.सभापती विलास भाऊ आहेर, किरण भाऊ देवरे, किरण भाऊ कांदे, अमोल नावंदर,सरपंच पिंपरखेड सौ.मंजुषा गरुड, रमेश मामा काकळीज, जीवन गरुड, देशमुख सर, संदीप मवाळ, नवनाथ सोमवंशी, दीपक मोरे, बाबासाहेब गरुड, राजेंद्र गरुड, एकनाथ पाटील, जालम आहेर, संजय आहेर, शिवाजी बछाव, शिवाजी सुरासे, जिभाऊ पवार, रवींद्र गायकवाड, मनोज बछाव, शांताराम शिंदे, गणेश घोटेकर, शरद शिंदे, शिवाजी जाधव, उमेश मोरे, रामेश्वर तुरकुने, किशोर नवले, रमेश दळवी, उत्तम चव्हाण, मगण चव्हाण, माधवराव गरुड, पतींगराव देशमुख, दिनेश गरुड, भाईलाल दळवी, जनार्दन पवार अमोल पाटील, मनोज देशमुख, भरतआबा शेलार, बाबा ढोमासे, गिरधारी भालेकर प्रमोद देशमुख, बाळासाहेब गुंजाळ, सागर हिरे, भाऊराव बागुल, आण्णा मुंढे दीपक शेलार, आदींसह विविध गावातील सरपंच, चेअरमन, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने ने उपस्थित होते.

Sunday, September 24, 2023

नांदगाव मधील शिवकन्या संगिता सोनवणे यांना मराठा भुषण जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित,



नांदगाव (प्रतिनिधी)- नांदगाव येथील शिवकन्या व सामाजिक कार्यकर्त्या  संगिता सोनवणे यांना मराठा सेवा संघ धुळे जिल्ह्याच्या वतीने मराठा भुषण जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
           नांदगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्या शिवकन्या तसेच विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या  संगिता सोनवणे यांना मराठा सेवा संघ धुळे जिल्ह्याच्या वतीने अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मराठा भुषण जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संरक्षण मंत्री व खासदार सुभाष भामरे हे होते यावेळी विविध प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.पुरस्कार मिळाल्या बद्दल सकल मराठा समाजातर्फे तसेच सर्व थरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Saturday, September 23, 2023

नांदगाव तालुका महात्मा फुले समता परिषद महिला अध्यक्षपदी चंद्रकला बोरसे तर शहराध्यक्षपदी सुगंधा खैरणार यांची निवड,



नांदगाव ( प्रतिनिधी ) - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका महिला अध्यक्ष पदी चंद्रकला राजेंद्र बोरसे तर  
अखिल भारतीय समता परिषद महिला शहराध्यक्ष पदी सुगंधा दिलीप खैरनार
 यांची  नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व  समता परिषद संस्थापक अध्यक्ष आ. छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास  संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ , दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष योगिता पाटील, जया खैरे, वंदना साबळे,शोभा बोरसे, राजेंद्र बोरसे, संजय खैरनार,अनिता जाधव, सुनिता खैरनार,किसनाबाई खैरनार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी चंद्रकला बोरसे व सुगंधा खैरणार यांना  अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

हिसवळ खुर्द येथे रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम,




 हिसवळ खुर्द (प्रतिनिधी ) - हिसवळ खुर्द येथे  आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रयत्नातुन ११८ नवीन रेशनकार्ड विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने त्याचे वाटपाचा कार्यक्रम  गणपती मंदिर सभागृहात पार पडला .आमदार आपल्या दारी अंतर्गत मोफत शासकीय सुविधा कार्यालय माध्यमातून विविध शासकीय दाखले व रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जात आहेत.
आता पर्यंत हजारो नागरिकांना मोफत रेशन कार्ड व विविध दाखले उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  याप्रसंगी  मनमाडचे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते राजेंद्र पवार, सदस्य  डॉ.विजय कदम, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, माजी सभापती सुधीर देशमुख, माजी सभापती किशोर लहाने, माजी सभापती अंकुश कातकडे,सोपान बिन्नर, सागर आहेर  आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संजय आहेर यांनी केले,या प्रसंगी त्यांनी पुढील कामांची माहिती सांगितली , आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रयत्नातुन आजपर्यंत गावात पूर्ण झालेली व मंजूर कामे जवळपास दोन कोटी रुपयांची आहेत. तर अनेक कामे प्रस्तावित आहेत. कृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून एकाच वेळी दोनशे शेततळे करण्याचा निर्धार या गावाने केला आहे. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र मंजूर आहे. या ठिकाणी तीन वर्षांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू होत आहे. यामुळे परिसरातील अठरा वर्षा वरील वयोगटातील मुलांना प्रशिक्षण घेण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी माजी सरपंच विजय आहेर, मोहनदादा आहेर, विश्वास आहेर, मुकुंद बाबा पालीमकर, ग्रामपंचायत सदस्य- नानासाहेब आहेर, संतोष आहेर, संदिप कदम,सुदाम आहेर,संदिप आहेर, संदिप लोखंडे, ग्रामसेवक मनिष भाबड, विशाल काळे, रितेश आहेर, मंगेश आहेर, सुरेश सोळसे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जातेगाव येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात,




नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच हिंगने तांडा येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला. 
     या वेळी सौ. अंजुमताई कांदे यांनी उपस्थित होत्या. समाज बांधवांतर्फे यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
       त्यांनी मनोगतात यावेळी सर्वांना प्राणप्रतिष्ठा सुळे निमित्त शुभेच्छा दिल्या. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्याला प्रत्येक दिलेला शब्द पाळला असून आणि यापुढेही आपल्या प्रत्येक अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कुटुंबीय कटिबद्ध आहोत असे मत व्यक्त केले. तांड्यावरील महिला भगिनींना खुशखबरी देत लवकरच महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिला उद्योग सुरू करणार असल्याचे सांगितले.
     आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व बंजारा तांड्यांवर सभा मंडप उभारण्यात आले असून यामध्ये स्वखर्चाने संत सेवालाल महाराजांची मूर्ती भेट देण्यात आलेली आहे . या सर्व मुर्त्यांचे प्राणप्रतिष्ठा आता करण्यात येत आहे.
      यावेळी बोलताना एन के राठोड यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले. समाजाकरिता आमदार साहेब सतत अहोरात्र कार्य करत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो तसेच बंजारा तांड्यांवर मोठ्या प्रमाणात अण्णांच्या माध्यमातून विकास झालेला असून समाजाला योग्य न्याय देणारा आमदार म्हणून अण्णांना आम्ही मानतो असे उदगार काढले.
या वेळी गणेश हिरामण चव्हाण ,एन के राठोड, आण्णा मुंढे, भाऊसाहेब चव्हाण, भाऊलाल राठोड, संजय चव्हाण ,राऊसाहेब चव्हाण,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बंडू पाटील , संचालक आनिल सोनवणे ,गुलाब पाटील, भाऊसाहेब सुर्यवशी , वि. वि. कार्यकारी जातेगाव चेअरमन अंकुश पगारे, व्हाईस चेअरमन बाबू मानसिंग राठोड, रामदास पाटील, बाबुअल्ली शेख, तसेच हींगणे येथे पिंपरी हवेली सरपंच अनिल पवार, उपसरपंच मानसिंग जेमा चव्हाण, सदस्य राजेंद्र धर्मा राठोड , रतन मानसिंग चव्हाण, रामेश्वर चव्हाण, नायक सोमनाथ, धनराज कारभारी, सुदाम हरी चव्हाण आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचा न्यायडोंगरी गटात दुष्काळ पाहणी दौरा, अल्यल्प पाऊसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान,




नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी नांदगाव विधानसभा मतदारसंघात गावो गावी जाऊन दुष्काळ पाहणी दौरा करण्यात येत आहे. गुरुवार व शुक्रवार रोजी न्यायडोंगरी गटातील विविध गावात थेट शेतावर जाऊन शेतकरी बांधवांना भेट देण्यात आली. 
अत्यल्प पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून भविष्यात पाणी व चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह आहे. 
 भविष्यात पाणी टंचाई व चारा टंचाई साठी आमदार म्हणून स्वखर्चातून व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले आहे. 
    या प्रसंगी विलासभाऊ आहेर,किरण आण्णा कांदे,प्रमोदभाऊ भाबड, राजाभाऊ जगताप, नंदू पाटील, किरण भाऊ देवरे, अरुणभाऊ भोसले, अमोलभाऊ नावंदर, भैय्या पगार, अनिलभाऊ वाघ, जीवन भाऊ गरुड, रमेशमामा काकळीज, दिपक मोरे, पुंजाराममामा जाधव, एकनाथ पाटील, रघुनाथदादा सांगळे, विश्वनाथ कांदे, दत्तूभाऊ काळे, एन.के. राठोड, गोरखबापू सरोदे, ॲड.किरण गायकवाड, जिभाऊ पवार, उमेश मोरे, सागर हिरे, सुनिल जाधव, भाऊराव बागुल, शुभम आव्हाड, दिपक शेलार आदींसह सरपंच उपसरपंच सदस्य व स्थानिक नागरिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Friday, September 22, 2023

तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान नाट्य महोत्सवात एच.आर. हायस्कूलने पटकावले द्वितीय क्रमांक,




नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगावच्या मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  येथे झालेल्या तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान नाट्य महोत्सव सन २०२३ - २४ या (अंधविश्वास आणि विज्ञान)या विषयावर नाटिका सादर केले होते. या स्पर्धेत एच. आर‌. हायस्कूल  या विद्यालयाने द्वितीय क्रमांक घेतला. नाटिकेत मारीया तंबोली, जुबिया शेख, आयमन शेख, नशराह शेख, रिमशा मोमीन, इकरा शेख, मूनजजा शेख, सिमरन शेख, महेविश खाटीक, अल्वीरा अनम शेख या विद्यार्थ्यांनी नाटिकेत  उत्कृष्ट काम केले . त्यांना मार्गदर्शन विज्ञान शिक्षक सज्जाद सर   यांनी केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

नांदगाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांवर माकडांचा हल्ला, दोन विद्यार्थी जखमी, माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी,



नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव शहरात काल गुरुवारी दि. २१  संप्टेंबर   रोजी  दुपारी मधल्या सुट्टीत  क.मा.कासलीवाल विद्यालयात  माकडांनी शालेय विद्यार्थ्यांवर अचानक हल्ला केला.   यात शाळेचे दोन विद्यार्थी जखमी झालेत .यात इयत्ता पहिली ची विद्यार्थिनी आलम नसरा मोबीन शेख  हिच्या  पायावर फ्रॅक्चर झाला व तर इयत्ता दुसरीचा सेमी इंग्लिश विद्यार्थी रूद्र पंकज पाटील याला माकडाने चावा घेतला. आलम या मुलीला डॉक्टर अत्रेकडे  नेले असता त्यांनी एक्सरे काढण्यास सांगितले. उपचारासाठी एक्सरे डॉ .तुसे  यांच्याकडे केले असता त्यांनी प्लास्टर करण्यास सांगितले. त्यासाठी डॉक्टर कुलथे हे मुंबई वरुन दर गुरुवारी न्यु पुजा मेडिकल डॉ.आबेडकर चौक येथे आलेले असल्याची माहिती मिळाली. त्या विद्यार्थीनीला कुलथे डॉक्टरांकडे प्लास्टर साठी नेले व प्लास्टर करून घेतले.  या विद्यार्थिनीच्या पालकांकडे पैसे नसल्या मुळे तिचा सर्व खर्च शाळेतर्फे करण्यात आला.दुसऱ्या विद्यार्थ्यांला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन देण्यासाठी त्यांच्या पालकांना बोलावुन घेतले. या मुलास  रेबीज चे इंजेक्शन देण्यात आले व अजुन दोन इंजेक्शन पुढील दोन दिवसांत देण्यात येणार आहे.
  शहरात माकडाची टोळधाड अन्नाचे शोधार्थ आली असून, या माकडांनी  काही शालेय 
 विद्यार्थी ना जेवणाचे सुट्टीत जखमी केल्याने नागरिक मध्ये घबराट पसरली आहे. ही मुले जेवण करणासाठी ग्राउंड वर आली असता माकडाने अचानक मुलावर हल्ला केला यात  दोन विद्यार्थी जखमी झाली. त्यांच्या वर तातडीने उपचार करण्यात आले. तसेच हल्ला करणारे माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी  वन विभागात तक्रार करून माकडाचे बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

Wednesday, September 20, 2023

भाजपच्या नाशिक जिल्हा सरचिटणीसपदी संजय सानप यांची नियुक्ती,


नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील संजय बबनराव सानप यांची भारतीय जनता पक्षाच्या नाशिक जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून,  जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केले आहे.
   भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी नुकतीच त्यांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असून नांदगाव तालुक्यातील हरहुन्नरी, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व असलेल्या संजय बबनराव सानप यांच्या कार्याची दखल घेत त्यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. नांदगाव तालुक्यातील जेष्ठ नेत्या ॲड. जयश्री दौंड यांच्या नंतर जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. आतापर्यंत त्यांनी विविध पदांवर यशस्वीरीत्या काम केले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत केले जात असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tuesday, September 19, 2023

आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते विधीवत पुजारून गणरायाची स्थापना, गेल्या २६ वर्षांपासून गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव होतोय उत्साहात साजरा,




मनमाड ( विशेष प्रतिनिधी) - मनमाड आपल्या सगळ्यांचा लाडका आणि आनंदाचा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी आपल्या लाडक्या गणरायाची सगळेचजण आतुरतेने वाट बघत असतात आणि सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो .भारतात एकमेव ठिकाण असे आहे , जिथे गणराया रोज मनमाड ते कुर्ला अप डाऊन करतात ते म्हणजे मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मधील गणेशोत्सव गेल्या २६ वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो‌ यंदाही हा करण्यात आला .आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते  विधिवत पुजा करून गोदावरीच्या राजाची स्थापना करण्यात आली. गोदावरी एक्सप्रेस ही आता ३ दिवस धुळे येथून करण्यात आली असुन लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन ही गाडी पूर्ववत मनमाड येथूनच कशी सुरू करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार कांदे यांनी व्यक्त केले.यावेळी चांगला पाऊस पडू दे दुष्काळ दूर होऊ दे अशी प्रार्थना केली असल्याचे कांदे यांनी सांगितले. यावेळी रोज अप डाऊन करणारे चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगाव मध्ये तैलिक समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात निवेदन,


नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका तैलिक समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षणा बाबत नाशिक विभाग अध्यक्ष शशिकांत व्यवहारे, उत्तर जिल्हाध्यक्ष समाधान चौधरी,जिल्हा वकील आघाडी अध्यक्ष ऍड.बी.आर.चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
ओबीसी आरक्षणा बाबत सुरू असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. १८) रोजी नांदगाव शहर व तालुका तैलिक समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, शासनाने कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण जी. आर.२००४ व २०२३ ची आरक्षण समिती रद्द करण्यात यावी. मुळात ओबीसी समाज हा जवळ पास ६०% आणि त्यातही जवळ जवळ ४००. जाती जमाती आहेत आणि संख्येच्या तुलनेत आमचे आरक्षण हे २७.टक्के नव्हे तर अधिक असायला हवे होते पण आम्हाला तुटपुंजे २७.टक्के आरक्षण देऊनही आणि त्यात ही विशेष मागास प्रवर्गासाठी ११.टक्के म्हणजे आमच्या वाट्याला १६.टक्के आरक्षणावर बोळवण करून आणि ते ही आता संपवण्याच्या जो घाट घातला जातोय त्यास आमचा तिव्र विरोध आहे.आज आमचे राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण संपवण्याचा डाव खपवून घेतला जाणार नाही अशा तीव्र भावना व्यक्त करीत आज पर्यंत साऱ्याच राजकीय पक्षांनी आम्हा ओबीसींचा गैर फायदा घेत पिढ्यांन पिढ्या सत्ता भोगत मलिदा लाटला आणि त्यांना आमचा आता हा निर्वाणीचा इशारा आहे. हा समाज आता निद्रिस्त नाही राहिला, जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर नकीच आमचा ओबीसी बांधवांचा उद्रेक पाहायला मिळेल. आता ही सुरुवात आहे पण जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर त्यांचा प्रक्षोभ बघावा लागेल आशा भावना कळवित निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदन सादर करतांना तालुकाध्यक्ष दत्तात्रय बत्तासे,तालुका युवा आघाडी अध्यक्ष संतोष गायकवाड, शहर समाज अध्यक्ष दिलीप सौंदाणे,तालुका महिला आघाडी अध्यक्षा कुमुद चौधरी,शहर महिला आघाडी अध्यक्ष सरला चौधरी, विनोद महाले, तालुका उपाध्यक्ष दिलीप देहाडराय, शहर उपाध्यक्ष, मनोहर चौधरी तालुका सचिव,लक्ष्मण चौधरी, नितीन वाघ,बाळासाहेब वाघ,राजेंद्र चौधरी,नितीन पाटील,मनोज वाघ,बाळासाहेब देहाडराय,देविदास सौंदाणे,रमेश खंडू,संतोष चौधरी,सुदाम सौंदाणे,हेमंत चौधरी,अमोल खैरणार आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, September 18, 2023

नांदगावात श्री रामदेवजी बाबा यांच्या पालखीची भव्य मिरवणूक, धार्मिक सोहळ्यात भाविकांची गर्दी,





नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथे श्री बाबा रामदेवजी यांची जयंती दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.यंदाचे हे ६ वर्षे असून श्री रामदेवजी बाबा यांच्या पालखीची भव्य मिरवणूकीची सुरुवात सांयकाळी शहरातील गांधी चौकापासून वाजत गाजत मोठ्या भक्ती भावाने करण्यात आली.ही मिरवणूक सोनार गल्ली ,कासार गल्ली, विठ्ठल मंदिर, कलंत्री गल्ली,महावीर मागें पालखी मिरवणूक काढत पुन्हा गांधी चौकात आल्या नंतर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.या वेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी ज्योती अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या नंतर रात्री गुप्ता लॉन्स येथे जम्मा जागरण आणि श्री रामदेवजी बाबा यांची जन्म उसत्वाची अमृतकथाचे प्रवचन ज्योतीप्रसाद अग्रवाल व श्री रामदेवबाबा भक्त मंडळ यांनी केले.या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व शहरातील भक्त परिवाराच्या मागणीनुसार श्री रामदेवजी बाबा मंदिरास दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून देणारआमदारांनी या वेळी जाहीर केले .
या धार्मिक सोहळ्यात शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या अमृतकथेचा लाभ घेतला.या वेळी शहरातील व्यापारी वर्ग,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री बाबा रामदेव भक्त मंडळ नांदगाव यांनी केले होते.

नांदगाव मधील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केली चंद्रयान ३ आकर्षक प्रतिकृती,



नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक संचलित व्ही.जे.हायस्कूल,नांदगाव येथे इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी स्वानंद उपक्रमांतर्गत टाकावू वस्तू , जूने रद्दी पेपर यापासून ' चंद्रयान 3 ‌' च्या 3D प्रतिकृती तयार केल्या आहेत.  विद्यार्थ्यांनी दोन ते तीन फूटा पर्यंत आकर्षक, वास्तववादी ४२ प्रतिकृती साकारल्या. या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक चंद्रकांत दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. गिरीश निकम व स्वप्निल पाटील यांनी त्यांना सहकार्य केले. सहभागी विद्यार्थांचे कौतुक शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे यांनी केले.तसेच शिक्षक प्रतिनिधी गुलाबराव मोरे,अनिल तांबेकर, मिलींद श्रीवास्तव, राजेश भामरे, विलासराव काकळीज यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Sunday, September 17, 2023

नांदगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदवीदान दीक्षांत समारंभ,



 नांदगाव ( प्रतिनिधी) -  औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथे विश्वकर्मा जयंती निमित्ताने पीएम स्किल रन तसेच पदवीदान दीक्षांत समारोह  आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन  करून विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली .या कार्यक्रमासाठी नांदगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्या अर्पणा कुलकर्णी,  नांदगावचे पीआय नितीन खंडागळे , पीएसआय बहाकर साहेब तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष पंकज खताळ ,  आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अॅड.विद्या कसबे , नांदगाव रेल्वे लोको पायलट क्रू लॉबीचे प्रमुख शंकर धनवटे  पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नितीन खंडागळे यांनी भूषविले .औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्तीर्ण झालेल्या विविध व्यवसायातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच पीएम स्किन रन मध्ये प्रथम ,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस रकमेचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी संजय धनवटे , शंकर धनवटे, अँड.विद्या कसबे , पीआय  नितीन खंडागळे ,  पंकज खताळ यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेतील गटनिदेशक एम. डी. निकुंभ सर  तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद आवर्जून हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी .राठोड व पी. एस. गायकवाड यांनी केले व एस. टी. शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत यांचे गान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नांदगाव शहरात आगामी सण - उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीच्या वतीने बैठक, काही चुकीची माहिती असल्यास संपर्क साधावा , मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांचे आवाहन,



नांदगाव (प्रतिनिधी ) -  या वर्षी नांदगाव तालुक्यात पाऊस कमी आहे , त्यामुळे लहान मूर्तीच्या विसर्जनासाठी नगरपालिकेच्या वतीने शिवसस्फूर्ती चौकात कृत्रिम तलाव तयार केला जाणार आहे. मोठ्या मूर्तीचे जतन करण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीच्या मार्गातील अडथळे दूर करणार असल्याचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत सांगितले.
     आगामी गणेश विसर्जन व महंमद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदगाव पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन शुक्रवार रोजी करण्यात आले होते.
आगामी गणेशोत्सवात व ईद उत्सव मिरवणूकित पारंपरिक वाद्य वाजवावी, तसेच गणपती मंडळांनी २४ तास स्वयंसेवक नेमवावे, मंडळांनी वीज वितरण कंपनी कडून अधिकृत कनेक्शन घ्यावे कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटी राहून गणेश उत्सव व ईद (ईद-ए-मिलाद) साजरा करावा, तसेच या कालावधीत सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा काही चुकीची माहिती दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन मनमाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांनी केले.  
    यावेळी नांदगाव तालुक्याचे तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांनी सांगितले की , गणेश मंडळांना प्रशासनाचे सर्व सहकार्य मिळेल.  यावेळी नांदगाव पोलीस ठाण्यात चे पोलीस निरीक्षक प्रीतम चोधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गणपती मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे करावेत. उत्कृष्ट देखावे तयार करणाऱ्या मंडळांना पोलीस स्टेशनचे अधिकारी पाहणी करून उत्कृष्ट कार्यक्रम घेणाऱ्या मंडळांना नांदगाव पोलीस ठाण्यातर्फे प्रशस्तीपत्र, बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. मंडळांनी सामाजिक उपक्रम राबाबे, असे आव्हान केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे म्हणाले की, या वर्षी दुष्काळी परिस्थिती असून मंडळांनी, जादा खर्च न करता, खर्चामध्ये बचत करून भविष्यात पाण्याच्या कामावर खर्च करून सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नांदगाव  तालुका व्यापारी संघटनेचे बाळासाहेब कवडे, वाल्मिक जगताप, संदीप जेजुरकर यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी नगरपालिकेचे कर निरीक्षक राहुल कुटे, सहायक पोलीस निरीक्षक नितिन खंडागळे, पोलिस उपनिरक्षक मनोज वाघमारे, उपनिरीक्षक संतोष बहाकर , हवालदार राजू मोरे, दत्ता सोनवणे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण चे सहायक अभियंता, डी. डी. पाटिल,
नरेंद्र पाटिल, याकुब शेख, सिध्दार्थ पवार ,मुस्ताक शेख, आरिफ मंसुरी , नासिर शेख, कपिल तेलुरे , वाल्मिक पवार, नांदगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश शेळके, महेश पेवाल,कलिम शेख आदी उपस्थित होते.

Saturday, September 16, 2023

नांदगाव मध्ये राष्ट्रवादी युवक कार्यकर्ता मेळावा, पक्षात जास्तीत - जास्त युवकांचे संघटन मजबूत करण्यासंदर्भात चर्चा,



नांदगाव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वांचीत नाशिक युवक जिल्हाध्यक्ष  चेतन कासव यांच्या निवडीनंतर  नांदगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने युवक कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा सत्कार समारंभ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आला होता. 
              याप्रसंगी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुका युवकाचं जास्तीत जास्त संघटन करण्यासंदर्भात येणाऱ्या काळात तालुक्यात होणाऱ्या उपक्रमासंदर्भात चर्चा झाली. कुठल्याही परिस्थितीत यानंतर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये नांदगाव तालुक्यात अजितदादा पवार व भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. तसेच युवक जिल्हाध्यक्ष चेतन कासव, तालुकाध्यक्ष विजय पाटील, बूथ कमिटी अध्यक्ष देवदत्त सोनवणे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
               यावेळी सोपान पवार, प्रसाद सोनवणे, शिवाजी जाधव, प्रशांत बोरसे, यांनी मनोगत व्यक्त केले, तर सूत्रसंचालन दिगंबर सोनवणे यांनी केले. 
               याप्रसंगी युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार , तालुकाध्यक्ष विजय पाटील, मविप्र व कृ. उ. बा. समिती संचालक अमित बोरसे पाटील, प्रसाद सोनवणे, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, दत्तू पवार, संतोष अडांगळे, राजेंद्र लाठे, राजेंद्र सावंत, देवदत्त सोनवणे, रवींद्र सुरसे, अशोक पाटील, दिगंबर सोनवणे, शिवा सोनवणे, सुरेश गायकवाड, डॉ. भरत जाधव, प्रशांत बोरसे, शिवाजी जाधव, महेश पवार, सचिन कोरडे, पृथ्वीराज चव्हाण, मनोज कोरडे, सागर आहेर, अशोक पवार, उमेश पवार, लक्ष्मण गायकवाड, राकेश पवार, साईनाथ शिरसाठ, सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर सुरसे, पवन खैरनार, अजय गव्हाणे, राजेंद्र निकम, सागर चव्हाण, दीपक घाडगे, सचिन पवार, वैभव पवार, अविनाश थोरात, राहुल माने, दर्शन सानप, हर्षल बेंडकुळे, वरून ठाकूर, प्रेम सोळसे, ज्ञानेश्वर बच्छाव, गोकुळ चव्हाण, जगदीश सुरसे, रोहित बोरसे, भूषण बोरसे, कल्पेश इंडाईत, पुरुषोत्तम बागुल, विशाल बोरसे, हेमंत मोरे, महेश कदम, राहुल काटकर, सनी सोळसे, वाल्मीक काटकर, अभिजीत पवार, सिद्धांत काकळीज, शुभम जगताप, सिद्धार्थ जगताप, विजय बोरसे, रवींद्र कदम, अमोल सोनवणे, सिद्धार्थ बागुल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगाव महाविद्यालयांत हिंदी दिवस साजरा, हिंदी भाषेचे भारत स्वतंत्र होण्यासाठी असलेले योगदानाबद्दल भाष्य,



 नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव महाविद्यालयात हिंदी दिन साजरा
कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे होते . हिंदी भाषेतील उज्वल भविष्य हे डॉ. बी.बी धोंगडे हिंदी विभाग प्रमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले. तर
प्रमुख वक्ते  डी. एम. भिलोरे यांनी हिंदी भाषेचा इतिहास, संविधानाने दिलेला राष्ट्रभाषेचा दर्जा व त्याची प्रक्रिया हिंदी भाषेचे भारत स्वतंत्र होण्यासाठी चे असलेले योगदान अशा विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले .
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक  जी.व्ही. बोरसे यांनी हिंदी भाषेचे महत्व हिंदी साहित्याचे महत्व,विविध प्रकार तसेच शेरोशायरीने विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन तसेच मनोरंजन केले.
महाविद्यालयातील  कल्पेश सोनवणे,  कोमल बोरसे,  अक्षय पानगव्हाणे,  सचिन शिंदे, रिना राठोड,  बाळनाथ शिंदे या विद्यार्थ्यांनी आपले हिंदी विषयाचे प्रेम आपल्या भाषणातून व्यक्त केले.
      हिंदी सप्ताह निमित्त झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस एन शिंदे ,उपप्राचार्य डॉ.एस. ए. मराठे,देवरे आर.टी. तसेच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस. एन. शिंदे यांनी "हिंदी पढो, आगे बढो ,भारत जोडो" असा संदेश देत आपल्या विश्व प्रसिद्ध वसुधैव कुटुम्बकम भावनेने परिपूर्ण संस्कृती ,सभ्यता असलेली हिंदी भाषा चा महिमा आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला.
या कार्यक्रमाला शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक  अनिल राठोड यांनी मानले.

Monday, September 11, 2023

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे गणितीय शिक्षण एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध,



नांदगाव( प्रतिनिधी ) - शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे गणितीय शिक्षण एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून नांदगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली आहे असे प्रतिपादन सेवा निवृत्त शिक्षक विजय काकळीज यांनी नांदगाव येथे संपन्न झालेल्या एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले.
    एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी द्वारा आयोजित २२ व्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटीशनचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी येथील गुप्ता लॉन्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करण्यात येवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे, प्राचार्य मनी चावला, भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, सेवा निवृत्त शिक्षक विजय काकळीज, अशोक घडेकर, पत्रकार अनिल आव्हाड, व पत्रकार महेश पेवाल उपस्थित होते.   
एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी द्वारे रविवार (दि. १०) रोजी सकाळी अकरा वाजता नांदगाव केंद्रावर २२ व्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटीशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नांदगाव, निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यानंतर दुपारी परी‌क्षेचा निकाल जाहीर करण्यात येवून यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या संचालिका कल्पना गडेकर यांनी केले, सुत्रसंचलन सुवर्णा आव्हाड यांनी केले तर आभार निशिगंधा काकळीज यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाम गाडेकर, सिद्धार्थ सोनवणे, शिक्षीका गीता बिसेन, सोनाली खैरनार यांनी परिश्रम घेतले.

मच्छीमार बांधवांनी गिरणा नदीपात्रात सोडले मत्स्यबीज,


नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून गिरणा धरणात मस्त्यबीज सोडण्यात आले. गिरणा धरण परिसरातील आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी या धरणात मत्स्यबीज सोडण्यात आली. मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव मच्छी व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. 
   आंध्र प्रदेश येथून कटला जातीचे मत्स्य बीज मागवले गेले असून, १० लाख बीज धरणात या वेळी सोडण्यात आले आहे. पाच ते सहा महिन्यात हा मासा मासेमारी करिता तयार होतो. गेली काही दिवस माश्यांची संख्या कमी झाली होती. म्हणून मच्छिमार बांधवांचा उदरनिर्वाह करिता हे बीज सोडण्यात आले आहेत. 
  स्थानिक मच्छिमार बांधवांना या ठिकाणी मच्छीमारी करण्याचा प्रथम हक्क अशी भूमिका काही दिवसांपूर्वीच आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मोठे आंदोलनात केली होती . 
       या मुळे स्थानिक मच्छीमार बांधव आनंदात असून ग्राहकांच्या मागणीनुसार संबंधित जातीचे मत्स्य बीज धरणात सोडले असल्याने भविष्यातील चिंता दूर झाल्याचे त्यांनी या वेळी बोलून दाखवले. आजपर्यंत स्थानिक मच्छिमार बांधवाना मच्छीमारी करिता विविध अडचणी आल्या पण आण्णांनी ठामपणे यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना आधार दिल्यानंतर मात्र हा समाज बांधव आनंदात आहे .
       या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे, सुरेशजी शेलार, बापू शेलार, देवेंद्र शेलार, गोरख बाबा ठोके, सौ.रोहिणी मोरे, राजेंद्र मोरे सर, संजय मोरे ,समाधान गायकवाड, दीपक पवार ,राजाराम गायकवाड,हरीश ढोले,शांताराम वाघ,केवळ वाघ,शिवाजी वाघ,रतन मोरे, भुरा सोनवणे,संदीप शिवदे,काशिनाथ ढोले,बाळू शिवदे,युवराज शिवदे,बापू बोरसे,दादाजी बोरसे,बाजीराव पवार, मांगु गोरे, भागचंद गोरे,गोपाळ ढोले आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते.

नांदगाव येथील जय म्हसोबा महाराज मंदिराजवळ विशाल भंडारा,



 नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील जय म्हसोबा प्रसन्न भोंगळे रोड भाजी भेंडी येथील जागृत देवस्थान असलेले जय म्हसोबा महाराज यांच्या मंदिरा जवळ भव्य विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले.
    दरवर्षीप्रमाणे येथील जय म्हसोबा महाराज मित्र मंडळाच्या वतीने व दीपक सोनवणे राकेश चंडाले यांच्या नेतृत्वाखाली श्रावणाच्या शेवटच्या दिवशी शहरातील भाजी भेंडी, येथे जय म्हसोबा मंदिर येथे भव्य भंडाऱ्याचे आयोजन केले होते. या वेळी सकाळी सत्यनारायणाची विधीवत पूजा करून महाआरती करण्यात आली. हे यंदाचे ११ वे वर्ष असून शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.
येथील सर्व भाविक भक्त एकत्र येऊन या देवाचे सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात.
जवळपास आजरो भाविकांनी व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशी माहिती आयोजकांनी दीपक सोनवणे यांनी दिली.या वेळी,आबा शिंदे, युसुफ राजू,निलेश गेजगे,गोटु गेजगे, डेबु सोनवणे, सागर जाधव, सागर सोनवणे, शुभंम शिंदे गणेश जाधव, महेश चौगुले, राम शिंदे, कैलास जाधव, लक्ष्मण गेजगे, अनिल जंगम, तुषार शिंदे, अर्जुन आप्पा, रवी आप्पा, सखाराम सोनवणे, प्रतिक भालेकर, प्रसाद, शाम शिंदे, सोनवणे,विशाल गायकवाड,आचारी रमेश भोसले आदी भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.

नांदगाव मध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन,


नांदगांव( प्रतिनिधी) - विधी व न्याय विभाग यांच्यामार्फत राष्ट्रीय लोकआदालत चे आयोजन केले जाते.  यामध्ये जास्तीत जास्त दाखल व दाखल पूर्व तडजोड होण्यासारखी प्रकरणे ठेवली जातात. लोक आदालत म्हणजे "पीपल्स कोर्ट" असे सामान्यतः ओळखले जाते. या लोकआदालतींचा उद्देश जनतेला त्याच्या समस्यां सोडवण्यासाठी तडजोडीच्या माध्यमातून केलेला एक प्रयत्न आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त तडजोड योग्य प्रकरणात न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो, न्यायिक प्रक्रियेच्या सर्व स्तरांवरील विचारात्मक सुलभता यात असते असे मत न्या. एस व्ही लाड यांनी नोंदविले.
      नांदगांव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाखल असलेली ३८१२ प्रकरणांपैकी तडजोड योग्य ११२४ प्रकरणे व इतर दाखल पूर्व २६८८ प्रकरणे लोक न्यायालयात ठेवण्यात आली होती.  त्या मधील ३२२ प्रकरणे निकालीवरून निघाली असून त्यातुन १४ लाख ११ एजार ८३७ रुपये थकबाकी वसुली झाली आहे यात, शहरातिल बंँका,विजवितरण कंपनी,आणी ग्रांमपंचायत थकबाकी यांचा समावेश आहे .यातील वीज कंपनीला कोणतीच वसुली झाली नाही
नांदगांव न्यायालयात दि.  ९ सप्टेंबर रोजी लोकन्यायालय दरबार घेण्यात आला होता.  या झालेल्या तडजोडी मध्ये वीज वितरण कंपनीला ग्राहकांनी ठेंगा दाखविला म्हणजे ग्राहक त्यांचे कडे फिरकले नाही.
   तर फौजदारी खटल्यातील १४६ पैकी ३२ गुन्हे निकालीवरून काढले.दिवाणी मध्ये १०० पैकी ३० गुन्हे निकालीवरून निघाले. ग्रामपंचायत थकबाकी मध्ये १९९५ पैकी २५७ केस निकालीवरून निघाले.बँका मध्ये ४८० पैकी फक्त ३ केस निकालीवरून निघाल्या आणी महावितरण कंपनीची २१३ पैकी एक ही केस निकाली निघाली नाही .
     यात विशेष बाब म्हणजे न्यायमूर्ती श्रीमती एस. व्ही . लाड यांनी सर्व प्रकरणातील वादी आणि प्रतिवादी यांच्यात तडजोड होणे कामे जास्तीत जास्त प्रयत्न केला.
त्यामुळे पती पत्नीचे वाद असलेल्या सात व चेक बाऊन्सचे दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली. 
त्यामुळे सात मुली संसारात नांदाण्यासाठी सासरी गेल्या. या प्रसंगी न्यायालयीन कर्मचारी व वकील संघाचे सदस्यांनी वादी प्रतिवादी यांच्या केसेस निकाली काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. दरम्यान या प्रसंगी अँड सचिन साळवे, दिपक शिंदे यांनी या संदर्भातील न्यायालयीन कामकाजात विशेष सहकार्य केले. या दरम्यान पक्षकारांनी तडजोडीस विशेष प्राधान्य दिले.
 न्यायालयाच्या आवारात न्यायडोंगरी येथील ८० वर्षाच्या जेष्ठ महिलेचा लहाणग्या बाळासारखे उचलून न्यायलायात जबाब नोंदविला.  या दरम्यान ज्येष्ठ नागरीका मध्ये पुरुष महिला, यांचे प्रमाण अधिक होते. याच दरम्यान शहरातील प्रतिष्ठित व नामवंत कुटंबातील पुरुष व महिला यांनी देखील आपल्या गुन्ह्याचे संदर्भात न्यायलायात सखोल चर्चा करून तडजोड केली.

Friday, September 8, 2023

क्रांतीनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप सुशोभीकरण व काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन,




नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत  क्रांतीनगर ग्रामपंचायत येथील सभामंडपाचे सुशोभीकरण तसेच काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन सरपंच पूनम संदीप जेजुरकर तसेच उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. 
     यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी महीलांचा सन्मान करत उपस्थित महिला भगिंनिंच्या हस्ते भूमिपूजन करून महिलांना सन्मान दिला. 
   आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सभामंडपाचे सुशोभिकरण, तसेच काँक्रिट रस्ता तय्यार करण्यात येत आहे. 
    या वेळी विष्णू निकम सर, अमोल नावंदर, उप सरपंच युवराज डोळे, सदस्य सौ.मंगला मोकळं, संगीता नागरे, इंदूबाई गायकवाड, प्रियांका पाटील, बेबिबाई ककळीज, सचिन मोकळं, कडूबाई काळे, आत्माराम जेजुरकर बाळासाहेब मोकळ निवृत्ती मोकळ योगेश मोकळ अशोक मोकळ संदीप जेजुरकर भास्कर जेजुरकर अनिल पाटील अशोक नरोटे अशोक गायकवाड अमोल काळे वनाजी आयनोर सुनील नरोटे ज्ञानेश्वर जेजुरकर दिगंबर भागवत छायाताई जेजुरकर मंगला मोकळे शांताबाई सरला जेजुरकर पल्लवी आहेर जयश्री जेजुरकर सुमन जेजुरकर चंद्रकला जेजुरकर दिनकर जाधव गोपाळ भस्मे जितेंद्र आहेर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, September 7, 2023

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा बांधवांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ नांदगावी रास्ता रोको,


नांदगाव (प्रतिनिधी) -  जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनास बसलेल्या मराठा समाज कार्यकर्त्यांना पोलीसानी जो अमानुष लाठीचार्ज करून अनेक निष्पाप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे. त्या निषेधार्थ नांदगाव येथील हुतात्मा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांतर्फे तहसीलदार सिध्दार्थ मोरे व पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन देण्यात आले. काल सकाळी ११ वाजता येथील हुतात्मा चौकात सकल मराठा समाज जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय..., तुमचे - आमचे नाते काय जय जिजाऊ - जय शिवराय..., आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे..., जरांगे पाटिल आगे बढो हम तुम्हारे साथ है... या घोषणा देवून परिसर दणाणुन गेला होता. यावेळी संभाजीनगर - येवला- मनमाड- मालेगाव कडे जाणाऱ्या येणार्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आमदार सुहास कांदे यांनी आपण मराठा समाजाबरोबर सदैव असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन अशी आपली प्रामाणिक व इच्छा मागणी आहे. तर माजी आमदार संजय पवार यांनी सांगितले कि, न्याय हक्कासाठी उपोषण बघता या पूर्वी सराठा समाजाचे निघालेले शांतता पूर्ण मोर्चे शासन ज्ञात आहे. आरक्षण लढासाठी मराठा समाजाला नांदगाव शहरातील सर्व पक्ष, संघटना यांनी दिलेला पाठिंबा राज्यातील प्रत्येक राजकारण्यांनी, समाजिक संघटनांनी पाठिंबा द्यावा, असे मत व्यक्त करीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लक्षात घेवून शासनाने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे असे माजी आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी संतोष गुप्ता, महेंद्र बोरसे, राजाभाऊ जगताप, लकी कदम, विशाल वडघुले, निलेश चव्हाण आदिंनी आपले मनोगत व्यक्त करीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी एकमुखी मागणी यावेळी त्यांनी केली. याप्रसंगी तहसीलदार मोरे व पोलीस निरीक्षक चौधरी यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या तरूणांनी भगवे उपरणे व भगव्या टोप्यांवर लिहिलेला ' एक मराठा लाख मराठा ' सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. यावेळी माजी आमदार अॅड. अनिल आहेर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, नगराध्यक्ष राजेश कवडे, किरण देवरे, रमेश बोरसे, फरहान खान, विलास आहेर, तेज कवडे, शिवकन्या संगिता सोनवणे, विजय पाटिल, गुलाब चव्हाण, सागर हिरे, दिपक म्हस्के, सुरज पवार, दर्शन आहेर, अनंत आहेर, महेंद्र जाधव, राहूल पवार, राहूल शेवाळे, कमलेश पेहरे, महेंद्र शिरसाठ आदिंसह सकल मराठा समाजातील नागरिक, तरूण उपस्थित होते. यावेळी काही तरूणांनी जालना येथील घटनेचा निषेध म्हणुन मुंडणही केले.

Wednesday, September 6, 2023

जामदरीच्या शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,

   
नांदगाव (प्रतिनिधी )  - नांदगाव तालुक्यातील महेश इनामदार यांच्या वाढदिवसा निमित्त विक्रांत  कवडे व टायगर ग्रुप नांदगाव तालुका प्रमुख वैभव कुमावत व सदस्य,बंटी उन्हाळे,सुरज खैरे,कृष्णा शेवाळे,प्रशांत शेवाळे, सुधीर शेवाळे, प्रीतेश इनामदार,भारत गायकवाड,संकेत शेवाळे यांच्या सहकार्याने जामदरी गावात व वस्तीच्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वही व पेन्सील वाटप करण्यात आली . शाळेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी विक्रमसिंग इनामदार,भाऊशिंग शिंदे,प्रशांत इमानदार,समाधान सरोदे,रितेश सोनवणे,डिगंबर इनामदार,रिंकू विसपुते,कमलेश इनामदार,अमोल पवार,पोपट व्हडगर,सखाराम चव्हाण, नेताजी व्हडगर,अर्जुन खेमगर व सर्व शिक्षक व शिक्षिका आदी यांच्या समवेत जामदरी गावात व वस्ती शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वही व पेन्सील वाटप करताना शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

नांदगाव तालुक्यातील जामदरी शिवारात एसटी बस अपघातात शाळकरी मुले व काही प्रवाशी जखमी,




नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील जामदरी शिवारात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शाळकरी मुले व काही प्रवाशी जखमी झाल्याचे समजते याबाबत 
मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक एमएच. १४ बीटी ३८०६ ही गिरणा डॅमकडून नांदगावकडे येत असताना सदर बस जामदरी फाट्याजवळ आली असता बसचे पाटे तुटल्याने हा अपघात झाला. या बसमध्ये अंदाजे पन्नास ते पंचावन्न प्रवाशी होते. त्यामध्ये शाळकरी मुले आणि इतर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या बसमधील सर्व शाळकरी मुले चाकोरी येथील कर्मवीर भाऊसाहेब विद्यालयातील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघातात शाळकरी मुले आणि प्रवाशांसह चालक शांताराम सोनवणे आणि वाहक योगेश गरुड हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अपघातस्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.

नांदगाव येथील कासलीवाल विद्यालयात बालगोपालांनी केला जल्लोषात गोपालकाला साजरा,





 नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव शहरातील कासलीवाल प्राथमिक विद्यालयात काल बुधवारी  दि. ६ संप्टेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात बालगोपालांनी राधाकृष्णाच्या वेशभुषेत दहिहंडी फोडुन गोपालकाला साजरा केला . `गोविंदा आला' या गाण्यावर नृत्य केले.
     गोपालकाल्याचे महत्व शाळेचे उपशिक्षक सिद्धार्थ जगताप यांनी सांगितले.
     या कार्यक्रमास उपस्थित बालगोपालांचे संस्थेचे अध्यक्ष सुनिलकुमार कासलीवाल ,सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता,सरचिटणीस प्रमिला कासलीवाल,संचालक महेंद्र चांदीवाल, तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल सावंत, शरद पवार यांनी सर्व बालगोपालांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tuesday, September 5, 2023

मनमाड मध्ये आ.सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्यात प्रचंड प्रतिसाद,




 मनमाड (विशेष प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्यातर्फे  मनमाड येथील संपर्क कार्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता . 
    दुष्काळाची परिस्थिती पाहता आमदार सुहास आण्णा कांदे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले आणि मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध सुविधांचे लोकार्पण करण्याचे आयोजन केले. याचाच एक भाग म्हणून मतदारसंघातील तरुणांसाठी नोकरी ची संधी उपलब्ध करून देण्यात आली. 
    या मध्ये रिंग गेअर अक्वा, शारदा मोटर्स, बजाज सन्स, हिताची जळगाव, एम डी इंडस्ट्रीज, एल आय सी, महिंद्रा अँड महिंद्रा, टपारिया टूल, सतीष टोय, वैष्णवी ऑटो, किंप क्लॉथ, आर्ट रबर, व्ही आय पी, नाशिक, सिन्नर येथील 30 हून अधिक कंपनीचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
     या रोजगार मेळाव्यास मतदारसंघातील तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नोकरी करिता मुलाखत दिली, यावेळी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली. 
  तब्बल ११३३ उमेदवारांनी नोकरीसाठी मुलाखत दिली तर यातील ७७६ मुलांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात आले. संपूर्ण मतदारसंघातून या ठिकाणी तरुण तरुणी मुलाखतीसाठी आलेले होते. 
   या वेळी संपर्क कार्यालयं येथे थंड पाणी चहा ची व्यवस्था करण्यात आली होती.  
   युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान दादा खान, अल्ताफ बाबा खान, उप जिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे, बबलू भाऊ पाटील, सौ.संगीता ताई बागुल, विद्या ताई जगताप, पुजाताई छाजेड यांच्या हस्ते प्रत्येकाला ऑफर लेटर देण्यात आले. 
    या मेळाव्याचे नियोजन रवी देवरे सरचिटणीस औद्योगिक कामगार सेना यांनी केले होते. या वेळी बोलतांना याबपुढेही आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नांदगाव, मनमाड, मालेगाव येथील संपर्क कार्यालयात नोकरी नोंदणी सुरू राहणार असून प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना नाशिक येथे बोलावले जाणार असून त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाते असे त्यांनी सांगितले. 
   या वेळी युवासेना शहराध्यक्ष योगेश इमले,आसिफ पहिलवान, गालिब शेख, अमीन पटेल, आझाद पठाण, आमीन शेख, राकेश ललवाणी, किशोर लहाने, अंकूश कातकडे, वाल्मीक आंधळे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, दिनेश घुगे, निलेश ताटे, अज्जू शेख, रमेश दरगुडे, विशाल सुरवसे, लोकेश साबळे, सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी, अज्जू पठाण, स्वराज देशमुख, रिशिकांत आव्हाड, धनंजय आंधळे, स्वराज वाघ, अमोल दंडगव्हाळ, प्रमोद अहिरे, मन्नू शेख, प्रमोद राणा, कुणाल विसापूरकर सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, शहर संघटक नीतू परदेशी, सावित्री यादव उपस्थित होते.


मराठा आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा न्यायडोंगरीला रास्ता रोको,



नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, कांद्यावर लावलेले निर्यातशुल्क रद्द करावे , मराठा आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने नांदगाव तालुक्यातील न्याडोंगरी बंद तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी गावात १०० टक्के बंद पाळण्यात आला.  तर नांदगाव जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला तर सुमारे तासभर रास्ता रोको करण्यात आला . यावेळी जोरदार घोषणाबाजी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

Monday, September 4, 2023

नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणुन घेतली नगरपरीषदेची कार्यपद्धती ,



नांदगाव (प्रतिनिधी )- नांदगाव  येथील वैजनाथ जिजाजी विद्यालयाच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनींनी 'स्वानंद' ह्या अभिनव उपक्रमांतर्गत नांदगाव नगरपालिकेला भेट देवून कार्यपद्धती जाणून घेतली. ह्याप्रसंगी नगरपरीषदेचे कर अधिक्षक राहुल कुटे ह्यांनी विद्यार्थ्यांना नांदगाव नगरपरीषदेच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगत विविध सेवा जसेकी सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग,बांधकाम,आरोग्य,
स्वच्छता विभाग, विविध करभरणा विभाग,अर्थविभाग ते रस्तादुरूस्ती असो वा घंटागाडी किंवा विविध दाखले वा आयुक्तांचे दालन..इ. बाबी व विभागांच्या कार्यपद्धतीविषयी विद्यार्थ्यांना मनमोकळ्या संवादाद्वारे अवगत केले, तसेच कुटे ह्यांनी ह्यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचीही उत्तरे दिली.
          ह्यावेळी नगरपालिका कर्मचारी विजय कायस्थ, अरुण निकम,अंबादास सानप,श्रीमती रोशनी मोरे,रवी चोपडे,आनंद महिरे,निलेश देवकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
        शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे ह्यांची संकल्पना तसेच मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे,पर्यवेक्षक मनोहर शिंदे आदींची प्रेरणा लाभलेल्या ह्या उपक्रमासाठी इयत्ता ८ वी 'अ' तील विद्यार्थीनींना वर्गशिक्षक प्रविण अहिरे ह्यांनी मार्गदर्शन केले.
त्यांना विद्यालयातील चंद्रकांत दाभाडे,स्वप्निल पाटील आदींचे सहकार्य लाभले.

नांदगाव मध्ये आमदार सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध लोकपयोगी सुविधांचे लोकार्पण, मनमाड येथे भव्य रोजगार मेळावा,



नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघावर आलेले दुष्काळाचे सावट पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार सुहास आण्णा कांदे यांनी घेतला आहे.वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध लोकपयोगी सुविधांचे लोकार्पण करण्यात येत आहे .आमदार सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेत लोकार्पण होत आहे ‌. त्यात ९ जलरथ ( पाण्याचे टँकर), ३ नवीन सुसज्ज रुग्णवाहिका, मोफत फिरता दवाखाना, मोफत शासकीय सुविधा,२ वैकुंठ रथ उपलब्ध होणार आहेत. दीव्यांग व्यक्तीकरीता १०० सायकल, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्वतंत्र बसचा लोकार्पण बुधवारी दि. ६ सप्टेंबर रोजी नांदगाव शहरातील गुप्ता लॉन्स येथे सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
आमदार सुहास कांदे  नागरिकांच्या भेटीसाठी नांदगाव निवासस्थानी उपस्थित राहणार असून, कोणीही पुष्पगुच्छ, हार तुरे आणू नये असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे.

- मनमाड मध्ये भव्य रोजगार मेळावा >
 
   मनमाड मध्ये मंगळवारी दि. ५ सप्टेंबर रोजी शिवसेना संपर्क कार्यालयं येथे भव्य रोजगार मेळावा होणार आहे. मतदारसंघातील जास्तीत जास्त तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यात अनेक बेरोजगार तरुण - तरुणींना हाताला काम मिळणार आहे. नाशिक मधील अनेक नामांकित खासगी कंपनीत  नोकरी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 



Friday, September 1, 2023

नांदगावच्या ग्रामीण भागातील ४९ नागरिकांवर नाशकात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आमदार सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून होतोय उपचार,



नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - आमदार आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांना मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा दिल्या जात आहेत. या उपक्रम अंतर्गत  घाटमाथ्यावरील वसंत नगर तांडा , लोढरा , ढेकु ,चंदनपुरी येथील जेष्ठ ४९ नागरिकांना नाशिक येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. यासाठी आमदार सुहास आण्णां ची बस प्रत्यक्ष गावात येऊन नागरिकांना घेऊन जाते. या वेळी चहा नाश्ता जेवण व परतीचा प्रवास सुविधा दिली जाते.
   या वेळी बाजार समिती नांदगाव माजी सभापती  दत्तात्रय  निकम, प्रवीण पाटील , निकम साईनाथ, घाडगे किरण निकम , ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र निकम ,चंद्रकांत निकम, सुशील निकम, विजय निकम, एन. के .राठोड, साईनाथ चव्हाण संभाजी नगर पोलीस, भाऊसाहेब चव्हान, गणेश चव्हाण, कारभारी चव्हाण , तात्या राठोड, वाल्मीक चव्हाण, गोरख बन्सी, फतू चव्हाण, चंदू राठोड , देविदास राठोड, रतन चव्हाण, साईनाथ मोहन, भाऊसाहेब नामदेव, संजय सेट, नथू थारू, हरलाल भासू , अशोक कालू, व आदी समाज बांधव उपस्थित होते.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...