Thursday, March 31, 2022

नांदगावतील रस्ता दुरुस्तीसाठी आम आदमी पार्टीचे आसुड आंदोलन


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील   येवला रस्त्याच्या नुतनीकरण च्या व जुना औंरंगाबाद रोड  नवीन तहसिलसमोर स्पीड ब्रेकर  साठी येवला रोड वर रास्ता रोको व आसुड (चाबूक) मारून आदोलन करण्यात आले. निवेदनात असे की येवला नांदगाव रस्ता रेल्वे गेट ते बाणगांव पर्यंत दुरवस्था लक्षात घेता मोठ्या प्रमाणात अपघात व धुळीचे सामाज्य वाढत आहे.  या सर्व मागण्या मान्य कराव्यात . जर हे मागण्या मान्य झाल्या नाही  जनतेच्या मागण्यासाठी जनआंदोलन छेडण्यात येईल, यांची प्रशासनाने नोंद घ्यावी , होणार्या परिणामाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. यावेळी जनता व पदाधिकारी व येवला रोड नागरीक आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिवाजी वडघुले ,यशवंत शिदें ,विकास प्रकाश गवळी, स्वभिमानी शेतकरी संघटना ता. अध्यक्ष निलेश चव्हाण, योगेश वाघ, आबादास मोरे, प्रमोद पगार, रविंद्र शिदें, भाऊराव बरसाले, ज्ञानेश्वर मधुकर भामरे, भसरे आजय, विनोद ठाकरे, जगंधिश औशिकर, आमोल कुमावत, आतुल पाटील,  ज्ञानेश्वर वडघुले, बाळासाहेब सावळ, आन्नाभाऊ साबारे, साईनाथ वडघुले, सोमनाथ सोळसे , राजेद्र पाटील,  दत्तात्रय आहेर , गणेश पारख, कमलेश पारख, किशोर ललवाणी, बाजिराव बेडके, चेतन कोचर, संभाजी हिरे, लखन ठाकरे,  सुनिल सोमासे, आशिष साळुंखे, लकी कदम, गणेश कोमदकर,  व आदी सर्व येवला रोड व्यापारी नागंरीक उपस्थित होते. 

Tuesday, March 29, 2022

बिग ब्रेकिंग न्युज ... नांदगावच्या भूमिअभिलेख कार्यालयावर लाचलुचपत विभागाची कारवाई

 बिग ब्रेकिंग न्युज ...
नांदगाव - नांदगावच्या भूमिअभिलेख  कार्यालयावर लाचलुचपत विभागाची कारवाई 
  ४० हजाराची लाच घेताना अधिक्षक विलास दाणी यांना अटक झाली
जागेचा एनए करण्यासाठी घेतली होती लाच

Saturday, March 26, 2022

नांदगाव तालुकासह शहरात उन्हाचा तडाका,


नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुकासह शहरात मागील काही दिवसापासुन नांदगाव आणि परिसरात सकाळपासुन उन्हाचा तडाका जाणवत असल्याने रस्त्यावर व्यवसाय करणार्या व्यवसायकांनी छत्रीवर तर काही ठिकाणी तात्पुरते कपड्याचे सावलीसाठी बांधले आहे. 
       दुपारी नांदगाव शहरात नांगरिकांची वर्दळ कमी झाली . उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री, टोपी , उपरणे अशा वस्तुचा वापर वाढला आहे. तसेच मिळण्यासाठी थंडपेयच्या दुकानात गर्दी वाढली. घरांमध्ये पंखे, कुलर , एसी वापर वाढलेला आहे. आता पासुनच सुर्य आग ओकत आहे. पुढील काही दिवसात अजून उन्हाचा तडाका वाढणार असे जाणकारांचे अंदाज आहे 

नांदगाव तालुक्यातील कासारी ईथील शेतकरी पुत्र आकाश भाबड यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर रेकॉर्ड केल्याबद्दल शिवसंस्कार संस्थेच्या वतिने सत्कार


नांदगाव ( प्रतिनिधी) -    नांदगाव तालुक्यातील कासारी येथील आकाश रविंद भाबड या सर्व सामान्य शेतकरी पूत्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर रेकाॅडॆ केल्या बद्दल शिवसंस्कार संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष स्थानी संस्कृती रक्षक केंद्रा चे संस्थापक दत्तराज छाजेड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जायटंस चे राज्य संचालक ज.का.सांळूखे, रविंद्र भाबड, परसराम सरोदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी केले.
            नांदगांव तालुक्यातील कसारी गावातील आकाश भाबड ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट प्रशिक्षणाचा सुरु झालेला प्रवास आता आंतरराष्ट्रीयस्तारावर पोहोचला आहे. त्यांनी नुकताच 22 देशातील एज्यूकेटर्स एकत्र आणण्याचा कार्यक्रम झाला. त्यात भारतासह, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, अजेंटिना, मलेशिया, इटली, रोमानिया, आमेंनिया, तैवान, पेरु, मॉरिशस, रशिया, जॉर्जिया, लेबनॉन, भूतान, बाझिल, मॅसेडोनिया, दक्षिण अफ्रीका, बांगलादेश, नायजेरिया आणि श्रीलंका या देशातील एज्युकेटर्स सहभागी झाले होते. हा विश्व विक्रम ठरला म्हणावे लागेल. जगातील विविध देशांतील एज्यूकेटर्स एका व्यासपीठावर आणण्याचे आणि शिक्षणाविषयी त्यांचे विचार व्यक्त करण्याचे अनुभव यावेळी व्यासपीठ निर्माण झाले होते. त्यासाठी तारीख 22/02/2022 निवडण्यात आली होती. या कार्यक्रमात विविध देशांतील तंज्ञानी त्यांचे अनुभव ज्ञान, यशाची रहस्ये, शिक्षण, शिक्षण पद्धती आणि शिक्षकांच्या प्रति दृष्टिकोण मुलाखतीच्या माध्यमातून जगासमोर ठेवला.   या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व उपक्रम क्रमांक 22 आणि 2 शी संबंधित होते. या कार्यक्रमात सहयोगी भागीदार कंपनी 'भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन' ने याप्रसंगी 8 पुस्तके प्रकाशित केली. यामध्ये भारतासह आर्मेनिया, झिम्बाब्वे आणि रोमानिया येथील लेखकांचा समावेश होता. आकाश भाबड हे स्वतः लाईफ कोच आणि बिझनेस कोच म्हणून काम करतात. ते ऑथर्स सक्सेस कोच सुद्धा आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व शिक्षक अनुभवी आणि आपापल्या देशांतील अव्वल शिक्षकांच्या यादीत समाविष्ट आहेत. आगामी काळात आकाश भाबड असे विश्वविक्रम करणार असल्याचे नमूद केले. त्यांनी 12 डिसेंबर 2021 रोजी 12 लेखक, 12 देशांतील 12 ज्ञान मार्गदशक 12 राज्यातील 12 जिल्ह्यातील 12 मार्गदर्शक आणि 12 शहरातील 12 मार्गदशकांची 12 तासांची परिषद आयोजित केली होती. यावेळीह नामवंत लेखकांची 12 पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते.
    जगातील तज्ञ एज्युकेटर्स कोच आणि विविध क्षेत्रातील नेतृत्व एकत्र करण्याचे काम म्हणून भाबड यांच्या कार्याची दखल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डर्सने घेतली आहे. त्यांच्या 20 डिसेंबर 2021 रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित गौरविण्यात आले होते. शेतकरी कुटुंबातील मुलगा परंपरागत शेती व्यवसाय करुन अंतरराष्टीय स्तरावर कार्यरत आसल्याने तालुक्याचा नावालौकिक वाढला. तसेच कुटुबालाही अभिमानास्पद कामगिरी असल्याचे भाबड यांचे वडील रविंद्र भाबड यांनी सांगितले.

Saturday, March 19, 2022

नांदगांव शहरास शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी

  

  नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगांव शहरासाठी झालेल्या गिरणा धरण योजनेमध्ये शहराला केला जाणारा पाणी पुरवठ्या मध्ये अवास्तव वाढ करुन कोणतेही मीटर न लावता मीटर च्य धर्तीवर अवाजवी पाणी पट्टी आकारून त्या मध्ये वस्तू स्तिथी प्रमाणे आकारणी करावी ही मागणी नांदगांव नपा कडून अनेक वर्षे  असताना एकतर्फी आकारणी करणाऱ्या व गिरणा धरण योजनेचा पाणी पुरवठा बंद करून नांदगांव शहरास कराना अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास मजबूर करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.  अशुध्द पाणी प्यायल्याने नांगरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे‌. नांदगांव शहराला पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्यास जिल्हाधिकारी साहेब व आमदार साहेबानी  त्वरित जिल्हा परिषद व नगर पालिकेत समन्वय घडवून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी संतोष गुप्ता यांनी केली. या मागणीचा विचार न झाल्यास आम्हा  नांदगाव शहरातील नांगरिकाना तीव्र आदोलन करावे लागेल अशा ईशारा देण्यात आला.

Thursday, March 17, 2022

नांदगावच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून दुर्गुणांची होळी साजरी


नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून आवारातील झाडांचा पालापाचोळा प्लास्टिक व कागद यापासून तयार केलेल्या होळीचे दहन करून होळी सण साजरा केला. यात मुलांनी वाईट रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा,राग, द्वेष, मत्सर, आळस,मी पणा,गर्व,  अंधश्रद्धा,अहंकार,वाईट गुण यांचे तक्ते बनवून त्यांचे होळीत दहन केले. श्रीमती चोळके मॅडम यांनी होळी या सणाविषयी माहिती सांगितली. नंतर त्याच पद्धतीने आपल्या मधील वाईट गोष्टी होळी च्या माध्यमातून समूळ नष्ट कराव्यात हा संदेश दिला. यावेळी मुख्याध्यापक व्ही.पी. सावंत  माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरख डफाळ उपस्थित होते.
प्रशासन अधिकारी पी.पी. गुप्ता, चेअरमन सुनील कुमार कासलीवाल, श्री.विजय चोपडा, श्री.महेंद्र चांदिवाल या सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, विजय जाधव,धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, जयश्री चोळके,अनिता पवार, वैशाली शिंदे आदींनी परिश्रम घेतले. अशाप्रकारे होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

Sunday, March 13, 2022

नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे नुतनीकरण लोकार्पण सोहळा संपन्न


नांदगांव(प्रतिनिधी ):-  काल  दि. १३ मार्चला नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते पार पडला यावेळी हत्तीवरून मिरवणूक काढन्यात आली मोठ्या बग्गीतुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.ढोल ताशे लेझीम पथक मर्दानी खेळ या सर्व शिवकालीन खेळात भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.आज करण्यात आलेल्या या सोहळ्याचे संभाजीराजे यांनी कौतुक करत छत्रपती घरण्यावर असेच प्रेम कायम ठेवावे असे  अवाहन केले.यावेळी त्यांची लाडूने तुला करण्यात आली.या अभूतपूर्व सोहळ्यासाठी शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
             नांदगांव येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली होती यासाठी शिवकन्या संगीता सोनवणे यांनी आमरण उपोषण केले याची तात्काळ दखल आमदार सुहास कांदे यांनी घेतली व तत्काळ 20 लाख रुपये मंजुर करून सुसज्ज असे मंदिर व सोन्याचा मुलामा असलेली मूर्ती बनवण्यात आली याचा लोकार्पण सोहळा आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते करण्यात आला.यावेळी हत्तीवरून मिरवणूक ढोल ताशे लेझीम पथक मर्दानी खेळ या सर्व शिवकालीन खेळात भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मंचावर येताच सर्व जनतेने छत्रपती संभाजीराजे यांचे हात उंचावून स्वागत केले यानंतर काशिवरून आलेल्या पुजारी यांनी विधिवत अभिषेक पूजा केली.
यानंतर आमदार सुहास कांदे यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा नांदगांव तालुक्यातील जनतेच्या वतीने चांदीची तलवार देऊन सत्कार केला.यावेळी आमदार कांदे यांनी प्रास्ताविक करताना मराठा समाजाच्या मागण्यासाठी कोल्हापूरवरून आदेश येताच आमदारकीचा राजीनामा देईल असे उद्गार काढले यावेळी उपस्थितीपानी जोरदार टाळ्या वाजवत स्वागत केले.यावेळी मंचावर नांदगांव नगराध्यक्ष राजेश कवडे,जेष्ट नेते बापूसाहेब कवडे,माजी आमदार राजेंद्र देशमुख,अल्ताफ खान,साईनाथ गिडगे,विनय आहेर,विलास आहेर,अंजुम कांदे,गणेश धात्रक,तेज कवडे,पिंटू शिरसाठ मयूर बोरसे,किरण देवरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, March 9, 2022

नांदगाव नगरपरिषदतर्फे ८ मार्च जागतिक महिला दिवस उत्सवात साजरा



नांदगांव( प्रतिनिधी ) -  नांदगाव नगरपरिषद नांदगाव येथे दिनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मुख्याधिकारी तथा प्रशासक  विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मार्च जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यात महिलांसाठी माझी वसुंधरा या विषयावर आधारित काव्य वाचन स्पर्धा ,उखाणे स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा,इ.  स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यातून विजेत्या माहिला स्पर्धकाना नांदगाव नगरपरिषद मार्फत प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच माझी वसुंधरा व स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव या अभियानांची जनजागृती करण्यात येऊन माझी वसुंधरा अभियानातर्गत सर्व महिलांना  हरित शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमात महिला पोलीस कर्मचारी श्रीमती.रंजना शिंदे, श्रीमती मोनाली ठाकरे, श्रीमती संध्याराणी कोकाटे, आशा वर्कर नलिनी काकळीज, सामाजिक कार्यकर्त्या संगीता सोनवणे, माझी वसुंधरा अंतर्गत सर्वोत्कृष्ट परसबाग श्रीमती .शोभा कैलास मांडवडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट व्यवसाय बचत गट- सिद्धेश महिला बचत गट, उत्कृष्ट बचत गट- दुर्गा महिला बचत गट, माझी वसुंधरा अभियानातर्गत सक्रीय बचत गट म्हणून गंगेश्वर महिला बचत गट या बचत गटांना भेट वस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.त्याच प्रमाणे महिला सफाई कर्मचारी संगीता दादू गुढेकर, माया काशिनाथ भालेकर, वैशाली पवार, मालन भालेकर यांचा सत्कार करून गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती.डॉ.योगिता चव्हाण यांनी महिलांना आरोग्यदायी जीवन कसे जागावे या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती.विद्या कसबे यांनी महिला सुरक्षा व सबलीकरण या मुद्यावर उपस्थित नांदगाव शहरातील बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुक्ता कांदे-कुटे (प्रशासकीय अधिकारी), रोशनी मोरे (संगणक अभियंता ), राहुल कुटे (कर निरीक्षक ), विजया धनवट(समूह संघटक), बीजला गंगावणे (क्षत्रिय समन्वयक,माविम)  दिपक वाघमारे  इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.आनंद महिरे (सहा.प्रकल्प अधिकारी) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होणे कामी एकविरा,नांदेश्वरी,निलांबरी,सारनाथ,ज्ञानज्योती,निर्मिती,वैष्णवी इ वस्तीस्तर संघातील सदस्य व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Sunday, March 6, 2022

नांदगावतील साखळी उपोषणास वंचित बहुजन आघाडीचा जाहिर पाठींबा



नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगर परिषदमध्ये लाड- पागे कमिटीच्या शिफारशीनुसार मयत व सेवानिवृत्त रिक्त सफाई कामगार नियुक्ती देण्यात यावी यासाठी उपोषणात बसलेले वारसदार यांना जाहिर पाठिंबा वंचित बहुजन आघाडी नांदगाव शहर शाखेतर्फे देण्यात आला. या वारसदारांना नगर परिषद नांदगाव यांनी शासनाच्या परिपत्रकाच्या नगर विकास मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार , त्यांना नियुक्ती द्यावी, वारसांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. वारसाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी नांदगाव शहर जाहिर देण्यात आला. नगर परिषदेमध्ये जर या वारसांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला . 

Friday, March 4, 2022

नांदगाव मध्ये वारसांना पालिका सेवेत सामावून घेण्यासाठी छेडलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच


नांदगाव ( प्रतिनिधी ) -   नांदगाव येथे  मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना नांदगाव पालिका सेवेत सामावून घेण्यासाठी छेडण्यात आलेले उपोषण आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने त्रुटी विरहित कार्यवाही करण्याची हमी दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्याने गुरुवारी (दि. ३) दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.
     लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने मयत व सेवानिवृत्त रिक्त सफाई कामगार पदावर नियुक्ती मिळावी यासाठी बुधवारी बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नांदगाव नगरपरिषदेसमोर आंदोलनकर्ते आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये होत  चर्चा करण्यात आली . यावेळी नगरपालिका अधिकारी राहुल कुटे, गणेश पाटील, विजय कायस्थ यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून पालिका प्रशासन आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्यास तयार असल्याचे सांगितले . यापुर्वी  केलेल्या आंदोलनात आम्हाला असेच आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. मात्र, नसल्याचा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव दिले. आमची मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली व त्रुटी विरहित कार्यवाही करण्याची लेखी हमी देण्याची मागणी करण्यात आली. सक्षम अधिकाऱ्याकडून लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

Wednesday, March 2, 2022

नांदगावला वारस रिक्त सफाई कामगार या पदावर नियुक्ती मिळावी यासाठी जुन्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण


नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नांदगाव नगरपालिकेतील मयत व सेवानिवृत्त मागासवर्गीय सफाई कामगार यांचे वारसदार यांनी लाड -  पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने मयत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना रिक्त सफाई कामगार या पदावर नियुक्ती मिळावी यासाठी येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर बुधवार (दि.२) पासून कुटुंबीयांसह उपोषणाला बसले आहेत.
नांदगाव नगरपालिकेतील सेवानिवृत्त सफाई कर्मचारी तथा मृत कर्मचारी यांच्या वारसांनी वेळोवेळी वारसाहक्काने नोकरी मिळण्यासाठी उपोषणे केली असून याबाबत प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत असून या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी बुधवार (दि. २) पासून येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंबीयांसह साखळी उपोषणाला बसले आहेत. यावेळी संतोष गुप्ता, प्रदिप थोरात, गौतम जगताप, नाना जाधव, सखाराम चव्हाण आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
नांदगाव नगरपालिकेतील आस्थापना विभागातील मंजुर सफाई कामगार पदावर सन १९९१ मध्ये ११ व सन १९९५ मध्ये १० सफाई कामगार म्हणून कोर्ट सुलेनामा च्या आधारावर कायम नियुक्ती देण्यात आली असता त्यांना स्थायी निर्देश लागू करण्यात आले होते. या सर्वांनी पंचवीस ते तीस वर्ष सेवेत कार्यरत राहून सेवानिवृत्त झाले तर काही मयत झाले त्यांच्या वारसांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे विनंत्या, अर्ज करून नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले असता केवळ दोन जणांना नोकरीत सामावून घेतले तर इतरांना केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. 
वारसा हक्काने नियुक्ती मिळत नसल्याने न.पा. प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी २५ जून २०१९ रोजी नांदगाव नगरपरिषद समोर आमरण उपोषण केले. त्यानंतर १४ ऑगस्ट २०१९ जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे सामुदायिक आमरण उपोषण केले. पुन्हा १३ ऑगस्ट २०२० रोजी जुने तहसील कार्यालय नांदगाव या ठिकाणी उपोषण करण्यात आले. अनेक वेळा मुख्याधिकारी नांदगाव तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यालय नपा शाखा यांनी वेळोवेळी आयुक्त तथा संचालक यांचे कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळताच नियुक्ती देऊ असे खोटे आश्वासन देऊन आम्हाला वारसा हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. कोरोना महामारी मध्ये सुद्धा हाताला रोजगार नाही. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने आम्हा वारसदारांवर उपासमारीची वेळ आली असून आमच्यावर दया करावी व नगरपालिकेच्या सफाई कामगार पदावर वारसाहक्काने नियुक्ती देण्यात यावी जेणेकरून आमच्या कुटुंबाची उपासमार थांबू शकेल असे उपोषनार्थींनी मुख्याधिकारी नांदगाव नगरपरिषद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बापू भालेकर, शालूबाई भालेकर, अर्चना भालेकर, ज्योती भालेकर, शितल भालेकर, रणजीत अहिरे, दिपाली अहिरे, विनोद आहिरे, पोपट ससाने,  सचिन गुढेकर, दिगंबर गुढेकर आदींच्या सह्या आहेत.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमरण उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा लक्ष्मी नगर (वाडी) व मांडवड येथे जाहीर सत्कार



 नांदगाव  ( प्रतिनिधी) -  मराठा समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते त्या उपोषणात सक्रिय सहभागी होऊन नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर व मनमाड येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ मराठा महासंघाचे पदाधिकारी आमरण उपोषणास बसले होते. 
मराठा समाज आज अनेक समस्यांनी ग्रस्त झाला आहे मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिवसागणिक खालावत चालली आहे अशातच मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने त्यात आणखीन भर पडली आहे आरक्षण केव्हा मिळेल याची आज शाश्वती नाही,मराठा समाजाला यातून थोडाफार आधार मिळावा म्हणून युवराज  संभाजी राजांनी एकूण 15 मागण्या गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे मांडून त्याचा पाठपुरावा सातत्याने करत होते परंतु महाराष्ट्र शासनाने प्रतिसाद न दिल्याने शेवटी राजेंना आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला या आंदोलनात मनमाड व नांदगाव च्या मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आमरण उपोषण सुरू केले होते आंदोलनाची दहाकता बघून शासनाने अखेर तिसऱ्या दिवशी राज्यांच्या सर्व एकूण 15 मागण्या पूर्ण केल्याचे लेखी पत्र दिले आहे आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनमाड व नांदगाव च्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली प्रयत्नांची पराकाष्टा करीत आंदोलन यशस्वी केले म्हणून लक्ष्मी नगर (वाडी) गावचे थेट सरपंच बापूसाहेब जाधव,महेंद्र लोखंडे व ग्रामस्थांनी महासंघाचे नाशिक जिल्हा उपप्रमुख भास्कर झाल्टे,नांदगाव तालुका प्रमुख भिमराज लोखंडे, ता.उपाध्यक्ष विशाल वडघुले,उपाध्यक्ष डॉ. विनोद डमरे,मनमाड शहर प्रमुख विष्णु चव्हाण, मनमाड शहर उपाध्यक्ष नानासाहेब घुमरे,व शिवभक्त सौ.संगिताताई सोनवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ता.अध्यक्ष निलेश चव्हाण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
     तसेच मांडवड गावाचे शिवबा ग्रुपचे अध्यक्ष श्री अशोकभाऊ  निकम यांनी मांडवड येथे आमरण उपोषण कार्यात युवराज संभाजी राजे छत्रपती यांना साथ देणारे मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार केला यावेळी आमरण उपोषण कर्त्यांनी आपल्या मनोगतात मांडताना सांगितले की या ठिकाणी येऊन मराठा महासंघाची भूमिका मांडता यावी यामुळे हा सत्कार आम्ही स्वीकारला आहे यावेळी लक्ष्मीनगर चे थेट सरपंच बापूसाहेब जाधव, शिवबा ग्रुपचे अध्यक्ष अशोकभाऊ निकम ,महेंद्र लोखंडे, आर्मी मॅन साहेबराव जाधव,इंजिनिअर सागर आहेर,संदिप आहेर,शंकर आहेर,भास्कर आहेर व इतर बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...