Monday, February 28, 2022

नांदगाव तालुक्यातील विजय बडोदे यांना सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे गौरव पुरस्कार

     


नांदगाव (प्रतिनिधी) -  नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका येथील सर्पमित्र विजय बडोदे यांना वन्यजीव पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्था पुणे यांच्या तर्फे 20 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे नटसम्राट निळूभाऊफुले नाट्यगृहात सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नांदगाव तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीवांच्या मदतीला धावून जाणारे लोकांच्या मनातील सापाबद्दल भीती व अंधश्रद्धा हे परिसरातील शाळेतील व गावोगावी सर्प जनजागृती व सापांची भीती दूर केली . सर्पदंश झालेले लोकांना वेळेवर उपचारासाठी हॉस्पिटल पोहोचवले आणि जखमी साप मुंगूस पशु पक्षी राष्ट्रीय पक्षी मोर विहिरीत पडलेल्या रानमांजर कोल्हा उदमांजर आणि साप अशे वन्यजीव वाचवण्यात मोलाची भूमिका घेतली,  या कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बरेच वर्ष पासून सर्पमित्र विजय बडोदे हे सामान्य जनतेत साप व गैरसमज या विषय वर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे पुरस्काराने गौरविण्यात आले . सर्पमित्र यांचे मोलाचे कार्य बघता  प्रत्येक जिल्ह्यात जाऊन भेट देणार असे सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांनी सांगितले.  या वेळी प्रमुख उपस्तिथी  वन्यजीव पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्था चे अध्यक्ष सुरेखा बडदे , सचिव विनायक बडदे , सर्प अभ्यासक अनिल खैरे , देवदत्त शेळके , मानद वनरक्षक आदित्य परांजपे , अति आयुक्त उल्हास जगताप , दादासाहेब नरळे,  अति आयुक्त जितेंद्र वाघ , अग्निशामक प्रमुख किरण गावंडे , अनिल राऊत पाणीपुरवठा प्रमुख प्रवीण लडकत उपस्थित होते .

Saturday, February 26, 2022

नांदगाव शहरातील शिवस्फुर्ती मैदानावर विविध मागण्यासाठी मराठा समाजाचे उपोषण



नांदगाव (प्रतिनिधी)-  नांदगाव मध्ये मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्याकरिता खा. संभाजी राजे छ्त्रपती यांच्या मुंबईत सुरु केलेल्या उपोषणाला  पाठिंबा दर्शवविण्यासाठी नांदगावतही अखिल भारतीय मराठा संघ, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतिने ईथील शिवस्फुर्ती मैदानावर उपोषण सुरु करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण ,  अण्णासाहेब महामंडळातर्फे मिळणारे कर्जाची रक्कम वाढवून मिळावी, मराठा समाजाच्या विद्यार्थीसाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह सुरु करणे, आदोलक तरुणावरील गुन्हे मागे घेण्यात याव्यात आदी मागण्याकरिता ईथे उपोषणास बसले आहे. यावेळी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही , यापुढे तीव्र स्वरुपाचा आदोलन करण्यात येईल ईशारा देण्यात आला. यावेळी निवेदनावर शिवाजीराव जाधव, विशाल वडघुले, संगिता सोनवणे, निलेश चव्हाण, ज्ञानेश्वर गरुड, गोरख आहेर, देविदास देवरे, प्रमोद पगारे,  जगदीश झाल्टे, नाना पवार, महेंद्र झाल्टे यांच्या सह्या होत्या.

Saturday, February 19, 2022

मांडवडच्या जनता विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी


नांदगाव  ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय मांडवड हायस्कुल  मध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे शालेय स्कूल कमिटी कमिटी अध्यक्ष माधव दादा काजळे होते.
       व्यासपीठावर गावातील ज्येष्ठ नेते विठ्ठलआबा आहेर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर आहेर मुख्याध्यापक खैरे.आर.जी. स्कूल कमिटी सदस्य अशोकभाऊ निकम,वाल्मिक थेटे,दत्तात्रय थेटे, महेश मोहिते,विजय आहेर,सोमनाथ नाझरकर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा शिक्षक संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाने  प्रतिकारात्मक अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराजांची लेझीम पथकाद्वारे गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.  शालेय विद्यार्थ्यांनी पोवाडा,शिवभक्ती गीते, भाषणे सादर केली.
     मुख्याध्यापक खैरे आर.जी. यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार असून त्यांचे कुठल्याही धर्माविषयी युद्ध नसून अन्यायाविरुद्ध लढणारे युगपुरुष होते. आज चार शतकानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल सर्वांना प्रेरणा देणार आहे, असे विचार मांडले.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी गौरवी चव्हाण व वर्षा निकम यांनी केले तर आभार उपशिक्षक हेमंत परदेशी यांनी मानले.  कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

नांदगाव शहरातील कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालयात शिवजयंती साजरी

       शिवरायांचे भूमिकेत विद्यार्थी शिवाय पेवाल 

नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील कमलाबाई माणिकचंद कासलीवाल  माध्यमिक विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी छोट्या बालगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. तसेच विद्यालयाच्या प्रांगणात जय भवानी, जय शिवाजी ,जय जिजाऊ अशा घोषणांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांचा व उपस्थित पालकांचा उत्साह अवर्णनीय होता .उपस्थित पालकांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . इयत्ता पाचवीचे विद्यार्थी हेमंत शिंदे, तनवी दळवे, कावेरी जगधने, साक्षी बाविस्कर व आरुषी आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन सुनील कुमार कासलीवाल , सेक्रेटरी विजय चोपडा सर, गुप्ता सर  संस्थेचे सर्व पदाधिकारी व मुख्याध्यापक  गोरख डफळ सर यांनी शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

नांदगावमध्ये मराठा समाजाचे आमरण उपोषण व अन्नत्याग आदोलनाचा ईशारा



नांदगाव( प्रतिनिधी) -  मराठा समाजाच्या  प्रलंबित मागण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत. 
युवराज संभाजीराजे सोबत या लढ्यात सहभागी होण्याकरीता दि .२६ फेब्रु. रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी व कुटुंबातील सर्व सदस्य  नांदगाव येथील शिवस्फुर्ती मैदानात  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसणार असुन अन्नत्याग आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
    महाराष्ट्राचे आराध्य दैवत लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज  यांच्या वंशजास आर्थिक व शैक्षणिक मागास मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण  करण्याची वेळ या महाराष्ट्र शासनाने आणल्या मुळे महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध या वेळी  नोंदवण्यात आला. या बाबतचे निवेदन तहसीलदार नांदगाव यांना देण्यात आले. निवेदनावर शिवभक्त संगिताताई सोनवणे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष  विशाल वडघुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण व  राकेश चव्हाण यांच्या सह्या होत्या.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...