Wednesday, January 31, 2024

राहुरी येथील घटनेचा नांदगाव न्यायालयचे कामकाज बंद करून केला निषेध, आरोपींवर कारवाई करावी वकील संघाकडून नांदगाव नायब तहसीलदारांना निवेदन,




नांदगाव ( प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील राजाराम जयवंत आढाव , मनिषा राजाराम आढाव यांची निर्घुणपणे हत्या करुन विहिरीत फेकण्यात आले. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ नांदगाव न्यायालयातील कामकाज बंद करुन निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अश्या प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी नांदगाव न्यायालय ते नविन तहसीलदार कार्यालयापर्यंत व वकील संरक्षण कायद्या पारीत लवकरात लवकर करुन वकीलांना न्याय मिळाला अशी मागणी नांदगाव नायब तहसीलदार चेतन कुणकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नांदगांव येथील समस्त वकील संघाकडून निषेध नोंदवला होता. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव , उपाध्यक्ष उमेशकुमार सरोदे, सचिव शेखर पाटील, खजिनदार
सुशिलकुमार जाधव, तसेच माजी अध्यक्ष वसंतप आहेर , राजेंद्र दराडे, अँड.बी.आर.चौधरी,
जी.एस.सुरसे, एफ.सी.सोनवणे,ए.के.शिंदे,
पोपटराव घुगे, युनूस शेख, बी.बी.बिन्नर,
अॅड. विजयकुमार रिंढे, महेश पाटील, प्रमोद दौड, पी.एस.पवार, एस.एम.वाळेकर,
एस.जे.घुगे, तुकाराम राठोड, सचिन
साळवे, अमोल आहेर, मनिषा त्रिभुवन, 
वंदना पाटील, अनोबर पठाण, दिगंबर आहेर,
रंजन आहेर, व इतर वकील बंधु यावेळी उपस्थित होते.

Sunday, January 28, 2024

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नांदगाव शाखा अध्यक्षपदी प्रा. सुरेश नारायणे यांची एकमताने बिनविरोध निवड,





नांदगांव ( प्रतिनिधी) - नुकतीच नांदगांव महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मृलन समितीचीची बैठक घेऊन त्यात कार्यकारणी जाहीर करण्यात असून, अध्यक्षपदी प्रा. सुरेश नारायणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीत वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. काल रविवारी दि. २८ जानेवारी रोजी दुपारी येथील रिपाई (ए) जन संपर्क कार्यालय येथे महा. अनिस नांदगाव शाखा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत नविन संकल्पनावर चर्चा करुन शहरात अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावर अधिक भर घालुन विविध ठिकाणी जन जागृती करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले . तसेच तरुण पिढीने स्व:ताहुन पुढे येऊन सहभागी झाल्याने संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक मारुती जगधने, प्रा सुरेश नारायणे यांनी सर्वांचे स्वागत केले.
    महा. अनिस च्या नांदगाव शाखेच्या २३ पदांपैकी इतर १३ महत्वाच्या पदावर - वामन पोतदार,संदीप जेजुरकर, भास्कर बागुल, मनोज चोपडे, संजय कांदळकर,किरण भालेकर, राजेंद्र गुढेकर,गणेश शर्मा ,गोरख जाधव, प्रदीप थोरात, बाबासाहेब कदम,कृष्णा थोरे, मोहसीन बेग, यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून राजेंद्र जाधव, अभिषेक इघे,गणेश जाधव,संजय जाधव,मनोज जाधव,राजेंद्र वाघ, यांच्या नावाची सन २४-२०२५ च्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. मार्गदर्शक प्रा. सुरेश नारायणे,डॉ. सुनिल तुसे ,देवीदास मोरे ,मारुती जगधने ,भाऊसाहेब साठे ,वामन पोतदार यांची निवड झाली . दरम्यान बैठकीत दि. १७फेब्रुवारी २०२४ला जळगाव "बु" येथे चमत्कार दिन साजरा करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.
 नांदगांव महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मृलन समितीची निवड झालेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे :- 
अध्यक्ष: प्रा सुरेश नारायणे यांची सलग तिसऱ्यांदा तर उपाध्यक्ष: देवीदास मोरे (शहर) यांची दुसर्यांदा व उपाध्यक्ष: भगीरथ जेजूरकर (ग्रामीण )यांची दुसर्यांदा निवड झाली .
कार्याअध्यक्ष: प्रभाकर निकुंभ सर्पमित्र, 
प्रधानसचिव: प्रज्ञानंद जाधव पत्रकार,
महिला सहभाग विभाग :अँड विद्याताई कसबे ,
बुवाबाजी संघर्ष कार्यवाह विभाग: मंगेश आहेर ,
मानसिक आरोग्य :डॉ हर्षद तुसे ,
कायदेविषयक :अँड सचिन साळवे 
असे एकुण २३ पदांची नियुक्ती या बैठकीत सर्वांच्या मते निवडण्यात आली . कार्याकारणीत
या बैठकीत सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील विवेक विचारांचे जेष्ठ ,तरुण या सर्वांनी चिकाटीने सोबत मिळुन काम करु असा निर्धार केला 
यावेळी बैठकीला पत्रकार,डॉक्टर,वकील, सर्पमित्र, शिक्षक, तसेच समाजिक क्षेत्रातील, विवेक विचारांचे मान्यवर उपस्थित होते.

नांदगाव मध्ये संविधान सन्मान मेळावा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत संपन्न,






नांदगाव ( प्रतिनिधी ) - संविधान सन्मान मेळावा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत नांदगाव येथे संपन्न झाले.भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकच्या नांदगाव मध्ये " जागर लोकशाहीचा, गौरव संविधानाचा " संविधान सन्मान मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वेळी संविधान चौक येथील भारतीय राज्य घटनेची प्रस्तावना असलेल्या कोणशीला स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात मान्यवरांचे ढोलताशेंच्या गजरात स्वागत करण्यासाठी कांग्रेसचे शहराध्यक्ष चोपडे यांच्यासह बहुजन समाजबांधव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे व नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे यांच्या हस्ते सामाजिक,क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले . पत्रकार बांधवांना सन्मानाने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 
    यावेळी बहुजन समाज बांधवांना समाजिक न्याय मंत्री हंडोरे यांनी संविधानाचे महत्व पटवून सांगितले . तसेच मनोज चोपडे यांना सर्व धर्म समभाव हा पध्दतीने सर्वांना एकत्रित करून आपलं कार्य कायमस्वरूपी चालुच ठेवावे असे मार्गदर्शन केले . भारताचे संविधान हा दीप स्तंभ हजारो वर्ष उर्जा सर्व भातीयांना देत राहो असे जनतेला सांगितले. यावेळी शहरातील महिला वर्ग बहुजन समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Thursday, January 25, 2024

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे संस्कारपीठ - प्रा.सुरेश नारायणे






मांडवड (प्रतिनिधी) - शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने २४ सप्टेंबर १९६९ ला त्या काळचे शिक्षणमंत्री डॉ.व्ही.के.आर.व्ही. राव यांनी म.गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम सुरू केला. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यांना श्रमाचे आणि कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सुरु झालेला उपक्रम आज भारतभर ३२लाख. स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना हे एक विद्यार्थ्यांचे संस्कारपीठ बनले आहे. असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी केले. ते मांडवड येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिररात "राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व " या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.पी.मोरे होते. पाहुण्याचा परिचय व प्रास्ताविक सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.श्रीमती के.टी.बागुल यांनी केले. सुरवातीला स्वयंसेविका नम्रता फोडसे हिने राज्यस्तरावरील एन.एस.एस.चे शिबिरातील आलेले अनुभव व आत्मविकास कसा झाला याचे कथन केले. या शिबिरात शंभर स्वयंसेवकांचा सहभाग आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास आणि लोकसंख्या नियंत्रण जागृती व श्रमदानद्वारे शोषखड्डे,वृक्षांना आळे करणे, व समाजप्रबोधन या शिबीरकाळात केले जाणार आहे असे प्रतिपादन यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. बी.पी. मोरे  यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म.वि.प्र. संस्थेचे  सरचिटणीस ॳॅड.नितीन ठाकरे, नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील,प्राचार्य  डॉ. एस.एन.शिंदे, उपप्राचार्य प्रा.डाॅ.संजय मराठे,सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.पी.गायकवाड, प्रा.श्रीमती पी.एच.जाधव,प्रा.श्रीमती, के.टी.बागुल,स्व.श.आ.ज.वि.मांडवडच्या मुख्याध्यापक श्रीमती संजीवनी कांबळे, सरपंच अ़कुश हरी डोळे, उपसरपंच सौ.जीजाबाई विठ्ठल आहेर ग्रामसेवक मयुर आहेर व स्वयंसेवक, विलास आहेर, नितीन सरोदे,शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

वादग्रस्त पोस्टच्या निषेधार्थ नांदगाव शहर बंदला प्रतिसाद,





नांदगाव ( प्रतिनिधी) - राम मंदिर स्थापनेनंतर सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावतील अशी वादग्रस्त पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम नांदगाव शहरातील काही समाजकंटक हेतू पुरस्कृत करत आहेत . अशांना वेळीच आवर घालावा व असे कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवकन्या संगिता सोनवणे सह सकल हिंदू समाजच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या कडे करण्यात आली. नांदगाव शहर बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नांदगाव च्या जनतेने पाठिंबा दिला असुन, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी तात्काळ नांदगाव येथे भेट देऊन हिंदू समाजाच्या भावना जाणून घेतल्या. कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले .नांदगाव शहरात काही समाजकंटक असे कृत्य घडवत आहेत त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असेही अनिकेत भारती यांनी सांगितले, सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव शहरांतून मोर्चा देखील काढण्यात आला होता.दुपारी तीन वाजेला निवेदन देऊन पोलिस अधीक्षक अनिकेत भारती सह एकत्रितपणे पणे चहा पाणी घेऊन व्यवहार सुरळीत करण्याचे आव्हान करण्यात आले
    अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी हिंदू समाजाच्या भावना जाणून घेतल्या व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, सकाळी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. नांदगाव शहर शांतताप्रिय असून, दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, नांदगाव शहरासह ग्रामीण भागातील सात संशयितांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतील असा समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखविण्याच्या हेतूने प्रसारित केले म्हणून याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, संशयितांना अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक बहाकर तपास करत आहेत.

Saturday, January 20, 2024

नांदगाव येथे भाजपतर्फे महिला सशक्तीकरण व सबलीकरण सम्मेलन




नांदगाव ( प्रतिनिधी
) - केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी दिलेल्या योजनांचा फायदा नागरीकांना व्हावा म्हणुन दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहयमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथे नेत्यांची बैठक घेऊन ठणकावून सांगितले. या सुचनेचे तत्काळ पालन करुन नांदगांव येथे भव्य ' महिला सबलीकरण सम्मेलन ' चे अयोजन भारतीय जनता पार्टी नांदगाव शहर, निमगाव मंडल आणि भाजपा नांदगांव तालुका तर्फे करण्यात आले. सदर कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा फायदा तळा गळातील, गोर गरीब, गरजू होतकरू महिलांना कसा मिळेल आणि या कल्याणकारी योजनांचा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास, सक्षम बनण्यास कशा प्रकारे मदत देणारे आहेत. या बद्दल महिलांना सांगण्यात आले. 
             सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन केंद्रिय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, भाजपा माजी प्रदेश उपाध्यक्षा ॲड. जयश्रीताई दौंड, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, विधानसभा प्रचार प्रमुख पंकज खताळ होते . तसेच त्यांचा समवेत व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक तालुका अध्यक्ष गणेश शिंदे(उत्तर), मनिषा काकड(दक्षिण), शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, शिवाजी कराडे(निमगाव मंडल), महिला मोर्चा अध्यक्षा छाया बोरसे(उत्तर), सुवर्णा आहेर(दक्षिण), मिनाक्षी हिरे(निमगाव मंडल), माजी नगरसेवक व माजी शहर अध्यक्ष राजीव धामणे, अन्नपुर्णा जोशी(म. मोर्चा शहर अध्यक्षा), तारा शर्मा(उपशहर अध्यक्षा), अक्षदा कुलकर्णी, ॲड. मनिषा पाटील, ताराबाई सोनवणे(सकोरा माजी सरपंच), चंदा पाटणी आदी होते.
          मंत्री भारतीताई पवार आणि विजुभाऊ चौधरी यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच सर्व उपस्थित महिलांनी त्यांचे उभे राहुन स्वागत केले. ना. पवार कार्यक्रमा ठिकाणी उशीरा येऊन सुध्दा महिला त्यांची वाट बघत होत्या.सदर कार्यक्रमात ना. भारतीताई पवार यांनी नविन तंत्रज्ञानाचा वापर महिलांना रोजगार निर्मिती साठी कसा करता येईल हे उदाहरणे देऊन समजावुन सांगितले. तसेच विजयजी चौधरी यांनी महिलांना स्वावलंबी होण्याचे मार्ग सांगितले व सरकार आपल्या कोणत्याही अडचणीत आपली मदत करेल याचे आश्वासन दिले. तद नंतर शंकरराव वाघ आणि ॲड. दौंड यांनी देखील उपस्थितीत महिलांना मार्गदर्शन केले.
           कार्यक्रमाला राजेंद्र पवार(वरिष्ठ प्रशिक्षक महा.बँक), संजय सोमवंशी(उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र), रविराज बेलेकर असे व्यवहार, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ पदाधिकारी व यशस्वी महिला उद्योजिका मनिषा इंगळे, आशा कदम, अर्चना आढाव आदी उद्योजिका यांनी महिलांना मार्गदर्शन केले आणि उद्योगासाठी प्रेरीत केले. नंतर उपस्थित महिलांना हळदी-कुंकू लाऊन आणि तीळ गुळ वाटुन त्यांना ना. पवार यांच्या हस्ते वान देण्यात आले.
           खासदार डॉ.भारती पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केल्या नंतर स्वतः हाताने कमळाचे चित्र काढून भाजपा च्या दिवार लेखनाचा कार्यक्रम व हनुमान टेकडी येथील संत जनार्दन महाराज मंदीर येथे स्वच्छ्ता करीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेल्या मंदिर स्वच्छतेचा कार्यक्रमही राबविला. सदर मंदिर स्वच्छतेच्या कार्यक्रमात ना. पवार, विजयजी चौधरी यांच्या समवेत शंकरराव वाघ, ॲड. दौंड, संजय सानप, पंकज खताळ, गणेश शिंदे, मनिषा काकड, राजाभाऊ बनकर, राजीव धामणे, सोमनाथ घोंगाणे आदी कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
              सदर कार्यक्रमास सतिष शिंदे, मनोज शर्मा, भगवान सोनवणे, संदिप पगार, प्रशांत इनामदार, भगवान व्हाडगर, फिरोज खाटीक, बबन मोरे, सतिष आहीरे, अण्णा काळे, दिनेश दिंडे, धम्मवेदी बनकर, दत्तु शेलार, अरुण पवार, हिरा सानप, डॉ. कारभारी आहेर, प्रविण पवार, वंश पटाईत आदी कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत काकड सर आणि राजेंद्र गांगुर्डे सर यांनी केले.

Friday, January 19, 2024

साकोरा येथे "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानाअंतर्गत शाळेस सौ. अंजुम कांदे यांची भेट,




नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात आयोजित ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन  म. वि. प्र. संस्थेच्या नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील यांनी केले.  विज्ञान प्रदर्शन हे विध्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे असून शिक्षकांनी त्यांच्यातील कल्पनाशक्ती व संशोधक वृत्तीला चालना देऊन भविष्यातील संशोधक तयार करावेत असे आवाहन केले . प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी संदीप दळवी होते. प्रास्ताविक विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष संजय बच्छाव यांनी केले.
     याप्रसंगी अमित बोरसे यांनी बोलताना सांगितले की, मानवी जीवनाचा संबंध हा विज्ञानाशी आला आहे. आजचे विज्ञान प्रदर्शन हे महान शास्त्रज्ञांना आदरांजली ठरेल. अब्दुल कलाम हे अतिशय गरीब परिस्थितीतून आले आहेत. देशासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. आई वडिलांनी विद्यार्थीच्या कला गुणांना वाव दिला पाहिजे. तालुक्यातील सर्व संस्थांनी एकत्र येवून विद्यार्थ्यांना एक वेगळे व्यासपीठ उभे करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
       व्यासपीठावर गटविकास अधिकारी संदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, पोलीस उपनिरीक्षक खडांगळे, पत्रकार अनिल आव्हाड, संजय मोरे, विस्तार अधिकारी नंदा ठोके, न. पा. प्रशासन अधिकारी प्रशासन अधिकारी एन. एम. चंद्रमोरे, जिल्हा विज्ञान अध्यापक संघ कार्यवाहक अरुण पवार, स्कूल कमिटी अध्यक्ष दिलीप देवचंद पाटील, विजय काकळीज, राजाराम गवांदे, मुख्याध्यापक डी. व्ही. गोटे, मुख्याध्यापक
मुख्याध्यापक वाय . चव्हाण, मुख्याध्यापिका जे. आर. काळे, मुख्याध्यापिका एस. एस. कांबळे, मुख्याध्यापक योगेश पाटील, जी. ए. वैद्य, पी. एन. खुटे, आयोजक अविनाश शेवाळे, सी. डी. अहिरे, उमेश पाटील, निलेश इप्पर, सुनील कोठावदे, भाऊसाहेब सोनवणे, अजित पगार, आत्माराम बोरसे, बाबूलाल ठोंबरे, प्रवीण ठोंबरेसह आदीची उपस्थिती होती. 

Thursday, January 18, 2024

नांदगाव आगाराचे इंधन बचत मासिक कार्यक्रमाची सुरुवात,






नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय इंधन बचत कार्यक्रम नांदगाव येथे दि.१६ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या मासिक काळात इंधन बचत कार्यक्रमाचे उदघाटन नुकतेच नांदगाव  डेपो आगारात पार पडले. यावेळी मालेगावचे आर.टी.ओ. भरत भवाळ  यांच्या हस्ते इंधन  बचत मासिक कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव आगाराचे डेपो मॅनेजर हेमंत पगार होते . तर प्रमुख अतिथी प्रा. सुरेश नारायणे होते. आर.टी.ओ.भरत भवाळ म्हणाले की, इंधन बचत करणे काळाची गरज आहे. त्यासाठी महामंडळाच्या बस ड्रायव्हर यांनी काही तांत्रिक बाबी लक्षात घेऊन इंधन बचत कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करावे.  
गॅस टँकचं झाकण घट्ट लावलेलं नसेल, तरीही तुमची गाडी अपेक्षित मायलेज देणार नाही. गॅस टँकचं झाकण घट्ट लावलं नसेल, तर गाडीतला गॅस लीक होऊ शकतो. याचसाठी गॅस टँकचं झाकण घट्ट लावल्याची खात्री करून घ्या.
गाडी कुठल्याही कारणानं जागीच उभी असेल, तर ती बंद ठेवा. चालू ठेवू नका. त्यामुळेही इंधनाची बचत होईल.
   कारच्या अॅक्सलरेटर पॅडेलवर सातत्यानं पण हळूहळू दाब द्या. कारची गती सावकाश वाढवा. विशिष्ट वेगमर्यादेतच गाडी चालवा. त्यामुळे इंधन बचत होईल.तसेच त्यांनी बस कर्मचारी वर्गाशी  हितगुज केले.तर हल्ली पेट्रोल, डिझेल, आणि गॅसचा साठा  मर्यादित होत चालला आहे. पारंपरिक इंधन संपत्तीचा साठा कमी होत असल्याने सामान्य जनतेने वाहानांचा वापर आवश्यक तेव्हाच करावा. व जनतेने इंधन बचतीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन इंधन बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आठ दिवसांतून एक दिवस वाहनांचा वापर बंद केल्यास इंधन बचतीसाठी नक्कीच हातभार लागेल असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी मनोगतातून व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतातून डेपो मॅनेजर हेमंत पगार यांनी इंधन बचतीसाठी नांदगाव एस.टी.डेपोचे सर्वच कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असतात. मागील काही महिन्यात नांदगाव आगराने इंधन बचत करून नांदगाव आगार नाशिक विभागातुन नफ्यात अव्वलस्थानी असल्याचे सांगितले 
.त्याबद्दल नांदगाव आगारातील सर्व कर्मचारी वर्गाचे  त्यांनी कौतुक केले. यावेळी आगार व्यवस्थापक ए.डब्लु.एस. सानप, अरुण इप्पर, डी.पी.जगधने, डी.एम.भाबड,वाहन परीक्षक  राजु कटारे, मयुर सुर्यवंशी, विनोद इप्पर तसेच डेपोतील सर्व मॅकिनिक कर्मचारी, सर्व बस वाहक,चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tuesday, January 16, 2024

सेवक सहकारी सोसायटीच्या सभासदांच्या वारसास १५ लाखांचा विमा चेकमार्फत कुटुंबास सुपुर्द , तर संस्थेतर्फे पंचवीस हजार रुपये मदतनिधी,





नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन सेवक सहकारी सोसायटीच्या सभासदांसाठी दरवर्षी नफ्यातून रुपये १५ लाखांचा अपघाती विमा काढला जातो. मनमाड ते नांदगाव महामार्गाने प्रवास करत असताना माध्यमिक विद्यालय पांझनदेव (ता.नांदगाव) येथील उपशिक्षक कै.प्रशांत माणिक ठाकरे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारस पत्नी श्वेता प्रशांत ठाकरे तसेच त्यांची मुलगी धनश्री प्रशांत ठाकरे,शालक शरद आहिरे व त्यांचे सहकारी शिक्षक अनिल गोरे यांना रु.१५ लाखांचा विमा चेक व संस्थेमार्फत २५ हजार रुपये मदतनिधीचा चेक देण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रमोद चव्हाण,व्हा.चेअरमन प्रियंका पाटील, संचालक जिभाऊ खताळ,महेंद्र जाधव,अशोक मार्कंड,संजय पवार,संतोष इप्पर व कर्मचारी शरद देशमुख आणि शुभम सोनेज उपस्थित होते.
नांदगाव तालुक्यातील ही माध्यमिक सेवकांची पतसंस्था दरवर्षी संस्थेच्या नफ्यातून सभासदांसाठी अपघाती विमा काढत असते. त्यामुळे अपघातात निधन झालेल्या सभासदास आर्थिक मदत होते. यंदाच्या वर्षासाठीही संस्थेने रु.१५ लाखांचा अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे,असे चेअरमन प्रमोद चव्हाण यांनी सांगितले. या निर्णयाचे सर्व संचालक मंडळ आणि सभासदांनी स्वागत केले.

न्यायडोंगरी येथील विविध मागण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ भारती पवार यांच्याकडे निवेदन सादर,




न्यायडोंगरी (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावाच्या बरोबर मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची अप डाऊन मुंबई -  भुसावळ   या रेल्वे मार्गावरील तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम जोरात सुरू झालं आहे.  ‌ न्यायडोंगरी गावाच्या पूर्व भागाकडे असणारा गावाचा अर्धा भाग त्याचबरोबर हिंगणे देहेरे , पिप्रीहवेली , परधडी, पिंपळगाव ,राजदेहरे ,ढेकू, जातेगाव ,बोलठाण ,या गावांचा न्यायडोंगरी च्या पश्चिम भागाशी संबंध तुटला असून , पुलाच्या कामामुळे मराठवाडा व खान्देश ला जोडणारी वाहतूक पूर्णतःबंद झाली आहे .रेल्वेचे सबंधित अधिकारी व काम करणारे ठेकेदार यांनी लोकांना वापरण्यासाठी तात्पुरती का होईना पर्यायी व्यवस्था करून न दिल्याने मोठ्ठा पेच निर्माण झाला.  त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व गावातील गावकऱ्यांनी माजी आमदार अनिल दादा आहेर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कुटुंब कल्याण व आदिवासी विकास मंत्री भारतीताई पवार यांची नाशिकच्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली .  या समस्या मार्गी लावणे कामे आग्रह धरला असता , भारतीताई यांनी लागलीच दखल घेत सबंधित अधिकारी यांची कानउघाडणी करीत पर्यायी नव्हे तर  कायम स्वरुपी व्यवस्था करण्याचे आदेश दिल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
                   यावेळी रस्त्याच्या मागणी बरोबरच धुळे ते मुंबई या प्रवासी रेल्वे गाडीस  न्यायडोंगरी  स्थानकावर थांबा मिळावा यासाठी ही निवेदन देण्यात आले . यावेळी आग्रह धरण्यात आला असता लवकरच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री भारतीताई पवार यांनी शिष्टमंडळास दिले . यावेळी नांदगाव तालुक्यातील विविध समस्या व विकास कामाच्या संदर्भात अनिल दादा आहेर यांचेशी चर्चा करण्यात आली . नांदगाव मतदार संघाने मला दिलेले मताधिक्य माझ्या स्मरणात असून त्याची उतराई होण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याने तुम्ही मला सार्वजनिक कामासाठी विनंती न करता आदेश द्या असा आदरभाव या वेळी भारतीताई पवार यांनी व्यक्त केला. न्यायडोंगरी गावात उभारण्यात आलेल्या विविध लोकऊपयोगी वास्तुंसाठी संरक्षक भिंत बांधने कामी निधी देण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले आहे. या शिष्टमंडळात मा. आमदार अनिल दादा आहेर ,  जेष्ठ पत्रकार जगनाथ आहेर,माजी सभापती राजेंद्र आहेर , उपसरपंच अमोल आहेर ,शिवाजी बच्छावं, अनिल वाघ, नवनाथ बोरसे ,जिभाऊ पवार , तात्या राठोड , सोमनाथ पवार , भैय्या आहेर,धनंजय आहेर, निंबा आहेर, गणेश आहेर, गुड्डू शेख यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Friday, January 12, 2024

नांदगावच्या कन्या विद्यालयात फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचतर्फे आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम,




नांदगाव (प्रतिनिधी ) - महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह देशातील नव्हे तर जगातील प्रत्येक महापुरुषांच्या यशामागे त्यांच्या आईचे योगदान आहे.  आजच्या स्त्रीने देखील भविष्यात याच महिलांच्या आदर्श घेऊन मार्गस्थ व्हावे. देशाचं भविष्य त्यांच्याच हातात असल्याचे मत सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक शाहिद अख्तर यांनी व्यक्त केले. फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच ही उर्दू शाळा असली तरी सर्वच महापुरुषांच्या जयंती आम्ही साजरा करत असतो असेही त्यांनी सांगितले. यावेळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी,शिवकन्या संगीता सोनवणे , आशाबाई काकाळीज,  शिक्षण मंडळ अधिकारी गणेश पाटील,रिपाई नेते कपिल तेलुरे,फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच कार्याध्यक्ष फिरोज शेख,काजीसेवासंघ जिल्हाध्यक्ष वसीम काजी,  मनसे मनमाड शहरउपाध्यक्ष जाकिर पठाण,  उपशिक्षिका श्रीमती शगुफता मॅडम , शाह जाकेरा मॅडम , शेख फौजिया, शेख साजेदा ,  शेख अंजुम मॅडम तसेच इस्माईल सर ,  फुरकान सर  पत्रकार महेश पेवाल,  नानु कवडे,  रमाकांत सोनवणे,  रंगनाथ चव्हाण , कपिल तेलुरे , मोहम्मद शेख मान्यवर उपस्थित होते.  यावेळी इयत्ता सातवी च्या मुलींनी स्वागत गीत सादर केले.

    यावेळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  सर्वच राष्ट्रीय महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन तरुणांनी वाटचाल करावी . जेणेकरून देशाचे भवितव्य सुधारेल असे मत व्यक्त केले.फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी अफजलखान यांचा खात्मा केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई अर्थात माँसाहेब जिजाऊ यांनी त्यांना सांगितले की जोपर्यंत अफजलखान जिवंत होता तोपर्यंत तो दुष्मण होता आता त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला माणुसकी नात्याने दफनविधी करून टाक. ही शिकवण जिजाऊनी दिली आहे अशीच शिकवण सध्या गरजेची आहे असे मत व्यक्त केले.कपील तेलुरे यांनी विद्यार्थ्यांना जिजाऊं कोण होत्या आणि त्यांचे काय कार्य होते याबाबत मार्गदर्शन केले.शिवकन्या संगीता सोनवणे यांनी यावेळी जिजाऊंच्या आयुष्यावर भाषण करून प्रत्येक महिलेने जिजाऊ, सावित्रीबाई फुले , माता रमाई यांच्या पावलावर पाऊल ठेवावे.  आदर्श निर्माण करावा असे मत व्यक्त केले.यावेळी शाळेच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अनिल धामणे यांनी केले.

Thursday, January 11, 2024

नांदगाव येथील समाजसेविका संगीता सोनवणे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान,







नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील समाजसेविका आणि शिवकन्या सौ संगीता सोनवणे यांना नाशिक येथील वृत्त वाहिनीच्या वतीने महिलांसाठी करत असलेल्या कामासह त्या करत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेबद्दल समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अँटी करप्शन ब्युरोच्या डॅशिंग अधिकारी शर्मिष्ठा वालावकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे प्रदान नुकतेच नाशिक येथे एका कार्यक्रम सोहळ्यात करण्यात आले. या बद्दल त्यांचे सर्व थरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Tuesday, January 9, 2024

नांदगाव येथील धर्मराज सुरसे यांच्या शेतातील विहिरीत आढळले दोन उदमांजर,





नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नांदगाव तालुक्यातील साकोरा शिवारात शेतकरी धर्मराज जयराम सुरसे हे सकाळी आपल्या शेतात जनावरांना पाणी आणण्यासाठी विहिरीजवळ गेले.  त्यांनी बघितलं तर दोन वेगळेच प्राणी आपल्या विहिरीत पडलेले दिसले.  त्यांनी आपले घरातील मुलांना आवाज देऊन बोलावून घेतले.  विशाल सुरसे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला. सर्पमित्र बडोदे घटनास्थळी पोहोचले आणि बघितलं तर हे दोन उदमांजर पाण्यात रात्रीपासून पडलेले अवस्थेमध्ये होते. बडोदे यांनी दोरीच्या साहाय्याने पन्नास ते साठ फूट खोल विहिरीत उतरून मोठ्या शीताफिलीने दोन्ही उदमांजरला वेवस्तीत बाहेर काढले ‌ त्यांना दोन ते तीन तास लागले . खूप कठीण परिस्थितीत ती कारण अश्या  मध्ये स्वतःची काळजी घेऊन काम करावा लागतो. वेवस्तीत बाहेर कडून थोडक्यात माहिती दिली या प्राणीला उदमांजर इंग्लिश मध्ये सिव्हिल कॅट अशे म्हणतात.  दिसायला मांजरी सारखेच असतात पण तोंड कुत्रा सारख असतो .  शरीर मांजरी सारख असतो हे प्राणी निशाचर असतो. रात्रीचे बाहेर निघतात हा मांसाहारी पण आहे.  शाकाहारी पण आहे हे फळ पण खातो आणि मास पण खातो खूप दुर्मिळ होत चालले प्राणी अशे प्राणी दिसल्यास मारू नका प्राणीमात्रांना किंवा वनविभाग संपर्क करा अशी माहिती सर्पमित्र विजय बडोदे यांनी दिली.  नांदगाव वनविभागात नोंद करून निसर्गात स्वाधीन केले.

Thursday, January 4, 2024

मनमाडला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन,



मनमाड ( विशेष प्रतिनिधी) - अखंड हिंदुस्तानाचे कोट्यावधी हिंदू समाजाचे दैवत प्रभू श्रीरामांचे येणाऱ्या २२ जानेवारीला अयोध्या येथील भव्य प्रभु श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे . काही दिवसांपूर्वी शिर्डीत महाविकास आघाडीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना व सर्व श्रीराम भक्त यांच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळ्यास काळ फासण्यात आलं . तसेच महिला आघाडी तर्फे प्रतीकात्मक पुतळ्यस जोडे मारत, प्रभू श्रीराम की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, आवाज कोणाचा शिवसेनेचा, आमदार सुहास आण्णा कांदे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है असे घोषणाबाजी करत, चपलांचा हार टाकून पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आले.
        या प्रसंगी शिवसेना नेते अल्ताफ(बाबा) खान,उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, विधानसभा संघटक जाफर मिर्झा,महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, महिला आघाडी शहरप्रमुख संगीता ताई बागुल,विधान सभा संघटक पूजाताई, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले, आझाद पठाण, मिलिंद उबाळे,दिलीप तेजवानी,एजाज शाह, भाजप शहर प्रमुख सचिन सांगवी, बबन फुलवाणी, सुभाष माळवातकर,लाला नागरे,चंद्रकांत आव्हाड,महेंद्र गरुड,दिनेश घुगे, निलेश ताठे, सिद्धार्थ छाजेड, अजिंकीय साळी,स्वराज देशमुख,अज्जू शेख,पिंटू वाघ,लोकेश साबळे,सुनील ताठे,बाबा पठाण,अतुल भंडारी,ऋषिकांत आव्हाड,मनु शेख, कैलास सोनवणे,आसिफ पठाण, अतीक शेख, सागर आव्हाड,इम्तियाज शाह,कुणाल विसापूरकर तसेच महिला आघाडी उपतालुका नाजमाताई मिर्झा, संघटक शहर नीताताई लोंढे, अल्काताई कुमावत, वंदनाताई शिंदे, प्रसिध्दी प्रमुख निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते.

Wednesday, January 3, 2024

नांदगांवमध्ये भाजपा महिला मोर्चा तर्फे माता सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी,




 नांदगाव ( प्रतिनिधी )   -   नांदगांव शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे माता सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास आणि तदनंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना पुष्पहार व पुष्प अर्पण करुन करण्यात आला. 
              या  कार्यक्रमात बोलताना भाजपा च्या माजी प्रदेशउपाध्यक्षा ॲड. जयश्रताई दौंड म्हणाल्या समस्त स्त्री वर्गास शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई यांनी मुलींच्या, महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व जाणुन कित्येक स्त्रियांना प्रेरीत केले. त्यांनी महिलांसाठी पुण्यात भारतातील पहिली शाळा सुरु केली.  त्या भारताच्या प्रथम शिक्षिका झाल्या, त्यांचीच प्रेरणा घेऊन पुढे फातिमा शेख यांनी देखील शिक्षिका प्रशिक्षण घेऊन आणि पदवी प्राप्त करून भारताच्या पहिल्या मुस्लीम महिला शिक्षिका झाल्या.
              तसेच भाजपा शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर म्हणाले लवकरच पुण्यात माता सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केलेल्या जागेवर महायुती सरकारतर्फे एक भव्य सुशोभित असे स्मारक होणार आहे .  त्या निमित्ताने आज च्या युगातील मुलींना व महिलांना, माता सावित्रीबाई यांचा लढा व त्यातुन प्रेरणा मिळणार आहे. आणि हीच माता सावित्रीबाई फुले यांना खरी श्रद्धांजली असणार आहे. 
              याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा तर्फे करण्यात आले. कार्यक्रमावेळी जयश्रीताई दौंड, राजाभाऊ बनकर, दिपक पाटील, सतिष शिंदे, मनोज शर्मा, गणेश शर्मा, अन्नपूर्णा जोशी, तारा शर्मा, धम्मवेदी बनकर, अमोल चव्हाण, काजल जाधव, परवीन शेख, सरला गोखने, कविता माले, उज्वला लोखंडे, संगीता बागुल, जिजाबाई परदेशी, लता अडकमोल, रेखा सोनवणे, सुमन जाधव, गरुड ताई, जाधव ताई, उषा सोरेसह आदी महिला उपस्थित होत्या.

Tuesday, January 2, 2024

नांदगाव शहरात भाजपकडून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे उद्घाटन, योजनेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन,




नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या शिबिराचे उद्घाटन शहरातील शनी मंदिर गार्डन जवळील सानप ड्रायफ्रूट येथे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर तथा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
प्रधानमंत्री आयुष्मान भारत या योजनेद्वारे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत असलेल्या कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या शिबिराचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. या शिबिरात बाबाजी शिरसाठ, अन्नपूर्णा जोशी, ॲड. मनीषा पाटील, तारा शर्मा, सतिष शिंदे, बळवंत शिंदे, मनोज शर्मा, राजेंद्र गांगुर्डे, दिनेश दिंडे, सुरेश कुमावत, अण्णा काळे, धनराज मंडलीक, शंकर वाघमोडे, रविंद्र सानप, अमोल चव्हाण, धम्मवेदी बनकर आदींची उपस्थिती उपस्थिती होती. यावेळी नाव नोंदणीचा शुभारंभ करण्यात येवून नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस संजय सानप यांनी केले आहे.

नवीन मोटार वाहन कायद्यातील अन्यायकारक तरतुदी रद्द कराव्यात, राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन!!






नांदगाव ( प्रतिनिधी ) -  केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर आहे. असे वाहनचालकाचे म्हणणं आहे. या कायद्याला अनेक पक्ष, संघटना विरोध करत आहेत. या  कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास ७ वर्षांची शिक्षा तसेच १० लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.चालकांना भिती वाटावी असा जुलमी, कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा केन्द्र सरकारने आणला आहे.या कायद्यामुळे स्वत:चे वाहन चालवण्यासही लोकांना भिती वाटत आहे. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर १-२ वर्षांची शिक्षा व १००० रूपयापर्यन्त दंड होता. पण नवीन कायद्यानुसार ७ वर्षांपर्यंत शिक्षा व १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे तसेच हा कायदा आता अजामीनपात्र आहे. या कठोर  कायद्याविरोधात जनतेत तीव्र नाराजी आहे. या काळ्या कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असून चालकांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा आहे,  असे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता २०२३ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर केले आहे. त्यात त्यांनी हिट अँड रन केसमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. आयपीसीच्या कलम १०४ नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास आधी दोन वर्षाची शिक्षा किंवा दंडाची तरतूद होती. किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद होती. नव्या कायद्यानुसार ७ वर्षाची शिक्षा आणि १० लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हत्येच्या हेतूने गुन्हा केला नसेल, पण आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्यास किंवा त्याने तात्काळ पोलिस अधिकारी किंवा मॅजिस्ट्रेटला माहिती दिली नाही तर त्याला शिक्षा आणि रोख रक्कम भरणे आदी दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शिक्षेचा कालावधी दहा वर्षाचा असू शकतो. या गुन्ह्यात आर्थिक दंडाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
   ह्या विरोधात नांदगाव तालुक्यातील पानेवाडी  येथे इंधन पुरवठा करणाऱ्या वाहनावरील वाहनचालक उपोषणास बसले आहेत. त्यांनी ही या कायद्याला विरोध दर्शवला आहे. हा  कायदा म्हणजे दुधारी तलवार  आहे,अपघातानंतर वाहनचालक मदत मागण्यासाठी थांबला तरी त्याच्यावर जमावाकडून हल्ला होण्याचा धोका असतो. अनेकदा अशा वेळी जमाव हिंसक होतो. हल्ल्यातून वाचण्यासाठी तो पळून गेला तर त्याला कायद्यानुसार १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. त्यामुळे रस्त्यावर अपघात होऊन त्याचे संपूर्ण जीवन प्रभावित होऊ शकते.
अपघातानंतर चालक हा घटना स्थळावरून पोलिस स्टेशन अथवा सुरक्षित ठिकाणी पोहचून पुढील कायदेशीर प्रकियेत सहकार्य करत असतो, त्यामुळे नवीन विधेयकातील जाचक तरतुदी वगळून चालक वर्गाला नाहक त्रास होणार नाही अशी सुधारणा व्हावी व चालक वर्गाच्या रास्त मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहोत. आणि वाहनचालकांनी लोकशाही मार्गाने उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत  आहोत‌.

नांदगावच्या तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर... पिवळ्या - केशरी रेशनकार्डवर नागरीक मारताय स्वतःच्या हाताने शिक्के...प्रशासकीय यंत्रानेचा खेळखंडोबा तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी करताय काय...? सर्वसामान्य नागरिकांकडे शिक्के आलेच कसे...?





नांदगाव (प्रतिनिधी ) - तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यलयात भ्रष्टाचार चालतो हे जगजाहीर आहे . मात्र प्रशासकीय अधिकारी यांचे शिक्केच जर नागरीक स्वतःच्या हाताने मारून घेत असतील तर ..? हो हे घडते आहे. आणि तेही नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात नांदगाव तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरू असुन,  पिवळे रेशनकार्ड केशरी रेशनकार्ड यांचे रेट फिक्स असुन राजकीय नेत्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर काम सुरू असतात . मात्र आता तर अजब घटना बघायला मिळाली आहे .नांदगाव तहसील कार्यलयात एक महिला व एक तरुण स्वतःच्या हाताने पिवळ्या रेशनकार्डवर शिक्के मारताना दिसत असुन जर नागरीक स्वतःच्या हाताने शिक्के मारत आहेत. तर यांच्याकडे शिक्के आलेच कसे आणि जर सर्वसामान्य माणसाकडे शासकीय शिक्के आहेत. तर मग पुरवठा अधिकारी व तहसीलदार करतात. तरी काय ...? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
     महसूल विभागात अक्षरशः लुट सुरू असुन अनेक शासकीय काम हे काही नेत्यांच्या घरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असुन याला प्रशासकीय यंत्रणा देखील जबाबदार आहेत. याकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील का व या घटनेची चौकशी करतील का ..? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

Monday, January 1, 2024

मनमाड मध्ये भिमा कोरेगाव क्रांतीस्तंभास अभिवादन,






मनमाड ( विशेष प्रतिनिधी) - भीमा कोरेगाव येथे पेशव्यांच्या विरोधात लढणाऱ्या तत्कालीन महार(बौद्ध) शूर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी देशभरातुन लाखो लोक पूणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात. त्याच धर्तीवर मनमाड येथे देखील भिम सैनिकांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम करण्यात येतो. येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून अभिवादन करण्यात येते.  यावेळी आजपासून ईव्हीएम या मशीनला विरोध करण्यासाठी शपथ घेण्यात आली व त्यासाठी जनजागृती करण्याचा ठराव पारित करण्यात आला.यावेळी मनमाड शहरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र शासनाने वाहनचालकासाठी केलेल्या नवीन कायद्याला टँकर, ट्रक चालकांचा विरोध, चारही कंपनीचे जवळपास दोन हजार पेक्षा जास्त टँकर संपावर,






 मनमाड (विशेष प्रतिनिधी) - केंद्र सरकारने वाहनचालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक,टँकरसह सर्वच वाहन चालका मध्ये संतापाची लाट उसळली असून,  हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत मनमाडच्या पानेवाडी,नागापूर परिसरात असलेल्या इंडियन ऑइल,भारत पेट्रोलियम,हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडेन गॅस कंपनीतुन इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे सुमारे दोन हजार पेक्षा जास्त टँकर आणि ट्रक चालकांनी काल पासून काम बंद आंदोलन सुरु केले.या संपामुळे ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातुन राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेलसह गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प  झाला. संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हा कायदा जाचक आहे हा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी संपकऱ्यांनी केली आहे.

केंद्र शासनाने केलेल्या नवीन कायद्यात काय आहे तरतूद,
 - केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता २०२३ कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास १० वर्षे कारावास आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालका मध्ये असंतोष निर्माण झाला असून,  हा कायदा अति कठोर आणि अन्याय कारक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...