Monday, April 29, 2024

जळगाव बुद्रुकच्या नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा सांगळे यांचा आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून सत्कार ,






नांदगाव (प्रतिनिधी ) - जळगाव बुद्रुक येथील नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. सुवर्णा योगेश सांगळे यांची वर्णी लागली. यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला . तसेच पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमानंतर ग्रामस्थांसोबत एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.
   कार्यक्रमप्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. जळगाव बुद्रुक गावावर माझे विशेष प्रेम आहे, याचे कारण म्हणजे या गावात राजकारण, शेती, भाऊबंदकी काहीही असो पण माझ्या निवडणुकीचा विषय येतो . तेव्हा मात्र सर्व गाव जसे देवासाठी मंदिरात एकत्र येतात तसे एकत्र येऊन मला मदत करतात हे मी कधीही विसरू शकत नाही आणि म्हणून जळगाव बुद्रुक या गावावर माझं विशेष प्रेम आहे असं प्रांजळ मत यावेळी व्यक्त केले. या गावात पाणी आरोग्य शिक्षण या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि लवकरच एक वीज रोहित्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणेल असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. 
     सुवर्णाताई यांच्या रूपाने सांगळे कुटुंबियांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले‌. याचा मलाही आनंद होत आहे असेही त्यांनी सांगितले.
   व्यासपीठावर किरण आण्णा कांदे,मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड, बाजार समिती संचालक अमोल भाऊ नावंदर , माजी नगराध्यक्ष रामनिवास काका कलंत्री, किरण भाऊ देवरे, यज्ञेश कलंत्री, नवनियुक्त सरपंच सुवर्णा योगेश सांगळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नवनाथ भाऊ गीते यांनी केले. 
     सांगळे कुटुंबियांच्या वतीने नवनियुक्त सरपंच सुवर्णा सांगळे यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार केला. 
     याप्रसंगी पत्रकार संतोष कांदे, उपसरपंच पुंजाराम पथे, सदस्य विश्वनाथ कांदे, सौ.लंका शरद गीते, चिंधा गावंडे, उषा शरद आव्हाड, कृष्णा अहिरे, गोपाबाई नाना गावंडे, समस्त ग्रामस्थ महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, April 28, 2024

पिंपरखेड येथील जळीतग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास आण्णा कांदे यांचा माणुसकीचा आधार, कुटुंबीयांना संसारोपयोगी साहित्य वाटप,





 नांदगाव ( प्रतिनिधी )  -  नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पिंपरखेड येथील अपादग्रस्त कुटुंबाला धान्य, कपडे, भांडे आदी संसारपयोगी साहित्य देत माणुसकीचा आधार देऊन सामाजिक कृतज्ञता जपली आहे.                       
        पिंपरखेड येथील शंकर मोरे व अर्जुन मोरे यांच्या राहत्या झापाला शॉर्ट सर्किटने आग लागून संसारपयोगी साहित्य मग त्यात धान्य,सर्व वापरात असलेली भांडी,कपडे,आदीसह शेती साहित्य व काही कोंबड्या जळून खाक झाल्याने त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला होता.
       ही गोष्ट बाजार समितीचे संचालक जीवन गरुड, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ सोमवंशी व संदीप मवाळ यांनी तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांना कळवली.
    आमदार सुहास अण्णा कांदे यांनी लगोलग या कुटूंबाला त्यांच्या निवास्थानी (देवाज ) बंगल्यावर बोलावून घेतले या कुटूंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना ५० किलो गहू, ५० किलो तांदूळ, रोजच्या वापरासाठी लागणारी आवश्यक ती स्टील ची भांडी,कपडे,देवून त्या कुटूंबाला आधार दिला. 
      या वेळी आम्ही तुमच्या सोबत असल्याचा दिलासा दिला.या मदतीबाबत सदर मोरे कुटूंबाने आ.सुहास आण्णा कांदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी किरण आण्णा कांदे, सागर भाऊ हिरे, प्रकाश भाऊ शिंदे, बाजार समितीचे उपसभापती दिपक भाऊ मोरे, प्रमोद भाऊ भाबड, अमोल शेठ नावंदर, आण्णा मुंढे, रमेश काकाळीज आदींची उपस्थिती होती .

Friday, April 26, 2024

मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत पाणी वाटप,





मनमाड ( विशेष प्रतिनिधी ) - मनमाड शहरात भासत असलेली पाणीटंचाई याचा फटका मनमाड रेल्वे स्टेशनवर ही जास्त प्रमाणात बसला आहे . येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना रेल्वे गाडीतून जात असताना अति उष्णतेमुळे पाण्याची जास्त गरज भासत आहे . रेल्वे गाडी ही स्टेशनवर जास्त वेळ उभी राहत नाही. तसेच प्रत्येक वेळेस पाणी बॉटल विकत घेणे हे सामान्य प्रवाशांना परवडत नाही . ही गोष्ट लक्षात येता पंकज खताळ पाटील फाउंडेशन , लायन्स क्लब मनमाड , आरपीएफ इन्स्पेक्टर देसवाल साहेब ,  नाना भालेराव (वाणिज्य अधिकारी),  संजय कांबले (रेल्वे टिसी डिपो इंचार्ज ) , लायन्स क्लब मनमाड अध्यक्ष सुचेता पंकज खताळ, सेक्रेटरी गणेश हाडपे, संगीता शेजवळ संतोष जैन शाम शूगवानी रेल्वेचे वेगवेगळे विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या संकल्पनेतून पुष्पक एक्सप्रेस व पवन एक्सप्रेस या रेल्वे गाडीतील प्रवाशांना मोफत पाणी वाटप केले गेले व सर्व प्रवाशांना त्या पाण्याचा फायदा झाला.

Monday, April 22, 2024

इतर विधानसभा मतदार संघापेक्षा सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करू - आमदार सुहास कांदे,


नांदगाव (प्रतिनिधी ) - आम्ही नाराज आहोत,पण आता ती व्यक्त करण्याची वेळ नाहीये.तुम्हाला इतर विधानसभा मतदार संघापेक्षा सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करू ; अन मग त्यानंतर आमची नाराजी बोलून दाखवू असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी भाजपच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांना उद्देशून केले.
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी,मनसे,रासप,रिपाई या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा एकत्रित स्नेहमेळावा आमदारांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे,उमेदवार डॉ.भारती पवार,माजी आमदार राजेंद्र देशमुख,माजी आमदार संजय पवार,भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,राजेंद्र पवार,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे,तालुक्यातील महिलांचे खंबीर नेतृत्व सौ.अंजुम कांदे,नितीन पांडे,सभापती अर्जुन पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे,आनंद कासलीवाल,दत्तराज छाजेड,पंकज खताळ, मयूर बोरसे आदी उपस्थित होते.
     आमदार सुहास कांदे पुढे म्हणाले की,आज आपण नाराजी दर्शवली तर याचा फायदा विरोधकांना होऊन ते नगरपालिका,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या वरचढ होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून सध्या ही नाराजी दूर ठेवून एकदिलाने,एकमताने आणि एक विचाराने एक होऊन भारती ताईंना गेल्या वेळेपेक्षा सर्वाधिक मताधिक्य आपल्या मतदार संघातून मिळवून देऊ,अन त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी बसवू अन मग आपली नाराजी त्यांना सांगू.! असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
      यावेळी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी बोलताना केंद्र शासनाकडून कांदा,कपाशी,द्राक्ष आदी पिकांबाबत दुर्लक्ष झाल्याची बाब अधोरेखित करत भविष्यातील निवडणुका लक्षात घेऊन भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.माजी आ.संजय पवार यांनी ही जुन्या गोष्टीना उजाळा देत मी पक्ष बदलले नाही,तर मला भाग पाडण्यात आले असे सांगितले.
,राजेंद्र देशमुख,शिवसेनेचे सुनील पाटील,राजेश कवडे,दत्तराज छाजेड,सौ.अंजुम कांदे,महावीर पारख,आदी वक्त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
     भाजपच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांनी वरील गोष्टी घडल्या असल्या तरी यातून काही चांगल्या गोष्टी ही घडल्या असल्याचे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.यावरून राजकारण करणारे विरोध पक्ष दूटपी असल्याचे त्या म्हणाल्या.
     या भव्य स्नेह मेळाव्यास माजी नगराध्यक्ष बबलू पाटील,माजी सभापती तेज कवडे,किशोर लहाने,डॉ.संजय सांगळे, संग्राम बच्छाव ,महेंद्र दुकळे,दिपक मोरे,श्रद्धा जोशी,नंदू पाटील,रमेश पगार,अण्णासाहेब पगार,प्रकाश घुगे,देविदास मोरे,गंगादादा त्रिभुवन,प्रदीप थोरात आदिंसह शिवसेना,युवा सेना, महिला आघाडी,भाजप,राष्ट्रवादी,रिपाई,रासप,मनसे,आदी पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी,विविध गावांचे सरपंच,सदस्य,सोसायटी संचालक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, April 13, 2024

नांदगाव शहरात प्रथमच कलर्स मराठी - सुर नवा ध्यास नवा फेम अविनाश कदम यांची खास उपस्थिती,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे महापुरुषांच्या जयंती तसेच पवित्र रमजान ईद निमित्त समाज प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे BMA ग्रुप नांदगाव यांच्या तर्फे दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी  आयोजित करण्यात आला होता.या वेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन मनमाडनगरीचे गणेश धात्रक हे होते. तर अध्यक्षस्थानी नाशिकचे समाज भुषण मोहन अढांगळे हे उपस्थित होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज,प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन डॉ .बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणुन उपस्थित असलेले कलर्स मराठी- सुर नवा ध्यास नवा फेम अविनाश कदम यांनी जसा गुलाब बोलतोया या सुगंधी जाईला भिम आवडीने बोले रामु रामू रमाईला या गीताची सुरवात करुन मान्यवरांचे व प्रेषकांचे मने जिंकली होती.
     एका पाठोपाठ भिमरायाला मानवंदना देण्यास सुरुवात झाली . त्या नंतर सामाजिक क्षेत्रातील उलेखनीय कामगिरी करणार्‍या पत्रकार निलेश वाघ, प्रा . सुरेश नारायणे, प्रज्ञानंद जाधव, राजेंद्र जाधव, महेश पेवाल यांना तर   माया पगारे,सौ . शिलेलाल, जयंती अध्यक्ष सिध्दांत काकळीज, सागर आडकमोल, मा.अध्यक्ष मंगेश पगारे, मा.  नगरसेविका अक्काबाई सोनवणे तसेच सर्वच महापुरुष सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यांना सन्मान चिन्ह शाॅल पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले होते . पुन्हा प्रसिद्ध गायक अविनाश कदम यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग तसेच प्रत्येक बहुजन समाजासाठी त्यांनी किती प्रयत्न केले .ते देखील आपल्या प्रबोधन गीत गायनातून जनतेला सांगीतला बहुजन समाज बांधवांनी व जनतेने मनसोक्तपणे या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला या वेळी फुले, शाहु,आंबेडकर, प्रमुख पाहुणे म्हणून नितिन जाधव, संतोष गुप्ता, संतोष बळीद, दर्शन आहेर, श्रावण आढाव, दिपक सोनवणे,रोहित जाधव , मोहीत भोसले, दिपक अंभोरे ,आयोजक बी.एम.ए. ग्रुप सूत्रसंचालक मनोज चोपडे यांनी केले.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...