Monday, January 30, 2023

नांदगाव तालुक्यात नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी ५३ टक्के मतदान,





नांदगाव( प्रतिनिधी) - नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी नांदगाव तालुक्यात ५३ टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी तालुक्यात चार मतदान केंद्रे होती. दोन हजार ६२२ मतदारांपैकी एक हजार ४०८ पदवीधर मतदारांनी आपला हक्क बजाविला. वेहेळगाव, मनमाड, नांदगाव व जातेगाव या चारपैकी मनमाड केंद्रावर ५७ टक्के नांदगाव केंद्रावर ५२.५६ टक्के, जातेगाव केंद्रावर ५६.७६ टक्के तर वेहेळगाव केंद्रावर ४५ टक्के मतदान झाले. अनेक पदवीधर मतदारांना आपल्या शाळा शासकीय कार्यालयातील जबाबदाऱ्या सांभाळीत मतदानाला येण्यासाठी होणारा विलंब हे त्यापैकी एक प्रमुख कारण ठरले. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, चेतन कुणगर व रामेश्वर गाढे पाटील यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. माजी आमदार अॅड अनिल आहेर, नगराध्यक्ष गणेश धात्रक, विजय पाटील, अनिल पवार, अयुब शेख हे जातेगाव केंद्रावर उपस्थित होते.

Sunday, January 29, 2023

नमन एज्युकेशन संचलित दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम साजरा,


नांदगाव (प्रतिनिधी)  -  नमन एज्युकेशन संचलित लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल
 आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला.दि.२८ जानेवारी रोजी नमन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संजय बागुल संस्थापिका .सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शालेय प्रांगणात हळदी कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पालक शिक्षक संघाच्या महिला सदस्य ऍडव्होकेट विद्या कसबे ज्योती जंगम लाभल्या होत्या.उपस्थित मान्यवर तसेच शालेय संस्थापक संजय बागुल व संस्थापिका सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर , रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्याहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले होते. आणि संस्थापिका  बागुल यांच्याहस्ते उपस्थित सर्व मान्यवरांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.नमन शिक्षण संस्थेचे संस्थापक बागुल व संस्थापिका मा बागुल लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर रेंनबो इंटरनशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
 महिलांचे मनोरंजन व्हावे यासाठी शाळेने विविध खेळांचे आयोजन केले होते.मकरसंक्रांत हा नववर्षातील पहिला सण असतो आणि त्या सणाचे महत्व व हळदी कुंकू का करतात?याचे महत्व पटवून देण्यात आले.उपस्थित माता पालकाचे हळदी कुमकुम अशा दोन गटात विभाजन करण्यात आले आणि रंगतदार फेऱ्यांना सुरुवात झाली.पहिली फेरी सामान्य ज्ञानाची होती .दुसरी फेरी गाणे ओळखणे आणि तिसरी फेरी अभिनय ओळखणे ही होती.सर्वच फेऱ्या रंगतदार ठरल्या .आणि हळदी गटाने बाजी मारली.विजेता गटाने सरप्राईज गिफ्ट देण्यात आले.
      यानंतर मनोरंजन म्हणून काही वेळ अंताक्षरी खेळण्यात आली. महत्वाचा कार्यक्रम म्हणजेच हळदी कुंकू तर सर्वप्रथम सरिता बागुल आणि प्रमुख अतिथी यांना सहशिक्षिका ज्योती सुरसे यांनी हळदी कुंकू आणि तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या. आणि सहशिक्षिका वर्षा नगे आणि मोनाली मोरे यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू आणि तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या.यानंतर वाण चिठ्ठी निवड पद्धतीने वाण वाटप पुनम सोमासे आणि विजेता पिलके यांनी केले.महिलांनी सरिता बागुल यांनी वाण दिले. आणि उखाण्यांनी ताल धरला.अशा पद्धतीने अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला.शालेय शिक्षिकांना सरिता बागुल यांनी हळदी कुंकू तसेच तिळगुळ देत सुंदर असे वाण दिले. यानंतर उपस्थित महिलांनी शाळेबद्दल तसेच उपक्रमांबद्दल कौतुक करत अतिशय समर्पक शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित महिलांचे नमन शिक्षण संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच "तिळगुळ घ्या गोडगोड बोला" म्हणत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतिशय सुरेख रित्या सहशिक्षिका जयश्री चौधरी यांनी केले. हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यासाठी लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले अंकिता सरोदे भाग्यश्री शिंदे धनश्री न्याहारकर पूनम सोमासे विजेता पिलके,सुरेखा गायकवाड नेहा पाटील मॅम,ज्योती सुरसे ,वर्षा नगे संदीप पांडे राहुल उपाध्याय सर ,मोहन सुरसे अनिता जगधने क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड जयश्री चौधरी चैताली अहिरे रोहिणी पांडे अश्विनी केदारे ,दिव्या शिंदे ‌ तसेच मदतनीस अनिता नेमणार, वैशाली बागुल, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला.

मोरझरच्या सरपंच लीना पाटील यांना आदर्श महिला कृषी माऊली पुरस्कार प्रदान,



नांदगाव, मोरझर (प्रतिनिधी) - जागतिक कृषी प्रदर्शन २०२३ अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र संचलित कृषी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोरझर ता. नांदगाव च्या सरपंच सौ लीना समाधान पाटील यांना आदर्श महिला कृषी माऊली पुरस्कार केंद्राचे प्रमुख दादासाहेब मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.
   लीना पाटील यांनी मोरझर गावचा कारभार हाती घेतल्यापासून विविध विकास कामांबरोबरच गावगाड्यातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे या उदात्त हेतूने जलसमृद्धी सारखी योजना अमलात आणून पाणी आडवा पाणी जिरवा वर जिल्हाभरात उल्लेखनीय कामकाज केले. त्यामुळे मोरझर गाव दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. शिवार सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर असून सौ पाटील यांचे सामाजिक कामातही विशेष योगदान आहे. गावात सातत्याने आरोग्यविषयक शैक्षणिक व कृषी विषयक कामांमध्ये कामांमध्ये  लक्ष ठेवून योग्य कारभार करीत आहेत. यामुळे त्यांना याआधी अनेक संस्थांमार्फत आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नांदगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या विकास कामांचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर,


नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात झालेल्या व सुरू असलेल्या विकास कामांचा अहवाल " बदल घडतोय बदल दिसतोय" या पुस्तकाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकडे सादर केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांना कार्य अहवाल सादर करतांना नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे व युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांची उपस्थिती होती.

Saturday, January 28, 2023

नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत पालकमंत्री दादा भुसे यांना निवेदन,


नांदगाव( प्रतिनिधी) -  नांदगाव येथे ज्येष्ठ कामगार नेते श्रावण जावळे यांनी आंबेडकर चौक येथे नगरपालिका कर्मचाऱ्यांना धावती भेट दिली. सविस्तर वृत्त असे की दि. २३ जानेवारी रोजी नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, तसेच अनुकंपा व वारस हक्कांवर नियुक्ती मिळावी, वारस हक्क कंत्राटी कामगारांना वेतन कायदा लागू करावा. मागासवर्गीय सफाई कर्मचारी यांच्यावरील अन्याय दूर करावा यासह नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कामगार मजदुर संघाचे ज्येष्ठ कामगार नेते श्रावण जावळे,मोरे व कार्यकर्ते यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां यांच्या कार्यालयाला पाच ते सात पत्र व्यवहार केलेले आहेत. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने आपण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने स्वतः मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून बैठक आयोजित करावी व पालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडावे आपणास जाणीव व भावना असल्याने मागण्या संदर्भात विनंती केली आहे.नांदगाव, येवला, मलकापूर, सटाणा, यावल, भगुर, या नगरपालिकेत अनुकंप वारस हक्क नोकरी गेल्या काही वर्षापासून देण्यात येत नाही तसेच दिनांक १३/३/२०१६ चे सामाजिक न्याय विधी विभागाचे परिपत्रक रद्द करून सर्व समाजातील सफाई कामगारांना पूर्वीप्रमाणे वारस हक्क चालू करावा व ते पत्रक सुधारित करून किंवा नव्याने पारित करावी अनेक विविध 10 प्रश्नांचे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे तरी विषयावरील मागण्यासंदर्भात लवकरात लवकर आपले उपस्थितीत मुख्यमंत्री यांच्या दालनात वरील मागण्यांचे तातडीने बैठक लावण्यात यावी अशी निवेदनात विनंती करण्यात आली आहे.  नांदगाव नगरपालिकेचे कामगार संघटना,कर्मचारी वृंद यांनी भारतीय मजदूर कामगार संघटनेचे जेष्ठ नेते श्रावण जावळे यांचे नांदगाव नगरीत येताचं आंबेडकर चौक येथे जोरदार स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रावण जावळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले व कामगार यांनी महापुरुषांच्या नावाने घोषणा दिल्या होत्या. जावळे यांनी लवकरच कामगारांच्या विविध समस्यांचे कामे मार्गे लागतील आपल्या विविध समस्या मांडणार असल्याचे दादा भुसे यांनी सकारात्मक उत्तर दिलेले आहे असे जमलेल्या कामगारांना जावळे यांनी नांदगाव येथे आंबेडकर चौक येथे बोलताना सांगितले आहे. यावेळी रिपाईचे नेते देविदास मोरे, राजेंद्र गुढेकर, भीमशक्तीचे सोनू पेवाल, गणेश शर्मा,उमेश चंडाले,बापू भालेकर,किरण फुलारे, रितिक पेवाल,  नगर नगरपालिका कर्मचारी वृंद,तसेच रिपाई कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था पदाधिकारी मोठ्याा संख्येने उपस्थित होते.

मनमाडच्या मुश्ताक शेखने पटकावला नाशिक श्री मास्टर किताब....!



मनमाड(विशेष प्रतिनिधी) - नाशिक जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने हबीब क्लब यांच्या तर्फे भरविण्यात आलेल्या नाशिक श्री मास्टर या जिल्हा स्तरीय स्पर्धेत मनमाडच्या मुश्ताक शेखने अजिंक्यपद पटकावले असुन तब्बल एक तपांनंतर नाशिक श्री हा किताब मनमाडला मुश्ताकच्या रुपांने मिळाला आहे.या कामगिरी बद्दल मुश्ताकचे मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.
          नाशिक जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन व हबीब क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मास्टर श्री हा जिल्हास्तरीय किताब मुस्ताक शेख या मनमाडच्या 44 वर्षीय युवकांनी पटकावला असून भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या मुस्ताकने याआधी देखील मोठ्या मेहनतीने अनेक किताब मिळविले आहेत दिवसभर सरकारी कार्यालयात कर्मचारी म्हणून काम केल्यानंतर रात्रीच्या वेळी आपल्या शरीराला वेळ देऊन व्यायाम करत मोठ्या मेहनतीने मुस्ताकने आपले शरीर बनविलेले आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात तसेच इतर राज्यात देखील मुस्ताकने अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये यश मिळविलेले आहे. नाशिक येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मास्टर श्री या किताबासाठी जवळपास 18 स्पर्धक सहभागी झाले होते . या सर्वांना मागे सोडत मुस्ताकने यश संपादन केले व तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर नाशिक जिल्हा श्री हा किताब पुन्हा एकदा मनमाड चे नावे केला आहे. या कामगिरीबद्दल मनमाड शहरातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक यासह इतर सर्व थरातून मुस्ताकचे अभिनंदन करण्यात येत आहे. याही पुढे मेहनत सुरूच ठेवून राज्यस्तरावर खेळण्यासाठी तसेच इतर तरुणांना बॉडी बिल्डिंग कडे आकर्षित करून त्यांना देखील स्पर्धेसाठी तयार करणारा त्याचे मत मुस्ताक शेख यांनी व्यक्त केले आहे.

Friday, January 27, 2023

राज्यस्तरीय वुशु स्पर्धेत नांदगाव महाविदयालयाचे यश,

माधुरी भाऊसाहेब ठोंबरे वुशु स्पर्धेत राज्यात तृतीय व वैष्णवी किशोर चितळकर बॉक्सिंग राज्यस्तरीय सहभाग,
       छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर

नांदगाव ( प्रतिनिधी) -  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड व क्रीडा परीषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय वुशु क्रीडा स्पर्धा मध्ये नांदगाव महाविदयालयातील इयत्ता १२ वी विज्ञान वर्गाची विदयार्थिनी राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाने विजयी झाली. कु. माधुरी भाऊसाहेब ठोंबरे हीचा सत्कार करतांना महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे व सर्व स्टाफ तसेच राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा क्रीडा संकूल पालघर येथे संपन्न झाल्या हया स्पर्धेत कु. वैष्णवी किशोर चितळकर हीने सहभाग नोंदवुन उत्तम कामगीरी केली. या यशाबद्दल म. वि. प्र. संचालक (नांदगाव) अमितभाऊ बोरसे यांनी विदयार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे दोन्ही विदयार्थिनींचे सत्कार करुन पुढील खेळाच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . तसेच ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षकांनी विदयार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले.
वरील दोन्ही विदयार्थिनीस तंत्र व कौशल्याचे मार्गदर्शन महाविदयालयाचे उपप्राचार्य (ज्यु. कॉलेज) डी. एम. राठोड,  सिनीअर महाविदयालयाचे क्रीडासंचालक  आर. डी. वडजे सर व दिलीप आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.
 

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलश पूजन, अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,



 नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील  मंगळने येथे  आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे हे उपस्थित होते.  या प्रसंगी प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेत. ह. भ. प. नामदेव महाराज बोगीर यांच्या काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतला. 
  या वेळी बोलताना आमदार म्हणाले की लोकप्रतिनिधी या नात्याने मी जे जे काही शक्य होईल ते करत आहे आणि ते सर्व इथे बसलेल्या माता भगिनी आणि माझ्या बांधवांमुळेच शक्य झाले आहे, या पुढेही प्रत्येक सुख दुखःत मी आपल्या सोबत आहे आपण हाक द्या मी साद देईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. 
   ग्रामस्थांनी आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे पुष्पहार देत सत्कार केला. सौ.अंजुम ताई कांदे यांनी ग्रामस्थ महिलांशी संवाद साधला.  या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूलचा ७४.वा प्रजासत्ताक दिन साजरा



नांदगाव (प्रतिनिधी) -  दि.२६ जानेवारी रोजी 
नमन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संजय बागुल , संस्थापिका सौ.सरिता बागुल ,लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या प्रांगणात ७४ वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
        आजच्या प्रजासत्ताक दिनाचे आकर्षण म्हणजे संस्थेने आपल्या परीसरातील शेतकरी बांधवांना बोलवून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  ७४. वा प्रजासत्ताक दिनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या शेतकरी पालकांना निमंत्रित करण्यात आले होते.आणि म्हणूनच आजचे ध्वजारोहण तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या हस्ते पार पडले.बाळासाहेब बागुल (पोखरी),जगन्नाथ बोगीर (हिसवळ) शंकर शिंदे (दहेगांव),सर्जेराव पवार (साकोरे),सौ.सुमनबाई काशिनाथ सुरसे,राहुल काशिनाथ सुरसे (साकोरा),गणेश मोरे (मांडवड),.अंबादास जगधने सर (जगधने वाडा) योगेश बोगीर (हिसवळ),शिवाजी पाटील (क्रांतिनगर ,नांदगाव), प्रविण मोरे (साकोरे),रघुनाथ सांगळे (कासारी ,जळगांव) नरसिंग ठोके(साकुरी,मालेगाव)निलेश व सौ पुजा पाटील (बाणगाव),पुंजाराम सानप (वेहळगाव) रामेश्वर सदगिर ,(टाकळी),मधुकर राठोड (पिंप्राळे)‌ रविंद्र व सौ.पल्लवी सोनवणे (हिसवळ),राजेंद्र सुर्यवंशी (मांडवड),भाऊसाहेब बागुल (दहेगांव),.पोपट डांगे (दहेगांव) संदिप फोडसे (टाकळी),शरद गोराडे (बाणगाव),मनोज म्हस्के (टाकळी), प्रशांत सुर्वे (चांदोरा)
सर्व शेतकरी बांधव तसेच महेश पेवाल ( पत्रकार) ,बाबासाहेब कदम ( पत्रकार) ,अनिल धामणे (पत्रकार) तसेच विठ्ठल राजाराम भाबड ,बबनराव साळी ,सूरज खैरनार (नांदगाव) आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.उपस्थित मान्यवर तसेच संस्थापक संजय बागुल व संस्थापिका सौ.सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा खांडेकर रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता सुर्यवंशी यांच्याहस्ते सरस्वती पूजन ,ध्वजपूजन आणि मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि ध्वजगिताने लय धरला.यानंतर मार्च पास करण्यात आला.
               संस्थापक बागुल सर व संस्थापिका सौ.बागुल यांच्याहस्ते उपस्थित सर्व मान्यवरांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.नमन शिक्षण संस्थेचे संस्थापक  बागुल सर व संस्थापिका सौ बागुल लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा खांडेकर रेंनबो इंटरनशनल स्कूल मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता सुर्यवंशी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले.  सर्व मान्यवरांच्या आसन व्यवस्थेनंतर शालेय प्रांगणात चिमुकल्यांचे नृत्याविष्कार सुरू झाले. एका मागोमाग एक धमाकेदार तसेच हृदय द्रावक नृत्याविष्कार उपस्थित वर्गाच्या डोळ्यात पाणी आणणारे होते.जणू चिमुकले या ठीकाणी शेतकरी राजाची करूण कहाणी मांडत होते.शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि होणारे नुकसान तसेच बळीराजाची विवंचना यांचा लघुचित्रपट दाखवत होते.
             नृत्यादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत अतिशय समर्पक शब्दांत मयानंतर उपस्थित पालकांनी शाळेबद्दल तसेच उपक्रमांबद्दल कौतुक करत अतिशय समर्पक शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.
  उपस्थित सर्व मान्यवरांचे नमन शिक्षण संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतिशय सुरेख रित्या सहशिक्षिका.सौ.ज्योती सुरसे व सौ.वर्षा नगे यांनी केलेे. हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यासाठी लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले अंकिता सरोदे भाग्यश्री शिंदे धनश्री न्याहारकर पूनम सोमासे विजेता पिलके सुरेखा गायकवाड नेहा पाटील ,संदीप पांडे ,राहुल उपाध्याय मोहन सुरसे अनिता जगधने, क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड जयश्री चौधरी चैताली अहिरे रोहिणी पांडे अश्विनी केदारे ,दिव्या शिंदे ‌तसेच मदतनीस श्रीमती अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला.

जळीतग्रस्तांसाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून गृहसंसार उपयोगी वस्तूंची भेट,



  नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगाव तालुक्यातील दोन कुटुंबियांच्या झोपडीस आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या कुटुंबियांना आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते गृह उपयोगी संसार भांडे कपडे अन्नधान्य भेट देण्यात आले. 
   नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथील ऊसतोड कामगार विलास श्रावण सोनवणे, सौ. सखुबाई विलास सोनवणे, यांच्या झोपडीला आग लागून सर्व संसार खात झाला तसेच पळाशी येथील साहेबराव भावडू गायकवाड मोठ्या प्रमाणात संसाराची हानी झाली. दोन्ही कुटुंबांना आज आमदार निवास बोलावून त्यांना कपडे गॅस शेगडी संसार उपयोगी भांडे गहू तांदूळ देण्यात आले.
      याप्रसंगी जिल्हाप्रमुख किरणभाऊ देवरे, प्रमोदभाऊ भाबड, विलासभाऊ आहेर, राहुल वाघ अनिल पवार, प्रकाश आव्हाड, रंगनाथ आव्हाड, सौ.रोहिणी मोरे, सौ.संगीता अनिल पवार, सौ. निराली राहुल वाघ, आदि उपस्थित होते.

नांदगाव महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 'लेखक तुमच्या भेटीला' कार्यक्रम संपन्न,




नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा- १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे व 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कवी, गीतकार मा. श्री. विष्णू थोरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात आपली बोली आणि परिस्थिती सांभाळून कसे लेखन होत आहे याची जाणीव त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील कवितांद्वारे करून दिली. अलीकडच्या काळात मराठी भाषा संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे, ही शोकांतिका देखील त्यांनी आपल्या वक्तव्यातून मांडली. त्याचसोबत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगाव चे अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे यांनी त्यांच्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.वाय.आर.वाघ यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा.के.टी.बागुल व आभार प्रदर्शन डॉ.बी.बी.धोंगडे यांनी केले.


Thursday, January 26, 2023

मनमाड शहर सार्वजनिक शिवजयंतीच्या अध्यक्षपदी आमदार सुहास आण्णा कांदे तर कार्याध्यक्षपदी मयूरभाऊ बोरसे यांची निवड



मनमाड (प्रतिनिधी ) -   सार्वजनिक जयंती उत्सव समिती  मनमाड शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, समाजबांधव, नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते सार्वजनिक शिवजयंतीच्या अध्यक्षपदी आमदार सुहास आण्णा कांदे तर कार्याध्यक्ष पदी मयूरभाऊ बोरसे यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.


जातेगावला प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू



जातेगाव , नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ वय १५ इयत्ता नववी हिचे दि २६ जानेवारी रोजी शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर सालाबाद प्रमाणे येथील ग्रामपालिकेच्या ध्वजारोहणासाठी जात असताना सुरू असलेल्या प्रभात फेरी दरम्यान " वंदे मातरम भारत माता की जय " या घोषणा देत असताना चक्कर येऊन पडल्याने तिला उपचारासाठी तात्काळ बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. पुजा हिची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जायभार यांनी सांगितले कु पुजास नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. नांदगाव ला जात असताना च पूजा चे निधन झाले. याबाबत पुजा हिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तीला जन्मापासूनच श्वासोस्वास घेण्यास तकलीफ होत असल्याने तिची तपासणी केली असता तिच्या फुफुसाला होल असल्याचे सांगितले होते, त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. परंतु तिचे शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली, तीच्यावर शोकाकुल वातावरणात येथील स्मशानभूमीत १२ वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. 
विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात त्यातून शक्य तितकी मदत तिच्या पालकांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली, तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत असलेले सर्व नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम वरील घटनेमुळे रद्द करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदगाव मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा,


 
नांदगाव ( प्रतिनिधी)  - नांदगाव शहरात दि. २६ जानेवारी रोजी नांदगाव नगरपरिषद प्रांगणात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विवेक पंडितराव धांडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शहरातील व्ही जे हायस्कूलमधील एन सी सी च्या पथकाने यावेळी पथसंचलन करून राष्ट्रध्वजास मानावंदना दिली.या प्रसंगी नांदगाव शहरातील अनेक मान्यवर, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. नगरपरिषद इमारतीस व शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास आकर्षक रोशनाई करण्यात आलेली आहे.

Wednesday, January 25, 2023

इंदिरानगर तळवाडे येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा,


नांदगाव (प्रतिनिधी)  -     इंदिरानगर तळवाडे शाळेत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना बच्छाव मॅडम यांनी केले.यावेळी मा.पं. स. सभापती सुभाषभाऊ कुटे,सरपंच शीतल निकम,उपसरपंच प्रभाकर दोंड, शा.व्य.समिती अध्यक्ष हरिभाऊ घुगे,ग्रा.पं.सदस्य प्रभाकर माळी, मा.सरपंच नामदेव सोनावणे, गणेश निकम,शांताराम सातले उपस्थित होते.
   यावेळी बंजारा समाज तालुका अध्यक्ष समाधान चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांना अंकलिपी वाटप केली.तसेच शाळेतील शिक्षक श्री महेश थोरे यांनी त्यांच्या मातोश्री कै.ठकुबाइ थोरे यांच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांना जलकुम्भ् बांधून दिले.त्याचे उद्धातन् उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश थोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संभाजी घुगे यांनी केले.

वंचित आघाडीकडून नुतन तालुकाध्यक्ष, कार्यकर्त्यांचा सत्कार,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक  येथे वंचित बहुजन आघाडी शहराच्या वतीने  नूतन वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर व सर्व कार्यकरणी चे सहर्ष स्वागत व सत्कार करण्यात आला होता. त्या प्रसंगी नांदगांव शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवर वंचित आघाडीच्या मनमाड शहराध्यक्षा  ऍड. आम्रपाली  निकम , शिवसेना ठाकरे गटाचे नांदगाव तालुका प्रमुख   संतोष अण्णा गुप्ता, ठाकरे गट शहरअध्यक्ष  श्रावण आढाव , वंचित आघाडीचे नांदगाव तालुका उपाध्यक्ष वसंत  निकम , तालुका सचिव रंजित अहिरे ,  नांदगाव शहराध्यक्ष  अविनाश केदारे , शहर कार्यअध्यक्ष शरद बागुल , शहर सचिव राहुल पगारे ,  सामाजिक कार्यकर्ते जितू बागुल, प्रवीण गरुड, आकाश साळवे, सुमित निकम, दिपक कळमकर, हेमंत जगताप, किरण मोरे आदी सर्व कार्यक्रत्ये उपस्थित होते.

नांदगाव येथे आशासेविकांचे मुक्काम आंदोलन,



नांदगाव (प्रतिनिधी) -  कोरोना प्रोत्साहन भत्ता २४ हजार रुपये अदा करण्यात यावे या मागणीसाठी तालुक्यातील आशासेविका यांनी पंचायत समितीसमोर मुक्काम आंदोलन सुरु केले. जो पर्यंत कोरोना प्रोत्साहन भत्ता २४ हजार रुपयांचा धनादेश मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी भूमिका नाशिक जिल्हा आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीटू संघटनेच्या वतीने घेण्यात आली. आंदोलनात विजय दराडे, कल्पना शिंदे, दीपाली कदम, इंदुमती गायकवाड, चित्रा तांबोळी, शीतल आहेर, शारदा निकम, रोहिणी आहेर, मनीषा पाथरे, लता लाठे, दीपाली सानप, वृषाली बोरगुडे, पल्लवी साळुंखे, संगीता सोनवणे, स्वाती खैरनार, सुप्रिया पाटील, प्यारीबाई राठोड, वंदना जगताप, उज्ज्वला खताळ, छाया सोनवणे, वैशाली जगताप, भारती बोडखे, परिघा पवार, सोनाली माळवतकर, छाया लोंढे यासह मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

Monday, January 23, 2023

नांदगाव शहरात शिवसेना ठाकरे गटातर्फे हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन ,


 नांदगाव ( प्रतिनिधी) -  शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पूजन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नांदगांव शहर तर्फे करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता,  शहर प्रमुख श्रावण आढाव,  मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष  पत्रकार सुरेश शेळके, एस के ( सूर्यभान) खैरणार , पवन दिवे ,भीमा शिंदे, चेतन शिंदे  ,नुरा खान, असिफ पिंजारी, सुनील सोनवणे, प्रकाश गवळी ,भिका मोरे ,संतोष बनगर,  सुशील सोनवणे ,विजू थोरात, तेजस बोरले  आदी सह शिवसैनिक उपस्थित होते.

नांदगाव येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात ,



नांदगाव (  प्रतिनिधी) -  नांदगाव मधील  बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे रेल्वे मालधक्का येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  या निमित्ताने उपस्थित त्यांना लाडू पेढे व मिठाई वाटप करण्यात आले.
     याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण  देवरे, गुलाब  भाबड, डॉक्टर सुनील तुसे,  शहर प्रमुख सुनील जाधव , युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे , राजाभाऊ देशमुख , नूतन कासलीवाल,  मिथुन पवार , आनंद कासलीवाल,  प्रदीप कासलीवाल,  सचिन साळवे,  बाळू शेवरे,  गुलाब चव्हाण , दीपक मोरे,  भरत पाटील , शशिकांत सोनवणे , महेंद्र गायकवाड , युवासेना शहर प्रमुख मुज्जू शेख , कपिल तेलोरे , किरण फुलारे , सुनील सोर , रवी सोनावणे,  किरण शर्मा , सिद्धेश खरोटे, विकी पवार , प्रकाश शिंदे , अय्याज शेख, सद्दाम शेख आदि सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनमाड शहरात बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी,



मनमाड (प्रतिनिधी)  -  मनमाड शहरात  बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे  हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना , भारतीय जनता पार्टी , आरपीआय , पीपल्स रिब्लिकन पार्टी   या पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  मनमाड शहरात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

शिवसेना ठाकरे गट - वंचित बहुजन आघाडीत युती झाल्याने नांदगावात जल्लोष,



 नांदगाव ( प्रतिनिधी) -     महाराष्ट्रातील राजकारणाचा  नवा अध्याय सुरु झाला आहे. राज्यात शिवशक्ती व भीमशक्तीच्या युती ची  घोषणा झाली असून  उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी यांची  युती ची घोषणा झाली. नांदगांव वंचित बहुजन आघाडी शहर व शिवसेना ठाकरे गट हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नांदगांव येथे एकत्रित येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व मिठाई वाटून आनंद साजरा केला व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या  होत्या.  त्या प्रसंगी ठाकरे गटाचेेे शिवसेना तालुका अध्यक्ष संतोष अण्णा गुप्ता , नांदगाव शहराध्यक्ष श्रावण आढाव ,  वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष अविनाश केदारे , जेष्ठ नेते
अरुण साळवे, जगताप सर, विलास कोतकर, बागुल साहेब, अर्जुन पवार , जितू बागुल,प्रवीण गरुड, दिपक कळमकर, शुभम त्रिभुवन, समाधान लाठे, चेतन शिंदे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.

Saturday, January 21, 2023

नांदगावच्या रेंनबो इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष भेट,



नांदगाव (प्रतिनिधी)   -  आज शनिवारी दि. २१  जानेवारी नमन एज्युकेशन सोसायटी  संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल  विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल,   उपाध्यक्ष सरिता बागुल,  रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली.  शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी नांदगाव पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष भेट दिली. शाळेच्या वतीने असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर पाटील सर पोलीस कॉन्स्टेबल  मुंढे सर पोलीस कॉन्स्टेबल  पिंपळे यांना थँक्यू कार्ड देण्यात आले. तेथे गेल्यावर  अधिकारी  पाटील यांनी सर्वांना पोलिसांची भूमिका समजावून सांगितली. त्याचबरोबर तेथील क्राईम रूम, तक्रार कक्ष, कारागृह यांची मुलांना प्रत्यक्षरीत्या माहिती दिली व मुलांनी समाजाशी कशा प्रकारचे वर्तन करावे हे समजावून सांगितले. सर्वात शेवटी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर  पाटील यांनी मुलांना खाऊ वाटप केले.
          ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी, एडना फर्नांडिस, मोनाली गायकवाड,  दिव्या शिंदे , चैताली अहिरे, अश्विनी केदारे,  रोहिणी पांडे ,मोहन सुरसे ,संदीप पांडे तसेच मदतनिस वैशाली बागूल , छाया आवारे ,ड्रायव्हर विनोद चौधरी, बाळू गायकवाड, सागर कदम, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल, यांनी अतोनात मेहनत घेऊन आजची ही भेट उत्तम रित्या घडवून आणली.

Friday, January 20, 2023

नांदगाव तालुक्यातील गिरणानगर येथे राष्ट्रीय सेवा योजना +२ चे हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन,

छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर 


नांदगाव (प्रतिनिधी) -    म. वि.  प्र. समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगावचे राष्ट्रीय सेवा योजना +२ चे हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराचा नांदगाव तालुक्यातील मौजे गिरणानगर   येथे गुरूवार दि. १९  रोजी उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विश्वासराव दौलतराव कवडे (वरिष्ठ महाविद्यालयीन स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मविप्र संचालक अमित उमेदसिंग बोरसे,ज्येष्ठ नेते रमेश पुरुषोत्तम बोरसे,प्रसाद सोनवणे ,सर्जेराव आबा पाटील, विस्तार अधिकारी  विजयकुमार ढवळे, सरपंच श्रीमती अनिता पवार, उपसरपंच अनिल आहेर,सर्व ग्रामपंचायत सदस्य- कर्मचारीवर्ग व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत,गिरणानगर व ग्रा.प.कर्मचाऱ्याच्या वतीने मविप्र नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे यांनी प्रास्ताविकेतुन शिबिराचे महत्त्व व राष्ट्रीय सेवा योजना चळवळ ही विद्यार्थ्यांच्या श्रम संस्काराचे व्यक्तिमत्व विकासाचे जणू विद्यापीठच आहे असे मनोगत व्यक्त केले.श्रमसंस्कार शिबिरात येणारे अनुभव हे आपल्याला प्रेरणा देतात. आर.एल. दिवटे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेविषयीची माहिती सांगितली. युवा नेते प्रसाद  सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष अमितभाऊ बोरसे यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता व आपला व्यक्तिमत्व विकास साधण्याचे आवाहन केले व सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे सहभाग घेतल्याबद्दल विशेष कौतुक केले. उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस.ए.मराठे यांनी केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.सुत्रसंचालन बी.के.पवार यांनी केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डी.आर.बच्छाव आर्.एल.दिवटे,डी.पी.दुसाणे,डी.एल.आहेर श्रीमती एस.ए. लोखंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-कर्मचारीवृंद यांनी हिरीरीने सहभाग घेतला.

Tuesday, January 17, 2023

नांदगाव च्या महाविद्यालयातील खेळाडूंना विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत यश,

छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर 


नांदगाव( प्रतिनिधी) -  महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नंदुरबार आणि क्रीडा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा अंडर १९ वर्षे वयोगटाच्या दि. १३ जानेवारी रोजी क्रीडा संकुल नंदुरबार येथे संपन्न झाल्या होत्या. ह्या स्पर्धेसाठी नांदगाव ज्यूनियर कॉलेजच्या मुले व मुलींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत मुले व मुलींनी सर्वोत्तम कामगिरी करून यश संपादन केले. या स्पर्धेत वैष्णवी चितळकर हीने सुवर्णपदक घेऊन प्रथम क्रमाकांने विजयी झालेली आहे. तिची पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर स्पर्धक माधुरी ठोंबरे हिचा विभागात व्दितीय क्रमांकाने विजयी झाली. सुनिता डोळे व्दितीय क्रमांकाने विजयी झाली. मुलांमध्ये ईश्वर पवार यांने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
       सर्व स्पर्धकांना मराठा विद्या प्रसारक समाज चे नांदगाव संचालक इंजि. अमित बोरसे यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे यांनी विजयी खेळाडूचा सत्कार केला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मराठे सर व शिक्षक, शिक्षकेतर वर्गांनी यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना योग्य व तांत्रिक कौशल्याचे मार्गदर्शन ज्यु. कॉलेजचे उपप्राचार्य डी.एम. राठोड, क्रीडा संचालक आर. डी. वडजे , दिलीप आहिरराव, ज्यु. कॉलेजचे उपप्राचार्य आर.टी. देवरे यांचं सहकार्य लाभले होते.

Friday, January 13, 2023

नांदगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुखपदी श्रावण आढाव,


नांदगाव / मनमाड (प्रतिनिधी) -  नांदगाव शहरातील श्रावण आढाव यांची नांदगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. नांदगांव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नांदगांव शहर प्रमुख पदी श्रावण आढाव यांची नियुक्ती आज मनमाड मध्ये संपर्क प्रमुख जयंत भाऊ दिंडे यांनी केली . तर  नियुक्तीपत्र जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या हस्ते देण्यात आले. नियुक्ती नंतर शहरवासीयांन व शिवसैनिकां तर्फे नांदगांव शहरात त्यांचे जल्लोषाने स्वागत झाले.  सर्व शिवसैनिकानी एकत्र जाऊन शहरातील महापुरुषाच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी शिवसेना संतोष गुप्ता तालुका प्रमुख  रईश कुरैशी, संदिप पांडे,सूर्यभान खैरनार, चेतन शिदे राजु शेख, अंबादास कसबे, शंकर अकावरे,बाळा बोरसे, यश आढाव, सुमित गुप्ता, गणेश बडोदे, सुनील सोनवणे, राहुल दरगुडे,रंजित आहीरे, राहुल त्रिभुवन,रुषिकेश सोनवणे, निलेश काळे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात रंगला पतंगोत्सव,



 नांदगाव (प्रतिनिधी) -  आज दि.१३ जानेवारी रोजी नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव यांनी शाळेत पतंगोत्सव साजरा करण्यात आला.  विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत  नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात आला.  शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी मकर संक्रांत निमित्त पतंग उडविण्याचा आनंद घेऊन हा सण साजरा केला.
 शाळेचे प्रांगण रंगेबीरंगी पतंगाणे भरलेले होते. मुलांनी नवनवीन रंगेबीरंगी कपडे परिधान केलेले होते. मुलांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत पतंग उडविण्याची मजा घेतली.तसेच सर्वांनी एकमेकांना तिळगूळ वाटप करत मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा दिल्या.अशी अनोखी पतंगाची आतीष बाजी आज रेंनबो इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडली. शेवटी शाळेचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल यांनी सर्वांना मिठाई वाटप केली. 
          हा उत्सव उत्तम रित्या घडवून आणण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड दिव्या शिंदे चैताली अहिरे अश्विनी केदारे, रोहिणी पांडे, तसेच मदतनिस वैशाली बागूल , अनिता नेमनार रविंद्र पाटील  यांनी  मेहनत घेऊन आजचा हा उत्सव उत्तम रित्या घडवून आणण्यात आला.

नांदगाव रेल्वे स्टेशनवर कामायनी , झेलम एक्स्प्रेसचे थांबा मिळण्याचे आश्वासन,



नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे थांब्यासाठी अनेक बैठका, आंदोलने, निवेदने दिली गेली. त्यातील फक्त मोजक्या गाड्यांना थांबा मिळाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नांदगाव रेल्वे स्टेशन वर गाड्या थांब्यासाठी आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ. भारती प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले की  कामायनी, झेलम आणि पुणे भुसावळ हुतात्मा या तीन गाड्यांसाठी त्यांना  रेल्वे प्रवासी अप/डाऊन नांदगांव तर्फे निवेदन देण्यात आले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर कामायनी व झेलम या दोन गाड्यांचे थांबा मिळण्याचे आश्वासन दिलेले आहे. दोन्ही गाड्यांचा थांबा मिळाला तर यांचा फायदा चाकरमानी, विद्यार्थी, व्यापारी इत्यादी मिळणार आहे.

नांदगावात हेल्मेट घातले म्हणून वाहनचालकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार, पोलिसांनी वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त उपक्रम राबवला,

नांदगाव (प्रतिनिधी)  -  नाशिक जिल्ह्यात वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या माध्यमातून पोलीस अधीक्षक शहाजी उमाप  व जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक देविदास डुमणे  यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथे मनमाड चौफुली कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाजवळ सुरक्षा सप्ताह निमित्त पोलीस उपनिरीक्षक व्ही जी रोकडे व व सहकाऱ्यांनी वाहन चालकांना विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना वाहन  नियम समजावून सांगितले . विना हेल्मेट वाहन चालवण्याचे दुष्परिणाम तसेच योग्य ते कागदपत्र असावे अशा सूचना व माहिती त्यांनी दिली होती. जे वाहन चालक हेल्मेट घालून योग्य ते कागदपत्र सोबत ठेवून वाहन चालवत होते अशांचा गुलाब पुष्प देऊन सत्कारही करण्यात आला . यावेळी पोलीस उपनिरीक्षक व्ही जी रोकडे  ,  पोलीस हवालदार नवनाथ शिंदे , भगवान सोनवणे, योगेश हिरे, सचिन वराडे व वाहन चालक विनोद शिंपी यांचाही  सुरक्षा सप्ताहात सहभाग होता‌.

Tuesday, January 10, 2023

नांदगाव महाविद्यालयाला कॉर्फ बॉल क्रिडा स्पर्धेत यश,

छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर.


नांदगाव ( प्रतिनिधी) -  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  , शारीरिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन कॉर्फ बॉल मुले व मुली यांच्या स्पर्धा शनिवारी दि. ७ जानेवारी रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत नाशिक विभागातील विविध महाविद्यालयातील संघाचा समावेश होता. नांदगाव महाविद्यालय च्या मुले - मुली संघाने सहभाग नोंदविला होता.  नांदगाव च्या महाविद्यालयाने सर्वोत्तम कामगिरी करताना के. व्ही.एन नाईक महाविद्यालयाला अंतिम सामन्यात ५-० ने पराभूत प्रथम क्रमाकांने विजयी झाले आहेत. या स्पर्धेत निखिल औशिकर ( संघनायक), रवि खैरणार, कैलास डोळे, कार्तिक औशिकर, ऋषिकेश घोलप, गणेश औशिकर, बाजीराव कासार, आश्विनी औशिकर, कोमल बच्छाव, प्राची सौर, पुजा पंगुडवाले, स्नेहल इंगळे, प्रतिक्षा पेहरे, रोशनी औशिकर, इत्यादी विद्यार्थी सहभागी झाले होते. या सामान्यांसाठी पंच म्हणून डॉ. सुरेखा दप्तरे, डॉ. दिनेश उकिर्डे , संकेत कदम यांनी काम पाहिले. 
       स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णु निकम सर, नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती, नाशिक अध्यक्ष प्रमुख पाहुणे डॉ. पी.व्ही. रसाळ, स्पर्धेचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे यांनी भुषविले होते. तसेच कनिष्ठ महाविद्यालयचे उपप्राचार्य आर.टी. देवरे यांनीही उपस्थिती दर्शविली होती.‌ सर्व विजयी खेळाडू चे म.वि.प्र. नांदगावचे संचालक इंजि. अमित बोरसे यांनी अभिनंदन केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  एस.एन. शिंदे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला होता. महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्गांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या खेळाडूंना योग्य, तांत्रिक कौशल्याचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक राकेश वडजे, उपप्राचार्य दयाराम राठोड, दिलीप अहिरराव यांचे सहकार्य लाभले होते.

नाशिक जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद भाबड,



  नांदगाव (प्रतिनिधी) -  नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. या वेळी झालेल्या चुरशीच्या लढाईत नांदगाव चे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नेतृत्वात आमदारांचे खंदे समर्थक प्रमोद भाबड यांची अध्यक्ष पदी निवड झाली.  
       जिल्हा मजूर संघाच्या संचालक पदासाठी गेल्या महिन्यात निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी २० जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १२ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. काल मंगळवारी दि. १० जानेवारी रोजी पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस होती. यात प्रमोद भाबड यांना १२ मते तर इगतपुरी चे ज्ञानेश्वर लहाने यांना ८ मते मिळाल्याने प्रमोद भाबड यांची बहुमताने अध्यक्ष पदी निवड झाली. तसेच संघाच्या उपअध्यक्ष पदी सौ. शर्मिला कुशारे यांची निवड झाली.   यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, विष्णू निकम, नगराध्यक्ष राजेश कवडे, आनंद कासलीवाल, राजेंद्र पवार, योगेश पाटील, राजेंद्र भोसले, केदा आहेर, साईनाथ गिडगे, तेज कवडे, किशोर लहाने, किरण देवरे, मयुर बोरसे, अमोल नावंदर, डॉ. सांगळे, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, अनिल रिंढे, दशरथ लहिरे, पंकज जाधव, जिल्हा मजूर संघाचे सर्व संचालक मंडळ तसेच उपस्थितांनी प्रमोद भाबड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बिहार प्रमाणे महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना व्हावी निवेदनाव्दारे मागणी,




नांदगाव ( प्रतिनिधी) -  नुकतीच बिहार मध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी अशी मागणी समता परिषदेने नांदगाव तहसीलदार  यांना निवदेनाद्वारे केलेली आहे.
    देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षे होत आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यादा पटवून दिले. सन २०१० च्या ५ मे ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, स्व.गोपीनाथराव मुंडे यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव  केला होता.
त्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीयांनी प्रयत्न केले होते. त्यातुन २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना (SECC 2011) केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली नाही.
    देशात सन २०२१ सालच्या नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. तरी, बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना करावी,अशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनेे कडून   मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्षज विजय पाटील,   अखिल समता परिषदेचे तालुकाध्यक्ष  अशोक पाटील , राष्ट्रवादी शहराध्यक्ष अरूण पाटील , माजी नगरसेवक  वाल्मीक  टिळेकर  , सुरज पाटील , प्रतिक  भाऊ , शंकर शिंदे , सचिन जेजुरकरसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Monday, January 9, 2023

व्ही.जे. हायस्कूलचा सोहम गायकवाड ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात जिल्हात पहिला, शाळेतील ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत मिळवलं स्थान,



नांदगाव ( प्रतिनिधी ) - शहरातील व्ही.जे.हायस्कूल नांदगाव येथील महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेली २०२१-२२ इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत ७ विद्यार्थांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून घवघवीत यश मिळविले त्यात ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत सोहम विलास गायकवाड या विद्यार्थाने जिल्हातील गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळवून यश संपादन केले.तर जानराव ईश्वरी योगेश (जिल्हात ७४ वी ),चौधरी सार्थक खंडू (जिल्हात ८९ वा),मोरे उन्नती नंदू (जिल्हात ३०८ वी) तसेच ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत बोरसे अथर्व संजय (जिल्हात १२५ वा ),आंबेकर श्रीरंग ललित (जिल्हात १३९ वा ) व घोडके दर्शन नाना (जिल्हात २५७ वा ) या विद्यार्थांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळाले. या यशाबद्दल शाळेच्या वतीने विद्यार्थाचा सत्कार करण्यात आला.या विद्यार्थांना शिष्यवृत्ती प्रमुख भास्कर मधे,व अनिल तांबेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल,तसेच नितेश पवार,अनिल पाटील, रविंद्र ठाकरे,प्रियंका पाटील,सुरेश नवासारे,राजेश भामरे,अनिता चौधरी,तृप्ती बागुल,उज्वला भोई,सुनिता जगताप,संगीता शिंदे,राकेश नन्नावरे, यांनी या परीक्षेत विषयाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र कलाल,सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला सी.व्ही.रमण अकादमी प्रमुख अकला कुलकर्णी शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे ,मुख्याध्यापक मनोहर बडगुजर,उपमुख्याध्यापक दिपक बाकळे ,पर्यवेक्षक मनोहर शिंदे ,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष गणेश चव्हाण व शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन केले.

Saturday, January 7, 2023

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नांदगाव तालुकाध्यक्षपदी सुरेश शेळके यांची बिनविरोध निवड,


नांदगाव / मनमाड (प्रतिनिधी)  -  नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नांदगाव तालुकाध्यक्षपदी सुरेश शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मनमाड येथे पत्रकार दिनी  पार पडलेल्या  विशेष बैठकीत शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक संजीव निकम जिल्हा कार्यकारीणी सदस्य बब्बू शेख,जेष्ठ पत्रकार बळवंत आव्हाड नरेश गुजराती यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
             नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या आदेशानुसार नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाची महत्वपूर्ण व विशेष बैठक मनमाड येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून घेण्यात आली.या बैठकीत सुरवातीला पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी आझाद आव्हाड यांनी प्रास्ताविक करत बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारिते बद्दल माहिती दिली.यावेळी बैठकीत नुतन तालुकाध्यक्ष निवडीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला जिल्हा समनव्यक संजीव निकम यांनी शेळके यांच्या नावाची घोषणा केली . मावळते अध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी नुतन अध्यक्ष सुरेश शेळके यांना पदभार दिला माझ्यावर जो विश्वास ठेवुन मला जी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली ती मी पूर्णपणे निभावेल असे मत व्यक्त केले.यावेळी किरण काळे,हेमराज वाघ,अजहर शेख,विनोद वर्मा,हेमंत गद्रे, शँकर विसपुते, मोहम्मद शेख,सचिन बैरागी,सतीश परदेशी,देशमुख, अनिल धामणे,बाबासाहेब कदम,अमोल बनसोडे,चंद्रकांत भालेराव, क्रांती आव्हाड,हिरामण मनोहर, महेश पेवाल, अविनाश पारखे,सिताराम पिंगळे,महेंद्र पगार,राजेंद्र तळेकर,भरत पाटील,ईश्वर जाधव,जगदिश अडसूळे यांच्यासह इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, January 4, 2023

संगणक परिचालक यांना सुधारीत आकृतीबंधानूसार कर्मचारी दर्जा व वेतनासाठी निवेदन,


नांदगाव (प्रतिनिधी) - काल  दि. ३ जानेवारी रोजी नांदगाव संगणक परिचालक संघटनेच्या वतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  खासदार डॉ.  भारती पवार यांना मनमाड येथे निवेदन देण्यात आले. तसेच नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे  यांना त्यांच्या निवास्थानी निवेदन देऊन  राज्य सरकार कडे यावलकर समितीच्या अहवालानुसार संगणक परिचालक यांचा आकृतीबंध मध्ये समावेश करण्याची शिफारस करावी असे असं निवेदनात मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना नांदगाव तालुका संगणक परिचालक संघटना अध्यक्ष  सोमनाथ उडकूडे सचिव  श्रीकांत जगताप ,  उपाध्यक्ष अरुण जाधव व सदस्य उपस्थित होते.

नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा,



  नांदगाव (प्रतिनिधी)   -   आज आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी मुळडोंगरी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित लोक नियुक्त सरपंच जनाबाई सुरेश पवार, सदस्य सतिष मोरे , चंद्रकाला पवार, गोटिराम चव्हाण, घिमाबाई बागुल, सुनिता सोनवणे, राधाबाई घुसळे ,वाल्मिक ठाकरे , वि.वि.का.सो. चेअरमन शुभम कासलीवाल, सोबतच सर्व सदस्यांचा शिंदे गटाच्या बाळासाहेबांची  शिवसेना पक्षात प्रवेश सोहळा संपन्न झाला.
   आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले, सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलतांना गावाच्या विकासासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे, आपल्या प्रत्येक अडी अडचणी मला सांगा मी सर्व सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. आपल्याला पक्षात मान सन्मान मिळेल, मतदार संघाचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे आणि प्रत्येक विकास कार्यात मी आपल्या सोबत राहील असा विश्वास आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांना दिला.
 या प्रसंगी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नुतन कासलीवाल, मिथुन पवार , बाळासाहेब कवडे, प्रमोद भाबड, जिल्हाप्रमुख किरण देवरे,रमेशभाऊ मोरे कीरण मोरे लखा चव्हाण सजंय चव्हाण भैय्या राठोड खडू राठोड रमेश चव्हाण सतोष चव्हाण दादा टेलर एन.के.राडोड , डॉ.प्रकाश चव्हाण, मुलचंद मोरे, सुनिल जाधव, सागर हिरे, संजय आहेर व ग्रामस्थ उपस्थित होते.

नांदगावात आमदार सुहास आण्णा रहेनुंमा फाउंडेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न



नांदगाव (प्रतिनिधी) -  मुस्लिम समाजातील विविध सामाजिक, शासकीय प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली रहेनुमा फाउंडेशन ची स्थापना केली आहे. याचे अद्ययावत सुविधा असलेले संपर्क कार्यालय कोर्ट गल्ली, नांदगाव येथे सुरू केले असून या कार्यालयाचे उद्घाटन आज अंजुम  सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
   रहेनुमा फाउंडेशन चे कार्याध्यक्ष रियाज पठाण यांनी उपस्थितांना फाउंडेशन चे उदिष्ट समजाऊन सांगितले, सचिव अयाज शेख यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार तळागाळातील मुस्लिम कुटुंबीयांना शासकीय योजना, कागदपत्रांच्या अडचणी, सामाजिक अडचणी सोडवता याव्या या साठी या फाउंडेशन ची निर्मिती केली असल्याचे सांगितले.
    अंजुम  कांदे यांनी बोलताना उपस्थित नागरिकांना फाउंडेशन च्या माध्यमातून सामुदायिक विवाह सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अडचणी सोडवून घ्या, महिलांना ही पुढे आणा, ज्यांना मदत पाहिजे त्यांना फाउंडेशन च्या कार्यालयात घेऊन या असे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष सईद शेख, कार्याध्यक्ष रियाझ पठाण, सर चिटणीस आयाज शेख वर सदस्यांनी केले. 
        या प्रसंगी महिला आघाडी शहराध्यक्ष रोहिणी मोरे, शहर समन्वयक भारती बागोरे, उपाध्यक्ष तबस्सुम शेख, शबाना शेख माजी नगराध्यक्षा, फरजाना मॅडम, महेजबिन निहाल शेख, नगिना पठाण, रिजवाना अयाज, शबाना अक्रम शेख, अंजुम पठाण, रुक्साना खाला,शाहीन शेख, मिनाज, मुमताज आपा, साबेरा खाला, हाजी मुनव्वर, इकबाल प्रिया, मुफ्ती फहीम, भैया चव्हान सर, खलील जनाब, हाजी युसूफ जमजम,अख्तर भाई, अय्याज कुरैशी,अल्ताफ खान, अनिस मिर्झा न्यायडोंगरी, मौलाना अकील, हाफिज मन्नान साहेब, इसहाक भाई जवलकी, सय्यद सबदर,साजिद तांबोळी, असलम तांबोळी, युनूस जनाब,रफिक मुसा,हाजी रशीद, हाजी अयुब,हाजी अब्दुल रहेमान,हाजी सरफराज,सय्यद रहेनूमा कार्यकारणी मंडळ व सदस्य, सभासद, मुस्लीम समाज समन्वय समिती सदस्य असंख्य मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, January 3, 2023

नांदगाव तालुक्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण,


नांदगाव (प्रतिनिधी) -   राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या  जयंती निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नांदगांव तालुक्याच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे  पुजन करुण पुष्पहार  अर्पण  करण्यात आले. यावेळेस समता परिषदेचे पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व सर्व सामाजिक संस्थेतील पदाधिकारी इतर सामाजिक कार्यकर्ते व संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते.  समता परिषदेच्या वतीने आदिवासी मतिमंद विद्यालय गंगाधरी नांदगाव येथे सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यालयातील विद्यार्थ्यांना अल्पोहार व शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते . यावेळी नांदगाव शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद  शेलार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहरअध्यक्ष अरूण  पाटील,  समता परिषद तालुका अध्यक्ष अशोक  पाटील ,युवक शहर अध्यक्ष मुज्जू शेख, विजुभाऊ पाटील ,संतोष  गुप्ता, दया  जुन्नरे, विलास  राजोळे, वाल्मीक टिळेकर, राजाभाऊ सावंत काका, सोळशे, सचिन  जेजुरकर,  शंकर शिंदे, दीपक खैरनार, विजुभाऊ जाधव, , सागर आहेर, वसंत सोनवणे, गोविंद जाधव, सुधाकर अण्णा निकम, बाळासाहेब देहाडराय, अरबाज शेख, फेज शेख, सलमान पठाण, मंजूर शेख , कचरू   त्रिभुवन, संजू पवार, सोमनाथ पाटील, रिंकेश जाधव, सुनील खैरनार, दत्तू खैरनार, माणिक बाविस्कर, गणेश जेजुरकर, योगेश भागवत, मंगेश आहेर, विश्वजीत जाधव, रवी बिडवे, योगेश पैठणकर, अशोक सौर, चंद्रकांत काकळीज, रोहिदास सोनवणे सर्व मान्यवर उपस्थित होते.

नांदगाव मतदार संघातील नवनिर्वाचित सर्व सरपंच व सदस्यांचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून सत्कार,



नांदगाव (प्रतिनिधी) - आज दि. ३ जानेवारी रोजी आमदार निवासस्थानी आमदार सुहास आण्णा कांदे व  अंजुमताई कांदे यांनी मतदारसंघातील सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. 
    नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यावेळी उपस्थित होते. मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी मी बांधील आहे गावातील अंतर्गत रस्ते भूमिकात गटारी ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी सभा मंडप आदींच ग्रामपंचायतच्या विकासातील महत्त्वाची काहीही कामे असल्यास मला हक्काने सांगा ते मी मार्गी लागेल असे यावेळी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मत व्यक्त केले. 
          याप्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश काका बोरसे, पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर, जिल्हाप्रमुख किरण देवरे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, योगेश (बबलू) पाटील, बाळासाहेब कवडे, डॉक्टर संजय सांगळे, किशोर लहाने, प्रमोद भाबड, आनंद कासलीवाल, राजेंद्र देशमुख, धनंजय (बाळू आप्पा) कांदे, ज्ञानेश्वर कांदे, संजय आहेर, अमोल नावंदर, अंकुश कातकडे,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता ताई बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे, अनिल तात्या रिंडे, संग्राम नाना बच्छाव, दत्तू भाऊ निकम अशोक शेवाळे, सुधीर देशमुख राजाभाऊ सांगळे, दसरथ लाहिरे, एन के राठोड, पंकज जाधव पिंटू भाऊ वडघर, आबा नाईकवाडे, विठ्ठल पगार, भागचंद तेजा, शहर प्रमुख सुनील जाधव, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, भाऊराव बागुल, अण्णा मुंढे, आदि सह मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव बस आगाराप्रमुखांना निवेदनाव्दारे मागणी,




 हिसवळ बु.  नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु. येथे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत माध्यमिक विद्यालय असून या विद्यालयामध्ये हिसवळ बु.,  शास्त्रीनगर, धोटाने खु., काळेवस्ती, तसेच परिसरातील अनेक गावांमधून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.  परंतु सकाळी १०:३० वाजता शाळा भरण्याच्या वेळेत व सायंकाळी ०४:३० वाजता शाळा सुटण्याच्या वेळेत बस नसल्याकारणाने बऱ्याच विद्यार्थ्यांना घरीच राहावं लागतं किंवा प्रयत्न करून शाळेत आल्यानंतर घरी जाण्यास लवकर गाडी मिळत नसल्यामुळे रात्री उशिरा घरी जावं लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.  प्रवास साठी विद्यार्थ्यांना एस. टी. चा रितसर पासही काढला आहे. शाळेत जाण्यासाठी  ७० मुली व ४० मुलं असे एकूण ११० विद्यार्थी आहेत. या सर्व मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा महत्त्वाचा प्रश्न असून ते शिक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो. ‌‌यापूर्वी पालकांनी, स्थानिक ग्रामपंचायतींनी, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी आगार प्रमुख यांना वेळोवेळी विनंती केली असून, परंतु त्यांनी त्यांची कुठलीही दखल आपल्या स्तरावरून घेतली गेलेली नाही.  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी त्वरित बस सेवा सुरू करण्यात यावी. मागणी मान्य न झाल्यास  नांदगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलने छेडण्यात येतील व त्यांच्या होणाऱ्या परिणामास बस आगार  जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असा ईशारा  नांदगाव आगार प्रमुख  यांना देण्यात आला आहे. निवेदन देण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय पाटील, युवक अध्यक्ष सोपान पवार, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, सोशल मीडिया अध्यक्ष वाल्मिक टिळेकर, महात्मा फुले समता परिषद अध्यक्ष अशोक पाटील,दत्तू पवार, दारासिंग भिडे, बाळासाहेब देहाडराय,अरूण अप्पर,डगळे सर, देशमुख सर,सनी पवार इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...