Sunday, October 30, 2022

नांदगाव तालुक्यातील बाणगांवमध्ये तब्बल २३ वर्षांनी भरला शाळेचा वर्ग, माजी विद्यार्थी, शिक्षकांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा,



बाणगांव  ( प्रतिनिधी) -  शाळेतील मस्ती,एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक,शाळेतील क्रीडा स्पर्धा,शिक्षकांनी दिलेली शिक्षा,स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी -शिक्षकांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.निमित्त होते बाणगाव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जनता विद्यालयात च्या इयत्ता १० वीच्या माजी विद्यार्थ्यांच्या गेट टूगेदर मेळाव्याचे.१९९९ नंतर जवळपास २३ वर्षनी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा गुरुवारी (ता.२७)ला राधाकृष्ण लॉन्स ला आयोजित करण्यात आला होता.
  १९९९ साली जनता विद्यालयचे वर्ग श्री बाणेश्वर मंदिर परिसरातील इमारतीत भरत असे तिथे पूर्वीच्या स्कुलच्या परिसरात सकाळी ९ वाजता शाळेतील माजी विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाणेशर मंदिरात एकत्र आले तिथे फेटे बांधून ग्रुप फोटो काढत कार्यक्रमस्थळी राधाकृष्ण लॉन्स येथे गेले कार्यक्रमात ची सुरुवातीला प्रमुख अतिथीनी सरस्वती देवीच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले ल या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोकुळ चव्हाण होते.यावेळी प्राथमिक शाळेचे माजी शिक्षक उत्तम आहेर जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पी.एस.काळे,शिक्षक शरद आहेर,शिक्षिका श्रीमती प्रतिभा मापारी- कदम,जनार्दन शिक्षकेत्तर कर्मचारी लासुरे आदी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या वेळी १९९९ बॅचला शिकवणारे शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन गुरुजनांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सध्या हायत नसलेल्या मृत्यु पावलेल्या माजी विद्यार्थी मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी यावेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार गुरुजनांच्या वतीने गुलाबाचे फुल देऊन करण्यात आला गेट टू गेदर कार्यक्रमात आलेल्या सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला अल्प परिचय करून दिल्यावर .यावेळी माजी विद्यार्थी चिंतामण साबळे,गणेश देवकर,बाबासाहेब कदम,उषा कवडे,चित्रा गोराडे,ईश्वरी काकळीज यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी जुन्या आठवणीला उजाळा देताना शिक्षकांच्या तासाला घडलेल्या प्रसंग,छडी,उठ बस्या,करण्याची शिक्षा,जादा तास,क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम,शैक्षणिक सहल याची आठवण करून दिली काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला.अनेक विद्यार्थी.वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. १९९९ च्या दहावी बँचचे विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले यामध्ये प्रामुख्याने उषा कवडे,गणेश देवकर, चिंतामण साबळे आणि सहकारी यांचे योगदानामुळे " क्लासमेंट " या ग्रुपच्या माध्यमातून जोडली गेली आहे व या पुढेही अशीच जोडलेली राहणार आहे,यावेळी माजी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना म्हणाले माजी विध्यार्थी, शिक्षक यांचे स्नेहसंमेलन घेण्यात आले याबद्दल या बेचस च्या विद्यार्थ्यांचे कोतुक केले या स्नेहसंमेलनामुळे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रीण,शिक्षक वर्ग यांच्या भेटी झाल्या हा क्षण वेगळाच असतो सर्व माजी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या,तब्बल २३ वर्षोनी आपल्या शाळेत येत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देता आले सर्वना एकत्र येत सवांद साधला आला वयाची जवळ जवळ चाळिसाव्या वर्षी ओलंडलेल्या माजी विघार्थ्यामध्ये यामुळे उत्साहाचे चैतन्य निर्माण झालले पाहवयास मिळाले.जिल्हा परिषदेच्या केंद्र प्राथमिक शाळेच्या व जनता विद्यालय.या शाळेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी आज राजकारण,उद्योग,शिक्षण,सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे.यानंतर सर्व शिक्षक माजी विद्यार्थ्यांच्या साठी भोजनाची मेजवानी देण्यात आली ‌. यावेळी माजी विद्यार्थी,गणेश देवकर,दिलीप खालकर,चिंतामण साबळे,संभाजी काजळे,शरद कवडे,त्रिनाथ पवार,मच्छिंद्र कवडे, संदीप गोराडे,बाबासाहेब कदम,बाजीराव सोनवणे,विजय रोठे विजय काळे,बाळासाहेब काकळीज,संदीप गोराडे,राहुल कदम,नंदु फणसे, गणेश बनगर,सोमनाथ भामरे,सुनील आहेर,संतोष बागुल,रामहरी ,निकम,संजय साबळे,उषा कवडे,चित्रा गोराडे,सुनीता गोराडे, सुवर्णा गोराडे,वैशाली कवडे,ईश्वरी काकळीज,निता जाधव,पदमा काकळीज,संगीता साबळे,मनिषा निकम कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन,आभार, उषा कवडे,बाबासाहेब कदम यांनी केले .

Saturday, October 22, 2022

नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांच्याकडुन ३५० कामगारांना दिवाळीची भेट,



नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव येथील रेल्वे माल धक्क्यावरील सर्व कामगार वर्गास आमदार सुहास आण्णा कांदे त्यांच्याकडून दिवाळीची भेट देण्यात आली. नांदगाव रेल्वे माल धक्का येथील जवळपास ३५० कामगारांना आमदार सुहास कांदे यांच्याकडून दिवाळीची भेट देण्यात आली. शशिकांत सोनवणे यांच्या नियोजनात सर्व कामगार वर्गास आमदार निवासस्थानी पाचारण करत त्यांचे आदर तिथ्य करण्यात आले होते. आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते प्रत्येक कामगारास एक ड्रेस व त्यांच्या पत्नीस साडी भेट देण्यात आली. याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी उपस्थित सर्व मुकादम हमाल कामगार वर्गास दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येकाची विचारपूसही केली. याप्रसंगी ज्ञानेश्वर कांदे किरण देवरे गुलाब भाबड सुनील जाधव सागर हिरे भाऊराव बागुल अय्याज शेख प्रकाश शिंदे आदीं उपस्थित होते.

Thursday, October 20, 2022

मनमाड शहर राष्ट्रवादीतर्फे "दिवाळी आनंदाची " निमित्ताने आश्रमशाळेत फराळ वाटप ,



मनमाड (प्रतिनिधी) - मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डोणगाव रोड येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंद बोथरा यांच्या वतीने दरवर्षी दिवाळी निमित्त या विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात येतो. यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्यात आला.यावेळी संस्थेतर्फे राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे यांनी बोलगोपालाना मार्गदर्शन केले तसेच मनमाड शहरात असेच लोकोपयोगी व विधायक उपक्रम राबविण्याचा मानस बोलून दाखविला. सदर उपक्रमाबद्दल संस्था तसेच विद्यार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक गोगड, शहर कार्याध्यक्ष नाना शिंदे, महिला अध्यक्ष अपर्णा देशमुख, अहमदनगर येथील प्रसिध्द व्यापारी ईश्वर सुराणा, सखाराम पंडित,  ओबीसी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, योगेश जाधव, अमोल गांगुर्डे, संंदीप पाटील, श्रद्धा आहिरे, माया झाल्टे, पवन आहिरे, अक्षय देशमुख, संदीप जगताप, शुभम गायकवाड, आदींची उपस्थिती होती.संस्थेतर्फे पवार सर व पगार सर यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमाचे संयोजन आनंद बोथरा यांनी केले होते.

नांदगाव महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिरास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद,


नांदगाव (प्रतिनिधी) - राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन तरुण, तरुणींसाठी व्यक्तीमत्व विकास घडविण्याबरोबरच आरोग्य संपन्न जीवन जगायला लावणारी योजना आहे.महाविद्यालयीन तरुणांचे आरोग्य हित लक्षात घेता प्रत्येक विद्यार्थ्याला आपआपले रक्त गट माहिती असणे आवश्यक आहे. तसेच हिमोग्लोबिन माहित असणे आवश्यक आहे. म्हणून येथील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व नांदगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात १९७ विद्यार्थ्यांनी रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणीत सहभाग नोंदविला. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. प्रा. संजय मराठे,यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ख्याती तुसे,अजय भदाणे, नवाज शेख,मृणाल शेंद्रे, अमोल हिरे,ओम गरुड, राम शिंदे,शाम काळे, यांनी विशेष परिश्रम घेतले. तर राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. बालाजी मोरे,सह प्रमुख प्रा. संदिप दौंड, श्रीमती कौशल्या बागुल, सायन्स इन्चार्ज डॉ. भागवत चवरे, डॉ.एम.पी.दुसिंग, प्रा.राहुल त्रंबक बिन्नर,प्रा.किशोर निकम आदी यावेळी उपस्थिती होती.

मनमाड शहरात महाराष्ट्र शासनातर्फे नागरिकांना दिवाळीनिमित्त १०० रूपयात किराणा किट भेट,



 मनमाड (प्रतिनिधी)  -  मनमाड शहरात आज गुरुवारी दि. २०  अक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब जनतेसाठी दिवाळीचां आनंद द्विगुणित करण्या च्या हेतूने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे  यांनी दिवाळी भेट (फक्त १००₹ रुपयांमध्ये किराणा किट) देण्याचे जाहीर केले होते. 
     नांदगाव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने मनमाड शहर शिवसेना कोअर कमिटी च्या उपस्थितीत आज मनमाड शहरात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. लाभार्थी कुटुंबीयांना दीपावली किट चे वाटप करण्यात आले, या मध्ये गोडतेल, चणाडाळ,साखर व रवा समाविष्ट आहे. 
     या प्रसंगी पुरवठा विभागाचे शिंदे स तसेच शिवसेना मनमाड शहर कोअर कमिटी चे राजाभाऊ भाबड, सुनील हांडगे, मयूर बोरसे. अमीन पटेल, वाल्मीक आप्पा आंधळे, गालिब शेख, सुभाष माळवतकर, असिफ पहेलवान, विकास पिंटू वाघ, महेंद्र गरुड, मुकुंद झाल्टे, दादा घुगे, अनिल पगार, संजय नागरे, आप्पा कांदे, सिद्धार्थ छाजेड, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, कुणाल विसापूरकर, नंदू पीठे, महिला आघाडी च्या संगीताताई बागुल, विद्याताई जगताप, सरला ताई घोगल , पूजाताई छाजेड उपस्थित होते.

Wednesday, October 19, 2022

नमन एज्युकेशन संचलित लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल संयुक्त विद्यमाने शालेय परिसरात " दिपावली महोत्सव " कार्यक्रम,




  नांदगाव (प्रतिनिधी) -  काल बुधवारी दि .  १९ आक्टोबर  रोजी ‘नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल नांदगाव आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव या ठिकाणी शालेय परिसरात "दिपावली महोत्सव" अतिशय उल्हास दायक वातावरणात पार पडला.
          गेल्या तीन दिवसापासून शालेय परिसरात दिवाळी सजावटीची लगबग सुरू होती.
नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्ष सरिता बागुल ,लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर ,आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका .स्मिता सुर्यवंशी यांच्या हस्ते वसुबारस पूजन , धन्वंतरी पूजन ,लक्ष्मी पूजन,बलिपूजन करण्यात आले.
       यानंतर मुलांना दिवाळी का साजरी केली जाते?दिवाळीतील पाचही दिवसांचे महत्व पटवून देण्यात आले.याबद्दल सविस्तर माहिती ज्योती सुरसे आणि जयश्री चौधरी यांनी सांगितली .यानंतर मुलांना दिवाळी सणाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच वर्गसजावट बघण्यासाठी मुलांना संगणक कक्षात घेऊन जाण्यात आले.त्याठीकाणी जणू बोलका चित्रपटच मुलांना दाखविण्यात आला.मुलांचे संस्थापक तसेच वर्गशिक्षकांसोबत फोटो काढण्यात आले.सर्व मुलांना बागुल आणि बागुल यांनी मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मुलांनी सुंदर असे आकाश कंदिल बनविले होते. त्या आकाश कंदिलांनी शालेय परिसर सुशोभित करण्यात आला होतो.त्याचप्रमाणे दिव्यांची रोशनाई करण्यात आली होती.तसेच रांगोळी काढण्यात आली होती.सर्व शालेय परिसर अतिशय आकर्षक रित्या सजविण्यात आला होता.यानंतर मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले.
         सर्वानी या दिवाळी सणाचा मनमुराद आनंद लुटला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सुरसे आणि पिलके व जयश्री चौधरी यांनी केले. सरतेशेवटी सर्वाचे आभार मानण्यात आले.
             हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यात लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले नूतन खैरनार प्रतिभा अहिरे पूनम सोमासे धनश्री न्याहारकर सुरेखा गायकवाड नेहा पाटील वर्षा नगे संदीप पांडे राहुल उपाध्याय मोहन सुरसे अनिता जगधने क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका सुषमा बावणे एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड,जयश्री चौधरी चैताली अहिरे रोहिणी पांडे अश्विनी केदारे ,तसेच मदतनीस अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पाटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम सुंदर रित्या पार पाडला.

Tuesday, October 18, 2022

व्ही.जे.हायस्कूल येथे सुरु केलेल्या स्वानंद उपक्रमात विद्यार्थांनी घेतला दिवाळी सुट्टीतील आकाशकंदील तयार करणे कार्यशाळेतून नवनिर्मितीचा अभिनव उपक्रम,



नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचालित व्ही.जे.हायस्कूल येथे पर्यावरण पूरक आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा शालेय अभ्यासा व्येतिरिक्त विद्यार्थांना नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद मिळावा व विद्यार्थाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा विविध उपक्रम राबवीत असते या वर्षी शाळेने विद्यार्थासाठी स्वानंद उपक्रम सुरु केला आहे या सर्व विषायचे वर्षभरात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत .या दिवाळी निमित्त चित्रकला विषया अंतर्गत आकाशकंदील तयार करणे तीन दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीचा स्वनिर्मितीचा आनंद या कार्यशाळेतून विद्यार्थांनी घेतला .कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी विद्यार्थांना पर्यावरण पूरक आकाशकंदील तयार करण्याची संकल्पना विद्यार्थांकडून साकार करून घेतली त्यांनी या तीन दिवसात विविध पेपरचा उपयोग करून त्या पेपरची कटिंग,पेपरवर डिझाईन काढून चिटकविणे , रंगकाम करणे असे बारीकसारीक गोष्टींचे मार्गदर्शन करून आकाशकंदील तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले .यात विद्यार्थांनी या तीन दिवसाच्या कार्यशाळेत टप्प्या टप्प्या सर्व कलाकुसर आत्मसात करून सुंदर असे आकाशकंदील तयार केले.विद्यार्थांनी तयार केलेले आकाशकंदील स्वता विद्यार्थी आप-आपल्या घरी लावणार आहेत.या कार्यशाळेसाठी कलाशिक्षक विजय चव्हाण व चंद्रकात दाभाडे यांनी विद्यार्थांना मर्गदर्शन केले.या कार्यशाळेला मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड , भैय्यासाहेब चव्हाण यांनी हि कार्यशाळेतील विद्यार्थाना मार्गदर्शन करून विद्यार्थांनी बनविलेल्या आकाशकंदीलाचे कौतुक केले. या कार्यशाळेला पत्रकार संजीव निकम,प्रमित आहेर,रोहित शेळके ,किरण भालेकर तसेच पालकांनी भेट देऊन या शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले .कार्यशाळेसाठी नियोजन संदर्भात उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर,पर्यवेक्षक मनोहर शिंदे याचे मार्गदर्शन लाभले.

Friday, October 14, 2022

आधार बहुउद्देशीय विकास संस्थेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकराना आगळेवेगळे अभिवादन,



नांदगाव (प्रतिनिधी) -  आधार बहुउद्देशिय विकास संस्था बाभुळगाव बुद्रुक अंतर्गत काल शुक्रवारी दि. १४ ऑक्टोंबर रोजी मुक्तीभूमि येवला येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. काल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथे केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून मुक्तिभुमि येथे मोठ्या संख्येने  जनसमुदाय उपस्थित होता. या दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. आधार बहुउद्देशीय विकास संस्थेचे संचालक,सदस्य,आणि स्वयंसेवक यांनी मुक्तिभूमि च्या परिसरात साफसफाई करून आंबेडकरांना आगळेवेगळे अभिवादन केले.

Sunday, October 9, 2022

नांदगाव शहरात ईद मिलादुन्नबी निमित्ताने भव्य जुलूस, विविध उपक्रमांनी मोहम्मद पैगंबर जयंतीत शांततेचा संदेश,



नांदगाव (प्रतिनिधी) - संपूर्ण  जगाला 
शांती, सदभावना व बंधुभावचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मुहम्मद  (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांचा जन्मदिवस अर्थात ईद- ए-मिलादुन्नबी नांदगाव शहरात आज (रविवार) पारंपरिक पद्धतीने  अभूतपूर्व जल्लोषात साजरा करण्यात आला.या निमित्त शरबत,हलवा,पेढे, आईस्क्रीम,मिठाई वाटपा सोबत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून भव्य जुलुस काढण्यात आला होता. त्यात  मुस्लिम बांधवा सोबत इतर धर्मीय नागरिक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे पैगंबर जयंतीत राष्ट्रीय एकात्मता दिसून आली.
         ईद-ए-मिलाद निमित्त तरुणांनी मस्जिदचे मौलाना  यांच्यासह शहरातील इतर सर्व प्रमुख मौलानांच्या नेतृत्वाखाली सकाळी भव्य जुलूस काढण्यात आला.नारा-ए-तकबीर अल्लाह हु अकबर,हुजूर का दामन नही छोडेंगे यासह इतर घोषणा देत जुलूस एच आर हायस्कूल कलंत्री गल्ली, शनी मंदिर रोड, पोलीस स्टेशन मार्ग ,रेल्वे गेट, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी पुतळा या मार्गे  मशिदीजवळ एच आर हायस्कूल जवळ संपन्न झाले. यावेळी जगात व देशात शांतता नांदावी,भारतात सर्व जाती धर्मांच्या लोकामध्ये सलोख्याचे कायम संबध रहावे.सर्व क्षेत्रात देशाची भरभराट व्हावी यासाठी विशेष दुवा करण्यात आली.  तालुक्यातील आमदार सुहास आण्णा कांदे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा  यावेळी दिल्या होत्या.  ईद-ए-मिलाद निमित्त यासह इतर ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुप तर्फे पाणी,शरबत, आईस्क्रीम, मिठाई,चॉकलेट  वाटप करण्यात आले तर नांदगाव ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेला जुलूस यात सहभागी मुस्लिम धर्मीय बांधव  लहान बालक उपस्थित होते.

Friday, October 7, 2022

साहित्य क्षेत्रात कवी रविंद्र कांबळे यांना साहित्यिक पुरस्कार,

नांदगाव ( प्रतिनिधी) -  येथील म.सा.प.शाखेचे सदस्य कवी व गझलकार मुंबई स्थित असलेले रविंद्र कांबळे यांना धुळे जिल्ह्यातील कै.मालतीबाई नामदेव पवार यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे.या निवडीबद्दल त्यांचे नांदगाव म.सा.प.शाखेने अभिनंदन केले आहे.नांदगाव येथील भुमीपुत्र असलेल्या रविंद्र कांबळे यांनी यापूर्वी अनेक साहित्य संमेलनातुन आपल्या कविता गझल सादर केल्या आहेत.त्यांच्या या यशाबद्दल नांदगाव म.सा.प अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, कार्याध्यक्ष गझलकार काशिनाथ गवळी, उपाध्यक्ष सचिन साळवे, खजिनदार माळी मॅडम,कवी डी.डी.आहिरे, रमेश घोडके सर,कवयत्री प्रतिभा खैरनार ,अरुण साळवे तसेच साहित्यानंद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयातर्फे कवी कांबळे यांचे अभिनंदन करण्यात आले.

Monday, October 3, 2022

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण,

  

नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचे आज सोमवारी दि. ३ अक्टोबर रोजी लोकार्पण करण्यात आले .
   नांदगाव तालुक्यातील कळमदरी येथे आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्ण झाली असून या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज कळमदरी येथे पार पडला.यामध्ये जन सुविधा योजना २०२०-२१अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज इमारत बांधकाम पूर्ण झाले असून आज आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. सोबतच ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील सभामंडप, स्मशानभूमी चे वॉल कंपाऊंड गाव अंतर्गत स्ट्रीट लाईट व दलित वस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचे लोकार्पण आमदार सुहास कांदे यांनी केले.
     या लोकार्पण सोहळ्यानंतर ग्रामविकास कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यामध्ये आदिवासी वस्तीवरील सभामंडप बांधणे, स्मशानभूमी अंतर्गत बैठक व्यवस्था शेडची निर्मिती करणे, ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पेवर ब्लॉक बसवणे व सोलार सिस्टीम बसवणे या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. 
    याप्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गणेश चौधरी साहेब बांधकाम विभागाचे उप अभियंता पाटील साहेब माजी सभापती विलास आहेर जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे सभापती सुभाष कुटे शेखर पगार प्रमोद भाबड किरण देवरे दिलीप पगार सर प्रमोद चव्हाण सर मनोज पगार (सरपंच कळमदरी) उपसरपंच अंजनाबाई पगार डॉक्टर विशाल पगार सुरेश पगार रमेश पगार नितीन पगार दिलीप पगार सुनील सूर्यवंशी प्रवीण सूर्यवंशी शेखर शेवाळे शशिकांत पगार आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

Saturday, October 1, 2022

नांदगाव च्या नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये एकत्रित रित्या नवरात्र उत्सव,



नांदगाव( प्रतिनिधी)- काल शुक्रवारी दि. ३० सप्टेंबर रोजी नमन एज्युकेशन सोसायटी' संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव शाळेमध्ये "नवरात्री उत्सव''साजरा करण्यात आला. 
     आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 
 नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी , लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . सर्वमंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असे म्हणतात की मा दुर्गा देवीने असुर महिषासुरासोबत युद्ध करून त्याचा वध केला. आणि हे युद्ध पूर्ण नऊ दिवस चालून दहाव्या दिवशी महिषासुराचा वध करण्यात आला. म्हणून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. त्यामुळे आज सर्व विद्यार्थी गुजराती वेशभूषा परिधान करून आले होते. त्यातील नऊ मुलींनी नऊ देवींची रूपे धारण केली होती. सर्वप्रथम शारदा मातेचे तसेच दुर्गा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्या नंतर संस्थेचे अध्यक्ष . संजय बागुल सरांनी नऊ देवींवर फुलांचा वर्षा करून त्यांचे पुजन केले. नवरात्री गाण्यावर ताल धरत दांडिया नृत्य सादर केले. यात सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली गायकवाड यांनी केले. तसेच सुषमा बावणे यांनी नवरात्री उत्सवाचे महत्त्व पटवून दिले. 
   हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका रूपाली शिंदे सुषमा बावणे ,एडना फर्नांडिस ,मोनाली गायकवाड .चैताली अहिरे रोहिणी पांडे .अश्विनी केदारे .मदतनिस वैशाली बागूल, छाया आवारे, अनिता नेमणार, मंजू जगधने, ज्योती सोनवणे, रवींद्र पटाईत तसेच ड्रायव्हर मंगेश शिंदे, विनोद चौधरी, बाळू गायकवाड, सागर कदम, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल, गजानन पवार यांनी अतोनात मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला  होता.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...