Wednesday, April 27, 2022

विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी आमिन शेख यांची निवड...


१६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न झाले.
या साहित्य संमेलन मध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मध्ये सदस्य म्हणून मनमाड येथील  युवा पत्रकार आमिन नबाब शेख यांच्या नियुक्ती ची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्यचे संघटक कॉ.किशोर ढमाले यांनी केली.अमिन शेख हे मनमाड शहरांतील  पत्रकार आहे. 
फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंच,ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व सेंट्रल रेल्वे मजुदर संघ मनमाड चे हितचिंतक आहे
त्यांच्या नेतृत्वाखाली पहिले विद्यार्थी-पालक-शिक्षक साहित्य संमेलन २०२० मध्ये मनमाड येथे भरविण्यात आले होते.त्या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते, दैनिक पुण्यनगरी चे मनमाड प्रतिनिधी म्हणून काही काळ काम केले आहे.साप्ताहिक मनमाड सम्राट चे ते संपादक आहे तर ते जागर जनस्थान न्युज चॅनल,E.T.Vभारत न्युज चॅनल प्रतिनिधी,दै.महानगर टाइम्स चे प्रतिनिधी म्हणून ते काम करत आहे.
परिवर्तन सोशल अकादमी च्या  माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मनमाड शहरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नांदगाव मस्तानी अम्मा उरूस कमिटीच्या अध्यक्षपदी सुनील जाधव



नांदगाव (प्रतिनिधी )  येथील हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मरहूम मस्तानी अम्माचा यंदाच्या उरूस भरविण्यासाठी पुन्हा एकदा भाविकांची लगबग सुरू झाली आहे. मस्तानी अम्माच्या यंदाच्या उरूस साजरा करण्यासाठी स्थापन केलेल्या मस्तानी अम्मा उरूस कमिटीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक जगताप, विजय बागोरे, माजी नगरसेवक याकूब शेख, अनिल जाधव, नितीन जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज
चोपडे, भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, समाधान दाभाडे, विकास चव्हाण, गणेश शर्मा, राजभाऊ गुढेकर आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उरूस कमिटीच्या उपाध्यक्षपदी मुश्ताक शेख व गौतम जगताप यांची कार्याध्यक्षपदी अॅड. विजय रिंढे, खजिनदारपदी शाकीर पठाण, सहखजिनदार राजूभाऊ गुढेकर, तर संदलप्रमुख म्हणून शकील रंगरेज,
दीपक सोनवणे, राकेश चंडाले सल्लागार म्हणून देविदास मोरे, वाल्मिक जगताप शकील शेख, संजय सानप, हरिभाऊ भालेकर, गणेश शर्माजी, बागुल रवि नगरकर, अकिल शेख, सदस्य म्हणून लालीभाई खाटीक, शरीफभाई शेख, इम्रानभाई बेग, समाधान दाभाडे, भरत मोकळ, नदीम रंगरेज, अरबाज मण्यार, नाविद शेख, सलीम रंगरेज, शकील रंगरेज, मुज्जू शेख, मौसिन शेख, मधू कलंत्री, रवी सानप, बाळासाहेब आहेर, करण भालेकर, आसिफ सय्यद, सोनू पेवाल, शरीफ शेख, पिंटू चौधरी, मौसिन खाटीक, गणेश कुमावत, जावेद तांबोळी, मिलिंद मोरे, आकाश हिरे, प्रकाश झोपे यांनी नियुक्ती झाली आहे.

पानेवाडी जवळ ईधनचोरी करणारे अटकेत,


मनमाड (प्रतिनिधी ) - साधारण एक दशकापूर्वी  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मनमाड शहरातील पानेवाडी इंधन प्रकल्पाजवळ अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांची पेट्रोल माफियाकडून हत्या करण्यात आली होती.त्या घटनेनंतर पेट्रोल डिझेल चोरी होऊ नये यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या मात्र या सगळ्या फोल ठरल्या चोरी करणारे या ना त्या मार्गाने चोरी करतातच पण जेव्हा ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच जर चोरी करत असतील तर? हो अशीच घटना मनमाड नजीक असलेल्या पानेवाडी इंधन प्रकल्पात घडली असुन रेल्वेच्या प्रत्येक वॅगनमधून 5 ते 15 लिटर पेट्रोल काढून ते काळ्या बाजारात विकण्याचा गोरख धंदा गेले अनेक वर्षांपासून सुरू होता रेल्वेच्या आरपीएफ यांनी या प्रकरणात विठ्ठल रामचंद्र सांगळे या रेल्वे कर्मचाऱ्यांला त्याच्या साथीदारासोबत सापळा रचून अटक केली आहे.मात्र हे दोघेच होते की मोठे रॅकेट आहे याचा छडा लावण्याचे मोठे आवाहन आरपीएफ समोर उभे आहे.
            या बाबत सविस्तर वृत्त असे कि शहरा पासून 6 किमी अंतरावर असलेल्या पानेवाडी येथे आव्हाड वस्तीवर इंधनाचा अवैध अड्डा असून तेथे रेल्वे रॅकच्या टॅंक मधून चोरी केलेले पेट्रोल डीझेलची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्या नंतर रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारी क्षितीज गुरव,बी.पी.कुशवाह यांच्या आदेशानुसार प्रभारी निरीक्षक डी.के.मिश्रा,उपनिरीक्षक आर.एस.यादव,समाधान बहुलकर,आरपीएफ  विठ्ठल नागरे,सागर वर्मा,मनीष कुमार,गजानन पाटील आदींच्या पथकाने  सापळा रचून अड्ड्यावर छापा मारला. त्यांनी 75 लिटर आणि 50 लिटर डीझेलसह इतर साहित्य जप्त करून या प्रकरणी विजय दशरथ सांगळे आणि विठ्ठल रामचंद्र सांगळे (रा.पानेवाडी) या दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे विठ्ठल हा रेल्वे कर्मचारी असून त्याची इंधन घेऊन आलेल्या रेल्वे रॅक टॅंकच्या सीलची देखभाल करण्याची जबाबदारी होती मात्र त्याने जबाबदारी पार पाडण्या एवजी इंधन चोरी सुरु केली अशी जोरदार चर्चा या भागात आहे.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षा पासून ही इंधन चोरी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे काहींनी तर इंधन चोरी करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली आहे त्यामुळे इंधन चोरीचे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्यात अनेक जणांचा समावेश असू शकतो त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने जर खोलात जाऊन तपास केल्यास अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येऊन काही मोठे मासे देखील त्यांच्या हाती लागू शकतात मनमाड पासून 4 ते 7 किमी अंतरावर नागापूर,पानेवाडी शिवारात इंडियन ऑयल,भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम चे इंधन प्रकल्प असून त्यातून टँकरच्या माध्यामतून राज्यभरातील पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा केला जातो टँकरचे  सील आणि लॉकचे बनावट चाव्या तयार करून मोठ्या प्रमाणात इंधन चोरी केली जात होती.इंधन चोरी आणि अवैध विक्री यातून 2011 साली अप्पर जिल्हा धिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्याची घटना घडली होती.या घटने नंतर काही काळासाठी इंधन चोरी,अवैध विक्रीवर काही प्रमाणात आळा बसला होता मात्र अधून-मधून पुन्हा अशा घटना घडू लागल्या आता तर थेट रेल्वे रॅकच्या टॅंक मधून इंधन चोरी केली जात असल्याचे उघडकीस आल्यामुळे इंधन चोर पुन्हा सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे
--------------------------------------------------------
सखोल चौकशी व्हावी सत्य बाहेर येईल...!
पेट्रोल डिझेल चोरी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे यात कधी टँकर मधून तर कधी पेट्रोल पंपावर भेसळ करण्यासाठी पेट्रोल डिझेल काढण्यात येते हा प्रकार सर्रास सुरू आहे यावर कोणाचेही नियंत्रण नाही तसेच इंधन कंपनीच्या आतमध्ये देखील अनेकदा चोरी झाल्याच्या घटना ताज्या आहेत यामुळे इंधन कंपनी व आरपीएफ अधिकारी यांच्या संमतीशिवाय येथून चोरी करणे अशक्य या प्रकरणी सखोल निःपक्षपाती चौकशी झाली तर सत्य जनतेच्याआ समोर येईल.
- गुरुकुमार निकाळे,रिपाई युवक तालुकाध्यक्ष...
--------------------------------------------------------
अवैध धंद्याना राजकीय वरदहस्त कुणाचा...?
यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड नंतर नाशिक जिल्ह्यातील तसेच जवळपास राज्यभरात अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.यानंतर काही काळ थांबलेले मनमाड शहरातील अवैध धंदे देखील बंद झाले होते मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र या सर्व अवैध धंद्याना राजकिय वरदहस्त कुणाचा हा प्रश्न पुनः समोर उभा ठाकला आहे.

Friday, April 15, 2022

आपला लढा हा मनुवादी विचारांविरूध्द - सरसेनानी आनंदराज आंबेडकर


नांदगाव ( प्रतिनिधी)-  आपला लढा हा मनुवादी विचारांविरूध्द आहे ज्यांना मनुवादी व्यवस्था आणायची आहे त्याविविरुध्द आहे.
संविधान सभेमधून आपण इशारा देत आहो की, जे कोणी संविधानकडे  डोळेवर कडून बघतिल त्याची डोळे काढून घेण्याची ताकद आंबेडकरी समाजामध्ये असल्याचे प्रतिपादन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने ``संविधान के सन्मान बहुजन मैदान''  संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रवक्ते   राजु वाघमारे, विशेष कार्यकारी अधिकारी राज्यमंत्री विजय बोरसे,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुतणे दादाजी साठे व नातू सचिन साठे सुरज साठे, माजी आमदार अनिल आहेर, विनोद शेलार, श्रीकृष्ण रत्नपारखी, रिपाइंचे जिल्हा कार्यध्याक्ष देविदास मोरे, योगिता पाटील, विद्या कसबे, आदी मान्यवर उपस्थित होते.
     आंबेडकर पुढे म्हणाले की,देशावर अनेक राजवटींची आक्रमणे झाली. त्यामुळे देशाचा इतिहास गुलामगिरीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यांची ओळख निर्माण करुन दिली. त्यांनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार केला.

आंबेडकर पुढे म्हणाले की, आपल्याला जे सांगितले जाते त्यावर आपण विश्वास ठेवतो. खर तर आपण चौकस राहून सत्यता पडताळली पाहिजे. बाबासाहेबांनी समाजातील अन्यायग्रस्तांकरीता कार्य केले. त्यामुळे कामगार, महिला, शेतकरी यांसह विविध वर्गातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली. बहुजनांनी जागृत असणे आवश्यक आहे. संविधानामुळे  देश एकसंघ राहिला. धर्मा धर्मात शत्रुत्व नसावे.शिक्षित समाजाने चाकोरीबाहेर जाऊन देशाच्या प्रगतीचा विचार  केला पाहिजे. समता, बंधुत्व या विचारांमुळे देश अखंड राहतो.जाती धर्माची झापड काढून टाकून बाबासाहेबांचे विचार अंगीकारले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी बाबासाहेबांनी केलेल्या विविध कार्यांची माहिती दिली.
दरम्यान,
या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना संविधान प्रत देऊन सन्मानीत करण्यात आले.

Thursday, April 14, 2022

नांदगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव  शहर व परिसरात मोठ्या उत्साहात व हर्षोल्हासात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. दोन वर्षापासून उत्सवावर कोरोनामुळे टाकण्यात आलेले निर्बंध दूर झाल्याने उधाण आले होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई, फुले व निळ्या पताकांनी सजविण्यात
आले होते. बारा बंगला, सहा बंगला, आनंदनगर, आंबेडकर नगर, एसटी कॉलनी, डीएम आहिरे चाळ, कैलासनगर, गांधीनगर आदी शहरातील विविध नागरी वस्तीमधून ढोल ताशांच्या निनादात बोलो बोलो जयभीम'च्या घोषणा देत आबालवृद्धांसह शेकडोच्या संख्येने मध्यरात्रीच्या बाराला आंबेडकरी अनुयायींचा गर्दीचा ओघ सुरूच होता. ठिकठिकाणी फटाक्यांच्या विविधरंगी आतषबाजीने या उत्साहाला वेगळे वलय निर्माण झाले होते. चारही बाजूने आलेल्या शोभायात्रा मध्यरात्री बाराच्या
सुमाराला डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहचल्या. तत्पूर्वी जयंतीच्या पूर्वसंध्येला अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने आयडलफेम आम्रपाली पगारे व संगीतकार सचिन पगारे सूत्रसंचाल राजुभाऊ गांगुर्डे यांणी  'मानवंदना भीमरायाला' हा स्वरसमृद्धी ऑर्केस्ट्राचा संगीतमय कार्यक्रम पार पडला. एकूणच उत्साह द्विगुणित करणाऱ्या कार्यक्रमाची सांगता रात्री बाराच्या सुमाराला करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक पंचशील व भीमस्तवनाने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी
नगराध्यक्ष राजेश कवडे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. गुरूवारी घराघरांवर उभारलेल्या निळ्या झेंड्यांनी व पताकांनी सकाळ उगविली. सारनाथ बुद्धविहार ते आंबेडकर पुतळा अशी मिरवणूक निघाली. या ठिकाणी पुन्हा पु सामुदायिक पंचशील व भीमस्तवनाने व अभिवादन करण्यात आले.
रेल्वेचे निवृत्त चालक वसंतराव बनसोडे व दूरध्वनी विभागातील पु बळवंत वाकोडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणेक ठिकाणी खिरदण करण्यात आले व अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आले  संध्याकाळी उशिरा ठिकठिकाणी वेगवेगळ्या अशावेळी शोभायात्रा काढण्यात आले भीम गीता च्या तालावर व नुत्यासह शोभायात्रा काढण्यात आले.

Monday, April 11, 2022

एकवीरा देवी यात्रा उत्सव समिती अध्यक्षपदी युवा उद्योजक आनंद कासलीवाल यांची एकमताने निवड


नांदगाव (प्रतिनिधी )- नांदगाव येथील ग्रामदैवत एकवीरा देवी यात्रा चैत्र पौर्णिमेला भरविण्यात येते. या यात्रेच्या उत्सवासाठी हिंदू पंच व जनसेवा मंडळाच्या वतीने यात्रा उत्सव भरविला जातो. या यात्रा उत्सव समिती अध्यक्षपदी युवा उद्योजक आनंद कासलीवाल यांची एकमताने निवड झाली आहे. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे होते. दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली यात्रा यंदा जनसेवा मंडळाचे पुढाकाराने होत आहे.

नांदगावमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

नांदगाव   (प्रतिनिधी )  - नांदगाव शहर व परिसरात मोठ्या उत्साहात महात्मा जोतिराव फुले जयंती झाली. यानिमित्ताने सार्वजनिक उत्सव समितीतर्फे सकाळी दहाला राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले. महात्मा फुले यांच्या विचारांचे विविध दाखले उद्धृत करणारी 'ठळक अवतरणे' सुशोभित करण्यात आले होते. यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणच्या शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांत प्रतिमापूजन झाले. मुख्य कार्यक्रम शहरातील महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ झाला. आमदार सुहास कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, विनोद शेलार यांनी महात्मा फुल्यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन केले.

नांदगाव स्टेशनवर रेल्वे गाड्या थांब्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे निवदेनाद्वारे मागणी


नांदगाव (प्रतिनिधी ) -   नांदगांव शहरात रामनवमी उत्सव निमित्त केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार उपस्थित होत्या. रामनवमीचे औचित साधुन शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेने निवेदन दिले की असे मनमाड कुर्ला टर्मिनन्स गोदावरी एक्सप्रेस मनमाड़ छत्रपती शिवाजी टर्मिनन्स पंचवटी एक्सप्रेस या दोन्ही प्रवाशी रेल्वे गाड्या मनमाड रेल्वे स्टेशनवरुन सुटतात. मात्र नांदगांव शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातुन व्यवसाय, नोकरी, शिक्षण व दैनंदिन कामासाठी शेकडो प्रवासी नाशिक, इगतपुरी व मुंबई येथे ये -जा करत असतात. परंतु नांदगांव येथून कार्यालयीन व शालेय वेळेशी सलग्न अशी एकही प्रवाशी रेल्वे गाड़ी नसल्यामुळे प्रवाशाची गैरसोय होत असते. त्यामुळे नांदगांव रेल्वे स्टेशनवरून या वेळेत प्रवाशी रेल्वे गाड़ी सुरु करण्यात यावी अशी प्रवाशांची तसेच नागरिकांची अनेक दिवसांची सातत्यांची मागणी आहे. तरी नांदगांव शहर व तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होण्यासाठी १) मनमाड कुर्ला टर्मिनल गोदावरी एक्सप्रेस व २) मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पंचवटी एक्सप्रेस अप १२११० व डाउन १२१०९ या दोन्ही प्रवाशी रेल्वे गाड्यापैकी एक प्रवाशी रेल्वे गाड़ी नांदगांव रेल्वे स्टेशन वरुन सुरु करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली. 

मांडवडच्या जनता विद्यालयात महात्मा ज्योतीबा फुले यांची १९५ वी जयंती साजरी



मांडवड ( प्रतिनिधी ) -  मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मांडवड हायस्कूलमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक खैरे आर जी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील ज्येष्ठ नेते संस्थेचे सभासद विठ्ठल आबा आहेर,शिवबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष अशोक निकम ,पगार के.जे.,श्री गावित,श्री शेख,निलेश वाळके,शरद सातपुते आदी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानिमित्ताने विद्यालयातील शिक्षक गोटे पी.डी,श्री.रायते, आपल्या मनोगतातून
महात्मा ज्योतीबा फुले यांच्याबद्दल समग्र लिखाणातून आणि त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीच्या दिशेवरून त्यांना अभिप्रेत असलेल्या भावी समाजाच्या स्वरूपाची कल्पना येते. सामाजिक व आर्थिक समतेवर आधारलेला शोषणविरहित असा समाज निर्माण करण्याचे ज्योतीबांचे स्वप्न होते. धर्माच्या आधारे निर्माण झालेली सामाजिक विषमता नष्ट झाली पाहिजे व सर्वजण मानव म्हणून एकत्रित आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता.
 अध्यक्षीय मनोगतातून खैरे आर.जी  यांनी ज्योतीबा फुले यांच्याबद्दल आपले विचार प्रकट केले फुले हे धर्मविरोधक नव्हते. परंतु त्याकाळी धर्माला आलेले विकृत स्वरूप, कर्मकांडाचे व पुरोहित वर्गाचे प्राबल्य व लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन केली जाणारी धार्मिक पिळवणूक त्यांना मान्य नव्हती. म्हणून मानवतावादाचा पुरस्कार करणाऱ्या एका नव्या धर्माची ‘सार्वजनिक सत्यधर्माची’ कल्पना त्यांनी पुढे मांडली. शूद्रांतिशूद्रांची सामाजिक दास्यातून मुक्तता व्हावी, जातिभेद व अस्पृश्यता नष्ट व्हावी असे जसे त्यांना वाटत होते, तसेच पुरुषांनी लादलेल्या रूढींच्या जोखडांतून स्त्रियांची मुक्तता व्हावी असेही त्यांना मनोमन वाटत होते. जिथे स्त्रियांना पुरुषांइतके स्वातंत्र्य व हक्क उपभोगता येऊ शकतील अशी समाजरचना त्यांना निर्माण करावयाची होती.
उत्पादक श्रमांचे माहात्म्य ज्योतिबांना पटलेले होते. समाजातील परोपजीवी वर्गाची निर्मिती आर्थिक शोषणाच्या प्रक्रियेतून निर्माण होते व या वर्गाचे समाजातील अस्तित्व आर्थिक शोषणाच्या प्रक्रियेचे सातत्य टिकविण्यास कारणीभूत होते असा त्यांचा दृढविश्वास होता. समाजातील उत्पादक श्रम करणाऱ्या वर्गाला योग्य संरक्षण देऊन सामर्थ्यवान केले तर समाजातील आर्थिक शोषणाचे उच्चाटन करणे शक्य होईल असा त्यांचा विश्वास होता. या नव्या समाजरचनेत उत्पादक श्रम करणाऱ्यांचे प्राबल्य असावे असे त्यांना वाटत होते.
 ज्योतीबांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक समाजाचे पाईक होणे, सत्यधर्माचे पालन करणे, आपणा सगळ्यांकडून त्यांना हीच खरी आदरांजली आहे . 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत परदेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप आहेर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समितीतील सर्व सदस्य शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी श्री .कोल्हे,श्री.आहेर एन.ए, श्री वर्पे यांनी प्रयत्न केले.

Sunday, April 10, 2022

पतीने पत्नीचा केला तीक्ष्ण हत्याराने खून,



नांदगाव ( प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यातील बाभुळवाडी गावात चारित्र्याया संशयावरून पतीने पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने खून करून मुलीला देखील जखमी केले. फरार आरोपी पतीला पोलिसांनी तात्काळ अटक केली.       बाभुळवाडी  गावातील संजय सोमनाथ दिवे व पत्नी बाली ऊर्फ सुगंधा, मुलगी करूणा राहत होते.  संजयला पत्नीच्या चारित्र्याचा संशय आल्याने त्याने पहारेने मारहाण केली. यात सुगंधाचा जागीच मृत्यू झाला. मुलगी देखील यात जखमी झाली. तिला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील , वाघमारे, हवालदार राजू मोरे, अनिल शेरेकर , सागर कुमावत, सागर  कुऱ्हाडे तपास करीत आहे. 

Wednesday, April 6, 2022

नांदगावात संविधान सभेचे आयोजन

नांदगाव शहरात संविधान सभेच्या आयोजन प्रसंगी महापुरुषांचे वारसदार बहुजन समाजातील बांधवांना संबोधित करणार.

 नांदगाव (प्रतिनिधी) - बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांती नायकांच्या संयुक्त जयंतीनिमित्त, संविधान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 
     नांदगाव शहरात संविधान के सन्मान में बहुजन मैदान में या कार्यक्रमा प्रसंगी उदघाटक म्हणुन पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आ सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर तसेच प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनची साठे आणि दादाजी साठे हे उपस्थित राहणार आहे.
     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ  राजू वाघमारे प्रवक्ते तथा जनरेल सेक्रेटरी काँग्रेस तर स्वागत अध्यक्ष म्हणून विजयजी बोरसे विशेष कार्य, अधिकारी मान राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची ही उपस्थिती असणार आहे.
      गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात छत्रपतीचे वंशज युवराज खा. संभाजीराजे भोसले यांनी छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची त्यांच्या हस्ते नूतनीकरण व सुशोभिकरण करुन शहराला भेट देऊन बहुजनांचे राजे छत्रपतींचे  विचार मस्तकात घ्या असे सांगून गेलेत त्या पाठोपाठ आता पुन्हा एकदा महापुरुषांच्या वंशजांचे आगमन शहरात होत असून त्यांचे ही विचार घेण्यासाठी तसेच तमाम बहुजन समाज बांधवानी त्यांच्या स्वागतासाठी मंगळवार दि १२/४/२०२२ ला सायंकाळी मोठ्या संख्येने पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपस्थित रहावे अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक युवानेते मनोज चोपडे व गौतम जगताप यांनी दिली आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक मनोज निकम यांचा समाज प्रबोधन पर गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

Saturday, April 2, 2022

नांदगावमधील कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात गुढीपाडव्यानिमित्त शैक्षणिक गुढी चे उत्साहात सादरीकरण



नांदगाव ( प्रतिनिधी)-  गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षांमध्ये येतो . हिंदूंमध्ये वर्षभरात येणारे साडेतीन मुहूर्त अतिशय शुभ मानले जातात. या साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त गुढीपाडवा हा आहे. पाडवा या सणा पासूनच मराठी नववर्षाची सुरुवात देखील होते .भारतातील सर्व लोक गुढीपाडवा हा सण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.
सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात शैक्षणिक गुढी उभारली .श्रीमती शिंदे मॅडम यांनी गुढीपाडवा या सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस यानिमित्ताने मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी कार्डशिट, माउंट बोर्ड यांपासून गुढी तयार केली. गुढी भोवती शैक्षणिक संबोधाच्या पट्ट्या लावण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर , माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ सर उपस्थित होते. प्रशासक पी.पी.गुप्ता ,चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल,विजय चोपडा, महेंद्र चांदीवाल ,यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक सिद्धार्थ जगताप,अभिजीत थोरात, विजय जाधव, ईश्वर फणसे, निलोफर पठाण, धन्वंतरी देवरे, जयश्री चोळके,अनीता पवार,वैशाली शिंदे आदींनी परिश्रम घेतले.अशाप्रकारे गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...