Tuesday, October 31, 2023

नांदगावच्या नगरपरिषदेसमोर १ नोव्हेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण, सफाई कामगारांच्या वारसास नियुक्ती मिळावी !!






नांदगांव( प्रतिनिधी ) - वाल्मीकी, मेहतर, भंगी या समाजाला वारसाहक्काने नोकरी देण्यात यावी असा न्यायालयाचा आदेश असतांना सुध्दा नोकरी मिळत नाही व प्रलंबित मागण्यांसाठी वारसदार, कुटुंबातील घटक, सर्व सेवानिवृत्त कर्मचारी एक नोव्हेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे अखिल भारतीय मजूर महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नांदगांव नगरपरिषदेमध्ये अनेक वर्षापासुन सेवेत मयत किंवा न. पा. सेवेतून सेवानिवृत्त होऊन अनेक सफाई कामगारांचे वारसाहक्काने न. पा. सेवेत नियुक्ती मिळत नाही. संघटनेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांचे मध्ये चर्चा झाली. परंतु मागण्या पुर्ण होत नाही.  जुलै महिन्यातही  न. पा. कार्यालयासमोर संबंधीत वारसाहक्काने नियुक्ती मिळणेकामी इशारा धरणे आंदोलन केले. परंतु त्यावेळी मुख्याधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांच्यात चर्चा होवुन सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडे वारसाहक्काने मागण्या पुर्ण होणेकामी मुंबई येथे जावुन मार्गदर्शन आणण्याचे ठरले. परंतु मुख्याधिकारी यांनी महासंघाचे पदाधिकारी यांना मुंबई येथे घेवुन जाणे क्रमप्राप्त होते . परंतु अद्यापपावेतो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कार्यालयाकडुन मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. महासंघाने दि. ५ ऑक्टोबर  रोजी मुंबई येथे प्रत्यक्ष जावुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास वारसाहक्काने नियुक्ती मिळणेकामी तात्काळ नांदगांव नगरपरिषदेस पत्र देण्यात यावे असे पत्र दिले.
     परंतु सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे कडुन मुख्याधिकारी यांना मार्गदर्शन पत्र न मिळाल्यामुळे संबंधीत लाभार्थी यांना वारसाहक्काने नियुक्ती मिळणे अशक्यप्राय झालेले आहे. यात मुख्याधिकारी यांनी मार्गदर्शन पत्र आणणेकामी झालेली दिरंगाई व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अव्वल सचिव यांनी सुध्दा दलीत मागासवर्गीय सफाई कामगारांना वारसाहक्क मिळणेकामी मार्गदर्शन पत्र न दिल्यामुळे सफाई कामगारांचे कुटुंबातील घटकामध्ये संतापाचे वातावरण आहे .  प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्या कुटुंबाची उपासमार होत आहे. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी दि. २४/०२/२०२३ रोजी निर्णयामध्ये मेहतर, भंगी वाल्मीकी या समाजास वारसाहक्काचा लाभ तातडीने देण्यात यावा असा आदेश असतांना सुध्दा सदरच्या आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई यांचे कार्यालयाचे दि. ७ ऑगस्ट २०२३ चे पत्र आयुक्त तथा संचालक न. पा. प्रशासन संचालनालय बेलापुर नवी मुंबई यांना दिले तरी या समाजास न्याय मिळत नाही, शेवटचा पर्याय म्हणुन अखिल भारतीय मजूर महासंघाने सफाई कामगारांचे वारसास न. पा. नियुक्ती मिळावी यासाठी दि. १ नोव्हेंबर २०२३ पासुन न.पा. कार्यालयासमोर वारसा हक्काने नियुक्ती मिळावी म्हणुन कुटुंबातील घटक, सर्व सेवानिवृत्त कर्मचारी बेमुदत आमरण उपोषण करणार आहे. या कालावधीत संबंधीत उपोषण कर्ते व त्यांचे कुटुंबातील घटकांचे काही बरे वाईट झाल्यास त्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मा. अव्वल सचिव मुंबई व मुख्याधिकारी तथा संबंधीत आस्थापना प्रमुख यांचेवर सर्वस्वी जबाबदारी राहील. अशी माहिती महासंघाचे पदाधिकारी श्रावण मोहन जावळे, शशिकांत शांताराम मोरे व संबंधीत सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दिली आहे.

Monday, October 30, 2023

नांदगाव येथे वारकरी आदर्श पुरस्काराचे वितरण सोहळा, मनोज जरांगे पाटील यांच्या मताशी मी सहमत - आमदार सुहास कांदे,




नांदगाव( प्रतिनिधी ) - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी माझ्या परीने पूर्णतः प्रयत्न करणार आहे. वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देण्यास हयगय करणार नाही, असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी शहरात झालेल्या वारकरी व पूजन व आदर्श वारकरी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी केले.
आमदार कांदे पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मताशी मी सहमत असून, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा चा समाजाला आरक्षण मिळावे. सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या  मागणीला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सासाठी प्रयत्न करणार असून, वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तर तोही देईन, असे सांगितले. मतदारसंघातील साधू, संत, महंतांचे पाद्यपूजन करण्यात आले. याकरिता श्रीक्षेत्र काशी,
प्रयागराज, हरिद्वार देवप्रयाग, ऋषिकेश येथून नद्यांचे पवित्र जल संकलन करून आणले होते. यावेळी बुलढाणा येथील पुरूषोत्तम महाराज पाटील यांची कीर्तनसेवा झाली. त्यांनी सांगितले की, राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असताना आ. कांदे महाराष्ट्रातील एकमेव असे आमदार आहेत की, ज्यांनी वारकरी संप्रदाय, साधूसंत, महंत यांचा सन्मान करत असताना एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला असून, कोणत्याही प्रकारचा त्यांना विरोध महाराज केला नाही. यातच त्यांची समाजाच्या विविध स्तरांतील लोकांसाठी करत असलेल्या कामांची पावती आहे.
    यावेळी आदर्श वारकरी पुरस्कारांचे वितरण आमदार सुहास कांदे, अंजुम कांदे यांच्या हस्ते करण्यात येऊन मतदारसंघातील १४८ गावांतील दोनशे भजनी मंडळांना दहा टाळ-मृदंग, वीणा भेट देण्यात आले. कार्यक्रमासाठी वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर, जयरामबाबा गोंडेगावकर, श्रावण महाराज अहिरे, माधवगिरी महाराज, नामदेव महाराज बोगीर, रामकृष्ण बानगावकर, दत्तात्रय महाराज, बाळकृष्ण महाराज, आनंद महाराज, जोंधळवाडीकर महाराज सर्व आखाड्यांचे महंत, संत, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार गायनाचार्य व मृदंगाचार्य तसेच मतदारसंघातील सर्व गावागावांतील भजनी मंडळी व नागरिक तसेच सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी नंदकिशोर महाराज दौंड यांनी परिश्रम घेतले.

नांदगाव मध्ये भाजपच्या वतीने मन की बात कार्यक्रमाचे आयोजन,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहर भारतीय जनता पक्षा तर्फे  शनिमंदीर चौकात देशाचे पंतप्रधान  नरेद्रं मोदी यांच्य  "मन की बात" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "मन की बात" हा लाईव्ह कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे शहर भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी शहरातील शनिचौकात टी. व्ही. स्क्रीन द्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थीत होते. या प्रसंगी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अॅड.  जयश्रीताई दोंड, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर, शहर उपाध्यक्ष मनोज शर्मा, ओ.बी.सी मोर्चा शहर अध्यक्ष दिनेश दिडें, अनु.जाती आघाडी जिल्हा अध्यक्ष बाबाजी शिरसाठ, सोमनाथ घोगांणे, सतिष शिंदे, राजेंद्र गांगुर्डे, विनोद महाले, अनिल बुरकुल, बळवंत शिंदे, अक्षदा कुलकर्णी, धम्मवेदी बनकर, यश सेठी, आकाश पानकर, डॉ. बाळासाहेब आहेर, किरण पैठणकर, प्रकाश सोळसे, संजय लभडे, मोहित शेंडगे, ज्ञानेश्वर बोरसे, सुरेश कुमावत, अशोक सुरसे, नाना मांडवडे, वंश पटाईत, नंदकिशोर शेंडगे, आदी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Saturday, October 28, 2023

नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर होणेसाठी राष्ट्रवादीकडून बेमुदत उपोषण,





नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगांव तालुक्यातील खरीप हंगाम २०२३ हा अवर्षणामुळे वाया गेला असुनही तालुक्याचा समावेश ट्रिगर -२ अंतर्गत घोषित ४२ तालुक्यात नसल्याने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. प्रसार माध्यमातील बातमीनुसार राज्य कृषि विभागाने शासनाकडे पाठविलेल्या दुष्काळग्रस्त ४२ तालुक्यांच्या यादीत नांदगांवचा समावेश नसल्याचे समजते. त्यामुळे शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य जनता आणि एकूणच सर्व बाजारपेठ हवालदिल झाली आहे. ह्या पार्श्वभूमी वर प्रशासनास जाब विचारण्वयासाठी व  तालुक्यातील जनतेला न्याय मिळावा ह्या करिता  येत्या गुरुवारी २ नोव्हेंबर  रोजी सकाळी ११ वाजेपासून नवीन तहसिल कार्यालय नांदगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) गटाकडून लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष महेद्र बोरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

नांदगाव येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण, गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचा ठराव,



नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथे मराठा समाज आरक्षण मिळण्यासाठी मागील सात दिवसांपासून साखळी उपोषणास बसले असून,   सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ, जय शिवराय असा जयघोष करण्यात आला. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आदी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.  उपोषणस्थळी ठराव पास करून मांडवड, मोरझर, जोंधळवाडी, धोटाने खु, माहेगाव, चांदोरा, आमोदे साकोरा, पिंपरखेड, दहेगाव, न्यायडोंगरी, परढाडी, भालूर पळाशी, डॉक्टरवाडी, आणकवाडे आदी गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.  विविध पक्ष संघटना, समाज यांनी यावेळी उपोषणास जाहीर पाठींबा दिला.   निलेश चव्हाण ,  संतोष जगताप , अमोल पाटील बाभुळवाडी, डॉक्टरवाडी सरपंच आदींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Friday, October 27, 2023

नांदगाव शहरातील गुरुकृपा नगरीत अविनाश भाऊजींचे होम मिनिस्टर...!


नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील गुरुकृपा नगर नवदुर्गा महिला मंडळाने होम मिनिस्टर... खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी निवेदक व विनोदी व्यक्तिमत्व  अविनाश  सोनवणे( सर) यांनी भाऊजींची भूमिका साकारली. या कार्यक्रमाचे आयोजन दि.  २२ व २३ ऑक्टोबर रोजी  करण्यात आले होते. सौ. निशा  सोनवणे यांनी अविनाश सोनवणे यांचे औक्षण केले. त्यानंतर सर्व महिला स्पर्धकांनी अविनाश भाऊजींचे जल्लोषात स्वागत केले. सर्व प्रेक्षक वर्गाला नमस्कार करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सुरुवातीला सर्व महिला स्पर्धकांनी उखाणे घेतले.  याप्रसंगी भाऊजींनी सर्व प्रेक्षकांना पोट धरून हसवले. या कार्यक्रमात अनेक मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. भाऊजींनी सर्व महिला स्पर्धकांबरोबर गप्पागोष्टी केल्या. या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता . त्यातून सौ. भाग्यश्री  मोरे या विजयी ठरत त्यांनी पैठणी मिळवून प्रथम बक्षीस मिळवले  तर सौ. लिना  जाधव या उपविजयी ठरल्या. भाऊजींनी दोन्हीही वहिनींना पैठणी देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी सर्व महिलांनी व प्रेक्षकांनी जल्लोष साजरा केला. खेळाच्या स्पर्धा सुरू असताना सौ. ज्योती वाघ व सौ‌. कविता आहेर यांनी पंच म्हणून भूमिका पार पाडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्या मीनाताई जाधव,  आशा पगार,   वर्षा आहेर , शिंदे ताई , तुरकुणे,  वसंतराव जाधव,  दिलीप मोरे , संजय आहेर, सानप बाबा , बाबासाहेब बागुल, बाळासाहेब जाधव सर,अशोक जाधव साहेब ,प्रवीण खैरनार आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अविनाश सोनवणे यांनी केले. नांदगाव नगरीचे मा. नगराध्यक्ष  राजेश कवडे तसेच अंजुमताई कांदे यांनी देखील मंडळाला सदिच्छा भेट दिली.

Thursday, October 26, 2023

लिटिल स्टार स्कूल आणि रेम्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्रीच्या निमित्ताने दांडिया उत्सव साजरा,





नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल , उपाध्यक्ष सरिता बागुल,   लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर,  रेम्बो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नवरात्रीच्या निमित्ताने दांडिया उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
  या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थी वेगवेगळे पोशाख परिधान करून आले होते. मुलांनी धोती पॅन्ट आणि मुलींनी घागरा ओढणी परिधान केलेले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याविष्कार सादर केले.
 शाळेतील लहान गटातील विद्यार्थिनी नवदुर्गाचे पोशाख परिधान करून आल्या होत्या. शाळेचे अध्यक्ष संजय बागुल सर आणि उपाध्यक्ष सरिता बागुल यांनी या नवदुर्गाचे पूजन करून आरती केली. यामुळे शाळेत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे शाळेच्या शिक्षिका दिपाली भांगे अनिता जगधने यांनी केले. नवरात्र आणि दांडिया उत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.

नांदगाव येथे संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न ,



नांदगाव (प्रतिनिधी ) - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकूण ११०९ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. 
     आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून आमदार आपल्या दारी व शासन आपल्या दारी अभियानांतर्गत ही प्रकरणे जमा करण्यात आली होती. 
     सर्व सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही, या अनेक अडचणी येतात, कधी कधी सामान्य जनतेला योजनाच माहीत पडत नाही तर कागदपत्र करायला समजत नाही अशा अनेक अडचणी लक्षात घेऊन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी थेट गावा गावात शासन आपल्या दारी हे अभियान सुरू केले. या अभियानास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत अनेक सुविधांचा लाभ घेतला.  ११०९ लाभार्थी महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे. 
        शासान आपल्या दारी च्या माध्यमातून मतदारसंघातील गावो गावी जातून कॅम्प लावण्यात आले, या ठिकाणी गावातील संजय गांधी निराधार योजनेतील समाविष्ट होणारे प्रकरण जमा करण्यात आली. या सर्व जमा प्रकरणे निकाली काढण्यासाठी समितीचे अध्यक्ष किरण देवरे यांच्या उपस्थितीत  बैठक झाली. 
        संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकीत एकूण ११४३ प्रकरणे होती यात ३४ प्रकरणे कागदपत्र अभावी अपात्र ठरली . उर्वरित ११०९ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. योजना पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून प्रती महिना १५०० रुपये मानधन मिळणार आहे. 
       या प्रसंगी सदस्य राजेंद्र पवार, निळू मामा सानप, गुलाब चव्हाण, लक्ष्मण खुरसने, ताराबाई सोनवणे, विजय ईप्पर, काळू शिंदे , गणेश शिंदे, आशुतोष जाधव, तसेच तहसीलदार सिध्दार्थ मोरे, नायब तहसीलदार योगेश पाटील, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, विस्तार अधिकारी मांडवडे , प्रमोद मोरे, वसंत महिरे आदी उपस्थित होते.

Wednesday, October 25, 2023

भारतीय जनता पार्टी च्या नांदगाव विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियरची बैठक,





नांदगाव (प्रतिनिधी) - शहरातील छत्रपती संभाजी नगर रोड येथे भारतीय जनता पार्टी च्या नांदगाव विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियरची  बैठक भा.ज.पा चे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मार्गदर्शन संपन्न झाली
     यावेळी नांदगाव शहरातील व तालुक्यातील विधान सभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली.   व्यासपीठावर विजय चौधरी, राजेंद्र गावित, जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ, ॲड. जयश्री दौंड, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, मनिषा काकड, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे, नांदगाव विधानसभा निवडणुक प्रमुख पंकज खताळ, मनमाडचे शहर अध्यक्ष नलावडे होते. 
भरत काकड सर यांनी सुत्र संचालन केले. याप्रसंगी सोमनाथ घोंगणे, ॲड.उमेश सरोदे(गिरणा नगर ग्राम पंचायत सदस्य), अर्जुन वाघ(सरपंच-न्यु पांझन), दिपक जाधव(उपसरपंच-न्यु पांझन) व शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी चे उपशहर प्रमुख मनोज शर्मा, अनु.जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाबाजी शिरसाठ, ओ.बी.सी मोर्चा शहर अध्यक्ष दिनेश दिंडे, उद्योग आघाडीचे संजय पटेल, शहर सरचिटणीस सतिष शिंदे, मन की बात चे जिल्हा संयोजक दिपक पगारे, भा.ज.पा. अल्पसंख्याक आघाडी चे जिल्हा अध्यक्ष जलील भाई अंसारी, राजाभाऊ गांगुर्डे, धम्मवेदी बनकर, ॲड.मनिषा पाटील, किरण पैठणकर, मनमाड चे नारायण पवार, यश सेठी, सतिष अहिरे, प्रवीण पवार आदी उपस्थित होते.



श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दूस्थान नांदगाव नवरात्र निमित्त दुर्गा माता दौड आयोजन,





नांदगाव( प्रतिनिधी ) - प्रभू श्रीरामरायाच्या व छत्रपती शिवरायांच्या आर्शीवादाने भगव्या ध्वजाचे राज्य लवकरच यावे यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान नांदगाव विभाग तर्फे नवरात्र निमित्ताने श्री दुर्गा माता दौड चे आयोजन करण्यात आले . या दौड चे यंदाचे हे नववे ९ वर्ष असून नवरात्री उत्सवा दरम्यान दररोज पहाटे निघणा-या या श्री दुर्गा माता दौडमध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले .
  आदिशक्ती माता श्री तुळजाभवानी चरणी देश, धर्माच्या स्वत्वस्वाभिमानासाठी, भारतमातेच्या रक्षणासाठी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर शंभूराजांच्या आणि अगणित धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या अंगी असणारे शौर्य, साहस प्रत्येक हिंदूच्या अंगी यावेत असे मागणे तुळजाभवानी मातेच्या चरणी मागण्यासाठी श्री दुर्गा माता दौड नवरात्री दरम्यान घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत दररोज पहाटे ६ / ३० वाजता श्री दुर्गा माता दौड काढण्यात आली . 
 यात धारकरी बंधू-भगिनी तसेच समाजातील इतर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले .
गेल्या नऊ दिवसांपासून शहरासह परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे आयोजित श्री दुर्गामाता दौडची आज मंगळवारी अखेरच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे अपूर्व उत्साहात यशस्वी सांगता झाली. तरुणांना एकवटून त्यांच्यामध्ये देव, देश व धर्म यांचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या श्री दुर्गामाता दौडमध्ये आज देखील शेकडो युवक - युवती व शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या आजच्या शेवटच्या
दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडला शहरातील श्री.शिवस्फुर्ती मैदान येथुन प्रारंभ झाला. संध्याकाळी दुर्गा मातेची,शिवरायांची आरती व शस्त्र पूजन करून ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणण्याद्वारे शिवरायांच्या जयजयकारात श्री दुर्गामाता दौड सुरू झाली. दौडच्या अग्रभागी भगवा ध्वज हाती घेतलेला होता आणि त्याच्या मागोमाग शस्त्रपथक, महापुरुषांचे फोटो, भगवे फेटेधारी आणि शेकडो शिवभक्त होते. पांढरी वस्त्रे, डोक्यावर पांढरी टोपी, भगवे फेटे परिधान करून दौडमध्ये सहभागी झालेले धारकरी, युवक युवती आणि शिवभक्तांसह अग्रभागी असलेला भगवाध्वज साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
दौडच्या मार्गावर रांगोळ्या रेखाटून तसेच फुलं, पुष्पदलांची उधळण करून दौडचे स्वागत केले जात होते. त्याचप्रमाणे सुहासिनी महिला अग्रभागी असलेल्या ध्वजाचे औक्षण करून दौडचे स्वागत करत होत्या. प्रत्येक मार्गावर उस्फूर्त स्वागत होते असल्यामुळे दौडमध्ये सहभागी झालेल्या शिवप्रेमींचा उत्साह द्विगुणीत होत होता. आजच्या दौंडमध्ये अबालवृद्धांसह तरुणांबरोबरच युवतींचा सहभाग देखील लक्षणीय होता.
      शिवस्फुर्ती मैदान येथुन सुरू झालेली आजच्या शेवटच्या दिवशीची श्री दुर्गामाता महादौड, विठ्ठल मंदीर, कलंत्री गल्ली, श्री, राममंदीर,शनीचौक, हुतात्मा चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांतीसुर्य फुले चौक,दत्त मंदिर, कालिका मंदिर, पाटील गल्ली, मार्गे ग्रामदैवत श्री
एकविरा माता मंदिर येथे समाप्त झाली. या ठिकाणी ध्वज उतरवण्यात आला श्री दुर्गामाता दौडचा समारोप करण्यात आला. यावेळी 
श्रीशिवप्रतिष्ठानतर्फे येत्या जानेवारीत (२०२४) श्री वढु बु. ते श्री. रायगड अशी गडकोट मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेची घोषणा करण्यात आली. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही परशराम हरळे यांचे कडून करण्यात आले.

Friday, October 20, 2023

दुष्काळ जाहीर होण्यासाठी संसद आवाज उठविला जाईल, दुष्काळबाबत मुंबईच्या बैठकीत नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आश्वासन,





नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती व शास्त्रीय निकष ह्या सर्व बाबींमध्ये नांदगाव तालुका तंतोतंत बसत असतानाही शासनाने ट्रिगर -२ अंतर्गत नांदगावचा समावेश केलेला नाही. ही बाब काल मुंबई  येथे शेतकऱ्यांचे कैवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे  मांडून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यात आली. कांदा अनुदान, शेतीमालाचे घसरलेले भाव, निर्यातशुल्क, जीवनावश्यक वस्तूंची महागाई ह्या प्रश्नावर चर्चा करून जनतेला न्याय मिळावा असे गाऱ्हाणं त्यांच्या पुढे मांडण्यात आले.यावेळी  बैठकीप्रसंगी उपस्थित असलेल्या खासदार सुप्रियाताई सुळे ह्यांनी  दुष्काळासंदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून तातडीने ट्विट केले. व नांदगावच्या दुष्काळाबाबत संसदेत आवाज उठविला जाईल असे पक्षाच्या तालुक्यातील शिष्टमंडळाला आश्वासित केले.
   दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या तालुक्याला वगळण्यात आले आहे. अवर्षणामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. हे लक्षात घेता या तालुक्याचा फेरअहवाल जिल्हा दुष्काळ देखरेख समितीमार्फत मागवून तो मंजूर करुन घेण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. 
       मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत  नांदगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी सादरीकरण केले. त्याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे बैठक सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांना टॅग करीत ट्विट केलं . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नांदगावच्या दुष्कळाबाबत चिंता व्यक्त करीत शासनस्तरावर सर्वोतपरी सहकार्य करण्याचे मान्य केले. दुष्कळाबाबत नांदगाव  तालुका राष्ट्रवादीकडून सातत्याने  पाठपुरावा केला जात आहे .
      या बैठकीत राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे,  हेमंत टकले, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सलक्षणा सलगर, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, यांच्यासह अनिल वाघ,निलेश चव्हाण, मच्छिंद्र वाघ, अशोक निकम आदीची उपस्थिती होती.

शाळेच्या प्रांगणात नवरात्रीनिमित्त भोंडल्याचा कार्यक्रम आनंद उत्सव साजरा,



नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल शिशु विहार येथे नवरात्रीनिमित्त भोंडल्याचा कार्यक्रम आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरा करण्यात आला.  शाळेच्या सुरळकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भोंडल्याची माहिती सांगितली.  तसेच देशमुख मॅडम व  निकम मॅडम यांनीही कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांसोबत गरबा नृत्य सादर केले.

नांदगाव येथील कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ.भारती पवार यांना दाखवले काळे झेंडे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी,




नांदगाव (प्रतिनिधी ) - मेरी माटी मेरा देश अंतर्गत  नांदगाव येथील कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री खासदार डॉ. भारती पवार यांना मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने केली जात असून, राज्यात मनोज जरांगे पाटील हे विविध ठिकाणी जाऊन सरकारकडे मागणी लावून धरत आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांचा विरोध होतोय . 
       नांदगाव  येथील कार्यालयात काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता केंद्राची काय भुमिका आहे असा सवाल करत भिमराज लोखंडे,  विशाल वडघुले, परेश राऊत यांनी  आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भारती पवार यांनी शहिदांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्याना मी विरोधकच म्हणेल त्यांनी संविधानिक मार्गाने आरक्षण मागावे आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले. कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या आंदोलनकर्त्यांना  यावेळी पोलिसांनी अटक केली. यानंतर भारती पवार यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत तुमच्या भावना मी नक्कीच वरपर्यंत पोहचवेल असे आश्वासन दिले. यावेळी भाजपच्या अॅड. जयश्रीताई दौंड, नांदगाव शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, तालुका अध्यक्ष मनिषा  काकड, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे,  पंकज खताळ पाटील , नांदगाव तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, दिनेश दिंडे, भाऊराव निकम, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबाजी शिरसाट, इंदिरा ताई बनकर, संदीप नलावडे, सतीश शिंदे, राजाभाऊ गांगुर्डे, भारत काकड सर, राजाभाऊ पवार, डॉ. आहेर आदी उपस्थिती होती.

Thursday, October 19, 2023

नांदगाव च्या आनंदनगर येथे वेशभूषा स्पर्धेचे आयोजन,




नांदगाव( प्रतिनिधी) -  शहीद भगतसिंग नवरात्र मंडळ आनंदनगर येथे वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत त्रिषा भावसार आरव,  आरोही धुमाळ, क्रियांश किशोर, वाघ वेदिका, शिंदे स्वरा ,धुमाळ शौर्य ,किशोर धुमाळ ,लक्ष भावसार, निधी पांडे ,दिक्षिता देवकते, आरव पांडे, अविरा भावसार ,साई सुनील, जाधव कीर्ती, चौधरी पलक ,हेमंत पांडे, अशा चिमुकल्यांनी  स्पर्धेला सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जाधव ताई, पुजा पांडे, रेणुका देवकते, साधाना धुमाळ यांनी काम पाहिले. प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार महेश पेवाल, अनिल धामणे उपस्थित होते. यावेळी 
सचिन देवकते,  शाम भावसार, चाद पठाण,  राकेश धुमाळ, राकेश सुरशे , सतिष वाघ , अशोक देवकते, सुभाष सरग, नाना धुमाळ, दिपक शिंदे, धिरज पवार. राम भावसार, किशोर धुमाळ, निलेश देवकते, संतोष शिंदे , अतुल पवार, नामा भावसार, शिवम भावसार, पवन धुमाळ, सचिन वाघ , सुरज शिंदे , जय सोनवने, किशोर वाघ , धनंजय वाघ,  साई जाधव , विराज पांडे, आशाताई भावसार, शोभाताई देवकते ,मीनाताई सरग, मिनाताई धुमाळ, कल्याणी पांडे,सोनाली वाघ,रूपाली भावसार,चंदकला सरग, जया देवकते, गुमणर ताई, पुनम देवकते, प्रिया पवार, विमलताई पवार, पुजा जाधव, कविता सोनवणे,  मनिषा शिंदे महिला उपस्थित होत्या . संयोजन राजेंद्र गांगुर्डे यांनी केले.

Wednesday, October 18, 2023

नांदगाव शहरात शिवसेना वाहतूक संघटनेच्या शाखांचे उद्घाटन, संघटनेच्या वतीने आमदार सुहास कांदे यांचा सत्कार,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात शिवसेना रिक्षा युनियन, चालक मालक संघटना व माल वाहतूक संघटनेच्या शाखांचे उद्घाटन आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. नांदगाव शहरात शिवसेना व आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कार्याची प्रेरणा घेत शिवसेना रिक्षा युनियन, चालक मालक संघटना व माल वाहतूक संघटनेच्या शाखांचे उद्घाटन संपन्न झाले. 
     आमदार सुहास आण्णा कांदे यांचे या प्रसंगी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. सुरुवातील छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली तर मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. 
       यावेळी बोलताना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शाखा उद्घाटन झालेल्या सर्व संघटनांच्या सदस्यांचा विमा उतरवून देणार असल्याचे सांगितले, या माध्यमातून प्रत्येकाला हॉस्पिटल खर्च ५ लाख व काही अप्रिय घटना घडल्यास वारसास १५ लाख रुपये मिळणार असल्याचे सांगितले. तसेच या ठिकाणी स्वखर्चातून सुसज्ज शेड केबिन देण्यात आली असून सौ. अंजुम ताई कांदे यांनी वॉटर फिल्टर भेट दिले आहे. 
      या प्रसंगी जिल्हा प्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख सुनील जाधव, राजाभाऊ जगताप, नंदू पाटील, राजाभाऊ देशमुख, बापूसाहेब जाधव, शशिकांत सोनवणे, अय्याज शेख, दिनेश ओचाणी, संजय देवरे, हरिभाऊ नन्नवरे, सुधीर देशमुख, किशोर जाधव, नाना पेहरे, संतोष वाघ, नितीन जाधव, अमजद खान, अनिल पगारे, योगेश गायकवाड, दत्तात्रय सावंत, सतीश गांगुर्डे, अब्दुल सत्तार, सुनील आहेर, भगीरथ जेजूरकर,
आदि उपस्थित होते.

आमदार सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी आढावा बैठक,




नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमात आपला तालुका बसतो. यामुळे जेव्हाही शासन दुष्काळ जाहीर करेल तेव्हा आपल्या तालुक्याचा त्यात समावेश असेल. मात्र कृषी विभागाच्या वतीने जर नांदगाव तालुक्याला टाळले तर मी हायकोर्टात पिटीशन दाखल करुन नांदगावला दुष्काळग्रस्त जाहीर करून घेईल. यामुळे तालुक्यातील जनतेने अजिबात घाबरू नये आणि संभ्रमात राहू नये असे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी दिले. आज तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीवर आढावा घेण्यासाठी  आयोजित बैठकीत ते बोलते होते.यावेळी तहसीलदार बीडीओ आणि कृषी अधिकारी यांच्यासह तालुक्यातील सर्वच शासकीय यंत्रणा उपस्थित होते.

Tuesday, October 17, 2023

गिरणानगर ग्रामपंचायत येथील हद्दीतील सभामंडपाचे भूमिपूजन अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न,



नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील गिरणानगर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीवर (वडाळकर वाडा) सभामंडपाचे सौ. अंजुम  सुहास कांदे यांच्या हस्ते  भूमिपूजन संपन्न झाले.
     नांदगाव तालुक्यातील गिरणानगर  येथील आदिवासी वस्तीवरील (वडाळकर वाडा) महिला व नागरिकांना या आधी दिलेल्या भेटीत स्थानिकांनी विविध विकास कामांची मागणी केली होती. सौ.अंजुम  कांदे यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांना माहिती दिली असता तात्काळ दाखल घेत कामांना मंजुरी दिली. 
आज या कामांचे भूमिपूजन या वेळी करण्यात आले. 
    या प्रसंगी बोलतांना आपल्या समस्या सोडवणे हे आमचं कर्तव्य आहे, आपण निसंकोपणे आमच्याशी संपर्क करू शकता असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला. या मध्ये मूलभूत सुविधा योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय तसेच सभामंडप बांधण्यात येत आहे.
      या प्रसंगी सौ.रोहिणी मोरे, भारती ताई बागोरे, सरपंच अनिता पवार, पल्लवी सोमासे,विद्या कसबे, संध्या पवार, निराली वाघ, रेणुका बाहिकर,नम्रता सांबरे, राधा सांबरे, वैशाली पडवळ, राहुल पवार, अनिल , राजेंद्र कुटे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Monday, October 16, 2023

नांदगाव समता परिषद महिला आघाडीतर्फे निवेदन देऊन महिलांच्या विविध प्रश्नावर चर्चा,



 नांदगाव ( प्रतिनिधी )  -   अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व पंकज  भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक महिला जिल्हाध्यक्षा  पूजा आहेर एंडाईत यांनी नांदगाव तालुक्यातील तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देऊन महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
           नांदगाव तालुक्यातील महिला व गोरगरीब व्यक्तींचे नांदगाव तहसील कार्यालयात कामे होत नाही. अर्ज देऊनही व सर्व पूर्तता करूनही कामे होत नाही. घरकुल योजना, रेशनकार्ड, नवीन रेशन कार्ड, बारकोड नंबर, दुय्यम रेशन कार्ड, रेशनकार्ड ऑनलाइन करणे, ऑनलाइन दुरुस्ती करणे, श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, विधवा पेन्शन योजना, सांप्रदाय मंडळ पेन्शन योजना इतर कामे होत नाहीत. अर्जदार चकरा मारून फेरे मारून थकून जातो. अर्जदार हा मजुरी करणार वर्ग असल्याने त्याला वारंवार चकरा मारणे परवडत नाही. अशिक्षित असल्याने त्यांना सहकार्य केले जात नाही. उलट त्यांना उडवा-उडवीचे उत्तरे देऊन त्यांना मानसिक त्रास दिला जातो. तरी महिला व गोरगरिबांची कामे लवकरात लवकर व्हावे असे निवेदन तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना देण्यात आले.
            यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला जिल्हाध्यक्षा सौ. पूजा आहेर-एंडाईत, अ. भा. म. फुले समता परिषद महिला तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे, अ. भा. म. फुले समता परिषद तालुकाध्यक्ष अशोक पाटील, अ. भा. म. फुले समता परिषद शहराध्यक्षा सुगंधा खैरनार, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, माणिक बाविस्कर, रंजना सोनवणे, प्रमिला आहेर, निर्मला आहेर, मंगला बोरसे, ताराबाई तावडे, विजया बोरसे, जयश्री खैरे, आशा खैरनार, बाळू सोनवणे, भारत ठाकरे, दायकु दळवी, पुनमचंद चव्हाण, माया मोरे, लंकू मोरे, विमलबाई सोनवणे, इंदुबाई ठाकरे, वंदना ठाकरे, अनिता वाघ, बाईजाबाई दळवी, नायजाबाई दळवी, पातळाबाई मोरे, मंगलाबाई सोनवणे, सिंधू दळवी, कमा दळवी, उषा दळवी, सुनीता जगधने, नर्मदाबाई आहेर, गीता दळवी, पुष्पा मोरे, मायाबाई मोरे, अनिता दळवी, अंजनाबाई चव्हाण, वैशाली चव्हाण, सुरेखा चव्हाण, सिंधुबाई चव्हाण, कौशलाबाई चव्हाण, सखुबाई चव्हाण, देविदास राठोड, धर्मा पवार, जनाबाई चव्हाण, सुशीला पवार, सुरेखा मोकळ, बबलू चव्हाण, तुकाराम माळी, विक्रम तावडे, सुनिता आहेर, सौदराबाई चव्हाण, सुनीताबाई मुकणे इत्यादी महिला व व्यक्तींनी या निवेदनात सह्या केल्या आहेत.

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन, तालुका प्रशासनाने वस्तुस्थितीदर्शक खुलासा करावा,




नांदगाव (प्रतिनिधी )  - दुष्काळग्रस्त  तालुक्यांच्या यादीत नांदगाव तालुका वगळण्यात आला आहे.  तालुका प्रशासनाने वस्तुस्थितीदर्शक खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. नांदगाव तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात शासन निर्णयान्वये दुष्काळाचे मूल्यांकन करण्याची सविस्तर कार्यपद्धती निश्र्चित करण्यात आली आहे. खरीप  -२०२३ हंगामामध्ये दुष्काळाचे मूल्यांकन Maha-Madat प्रणालीमार्फत करण्यात आले असून जिल्हानिहाय Trigger-1 व  Trigger-2 लागू झालेले तालुके निश्चित करण्यात आले आहेत. या मुल्यांकनानुसार राज्यातील ४२ तालुक्यामध्ये Trigger-2 लागू झाला आहे Trigger-2 लागू झालेल्या तालुक्यामध्ये केवळ दुष्काळामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याचे क्षेत्रीय सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्याकरिता अशा तालुक्यातील १०% गावे अकस्मात तपासणी (रँडम ) पद्धतीने निवडून प्रतिकूल परिस्थितीत  समाविष्ट करण्यासाठी उपाययोजना राबविणे अपेक्षित असते.  तालुका प्रशासनाने जाहीर केलेल्या आणेवारी बद्दल संपूर्ण तालुक्यात असमाधान असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सादर केलेल्या अहवालावर संशय घेण्यास वाव निर्माण करणारी परिस्थिती उपरोक्त परिपत्रकान्वये सिद्ध झालीआहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. Trigger-2 लागू झालेल्या तालुक्यात करावयाच्या क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर सवेंदन उपयोजन केंद्र ,नागपूर ( MRSAC) यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या Maha-Madat या मोबाईल अँप च्या माध्यमातून तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे.   दुष्काळ मध्यम स्वरूपाचा किंवा तीव्र स्वरूपाचा आहे याबाबतचा उल्लेख करून आपला अहवाल राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समिती मार्फत शासनास पाठविण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत .  जिल्ह्यातील सर्वात निच्चांकी पर्जन्यमानाची नोंद नांदगाव तालुक्यात झाली.  त्याचा परिणाम एकूण खरीप हंगामावर होऊन उत्पन्नावर झाला आहे . पाऊस नाही म्हणून भूगर्भातील जलपातळी घटली आहे. दुसरीकडे एकूण उपलब्ध जलसाठे कोरडेठाक पडले आहेत . त्यात पुन्हा दिवसेंदिवस टँकर्सची संख्या वाढत आहे .  पुन्हा भरीस भर म्हणून जनावरांच्या पिण्याचे पाणी व चारा टंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे . प्राथमिक नजर आणेवारी ३२ पैसे ते ३६  पैशाच्या आत आहे अशी सर्व पार्श्वभूमी असूनही Trigger-1 व  Trigger-2 मधून नांदगाव तालुक्याला वगळण्यात आले आहे.  त्यासाठी कोणते निकष गृहीत धरण्यात आलेत त्याचे स्पष्टीकरण झालेच पाहिजे . कारण  दुष्काळग्रस्त नांदगाव तालुक्यावर अन्याय आहे म्हणून या क्षेत्रीय सर्वेक्षणाची योग्य कार्यवाही करणे व त्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास नमूद वेळेत काटेकोरपणे पाठविणे अपेक्षित आहे.   जेणेकरून दुष्काळाची परिस्थिती ग्राह्य धरून नांदगाव तालुका दुष्काळी घोषित करण्याची कार्यवाही प्रशासनास करता येईल .  कामात प्रशासनाच्या वतीने हयगय झाल्यास होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी प्रशासनाची राहील असे  दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे.

Sunday, October 15, 2023

श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील शनी महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात,




 नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी)  शनिवारी आलेली आमवस्यामुळे  नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान भारतातील साडेतीन शनिपिठांपैकी पुर्ण पीठ असलेले श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील शनी महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.यावर्षी नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे संकट उभे राहिले असून, त्या संकटातून सावरण्याची शक्ती सर्वांना दे अशी विनवणी करत हजारो भाविकांनी शनी देवाच्या चरणी नतमस्तक झाले.
    शनिवारी अमावस्यामुळे दिवसभर असल्याने अनेक भाविक पहाटे पासूनच दर्शनासाठी दाखल झाले होते.  रात्री उशिरापर्यंत अमावस्या असल्याने दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.नांदगाव तालुक्यात पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने दुष्काळ परिस्थिती ओढवली असली तरी शनी देवांचे महात्म्य नाकारता येत नाही. दुष्काळचे सावट जाणवत असले तरी परिसरातून अनेक भागातून पायी दिंड्या शनी महाराज यांच्या दर्शनासाठी नस्तनपूर नगरीत दाखल झाल्या होत्या.ओम श्री शनेचराय नमः, शनी महाराज कि जय' चा नारा देत मंदिर परिसर दणाणून गेला होता . आरतीचे व महापूजेच मानकरी कोपरगाव येथील उद्योग पती निलेश जपे व सौ . जपे तर भाविकांना मधून चिंचविहिर येथील पांडुरंग विठ्ठल तुरकूने दांपत्य होते.  या प्रसंगी शनी महाराज संस्थानचे सरचिटणीस माजी आमदार अनिल आहेर , विश्वस्त उदय पवार,खासेराव सुर्वे, नांदगाव बाजार समितीचे संचालक दर्शन आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
     यात्रा काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून संस्थांनच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येऊन भाविकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यात जागोजागी पिण्यासाठी थंड पाणी, वैद्यकीय सुविधा,दर्शनासाठी सावली,देणगी स्टॉल ,इत्यादी तर मिठाई , प्रसाद, खाद्य पदार्थांची तसेच लहान मुलांच्या खेळणी ची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती त्यामुळे भाविकांनी यात्रेचा लाभ घेतला . यात्रा -  उत्सव शांततेत पार पडावी म्हणून यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ शरदचंद्र आहेर, संदीप मवाळ, हरेश्वर सुर्वे, सुनिल पवार, भैया पाटील, भास्कर सोळसे यांचे बरोबरच संस्थान चे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Saturday, October 14, 2023

आंतरजिल्हा महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत नाशिकच्या एचपीटी महाविद्यालय मुलीच्या संघाने पटकावले विजेतेपद, तर बी वाय के महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक,

छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर 



नांदगाव ( प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शारीरिक शिक्षण क्रीडा मंडळ पुणे, नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल मुली क्रीडा स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या.
   या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून एकूण बारा संघांनी प्रवेश घेतला होता. आंतर महाविद्यालयीन मुली क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रीतम चौधरी पोलीस निरीक्षक यांनी आरोग्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे व त्यासाठी क्रीडा स्पर्धा या गरजेच्या आहेत या स्पर्धेतून खेळाडूची क्षमता व प्रगती तपासता येते जेणेकरून खेळाडू स्पर्धेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी तयार होतो असे उपस्थित खेळाडूंना संबोधित केले. त्याचबरोबर शरद पाटील - स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य यांनी खेळाडूंना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे सर यांनी क्रीडा स्पर्धेचे महत्त्व, सध्याचे खेळाडू, त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच सध्याच्या खेळाडूंची मानसिकता यावर संबोधित केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. एल.एम. गळदगे यांनी सर्वांचे आभार मानून करण्यात आले.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एचपीटी महाविद्यालय व बी वाय के महाविद्यालय नाशिक यांच्यात चुरशीचा सामना होऊन एचपीटी महाविद्यालयाने जिल्हा आंतर महाविद्यालयीन फुटबॉल मुली स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर बी वाय के महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला. या सामन्यासाठी पंच म्हणून रहीम पठाण व त्यांचे सहकारी यांनी काम केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन शिंदे, उपप्राचार्य डॉ एस ए मराठे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक एल. एम. गळदगे महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Thursday, October 12, 2023

‌नांदगाव येथे भररस्त्यात चाऱ्यानी भरलेल्या ट्रॅक्टरला भीषण आग, अचानक लागलेल्या आगीत चारा जळून खाक,



नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती भीषण बनत चालली असून पावसाने पूर्ण पाठ फिरविल्याने आता ऐन पावसाळ्यात चाऱ्याच्या किमती दुपटीने वाढू लागल्या आहेत. अजून काही दिवसांनी चारा मिळणेही मुश्किल होणार आहे. तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे . यातच
नांदगाव तालुक्यातील पळाशी येथून चारा खरेदी करून मनमाड जवळील पाणेवाडी कडे जाणाऱ्या जनावरांचा चाऱ्यानी भरलेल्या ट्रॅक्टरला भीषण आग लागली.नांदगाव मनमाड रोडवर असलेल्या चालत्या ट्रॅक्टर मध्ये दोन एकरचा जनावरांसाठी चारा भरलेला दोन टारलीला अचानक आग लागल्याने चारा आगीत जळून खाक झाला असल्याची घटना घडली.
पाणेवाडी येथील शेतकरी भागा सांगळे असे या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.आग कशामुळे लागली याचे कारण समजले नसून,येथील नागरिकांच्या मदतीने व येथील काही अंतरावरील निलेश सर्व्हिस स्टेशनवर ट्रॅक्टर थांबवुन पाणी मारून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्या नंतर नांदगाव नगर पालिकेचा मिनीबंब दाखल झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील प्रयत्न केले परंतु चारा जळून खाक झाला. अखेर कॉलेज जवळील पटांगणात चाऱ्याची टारली नेऊन जेसीबीच्या सहाय्याने खाली केली तरी देखील आग सुरूच होती यात सुमारे मोठ्या प्रमाणावर आर्थीक नुकसान झाले कडवा चारा जळून खाक झाला, या दरम्यान नांदगांव पोलिसांनी जळालेल्या चाऱ्याची पाहणी केली. 
- " नांदगांव शहरा नजीक चालू ट्रॅक्टरच्या कडब्याला कुणीतरी आग लावल्याने चारा जळून खाक झाला. यात मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान झाले आहे असे पाणेवाडी येथील शेतकरी सानप यांनी सांगितले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रसादभैय्या सोनवणे यांची नियुक्ती,




नांदगाव (प्रतिनिधी ) - मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,अन्न,नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार व मुंबई प्रांताध्यक्ष समीर भुजबळ, उत्तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, प्रदेश सरचिटनिस दिलीपआण्णा खैरे, नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या हस्ते नांदगाव तालुक्याचे युवा नेते प्रसादभैय्या सोनवणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
     नांदगाव तालुक्यातून श्रीगणेशा करत, जिल्हा पातळीवर भुजबळ कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाने याआधी प्रसादभैय्या सोनवणेंनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे, नाशिक जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच जिल्हा शेतकीय समितीवरही ते कार्यरत आहेत. आपल्या कार्य कर्तुत्वाने या पदांमार्फत जिल्ह्यावर ठसा उमटवलेला आहे. आणि म्हणूनच आता अवघ्या वयाच्या २६ व्या वर्षी राज्याच्या राजकारणात प्रवेश करत, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार यांसारख्या बड्या जिल्ह्यांची जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या विश्वासाने टाकलेली दिसते. सोनवणेंचा इतिहास बघता, राज्यव्यापी कॉपीमुक्त अभियान ईथपासून ते राज्यस्तरीय शिष्यवृत्ती समस्या, विद्यापीठ विरोधी लढे असे अनेक राज्यव्यापी लढे, आंदोलने उभारत राज्यातील विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या मनात विश्वास तयार केलेला दिसतो.
  याच कामांची दखल घेत, भुजबळ परिवार प्रसादभैय्या सोनवणेंसाठी कायम आग्रही राहत, पाठीवरती थाप देतांना वेळोवेळी आपण सर्वांनी बघितला आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त काम, जास्तीत जास्त पक्षाच्या कामात सक्रीय राहत, उत्तुंग भरारी घेत उत्तर महाराष्ट्राचे पदाचे मानकरी प्रसादभैय्या सोनवणे या चर्चेला उधाण आले आहे. या निवडीमुळे प्रसादभैय्या सोनवणेंचे सर्वत्र स्वागत होत आहे. पक्षातील वरिष्ठ, कार्यकर्ता, युवक आणि विद्यार्थी वर्गाकडून कौतुक होत आहे.
       निवडीनंतर प्रसादभैय्या सोनवणेंनी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,  माजी खासदार व पक्षाचे मुंबई प्रांताध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ व प्रदेश सरचिटणीस दिलीपआण्णा खैरे यांचे आभार मानले.

Wednesday, October 11, 2023

नांदगाव रेल्वे रनिंगरूम जवळ साडेपाच फूट लांबीचे कोब्रा जातीचे विषारी साप आढळला,


 

नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव रेल्वे रनिंगरूम मध्ये साडेपाच फूट लांबीचे कोब्रा जातीचे विषारी साप आढळला होता. नांदगाव रेल्वे रनिंगरूम जवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास कर्मचारीला सर्पदंश होता होता वाचले. एक रूम मध्ये मोठा साप जाताना दिसला. सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला असता , बडोदे तात्काळ पोहोचले आणि रनिंग रूम एका खोलीत समान ठेवलेलं होता. त्यांनी समान व्यवस्थित बाजूला करून बघितलं तर साडे पाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप होता. बडोदे यांनी वेवस्तीत पकडून बंद केला आणि रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांना भयमुक्त केला बद्दल त्यांचे आभार मानले आणि कोब्रा ला निसर्गमुक्त केले.

लक्ष्मीनगर येथे भाजपतर्फे "मेरी मिट्टी मेरा देश" अभियान,


   
नांदगाव (प्रतिनिधी ) - लक्ष्मीनगर येथे भाजप तर्फे "मेरी मिट्टी मेरा देश" अभियान जेष्ठ नेते आनंदराव घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आले. भाजपाच्या जेष्ठ नेत्या अॅड. जयश्रीताई दौंड अभियानात सहभागी झाल्या होत्या. देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी लक्ष्मीनगरच्या ग्रामस्थांसह महिला व अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. 
    दिल्ली येथे निर्माण होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मे, शहिद वीर जवान आणि वीरांगना यांच्या स्मारकासाठी हा अमृत कलश जाणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आणि राष्ट्रीय भावना जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. अशी माहिती अॅड जयश्री ताई दोंड यांनी सांगितली. भारतीय जनता पार्टीच्या नांदगाव तालुका अध्यक्षा (भालूर) सौ. मंदाकिनी भारत काकड यांनी "मातीला नमन वीरांना वंदन" करण्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व मान्यवरांचे अभिनंदन केले व आभार मानले. नांदगाव भाजपा तर्फे हे अभियान राबविण्यात आले. मेरी मिट्टी मेरा देश, भारत माता की जय, वंदेमातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी भाजपचे डाॅ. राजेंद्र आहेर, जेष्ठ नेते भगवानजी सोनवणे,नामदेवजी शिंदे, डॉ. बी. के. आहेर, राजेंद्र भाऊ काजळे, सचिन थेटे, सचिन गाठबांधे, भारत काकड सर, आंबादास गवळी,कारभारी जाधव, अर्जुन उगले, यादव जाधव,हिरामण पवार, दिनकर साेनवणे, नामदेव पाटील, पुंजाराम जाधव, समाधान उगले, आसाराम गवळी, यशवंत जाधव, योगेश सोनावणे, सुकदेव दळे, मच्छिंद्र घाडगे, मधुकर राजगुरू, नारायण उगले, राजेंद्र जाधव,दत्तात्रय महाडिक,रमेश सोनावणे,चिंधु गरूड, सौ. जयश्री सोनवणे, उषाबाई सोनवणे, मनिषा राजगुरू, सुशिलाबाई सोनवणे, गौरी राजगुरू,वाल्याबाई सोनवणे, राधिका सोनवणे तसेच लक्ष्मीनगरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगाव मध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, शिबीरात आमदार सुहास कांदे यांच्या वतीने मोफत फिरता दवाखाना,




नांदगाव ( प्रतिनिधी) - आमदार सुहास अण्णा रहेनुमा फाउंडेशन नांदगाव व एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  नांदगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. 
     आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मोफत फिरता दवाखाना तसेच शिबिराचे आयोजन करण्यात आले. एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव येथून सर्व प्रकारच्या तज्ञ डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते . यामध्ये हृदयरोग तज्ञ, अस्तिरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, जनरल सर्जरी,असे विविध तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते. या वेळी सर्वच नागरिकांची रक्तदाब तपासून घेण्यात आला. 
  यात एकूण ४७३ नागरिकांनी विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला, डोळे तपासणी व यामध्ये ३२७ चष्मे वाटप करण्यात आले.
    या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख किरण देवरे, जेष्ठ नेते विष्णू निकम सर, बाजार समिती संचालक बाळासाहेब कवडे, माजी नगरसेवक इकबाल शेख, याकूब शेख, चिराग भाई शेख, सबदर अली सैय्यद, शशिकांत सोनवणे आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनचे अध्यक्ष सईद हाजी, अय्याज शेख,इकबाल भाई शेख मोहसीन दफेदार,  रियाज शेख, लल्लू टेलर, प्रकाश शिंदे,  नसीर खतीब, नईम शेख, सुनील जाधव, आरिफ शेख, वसीम पठाण ,इम्तियाज भाई परवेझ शेख, नदीम तांबोळी ,इमरान शेख आदी उपस्थित होते.

Sunday, October 8, 2023

नांदगाव येथील आर्या कासलीवाल हिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड,





नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील प्रसिद्व व्यापारी रिखबकाका कासलीवाल यांची नात व युवा उद्योजक समीर कासलीवाल यांची कन्या कुमारी आर्या हिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी  निवड झाली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत १४ वर्षाखालील विभागस्तरीय कॅरम स्पर्धा नुकत्याच शिरपूर येथे मोठया उत्साहात पार पडल्या. या स्पधेंत नाशिक विभागातील ६४ खेळाडूनी सहभाग नोंदविला होता. 
 या स्पर्धेत येवला येथील विद्या इंटरनॅशनल खेळाडू आर्या समीर कासलीवाल हिने ज्वहेरी अन्सारी (धुळे) , श्रेया माहालपुरे (जळगाव)  ,बिनी फातीया (मालेगाव) ' अरूण सोळसे (जळगाव )या खेळाडूवर अंत्यत शांत व संयमाने कलात्मक गुणाचां खेळ करून विजय प्राप्त केला. या विजयामुळे तिची राज्यस्तरीय स्पधैसाठी सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली. तिच्या या नेत्र दिपक कामगिरी बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील ,  धुळे जिल्हा प्रभारी क्रीडा अधिकारी अविनाश टिळे  , येवला तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे  नांदगाव युवा उद्योजक आनंद कासलीवाल , अमोल नावंदर , सचिन पारख, सोमनाथ घोगांणे,  नुतन कासलीवाल आदीनी आर्या हिचे अभिनंदन केले.

नांदगाव मध्ये समता परिषद महिला आघाडीतर्फे बैठक,



 नांदगाव (प्रतिनिधी) - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष  पूजा आहेर-एंडाईत यांच्या उपस्थितीत नांदगाव तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडीच्या वतीने मीटिंग आयोजित करण्यात आली. या  प्रसंगी महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच विविध प्रश्न सोडवण्यात आले. महिलांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
     यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला जिल्हाध्यक्षा  पूजा आहेर-एंडाईत, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे, शहराध्यक्षा सुगंधा खैरनार, विनोद शेलार यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
       अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे, अ. भा. म. फुले समता परिषद तालुकाध्यक्ष अशोक पाटील, अ. भा. म. फुले समता परिषद शहराध्यक्षा सुगंधा खैरनार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष योगिता पाटील, विनोद शेलार, महेश पवार, प्रशांत बोरसे, मोहिनी भागवत, लंकाबाई पवार, शैला पवार ,मीना वाघ, अर्चना यादव, मंदा वर्षे ,रत्ना वर्षे, मीना भागवत ,जयश्री खैरे ,अर्चना खैरनार,सविता आहेर, शोभा बोरसे, सुनिता आहेर, सुरेखा आहेर, मंगल बोरसे, वंदना साबळे, कविता बोरसे, मनीषा पगारे,मीना निकम, मोहिनी चव्हाण , सुग्रीबाई राठोड, वैशाली चव्हाण, अंजना चव्हाण, अनिता चव्हाण, वैशाली चव्हाण, सिंधू चव्हाण, गीता चव्हाण, पार्वता राठोड, सखु चव्हाण, वैशाली चव्हाण, सुनिता चव्हाण, सुरेखा चव्हाण, जनाबाई चव्हाण, छकुली चव्हाण, प्रतिभा चव्हाण,राहुल चव्हाण, वनिता राठोड, विजया बोरसे, हिराबाई आहेर, सुनिता सोमासे, कुसुम सोमासे,मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Friday, October 6, 2023

मनमाड करंजवण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलकुंभाचे भूमिपूजन,




 मनमाड ( विशेष प्रतिनिधी ) - आमदार सुहास अण्णा कांदे यांची महत्त्वकांक्षी पाणी योजना, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड पाणीपुरवठा योजने अंतर्गत येणाऱ्या शहरातील तीन जलकुंभा पैकी  संकलेच्या हिरो शोरूम पाठीमागील जलकुंभाचे (क्षमता ३.८५ लक्ष ली.) भूमिपूजन करण्यात आले.
        या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी माजी आमदार राजाभाऊ देशमुख हे होते. प्रास्ताविक मुख्याधिकारी चौधरी साहेब तर  जाफर मिर्झा यांनी सूत्रसंचालन केले.   या वेळी त्यांनी सद्य परिस्थिती सांगत करंजवण धरणातील जॅकवेल चे काम तसेच मनमाड शहरालगत सुरू असलेले केंद्राचे काम ८० टक्के पूर्ण झाले असल्याचे सांगितले‌. यात जवळपास ६० किलोमीटर पाईपलाईन टाकून झाले आहेत . मनमाड शहरात तीन जलकुंभ निर्मितीचे काम लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. 
      माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांनी यावेळी बोलताना योजनेचे काम ज्या वेगाने सुरू आहे ते पाहता योजना मनमाड शहराकडे चालत नाही तर पळत येत आहे असे म्हणत आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. 
      युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान  खान यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास अण्णा कांदे यांचे खरे पाठबळ आपण जनता आहे याबद्दल आभार मानले. 
   या प्रसंगी युवासेना मुख्याधिकारी मनमाड नगर परिषद  शेषराव चौधरी , जिल्हा प्रमुख फरहान दादा खान,उप जिल्हा प्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, अल्ताफ बाबा खान, राजाभाऊ भाबड, आर पी आय जिल्हाप्रमुख राजाभाऊ अहिरे, युवासेना शहर प्रमुख योगेश इमले, नितीन पांडे, दिलीप तेजवानी, गांगाभाऊ त्रिभुवन, असलम खान, नाना शिंदे, वाल्मीक आंधळे, अमिन पटेल, रवींद्र घोडेस्वार, गालिब शेख, महेंद्र शिरसाठ, राकेश ललवाणी, एजाज शाह, अमजद पठाण, प्रमोद अहिरे, दिनेश घुगे, संतोष अहीरे, अजीज शेख, लाला नागरे, संजय दराडे, मुकुंद झाल्टे, जलील भाई अन्सारी सुभाष माळवतकर, बाबा पठाण, सुनील ताठे, लोकेश साबळे, विशाल सुरावसे, समीर पटेल, मिलिंद उबाळे, मन्नू शेख, ललित रसाळ, संदीप पाटील,पिंटू वाघ,दिनेश घुगे स्वराज देशमुख,स्वराज वाघ, गुरू निकाळे,निलेश ताठे, सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी, धनंजय आंधळे, संजय दराडे, सचिन दरगुडे,कुणाल विसापूर्कर, निलेश व्यवहारे, शिवसेना महीला आघाडीच्या संगीताताई बागुल, पूजा छाजेड, नाजमा मिर्झा, सरला गोगळ, अलका कुमावत, प्रतिभा , संगीता घोडेराव, सविता दुबे ,
, अनिल गवळी, मुक्तार शेख, अज्जू भाई शेख आदि उपस्थित होते. 

Monday, October 2, 2023

नांदगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम,



नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगांव शहरातील शनि चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती चे आयोजन भाजप शहराअध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी केले. या प्रसंगी जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेेस भाजप पक्षाच्या  वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. भा.ज.पा च्या जयेष्ठ नेत्या जयश्री ताई दौंड यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . मनोज  शर्मा यांनी स्व. पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन्ही महापुरुषांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले . राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे....स्व. पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी अमर रहे.... भारत माता की जय....वंदे मातरम् ...अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस सतिष शिंदे, दिनेश दिंडे, अरुण राऊत, रवि निकम, संजय मोकळ, धम्मवेदी बनकर, राजु जैन, वंश पटाईत, भाऊ सोनवणे, प्रविण पवार, अलंकार सदगिर आदी उपस्थित होते.

भाजप पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याने नाराजीचा सूर, नांदगाव तालुक्यात असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे राजीनामे,



नांदगाव( प्रतिनिधी ) -  भारतीय जनता पक्षाचे नाशिक उत्तर जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांनी जिल्हा व मंडल कार्यकारणी मध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने नाराज झालेल्या भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते व बूथ प्रमुख व शक्ति केंद्र प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा नांदगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
 भाजपा नेते दत्तराज छाजेड यांनी त्यांच्या भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एक संताप ची लाट उठली व पूर्ण जिल्ह्यात भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्यावर जिल्हा व मंडळ कार्यकारिणी निवडी मध्ये जो अन्याय झाला. त्याचे तीव्र पडसाद मेळाव्यामध्ये दिसून आले. अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी, दत्तराज छाजेड यांच्या असंख्य समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केले. अनेक भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी छाजेड यांना साथ देत त्यांच्या वर झालेल्या अन्याय च्या विरोधात आवाज उठवला. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पक्षाचे ध्वज पूजन करून व सर्व पूजनीय महापुरुष व भाजपा चे संस्थापक नेते यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नाशिक जिल्हा कार्यकारणी व मंडळ अध्यक्ष निवडीत झालेल्या अनपेक्षित निवड तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. याबद्दल सर्वांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व आपापल्या पदांचा राजीनामा देऊ केला या वेळी भाजपा नेते व पदाधिकारी सचिन दराडे,जय फुलवाणी, दीपक देसले, कैलास शेवाळे, बापू काळे, राजू परदेशी, मा.जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण तात्या निकम, फकीर राव जगताप, पंचायत समिती सदस्य श्रावण गोरे, नितीन परदेशी, एकनाथ बोडखे, नितीन जाधव, राजेंद्र सोनवणे, प्रशांत गोसावी, सागर फाटे, उमेश उगले, विक्रम निकम, ब्रृजेश पाटील,स्वप्निल शिंदे, विनोद अहिरे, कृष्णा त्रिभुवन, राहुल अहिरे, पुरूषोत्तम पगार, नाना नवले, संतोष घाडगे, संजय आहेर, संजीव निकम, अप्पासाहेब मडके, लहानू निकम, राजू कदम, देवीदास व्यवहारे, राजू गांगुर्डे, प्रकाश थोरात, उद्धव वाघ, ज्ञानेश्वर पाटील, सोमनाथ तळेकर, रामेश्वर निकम, शांताराम जाधव, किरण बच्छाव, प्रमोद जाधव, गणेश शर्मा, सूरज परदेशी, राहुल पैठणकर, स्वराज शर्मा, श्याम राजपूत, विठ्ठल देशमुख, विशाल खैरनार, शुभम खैरनार, दीपक शिंदे, अक्षय पगार, ज्ञानेश्वर विसपुते, किरण शिंदे, संतोष पगार, गणेश शिंदे,ओम ईघे,भगवान ईघे अनिल मोरे, अमन कामत ,जयेश वाबळे महेश काळे, भाऊसाहेब डिगोळे, संतोष कामात प्रवीण घोलप शिवाजी राव ढगे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते यावेळी १५० च्या वर बूथ प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आणि भारतीय जनता पार्टी चा विजय असो अशा घोषणा देत, पक्ष आमचा परिवार आहे आम्ही पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे सदस्य पदाचा नाही. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून शेवट च्या श्वासा पर्यन्त पक्षाशी बांधिल राहू असे प्रतिपादन मान्यवरांनी ह्या वेळी केले.

Sunday, October 1, 2023

नांदगावात आदिवासी संघटनेचा मोर्चा,


नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे आदिवासी संघटनेचा  चक्का जाम आंदोलन नांदगाव शहरातील मालेगांव रोड येथुन आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष प्रभाकर निंबारे , आदिवासी आदिम सेना महिला तालुका अध्यक्ष जयश्री डोळे यांच्या नेतृत्वाखाली  भव्य मोर्चा काढण्यात आला होता .शहरातील प्रमुख मार्ग मालेगांव रोड शनिमंदिर मार्ग हुतात्मा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले . आदिवासी बांधव एकत्र येवुन आपल्या प्रमुख मागण्या करीता घोषणा बाजी करत शिंदे, फडणवीस सरकार च्या विरोधात घोषणा देत हुतात्मा चौकात तील परीसर दुमदुमन टाकला . यावेऴी आदिवासी एकलव्य संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रतन सोनवणे,अदिम आदिवासी सेना महिला तालुका अध्यक्ष जयश्री डोऴे यांनी सरकारचा खरपुस समाचार घेतला‌ एकलव्य संघटना,आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी अदिम सेना आदिवासी क्रांतिकारक राजा ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र, राज्य या संघटना पदाधिकारी,व आपल्या प्रमुख मागण्या करीता हुतात्मा चौकात जोरदार आंदोलन करत चक्का जाम केला S,T राखीव असलेल्या आरक्षणा मध्ये धनगर जातीचा समावेश करण्यात येवु नये. आदिवासी जमातीत धनगर जाती ने घुसखोरी करु नये,या बाबत नांदगाव नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना निवेदन देण्यात आले.  ह्या वेळी आदिवासी समाज मोठ्या सख्येंने उपस्थित होता. नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी , सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन खंडागऴे, पोलिस उपनिरक्षक मनोज वाघमारे, संतोष बहाकर यांनी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...