Monday, March 11, 2024

नांदगाव येथे जिम व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन,







नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील भोंगळे रस्त्यालगत आमदार सुहास कांदे यांच्या निधीतून होलार समाजासाठी व्यायामशाळा व सभागृह मंजूर करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले.
  नांदगाव शहर व परिसरातील होलार समाज तरुणांच्या मागणीनंतर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तात्काळ समाजातील तरुणांकरिता व्यायामशाळा व सभागृह मंजूर केले. तरुण पिढीने व्यसनाकडे न वळता व्यायाम करावा या उद्देशाने मतदारसंघात अनेक ठिकाणी व्यायाम शाळा बांधून देण्यात आले आहेत.
    याप्रसंगी बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर,माजी नगरसेवक नंदू पाटील,शहर अध्यक्ष सुनील जाधव,सौ.रोहिणी मोरे,रामनिवास करवा, विजय चोपडा,भगवान सोनावणे,रवी सोनावणे,रोहिदास सोनावणे, नामदेव सोनावणे, पंडित गेजगे, संजय गेजगे,शिरूभाऊ शेलार, पप्पू सोनावणे,पप्पू जाधव,नितीन सोनावणे, बापू जाधव, सागर सोनावणे,सर्वेश्वर हातेकर, बिरू जाधव,जय जाधव, आंबा सोनवणे, संजु सोनवणे, गणेश हातेकर, अंबादास खांडेकर आदिंसह मोठ्या संख्येने  नागरिक,समाज बांधव उपस्थित होते.

नांदगाव येथील अलका नारायणे वुमन रायझिंग स्टार अवाॅर्ड राष्ट्रीय पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित,









नांदगाव ( प्रतिनिधी) - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने वुमन रायझिंग स्टार अवाॅर्ड २०२४ राष्ट्रीय पुरस्काराने रविवार दि.10 मार्च नाशिक येथील पलाश सभागृह गुरुदक्षिणा हाॅल येथे दुपारी अडीच ते पाच वाजताच्या दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ.अलका नारायणे यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील वुमेन रायझिंग स्टार अवाॅर्ड २०२४ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नाशिक येथील कर्तव्यदक्ष
पोलिस उपायुक्त कविता राऊत,नाळ चित्रपटाच्या लोकप्रिय नायिका अभिनेत्री देविका दप्तरदार, विशेष इंडिया इंटरनॅशनल २०२४ विजेत्या ज्योती शिंदे, ग्राहक संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आशा पाटील, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण समितीच्या सदस्या सायली पालखेडकर,लोक भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशीताई अहिरे,पर्यावरण रक्षण कार्य करणारे मंत्राने ग्रिन रिसोर्स चे अध्यक्ष डॉ. यु.के.शर्मा, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये सौ.ऋतुजा हर्षद नारायणे यांना मनाली,केरळा, काश्मीर, बॅंकाॅक साठी तीन दिवसांचे काॅम्पलेमेंटरी हाॅलीडे गिफ्ट व्हाउचर सन्मान पुर्वक देण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Saturday, March 9, 2024

नांदगाव येथे जळीतग्रस्त कुटुंबास आमदार सुहास कांदे यांच्याकडून मदत,





नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरालगत असलेल्या गिरणानगर येथील माणिक मोरे या आदिवासी तरुणाच्या झापाला आग लागून संसारपयोगी वस्तू त्यात धान्य, सर्व भांडी,कपडे आदी महत्वाच्या गोष्टी जळून खाक झाल्याने त्याचा संसार मोडून पडला. ही गोष्ट गिरणानगर च्या सरपंच सौ.अनिता पवार यांनी तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या सुविद्य पत्नी सौ.अंजुम कांदे यांना कळवली.
    सौ.कांदे यांनी लगोलग या कुटूंबाला त्यांच्या निवास्थानी  (देवाज ) बंगल्यावर बोलावून घेतले.व या कुटूंबाची आस्थेवाईक पणे चौकशी करून त्यांना एक क्विंटल धान्य,रोजच्या वापरासाठी लागणारी आवश्यक ती स्टील ची भांडी,कपडे,देवून त्या कुटूंबाला आम्ही तुमच्या सोबत असल्याचा दिलासा दिला.या मदतीबाबत या मोरे कुटूंबाने आ.सुहास कांदे व सौ.अंजुम कांदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
      यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख उज्वला ताई खाडे, युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे, शशी सोनावणे, सुनील जाधव, राहुल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...