Sunday, April 30, 2023

नांदगाव बाजार समितीच्या निवडणूकीत आमदार सुहास कांदे यांच्या पॅनेलला १५ जागा, विजयी उमेदवारांवर गुलाब उधळत जल्लोष ,



नांदगाव (प्रतिनिधी) - आज शनिवारी दि. ३०  संध्याकाळी पाच वाजता प्रत्यक्ष नांदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी पूर्ण झाली असुन, आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालपैकी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या पॅनलला १५ जागा, एक जागा अपक्ष व दोन जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्या आहेत. यामध्ये हमाल मापारी गटातील अपक्ष उमेदवार निलेश इप्पर हे विजयी झाले . ग्रामपंचायत गटातुन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अमित बोरसे (इतर मागास प्रवर्ग) हे निवडून आले. तर सोसायटी गटातून दर्शन आहेर हे निवडून आले आहेत. सुहास कांदे यांच्या पॅनलचे सोसायटी सर्वसाधारण गटाचे  एकनाथ सदगीर ,  समाधान पाटील, साहेबराव पगार, कैलास पाटील, सतीश बोरसे,  जीवन गरुड तर महिला राखीव अलकाताई कवडे, मंगला काकळीज  हे निवडून आले. ग्रामपंचायत सर्वसाधारण गट अर्जुन पाटील, अनिल वाघ हे विजयी झाले. तसेच ग्रामपंचायत (आर्थिक दुर्बल घटक ) गटात  दिपक मोरे , ग्रामपंचायत (अनुसूचित जाती जमाती) गटात  अनिल सोनवणे तर    व्यापारी गटातील यज्ञेश कलंत्री विजयी झाले असून , व्यापारी गटातील दुसऱ्या जागेसाठी अमोल नावदंर विजयी झाले आहेत.
 

Friday, April 21, 2023

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारावा - अमित बोरसे

       सुहास पुणतांबेकर, प्रेसफोटोग्राफर


 नांदगाव (प्रतिनिधी) -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारून आपली गुणवत्ता सिद्ध करावी. स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी मविप्र समाज संस्था सदैव तयार आहे, असे प्रतिपादन मविप्र संचालक अमित बोरसे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले. मविप्र समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथील वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या दिमागदार शैलीतून विविध कविता सादर केल्या व कवितांना आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे, याचे कवितांसह सादरीकरण केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  सर्जेराव पाटील,प्रकाश पाटील,शरद पाटील व मविप्र सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.संजय मराठे यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यांनी वर्षभरातील महाविद्यालयाच्या कामगिरीचा अहवाल सादर केला. गुणवत्ताधारक व स्नेहसंमेलन स्पर्धांच्या विजेतांना प्रमाणपत्र व रोख रक्कम अदा करण्यात आली. विविध व्यक्तींकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेतून गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण शार्दुल व श्रीमती वैशाली धूम , आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. आर. व्ही.वाघ यांनी केले‌.

Thursday, April 20, 2023

मनमाड मध्ये ईदच्या सामुदायिक नमाजसाठी मैदानावर मंडप उभारण्यात यावे !! फुले, शाहू,आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे पालिका प्रशासनास निवेदन,


मनमाड (प्रतिनिधी) - रमजान ईद या वेळी एप्रिल च्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे २४ एप्रिल ला येत आहे. ईद उत्साहात साजरी व्हावी मुस्लिम बांधव सरसावले आहेत. रमजान ईदची नमाज अदा करण्यासाठी  शहरातील मुस्लिम बांधवांना आ.यु.डी.पी चे मैदानात उघड्यावर सामुदायिक नमाज पठण करावी लागणार आहे. ईदच्या नमाज पठणास मैदानावर मंडप टाकण्यासाठीचे निवेदन फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचार मंचतर्फे मनमाड नगरपालिका प्रशासनाला दिले आहे. काही दिवसांपूर्वी पदमभुषण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात जमलेल्या जनसमुदायास उष्माघाताचा सामना करावा लागला. त्यात जवळ जवळ १४ व्यक्ती मरण पावले होते. व ४००ते ५०० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ईद नमाज पठणात उष्माघाताची बाधा येऊ नये , खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षी मैदानावर मोठ्या प्रमाणात मंडप टाकण्याची गरज आहे. या मागणीचे निवेदनावर फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे शहअध्यक्ष मिर्झा अहमद बेग, सचिव विलास अहिरे, कार्याध्यक्ष फिरोज शेख, सद्दाम अत्तार , हाजी मुश्ताक सर, हाजी शफीभाई , जावेदभाई, इस्माईल पठाण, शकुर शेख, शकील तांबोळी, शकीलभाई आर.के, अमीनबाबा शेख, सलीम भाई , जानीशेठ( महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट), हाजी युनुस, मुसरीफ पठाण, तन्नु भाई आदींची उपस्थिती होती.

Monday, April 17, 2023

नांदगावच्या मेघा पवारने पटकावले सुवर्ण पदक , वुशु स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली निवड,



नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील नांदगाव स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मेघा पवार हिने दि. १४ ते १७ एप्रिल २०२३ या काळात वेरूळ, छत्रपती संभाजी नगर येथे पार पडलेल्या २१ व्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत ७० किलोच्या आतील वजन गटात आपले वर्चस्व कायम करत सलग दुसऱ्या वर्षी सुवर्ण पदकाला गवसनी घातली.  पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे मध्ये तिची निवड झालेली आहे.या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


Friday, April 14, 2023

नांदगाव मध्ये जांयटस् वेलफेयर फाउंडेशन 2-बी , जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव व नांदगांव सहेली यांचे शपथविधी,



नांदगाव (प्रतिनिधी) -  जांयटस् वेलफेयर फाउंडेशन 2-बी आणि जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव व नांदगांव सहेली या सर्व ग्रूपचे शपथ-विधि रविवार रोजी पार पडले. कु.मुग्दा पटेल या कुमारीने श्री स्वागत गीत कृत्य करून आलेले सर्व मान्यवराचे सुस्वागतम् केले. कार्यक्रमात अध्यक्षस्थान विजयकुमार चौधरी, प्रमुख अतिथी पद्माकर दुसाने, राजाराम मोरे, विनोद शेवतेकर, सूर्यमाला मालानी, फेडरेशन अध्यक्ष मेजर जगन्नाथ सालुंके, राजेंद्र चव्हाण, नरेंद्र पारख, डॉ.गुरुदत्त राजपुत, सुमित गुप्ता, नांदगांव अध्यक्ष राजेंद्र दुसाने नांदगांव सहेली अध्यक्षा पुष्पा दुसाने आणि आलेले सर्व कॉन्सिल मेंबर्स यांनी सामूहिक प्रमाणे शपथ घेतली. आलेले पाहुण यांची भाषणे झाली. सर्वात प्रथम आलेले पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. बाकी सर्व आजी-माजी अध्यक्ष, सचिव याचे पुष्प गुच्छ देऊन शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले. मग ओरियंट मीटिंग घेण्यात आली. त्यानंतर सुरुची भोजन झाले नंतर 3 घी ग्रूपचे शपथ-विधि झाले. मा.अध्यक्ष संजय पटेल, जयश्री पटेल यांनी आपले मागील अहवाल सादर केले. आणि येणाऱ्या वर्षात कश्या प्रकारे नविन कार्य करता येईल त्याची संकल्पना मांडली. नंतर कौन्सिलिग मीटिंग घेवुन आलेले सर्व आजी-माजी अध्यक्ष सचिव या सर्व प्रकारचे सूचना करण्यात आली. ज्या-ज्या ग्रुप चे अवार्ड बिडिंग झाली होती त्या सर्व ग्रूपला अवार्ड वाटण्यात आले. व चालू वर्षात कसे प्रोजेक्ट करावे आणि गरजु पर्यत कसे पोहचुन सामाजिक कार्य करावे त्याची माहिती देण्यात आली. डिसेंबर महिन्यात केरळ मध्ये होणाऱ्या अधिवेशन साठी जास्तीत-जास्त जायंटस् परिवाराने सहभागी व्हावे अशी सूचना देण्यात आली. शेवटी नूतन अध्यक्ष राजेंद्र दुसाने आणि पुष्पा दुसाने यांनी प्रमुख पाहुने, कॉन्सिल मेंबर्स आणि सर्वाचे आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन फे.ऑफीसर दत्तराज छाजेड़, बलवंत शिंदे, प्रसाद बुरकुल यांनी सामाई प्रकारे केले.

Tuesday, April 11, 2023

नांदगावात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली,



नांदगाव (प्रतिनिधी ) - क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
      यावेळी "जय ज्योती जय क्रांती" "महात्मा जोतिराव फुले यांचा विजय असो",  आदी घोषणांनी परिसर दणाणून गेले.
दीपक खैरनार, संतोष गुप्ता, अरुण पाटील, अशोक पाटील, सचिन जेजूरकर, प्रसाद पाटील, सुधाकर निकम, श्रावण आढाव, जगताप, अतुल निकम, डॉ. वाय.पी. जाधव, विनोद शेलार, वाल्मीक टिळेकर, सचिन देवकते, संजय पवार, बाळासाहेब देहाडराय, सुनील खैरनार, महेश पवार, शिवा सोनवणे शंकर शिंदे, धीरज मोकळ, सूर्यभान खैरनार आदी उपस्थित होते. गंगाधरी येथे रॅलीची सांगता झाली.यावेळी महात्मा फुले सर्कल फलकाचे यावेळी शहरातून मोटारसायकल अनावरण पंकज भुजबळ यांच्या हस्ते रॅली देखील काढण्यात आली. याप्रसंगी झाले.

शेतकऱ्यांचे पिकांचे १००% पंचनामे केले जातील आणि नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल : आमदार सुहास आण्णा कांदे



  नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) -   नांदगांव तालुक्यातील घाटमाथा परिसरावर झालेल्या गारपिट अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . ह्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी  आमदार सुहास कांदे हे थेट शेतकऱ्याचं बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून दोन दिवसात परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे १००%पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या त्वरित वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 
        आमदार सुहास कांदे यांनी बोलठाण, जवळकी, जातेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पाहून आमदार भावुक झाले. वर्षभर पोटच्या मुलासारखे पीक जपून नैसर्गिक आपत्तीने क्षणात नाहीसे होणे अतिशय वेदनादायी आहे. मीही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे धीर सोडू नका आमदार व सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. लवकरात लवकर आपल्याला ही झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे आश्वासन यावेळी आमदार सुहास कांदे यांनी दिले.
       या प्रसंगी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे सर्व कर्मचारी, सरपंच वाल्मीक गायकवाड, अनिल रिंढे, रफिक पठाण, गोकुळ कोठारी, गुलाब चव्हाण, मनोज रिंढे, अनिल सोनवणे, गणेश व्यवहारे, संदीप सूर्यवंशी,भाऊसाहेब सूर्यवंशी,बंडू पाटील,गूलाब पाटील,संतोष गायकवाड,शरद पवार,सुभाष पवार,भरत गायकवाड,नाना थोरात,अंकूश पगारे,मारुती सोनवणे,रमेश पाटील, ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Monday, April 10, 2023

नांदगाव येथील रेंनबो इंटरनॅशनल स्कूलचे नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेला आकर्षक फुग्यांची सजावट,



नांदगाव ( प्रतिनिधी) - सोमवारी  दि. १० एप्रिल रोजी नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल चे नवीन वर्षाची आजपासून सुरुवात झाली. नमन एज्युकेशन सोसायटीचे 
अध्यक्ष संजय बागुल ,उपाध्यक्ष सरिता बागुल, रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे एक अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. संपूर्ण शाळा ही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सुसज्ज करण्यात आली होती. शाळेला फुग्यांची सजावट करण्यात आलेली होती. नमन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सरिता बागुल यांनी विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबिन कट करून स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना सरप्राईज गिफ्ट व गुलाबपुष्प आणि बिस्किटाचे वाटप करून स्वागत करण्यात आले. शाळेच्या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक नृत्य सादर केले त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद हा द्विगुणित झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री चौधरी यांनी केले.
               हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका रोहिणी पांडे, अश्विनी केदारे, प्रियांका खांडेकर , चैताली अहिरे ,निकिता सकट, मोनाली गायकवाड ,एडना फर्नांडिस, जयश्री डोळे तसेच मदतनीस वैशाली बागुल, छाया आवारे, अनिता नेमणार, ज्योती सोनवणे या सर्वांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचे अति उत्साहाने स्वागत केले.

जेष्ठ नागरिकांसाठी भाजपा ओबीसी मोर्चा आयोजित भव्य वाकथॉन स्पर्धा संपन्न,



 नांदगाव ( प्रतिनिधी) - जेष्ठ नागरिकांसाठी भाजपा ओबीसी मोर्चा आयोजित भव्य वाकथॉन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक वयोगटातील विजेत्यांनी एकमताने स्पर्धेचा बहुमान नमो चषक हा कुदरत अली शहा यांना द्यावा असे ठरविले.  तो बहुमान ९६ वर्षांचे हाजी कुदरत अली शहा यांनी भाजपा नेत्या जयश्री दौंड,दत्तराज छाजेड,बबनराव सानप यांच्या हस्ते स्वीकारला . यावेळी प्रत्येक वयोगटातील विजेत्यांना सन्मान चिन्ह (ट्रॉफी)सहभाग घेणाऱ्या स्पर्धकाला मेडल मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ह्या स्पर्धेसाठी बाळा आहेर  यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली .त्यानाही मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक तसेच भाजपा ओबीसीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, April 8, 2023

नांदगाव रेल्वे स्टेशन येथे जनता एक्सप्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे पूर्ववत , केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खा.डॉ . भारती पवार यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला,


नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव रेल्वे स्टेशन येथे जनता एक्सप्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, कामयानी एक्सप्रेस  या गाड्यांचे थांबे पुर्ववत झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  खासदार डाॅ. भारती  पवार यांच्या हस्ते कामयाणी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी समस्त नांदगावकरांनी अनेक दिवसाची मागणी पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले.
यावेळी जेष्ठ नेते जयश्रीताई दौंड,सजनराव कवडे,गणेश शिंदे,दत्तराज छाजेड,बापू शिंदे,राजाभाऊ बनकर, सागर फाटे,सूनिल जाधव, उमेश उगले,संजय सानप,राजु आहेर, भावराव निकम, डाॅ. आहेर,देवीदास मोरे, राजाभाऊ पवार,अभय देशमुख,कपिल तेलूरे,सुनिल जाधव,बबलू सय्यद, तुषार पांडे दिनेश पीगळे तसेच शिंदे गटाचे भारती मोरे, सुनील जाधव यांच्यासह रेल्वे प्रशासन पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

Monday, April 3, 2023

नांदगाव बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी करिता १४९ अर्ज दाखल



नांदगाव( प्रतिनिधी) -  तालुक्यात नांदगाव व मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीने राजकारण तापले आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १४९ उमेदवारांनी सोमवारी आपले अर्ज दाखल केले. या वेळी उमेदवारांसोबत अर्ज सादर करताना आमदार सुहास कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार पंकज भुजबळ, अॅड. अनिल आहेर यांनी हजेरी लावली. यंदा बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक सरळ लढतीची असल्याने कुठल्या पॅनेलमधून कुणाला उमेदवारी बहाल होईल याची नेमकी खात्री मिळत नसल्याने अनेक इच्छुकांनी आपल्यासाठी लॉबिंग सुरु केल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
    त्यासाठी निवडणूक कार्यलयात आमदार सुहास कांदे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे माजी आमदार पंकज भुजबळ माजी आमदार अँड अनिल आहेर हे उपस्थितीत होते.  केवळ अर्ज भरून असा निरोप असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करीत वेळ टळणार नाही याची काळजी घेत इच्छुकांची लगबग सुरु होती. नांदगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सोसायटी गटात सर्वसाधारण एकूण ८१ तर ग्रामपंचायत गटातून ४८, व्यापारी गटात १३. हमाल मापारी गटात ७ असे एकूण १४९ उमेदवारांनी  अर्ज दाखल केले.  उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मध्ये माजी सभापती तेज कवडे, विलासराव आहेर, मविप्रचे संचालक अमित पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील, अनंत इनामदार, एकनाथ सदगीर, उदय पवार, समाधान पाटील, कैलास पाटील, दर्शन आहेर, अॅड. अमोल आहेर, राजेंद्र देशमुख, उदय पवार, अमित नहार, बंडू पाटील, पुंजाराम जाधव, अलकाताई कवडे, मंगलाताई काकळीज, भाऊसाहेब पाटील, यज्ञेश कलंत्री, बाळकाका कलंत्री, सोमनाथ घोंगाणे, संजय सानप, मुकुंद खैरनार, नूतन कासलीवाल, गोकूळ कोठारी, अमोल नावंदर, भास्कर कासार, नीलेश हिप्पर, नितीन कवडे, सचिन हिरे, राजेंद्र लाठे, शिवाजी बच्छाव, नलिनी बोरसे, अमित बोरसे, बेबीताई पगार, चंद्रकला वाकळे, हरेश्वर सुर्वे, कैलास गायकवाड, भागवत बाबळे, धोंडीराम काळे, आदीउमेदवरांचाही अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. दाखल आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी ५ एप्रिलला होणार असून त्यात किती अर्ज अवैध ठरतात हा उत्सुकतेचा भाग आहे. माघारीसाठी मोठा अवधी देण्यात आला आहे. २१ एप्रिलला चिन्ह वाटप होईल या नंतर पॅनलच्या निर्मितीची घोषणा पॅनेल प्रमुख करतील.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...