Friday, June 30, 2023

नांदगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहाचे उद्घाटन , मिटिंगसाठी सभागृहात शंभर लोकांची बसण्याची व्यवस्था,


 नांदगाव ( प्रतिनिधी ) - शिवसेना जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते काल शुक्रवारी नांदगाव येथे सार्वजनिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न झाले. आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच खासदार केंद्रीय मंत्री डॉ.भारती ताई पवार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत नांदगाव येथे शिवनेरी शासकीय सभागृह शेजारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह ( मीटिंग हॉल) बांधण्यात आले आहे. 
       शंभर दीडशे लोकांची बैठक होईल असा अद्ययावत सुविधा असलेला वातानुकूलित मीटिंग हॉल बांधण्यात आला आहे.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत या हॉल चे उद्घाटन जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.  
     याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे, माजी नगराध्यक्ष राजेशजी कवडे, प्रमोद भाबड, विष्णू निकम सर, राजाभाऊ जगताप, डॉक्टर सुनील तुसे, शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिढगे, बाजार समितीचे सभापती बंडू पाटील, माजी सभापती तेज दादा कवडे, उपसभापती पोपट सानप, कैलास पाटील, एकनाथ सदगीर, सतीश बोरसे, कानाकलंत्री, निलेश इप्पर, आनंद कासलीवाल, राजाभाऊ देशमुख, डॉक्टर संजय सांगळे, मयूर भाऊ बोरसे, महेंद्र नाना दुकळे, आबा देवरे, ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, रमेश पगार, अण्णासाहेब पगार, भैय्या पगार, डॉक्टर प्रभाकर पवार, डॉक्टर प्रवीण निकम, अंकुश कातकडे, सर्जेराव भाबड, किरण गायकवाड, आप्पा कुनगर, कपिल तेलोरे, आदींचे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Thursday, June 29, 2023

साकोरा येथील तरुणाला अॉपरेशनसाठी आमदार सुहास कांदे यांच्या कडून वैद्यकीय मदत,




नांदगाव (प्रतिनिधी ) -  आमदार सुहास अण्णा कांदे हे सतत मतदारसंघाच्या विकासासाठी सक्रिय असतात . तसेच सामाजिक कार्यात सतत गरजवंतांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहतात याची प्रचिती  पुन्हा एकदा आली. 
    काही दिवसापूर्वी साकोरा येथील तरुण महेश सुदाम बोरसे यांचे वैयक्तिक वादातून डोक्यावर वार करण्यात आल्यामुळे कवटी फुटेपर्यंत मोठी जखम झाली होती. त्यांना तात्काळ नाशिक येथील सोपान हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या  परिस्थितीत डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी सहा लाखांच्या वर खर्च सांगितला. महेश बोरसे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. 
   मतदार संघातील सार्वजनिक कामे सामाजिक कामे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहून आमदार सुहास अण्णा कांदे त्यांना आर्थिक तसेच सर्व प्रकारची मदत करत असतात. नैसर्गिक आपत्तीमध्ये संसाराची कोटी नुकसान झालेल्या कुटुंबीयांना पुन्हा संपूर्ण संसार भेट देऊन कुटुंब प्रमुखाची जबाबदारी ते सतत निभावत असतात. 
     साकोरा येथील तरुण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांनी मतद केलीच पण तात्काळ पुढील सहकार्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.
       हॉस्पिटलचे बिल भरण्याइतपत त्यांच्याकडे पैसे नसल्याने नातेवाईक व कर्ज काढून त्यांनी पैसे जमवले सदर सर्व माहिती साकोरा येथील शिवसेना पदाधिकारी शरद भाऊ सोनवणे यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कानावर टाकली असता , संबंधितांना  आमदार निवासस्थानी बोलवण्यात आले .आमदार सुहास अण्णा कांदे यांनी ५० हजार रुपयांची रोख मदत केली. सोबतच संबंधित हॉस्पिटलला संपर्क करून कमी करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास दिला, तसेच तात्काळ सूचनाही केल्या. 
     याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी शरद सोनवणे, प्रवीण पवार ,गणेश बोरसे, वैभव बोरसे ,सुरज बोरसे ,पवन बोरसे ,सचिन बोरसे ,गणेश बच्छाव, देवेंद्र बोरसे ,काशिनाथ बोरसे आदी उपस्थित होते.

Wednesday, June 28, 2023

नांदगाव येथील एच.आर. हायस्कूल मध्ये अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप,



 
 नांदगाव (प्रतिनिधी ) - आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने नांदगाव शहरातील एच आर हायस्कूलच्या गरजवंत विद्यार्थ्याना मोफत शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अंजुम कांदे यावेळी उपस्थित होत्या.  नांदगावात मंगळवार दि. २७ जून रोजी एच. आर. हायस्कूल येथे उपस्थित गरजवंत मुलांना सौ.अंजुम ताई सुहास कांदे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.अंजुम ताई कांदे होत्या. सूत्रसंचालन इर्शाद सर यांनी केले मुख्याध्यापक सईद सर, इकबाल दादा शेख यांनी मनोगत व्यक्त केले .
        सौ.अंजुम ताई ह्यांनी शाळा व्यवस्थापन समितीने एकत्र येऊन विद्यार्थ्याच्या हितासाठी शाळेच्या उन्नती साठी सर्वांनी मिळून सर्वोतरी प्रयत्न करावयाला हवे तसेच विद्यार्थिनींनी मागे न राहता उच्च शिक्षण घेऊन नाव लौकिक करण्यास परावृत्त केले. या   कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक जाफर जनाब, हाजी चिराग सेठ, इकबाल दादा शेख, याकूब शेख, अकील मास्टर, खालिल जनाब, गायास टेलर सबदर सय्यद, अब्दुल रहेमान भय्या, हाजी रशिद हाजी सरफराज, अख्तर भाई, महमूद टेलर, असलम तंबोली, इत्यादि मान्यवरांसह रहेनुमा कार्यकारणीचे आयाज शेख रियाज पठाण, इम्तियाज गांधी,वसीम पठाण, नासिर खतीब, शकील सय्यद, शारिक, फहीम, इम्रान इत्यादि उपस्थीत होते.

नांदगावात शांतता समितीची बैठक संपन्न,




नांदगांव (प्रतिनिधी ) -  नांदगांव येथे हिंदु मुस्लीम शांतता समितीची बैठक नांदगांव पोलीस स्थानकात घेण्यात आली . या बैठकीत आषाढी एकादशीला मास विक्री केली जाणार नाही असा निर्णय बैठकीत घेण्यात आला . आज   दि . २९ रोजी आषाढी  शुध्द ११ गुरूवारी रोजी देवशयनी आषाढी एकादशी व बकरी ईद तसेच पंढरपूर याञा ,चातुर्मास्यारंभ हे सर्व धार्मिंक सण एकाच दिवसी येत आहे . हिंदु - मुस्लीमच्या भावना लक्षात घेता नांदगांव पोलीस स्थानकात हिंदु- मुस्लिम समाजाच्या विनंतीला मान देऊन एका बैठकीचे आयोजन केले.   आषाढी एकादशीला कुर्बानी , तसेच मास  विक्री करुन नये या संदर्भातील निर्णय बैठकीत घेण्यात आला .  दि २९ रोजी नांदगांव येथे कुर्बानी दिली जानार नाही व मास देखील विक्री होणार नाही सदर कुर्बानी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे .या बैठकीला पो नि रामेश्वर गाढे, सा पो नि दिपक सुरवडकर,पो उ नि पाटील,वाघमारे उपस्थीत होते. तसेच बैठकीला हिंदु मुस्लीम पदाधिकारी देखील हजर होते. या सर्वांच्या उपस्थितीत  वरील निर्णय घेण्यात आला असून दि २९ रोजी आषाढी एकादशीला नांदगांव शहरात व पंचक्रोशीत मास विक्री होणार नाही या निर्णयाचे सर्व थारातुन स्वागत  होत आहे. या बैठकीला दत्तराज छाजेड, सागर फाटे, रेखा शेलार, संगीता सोनवणे, योगेश पैठणकर ,दर्शन शर्मा, संतोष हारळे,  याकुब शेख व इतर माैलांना उपस्थित होते.

Monday, June 26, 2023

वेहेळगाव येथे आमदार आपल्या दारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद,



नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या दारी या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून  वेहेळगाव येथे महाशिबिर यशस्वी रित्या संपन्न झाले.वेहेळगाव गणातील गावांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावली तसेच विविध सुविधांचा लाभ घेतला.
आमदार आपल्या दारी या शिबिरामध्ये विविध योजना अंतर्गत वस्तूंचे वाटप करण्यात आले
शालेय विद्यार्थ्यांना गणवेश,महिला बचत गट यांना कर्ज निधीचा धनादेश आई व लहान बाळासाठी बेबी केअर किट या आधीच्या झालेल्या आमदार आपल्या दारी या शिबिरामध्ये विविध दाखले व रेशन कार्ड साठी जमा केलेले प्रकरण लाभार्थ्यांना आज रेशन कार्ड वाटप करण्यात आले.
    या कार्यक्रमास सरपंच उपसरपंच सर्व सदस्य वेहेळगाव गणातील सर्व गावांचे सरपंच सदस्य सोसायटी चेअरमन संचालक मंडळ शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 जळीत घटनाग्रस्त कुटुंबियांना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चून ग्रह उपयोगी वस्तूंची मदत > 

 - मागील काही दिवसात वेळगाव व आमोदे येथील दोन कुटुंबीयांचे शॉर्टसर्किट मुळे आग लागून सर्व संस्कार खाक झाला होता. अशी माहिती मिळताच आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून दोनही कुटुंबांना संसार उपयोगी वस्तू धान्य कपडे मदत देण्यात आली. यात बंडू पोपट सोनवणे राहणार आमोदे व्यवसाय शेती यांच्या पत्र्याच्या घराला रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून संपूर्ण संसार राग झाला. बाबूलाल फुला भदाणे व्यवसाय चर्मकार राहणार वेहेळगाव, काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यामुळे झापासात लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  दोन्ही कुटुंबीयांना आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात पाचरण करण्यात आले होते . या ठिकाणी उपस्थित त्यांच्या हस्ते गृह उपयोगी संसार जसे अन्नधान्य भांडी गॅस कुकर इत्यादी साहित्य देण्यात आले.

Saturday, June 24, 2023

नांदगाव आगरात उभ्या असलेल्या एसटी बसने घेतला पेट ; मात्र सुदैवाने जीवित हानी टळली, भीषण आगीमुळे बस जळून खाक,


 


नांदगाव (प्रतिनिधी )  नांदगाव आगारातील बस नेहमीच नादुरुस्त झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात. काल मात्र  सायंकाळच्या सुमारास नांदगाव आगराची बस चाळीसगाव येथून नांदगाव बस स्थानकात थांबली असताना चालक,वाहक आणि प्रवासी बसमधून खाली उतरल्यानंतर काही वेळेतच बसच्या खाली चालकाला आग लागलेली दिसली असता काही क्षणातच बसने  पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी बसचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नांदगाव आगारातील बस मुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट परिवहन महामंडळ पाहत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव आगराची बस आज सायंकाळी चाळीसगाव येथून नांदगाव  (MH 07 C 9337) स्थानकात  येऊन उभी राहिली चालक डी.ए.थोरे, वाहक ए.एस.ताडगे आणि बसमधील चार प्रवासी
 हे बस च्या खाली उतरल्यावर चालक हे वाहतूक नियंत्रक कक्षात नोंदणी कराययास गेले नंतर त्यांना बसच्या खाली आग लागलेली दिसली असता त्यांनी आगार व्यवस्थापक विश्वास गावीत यांना दुरध्वनी वरुन माहिती दिली.नांदगाव  आगारातील कर्मचारी व यांत्रिक कर्मचाऱ्यासह क्रांती निळे, राहुल पगारे ,प्रकाश पेहरे ,स्थानिक नागरिकांनी  आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.तसेच ८ युनिट आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु वारा वाहत असल्याने आगीने रुद्र रूप धारण केले. नांदगाव परिषदेकडे अग्निशमन बंब नसल्याने खाजगी पाणी टँकर बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत बस ने संपूर्ण पेट घेतला.अथक प्रयत्न करून बस ला विझवण्यात नांदगाव आगारातील स्थानिक कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी यांनी अतोनात प्रयत्न केले.बस जळून खाक झाली. मनमाड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते..मनमाड अग्निशमन बंबा ची
गाडीने राहिलेली आग विझविण्यात आली आहे..
 दरम्यान ,या आगीच्या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी बसला मोठ्या प्रमाणात आग लागली होती .बसस्थानकात आगीचे मोठे लोळदिसून येत होते. या घटनेमुळे नांदगाव आगारातील बसच्या बाबतीत गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

साकोरा येथे आमदार आपल्या दारी शिबिरास ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद ,


 

 नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी)- आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदार संघातील नागरिकांसाठी आमदार आपल्या दारी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले . 
      साकोरा गटातील साकोरा गणा मधील सर्व गावातील नागरिकांसाठी साकोरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगणात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
      उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नारळ फोडून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले . सकाळीच मोठ्या संख्येने सर्व गावातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. 
     आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात डोळे तपासणी चष्मे वाटप आरोग्य विभाग तहसील पंचायत समिती महावितरण असे विविध स्टॉल लावण्यात आले होते.
     नागरिकांनी याप्रसंगी रेशन कार्ड संबंधित अडचणी विविध दाखले तसेच आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.
      याप्रसंगी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नागरिकांच्या भावना समजून घेतल्या आणि गावोगावी आरोग्य तसेच शासकीय सुविधा पुरविल्या असल्याचे माहिती दिली, आमदार आपल्या दारी या उपक्रमातून अण्णांनी सामान्य नागरिकांना आरोग्य तसेच शासकीय कागदपत्र मिळवून देण्याची मोठी कार्य हाती घेतले असून सोबतच मतदारसंघातील विकास कामांसाठी जो निधी आणला तो याआधी कोणत्याही आमदाराने आणला नाही असे श्रीविष्णू निकम सरांनी मनोगत व्यक्त केले.
  या प्रसंगी तहसीलदार सिध्दार्थ मोरे, बिडीओ गणेश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जगताप तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, विष्णू निकम सर, प्रमोद भाबड, सरपंच ताराबाई सोनवणे, बाजार समिती संचालक अमोल नावंदर, सतीश बोरसे, सोपान सानप, सरपंच शरद आहेर , राजेंद्र पवार, संजय आहेर, भैय्यासाहेब पगार, सरपंच लताबाई बापू जाधव भगवान देशमुख मनीषा ढोळे अनिता पवार शाम हिरे, सुनील जाधव, रमेश काकळीज, प्रकाश शिंदे, महेंद्र आहेर, सतीश बोरसे, आण्णा मुंढे, दादाभाऊ बोरसे बालक तात्या बोरसे प्रशांत बोरसे राजेंद्र बोरसे अमर सुरसे रवींद्र सुरसे संतोष बोरसे..
आदिंसह गणातील सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ, शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 - साकोरा 
आमदार आपल्या दारी- 

रेशन कार्ड ३६६
निराधार योजना ०२
उत्पन्न दाखले. ३५
जातीचे दाखले. ४९  
डोमोसैल ११

जनरल ओपीडी.३३२
डोळे तपासणी १०९०
चष्मे वाटप. ९३२
रक्त तपासणी. ५४

नांदगावच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑलम्पिक दिन उत्साहात साजरा ,

      छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर





नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगांव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे २३ जून २०२३ रोजी सकाळी ८:०० वाजता महाविद्यालयाच्या गेट पासुन ऑलम्पिक दिन रन व वॉकची सुरुवात करण्यात आली.
ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त विष्णु निक्रम यानी हिरवा झेंडा दाखवुन ऑलम्पिक दिन रन वॉकची सुरुवात केली. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच स्थानिक व्यवस्थापन समीतीचे सदस्य. जसे सर्जेराव पाटील (ज्यु.कॉ. व्यवस्थापन समीती अध्यक्ष), दिलीप पाटील- (न्यू-ई. स्कुल व्यवस्थापन), शरद पाटील (व्यवस्थापन समीती सदस्य कॉलेज), विजय काकळीज – (जेष्ठ शिक्षक न्यू इ. स्कूल) प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे, उपप्राचार्य – डॉ. एस. ए. मराठे डी. टी. देवरे ई मान्यवर उपस्थित होते.
या ऑलम्पिक दिवसाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील १२. वी, बी.ए., बी.कॉम बीएससी वर्गाचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व. ऑलम्पिक दिन रन अँड वॉक स्पर्धा संपल्यानंतर आदरणीय विष्णु निकम सरांनी सर्व विद्यार्थ्यांना ऑलपिक स्पर्धेचे महत्व, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी करावे लागणारे कष्ट व आजच्या खेळाडूची स्थिती यांची माहिती उदाहरणासह देवून, सध्याच्या युवकांना मैदानावर खेळण्यासाठी यावे यासाठी प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक एल.एम गळदगे, दि. एम. राठोड व दिलीप आहेरराव यांनी प्रयत्न केले.

Wednesday, June 21, 2023

नांदगाव मधील म.वि.प्र. संस्थेच्या कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.एस.एन.शिदे यांचे मार्गदर्शन ,

          छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर

नांदगाव (   प्रतिनिधी ) - मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे  इयत्ता बारावी परीक्षेत कला वाणिज्य व विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन  महाविद्यालयात करण्यात आले. कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील स्कूल कमिटी सदस्य देवाजी कदम  रामनिवास करवा डॉ.प्रवीण निकम आणि विद्यार्थी पालक ॲड.चौधरी साहेब या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कला शाखेत प्रथम आलेला कोल्हे ओंकार गंगाधर ४८३ गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला . त्याचा सत्कार सर्जेराव आबा पाटील यांनी गुलाब पुष्प पुस्तक प्रतिमा भेट देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार केला द्वितीय क्रमांक महाजन अक्षय पुंजाराम ४४९ गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचा सत्कार देवाजी कदम स्कूल कमिटी सदस्य यांनी गुलाब पुष्प पुस्तक प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. तर तृतीय क्रमांक सूर्यवंशी सोनाली रमेश ४४६ गुण मिळून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली तिचा सत्कार रामनिवास करवा यांनी गुलाब पुष्प प्रतिमा भेट देऊन  सत्कार केला . वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला चौधरी प्रसाद भालचंद्र ५३८ गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचा सत्कार महाविद्यालय स्कूल कमिटी सदस्य डॉ. प्रवीण निकम यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पुस्तक प्रतिमा भेट देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली खत्री भूमी जयकुमार ५२३ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली तिचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यांनी गुलाब पुष्प पुस्तक प्रतिमा भेट देऊन सत्कार केला तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला काळे उमेश गणेश ५१८ गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य राठोड सर यांनी गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार केला विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकाने राजपुरोहित विनेश लूनसिंग ५२८ गुण मिळून उत्तीर्ण झाला त्याचा सत्कार महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्रमुख श्री आर. टी. देवरे यांनी गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार केला द्वितीय क्रमांकाने पवार ज्ञानेश्वरी विश्वंभर ५१६ गुण मिळवून उत्तीर्ण झाली तिचा सत्कार  चौधरी साहेब यांनी गुलाब पुष्प देऊन व पुस्तक प्रतिमा भेटून तिचा सत्कार केला तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला पांडे स्वराज पंकज ४८२ गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला  त्याचा सत्कार देवाजी कदम यांनी केला .या गुणगौरव सोहळ्याचे प्रस्ताविक प्रा. बि.के.पवार यांनी केले. आपल्या प्रस्ताविक  मनोगतातून  नांदगाव महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक यांच्या सहकार्यातून दरवर्षी महाविद्यालयाचा निकाल उंचावतच असून विद्यार्थी हित लक्षात घेऊन महाविद्यालयातील प्राध्यापक हे ज्ञानदानाचे काम करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करतात असे आपले मत मांडले . विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक सतत प्रयत्न करत असतात व प्राध्यापकांनाही पालकांचे सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळते हे दैदिप्यमान यश मिळविण्यात महाविद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन नेहमीच करण्यात येते असे आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी आपले प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालय असून या महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी दातृत्व दाखविणारे  अनेक पालक व दाते सहकार्य करत असतात .त्यामुळे आम्हाला महाविद्यालयाची प्रगती व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी  नेहमीच पाठबळ मिळत असते असे आपले मत व्यक्त करताना विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षापूर्तीचे महाविद्यालय म्हणून नांदगाव महाविद्यालयाची ओळख आहे .त्यामुळे विकासात्मक कामे करण्यासाठी आम्हाला सुद्धा उत्साह वाटतो आणि महाविद्यालयाची भरभराट होत आहे असे विचार व्यक्त केले व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या गुणवंत विद्यार्थी प्रतिनिधी  खत्री भूमी जयकुमार व महाजन अक्षय पुंजाराम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील  प्राध्यापकांनी  केलेले मार्गदर्शन यामुळेच आम्ही हे यश मिळू मिळवू शकलो असे महाविद्यालयातील प्राध्यापकांविषयीचे यथोचित गौरवउद्गार विद्यार्थ्यांनी आपल्या  मनोगतातून व्यक्त केले. तर   चौधरी साहेब यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यार्थ्यांना जास्ती यशामुळे हुरळून न जाता आपल्याला आयुष्यात अनेक टप्पे  पार करायचे आहेत त्यामुळे यश हे कायमच टिकून ठेवणे व सतत अभ्यासाची प्रगती टिकून ठेवणे  याविषयीचे मत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायडोंगरी येथील सी.जी. ए इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रवेश उत्सव साजरा , शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत,


नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - न्यायडोंगरी येथे सोमवारी दि. १९  रोजी शनेश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित सी.जी. ए इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यायडोंगरी येथे शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा देखील उत्साह दिसून आला.या प्रसंगी आलेल्या सर्व उपस्थित पालक व विद्यार्थ्याचे औक्षण करून तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन करून सुरवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाल विद्यार्थ्यांनी नृत्याचा मनसोक्त आनंद लुटत शाळेचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला .त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पिंपरखेडच्या कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगादिन, आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक योग व प्राणायामाचे प्रकार यांचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून धडे,




 नांदगाव , पिंपरखेड (प्रतिनिधी ) - पिंपरखेड येथील कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी नांदगाव येथील प्रसिद्ध योग शिक्षिका डॉ.जागृती पवार व डॉ.किर्ती आहेर यांनी विद्यार्थ्यी व शिक्षकांना योग व प्राणायामाचे धडे दिले.  अनेक उपयुक्त व दैनंदिन आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक योग व प्राणायामाचे प्रकार त्यांनी सांगितले व तसे प्रात्यक्षिक करून घेतले. यातून विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळाली. या पुढे नियमित योग करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 
    यावेळी दोन्ही योग प्रशिक्षक मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाची प्रेरणा मुख्याध्यापक  काशिनाथ गवळी यांची होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक बोरसे सर,  कांदळकर सर, श्रीमती शिंदे मॅडम,  पठाडे सर,  सोनवणे सर,  जाधव सर, संदीप मवाळ,  आबासाहेब सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tuesday, June 20, 2023

बाणगाव खुर्द येथे मोठ्या उत्साहात आमदार आपल्या दारी महाशिबिराचे आयोजन , शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांची उपस्थिती,

  नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी)   -  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या दारी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून ,  बाणगाव खुर्द येथे जातेगाव गटातील मांडवड गणातील नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
   शिबिराचे उद्घाटन श्रीफळ वाढवत शिवसेना जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी आमदार सुहास आण्णांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाची दखल राज्य सरकार ने घेऊन राज्यात शासन आपल्या दरबारी मोहीम सुरू केली, सर्व सामान्यांना गावात येऊन विविध सुविधा पुरविण्याची ही योजना महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले. उपस्थित नागरिकांनी जास्तीत जास्त या अभियानाचा फायदा घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 
   राधाकृष्ण लॉन्स बाणगाव खुर्द येथे  मोठ्या संख्येने मांडवड गणातील प्रत्येक गावातून आलेल्या नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून विविध सुविधांचा लाभ घेतला. 
     ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच विविध शासकीय दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात आणि म्हणूनच या शिबिराच्या माध्यमातून त्यांना तात्काळ विविध दाखले व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा हेतू मोठ्या प्रमाणात साध्य होत असल्याचे दिसून येत आहे. 
   रेशन कार्ड संबंधित विविध त्रुटी अडचणी तसेच विविध निराधार योजना विधवा पेन्शन योजना व इतर शासकीय दाखल्यांसाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. 
     आरोग्य सुविधा महावितरण तहसील पंचायत समिती डोळे चेकप असे विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते. 
          राज्य कृषी अभियांत्रिकी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना या वेळी ट्रॅक्टर देण्यात आले. 
        या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे, प्रमोद भाबड, बाजार समिती मा.सभापती तेज कवडे, संचालक एकनाथ सादगिर, विक्रम फोडसे, बाळू पवार, नंदू खरात, समाधान पाटील, कैलास चोळके, बबलू पाटील, योगेश इमले, बाबा बिलोरे, कैलास गायकवाड, सागर हिरे, विलास गायकवाड, भाऊसाहेब सदगीर, शिवाजी वडगळ, दत्तू काळे, शांताराम कवडे, प्रभाकर कवडे, रवी दादा पाटील, समाधान हिरे, वाल्मीक गोराडे आदी उपस्थित होते
        शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी ,शिवसैनिक, विविध गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेरमन उप चेरमन सर्व सदस्य व इतर लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
    नांदगाव तालुक्यातील  कासारी,पोही ,कसाबखेडा ,टाकळी बू.खुर्द ,तांबेवाडी ,माणिकपुंज , बाणगाव,बू खुर्द , खिर्दी , भौरी , वडाली बू खुर्द , सोयगाव , मोरझर , दहेगाव , तांदुळवाडी, मांडवड लक्ष्मीनगर या गावातील नागरिकांनी या वेळी उपस्थिती लावली.


बाणगाव शिबिराची आकडेवारी - 
१) आरोग्य विभाग - ४५६
२) नेत्र तपासणी - ७२५
३) चष्मे - ६७४
४) डोळ्यांचे ऑपरेशन -  ३०
५)शासकीय दाखले - १०५
६) रेशन कार्ड - २२८
लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. 

जागतिक योगदिनाच्या पूर्वसंध्येला झाडावर व मोटारसायकलवर केले योगासन, नांदगावच्या योग शिक्षकांचा अनोखा उपक्रम,




नांदगाव (प्रतिनिधी) - आज बुधवार दि.  २१ जुन हा 'जागतिक योगदिन' म्हणुन संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो.  आपल्या आरोग्यासाठी योग प्राणायाम करणे गरजेचे आहे . यासाठी अनेक शाळेत कॉलेज यासह अनेक संस्थामध्ये योग करणे अनिवार्य करण्यात आले आहे नागरिकांनी योग साधनेकडे वळावे यासाठी योग शिक्षक अनेक नानाविध उपाय करत असतात.  असाच एक अवलिया आहे बाळासाहेब मोकळ हा गेल्या २० वर्षांपासून योग साधना करतो.  योग शिक्षक म्हणुन कार्यरत असतांना देखील नागरिकांनी योगसाधना करण्यासाठी व त्याची जनजागृती करण्यासाठी मोकळ धडपडत असतात आज होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या निमिताने त्यांनी आज  पूर्वसंध्येला झाडावर व मोटारसायकलवर योग प्राणायाम आसने करून दाखवली.  याआधी त्यांना योग साधनांसाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नागरिकांनी योग साधनेकडे वळावे यासाठी आपण नवनवीन प्रयोग करत असतो असे मोकळ यांनी सांगितले.

Monday, June 19, 2023

नांदगाव तालुक्यातील बिरोळे परधाडी व चांदोरा येथील आदिवासी वस्तीवर सभा मंडपात भगवान वीर एकलव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा,



नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी)  - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व आदिवासी वस्तीवर सभामंडप दिले असून, यामध्ये स्वखर्चातून भगवान वीर एकलव्यांची मूर्ती भेट देण्यात आली . जवळपास सर्वच सभामंडपांचे काम पूर्ण होत आले असून काम पूर्ण झालेल्या सभामंडपात भगवान वीर एकलव्य यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. 
   नांदगाव तालुक्यातील बिरोळे परधाडी व चांदोरा येथील आदिवासी वस्तीवर सभा मंडपात भगवान वीर एकलव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 
     परधाडी या ठिकाणी सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी  भगवान वीर एकलव्य यांच्या मूर्तीचे विधिवत पूजा केली. उपस्थित आदिवासी माता बंधू आणि भगिनींंसमोर बोलताना आपल्याला कोणत्याही समस्या असतील. त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत .आम्ही त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहोत आपल्या आरोग्य तसेच शासकीय कागदपत्रांसाठी मोफत फिरता दवाखाना व शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण या व्यतिरिक्तही काही अडचणी असल्यास आम्हाला सांगा आम्ही त्या सोडवू असे मनोगत व्यक्त केले. 
     शिवसेना माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप, आदिवासी समाज संघटक भाऊराव भाऊ बागुल युवा सेना तालुकाप्रमुख सागर भाऊ हिरे, भरत आबा शेलार, दीपक मोरे, सतीश एरंडे, अनिल सोनवणे, गणेश घोटेकर, विश्वनाथ चव्हाण, लहू पवार, वसंत सोनवणे, शिवसेना महिला आघाडी मनमाड शहराध्यक्ष संगीता ताई बागुल, नांदगाव शहराध्यक्ष रोहिणीताई मोरे, कविता राऊत, आदिवासी समाज बांधव, आदींसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Sunday, June 18, 2023

नांदगाव शहरात लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये ' फादर्स डे ' उत्साहाने साजरा ,




नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगाव शहरातील शनिवारी  दि. १७ जून रोजी 'नमन एज्युकेशन सोसायटी' संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल  आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल  येथे फादर्स डे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.   विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 
 नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल, उपाध्यक्ष सरिता बागुल, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका खांडेकर मॅडम, रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थिनींनी आलेल्या सर्व वडिलांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालकांसाठी सरप्राईज डान्स व गाणे सादर केले.काही उत्साही पालकांनी देखील आपल्या मुलांसोबत नृत्य करून वडील मुलांमधील नाते वृध्दींगत केले.
        विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने आपल्या वडिलांचे चरण पूजन व औक्षण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे शाळेच्या शिक्षिका अनिता जगधने व शिक्षक योगेश शेवाळे यांनी केले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतोनात मेहनत घेऊन घेतली.

Friday, June 16, 2023

नांदगाव तालुका तैलिक समाजाचे डाबली येथील खुनी हल्ल्याचा निषेध करीत तहसीलदार प्रमोद मोरे यांना निवेदन सादर,




नांदगाव( प्रतिनिधी) - मालेगाव तालुक्यातील डाबली या गावी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने  रविंद्र शंकर चौधरी याने वाळु माफिया  रितेश भाऊसाहेब निकम यास तलावातील मुरूम अनाधिकृतपणे नेण्या संदर्भी विचारणा केली असता, सदर माफिया रितेश निकम व त्याच्या साथीदारांना त्याचा राग येऊन त्यांनी  चौधरी वर खुनी हल्ला चढविला,दंडक्यांनी मारहाण केली. आणि त्यात रविंद्र चौधरी चा मृत्यु झाला व त्याचा अवघा परिवार पोरका झाला. कुटुंबाची आधारवड हरपली आणि या घटनेच्या तिव्र निषेध म्हणून आज नांदगाव तालुक्याच्या व नाशिक जिल्हा तैलिक समाजाच्या वतीने  नायब तहसिलदार  प्रमोद मोरे यांना निवेदन सादर करण्यात आलं. गुन्हेगारास कठोरात कठोर शासन होऊन न्याय मिळावा ही विनंती करीत निवेदन सादर करतांना नाशिक विभाग अध्यक्ष ऍड.शशिकांत व्यवहारे,जिल्हा उत्तर ग्रामीण अध्यक्ष समाधान चौधरी,वकील आघाडी अध्यक्ष ऍड.बी.आर.चौधरी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय बत्तासे,उपाध्यक्ष विनोद महाले,जिल्हा संघटक मनोहर चौधरी,सहसचिव गोरख नेरकर,शहराध्यक्ष दिलीप सौंदाणे,उपाध्यक्ष दिलीप देहडराय,सचिव संजय वाघ, तालुका युवा आघाडी अध्यक्ष संतोष गायकवाड,उपाध्यक्ष राम देहाडराय,शहर युवा आघाडी अध्यक्ष कुणाल सौंदाणे,उपाध्यक्ष सोमनाथ उडकूडे सह बळवंत चौधरी,बाळासाहेब वाघ,बाळासाहेब देहाडराय,मनोज वाघ,रमेश खंडू,राजेंद्र चौधरी,सुभाष चौधरी,वाल्मिक टिळेकर नगरसेवक नांदगाव नगरपरिषद,विनोद चौधरी,ऋषिकेश चौधरी,महेश देहाडराय, मनीषा चौधरी, अल्काबई चौधरी इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, June 10, 2023

नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा, नांदगाव तालुका बुथ कमिटी अध्यक्षपदी देवदत्त सोनवणे यांची निवड ,




 नांदगाव (प्रतिनिधी) -   नांदगाव येथे शनिवारी दि. १० रोजी नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त तालुकाध्यक्ष विजय पा. चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच देवदत्त चंद्रभान सोनवणे यांचा नांदगाव तालुका बुथ कमिटी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
 विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, तालुकाध्यक्ष विजय पाटील, महिला तालुकाध्यक्ष योगिताताई पाटील, ता. अध्यक्ष बुथ कमिटी देवदत्त सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
          यावेळी तालुकाध्यक्ष विजय पा. चव्हाण, नांदगाव शहराध्यक्ष अरुणभाऊ पाटील, विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, युवक अध्यक्ष सोपान पवार, समता परिषद ता. अध्यक्ष अशोक पाटील, राजेंद्र लाठे ता. सामाजिक न्याय विभाग, पद्माकर महानुभव ता. अध्यक्ष सेवादल, दिगंबर सोनवणे ता. अध्यक्ष माहिती व तंत्रज्ञान, वाल्मीक टिळेकर ता. अध्यक्ष सोशल  मीडिया, पंडितदादा सूर्यवंशी ता. अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक, विलास राजुळे, देवदत्त सोनवणे, अतुल पाटील, फैसल शेख, विश्वास अहिरे, चंद्रकला बोरसे, सुगंधा खैरनार, किसनराव जगधने, महेश पवार, शरद जाधव, विकी कोरडे, शंकर शिंदे, योगेश बोरसे, वाल्मीक खिरडकर, सागर आहेर, ज्ञानेश्वर सुरसे, प्रशांत बोरसे, शुभम बोरसे, बाळासाहेब देहाडराय, दीपक पाटील, विश्वास घाडगे, माणिक बाविस्कर, भाऊसाहेब बर्डे, विलास जोनवाळ, समाधान बोगीर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Friday, June 9, 2023

नांदगाव च्या प्रशासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत मनसेचे निवेदन,


 
 नांदगाव (प्रतिनिधी) -  प्रशासकीय कार्यालयातील  सीसीटीव्ही कॅमेरे लावून चालू करण्याबाबत  नांदगाव तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना मनसेतर्फे निवेदन देण्यात आले. 
नांदगाव तहसिलला अद्यावत नवीन इमारत मिळाली असून या नवीन इमारतीमध्ये अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत. परंतु या इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आलेले नाहीत. तरी आपणास निवेदन देत आहोत की , शासकीय धान्य गोदाम तहसील कार्यालय ,सहकार विभाग, खरेदी विक्री कार्यालय ,वनविभाग कार्यालय ,कृषी कार्यालय, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयांमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावून ते चालू ठेवण्याबाबत आम्ही आपणास २१ दिवसाची मुदत देत आहोत .अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी आपली असेल.निवेदनावर मनसे नांदगाव तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात, नांदगाव शहराध्यक्ष अभिषेक विघे, नांदगाव तालुका अध्यक्षा महिला रेखा शेलार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

नांदगाव येथे नांदेड जिल्ह्यातील बोंढारहवेली भालेराव हत्याकांड संदर्भात जन आक्रोश मोर्चा,



नांदगाव( प्रतिनिधी) - नांदेड पासुन ३ की मी अंतर असलेल्या बोंढारहवेली, जि. नादेंड या गावात बौध्द तरुण अक्षय भालेराव यांचा खुन करण्यात आला. अधिक वृत्त,  असे की नांदगाव शहरातील सर्व पक्षीय व बौध्द समाज बांधवांनी तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना भारतीय स्वतंत्रचा अमृत महोत्सव भारतभर साजरा केला जात असतांना आज ही मानसिक विकृतीने लोक ग्रासलेले असुन त्यांना जातीयतेची लागण झाल्याचे वारंवार दिसून येत त्याचीच प्रचीती नांदेड जिल्ह्यातील बोंढारहवेली या गावात रहात असलेल्या बौध्द तरुण अक्षय भालेराव यांचा (हत्याकांड घडले)खुन करण्यात आला.! 
या गावात पहिल्यांदाच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. याचा राग मनात धरून या गावातील बौध्द तरुण अक्षय भालेराव याला काही जातीयवादी गाव गुंडयांनी त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे. अशा विकृत व्यक्तींना कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच हे फरार आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहे त्या संघटनेवर कारवाई करण्यात यावी तसेच पिडीत व्यक्ती व बौद्ध वस्तीला संरक्षण मिळावे शिवाय ॲट्रॉसिटी अॅक्ट 302 अंतर्गत झालेल्या कारवाई 120 ब चा समावेश करावा व अशा गावगुंड्यांना फाशीची शिक्षा करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.तसेच जातेगाव नांदगाव येथील जमिनीच्या वादातून प्राथमिक शिक्षक शरद पवार व त्यांनी आणलेल्या गावगुंडांची तुकाराम लाठे व त्यांच्या परिवारास भ्याड हल्ला करून तुकाराम यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.! त्यांच्यावर व त्यांनी आणलेल्या गावगुंड्यावर कारवाई व्हावी व लाठे कुटुंबीयांना संरक्षण मिळावे त्यात दिरंगाई झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंबेडकर अनुयायी यांनी दिला निवेदनात त्या निषेधार्थ आज नांदगाव  शहरातील आंबेडकर अनुयायींनी नायब तहसिलदार मोरे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे (पाटिल) यांना निवेदन देण्यात आले अक्षय भालेराव याला गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत भाग घेतल्यानं  गावातील काही जातीयवाद लोकांनी त्याचा खुन केल्याचा आरोप करण्यात येतोय.! त्या संदर्भात आज नाशिक जिल्ह्यातील तालुका नांदगाव या शहरात अक्षय भालेराव यांना न्याय देण्यासाठी आंबेडकर अनुयायी एकवटले होते त्यांनी जन आक्रोश मोर्चा काढुन सरकारला धारेवर धरले होते सरकाराचा निषेध व्यक्त केला यावेळी उपस्थित असलेल्या समाजबाधवांनी आक्रोश करत भाषणे ही  केली होती यावेळी अरुण साळवे, वाल्मीक जगताप, भास्कर निकम,विलास कोतकर, माजी नगरसेवक नितिन जाधव, देविदास मोरे. अनिल जाधव ,विश्वास आहिरे, महाविर जाधव, अनिल कोतकर, संदीप पवार, सचिन साळवे, नाना जगताप,अविनाश केदारे फिरोज शेख, कपिल तेलुरे, राज पवार, निर्मला केदारे,अलका रूपवते,संगिता वाघ, विद्या कसबे,जयश्री डोळे तसेच ग्रामीण भागातील  वयोवृद्ध महिला पुरुष आणि तरुण आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने या जन आक्रोश मोर्चेत सहभागी झाले होते. बौध्द पध्दतीने अक्षय भालेराव याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून वंदना घेण्यात आली.

Tuesday, June 6, 2023

नांदगाव शहरातील नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूलचे नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात,




  नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव येथील ५ जून  रोजी नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो  इंटरनॅशनल स्कूल चे नवीन वर्षाची  सुरुवात झाली. नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल , उपाध्यक्ष सरिता बागुल, रेंनबो  इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली   नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे एक अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.  संपूर्ण शाळा ही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सुसज्ज करण्यात आली होती. शाळेला फुग्यांची सजावट करण्यात आलेली होती. नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल यांनी विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबिन कट करून स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांनी सरस्वती मातेला नमस्कार करून  आपल्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाला सुरुवात केली.विद्यार्थ्यांना सरप्राईज गिफ्ट वाटप करून स्वागत करण्यात आले.  याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्ये सनई संबळ वर ठेका धरत नृत्य सादर केले त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद हा द्विगुणित झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली भांगे यांनी केले.
               हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी रेनबो  इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका अश्विनी केदारे,  प्रियांका खांडेकर, चैताली अहिरे, मोनाली गायकवाड, एडना फर्नांडिस, अनिता जगधने ,दिपाली भांगे , तसेच मदतनीस वैशाली बागुल, छाया आवारे, ज्योती सोनवणे  त्याचबरोबर बरोबर शाळेतील ड्रायव्हर विनोद भाऊ, गजानन भाऊ, मंगेश भाऊ, बाळू भाऊ, रवि भाऊ, चंदू भाऊ  सागर भाऊ या सर्वांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचे अति उत्साहाने स्वागत केले.

Friday, June 2, 2023

नांदगावच्या एच.आर.हायस्कुल एसएससी दहावी उर्दू माध्यमाचा ९७.६१% निकाल, आफिया जावेद खाटीक हीने ८९ टक्के मिळवून शाळेत प्रथम ,

८९.००%
                          ८७.२०%
                         ८६.८०%

नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगावच्या एच‌.आर. हायस्कूल उर्दू माध्यमाच्या एसएसी ९७.६१% निकाल अॉनलाईन पध्दतीने संकेतस्थळावर जाहीर झाला. या हायस्कूल मधील विद्यार्थी आफिया जावेद खाटीक ८९.००% मिळवून शाळेत प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाली. नांदगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी संचलित एच.आर. हायस्कूल नांदगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी ही कायम ठेवली आहे. शाळेचा एकत्रित निकाल ९७.६१ % लागला. यावर्षी परिक्षेत एकुण ४२ विद्यार्थी बसले होते. त्यात २० विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये, तर १५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत आणि ६ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेतील आफिया जावेद खाटीक हीने ८९.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक जुबीया रफीक अन्सारी ८७.२०% , तृतीय क्रमांक जुफीन   शेख साबीर ८६.८०% मिळवला आहे. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख सईद सर, आरीफ खान सर, इस्राईल सर, इर्शाद सर, जेबा मॅडम, समरिन मॅडम , सज्जाद खान सर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या तर भविष्यात चांगल्या निकालाची इच्छा व्यक्त केली.

नांदगावमधील व्ही.जे. हायस्कूल १० वी चा निकाल ९७.४२ टक्के, कु.वैष्णवी प्रवीण जावरे ९८.४० टक्के गुण मिळून शाळेत प्रथम,




नांदगाव ( प्रतिनिधी )  - नांदगाव येथील व्ही.जे.हायस्कूल मधील २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षातील मार्च २०२३ चा एस.
एस.सी. निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने दुपारी एक वाजता जाहीर झाला.या वर्षीही शाळेने चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .या वर्षी विशेष श्रेणीत १२६ तर प्रथम श्रेणीत ९८ विद्यार्थी गुण मिळून उत्तीर्ण झाले आहेत.
 कु.वैष्णवी प्रवीण जावरे हीने ९८.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहेे. त्याच प्रमाणे कु. मोहिनी सोमनाथ देशमुख ९७.४० टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक तर कु. मृणाल मंदार रत्नपारखी९६.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक तर कु.केतकी विनायक बोरसे ९६ टक्के,श्रुती संजय देशमुख ९५.८० टक्के,मानसी शामपुरी गोसावी ९४.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थांचे कार्याध्यक्ष डॉ.राजेंद्रजी कलाल, सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला, संकुल प्रमुख संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर,उपमुख्याध्यापक दीपक बाकळे,पर्यवेक्षक मनोहर शिंदे , टी.एम.भैय्यासाहेब चव्हाण ,भास्कर मधे,वर्गशिक्षक दिपाली सांगळे,विलास काकळीज ,रविंद्र ठाकरे ,राकेश ननावरे तसेच शाळेतील सर्व पदाधिकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Thursday, June 1, 2023

आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या अंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ ,



                        
 नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद येथे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या अंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. नांदगाव नगरपरिषद्वारा आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शहरातील १०७ दिव्यांग लाभार्थ्यांना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेद्वारा राजगीर ,सर्वज्ञ, सप्तशृंगी, गौरी या बचत गटांना प्रत्येकी रुपये १५००००/- चे धनादेश वितरित करण्यात आले. नसीब, सोनचाफा ,व सिल्की या बचत गटांना आयसीआयसीआय बँक द्वारा प्रत्येकी पाच लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री पथविक्रेता योजना या योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक ,बँक ऑफ बडोदा, युनियन बँक इत्यादी बँकेद्वारा आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते ५५ लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. ५ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेअंतर्गत परिचय बोर्डाचे वाटप करण्यात आले. तसेच दारिद्र्य रेषेखालील दाखल्यांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण बँक द्वारा पथविक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आले.अंजुमताई कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी   बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी हनुमंते, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी जयंत अमृतकर मुक्ता कांदे प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे कर निरीक्षक विजय कायस्थ, रविन्द्र चोपडे, सुनील पवार, विजया धनवट, बिजला गंगावणे आदी उपस्थित होते. .     
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक . विवेक धांडे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद महिरे (सहायक प्रकल्प अधिकारी) यांनी केले.

गिरणानगर हद्दीतील आदिवासी महिलांचे प्रश्न मार्गी लागणार , अंजुमताई कांदे यांचे उपोषणाला बसलेल्या महिलांना आश्वासन,




 नांदगाव (प्रतिनिधी) -    गिरणा नगर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीवरील महिला, समाज बांधव विविध मागण्यासाठी उपोषणाला बसले होते. या संबंधी माहिती मिळताच सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी येथे भेट दिली. 
     आदिवासी महिलांच्या विविध अडचणी समजून घेतल्या, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून सर्व समस्यांवर त्वरित सोडवल्या जातील असे सांगितले. या वेळी बि.डी.ओ. गणेश चौधरी साहेब,विस्तार अधिकारी मांडवडे साहेब उपस्थित होते. 
      आदिवासी वस्तीवर घरकुल, शौचालय, पाणी , शासकीय कागदपत्रांची अडचणी लक्षात घेता ताईंनी त्वरित पाण्याचे टँकर पाठवण्याचे सांगितले तर त्वरित वस्ती साठी शौचालय ची व्यावस्था करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच बिडीओ यांनी शबरी घरकुल योजना अंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. 
       अनेक आदिवासी कुटुंबियांना रेशन कार्ड, जातीचे दाखले तसेच विविध कागदपत्रं नाहीत किंवा अडचणी आहेत त्यांना सर्वांना मोफत शासकीय सुविधा अंतर्गत आमदार संपर्क कार्यालयातून सर्व मदत केली जाणार आहे आणि त्यासाठी सर्वांना कागदपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  तसेच लवकरच मोफत दवाखाना व मोफत शासकीय सुविधा कॅम्प आयोजित करणार असल्याचे सांगितले. 
      आदिवासी महिला व कुटुंबियांच्या उपोषण स्थळी भेट दिल्या बद्दल उपोषणकर्त्यांनी ताईंचे आभार मानले.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...