Friday, September 30, 2022

नांदगाव येथे आदिवासी समाज बांधव सन्मान भव्य सोहळा आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत संपन्न,



नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आमदार निधी अंतर्गत मतदार संघातील सर्व आदिवासी वस्तीवर वीस लाख रुपयांचा सभा मंडप मंजूर केला असून या सभा मंडपात स्वतःच्या स्वखर्चातून भगवान एक विर एकलव्य यांची आकर्षक सुंदर मूर्ती देण्याचे ठरविले होते . या सर्व मूर्तींच्या एकत्रित पूजन करून सर्व आदिवासी बांधवांना सन्मानित करावे असा त्यांचा मानस होता आणि या अनुषंगाने आज नांदगाव मार्केट कमिटी पटांगणावर भगवान विर एकलव्य मूर्ती पूजन व आदिवासी समाज बांधवांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
  याप्रसंगी ८१ भगवान एकलव्य यांच्या मुर्त्या स्थापित करण्यात आल्या होत्या . प्रत्येक मूर्ती समोर एक होम बनविण्यात आलेला होता सर्व होम आणि परिसरात झेंडूची फुले तसेच रांगोळीने सजवण्यात आले होते. प्रत्येक मूर्ती समोर दोन आदिवासी बंद कुटुंब पूजेत बसले होते . या पूजेसाठी जवळपास दीडशे पुरोहित आमंत्रित केले गेले होते. आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजू कांदे हे स्वतः पूजेस बसले होते.
पूजा झाल्यानंतर आमदार कांदे वसई गांधी यांनी सर्व दीडशे कुटुंबीयांनी पर्यंत जाऊन हात जोडून त्यांना स्वागत व नमस्कार केला.
याप्रसंगी बोलताना आमदार सुहास आण्णा कांदे म्हणाले की हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही यामुळे या कार्यक्रमास आदिवासी बांधवांस सर्व राजकीय नेतेमंडळी तसेच सामाजिक नेते मंडळींना उपस्थित आहेत. मतदार संघाच्या प्रत्येक वंचित घटकाचा विकास करणे हे माझे कर्तव्य असून यापुढे आदिवासी समाजातील तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊ नये म्हणून प्रत्येक आदिवासी वस्तीवर जिम आणि वाचनालयाची निर्मिती येत्या वर्षभरात करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना दिली. मी पहिल्यांदाच पूजेला बसणार असल्याने माझ्याकडून काही चूक झाली तर सर्व आदिवासी बांधवांनी मला पदरात घ्यावे मला माफ करावे असे भावनिक आव्हानही आमदार कांदे यांनी यावेळी केले.
आदिवासी समाज बांधवांसाठी या आधी असा सामाजिक कार्यक्रम घेतला नाही , आदिवासी समाज नेहमी राज करण्यापासून दुर्लक्षित केला गेला ही नाळ पकडुन आमदार सुहास कांदे यांनी आदिवासी बांधवांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी इतक्या मोठ्या भव्य स्वरूपात कार्यक्रम घेऊन आदिवासी माता - भगिनींचा सन्मान केला . या बद्दल उपस्थित बांधवांनी आमदार कांदे यांच्या बद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी फरान खान बापूसाहेब कवडे तेज कवडे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, विलास आहेर, विष्णू निकम, आनंद कासलीवाल, सागर हीरे, कपिल तेलुरे, किरण देवरे, गुलाब भाबड ,सुनिल जाधव, भरत पारख,  बापू जाधव, नितीन सोनवणे ,चेतन पाटील, रोहीनी मोरे,  यावेळी शहरातील कार्यकर्ता , महिला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, September 29, 2022

हिंगणवाडी येथे निसर्ग मित्र समिती तर्फे वृक्षारोपण



हिंगणवाडी (प्रतिनिधी) -  आज गुरुवारी दि. २२ रोजी महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती नांदगाव तालुक्याच्या वतीने हिंगणवाडी  येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण विकास संस्थेचे सरचिटणीस  रमेश अप्पा पगार तर प्रमुख पाहुणे म्हणून निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, धुळे जिल्हा संर्पक प्रमुख शाहीर वाघ सर,प्रा.सुरेश नारायणे,ॶॅड.बी.आर.चौधरी, पत्रकार अनिल आव्हाड , डॉ.हर्षद सुनिल तुझे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ख्याती हर्षद तुसे,वनपाल व्ही.एस.बोरसे,प्रभारी वनपाल ए.डब्ल्यु .लोखंडे,वनरक्षक एम. डी.चौधरी,एल .एच. काटकर,हिंगणवडी सरपंच मनीषा डोळे,उपसरपंच संभाजी बच्छाव,ग्रामपंचायत सचिव सुनिल मोकळ,ग्रा.पं.सदस्य रामभाऊ बागुल,अनुसया गायकवाड,कांताबाई खंबायत,जण्याबाई शिंदे,सागर साळवे मनमाड,दिलीप निकम मनमाड,दिलीप सौंदाणे,सोमनाथ उडके साकोरा,पोलिस पाटील परशराम खंबायत,जेष्ठ नागरिक वामन खांबायत,सिद्धार्थ पवार,भास्कर मिस्कर,मुरलीधर देशमुख,नारायण शिंदे,खुशाल सोर,मच्छीन्द्र शिंदे इत्यादी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून गावकऱ्यांना हापूस,केशर जातीची आंब्याची रोपे व नारळ आणि जांभळाच्या रोपे वाटप करण्यात आली. प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे यांनी निसर्ग मित्र समितीच्या कामकाजा बाबत माहिती दिली. तर प्रा. सुरेश नारायणे यांनी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाची उपस्थितांना माहिती दिली व आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देत वृक्ष रोपण व संवर्धनाचे आवाहन करीत जल,जंगल व निसर्गाचे रक्षण करीत प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर वनाधिकारी बोरसे साहेबांनी रानभाज्यांचा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत पण त्या लोप पावत असल्याची खंत व्यक्त केली. व मनोगतात त्यांनी जंगल संपत्तीचे मणुष्य जीवनात महत्व असल्याचे सांगितले, समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब पगार यांनी निसर्ग मित्र या संस्थेच्या या उपक्रमाचे व हिंगणवाडी ग्रामस्थांचे कौतुक केले व सदर अभियान यशस्वी करण्याचे आणि सदर वृक्षांची निगा राखण्याचे आवाहन करीत सदर स्तुत्य उपक्रमा बद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व समितीच्या वतीने नविन तालुकाध्यक्ष म्हणून प्रा.धीरजकुमार परमार यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला त्यांना तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्यास शुभेच्छा दिल्या.नंतर दिवाळी प्रदुषण मुक्त राहाण्यासाठी फटाके न वाजविण्या बाबत ग्रामस्थांना प्रतिज्ञा देण्यात आली . मान्यवरांच्या सत्कारा नंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समाधान चौधरी यांनी केले . धीरजकुमार परमार,दिलीप सौंदाणे,सागर साळवे,निकम सर,समाधान चौधरी,वामन खंबायत,सोमनाथ उडके,सुनिल मोकळ,परशराम खंबायत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

Tuesday, September 27, 2022

"सत्यशोधक चळवळ ही आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनीय लोकचळवळ" - वडक्ते एस.के. यांचे प्रतिपादन


  मांडवड- ( प्रतिनिधी) - १५० वर्षापूर्वी समविचारी लोकांना बरोबर घेऊन महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 
"सर्व साक्षी जगत्पती!! त्याला नकोच मध्यस्थी!!"
 हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते. निर्मिकाचा धर्म सत्य आहे. हेच तत्त्व पटवून देण्यासाठी तात्कालीन समाजाला मानवतेचा, समतेचा, बंधुभावाचा संदेश देत, अंधश्रद्धा, भोंदूगिरी, अमानुषता, धार्मिक थोतांड यापासून समाजाला दूर ठेवण्यासाठी सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रात प्रबोधनाचे नवे पर्व सुरू केले. सरकार,सरकारी नोकर, सावकर, व्यापारी व भटजी यांच्याकडून शेतकरी, कष्टकरी, श्रमिक वर्ग, स्त्रीयांवर होणारे अत्याचार,शोषण आणि उच्चनीचता , जातीभेद याविरुद्ध सत्यशोधक चळवळीने लढे दिले. सवर्ण-दलितांमधील दरी कमी केली. दलित मुक्ती लढ्याचा पाया घातला. सत्यशोधकांनी शिक्षणाकडे समाज परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले. लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी जनजागृती केली. सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणेतून रयत शिक्षण संस्था व मराठा विद्या प्रसारक समाज संस्था यासारख्या ध्येयवादी शिक्षण संस्था सुरू झाल्या.सत्यशोधक समाजाकडून प्रेरणा घेऊन मविप्र समाज संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊराव ‌हिरे व सह कर्मवीरांच्या सहकार्याने मविप्र समाज संस्थेची स्थापना करून नाशिक जिल्ह्यांत शैक्षणिक क्रांती केली. त्याकाळातील लोकांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी कार्य करणारी सत्यशोधक चळवळ हि आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनीय लोकचळवळ होती असे पगार के.जे. यांनी असे प्रतिपादन केले. 
       मविप्र समाज संचलित स्व. शरद अण्णा आहेर जनता विद्यालयात ज्येष्ठ शिक्षक पगार के.जे. यांच्या अध्यक्षतेखाली मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पायाभरणीत सत्यशोधक समाजाचे अतुलनीय योगदान आहे, हे आजच्या विदयार्थ्यांना या चळवळीची माहिती होण्यासाठी सत्यशोधक चळवळीवर आधारित विद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सातपुते बी.पी. यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या काळात व तत्पूर्वी महाराष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती कशी होती. या विषयी माहिती दिली. श्रीमती आहिरे यांनी भाषणात सत्यशोधक चळवळीच्या कार्यातून आजच्या बहुजनांना आपला इतिहास समजेल आणि इतिहास समाजाला तरच आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतील त्यासाठी आजच्या तरुण पिढीला सत्यशोधक विचारांची गरज असल्याचे सांगितले. वडक््तते एस.के.यांनी समाजातील दीनदुबळ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि मानवता धर्माची प्रेरणा देण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळी सुरू केली. या सत्यशोधक समाजाच्या विचारसारणीतून प्रेरणा घेऊन कर्म. रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, गणपतदादा मोरे, या कर्मवीरांनी मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेची स्थापना करून नाशिक जिल्ह्यातील खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा पोहचवण्याचे महान कार्य केल्याचे प्रबोधनपर विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ज्येष्ठ सभासद रामराव मोहिते उपस्थित होते.
       कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी केले, यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

Sunday, September 25, 2022

आम्ही नांदगावकर रेल्वे प्रवाशी संघटना अध्यक्षपदी एजाज सय्यद यांची निवड,



नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगाव शहरातील "आम्ही नांदगावकर प्रश्न माझ्या गावांचा"  आज रविवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रहदारी बंगल्याजवळ बैठक आयोजित करण्यात आली होती.  रेल्वे प्रशासनाला आत्तापर्यंत जे निवेदन दिले होते , त्याची रेल्वे प्रशासन ने काहीही उतर दिले नाही. रेल्वे समस्येबाबत पुढील दिशा, कसे नियोजन करता येईल यासाठी बैठक महत्त्वाची होती. प्रवाशांना खरच रेलवे ची गरज आहे गावाचा विकास होईल हा उद्देश होता. अनेक मागण्या प्रलंबित असल्याने आम्ही नांदगावकर रेल्वे प्रवाशी संघटना  स्थापन केली आहे.  नांदगावतील उपस्थित नांदगावकरानी सर्वांच्या मताने  अध्यक्ष एजाज ( बबलू) सय्यद   , सचिव दिनेश पिंगळे , खजिनदार अरुण बोरसे यांची नेमणूक करण्यात आली. प्रवाशांसाठी गाड्या  थांब्यासाठी दिशा कळविण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Saturday, September 24, 2022

रेल्वे स्टेशनवरील सल्लागार समितीच्या बैठकीत महत्त्वांच्या विषयावर चर्चा ,



नांदगाव ( प्रतिनिधी)   -  नांदगाव मधील रेल्वे स्टेशन वरील  अनेक मागण्या वर चर्चा बैठकीत संपन्न झाली.  सल्लागार समितीची बैठक भुसावळचे वाणिज्य प्रबंधक अनिल बागले यांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर झाली.  रेल्वे स्टेशनवरील  महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली . रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत रेल्वे प्रशासनाच्या वतीने भुसावळ विभागाचे वाणिज्य प्रबंधक अनिल बागले, स्टेशन प्रबंधक व्ही.जे . मीना, केशव चौधरी, गरूड, मगर , जाधव, रेल्वे सुरक्षा बलाचे सिंह,  संजय सानप, राजेंद्र मोकळ, अॅड. विद्या कसबे, सईद शेख, सुमित सोनवणे, उदय मेघावत सचिन पारख, तुषार पांडे सल्लागार समितीचे सदस्याची उपस्थिती होती.
रेल्वे स्टेशन साठी  महत्त्वाचे मागण्या - 
१) झेलम, कामायनी, कृषीनगर एक्स्प्रेसचा थांबा मिळावा
२) डाऊन प्लाटफार्मवर प्रवाशी साठी शेड उभारावे
३) डिजिटल पोजिशन बोर्ड लावावं
४) पर्यायी तिकीट व्यवस्था औरंगाबाद रोड बाजूस 
५) शारीरिक दृष्ट्या विकलांग व वयवृद्ध  व्यक्तींना जिना अवघड असल्याने, पर्यायी लिफ्टची व्यवस्था
६)दोन बुकींग विंडो 
७) पार्किंग व्यवस्था करण्यात यावी इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली होती.

Friday, September 23, 2022

आगामी नवरात्र , दसरा उत्सव नियम पाळुन साजरा करा शांतता बैठकीत पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या सुचना,



नांदगाव (प्रतिनिधी) - आगामी होणाऱ्या   नवरात्र उत्सवात दुर्गा मंडळांनी शासनाने नियम पाळून साजरे करावे असे आव्हान दुर्गा मित्र मंडळ पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्या शांतता बैठकित नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी  केले. नवरात्र उत्सव, दसरा  पार्श्वभूमीवर नांदगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये  शुक्रवारी (ता.२३) रोजी शांतता समिती सदस्य बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी नवदुर्गा उत्सव समितीच्या मंडळांना सुचना केल्या आहेत. या पूर्वी परवानगी घेतलेल्या मंडळांना मुर्तीं बसवण्यासाठी व मिरवणुकीला परवानगी दिली जाईल नव्या मंडळांना  मुर्ती बसविण्यास परवणगी दिली जाणार नाही. ऑनलाईन अर्ज केलेल्या मंडळांना परवानगी दिली जाईल  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डी जे, डॉल्बी ला बंदी आहे. त्यामुळे असे वाद्य लावु नये व कायद्यानचे उल्लंघन करु नये, असे झाल्यास संबधीतावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.  तसेच शासनाने जारी केलेल्या  नियमानुर हा नवरात्र उत्सव साजरा  करावा , उत्सवात ध्वनिक्षेपक चा आवाज ५५ डेसिंबल च्या आत असावा रात्री १० वाजेपर्यंत वाद्य वाजण्यास परवानगी आहे.  धार्मिक सण हे धार्मिक परंपरेने साजरे करावे आपल्या पासून चुकीची पध्दत पडता कामे नये ही काळजी मंडळींनी घेतली जावी.  कोणतेही धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्ये वक्तव्य करु नये .  दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या वेग वेगळ्या रांगेची व्यवस्था  करावी , दांडिया नृत्य दरम्यान महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं सुचनाही केल्या.  कोणीही गैरवर्तन करत असेल तर समजावुन सांगा,  ऐकत नसेल तर तत्काळ पोलीसांना माहिती देऊन  पोलीस तात्काळ तेथे पाचारण होतील. अशा ठिकाणी वर्दीतील व सिव्हिल मध्ये पोलीस बंदोबस्तात राहणार आहे. नवरात्र उत्सव काळात व  विसर्जन मिरवणुकी वेळी वीजपुरवठा सुरळीत राहण्यायासाठी वीज मंडळास आम्ही पत्र देणार आहोत.  मिरवणूक मार्गात रस्त्यावरील खड्डे बजविण्यासाठी नगरपालिका मुख्यधिकारी यांना कळविले आहे.यावेळी पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी उत्सवकार्यक्रमात ,मिरवणुकीत पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान केले व उपस्थितांचे आभार मानले . या बैठकीस तालुक्यातील  ग्रामीण भागातील व शहरातील दुर्गा मंडळांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी,पत्रकार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी  उपस्थित होते, बैठकीसाठी गोपनीय शाखेचे दत्ता सोनवणे यांनी नियोजन केले.  नांदगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये आयोजित शांतता समिती  बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील,समवेत उपनिरीक्षक मनोज पाटील,गोपनीय शाखेचे दत्ता सोनवणे ,पत्रकार, नवदुर्गा मंडळांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

Thursday, September 22, 2022

नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन, वेदांत व फॉक्सकॉन कंपनी प्रकल्प गुजरातला वळविल्याने केला तीव्र निषेध,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील तळेगाव येथे सेमी कंडक्टर व डिस्प्ले फेब्रीकेशनचा मंजूर प्रकल्प गुजरात राज्यात वळविल्याने या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले होते. नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वेदांत व फॉक्सकॉन कंपनीने मंजूर केलेल्या प्रकल्पासाठी पुन्हा महाराष्ट्रात वळविण्यात यावा व राज्यातील युवकांच्या हक्काचा रोजगार प्रश्न सोडवा यासाठी नांदगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात आले. मनमाड कार्याध्यक्ष नाना शिंदे, रामु दादा, महिला तालुका अध्यक्ष योगिता पाटील, प्रबोधन मंचाचे जगताप सर, सोपान पवार, तालुका अध्यक्ष विजय पाटील शिंदे - फडणवीस सरकारचा  यावेळी निषेध  व्यक्त करण्यात आला. सेमीकंडक्टर प्रकल्प पून्हा महाराष्ट्रात आणावा, न आणल्यास नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व माजी. आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला. नांदगाव तालुक्यात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सर्व पिकांची पाहणी , पंचनामे करून एकरी ५००००₹ मदत जाहीर व लम्पी रोगामुळे शेतकऱ्यांचे मेलेल्या जनावरांची शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी . उर्वरित पशू जनावरांना मोफत लसीकरण करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन नांदगाव तहसीलदार  यांना देण्यात आले आहे.
    या धरणे आंदोलनात तालुका अध्यक्ष विजय पाटील, शहरप्रमुख बाळकाका कलंत्री, प्रतापदादा गरूड, रामु दादा पवार, डॉ. वाय . पी. जाधव, महिला तालुका अध्यक्ष योगिता पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष सौपान पवार, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष राजेंद्र लाठे , गट प्रमुख राजेंद्र सावंत, गट प्रमुख दादाभाऊ पगार, युवक प्रमुख गौतम जगताप, नानाभाऊ शिंदे, राजभाऊ जाधव, हबित शेख, अक्षय देशमुख, आनंद बोथरा , पंडित सुर्यवंशी, किसनराव जगधने, राजेंद्र निकम, वाल्मिक खिरडकर, काशीनाथ जोघारे , योगेश बोरसे, शिवा सोनवणे, अलका आयनोर, सुगंधा खैरनार, बाळासाहेब देहाडराय, प्रकाश देवरे, साईनाथ शिरसाट , काका सोळसे , वाल्मिक जगताप , विश्वास आहिरे, दत्तु पवार, नारायण पवार, संजय आहेर, पद्माकर महानुभाव, शिवाजी जाधव, दिलीप निकम , सचिन कोरडे, दिगंबर पाटील, देविदास पगार, देवदत्त सोनवणे, दिपक खैरणार, दया जुन्नरे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगावात २१ महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाखांचे कर्ज वाटप,


नांदगाव (प्रतिनिधी)  -  आज गुरुवारी दि. २२ रोजी नांदगाव नगरपरिषद मध्ये पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव यांच्या साह्याने २१ महिला बचत गटांना प्रत्येकी रुपये १०००००₹ कर्ज रकमेचा धनादेश नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी उपस्थित महिला बचत गटाच्या सदस्यांना उद्योग व्यवसायाबाबत तसेच नियमित बचत करून कर्ज परतफेड करणे बाबत मार्गदर्शन केले.
      या वेळी २१ बचत गटातील सुमारे २०० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी पी. ए. हनुमंते , शिंदे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी आनंद महिरे , समुदाय संघटक विजया धनवट, क्षेत्रिय समन्वयक बिजला गंगावणे उपस्थित होते.

मनमाड रेल्वे जंक्शन वर थांबणाऱ्या पाच गाड्यां रद्द, बिलासपूर विभागात नॉन इंटरलॉकिंग कार्यामुळे रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय,


मनमाड ( प्रतिनिधी) - रेल्वे प्रशासनाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या बिलासपूर विभागात रायगढ - झारसुगुडा दरम्यान चालू असलेल्या नॉन इंटरलॉकिंग कार्यामुळे भुसावळ मंडळातून जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल सोमवारी दि. २१ सप्टेंबर ते १ अक्टोबर पर्यंत रेल्वे कार्य चालणार आहे. यामुळे  बिलासपूरच्या दिशेने  मनमाड जंक्शन वर थांबणाऱ्या गाडी नं .२२५११ लो.टि. टर्मिनस कामाख्या कर्मभूमी सुपरफास्ट एक्स्प्रेस  ( २७ सप्टेंबर), १२८०९ मुंबई हावडा मेल ( २१ ते २८ सप्टेंबर) , १८०२९ लो.टि.टर्मिनस शालीमार एक्स्प्रेस ( २१ - २८ सप्टेंबर),  १२८७९ लो.टि . टर्मिनस भुवनेश्वर विकली सुपरफास्ट एक्स्प्रेस ( २४,२८ सप्टेंबर व १ अक्टोबर) २२८६५ लो. टि. टर्मिनस पुरी विकली सुपरफास्ट एक्स्प्रेस ( २९ सप्टेंबर)  ला  गाड्या आता रद्द आल्या आहेत. प्रवाशांना पर्यायी गाड्याचा टिकट काढून प्रवास करावा लागणार आहे. ज्या प्रवाशांनी या गाड्याचे टिकटे अॉनलाईन काढली असेल त्यांना परतावा मिळेल, तर ज्यांनी काउंटर वरून काढले असतील त्यांना ही टिकीटांचे पैसे परत मिळणार आहे. मनमाड रेल्वे जंक्शन वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता या गाड्या साठी वाट पाहावी लागणार आहे. मनमाड रेल्वे स्टेशन वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते.

Wednesday, September 21, 2022

नांदगाव हे स्मार्ट सिटी होणार - डॉ . ओमप्रकाश कुलकर्णी,

डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांचा सत्कार करतांना आमदार सुहास कांदे, विजय चोपडा, बाळासाहेब कवडे, सुनील चांडक, दिलीप पारख, रत्नाकर खरोटे, आनंद कासलीवाल .


  नांदगाव ( प्रतिनिधी ) -  सततच्या औद्योगिक व व्यावसायिक दृष्ट्या मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदगाव तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय संशोधक डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने पुढे जाण्याचा निर्णय नांदगाव येथील बैठकीत घेण्यात आला. येथील विश्रामगृहात आ. कांदे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील उद्योजक, व्यावसायिक व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठकीचे आयोजन उद्योगवर्धिनी नाशिकचे संचालक सुनील चांडक यांनी केले होते. 
   यावेळी भौगोलिक, औद्योगिक व पारंपारिक शेती इत्यादी परिस्थितीचा अभ्यास करून नांदगाव तालुक्याच्या दृष्टीने छोट्यात छोट्या गटापासून सर्वांना रोजगार व व्यवसायाची संधी कशी प्राप्त होईल याचा विचार व अभ्यास करून आपल्याला व्यवसाय संधी उपलब्ध करून देता येतील.  याचवेळी नांदगाव तालुका शेती प्रधान असल्याने शेतीवर आधारित आधुनिक पिक पद्धती व त्या अनुषंगाने आवश्यक बदल कसे करता येतील याचा विचार आपणास करावा लागेल.  त्यासाठी मी माझ्या स्तरावरून डॉ कुलकर्णी यांना सर्वतोपरी सहाय्य व मदत करण्यास तयार आहे असे प्रतिपादन आ. कांदे यांनी केले. 
    नांदगाव माझी जन्मभूमी असून तिच्यासाठी आपण काही तरी करावे व या भावनेतूनच मी आज नांदगाव येथे आलो आहे असे भाव विवेशतेने मत मांडले आहे.  डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले कि, माझ्या अभ्यासाचा संशोधन वृत्तीचा फायदा मी माझ्या नांदगावला देण्यासाठी सदैव तयार आहे. नांदगाव हे स्मार्ट सिटी करण्याचा आराखडा तयार असून तो मी नांदगावला देण्यास व त्यासाठी काम करण्यास हि तयार आहे. असे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले. 
  आमच्याकडे बचत गटाच्या एकूण ३००० पेक्षाही अधिक महिलांचे बचत गट कार्यरत असून त्यांच्यासाठी काही तरी करण्याची आपली व सौ. अंजुम कांदे यांची ईच्छा असून डॉ. कुलकर्णी व उद्योगव्र्धीनीचे चांडक यांच्या संयुक्त उपस्थितीत लवकरच नांदगाव येथे एक भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करून त्यात बचत गटाला व्यावसायिक संधी देऊन त्यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेऊ असे आ. कांदे यावेळी म्हणाले होते.
     डॉ. कुलकर्णी यांनी कमी खर्चाचे व्यावसायिक तंत्रज्ञान द्यावे व उद्योग व्र्धीनीचे सुनील चांडक यांनी उत्पादनाचे मार्केटिंग यशस्वीरीत्या करून द्यावे अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी व्यापारी संघटनेचे विजय चोपडा, उद्योजक आनंद कासलीवाल व मुकुंद शहा, कृषी तज्ञ बाळासाहेब कवडे, दिलीप पारख, रत्नाकर खरोटे, विधिज्ञ सचिन साळवे आदी मान्यवरांनी उपस्थिती होती.  डॉ. कुलकर्णी आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे संशोधक असून त्यांनी अमेरिकेची जनरल इलेक्ट्रिक मोटर, योर्क (वातानुकुलीत यंत्र बनवणारी) कंपनी, भारतीय आर्मी व नेव्ही, इस्रो अशा अनेक ठिकाणी मोलाचे काम केले आहे.   

पोषण आहार मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी आ. सुहास कांदे यांना दिले मागणीचे निवेदन,



नांदगाव (प्रतिनिधी) -   नांदगांव तालुक्यातील शालेय पोषण आहार समितीच्या सदस्यांनी आमदार सुहास कांदे यांना मानधन वाढीसाठी निवेदन दिले.  तालुक्यातील विविध शाळांमधून मदतनीस म्हणून कार्य करतो यात वर्गातील स्वच्छता,अन्न शिजवणे, अन्न वाटप करणे,भांडे धुवणे व पुन्हा वर्ग झाडून स्वच्छ करणे यासारखे व अजून इतरही काम करतो मात्र या मोबदल्यात आम्हाला अवघे   १५००₹ महिना पगार दिला जातो . याच धर्तीवर अंगणवाडी सेविका आशा वर्कर या देखील शासनाचे काम करतात मात्र त्यांना मोठ्या प्रमाणावर मानधन देण्यात येते तरी आम्ही व आमच्यासारख्या राज्यातील सर्वच शालेय पोषण आहार मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी अशी पत्रात मागणी करण्यात आली आहे . महाराष्ट्र राज्य सरकारमधील एक घटक आहात म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत आम्हाला न्याय देण्यात यावा अशी पत्राद्वारे निवेदन दिले.

      

Tuesday, September 20, 2022

नांदगाव च्या सबवे मुळे वाहनांच्या लागल्या मोठ्या रांगा, वाहतूक कोंडीने वाहनचालकही त्रस्त,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील सबवेत पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नांदगाव मध्ये सकाळी पाऊस ओसरल्याने या सबवेतून वाहने येण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी गळती दिसून येते. मात्र मागील वर्षी जैसे पाणी तुंबले तसे चित्र यंदा नव्हते. रेल्वे गेट बंद केल्याने पर्यायी मार्ग सबवे सुरू करण्यात आला. गेल्यावर्षी इथे मोठ्या प्रमाणात पाऊसाचे पाणी तुंबले होते. या महापूरामुळे दुकानात, घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान करून गेले होते. पूराचे पाणी वाहू न शकल्याने यांचे दोष मटन मार्केट वर देण्यात आले. नंतरच्या काळात मटन मार्केट जेसीबी मशीन मदतीने  जमीन दोस्त करण्यात आले. सबवेच्या वाहतूक कोंडी चा प्रश्न अनेकवेळा उपस्थित करण्यात आला पण प्रशासनाने यावर अजून ही दखल घेतली नाही. वाहन चालकांची यापासून सुटका कधी होणार असा नागरिक सवाल उपस्थित करत आहे. सबवेच्या अरूंद रस्त्यावर ट्रॅक्टर, इतर वाहने वळवताना मोठी कसरत करावी लागत असल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत आहे.

आमदार सुहास कांदे यांनी मनमाड मध्ये केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी ,

 
मनमाड (प्रतिनिधी )- नांदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने मनमाड मध्ये रामगुळणा, पांझण नदीला मोठा पूर आला. मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने पूराचे पाणी घरात  शिरल्याने घरातील संसारपयोगी वस्तू मोठे नुकसान झाले. यांची माहिती मिळताच मनमाड मध्ये आमदार सुहास कांदे यांनी पूर परिस्थितीचा व नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी केली. नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.  नांदगाव तालुक्याचे  आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांनी पूर आपत्तीग्रस्तांना भेट घेतली होती. तसेच पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार, मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी कृषी अधिकारी, आरोग्याधिकारी, PWD, पोलीस, पंचायत समिती चे अधिकारी वर्ग उपस्थित होता. 
   रामगुळणा, पांझण नदीला  पूर परिस्थितीमुळे आणि भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये म्हणून या पुलाचे काम सुरू करण्यात येईल व या दोन्ही साठी 5 कोटी रुपये मंजूर केले असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. आपत्ती ग्रस्थांशी बोलताना आमदार कांदेनी धीर दिला, मोठे नुकसान झालेल्या कुटुंबीय महिलांशी बोलतांना धीर देत सर्व संसार उपयोगी साहित्य व अन्न धान्य तात्काळ देणार असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी शिवसेना कोअर कमिटी मनमाड शहर व महिला आघाडी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Saturday, September 17, 2022

उद्यापासून नांदगाव शहरातील गुलजारवाडीत "जश्ने ईदे मिलादुन्नबी" निमित्ताने मुली व महिला करीता मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स,


नांदगाव ( प्रतिनिधी)  - नांदगाव शहरात "जश्ने ईदे मिलादुन्नबी" निमित्ताने मुली व महिला करीता मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स विद्यमान नगरसेवक मरहूम इकबाल दादा शेख कोचिंग क्लासेस उद्यापासून  दिनांक १९ सप्टेंबर रोजी क्लास चालू होणार आहे. यांचा शुभारंभ नांदगाव शहरातील गुलजारवाडी जवळील न्यू महाराष्ट्र टॉकीज कंपाउंड येथे  होणार आहे. नांदगावचे विद्यमान नगरसेवक मरहुम इकबाल दादा शेख कोचिंग क्लासेस अंतर्गत शिवण क्लास व मेहंदी क्लासचे यशस्वीतेनंतर मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्सची सुरुवात ईद मिला दून्नबी च्या शुभप्रसंगी होत आहे . जास्तीत जास्त मुली, महिलांनी या कोर्सचा सहभाग नोंदवावा अशी विनंती  दाऊद शेख यांच्याकडून करण्यात आली आहे. 

नांदगाव नगरपालिकेचा राष्ट्रीय पातळीवरील "इंडियन स्वच्छता लीग" स्पर्धेत सहभाग,


नांदगाव ( प्रतिनिधी )  - नांदगाव शहरात नांदगाव नगरपरिषदेने भारत सरकारच्या स्‍वच्‍छ अमृत महोत्सव अंतर्गत "इंडियन स्वच्छता लीग" या देश पातळीवरील स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला असून आज शनिवारी दि. १७ सप्टेंबर  रोजी शहरातून भव्य स्वच्छता रॅली आयोजित करण्यात आली होती. सदरील रॅली नगरपरिषद प्रांगणातुन सकाळी शहरातील तरुण तसेच महिला, विविध शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक , सफाई कर्मचारी आणि नगरपरिषदेचे अधिकारी , कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. 
 त्यानंतर रॅलीचे खास आकर्षण असणाऱ्या बाल वारकरी मंडळाच्या बालवारकरी यांनी " वृक्षवल्ली आम्हा सोयरे " अशा अभंगातुन व ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या साथीने रॅलीची सुरवात करण्‍यात आली. हातात झाडू घेऊन सर्व सहभागी नागरिक स्वच्छतेच्या घोषणा देत निघाले त्यानंतर शहरातून वाहणाऱ्या शाकांबरी नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली त्यानंतर शनीमंदिर येथील नगरपरिषदेचे उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबवत पुढे हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक येथून नांदगाव नगरपरिषद प्रांगणात येवून रॅलीचा शेवट करण्यात आला याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग नोंदविला होता.

Friday, September 16, 2022

नांदगाव च्या भाजीपाला बाजारात नागरिकांना चालणे मुश्कील, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात कधी येणार!!


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरात बाजारपेठ मध्ये भोंगळे रस्त्यावर खड्डे, चिखलामुळे वाहनचालक, पायी चालणाऱ्या डबक्यातून वाट शोधावी लागत आहे. पादचाऱ्यांना खड्डे वाचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हा बकालपणा किती दिवस  भोंगळे  रस्त्यावर असणार असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. बाजारात लोक भाजीपाला, मासळी घेण्यासाठी मोठी गर्दी असते. तसेच शहरातून कांद्याचे मोठी ट्रकची वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी होते. प्रशासनाने या लवकर बुजवले तर नागरिकांना चालणे मुश्कील होणार नाही. वाहने समोरून जात असताना नांगरिकाच्या कपड्यावर चिखलाचे घाण पाणी पडल्याने कपडे खराब होत आहे. रोजच इथे भाजीपाला विक्री येत असतो बाजार झाल्यावर तोच नदीत फेकला जातो, प्रश्न पडतो की नदीच्या पाण्यात तळे कि मळे अशी अवस्था झालेली आहे. यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बाहेरील व्यक्ती जर नदीच्या बाजूने गेला तर त्याला वास सहन करावा लागतो आहे.  ही वस्तुस्थिती सगळीकडे असल्याने डास, मच्छर मुळे रोगराई पसरत आहे. नागरिकांनी मागणी केली की भोंगळे रस्त्यावरील बकालपणा दुर करावा, रस्त्याची डागडुजी करून साफसफाई कामे करायची मागणी करत आहे.

नाशिक जिल्ह्यातील नुतन मविप्र संस्थेच्या महिला सदस्या शोभा बोरसे यांच्या कडून नांदगावतील न्यु इंग्लिश स्कूल शाळेतील कामकाज बद्दल समाधान व्यक्त


नांदगाव (प्रतिनिधी) -    नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या महिला सदस्या व नांदगाव तालुका माहेरवाशीण  शोभाताई बोरस्ते यांनी न्यु.इंग्लिश स्कूल शाळेस भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप गोटे यांनी त्यांचे स्वागत केले. शाळेतील कामकाजात बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भागवत बोरस्ते,दिपक म्हस्के,व विद्यालयातील पर्यवेक्षक तुकाराम.घुगे, सुपेकर सर,हाताने सर,व शालेय शिक्षक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी तालुका स्तरावरील विज्ञान नाटीका कार्यक्रमास देखील त्यांनी भेट दिली . याप्रसंगी तालुका विज्ञान मंचचे अरुण पवार,सी.डी.आहिरे,कोठावदे,शेवाळे, सातपुते ,परीक्षक ॳॅड.सचिन साळवे,प्रा.सुरेश नारायणे, आदींनी स्वागत केले. 

Thursday, September 15, 2022

भुसावळ - देवळाली मेमु एक्स्प्रेस धावणार,

     पॅसेंजर गाडी आता भुसावळ- देवळाली मेमु एक्स्प्रेस 

नांदगाव/ मनमाड (प्रतिनिधी) -  कोवीडमुळे पॅसेंजर  गाडी गेल्या अडीच वर्षांपासून बंद असल्याने भुसावळ- देवळाली  ये-जा करणा-या या रहिवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही गाडी आता नवीन नंबरसह सुरु होत आहे. तीच्या वेळेतही बदल करण्यात आलेला आहे. मात्र, ही गाडी पॅसेंजर ऐवजी मेल एक्सप्रेस असून भाडेही जास्त असेल. गाडीला बारा डबे असून त्यातील दहा जनरलचे आणि दोन ब्रेक व्हॅन आहेत. गाडी क्रमांक 11114 अप भुसावळ- देवळाली ही भुसावळहून येत्या 16 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता नियमीत सुटेल.तर गाडी क्रमांक 11113 डाऊन देवळाली-भुसावळ पॅसेंजर ही देवळालीहून 17 सप्टेंबरला सकाळी 7:20 वाजता नियमित सुटेल.या गाडीची देवळालीहून सुटण्याची वेळ पहाटे पाच एवजी 7.20 अशी आहे. त्यामुळे नाशिक ते नांदगाव दरम्यानच्या नोकरदार, व्यावसायिक आदींची सोय झाली आहे. नांदगाव च्या आम्ही नांदगावकर यांनी अनेक निवेदने, मागण्या केल्या तरी रेल्वे प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर आलेले नाही. नांदगाव करांच्या सेवेत जर गाड्या वाढल्या तर त्यांचा प्रवास सुखदायी होईल.  प्रवाशांची  गैरसोय यामुळे होणार नाही. कोरोनापूर्वी ही पॅसेंजर पहाटे पाचला देवळालीहून सुटत होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना भुसावळला दुपारी बाराच्या आत पोहचता येत असे. नवीन मेमूला जादा भाडे व नवीन वेळेमुळे असल्याने प्रवास करावा लागणार आहे.ही गाडी मेमू एक्स्प्रेस मनमाड जंक्शन, पानेवाडी, नांदगाव, न्यायडोंगरी इथे थांबणार आहे. गाडीचे वेळापत्रक असं देवळाली - भुसावळ गाडी. (११११३)  - मनमाड सकाळी - ८.३०, पानेवाडी- ८:४४, नांदगाव -९.०३, न्यायडोंगरी-९:१९ वाजता तर गाडी.११११४ भुसावळ - देवळाली कडे - न्यायडोंगरी- रात्री ७:५९, नांदगाव-८:१८, पानेवाडी-८:३४, मनमाड जंक्शन- ८:५० असेल.

मालेगांव - नांदगाव बससेवेत असलेल्या त्रुटी तात्काळ दुर करा , नांदगाव व्यापारी संघटनेची बस आगार व्यवस्थापकांना निवेदन,


  नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील  व्यापारी संघटनेने  नांदगाव बस आगार व्यवस्थापकांना निवेदन केले आहे की, मालेगांव येथून सायंकाळी ७ वाजेनंतर नांदगाव शहरात येण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्याने, व्यापारी, दैनंदिन प्रवाशी आदींची अतोनात गैरसोय होत आहे. सात वाजेनंतर अशा प्रवाशांना मनमाड मार्गे नांदगाव येण्याची वेळ आगार प्रशासनाने आणलेली आहे. ही बाब मोठी खर्चिक व अन्याय कारक आहे. यांमुळे बस प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे.  कोविड च्या स्थितीत बससेवा कमी होणे स्वाभाविक होते. परंतू आता पुर्ववत रात्री ७.३० व ८.४५ या वेळेत सुरू असणारी मालेगांव नांदगांव बससेवा विना विलंब दसरा दिवाळी पुर्वीच पूर्ववत न झाल्यास २ ऑक्टोंबरला २०२२ रोजी बस स्थानकासमोर "रास्ता रोको" आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी व तात्काळ बससेवा पुर्ववत करावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली. कोविड १९ च्या आपत्तीनंतर नांदगाव आगाराने किती बससेवा पुर्ववत केल्या व किती बससेवा अजुनही बंद आहेत याची माहिती द्यावी  अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. निवेदनावर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश  कळंत्री, सेक्रेटरी विजय चोपडा,  उपाध्यक्ष बाळासाहेब  कवडे उपाध्यक्ष प्रदीप सिसोदिया यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

नांदगावमध्ये दोन पोलिस कर्मचारी ३५ हजारांची लाच घेताना सापळा रचून पकडले, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई,


नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव पोलिस ठाण्यात बेकायदेशीर वाळू वाहतुकीसाठी जमा केलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून 'हॅश व्हॅल्यू' मार्गाचा अवलंब करून पकडले. दोन वेळेस सापळा रचला. मात्र, दोन्ही वेळेस प्रत्यक्ष देवाणघेवाण झाली नाही. मात्र, 'हॅश व्हॅल्यू'चा उपयोग करून गुन्हा नोंदविण्यात आला. हवालदार सुरेश सांगळे (वय ५४),   पोलिस शिपाई अभिजित उगलमुगले( वय २९ )यांच्यावर कारवाई करण्यात आली. २७ जुलैला लाचेची मागणी पंचासमक्ष केली होती. उगलमुगले यांनी सांगळे यांना लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिले, म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई केली.

Wednesday, September 14, 2022

नांदगाव ते भालूर बससेवा सुरू , बसचे वेळापत्रक बदलण्यासाठी युवासेनेतर्फे डेपो मॅनेजर ला निवेदन, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवावी,

नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव ते भालुर मार्गावरील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करणे व बसचा वेळ बदलणे बाबत आज युवासेनेतर्फे  डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की युवासेना शाखा भालुर तर्फे आपणास निवेदन देतो कोविड १९ लॉकडाऊन मध्ये १:३० वाजता नांदगाव ते भालुर बस चालू होती ती बंद झाली होती. पण लॉकडाऊन उघडुन खूप दिवस झाले आहे पण बस सेवा अजून सुरू झालेली नाही त्यामुळे नांदगाव ते भालुर मार्गावरील सर्वच नांदगाव कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होतेय व दुपारी ३ वाजता जी बस आहे तिचा वेळ नांदगाव वरून ४ वाजता करावा कारण काही विद्यार्थ्यांचे कॉलेज ३ ला सुटते त्यामुळे त्यांना ती बस मिळत नाही . त्यामुळे त्यांना इतर वाहनांच्या साह्याने यावे लागते मुलींना कधी कधी ५-६ किमी पायी यावे लागते तरी आपण आम्हाला सहकार्य करावे. ह्या पैकी भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्या कडे निवेदन हि दिले होते पण त्याची दखल घेतली गेली नाही. तरी आम्ही आपणास कळकळीची विनंती करतो की आपण आमच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी, असे निवेदन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता, युवासेना भालुर तर्फे आदेश शिंदे व सौरभ निकम उपस्थित होते. त्यासोबत विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी चे पत्र होते.

Tuesday, September 13, 2022

माजी नगरसेवक दिवंगत इकबाल दादा शेख कोचिंग क्लासेस मार्फत शिवण मशिन व मेहंदी क्लासचे १०० प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव भूमीचे सुपुत्र दाऊद  शेख यांच्या विशेष प्रयत्नातून  शहरातील अल्पसंख्याक वस्ती गुलजार वाडीत  मुस्लीम समाजाच्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना तसेच माता भगिनींना काही व्यावसायिक कला  कौशल्य शिवण मशिन, मेहंदी क्लास सुरू केलं होतं. क्लासचा उद्देश असा होता त्यांना आपल्या पायावर उभे राहता येईल आत्म सन्मानाने जगता येईल याचं भावनेने दाऊद भाईंनी आपल्या खिशातून पैसे लावून  या समाजाला आपण काही देणे लागतो हीच भावना मनात ठेवून आपल्या स्वताच्या नावाला मागे ठेउन  आपण ज्यांना आदर्श मानतो असे दिवंगत इकबाल दादा शेख यांच्या नावाने जेणे करून त्यांच्या आत्म्यास ही पुण्य लाभेल या पवित्र हेतूने दिवंगत इकबाल दादा शेख या नावाने कोचिंग क्लासेस अंतर्गत शिवण क्लास व मेहंदी क्लासचे  अत्यंत यशस्वीरित्या चालवून आज प्रशिक्षण पूर्ण झाले. ज्यांनी कोर्स पूर्ण केलं चेहऱ्यावर हास्य दिसुन येत होते.  यात जवळ पास १०० माता भगिनींना शिवण क्लास व मेहंदी क्लासचे प्रमाणपत्राचे वाटप करून सांगता केली. समाजातील अनेक मान्यवरांनी दाऊद शेख यांच्या भावना समजून त्यांना साथ दिली. कार्यक्रमाचे आयोजन  याकुब  शेख अध्यक्षतेखाली तसेच महिला जिल्हा मुस्लीम उत्कर्ष समिती अध्यक्षा फरिदा काझी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दाऊद शेख यांचे मित्र मोहसीन खाटीक,शरीफ शेख , शाकीर पठाण, सफर भाई, बाबा भाई,जकी शेख, आवेस पठाण, सबदर भाई, फज्जू भाई, रफिक भाई, वसीम शेख इत्यादींनी प्रयत्न केले.

न्यायडोंगरी मध्ये चक्क पाणीचे टाकीत पाच फूटांचा कोब्रा , बिनविषारी तस्कर साप आणि घोरपड आढळली,


 
 न्यायडोंगरी(प्रतिनिधी)-  नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी इथं भूषण बत्ताशे यांच्या घराचं काम चालू असताना भूषण यांना पाण्याची टाकी मध्ये आवाज आला त्यांनी टॉर्च लावून बघितलं तर भला मोठा कोब्रा जातीचा विषारी साप आढळला होता. दुसऱ्या टाकीत पांढऱ्या टिपके असलेला साप दिसला. भूषण त्यांचे मित्र अनिल गायके यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला आणि घडलेला प्रकार सांगितला बडोदे तात्काळ न्यायडोंगरी ला घटनास्थळी पोहोचले .  पाण्याच्या टाकी मध्ये पाच फूट कोब्रा जातीच विषारी साप , त्याच्या खाली पाण्यात घोरपड दिसली. दुसऱ्या टाकीत तस्कर जातीचा बिनविषारी साप होता एक एक करून व्यवस्थित बाहेर काढले व बरणीत बंद केले . भूषण बत्ताशे परिवाराला भयमुक्त केल्याबद्दल सर्पमित्र विजय बडोदे यांच्या कार्याला शुभेच्या दिल्या आणि कोब्रा , तस्कर, घोरपड वनविभागात नोंद करून निसर्गसानिध्यात स्वाधीन केले.

Monday, September 12, 2022

नांदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने विविध मागण्या साठी तहसीलदार यांना निवेदन,

     नांदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन नांदगाव  तहसीलदार यांना देताना


नांदगाव ( प्रतिनिधी) -  संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लम्पि जनावरं वर येणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत  असून हा गोधना वर येणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मुळे गोधनावर मोठं मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून शेतकऱ्यांना या रोगा संदर्भात योग्य मार्गदर्शन व प्रतिबंध उपाययोजना व लसीकरण व्हावेत या   पशुरोगावर तालुक्यातही पशुवैद्यकीय सुस्त यंत्रणा चुस्त दुरुस्त  करण्यात यावी व सातत्याने कांद्याच्या च्या भावात घसरण झाल्याने व उत्पादन खर्चा एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .  कांद्याच्या कोसळले  भावात शेतकऱ्यांना त्वरित किंट्टल मागे २०००₹ रुपयाचे अनुदान देण्यात यावे तसेच योग्य माफक भाव मिळावे म्हणून भाव वाढीसाठी शासनातर्फे उपाय योजना करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी हे निवेदन नांदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने नांदगाव तहसीलदार यांना देत तरी शासन व प्रशासनाने या बाबीची योग्य व गंभीर दखल घेऊ शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती करण्यात आली आहे.
     याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश धात्रक , उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, तालुका प्रमुख संतोष गुप्ता, उप.ता. शशीकांत मोरे, दिनेश केकान, लिकायत शेख, अनिल दराडे, स्वराज देशमुख,  विजय मिश्रा , राजाभाऊ आहेर, शैलेश सोनवणे ,प्रमोद पाचोरकर  ,संजय पवार ,सागर सांगळे, प्रवीण धकराव, दिलीप नंद ,अशोक चोळके, मुराद शेख संजय बच्छाव, सनी फसाटे, निवृत्ती गुंजाळ, रामकृष्ण शिपणकर ,लक्ष्मण झाडे, मधुकर झाडे, मधुकर सानप, दत्तातय चोळके ,न्यानेश्वर पवार, आदींची उपस्थिती होती.

Friday, September 9, 2022

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीतकांड प्रकरणी तिनही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा,

 मनमाड( प्रतिनिधी) - महाराष्ट्र सह देशाला हादरवून सोडणाऱ्या मनमाड जवळील पानेवाडी शिवारात अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या अंगावर रॉकेल टाकून जळीतकांड घटना घडली होती. या जळीतकांडाची सुनावणी न्यायालयात पार पडली. यात मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी यशवंत साेनवणे जळीतकांड खटल्यातील तीन आराेपींना मालेगाव अपर व सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इतर दाेन गुन्ह्यांमध्येही तिघांना दाेषी ठरवण्यात आले. घटनेच्या ११ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. राजेंद्र देवीदास शिरसाठ ऊर्फ राजू, मच्छिंद्र पिराजी सुराडकर ऊर्फ कचरू व अजय मगन साेनवणे (सर्व रा. मनमाड) अशी शिक्षा सुनावलेल्या नावे आहेत. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी २०११ रोजी मनमाडजवळील पानेवाडी शिवारात इंधन भेसळ अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेले यशवंत साेनवणे यांना पाेपट शिंदे व त्याच्या साथीदारांनी अंगावर राॅकेल टाकून जिवंत जाळण्यात आले  हाेते. यात मुख्य संशयित पाेपट हादेखील भाजला ,  काही दिवसांनी मुंबईत उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणात मनमाड पाेलिसांनी पाेपट शिंदे, कुणाल शिंदे, विकास शिंदे, दीपक बाेरसे, राजेश शिरसाठ, सीताराम भालेराव, मच्छिंद्र सुराडकर यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला हाेता. कुणाल शिंदे अल्पवयीन असल्याने त्याचा खटला बालन्यायालयात सुरू हाेता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने या खटल्याचा तपास सीबीआयकडे साेपवला हाेता. सीबीआयने तपास पूर्ण करत तिघांविराेधात आराेपपत्र दाखल केले हाेते. खटल्याच्या सुनावणीत अपर व जिल्हा सत्र न्यायाधीश डी. वाय. गाैड यांनी तिघांना दाेषी ठरवले.
   खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मठेप व दाेन हजार रुपये दंड, सरकारी कामात अडथळा आणल्याने दाेन वर्षे कारावास, हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावास, धमकावल्याच्या आराेपाखाली सात वर्षे शिक्षा तसेच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कैद अशी शिक्षा दोषींना सुनावण्यात आली.  सीआयडीचे वकील नमाज चालन यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. आरोपींच्या वतीने वकील राहुल कासलीवाल व सागर गरुड यांनी काम पाहिले.


नांदगावात आम आदमी पक्षाचा मेळावा, आगामी होणाऱ्या आप पक्ष सर्व निवडणुका लढवणार ,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील  गुप्ता लॉन्स इथे आम आदमी पक्षाकडून मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आपचे जिल्हाउपाध्यक्ष विशाल वडगुले, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम निर्भवणे यांनी दिली आहे.  आगामी होणाऱ्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील सर्व निवडणुका आम आदमी पार्टी लढवणार असून, त्यासाठी आपण पक्षाने कंबर कसली आहे. सर्व निवडणूकच्या तयारीचा भाग म्हणून आपने नाशिक जिल्हा समितीच्या वतीने राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्य सचिव धनंजय शिंदे, माजी उत्तर महाराष्ट्र सचिव, जिल्हा अध्यक्ष नाशिक महापालिका समन्वय समिती सदस्य अॅड. प्रभाकर वायचळे हे दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ला नांदगाव येथील गुप्ता लॉन्स च्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. आम आदमी पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून निवडणुकीची घोषणा करणार आहे.  येत्या काळात महाराष्ट्रात सर्वच निवडणुका आम आदमी पार्टी लढवणार आहे. यांचे केंद्र बिंदू दिल्ली व पंजाब मॉडेल वर असणार आहे. आपचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारत देशाला जगात नं.१ करण्याचा संकल्प केला आहे. पक्षाने दिल्ली, पंजाब मध्ये देखील मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत वैद्यकीय उपचार, महिलांना मोफत बस प्रवास, मोफत पाणी ही लोकउपयोगी कामे करून संपूर्ण भारताला एक कल्याणकारी कामे करण्याचे आदर्श मॉडेल दिलेले आहे. आम आदमी पार्टी च्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन पक्षाकडून करण्यात 
 आले आहे.

Tuesday, September 6, 2022

नांदगाव च्या अथर्वने बनवला हुबेहूब केदारनाथचा देखावा, सर्वत्र होतंय कौतुक,


नांदगाव ( प्रतिनिधी)  - आजकालच्या जगात सोशल मीडियाचा वापर कोण कसा करेल आणि कोण कसा हे काही सांगता येत नाही सोशल मीडिया जेवढे चांगले तेवढे वाईटदेखील आहे. नांदगांवच्या सातवीच्या अथर्वने याच सोशल मीडियाचा वापर करत प्रति केदारनाथ तयार केले आहे.थर्माकोल पुठ्ठा आणि कलर वापरत हुबेहूब केदारनाथ मंदिराचा देखावा केला आहे . केदारनाथ येथून खूप लांब असल्याने सर्वच जणांना दर्शनासाठी जाणे झेपत नसल्याने येथील नागरिकांना दर्शन घेता यावे अशी भावना अथर्वने बोलून दाखवली.विशेष म्हणजे या कामात त्याला कोणीही मदत केली नाही एकट्या अथर्वने आकर्षक, असा केदारनाथचा देखावा बनवला आहे.या छोट्या इंजिनिअरची अख्या नांदगांव शहरात चर्चा होत आहे.

Monday, September 5, 2022

नांदगाव च्या शासकीय आयटीआय ला एच.आर. हायस्कूल शाळेची भेट,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील एच.आर. हायस्कूल च्या विद्यार्थी यांनी शासकीय आय.टी.आय ला भेट दिली. नांदगाव येथील उर्दू एज्युकेशन सोसायटी संचलित एच.आर. हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय आय.टी.आय मधील तिथे चाललेले कोर्स बद्दल माहिती घेतली होती. शासकीय आय.टी.आय शिक्षकांनी तांत्रिक शिक्षण काय असते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या आयटीआय इमारत व प्रॅक्टिकल लॅब , कॅम्पस विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. यामुळे मुलांना याबद्दल आवड निर्माण झाली होती. यावेळी आयटीआय बद्दल माहिती देण्यासाठी प्राचार्य राठोड सर तर शिक्षकांचे मोलाचं सहकार्य लाभले , सोबत एच.आर. हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक शेख सईद सर, आरिफ सर, इस्त्राईल सर , जेबा मॅडम, समरीन मॅडम, इर्शाद सर , सज्जाद सर, मुसद्दीक सर , जावेद भाई यांची उपस्थिती होती.

नांदगाव रेल्वे स्थानकावर ६ गाड्याचा थांब्यासाठी आम्ही नांदगावकर यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा,



नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव रेल्वे स्टेशन वर रेल्वे थांब्यासाठी आम्ही नांदगावकर यांनी रेल्वे 
प्रशासनास निवेदन दिले होते. रेल्वे कडून अजूनही या संदर्भात चर्चा न झाल्याने आम्ही नांदगावकर यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे.रेल्वेने यावर उत्तर देणे अनिवार्य आहे. निवेदनात करण्यात आलेल्या ६ गाड्याचे थांबे अजूनही प्रलंबित आहेत. जो पर्यंत थांबे पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही नांदगावकर शांततामय मार्गाने रेल्वे प्रशासनाला जाग येई पर्यंत शांत बसणार नाही , अशी भुमिका घेतली आहे. रेल्वे च्या स्टेशन मास्तर व्दारे रेल्वे प्रबधक मध्य रेल्वे यांना निवेदन देत आहेत तरी आम्हाला लवकर न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनात पुढीलप्रमाणे गाड्या थांब्यासाठी - १) झेलम एक्स्प्रेस - ११०७७/७८, २ ) कामायनी एक्स्प्रेस-  ११०७१/७२ ३) ११०२५/२६- हुतात्मा एक्स्प्रेस, ४)जनता एक्स्प्रेस- १३२०१/०२, ५) कुर्शीनगर एक्स्प्रेस, ६) शालीमार एक्स्प्रेस- १८०२९/३०.
 आम्ही नांदगावकर यांनी येत्या ८ दिवसांत वरील गाड्याचे थांबे मिळावे , अन्यथा उपोषणे, आंदोलने या गोष्टीला भाग पाडायला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील , यांची नोंद घ्यावी इशारा देण्यात आला.

नांदगाव मधील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये " शिक्षकदिन" समारंभ साजरा


नांदगाव ( प्रतिनिधी)-    आज दि. ५ सप्टेंबर रोजी नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन उत्साहाने साजरा केला. या दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आखला होता. तो अत्यंत नेटकेपणाने पार पडला . शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेचे संपूर्ण कामकाज त्यादिवशी विद्यार्थ्यांनी सांभाळले. शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे पाठ घेतले. वर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तम सहकार्य दिले. मधल्या सुट्टीनंतर शाळेच्या प्रांगणात समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक देशमुख ,कोमल भावसार यांनी  सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले.  यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन शिक्षकांसाठी करण्यात आले होते. त्यामध्ये जिलेबी रेस, संगीत खुर्ची, लिंबू चमचा. वकृत्व स्पर्धा,समूह नृत्य  अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  मुख्याध्यापक श्री मनी चावला सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहित केले. प्रयत्न करत रहा यश हमखास मिळेल असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी केक कटिंग करण्यात आले.
      सर्व विद्यार्थीना व शिक्षिकांना संस्थेचे चेअरमन श्री. सुनीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल,सर्व पदाधिकारी,प्रशासन अधिकारी  प्रकाश गुप्ता,  प्रिन्सिपल मनी चावला  शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक पुनम सुराणा व वीरा पाटणी यांनी केले.

Saturday, September 3, 2022

नांदगाव शहराचा पाणीपुरवठा ५ दिवसाआड, शुद्ध करण्याची मागणी,


नांदगाव (प्रतिनिधी)- नांदगाव शहरात पाण्याचा पुरवठा तब्बल १० ते १५ दिवसानंतर होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय  होत आहे . ईतका लांबणारा पाणी पुरवठा ५ दिवसाआड व शुद्ध स्वरूपात करावा अशी मागणी पत्राव्दारे शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी नगरपरिषदला केेेेली आहे.  शहराचा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात आपल्याच काळात पाच दिवसाआड व शुद्ध स्वरूपात होत होता. नागरिकांना पाणी पुरवठा अशूद्व स्वरूपाचा होत असून ,  सणासुदीच्या दिवसांत पाणी पुरवठा करण्याची विनंती नांगरिक करत आहे.  पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या मागणीसाठी प्रत नांदगाव तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेली आहे.

Friday, September 2, 2022

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मधिल विद्यार्थ्यांचीअत्याधुनिक शेतीला फार्मला भेट


नांदगाव (प्रतिनिधी ) - नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव यांची शेतात प्रत्यक्ष भेट दिली . आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सरिता बागुल  रेनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी मॅम यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली.
  नविन शैक्षणिक वर्षात 30 ऑगस्ट रोजी शाळेच्या मुख्याध्या सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी दहेगाव येथिल प्रगती शील शेतकरी शंकर विठ्ठल शिंदे (सर) यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट दिली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शेतीची तसेच तेथील कार्यपद्धती याची माहिती असणे आवश्यक आहे. फक्त पुस्तक किंवा चित्रांवरुन माहिती सांगणे, हे मुलांच्या जास्त लक्षात आले नसते. त्यामुळे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मुले जेव्हा बघतात, तेव्हा ते त्यांच्या जास्त स्मरणात राहतात. म्हणूनच मुलांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी ही प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यात आली. सर्वप्रथम शेत, शेतातील पिके, ट्रॅक्टर, तेथील जनावरे, शेती करण्यासाठी लागणारी अवजारे यांची माहिती देण्यात आली. निसर्गरम्य वातावरणात ही भेट अत्यंत आनंददायी ठरली.
मुले फुलपाखरांसारखे इकडे तिकडे बागडत आनंद व्यक्त करत होती.योगेश शिंदे व योगिता शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सर्व शेती दाखवून त्याबद्दल मुलांना सर्व माहिती सांगितली. तसेच त्यांच्याकडून सर्व मुलांना खाऊ चे वाटप करून मुलांचे कौतुक करण्यात आले.
ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात रेनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी रुपाली शिंदे एडना फर्नांडिस,मोनाली गायकवाड सुषमा बावणे चैताली अहिरे पूजा पवार रोहिणी पांडे तसेच मदतनिस वैशाली बागूल, रविंद्र पाटील तसेच ड्रायव्हर मंगेश शिंदे, विनोद चौधरी, बाळू गायकवाड, सागर कदम, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल यांनी अतोनात मेहनत घेऊन आजची ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात आली.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...