Saturday, June 18, 2022

नांदगाव च्या एच.आर. हायस्कुल उर्दू माध्यमाचा १००% निकाल, आयशा आरीफ खान ९०.८०% मिळवून शाळेत आली प्रथम

      प्रथम - आयशा आरीफ खान (९०.८०%)
     द्वितीय - कुरैशी यशफीन एजाज   (९०.२०%)     
        तृतीय - खदीजा मोहम्मद मुबीन (८९.८०%) 

नांदगाव( प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य एस.एस.सी मार्च-२०२२ ला घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा बोर्डाकडून नुकताच अॉनलाईन पध्दतीने निकाल लागला. ना़ंदगावच्या उर्दू एज्यूकेशन सोसायटी नांदगाव संचलित एच.आर.हायस्कुलने दर वर्षी प्रमाणे यंदा ही चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
   एस.एस.सी. बोर्डची दहावीची  परिक्षा एच.आर.हायस्कुल मध्ये मार्च- २०२२ मध्ये झाली होती.   या परिक्षेमध्ये एकुण ४५ विद्यार्थी बसले होते. त्यात २८ विद्यार्थी डिस्टिंगशन  मध्ये तर १६ विद्यार्थी हे प्रथम  श्रेणीत उतीर्ण झाले. शाळेतील विद्यार्थींनी आयशा आरीफ खान हीने ९०.८०% प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक कुरैशी यशफीन एजाज ९०.२०%, तृतीय क्रमांक खदीजा मोहम्मद मुबीन ने ८९.८०% मिळवला आहे.  
या निकालामुळे विद्यार्थी , पालक, आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
     एच.आर. हायस्कूलचे मुख्याध्याक शेख सईद सर , शिक्षक वृंद यांनी सर्व विद्यार्थ्याना व पालकाना शुभेच्छा दिल्या. त्यांनी भविष्यात चांगल्या निकालाची ईच्छा ही व्यक्त केली.

Friday, June 17, 2022

नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालयाचा १० वी परिक्षेचा १००% निकाल

    प्रथम रितुजा भारत काकळीज (९२. ४०%)
    
        द्वितीय यशस्वी  चव्हाण (९१ . ४०%)


नांदगाव (प्रतिनीधी)- नांदगाव तालुक्यातील  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालयातील ५७ विद्यार्थी १० वी एस एस सी बोर्डाच्या परिक्षेस बसले होते . विद्यालयाचा निकाल १०० % लागला असून रितुजा भारत काकळीज ९२. ४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रंमाक तर  यशस्वी  चव्हाण  ९१ . ४० टक्के  मिळवून द्वितीय क्रंमाक ,  स्नेहल चव्हाण ८९ . ४० टक्के मिळवून तृतीय क्रंमाक घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील ३८ विद्यार्थी विशेष श्रेणीत' १६ विद्यार्थी प्रथम  श्रेणीत '  ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उतीर्ण झाले .
  या सर्व  यशस्वी विद्यार्थाचे संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्रजी कलाल,  सचिव अश्विनीकुमार येवला , शालेय समिती अध्यक्ष उमाकांत घोंगाणे , व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशराम नागरे ,  मुख्याध्यापक संजय दिक्षित , वर्ग शिक्षक सुनील हिंगमिरे यांनी अभिनंदन केले.

नांदगाव शहरातील व्ही.जे. हायस्कूल १० वी चा निकाल ९६.२८ %, सिध्दीका वडगावकर ९७ टक्के गुण मिळून शाळेत प्रथम

    प्रथम ९७% गुण मिळवणारी सिध्दीका                       योगेशकुमार वडगावकर
      द्वितीय क्रमांक रोहन सुधाकर खैरणार           ‌           ( ९५.२०%)
.     तृतीय क्रमांक  खुशी प्रवीण निकम                         (९४.२०%)      

नांदगाव ( प्रतिनिधी  ) - नांदगाव शहरातील   व्ही.जे.हायस्कूल मधील २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील घेण्यात आलेल्या परीक्षेचा  मार्च २०२२ चा एसएससी निकाल नुकताच जाहीर झाला. या वर्षी ही चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .शाळेचा निकाल ९६.२८ टक्के लागला यात सिध्दीका योगेशकुमार वडगावकर ९७  टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे त्याच प्रमाणे रोहन सुधाकर खैरनार ९५.२०टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक तर खुशी प्रवीण निकम  ९४.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक  मिळविला आहे. तर चैताली प्रकाश जैन यांनी ९२.४०टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक  व आकांक्षा आशिष  रत्नपारखी  हीने ९२.२० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला.या वर्षी २५९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यातील १९ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले तसेच विशेष श्रेणीत १३२ विद्यार्थांनी उत्तीर्ण झाले.
     या सर्व यशस्वी विद्यार्थाचे संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्रजी कलाल, सचिव आश्विनीकुमार येवला, शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे  ,मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड , उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर , पर्यवेक्षक मनोहर शिंदे  ,टी.एम.भैय्यासाहेब चव्हाण ,भास्कर मधे, वर्ग शिक्षक  दिपाली सांगळे,गुलाब पाटील,सुभाष लाड,व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

नांदगाव तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयात रिक्तपदे, जनतेकडून पदांची त्वरित पूर्तता करावी अशी मागणी !

नांदगाव/ मनमाड (प्रतिनिधी )-  मराठीत एक म्हण प्रसिद्ध आहे "सरकारी काम अन दोन महिने थांब" या म्हणीचा प्रत्यय नांदगांव तालुक्यातील जनतेला येथे असलेल्या सगळ्याच कार्यालयात मिळत आहे.याचे कारण असे की येथे असलेल्या तहसील कार्यालयापासुन ते पोलिस ठाण्यापर्यंत या सर्वच ठिकाणी मंजूर असलेल्या पदसंख्येच्या निम्म्याहून जास्त पद हे रिक्तच आहे यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावी लागत आहेत यामुळे नागरिकांना वेळेत काम मिळत नसल्याने नाराजीचा सुर निघत आहे तर रिक्त असलेल्या पदांची त्वरित पूर्तता करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
         नांदगांव तालुक्यातील लोकसंख्या बघता येथे असलेल्या प्रत्येक शासकीय कार्यलयात आधीपासूनच मंजूर असलेली संख्या कमी आहे त्यात मंजूर असलेल्या संख्येच्या निम्मे पद हे रिक्त आहेत.यामुळे तहसील कार्यालयातुन मिळणारे शैक्षणिक दाखले,यासह विविध कामासाठी लागणारे दाखले दिलेल्या मुदतीत मिळत नाही यासह भूमिअभिलेख कार्यलय असो वा सरकारी दवाखाने किंवा नगर परिषद या सर्वच ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांची पदसंख्या रिक्त आहे.यामुळे कामांना गती मिळत नसुन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.जे अधिकारी कर्मचारी आहेत तेदेखील मनमानी पध्दतीने काम करत असल्याने प्रत्येक किरकोळ कामासाठी आता लोकप्रतिनिधी पर्यंत जाण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे.काही विभागाचे कर्मचारी हे भरतीच्या दिवसापासून प्रतिनियुक्तीवर नाशिक येथे काम करतात ते करतात की नाही हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.हे कुठेतरी थांबले पाहिजे योगायोगाने दिंडोरी लोकसभा मतदार संघात नांदगांव तालुका येत असल्याने या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार डॉ भारती पवार या केंद्रीय मंत्री आहेत तर दमदार आमदार सुहास कांदे हेदेखील कामाच्या बाबतीत गंभीर आहेत आता या दोघांनीच नांदगांव तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील रिक्त असलेली पदे भरुन तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
           
--------------------------------------------------------------
वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक...!
कोणत्याही शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असते यासाठी सरकारी योजेतून त्यांना शासकीय निवासस्थान असते यावर लाखो रुपये शासन खर्च करते मात्र तालुक्याचे दुर्दैव असेंकी येथील एकही अधिकारी हा मुख्यालयी राहत नाही आपत्कालीन स्थितीत येथे असलेल्या शिपाई किंवा क्लर्क यांना वेळ मारून न्यावी लागते.एकतर यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे किंवा यांना आजपर्यंत देण्यात आलेले विविध टीए डीए याची व्याजासकट वसुली करावी.
--------------------------------------------------------------
नांदगांव तालुक्यातील तहसील कार्यालयापासुन ते पोलिस स्टेशनसह सर्वच सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पद रिक्त आहेत,यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त पदभार देण्यात येतो यामुळे त्यांचे काम अर्धे अतिरिक्त पदभार असलेले काम अर्धे यामुळे नागरिकांचे काम प्रलंबित राहतात याचाच काही लोक फायदा घेऊन पैशाची मागणी करून गोरगरीब जनतेकडून पैसे घेऊन काम केली जातात हे कुठेतरी थांबले पाहिजे आम्ही स्वतः केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्याकडे तालुक्यातील सर्व रिक्त पद भरण्यासाठी निवेदन देऊ पद भरले म्हणजे नागरिकांना सुविधा मिळतील.
- जयकुमार फुलवानी, शहराध्यक्ष भाजपा.



--------------------------------------------------------------
नांदगांव तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयातील रिक्त पदसंख्या....
 ●कार्यालय नाव  ●मंजुर संख्या ●उपलब्ध ●रिक्त
नांदगांव तहसील        ४४         ३५       ०९
कार्यालय                    
______________________________________
पंचायत समिती         १०७६     ८१४     २६२
कार्यालय 
______________________________________
सार्वजनिक बांधकाम    १५      १२        ०३
विभाग 
______________________________________
मनमाड शहर पोलिस   १३२     ५४        ७८
स्टेशन  
______________________________________
नांदगांव शहर पोलिस     ५६     ३६       २०
स्टेशन
______________________________________
मनमाड नगर परिषद        ३०     १४      १६
______________________________________
नांदगांव नगर परिषद        १३     ०५     ०८
______________________________________
भूमिअभिलेख कार्यालय    २३     १६    ०७ 
______________________________________
नांदगांव तालुका वैद्यकीय    १२८  ६६   ६२
विभाग 
______________________________

Thursday, June 16, 2022

नांदगावमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तहसीलदारांना निवेदन,

नांदगाव (प्रतिनिधी) -  ओबीसी एम्पीरिअल डाटा समर्पित आयोगा मार्फत सदोष पध्दतीने होत असल्याबाबत समता परिषदे कडून तहसीलदारांना डॉ सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले.  त्यात म्हटले आहे कि सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाने महाराष्ट्रात बाठीया यांच्या अध्यक्षते खाली समर्पित आयोग गठीत करण्यात आला असून सदर आयोगाने ओबीसी एम्पिरिएल डाटा घरोघर जावून ओबीसी ची खरी आर्थिक, सामाजिक , राजकीय स्थितीची माहीती संकलीत होणे अपेक्षीत आहे. पंरतू आमचे असे निर्दशनास आले आहे की आयोग वरील पद्धतीने माहीती संकलीत न करता सॉफ्टवेअर द्वारे आडनावा नुसार सदोष पद्धतीने डाटा संकलीत करीत आहे. ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे. व यात ओबीसी समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे.
          म्हणून समर्पित आयोगाचे कामकाज त्वरीत थांबवून सदरचे काम तलाठी ' ग्रामसेवक ' आशा वर्कर' अंगणवाडी सेवीका यांचे मार्फत संकलीत करून शासना मार्फत सर्वोच्च न्यायलयात देण्यात यावा व ओबीसी समाजाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
मागणी पूर्ण झाल्यास  समता परिषद राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या निवेदनावर समता परिषद शहराध्यक्ष शिवा सोनवणे, दीपक भाऊ खैरनार, अशोक पाटील, महेश पवार, शंकर शिंदे, दया जुन्नरे, सुरेश गायकवाड, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, प्रतीक कोरडे, अरबाज शेख, सलमान पठाण, सागर शिंदे, सुरज कमोदकर, सचिन जेजुरकर, मोसिम शेख, सचिन सोमासे, सचिन देवकते, मुकुंद खैरनार, राहुल नाईक, भरत जाधव, राजूभाऊ लाठे, गौतम जगताप, बाळासाहेब महाजन, सुधाकर निकम, चिंधा बागुल, बाळासाहेब महाजन, प्रशांत पाटील, राजूव बागुल, बाळासाहेब खैरनार आदीच्या सह्या आहेत.

Wednesday, June 15, 2022

मांडवडच्या जनता विद्यालयात "विद्यार्थी प्रवेशोत्सव" उत्साहात साजरा, बस सेवा सुरु झाल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये आनंदाचे वातावरण


नांदगाव (प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यातील मांडवड मध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालयात "विद्यार्थी प्रवेशोत्सव"उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी नांदगाव बस आगाराच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी नांदगाव आगाराचे डेपो मॅनेजर विश्वासराव गावित व कंट्रोलर विनोद इपर यांच्या कार्यतत्परतेमुळे पहिल्याच दिवशी बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले. या प्रसंगी चालक खैरे व वाहक सोनवणे यांचा मांडवड ग्रामस्थ व जनता विद्यालय मांडवड यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.  विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक व गुलाब पुष्प देऊन नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, करून सदर कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नेते विठ्ठलआबा आहेर, शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा.माधव दादा काजळे , मांडवडे गावचे सरपंच  अंकुश डोळे, शिक्षणतज्ञ गावित , मुख्याध्यापिका  कांबळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक हेमंत परदेशी यांनी केले.

Tuesday, June 14, 2022

नांदगाव मध्ये तलाठ्याला लाच घेताना पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


नांदगाव (प्रतिनीधी) -  शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसाचे नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागणाऱ्या नांदगाव येथील शहरतलाठी युवराज मासाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मुद्देमालासह पकडले. तक्रारदाराने नांदगाव येथील तलाठी युवराज मासाळे यांच्याकडे शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, तलाठी मासाळे यांनी यासाठी त्यांच्याकडे पाच हजारांची मागणी केली व दोन हजार रुपये आगाऊ देण्याचे ठरले. तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार  दुपारच्या सुमारास  जुन्या तहसील कार्यालयातील तलाठी कार्यालयात नाशिक येथील पथकाने सापळा रचून तलाठी मासाळे यांना दोन हजारांची लाच घेताना .रंगेहात पकडले या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र पवार, हवालदार प्रकाश डोंगरे, पोलिस नाईक प्रणय इंगळे सहभागी झाले होते.

Monday, June 13, 2022

मनमाड नगर परिषद निवडणुकीसाठी महिला आरक्षण सोडत जाहीर, महिला आरक्षण झाल्याने अनेक भावी नगरसेवक नाराज..


मनमाड ( प्रतिनीधी) - आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी मनमाड  नगर परिषदच्या महिला आरक्षण सोडत आज पार पडली . मनमाडच्या एकूण 16 प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.अनेक ठिकाणी महिलांना आरक्षण मिळाल्याने विद्यमान आणि काही भावी नगरसेवकाचा हिरमोड झाला आहे.मनमाड शहरात नव्या प्रभाग रचनेत एकूण ३३ नगरसेवक  असणार आहेत.आज  प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.यावर तीन दिवसांत हरकती नोंदवण्याची मुदत आहे.आजच्या आरक्षणाचा अनेक मातब्बराना फटका बसला आहे.

   मनमाड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक   प्रभागनिहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे - 
(प्रभाग १)- १अ - सर्वसाधारण (महिला), 
 १ब- सर्वसाधारण ,
(प्रभाग २)- २अ- सर्वसाधारण (महिला),
 २ब- सर्वसाधारण,
(प्रभाग ३)- ३अ- अनुसुचीत जाती( महिला),
  ३ब- सर्वसाधारण,
(प्रभाग ४)- ४अ- अनुसुचीत जाती, 
  ४ब- सर्वसाधारण (महिला),
(प्रभाग ५)- ५अ- अनुसुचीत जाती(महिला)
  ५ब- सर्वसाधारण,
(प्रभाग ६)- ६अ- सर्वसाधारण(महिला)
  ६ब- सर्वसाधारण
(प्रभाग ७)- ७अ- अनुसुचीत जमाती(महिला)
   ७ब- सर्वसाधारण
(प्रभाग ८)- ८अ- अनुसुचीत जाती(महिला)
  ८ब- सर्वसाधारण
(प्रभाग ९)- ९अ- सर्वसाधारण(महिला)
  ९ब-सर्वसाधारण
(प्रभाग १०)- १०अ- अनुसुचीत जाती
  १०ब- सर्वसाधारण(महिला)
(प्रभाग ११)- ११अ- सर्वसाधारण(महिला)
   ११ब- सर्वसाधारण
(प्रभाग १२)- १२अ- अनुसुचीत जाती
  १२ब- सर्वसाधारण(महिला)
(प्रभाग १३)- १३अ- अनुसुचीत जमाती
  १३ब- सर्वसाधारण(महिला)
(प्रभाग १४)- १४अ- अनुसुचीत जाती
  १४ब- सर्वसाधारण(महिला)
(प्रभाग १५)- १५अ- अनुसुचीत जाती(महिला)
  १५ब- सर्वसाधारण
(प्रभाग १६)- १६अ- अनुसुचीत जाती(महिला)
  १६ब- सर्वसाधारण(महिला)
  १६क- सर्वसाधारण असे आहे.

नांदगाव नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

      प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करताना नियंत्रक अधिकारी तेजस चव्हाण,   

नांदगाव ( प्रतिनिधी)- आज आगामी निवडणुकीसाठी नांदगाव नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. निवडणुकीसाठी चिठ्ठया टाकून जागांचे आरक्षण निश्चत करण्यासाठी नांदगावच्या व्ही.जे.हायस्कुल मधील विद्यार्थीनी समृध्दी राजेद्र पाटील व यश उमेश चंडाले या मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण अनुसूचीत जातीकरीता ४ जागा राखीव असून तर १ जागा  अनुसूचीत जमातीसाठी, महिलासाठी १० राखीव ठेवण्यात आल्या. प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यासाठी नियंत्रक अधिकारी तेजस चव्हाण  उपस्थित होते. या आरक्षण सोडत, निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानूसार १ ते १० प्रभागाचे आरक्षण निश्चीत करण्यात आले. आगामी निवडणुकीत १० प्रभाग असुन यापुढे  नव्या प्रभागरचनेनुसार  नगरपरिषदेत २० सदस्यसंख्या असतील.  आधी सदस्यसंख्या १७ होती.  प्रत्येक प्रभागात दोन सदस्य निवडुन येतील. निवडणुकीसाठी असणारे आरक्षण जाहीर झाल्याने ईच्छुकांनी नेतेमंडळी कडे भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. महिलासाठी १० राखीव जागा असल्याने पुढील समीकरणे काय असेल येणारा काळ ठरवेल. 
    नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२२ चे आरक्षण पुढील प्रमाणे- 
(प्रभाग १) - १अ - अनुसुचीत जाती,
  १ ब- सर्वसाधारण (महिला),  
(प्रभाग २ )-२ अ - अनुसुचीत जाती, 
  २ब- सर्वसाधारण (महिला), 
(प्रभाग ३) ३अ- अनुसुचीत जाती(महिला),
   ३ब - सर्वसाधारण, 
(प्रभाग ४) - ४अ- सर्वसाधारण (महिला) , 
  ४ब- सर्वसाधारण, 
(प्रभाग ५)- ५ अ- सर्वसाधारण (महिला), 
 ५ब - सर्वसाधारण,
 (प्रभाग ६) - ६अ - सर्वसाधारण (महिला), 
 ६ ब - सर्वसाधारण , 
(प्रभाग ७) - ७अ-  अनुसुचीत जमाती, 
 ७ब - सर्वसाधारण (महिला) ,
 ( प्रभाग ८)- ८अ- सर्वसाधारण (महिला) , 
 ८ ब - सर्वसाधारण,
 (प्रभाग ९) - ९अ- अनुसुचीत जाती (महिला),   ९ब- सर्वसाधारण,
 (प्रभाग १०) - १०अ- सर्वसाधारण(महिला) ,   १०ब- सर्वसाधारण  अशी आहे.

Friday, June 10, 2022

नांदगांव मध्ये आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना निवेदन

नांदगाव ( प्रतिनिधी)- नांदगावमध्ये नाशिक जिल्हाधिकारी नांदगावच्या दोऱ्यावर आले असता,  नांदगांव मध्ये आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने  जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनण म्हटले की,"  गेल्या कित्येक वर्षापासून नांदगाव शहरांमध्ये 3 अंगणवाडी आहेत,  त्याची संख्या वाढवावी व पोषण आहार उपलब्ध करून देण्यात यावा.  नांदगाव शहरामध्ये अनुदानित शाळा फी च्या नावाने पालकांची लूट करत आहेत यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.  गेल्या दोन वर्षापासून खावटी योजनेचे फॉर्म भरलेले असताना देखील अजूनही काही आदिवासी बांधवांना खावटी योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या बांधवांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाल संगोपन योजना व संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणं लवकरात लवकर मंजूर करण्यात यावी तसेच रेशन कार्डधारकांना 12 अंकी नंबर देण्यात यावा जेणेकरून त्यांना धान्य मिळेल असे निवेदन मागणी करण्यात आली.
          जिल्हाधिकारीनी या सर्व विषयांवर अॅड. विद्या कसबे यांच्या सोबत चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले  यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते . या निवेदनावर एडवोकेट विद्या कसबे,  शबाना मंसूरी, छाया  आवारे, प्रतिभा पवार, राणी सोनवणे , अक्काबाई राजोळे, गीता शिंदे, नेहा कोळगे, प्रमिला माळी, आदींच्या सह्या आहेत.

मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी संबंधीत आरोपीवर गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन


नांदगाव ( प्रतिनिधी) - ईस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लालाहू अलैही व सल्लम यांच्याविषयी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या  नुपुर शर्मा यांनी वादग्रस्त विधानाचे पडसाद भारतासह जगात उमटले. मुस्लीम देशांनी देखील या बेताल ,भडकाऊ विधानाचा निषेध केला. भारताला ही याविषयी अनेक देशांना स्पष्टीकरण द्यावे लागले. आज नांदगाव मधील जामा मस्जिद कमीटी व समस्त मुस्लीम समाजाच्या वतिने शांततेच्या मार्गाने, कोणतेही घोषणा न देता पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. वादग्रस्त विधान करणारी नुपुर शर्मा वर तात्काळ दाखल करण्यासाठी नांदगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पैगंबर मोहम्मद सल्लालाहू अलैही व सल्लम यांच्याविषयी केलेल्या बदनामीकारक , तसेच तमाम मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी संबंधीत आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली गेली.               
     समस्त मानव जातीला शांततेचा, मानवतेचा संदेश देणारे प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लालाहू अलैही व सल्लम यांच्यबद्दल असभ्य, अत्यंत खालच्या पातळीवर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रवक्ते नुपूर शर्मा यांच्या विरुध्द नांदगांव शहरातील आसाबा कब्रस्थान ट्रस्ट,जामा मस्जिद ट्रस्ट कमेटी व तमाम मुस्लीम बांधवाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी फिर्याद नोंदविण्यात आली. आरोपीवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक शासन करण्यात यावे,  जर संबधित आरोपीवर कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन करण्यास भाग पडेल मग होणाऱ्या  परिणामास शासन जबाबदार राहील यांची नोंद घेण्यात यावी. यावर मुस्लीम समाजाने प्रतिक्रिया देताना, " अल्लाह पाक है और उसके रसूल पाक , नापाक लोगो के घटिया बातो से उन के घटीया सोच से अल्लाह और उसके रसूल के शान मे जररा बराबर कमी नहीं आनेवाली हमे सब्र से काम लेना चाहिये.
मुस्लीम समाजा वतिने मुस्लीम समाजाला शांतता राखावी असे आवाहन केले.
           तसेच आरोपीवर निवेदनावर मा. नगरसेवक याकुब शेख, रियाज पठाण, अकील टेलर, आयाज भाई शेख, साजीद तांबोळी,सय्यद सबदर, मौलाना सुलेमान,इत्यादी च्या सह्या असून निवेदन सादर करतांना सय्यद सबदर, आसिफ युसुफ शेख, मुश्ताक शेख, जावेद शेख, रफिक भाई, बाबा भाई (आरको) , मोबीन खान, बब्बु रिक्षा, अखलाक शेख, आसबा कब्रस्थान मस्जिद चे सर्व मौलवी साहेब उपस्थित होते.

Thursday, June 9, 2022

मनमाडला मॉन्सूनपूर्व पाऊसाने झोडपले, वादळी वाऱ्यामुळे रेल्वे रूळावर झाडे उन्मळून पडली

          - रेल्वे रूळावर पडलेले झाड

मनमाड( प्रतिनिधी)- मनमाड काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रेल्वे रूळावर झाडे उन्मळून पडली. विजेच्या कडकडाटासह पाऊसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मनमाडकर आधीच उकाड्यापासून हैराण झाले असताना , वादळीवाऱ्यामुळे झाडे विजच्या पोलवर पडल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुसाट वाऱ्यामुळे शाळेचे पत्रे उडून गेले. झाडे रेल्वे रूळावर पडल्याने ओरंगाबादकडे जाणारी रेल्वे वाहतूक धीम्या गतीने धावत होती. हवामान खात्याचे अंदाज खरे ठरल्याने मनमाडला सांयकाळी वादळी वाऱ्या, विजेच्या कडकडाटसह पाऊसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील इंडियन हायस्कुलचे पत्रे वाऱ्यामुळे रस्त्यावर येऊन पडले. तर औरंगाबादकडे जाणाऱ्या गाड्या तपोवन, संचखंड, जनशताब्दी एक्सप्रेस १ते २ तास उशिराने धावत होत्या. वादळी वारा , पाऊसामुळे नांदगाव - मनमाड रस्त्यावर असलेल्या बुरकुलवाडी सबस्टेशनकडून येणाऱ्या लाईनवरील अनेक पोल वाकले व पोल पडल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

Tuesday, June 7, 2022

कोब्रा जातीचा विषारी सापाचे सर्पदंश झालं तर तांत्रीक मांत्रिक कडे वेळ न घालवता हॉस्पिटल ला जा - सर्पमित्र विजय बडोदे


 नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथे गोविंद चांगदेव चोरमले यांच्या घरात रात्री आठ वाजेच्या सुमारास घरात दरवाजा जवळ एका सापाने फन काडून बसलेला अवस्थेत घरातील लहान मुलांना दिसला आणि गोविंद चोरमले याना मुलांनी आवाज देई पर्यंत साप घरात पलंगा खाली जाताना दिसला. आणि  मांजरीचे दोन पिल्लू घरात होते एक मांजरिचा पिल्लू मेलेल्या अवस्थेत दिसल्याने चोरमले यांनी शेजारी न्यानेश्वर मोरे यांना बोलावलं आणि घडलेला प्रकार सांगितला न्यानेश्वर मोरे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला. बडोदे घटनास्थळी पोहोचले आणि साप शोधलं साप कोब्रा जातीचा विषारी साप होता. तो वेवस्तीत बाहेर काढलं आणि बरणीत बंद केलं आणि थोडक्यात माहिती दिली आता पावसाळा सुरू होत आहे काळजी घेणे खूप महत्वाचे या दिवसात पाणी पडलं का पाणी बिळात शिरत आणि साप बिळातून बाहेर पडतात . तर आपण जमिनी वर झोपणे टाळा आणि घराच्या अवतीभवती कचरा व विटांचा दगडाचा ढीग करू नका स्वच्छता ठेवा हा कोब्रा जातीचा विषारी साप होता सर्पदंश झालं तर तांत्रीक मांत्रिक कडे वेळ न घालवता हॉस्पिटल ला जा वेळेवर उपचार मिळाले नाही तर जीव गमवावा लागतो अशी माहिती देऊन चोरमले परिवाराला भयमुक्त केल बद्दल गोविंद चोरमले परिवार व स्थानिक लोकांनी सर्पमित्र विजय बडोदे यांचे आभार मानले.

Monday, June 6, 2022

नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथे विज पडून एका व्यक्तीचा मृत्यू तर दोन जनावरे दगावली


नांदगाव( प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यात सध्याकाळी ढगाळ वातावरण झाल्याने मॉन्सून पूर्व पाऊसाला सुरुवात झाली. नांदगाव तालुक्यातील तळवाडे  येथे विज पडून शांताराम सखाहारी निकम यांचा मृत्यू व दोन बैलाचा दगावल्याची घटना घडली . नांदगाव तालुक्यात सोमवारी सायंकाळी अनेक भागात वादळी वारा आणि वीज पडल्याची घटना घडली.शांताराम निकम हे दोन बैल घेऊन जात असताना, तळवाडे येथे विज पडून शांताराम सखाहारी निकम यांचा मृत्यू तर त्याचे दोन बैल दगावल्याची दुर्देवी घटना घडली. मान्सून पूर्व पाऊस सध्या काही भागात वादळी वा-यासह विजांचाही कडकडाट झाला.

Thursday, June 2, 2022

मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी आम आदमी पार्टीत सक्रिय पक्ष प्रवेश


मनमाड ( प्रतिनिधी) - मनमाड रेस्टाहाऊस येथे मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी आम आदमी पार्टी सक्रिय पक्ष प्रवेश घेतला. उत्तमराव निरभुवने जिल्हा उपाध्यक्ष  व वडघुले विशाल जिल्हा उपाध्यक्ष यांनी सर्व कार्यकर्ताना टोपी घालून पक्षात सहभागी करून घेतले व मनमाड नगरपालिका निवडणूक समोर ठेवून जनतेचे प्रश्न मार्गी लावूया  व जनते साठी मनमाड साठी काम करूया.
या प्रसंगी मानवता फाऊंडेशन मनमाड च्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत आव्हाड,आशोक पगारे,चंद्रकांत आहीरे, सुरज पगारे, आरूण धिवर,प्रकाश पगारे, आषिश पवार, अन्सार पठाण, ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते त्या प्रसंगी  आप जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव निरभुवने याचा वाढदिवस पण मानवता फाउंडेशनच्या वतीने साजरा करण्यात आला..

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...