Friday, December 30, 2022

नांदगाव च्या कनिष्ठ महाविद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद,

   छायाचित्र - सुहास पुणतांबेकर


नांदगाव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय कबड्डी स्पर्धा दि. ३० डिसेंबर रोजी नाशिक विभागीय क्रीडा संकुल हिरावडी , पंचवटी येथे संपन्न झाल्या आहेत. ह्या स्पर्धेत जिल्ह्यातून सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयच, तालुक्याचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ज्यु. कॉलेज नांदगाव च्या १७ वर्षे वयोगटातील मुलांनी प्रथम , व्दितीय व तृतीय फेरीत विजयी होऊन अंतिम सामन्यात निफाड संघासमवेत झालेल्या चुरशीच्या सामन्यात नांदगाव ज्युनियर कॉलेजचा निसटता पराभव झाला. या स्पर्धेत नांदगाव कॉलेजच्या मुलांनी उपविजेतेपद पटकावून तालुक्यासह जिल्ह्यात महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. मागील दहा ते बारा वर्षांच्या कालावधीमध्ये नांदगाव महाविद्यालयचा संघ प्रथम अंतिम सामन्यात पर्यंत मजल मारल्यामुळे जिल्ह्यात सर्व ठिकाणी चर्चेचा विषय झालेला आहे. या कबड्डी संघामध्ये निखील कवडे ( संघनायक), भारत आयनोर , सागर चव्हाण, सिध्दार्थ जाधव, प्रशांत शेवाळे, करण राठोड , गौरव मोहीते, साहिल काजळे, गौरव काकड, अनिकेत काकड, साईल सोमासे, अजिंक्य धनगे इत्यादी खेळाडुंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. 
      कॉलेज च्या उपविजेता कबड्डी संघाचे नांदगाव तालुका म.वि.प्र. संचालक अमित बोरसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, तसेच विज्ञान विभागाचे इन्चार्ज प्रा. पी.एम. आहेर, ज्यु. कॉलेज चे उपप्राचार्य आर.टी.देवरे , मासुळे सर, चौधरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक , अभिनंदन करून विद्यार्थ्यांस प्रोत्साहित केले. या संघाच्या खेळाडूना योग्य व तांत्रिक मार्गदर्शन ज्यु. कॉलेज चे उपप्राचार्य डी. एम. राठोड यांनी केले. तसेच सिनीअर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक आर.डी.वडजे , शारीरिक शिक्षण विभागाचे दिलीप अहिरराव यांचे मार्गदर्शन लाभले होते.

विज्ञान हे सत्याच्या तथ्यावर आधारीत असते - ठकसेन गोराणे



नांदगांव (प्रतिनिधी) - आपला देश जर खऱ्या अर्थाने महाशक्ती व्हायचा असेल तर तो अंधश्रद्धा मुक्ती असावा लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा समाजच प्रगतीशील समाज असु शकतो. विज्ञान हे सत्याच्या तथ्यावर आधारीत आहे. असे अंनिस चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे म्हणाले. ते येथील 
  मविप्रच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात व न्यु . इंग्लिश स्कूल येथे अंनिसच्या वतीने आयोजित केलेल्या "वैज्ञानिक दृष्टिकोन चमत्कार सत्यशोधन प्रात्यक्षिक " सप्रयोग व्याख्यानात बोलत होते. यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य एन. बी. शिंदे ,प्रा देवरे,प्रा पवार,मारूती जगधने, प्रा सुरेश नारायणे,वामन पोतदार,भगिरथ जेजुरकर, आदी उपस्थित होते., आपन व्हाँटशाँप इनव्हॆरसिटीवर काम करतो यातुन पसरणाऱ्या अंधश्रध्दांना आळा बसण्यासाठी आपण अंधश्रध्दा निर्मुलनच्या माध्यमातून स्वागत करुन होणाऱ्या परिणामाला ब्रेक लावु या असे अध्यक्षिय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.शिंदे म्हणाले. यावेळी डाॅ गोराणे यांनी पाण्यावर दिवा पेटविणे, डोळे बंद करुन वस्तू ओळखणे, अग्नी पेटविणे, या सारखी अनेक सप्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर करुन विज्ञानाच्या कसोटीला उतरुया व होणाऱ्या परिणामाची चित्कीसा करु या तसेच होणाऱ्या चमत्कारामागील कार्य कारणभाव तपासून बघू या  असे डाॅ .गोराने यांनी विविध सप्रयोगाद्वारे स्पष्ट केले . दरम्यान न्यु. इंग्लिश स्कुलवरील कार्यक्रामात शेकडो विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करुन त्यामागील विज्ञानाच्या कार्यकारणभावाचे स्पष्टीकरण केले. या प्रसंगी मुख्याध्यापक डी. व्ही. गोटे, उपमुख्याध्यापिका काळे मॅडम, पर्यवेक्षक तुकाराम घुगे सर, विज्ञान शिक्षक अविनाश शेवाळे, प्रकाश फणसे, व न्यु.इंग्लिश स्कुलचे सर्व शिक्षक,शिक्षीका,तसेच सेवकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाविद्यालयात प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्य प्रा.आर.टी.देवरे,प्रा.बी.के.पवार, प्रा.बच्छाव,प्रा.आर.एल.दिवटे, प्रा.गढरी, प्रा.श्रीमती.झेड.बी.अन्सारी,प्रा.श्रीमती.शेवरे, व अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविद्यालयातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.के. पवार यांनी केले.

नांदगाव तालुक्यात नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणुक कार्यक्रम जाहीर, ३० जानेवारीला मतदान तर २ फेब्रुवारीला मतमोजणी !!



नांदगाव / मनमाड (प्रतिनिधी) - नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक जाहीर झाल्याने विभागात आचारसंहिता लागू झालेली आहे अशी माहिती उपायुक्त उन्मेष महाजन यांनी दिली. पदवीधर निवडणुकांसाठी मतदान ३० जानेवारीला तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नांदगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पात्र पदवीधर मतदार असुन त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदार संघात अनेक दिवसांपासून मतदार नोंदणी सुरू होती. पदवीधर झालेल्या मतदारांनी नोंदणी करण्यासाठी लागणारे कागदपत्र जोडून योग्य अर्ज भरला होता. त्यामुळे या सर्वांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे आहेत. त्यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारीला संपणार आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:- 

अधिसूचना जारी करणे (५ जानेवारी २०२३) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक (१२ जानेवारी २०२३) नामनिर्देशन पत्राची छाननी (१३ जानेवारी २०२३) उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक (१६ जानेवारी २०२३)  मतदानाचा दिवस (३० जानेवारी २०२३) मतदानाचा कालावधी (सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत )  मतमोजणी दिनांक (२ फेब्रुवारी २०२३)

मांडवडच्या जनता विद्यालयात " वार्षिक स्नेहसंमेलन" उत्साहाने साजरा,




 मांडवड, नांदगाव (प्रतिनिधी)  - नांदगाव तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित स्व.शरद अण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड शाळेत " वार्षिक स्नेहसंमेलन" उत्साहात साजरे करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे सभासद  प्रशांत  आहेर हे होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सरस्वती मातेच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका कांबळे एस.एस.यांनी शाखा राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.त्याबरोबरच शाखेचा शैक्षणिक आलेख चढताच आहे असे अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मविप्र संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित  बोरसे(पाटील) यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रमांची गरज असल्याचे नमूद केले. तसेच जर एखादा विद्यार्थी एखाद्या कला गुणांत सरस असेल तर अशा विद्यार्थ्यांचा संस्था विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक खर्च करत असल्याची माहिती ही अमित भाऊंनी दिली.खरी कला ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली असते असे गौरव उद्गार विविध ग्रामीण भागातील कलाकारांचे दाखले देत अमित भाऊंनी आपल्या भाषणातून मांडले. व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी तालुक्याचे जेष्ठ नेते रमेश अण्णा बोरसे व रमेश फोडसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच गावातून मविप्र संस्थेचे ज्येष्ठ सभासद रामराव मोहिते, वाल्मीक थेटे,  तसेच युवा उद्योजक सागर  आहेर,बापूसाहेब आहेर,  शिवबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक भाऊ निकम कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी अमित  बोरसे(पाटील)मित्र मंडळ मांडवडचे मविप्र सभासद प्रशांत आहेर व युवा उद्योजक सागरभैय्या आहेर यांच्याकडून शाळेसाठी विद्यार्थीहित लक्षात घेऊन दहा फॅन देण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक कलागुणांचे सादरीकरण केले.यामध्ये नृत्य,पोवाडा, कोळीगीते,नाटक,एकांकी अशा कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी,अंधश्रद्धे विषयी कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश दिला. सदर कार्यक्रमाला गावातून पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.यामध्ये विद्यार्थ्यांनाही पालकांकडून त्यांच्या कलाविष्कारासाठी कौतुकाचे थाप दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती बोरसे मॅडम, उपशिक्षक परदेशी एच.टी. संदीप आहेर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी.डी. गोटे , बी.जी.  रायते , श्रीमती एम .के.अहिरे , जे.सी. सौंदाणे , कवडे मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वडक्ते एस.के.यांनी केले. उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

नांदगाव तालुका काँग्रेस अध्यक्षपदी हरेश्र्वर खासेराव सुर्वे यांची निवड,



नांदगाव प्रतिनिधी -   नांदगाव तालुका नवं कांग्रेस अध्यक्षपदी हरेश्र्वर खासेराव सुर्वे यांची निवड माजी. आ. अॅड. अनिलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नवीन तालुका कांग्रेस अध्यक्षाचे सत्कार अँड. अनिलदादा आहेर , उदय पाटील, चांदोरा गावचे सरपंच प्रवीण घोटेकर, दर्शन आहेर, पुंडलिक सदगिर, अकील शेख आदींची उपस्थितीत मध्ये झाले. सत्कार करताना त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. याआधी मावळते तालुका काँग्रेस अध्यक्ष समाधान पाटील दोन टर्म ( सहा वर्ष) अध्यक्षपद भूषविले होते. पक्षाचे व समाजाची कामे योग्यरित्या केली अशी प्रतिक्रिया त्यांनी पदमूक्त होतांना दिली. 

Wednesday, December 28, 2022

नांदगाव ईथील कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू माधुरी ठोबरे हीची राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग व वुशु स्पर्धेसाठी निवड,



नांदगाव (प्रतिनिधी) -  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे तसेच नंदुरबार जिल्हा किडा अधिकारी व क्रिडा परिषद यांच्या संयुक्त विदयमाने विभागीय शालेय किक बॉक्सिंग आणि वुशू हया क्रिडा स्पर्धा दि. २०.१२.२०२२ आणि २२.१२.२०२२ रोजी संपन्न झाल्या. या विभागीय क्रीडा स्पर्धेत नांदगाव च्या   कनिष्ठ महाविदयालयाचा मुलीचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत माधुरी ठोबरे विजयी झाली प्रथम क्रमांकामुळे तीची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग व वुशु स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
     वरील खेळाडु विदयार्थिनीचे म. वि. प्र. संचालक अमित बोरसे यानी हार्दिक अभिनंदन केलं.  महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यानी विदयार्थिनी व पालकाचे सत्कार केला  विदयार्थिनीस पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व कनिष्ठ महाविदयालयातील जेष्ठ शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी विदयार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. खेळाडु विदयार्थिनीस योग्य व तांत्रिक मार्गदर्शन ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य व क्रिडा विभाग प्रमुख डी. एम . राठोड,  सिनिअर महाविदयालयाचे क्रीडा संचालक आर. डी. वडजे सरांचे मार्गदर्शन लाभले.

Saturday, December 24, 2022

नांदगाव येथील कासलीवाल विद्यालयात जल्लोशात ख्रिसमस सण साजरा, बाळगोपाळांनी परिधान केली सांताक्लॉजची वेशभूषा,



 नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव येथील  सौ. क. मा. कासलीवाल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयात जणू काही सांताक्लॉजच अवतरले होते. निमित्त होतं ख्रिसमसच शाळेत बालगोपाळांनी सांताक्लॉज च्या वेशभूषा परिधान केली होती. सांताक्लाॕज बनलेल्या विद्यार्थ्यांनी केक कापला व इतर विद्यार्थ्यांना केक व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. तसेच ख्रिसमसच्या गाण्यांवर छान नृत्य सादर केले.शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना फुगे वाटप करण्यात आले. शाळेत छान प्रकारे सजावट करण्यात आली होती सुंदर सजावट करून सुंदर ख्रिसमसचा सुंदर देखावा तयार करण्यात आला होता. व सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने व जल्लोषाने ख्रिसमस सणाचा खूप आनंद लुटला. 
     या कार्यक्रमास सांताक्लाॕज बनलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुनिलकुमार कासलीवाल ,सचिव विजय चोपडा, पी. पी. गुप्ता,सरचिटणीस प्रमिला कासलीवाल,संचालक महेंद्र चांदीवाल, तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल सावंत,व गोरख डफाळ, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक .किशोर बागले , यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ जगताप, ईश्वर फणसे, अभिजीत थोरात, विजय जाधव श्रीमती. धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, वैशाली शिंदे,जयश्री पाटील, मीना सुरळकर, शालिनी निकम, निकिता देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

नांदगाव मध्ये इकबाल दादा फाऊंडेशन तर्फे एकदिवसीय हृदयरोग तपासणी शिबीर संपन्न, अनेक रुग्णांनी शिबीराचे घेतला लाभ,



नांदगाव ( प्रतिनिधी)
-  दिवंगत इकबाल दादा शेख यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त  इकबाल दादा फाऊंडेशन, लोकमान्य हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबीराचे आयोजन आज शनिवारी दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ते दुपारी ३ वाजेपर्यंत नांदगाव शहरातील न्यु महाराष्ट्र टॉकीज कंपाऊंड ईथील माजी नगरसेवक दिवंगत इकबाल दादा शेख कोंचीग क्लास सेंटर इथं संपन्न झाले. या मोफत शिबीरात रुग्णांसाठी इ.सी.जी, शुगर व ब्लड प्रेशर तपासणी, २ डि. इको, अॅन्जिओप्लास्टी , अॅन्जिओग्राफी, बासपास तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. या सोबतच हृदयरोग संबंधित ( कार्डियाक) - छातीत दुखणं, हार्ट अटॅक आलेल्या रुग्ण, हायपर टेन्शन मधुमेह, दम लागणे, अॅन्जिओप्लास्टी अॅन्जिओग्राफी, पायांवर सूज येणे, धडधड होणे, बायपास सर्जरी रुग्ण, हृदयातील छिद्र व झडपांचे आजार इत्यादी तपासणीची सुविधा रुग्णांसाठी होती. रुग्णांच्या तपासणीसाठी नाशिक च्या लोकमान्य हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटल मधील कार्डियोलॉजिस्ट डॉ. निलेश तायडे, कार्डियोलॉजिस्ट डॉ. रोहीत ठाकरे, कार्डीअॅक सर्जन डॉ. निलेश पूरकर, कार्डीअॅक सर्जन डॉ. नितीन ठाकरे, स्त्री- रोग तज्ञ व फॅमिली फिजीशियन डॉ. सौ. किर्ती शिवम आहेर यांनी केले. नांदगाव शहरातील रुग्णांची आधी केस पेपर सह नांव नोंदणी करण्यात आली. यात एकुण ११८ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यात १५ रुग्णांना  पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलविण्यात आले. या रुग्णांना मोफत १२५०० रुपयाांच्या   हृदयरोग तपासण्या करण्यात येणार आहे. हे सर्व आयोजन इकबाल दादा फाऊंडेशन, दाऊद अ. गणी शेख व मित्र परिवारा तर्फे करण्यात आले होते. रुग्णांसाठी नांदगाव मध्ये अशा प्रकारचे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Thursday, December 22, 2022

नांदगाव येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी,



नांदगाव ( प्रतिनिधी) -  संत सावता महाराज मंदिर कम्पाउंड नांदगाव येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा  करण्यात आला.सकाळी संताजी महाराजांचा पूजा महाअभिषेक करण्यात आला , तद्नंतर  समाधान चौधरी यांचे होता संताजींचा माथा म्हणून वाचली तुकारामांची गाथा*या विषयावर प्रवचन झाले.सदर पुण्यतिथी सोहळ्या साठी नांदगाव शहरासह तालुक्यातून भरपुर समाज बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रांतिक कोषाध्यक्ष तथा नाशिक मनपा राष्ट्रवादी चे गट नेते गजानन शेलार,महासचिव डॉ.भुषण कर्डीले,नांदगाव नगर परिषेदेचे माजी नगराध्यक्ष अरुण पाटील,जिल्हा उत्तर विभागाचे अध्यक्ष ऍड.शशिकांत व्यवहारे,उपाध्यक्ष ऍड.बी.आर.चौधरी, डिंगम्बर नाना, बाळासाहेब वाघ, तालुकाध्यक्ष दत्तात्रय बत्तासे,तालुका युवा आघाडी अध्यक्ष संतोष गायकवाड,तालुका महिला आघाडी अध्यक्षा कुमुदिनी चौधरी,माजी नगरसेविका वनिता पाटील, जिल्हा उपाध्यक्षा ज्योत्स्ना सौंदाणे,शहर महिला आघाडी अध्यक्षा सरला चौधरी,युवा पदाधिकारी सुरज पाटील,राम देहादराय , युवा शहर अध्यक्ष कुणाल सौंदाणे, शहर सचिव योगेश वाघ,गणेश चौधरी,सुभाष उडकुडे, उमेश देहाडराय,पृथ्वी पाटील,किशोर सोनवणे,अक्षय सौंदाणे,शुभम् सौंदाणे इत्यादीउपस्थित होते.सदर कार्यक्रमात नांदगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदी अरुण पाटील यांची निवड झाल्या बद्दल गजानन नाना शेलार यांनी समाजाच्या वतीने सत्कार केला.  गजानन शेलार यांनी समाजाला एकत्रित येण्याचे भावनिक आवाहन करीत तरुण ही समाजाची मोठी ताकद असून तरुणांनी व्यसनाधीन न होता शिक्षण आणि व्यवसायाची कास धरून आपले भवितव्य उज्वल करावे व समजा पुढे कोरोना कालीन विवाह पध्द्तीचा आदर्श मांडत आगामी पालिका निवडणुकीत समाजाची साथ देण्याचे आवाहन केले नंतर डॉ. भुषण कर्डीले यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जिवन चरित्राचा इतिहास मांडत तेली समाजाचा देदीप्यमान गौरवशाली इतिहास व समाजात होऊन गेलेली महापुरुषांची ओळख करून देत शिक्षण व संघटनाचे महत्व विशद केले सदर प्रसंगी ऍड बी.आर. चौधरी व ऍड शशिकांत व्यवहारे 
यांनी मार्गदर्शन केले नंतर मान्यवरांच्या हस्ते कार्यकारणी पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप करीत शुभेच्छा देत जिल्हा सेवा आघाडी उपाध्यक्ष  पदी डॉ.प्रदीप चौधरी , जतेगाव व नांदगाव तालुका युवा आघाडी उपाध्यक्षपदी राम देहाडराय  यांची फेर नियुक्ती करण्यात आली तर तालुका उपाध्यक्ष म्हणून विनोद महाले नांदगाव यांची निवड करण्यात आली .नंतर संताजी महाराजांची महाआरती होऊन पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली. सदर सोहळ्या साठी शहरासह सम्पूर्ण तालुक्यातून जातेगाव,बोलठाण,ढेकू,न्यायडोंगरी,परधाडी,
पिंपरखेड,मनमाड,नस्तनपूर इत्यादी ठिकाणाहून समाज बांधव,युवा ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती कार्यक्रम सुत्रसंचलन समाधान चौधरी यांनी केले.

Wednesday, December 21, 2022

निधन वार्ता,


नांदगाव : येथील डॉ. सारंग यशवंत जाधव वय ३४ यांचे बुधवार (दि.२१) रोजी आकस्मित निधन झाले त्यांच्या पश्चात आजी, आई वडील, तीन बहीणी, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. शहरातील प्रतिथयश डॉ. वा.पी. जाधव यांचे पुत्र होत.

Tuesday, December 20, 2022

नांदगाव तालुक्यात १४ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाची सत्ता, विजयश्री उमेदवारांनी गुलाल उधळत केला जल्लोष,


 नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यात १५ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात  नांदगाव तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारराजाने प्रस्थापितांना 'दे चक्का' दिला आहे. निकाल लागलेल्या १४ ग्रामपंचायतीमध्ये आमदार सुहास कांदेनी (शिंदे गट) वर्चस्व सिद्ध केले आहे.
    महाविकास आघाडीतील घटकपक्ष बाजी मारतो की सत्ताधारी शिंदे गट आणि तसेच भाजप सर्वाधिक जागा जिंकते का याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. मंगळवारी निवडणुकीचा निकाल घोषित झाला. यामध्ये १५ पैकी १४ ग्रामपंचायतींवर सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदार सुहास कांदे गटाचा झेंडा फडकला आहे.
   पंधरा ग्रामपंचायतील नवसारी, शास्त्रीनगर, कसायखेडा या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे व काही ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडले होते. बारा ग्रामपंचायतीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. बहुचर्चित मूळडोंगरी ग्रामपंचायतीत भाजप पदाधिकारी असलेल्या मिथुन पवार यांच्या मातोश्री मूळडोंगरी ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
   परिवर्तन पॅनलचे सात उमेदवार निवडून आले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय पवार यांचे बंधू राजेंद्र पवार हे भाजपचे पदाधिकारी असले तरी त्यांनी समर्थन शिंदे गटाला दिले आहे. तालुक्यात सर्वाधिक लक्ष लागुन राहिलेल्या नागापूर ग्रामपंचायतीमध्ये
  थेट सरपंचपदाचे उमेदवार राजेंद्र पवारांनी पॅनलचे उमेदवार निवडून आणले तर माजी आमदार संजय पवार यांना फक्त एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीमध्ये भाजप माजी तालुकाध्यक्ष  बापूसाहेब जाधव यांच्या पॅनलचा पराभव केला. पिंपरखेड ग्रामपंचायतीमध्ये जीवन गरुड यांचे पॅनेलने सत्ता मिळवली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा एकतर्फी लागला असून आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली १४ ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गाला सत्ता मिळविण्यात यश मिळाले आहे. थेट जनतेतून सरपंच पदावर निवडून आलेले राजेंद्र पवार नागापूर, मंजूषा गरुड पिंपरखेड, सुनीता चव्हाण कसावखेडा, शरद काळे पोटाणे खुर्द समर्थकांनी गुलाब उधळत जल्लोष केला.
    भिका बिन्नर शास्त्रीनगर यांचेसह ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देशमुख, सुधीर देशमुख, अनिल काळे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विजयी सरपंच व सदस्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

विजयी सरपंच पदाचे उमेदवार असे (कंसात मते):- 
 सुनीता चव्हाण (बिनविरोध, कसाबखेडा), अशोक व्हगळ (बिनविरोध, नवसारी), भिका बिन्नर (बिनविरोध, शास्त्रीनगर), जनाबाई सुरेश पवार (८८७, मूळडोंगरी), राजेंद्र पवार (९०३, नागापूर), बिन्नर श्रावण (२८५, हिरेनगर), ज्योती निकम (६७३, लोढरे), अनिता मार्कड (३३४, भाडी), शीतल निकम (९०५ तळवाडे), मंजूषा गरुड (१३८०, पिंपरखेड), वचन शेरमाळे (४३५, बोयेगाव), मीराबाई उगले (१९३, लक्ष्मीनगर), शरद काळे (३८७ घोटाने, शांताराम पवार (६६२, हिसवळ), मनीषा वाघ (३५२, धनेर).

नांदगाव शहरातील व्ही. जे. हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाची उत्साहात सांगता,



नांदगाव ( प्रतिनिधी ) - शाळा नियमित विविध उपक्रम राबवीत असते यातून विद्यार्थाचा सर्वांगीण विकास साधत असते.आपल्या मुलाने विविध क्षेत्रात प्रविण्य मिळवावे हीच सर्व पालकांची इच्छा असते.विद्यार्थांनी आपला अभ्यास करता करता ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे आहे त्या क्षेत्राची माहिती घेऊन शालेय जीवनापासूनच त्यात प्राविण्य मिळविल्यास आपण जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन विकास काकडे यांनी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या . नांदगाव येथील व्ही.जे.हायस्कूल वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्सहात संपन्न झाले. या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळा स्नेह संमेलनानिमित्त कला,क्रीडा ,नाट्य ,तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.क्रीडा स्पर्धेत कबड्डी ,खो-खो सारखे विविध सांघिक ,वैयक्तिक व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले .सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यानी विविध नृत्य प्रकार सादर केले . वर्षभरात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध स्पर्धा ,परीक्षा यामधील यशाचे कौतुक व प्रोत्साहान देण्यासाठी स्नेहसंमेलनाचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला बक्षीसपात्र विद्यार्थांन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले.पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे उद्योजक तथा ना.शि.प्र.मंडळ,नाशिक संस्थेचे सदस्य विकास काकडे व अध्यक्ष स्थानी शालेय समिती अध्यक्ष तथा संकुल प्रमुख संजीव धामणे होते.
  सुरवातीला लेझीम पथक व एन.सी.सी. पथकाच्या विद्यार्थांनी पाहुण्याचे स्वागत केले.त्यानंतर सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांनी केले. प्रास्ताविकात शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती तसेच वर्षभरात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा व परीक्षेत मिळविलेले यश याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात संजीव धामणे यांनी शाळेतील विविध उपक्रमाचे कौतुक केले व आपल्या संस्कृती बरोबर आधुनिक युगाचा ध्यास धरणारी शाळा आहे अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचल प्रियंका पाटील यांनी केले पाहुण्याचा परिचय राजेश भामरे यांनी करून दिला व आभार उपमुख्याध्यापक दिपक बाकळे यांनी मानले. व शेवटी उत्कृष्ट ४ समूह नृत्याचे सादरीकरण करण्यात आले .
  या प्रसंगी शालेय समिती सदस्य मंदार रत्नपारखी ,मुख्याध्यापक मनोहर बडगुजर ,उपमुख्याध्यापक दिपक बाकळे ,पर्यवेक्षक मनोहर शिंदे ,अकॅडमीक बोर्ड सदस्य भैय्यासाहेब चव्हाण,भास्कर मधे,शिक्षक प्रतिनिधी सुनिता देवरे ,ज्ञानेश्वर डंबाळे तसेच पत्रकार ,तसेच शाळेचे माजी शिक्षक ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

नांदगाव शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी नगरपरिषद प्रशासनास निवेदन ,


   
नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगाव शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण व दुरुस्ती होण्याच्या संदर्भामध्ये आज संत सावता माळी युवक संघ नांदगाव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदगाव शहर व समता परिषद नांदगाव शहर तालुका यांच्यामार्फत नगरपरिषदेचे ओएस कुठे मॅडम व सानप साहेब यांना निवेदन देण्यात आले.
      मागणी चे  निवेदन देण्यासाठी संत सावता माळी युवक संघाचे तालुका अध्यक्ष नगरसेवक वाल्मीक टिळेकर, समता परिषद तालुका अध्यक्ष अशोक  पाटील, शहराध्यक्ष शिवा सोनवणे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष  गौतम जगताप , नगरसेवक नितीन जाधव,राजू लाठे,कचरू त्रिभुवन, श्रावण  आढाव, सुधाकर निकम, विलास कोतकर, राज पवार,विशाल पवार,शरद महाजन, प्रवीण टिळेकर, प्रवीण सोमासे, रवी सोनवणे, खलील शेख,शंकर शिंदे,पप्पू जेजुरकर, संजय पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Monday, December 19, 2022

नांदगाव च्या गुलजारवाडीतील नागरिकांशी अंजुम कांदे यांनी साधला संवाद,


 
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील  अंजुम कांदे यांनी गुलजारवाडीच्या नागरिकांशी  विविध समस्येवर संवाद साधला. यावेळी त्यांनी समस्येवर लवकरच निराकरण करण्याची ग्वाही दिली.  आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सुरू असलेला विकासात्मक सुसाट प्रवासा सोबतच सामाजिक जबाबदारी पाहता सांस्कृतिक सामाजिक आरोग्य संबंधित विविध उपक्रम सातत्याने सुरू आहेत.  जनतेला या आधी असे धडाडीचे नेतृत्व कधीच पाहायला मिळाले नाही आणि म्हणुच जनता मनोमन खुश दिसत आहे. अंजुम कांदे यांच्या नेतृत्वात महिला आघाडी मतदारसंघात विविध भागातील महिला वर्गास प्रत्यक्ष जाऊन भेटत आहेत आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देत आहेत यात स्वतः  अग्रेसर असतात. 
   अंजुम कांदे यांनी आज नांदगाव येथील गुलजार वाडी परिसरातील महिला, नागरिकांशी संवाद साधला. त्यांची अडीअडचणी समजून घेतल्या, लवकरच विविध समस्यांचे निराकरण केले जाईल असा शब्द ही दिला.
  या प्रसंगी शहर प्रमुख रोहिणी मोरे, समन्वयक भारती बागोरे, फरजाना मॅडम, रिजवाना शेख, महेजबिन निहाल शेख, रहेणुमा फाऊंडेशन चे आय्याज शेख व इतर सदस्यांसह परिसरातील बांधव भगिनी उपस्थित होत्या.

Thursday, December 15, 2022

नांदगावतील असंख्य कार्यकर्त्यांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश,


  नांदगाव (प्रतिनिधी)  -  आज येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी उपमुख्यमंत्री  छगन भुजबळ  तसेच जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पगार व तालुका अध्यक्ष विजु पाटील यांच्या उपस्थिती मध्ये नांदगाव शहरांमधील अरुण पाटील, काका सोळसे, सुभाष कवडे,फैसल शेख, सीमा राजोळे,जाहीर सौदागर, शरीफ  शेख, शाकीर  शेख,मोसिम खाटीक ,फैयाज शेख ,शाकीर पठाण , शरीफ शेख ,जावेद खान , नासीर पठाण ,मुज्जु शेख, यतीन शेख, आज्जु शेख , मोसिम् इकबाल शेख , महेश चौघुले ,दीपक सोनवणे , सोनू पेवाल, राम देहादराय ,सूरज पाटील , विलास राजोळे , सीमा राजोळे आक्काबाई सोनवणे , सुनीता घाडगे , कल्पना घाडगे , वैशाली कवडे, सागर खैरनार , उमेश देहाडराय , ऋषी तोरणे , पृथ्वी पाटील , नैतिक काकळीज, संकेत बिडवे , गणेश जाधव , महेश चौघुले , खांडेकर  इत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नांदगाव शहराध्यक्षपदी अरुण भाऊ पाटील, महिला शहराध्यक्षपदी सीमाताई राजोळे व अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी हाजी फैजल शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Monday, December 12, 2022

साकोरा गावात नमन एज्युकेशन संचलित लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सहल म्हणून वनभोजनाचे आयोजन,



साकोरा , नांदगाव (प्रतिनिधी)   -  नमन एज्युकेशन संचलित लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सहल म्हणून "वनभोजन"  आयोजित करण्यात आले. नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर , उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका  स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली वनभोजन आयोजित करण्यात आले.
       ही सहल साकोरा ( गव्हाळी ) काशिनाथ आनंदा सुरसे यांच्या शेतात आयोजित करण्यात आली होती. प्रथमत: चिमुकल्यांचे महेश सुरसे व  ज्योती सुरसे यांनी तिलक व पुष्प वर्षाव करून मोठ्या उत्साहात स्वागत केले.तसेच संस्थापक व संस्थापिका यांचे देखील श्रीफळ पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शेतात मुलांना पेरूच्या बागेत फेरफटका मारला .मुलांनी पेरूचा आस्वाद घेतला.सोबतच वनभोजन करण्यात आले.
               संस्थापकांनी सहली सोबत मुलांचे मनोरंजन व्हावे म्हणून जादूचा कार्यक्रम त्यांना दाखविण्यात आला.मुलांनी पण सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.सरतेशेवटी सहलीत सहभागी विद्यार्थ्यांना बागुल सर बागुल यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले.
            संस्थापक बागुल सर, संस्थापिका बागुल यांच्याहस्ते अभिजित आणि सहल आयोजक सुमनबाई सुरसे,महेश सुरसे ,राहुल सुरसे आणि परिवार यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यात लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले, अंकिता सरोदे, धनश्री न्याहारकर, पूनम सोमासे, विजेता पिलके, सुरेखा गायकवाड, नेहा पाटील,  वर्षा नगे, संदीप पांडे ,राहुल उपाध्याय ,मोहन सुरसे ,अनिता जगधने,  क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका सुषमा बावणे, एडना फर्नांडिस ,मोनाली गायकवाड,  जयश्री चौधरी, चैताली अहिरे ,रोहिणी पांडे, अश्विनी केदारे, अश्विनी पाटील, तसेच मदतनीस अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन शैक्षणिक सहल सुंदर रित्या पार पडली.

Sunday, December 11, 2022

मनमाडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस साजरा,


 मनमाड ( प्रतिनिधी) -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस मनमाड येथे महाविकास आघाडीच्या वतीने साजरा करण्यात आला. मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकार्याना आमंत्रित करून केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहराच्या वतीने आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्यास महाविकास आघाडीतील सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी तालुक्याचे माजी आमदार संजय पवार, मनमाड मार्केटचे माजी चेअरमन गंगाधर बिडगर, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जिल्हा नेते संतोष बळीद, तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, काँग्रेसचे जेष्ठ नेते रहेमान शाह, बाळासाहेब साळुंके आदींनी आपल्या मनोगतात शरद पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांना एकसंघ सामोरे जाण्याचा मनोदय व्यक्त केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी तर्फे सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हबीब शेख, विधानसभा संघटक महेंद्र परदेशी, युवक जिल्ह संघटक अमोल गांगुर्डे, मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक, हकीम शेख, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील वयोगेश जाधव, खजिनदार योगेश शिंदे, सेवादल शहर अध्यक्ष संदीप जगताप, युवक शहर उपाध्यक्ष जावेद शेख, श्रीराज कातकाडे, पवन अहिरे, ओबीसी शहर अध्यक्ष शुभम आहेर, अक्षय देशमुख, आनंद बोथरा, प्रतिक मोरे, आदींनी प्रयत्न केले.

Saturday, December 10, 2022

भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदगावात रॅली ,


  नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या पैठण येथील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी समता परिषद, रिपाई, बहुजन वंचित आघाडी, प्रबोधन मंच काँग्रेस, राष्ट्रवादीसह शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनाच्या वतीने रॅली काढून घोषणाबाजी व निदर्शने करीत आंदोलन केले. या वेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडो मारून घोषणाही देण्यात आल्या.
    चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली. येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी रॅली काढली. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंबेडकर चौकात निषेधपर जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी
शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, माजी सभापती डॉ. वाय. पी. जाधव, प्रा. रवींद्र सुरसे, वाल्मिक जगताप, माजी नगरसेवक नितीन , जाधव, अॅड. विद्या कसबे, अॅड. सचिन साळवे, मनोज चोपडे, कपिल तेलुरे, तानसेन जगताप आदींची भाषणे झाली.
महावीर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. निवेदनावर भास्कर निकम,
अरुण साळवे, अनिल जाधव, मिलिंद खेडकर, विलास कोतकर, विश्वास आहिरे, अशोक पाटील, वाल्मिक टिळेकर, भिका बागूल, गौतम काकळीज, गौतम जगताप, नाना जगताप, अविनाश केदारे, शिवा सोनवणे, सचिन जेजूरकर, शंकर शिंदे, दया जुन्नरे, सागर आहेर, सोमनाथ पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Thursday, December 8, 2022

नांदगाव च्या सिध्दी बागुल या विद्यार्थ्यांनीचे जग्वार लॅड रोवर कंपनीत निवड, क्षत्रिय अहिर शिंपी समाजाकडून सत्कार,


नांदगाव (प्रतिनिधी)  -  नांदगाव शहरातील    गणेश रमन बागुल व योगिता गणेश बागुल (कापुरे )  यांची कन्या  सिध्दी गणेश बागुल या विद्यार्थ्यांनीने अत्यंत आव्हानात्मक असा आयआयटी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना कॅम्पस इंटरव्ह्यू  मध्ये जग्वार लॅड रोवर   (JLR) लंडन मधील ही आरामदायी (लक्झरी) आणि स्पोर्ट्स कार बनवणारी सुप्रसिद्ध कंपनी मध्ये आपले स्थान निश्चित केले. मूळची ब्रिटिश कंपनी असून तिला आता टाटा ग्रुप ने अक्वायर केलं आहे. तिने या कंपनीच्या भारतातील बंगलोर शाखेमध्ये इलेक्ट्रिक वेहिकल विभागामध्ये २१ लाखांचे पॅकेज मिळविले. याबद्दल तीचे क्षत्रिय अहिर शिंपी समाज नांदगाव कडून अभिनंदन व सत्कार करण्यात आला.   या प्रसंगी समाजाध्यक्ष पंकज अरुण सोनवणे तसेच समाज बांधव सुनील निकुंभ आबा सोनवणे , रवींद्र खैरनार , रवींद्र चव्हाण सर ,अमित सोनवणेे,  सोमनाथ सोनवणे, ,सुहास पूणतांबेकर उपस्थित होते.

Tuesday, December 6, 2022

नांदगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य कॉम्प्युटर राईज नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन,


 नांदगाव ( प्रतिनिधी) -   आज मंगळवार  दि.६  रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिना निम्मित वंचित बहुजन आघाडी नांदगावं शहर व ब्ल्यू लॉयन ग्रुप नांदगांव अविनाश पोपट केदारे (शहर अध्यक्ष )व दिया आय केअर सेंटर मालेगाव यांच्या वतीने भव्य कॉम्प्युटर राईज नेत्र तपासणी शिबीर  डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक नांदगाव येथे संपन्न झाले. त्या प्रसंगी उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला असून त्या मध्ये ३००  नागरिकांनी लाभ घेतला त्या प्रसंगी आय केअर टीम डॉ. अभिजित निकम, डॉ समाधान जगताप, डॉ. जम्मूरण आरा, प्रशांत गरुड, अनिकेत यशोद, उमेश पावरा यांनी काम काज बघितले  व या प्रसंगी उपस्तित मान्यवर राष्ट्रवादी चे नेते विनोद भाऊ शेलार,विजू पाटील,बाळाकाका कलंत्री, विश्वास अहिरे , गौतम जगताप,वाल्मिक टिळेकर, याकूब भाई शेख,सचिन देवकते,शिवशेना जिल्हा प्रमुख गणेश भाऊ धात्रक, विलास भाऊ, कटारे , व. ब. आ. मनमाड शहर अध्यक्ष ऍड आम्रपाली ताई निकम, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर छबू भाऊ नागरे, निहाल दादा शेख, देविदास आण्णा मोरे, अनिल जाधव, तानसेन भाई जगताप,ऍड सचिन दादा साळवे, कपिल तेलूरे, रंजना ताई अहिरे, निर्मला ताई केदारे, विद्या ताई कजबे,जयश्रीताई डोके, मिलिंद खेडकर, भीमराव सोनवणे आदी उपस्थित होते.
   या कार्यक्रमाचे आयोजन अरुण भाऊ साळवे, जगताप सर, भास्कर निकम, विलास भाऊ कोतकर, अर्जुन पवार, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जितू बागुल, गणेश केदारे, दिपक कळमकर, आकाश चव्हाण,जगदीश शिंदे, वसंतभाऊ निकम,शरद बागुल,चंचल मानकर, प्रवीण गरुड,राहुल बागुल,दीपक साळवे, शुभम त्रिभुवन,यश शिंदे, आकाश निकम, सँडी सोनवणे, बाळासाहेब पवार, वाल्मिक मोरे, राहुल देवरे, संतोष पवार आदी केलं होतं.

Monday, December 5, 2022

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मनमाड च्या एकलव्य नगर येथील सोनवणे कुटुंबीयांची केले सांत्वन ,



 मनमाड (प्रतिनिधी ) - काही दिवसा पूर्वी मनमाड येथील एकलव्य नगर येथील लोकेश सुनील सोनवणे या बालकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. अतिशय हृदयद्रावक घटना माहिती पडताच अंजुम  कांदे यांनी तात्काळ या कुटुंबीयांची भेट देऊन पोलिसांना योग्य तपासा करिता सूचना देखील दिल्या होत्या. दोन दिवसात पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीस अटक केलेली असून पुढील कारवाही करत आहेत. 
   या पार्श्वभूमीवर आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सोनवणे कुटुंबीयांची भेट घेतली. घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त करत आपण सदर घटना विशेष केस म्हणून फास्टट्रॅक मार्फत चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, सोबतच उज्वल निकम सारख्या दर्जेदार वकिलांना या केसचे काम पहावे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आणि आरोपीस फक्त आणि फक्त फाशीची च शिक्षा होईल असा पाठपुरावा करेन हा शब्द सोनवणे कुटुंबीयांना दिला.
  कुटुंब हे कष्टकरी वर्गातील असून परिस्थिती अत्यंत नाजूक असल्या कारणाने या वेळी अंजुमताई कांदे यांनी मुलाच्या आईकडे रोख एक लाख रुपये सुपूर्द केले तर चार महिने पुरेल असा किराणा , तांदूळ. गहू अशी सामुग्री दिली आहे.
   स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेच्या आरोपीला शोधून काढल्याबद्दल त्यांचे कौतुक यावेळी आमदार यांनी केले.     
     याप्रसंगी तहसीलदार सिद्धार्थ मोरे डीवायएसपी समीरसिंग साळवे तसेच एपीआय गीते साहेब, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल उपस्थित होते. तालुका प्रमुख साईनाथ गीडगे, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, जेष्ठ नेते राजाभाऊ भाबड, जिल्हा उप प्रमुख सुनीलभाऊ हांडगे,आमीन पटेल राकेशशेठ ललवाणी,महीला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख उज्वलाताई खाडे,तालुका प्रमुख विद्याताई जगताप, शहरप्रमुख संगीता  बागुल,पूजा छाजेड, वंदना शिंदे, राधाबाई मोरे,सुभाष माळवतकर, दिनेश घुगे, गुलाब जाधव, काळू माळी, गोकुळ परदेसी, लाला नागरे, आप्पा आंधळे, दादा घूगे, लोकेश साबळे, मूकूद झालटे, मिलींद पाथरकर, अज्जू शेख ,सिध्दार्थ छाजेड, आजिंक्य साळी, सचिन दरगुडे, आनंद दरगुडे ,ललीत रसाळ शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालय , आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दंत व आरोग्य विषयक शिबीर , शिबीराचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले विडीओ कॉन्फ्रेंसिंग माध्यमातून उद्घाटन,




नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दंत व आरोग्य विषयक आज दि. ५ डिसेंबर रोजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, खा. डॉ. भारती पवार यांनी विडीओ कॉन्फ्रेंसिंग माध्यमातून उद्घाटन केले. यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी लाभ घेतला. खासदार डॉ. भारती पवार प्रतिक्रिया दिली की , शिबिरात उपचार घेणाऱ्या व्यक्तीची टेस्ट, निदान, उपचार इत्यादीचा  लाभ घेण्यासाठी लोकांना अपील केले. गरज पडली तर या सर्व उपचारासाठी सर्जरी करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या आरोग्य शिबीर गरिबांसाठी वरदान ठरल्या आहेत.

मांडवडच्या जनता विद्यालय मुलींचा संघ नाशिक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद,



मांडवड, ता. नांदगाव ( प्रतिनिधी) - नाशिक च्या  स्व. मीनाताई ठाकरे विभागीय स्टेडियम  येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा यामध्ये १७ वर्षे मुलींच्या गटांमध्ये जनता विद्यालय मांडवड नांदगाव या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. पहिल्या साखळी सामन्यामध्ये त्रंबकेश्वर संघाला दहा गुणांनी पराभूत केले येवला संघाला बारा गुणांनी पराजित करून विजयाची घोडदौड पुढे सुरू ठेवून सेमी फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला. सेमी फायनल मध्ये चांदवड तालुक्याचा बारा गुणांनी दणदणीत पराभव करून अंतिम सामन्यामध्ये आपला प्रवेश निश्चित केला. नांदगाव नाशिक या तालुक्यांमध्ये झालेला अंतिम सामन्यांमध्ये नाशिक संघाने नांदगाव संघाला सात गुणांनी पराभूत केले.ज्योस्तना आहेर ,कर्णधार, साक्षी आहेर,वैष्णवी पिंगळे, श्रुती आहेर, श्रुती वाडेकर, वैष्णवी दरगुडे, ईश्वरी आहेर, शुभांगी चोळके ,आशा आहेर,कावेरी महाडिक,हर्षदा मोहिते या खेळाडूंनी अतिशय सुंदर खेळ करीत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उपविजेतेपद प्राप्त केले, या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री संदीप आहेर,गणेश गुरखा या सर्वांचे यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस मा श्री नितीन भाऊ ठाकरे, तालुका संचालक श्री अमित भाऊ बोरसे पाटील, विठ्ठल आबा आहेर, व्यंकट आहेर, प्रशांत आहेर, अशोक निकम, मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस.एम, यांच्यासह सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.

मनमाड येथील मयत मुलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध मागण्यांचे निवेदन,


 नांदगाव (प्रतिनिधी) -   मनमाड येथील  मयत मुलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध मागण्यांचे आज दि. ५ डिसेंबर रोजी निवेदन नांदगाव नायब तहसीलदार यांना देण्यात आले.   मनमाड येथे दि. १ डिसेंबर रोजी एक दुर्दैवी घटना घडली होती.    मनमाड मधील एका  अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करून त्या मुलाचा उजवा हात कापुन  खून करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत काही तासांच्या आत आरोपीला जेरबंद केले होते.  खुन करणाऱ्या आरोपीचे नाव राहुल पवार याला   कठोरात कठोर शिक्षा व्हावी  व मयत  मुलगा लोकेश सोनवणे यांच्या कुटुंबाला शासनामार्फत लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नांदगाव तहसीलदार यांना निवदेनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन देण्यासाठी आदिवासी आदिम सेना महिला आघाडी अध्यक्ष जयश्रीताई डोळे ,  आधार बौद्ध विकास संस्थेच्या एडवोकेट विद्या कसबे,  शबाना मन्सुरी ,  पायल डोळे, योगिता सोनवणे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या  वतीने करण्यात आली.

Thursday, December 1, 2022

जिल्हा तंत्र प्रदर्शन मध्ये नांदगाव आयटीआय चा डंका,



नांदगाव ( प्रतिनिधी)  - आज दि. १ डिसेंबर  रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथे जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.नाशिक सह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आयटीआय चा समावेश होता. यामध्ये विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थीं आणि निदेशकांनी आपल्या व्यवसायाच्या अनुरूप विविध *मॉडेलचे* प्रदर्शन करण्यात आले होते त्यात नांदगाव आयटीआय येथून संस्था स्तरावर निवड झालेल्या तीन प्रोजेक्टचे जिल्हास्तरीय साठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर तसेच विविध मॉलमध्ये आणि घरगुती कामात वापरल्या जाणाऱ्या टाइल्स क्लिनर या "मॉडेलचे" नांदगाव आयटीआय चे संध्याता व्यवसायाची प्रशिक्षणार्थीनी दिवस-रात्र मेहनत घेऊन कमी कालावधीत या संस्थेचे प्रभारी प्रभारी गटनिर्देशक श्री पी.डी.राठोड, जोडारी व्यवसायाचे श्री पी. एस. गायकवाड तसेच संधाता व्यवसायाचे शिल्प निदेशक श्री एस. टी. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मॉडेलची निर्मिती करण्यात आली होती. मॉडेलची निर्मिती करून या मॉडेलची जिल्हा तंत्र प्रदर्शन निवड समितीने उत्तेजनार्थ बक्षीस देऊन विभागीय तंत्र प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. नांदगाव आयटीआय चे मार्गदर्शक ,शिल्प शिल्प निदेशक व प्रशिक्षणार्थींचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.

खेळामुळेच सर्वांगीण विकास शक्य - राजेश कवडे,


     
नांदगाव (प्रतिनिधी)-  तालुका क्रीडा कार्यालय नांदगाव यांच्या वतीने 14 17 19 वर्षातील मुला मुलींच्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा नुकत्याच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नांदगाव चे नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनामध्ये खेळात सहभागी झाल्यावर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक असा सर्वांगीण विकास हा खेळामुळेच शक्य होतो असे प्रतिपादन केले व सहभागी विद्यार्थी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 100, 200, 400, 800,1500 ,3000, 5000 मीटर धावणे लांब उडी उंच उडी थाळीफेक गोळा फेक भालाफेक या विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या जवळपास 900 विद्यार्थी खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक  अमित  पाटील यांनी विजयी खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी जनता विद्यालय जातेगाव चे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण, संजय त्रिभुवन, सुधाकर कातकडे, ताडगे एस.आर, आहेर बी.एम, काळे आर्.बी यांच्यासह तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी यशस्वी रित्या स्पर्धा पार पाडल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी केले.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...