Wednesday, January 26, 2022

मांडवडच्या जनता विद्यालयात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन उत्साहात संपन्न



  मांडवड ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यामधील  मराठा विद्या प्रसारक समाज, संस्था संचलित जनता विद्यालय, मांडवड येथे २६ जानेवारी "प्रजासत्ताक दिन"उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जी.खैरे  यांनी  करून उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या  शुभेच्छा दिल्या . त्यानंतर ध्वजपूजन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय निकम व राष्ट्रीय ध्वजारोहन शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष माधव दादा काजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री विठ्ठलआबा आहेर, रामराव मोहिते, गंगाधर थेटे ,शालेय स्कूल कमिटी सदस्य अशोक भाऊ निकम, वाल्मीक थेटे, तसेच गावातील गावकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाखेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर व हेमंत परदेशी  यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.

नांदगाव‌ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा


नांदगाव  (  प्रतिनिधी) -  नांदगाव शहरातील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे प्रजासत्ताक दिन सोहळा महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेशजी कवडे, दत्तराज छाजेड, माणिक तात्या कवडे, विद्याताई कसबे, अरविंद पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मराठे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा.आर एल दिवटे सर इ. उपस्थित  मान्यवरांचे प्रा. वडजे सर यांनी स्वागत केले.महाविद्यालयाच्या प्रांगणातील भारतीय राष्ट्रध्वजाचे
ध्वज पूजन व ध्वजारोहण नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी केले. या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी महाविद्यालयातील  कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली. प्रा.वडजे सर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे तसेच महाविद्यालयातील सर्व सेवकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेमार्फत ध्वजारोहन


 नांदगाव ( प्रतिनिधी) -   नांदगांव शहरातील महात्मा गांधी चौकात दर वर्षी प्रमाणे शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्था नांदगांव यांच्या मार्फ़त ध्वजारोहण करण्यात येते. यावेळेस् लक्ष्मी अलंकार केद्रचे संचालक सोमनाथ दुसाने व वैशाली दुसाने यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण पार पडले. या ध्वजारोहणाच्या वेळेस शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्था, माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, महिला मंडळ, व्यापारी वर्ग उपस्थित होते. 
               त्यानंतर नांदगांव शहरातील शहीद स्मारक ठिकाणी तहसिलदार सिद्धार्थ मोरे व PI रामेश्वर गाड़े यांच्या शुभ हस्ते शहीद स्मारकला पुष्प चक्र अर्पण करुन जय-जवान जय-किसान या घोषनेने सर्व वातावरण आनंदमय झाले होते. या कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले.

Tuesday, January 25, 2022

नांदगाव तालुक्यातील इंदिरानगर तळवाडे येथे परमचैतन्य फाउंडेशनतर्फे शालेय शुज वाटप करत प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा



 नांदगाव (प्रतिनिधी)-   नांदगाव तालुक्यातील   जि.प.शाळा इंदिरानगर तळवाडे  येथे परमचैतन्य फाउंडेशन नांदगाव यांचेकडून सर्व विद्यार्थ्यांना शालेय शुज वाटप करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शालेय ध्वजारोहन फाउंडेशन चे सदस्य सागर फाटे यांनी केले. याप्रसंगी गावातीलच प्रतिष्ठित नागरीक सुभाष घुगे यांनी सर्व मुलांना कोरोना महामारीपासुन बचावासाठी मास्कचे वाटप केले.कार्यक्रमास परम चैतन्य फाउंडेशनचे महेश गायकवाड, राकेश राखेचा ,सरपंच नामदेव सोनवणे,शालेय व्य.समिती अध्यक्ष योगिता साताळे,बाळनाथ चकोर,गोविंद निकम,भाऊसाहेब साताळे,हरि घुगे,ञंबक आव्हाड,संदीप कांदे ,विजय घुगे मुख्याध्यापिका कल्पना बच्छाव,संभाजी घुगे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचलन  महेश थोरे सर यांनी केले. तसेच सागर फाटेसर यांनी विद्यार्थ्यांची पाणी पिण्याची समस्या समजून घेऊन शालेय आवारात टाकी बांधून देण्याचे आश्वासन आपल्या अध्यक्षीय भाषणात दिले. शाळेतर्फे महेश थोरे सरांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले,  तर आभार संभाजी घुगे यांनी मानले.





नांदगाव मध्ये थंडीचा कडाका, लोकांनी घेतला शेकोटीचा आधार


नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यासह थंडीची लाट संध्याकाळी सहा वाजेपासून कडाक्याची थंडीची सुरूवात पहाटे धुक्याची चादर पसरत आहे. रोजच तापमानाचा पारा घसरल्याने थंडीबरोबर गारठा आहे. हवातील गारठ्यामुळे माणूस असो व प्राणी सर्वानाच हुडहुडी भरली आहे. थंडीपासुन शरीराला उष्णता मिळण्यासाठी सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहे. शेकोट्या भोवती नांगरिक गर्दी करताच थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्याचा वापर वाढला. बाजारात उबदार कपडे घेण्यासाठी नांगरिकाची झुंबड उडाली . ज्या प्रदेशात बर्फवृष्टी झाल्याने येणार्या शीत लहरी आणि गारपीटमुळे  मागील आठ दिवस पासून महाराष्ट्राच्या काही भाग गारठला आहे . थंडीचा हा कडका कधी संपेल अशी चिंता नागरिक करीत आहे. 

Sunday, January 23, 2022

नांदगाव शहर शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

नांदगाव ( प्रतिनिधी) -   नांदगाव शहर शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालय नांदगाव चांडक प्लाझा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष हार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यानंतर शिवसेना मालक चालक रिक्षा युनियन शाखा येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
      या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण  देवरे, गुलाब भाबड, अमोल नावंदर, ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ जगताप, ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. सुनील तुसे, शिवसेना नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव , युवा सेना नांदगाव तालुका प्रमुख सागर  हिरे, भाऊराव बागुल, एन के राठोड, राम शिंदे, गोलू बागोरे,  बापू गणेश,  नितीन सोनवणे, विशाल काकळीज, सिद्धार्थ बागुल, शरद आयनोर, राजेंद्र अविले,चेतन शिंदे, सुरेश सोर, संतोष शर्मा, अशोक विसपुते, पप्पू बागुल, सिद्धु बागुल, दादा पाटेकर, गणेश देवरे, दादा सोनवणे, जय जाधव वीरू जाधव, विशाल जाधव, गणेश सोनवणे, बापू शिंदे उपस्थित होते.

Wednesday, January 19, 2022

नांदगाव शहरातील समाजसेविका संगिता सोनवणे यांना '" राज्यस्तरीय अभिमान महाराष्ट्राचा जीवन गौरव " पुरस्कार जाहिर


नांदगाव(प्रतिनिधी): - रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील डायनॅमिक युथ स्पोर्ट अकॅडमी तर्फे देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय " अभिमान महाराष्ट्राचा जीवन गौरव" पुरस्कार नांदगाव येथील समाजसेविका व शिवभक्त सौ संगीता सोनवणे यांना जाहीर झाला असुन येत्या २७ जानेवारी रोजी  मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पनवेल येथे होणार आहे त्याठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
           नांदगांव येथील  संगीता सोनवणे या समाजसेवक म्हणून कार्य करत आहेत.शिवकार्याची विशेष आवड असलेल्या संगीता सोनवणे  या गेल्या अनेक वर्षांपासून  रोजच्या नित्यक्रम सुरू करण्यापूर्वी शिवस्फूर्ती मैदानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला स्वच्छता करून मनोभावे पूजा करतात.तसेच समाजसेवक म्हणून देखील त्या अनेक कामात अग्रेसर असतात.कोव्हिडं काळात विशेष कार्य केले व आजही करत आहे.या कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे.नुकतेच विश्व हिंदू परिषदच्या वतीने त्यांना आदर्श समाजसेवक म्हणून गौरविण्यात आले आहे.त्यांच्या या कामाची दखल स्वता  खासदार संभाजीराजे व खासदार डॉ अमोल कोल्हे यांनीदेखील घेतली असुन मराठा समाजाच्या कार्यात देखील त्या अग्रेसर आहेत.या कामांची रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील डायनॅमिक युथ स्पोर्ट अकॅडमीने दखल घेत नुकतेच त्यांचे नाव या पुरस्कार सोहळ्यासाठी जाहीर केले आहे.येत्या २७ जानेवारीला  मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.त्यांच्या या कामामुळे नांदगांव तालुक्याचे नाव लौकिक झाले असुन विविध स्तरावर त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Monday, January 17, 2022

नांदगावच्या जळगांव खुर्द ईथे अॅपेरिक्षा - बुलेटच्या अपघात झाल्याने आर्मी जवानाचा मृत्यू , एकजण गंभीर जखमी

नांदगावच्या जळगांव खुर्द ईथे अॅपेरिक्षा - बुलेटच्या अपघात झाल्याने आर्मी जवानाचा मृत्यू , एकजण गंभीर जखमी 
नांदगाव  - नांदगाव तालुक्यातील जळगांव खुर्द ईथे अॅपेरिक्षा - बुलेटच्या धडकेत चिंचविहीर ( ता.नांदगाव ) ईथील आर्मी जवानाचा जागीच मृत्यु झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. सोमवारी ( दि‌.१७) सायंकाळी साडेसातच्या वेळेस  जळगांव - चांदवड महामार्गावर हा अपघात घडला.
    चिंचविहीरचा गोपाळ दाणेकर ( वय ३१) असे मृत जवानाचे नाव असून, त्यांचे सहकारी नयनेश बापू घाडगे ( वय ३४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मालेगांव हलविण्यात आले. काल दोघेही बोलठाण येथे लष्करी जवान अमोल पाटील यांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. परत ते आपल्या मूळगावी चिंचविहीर येथे गेले. त्यानंतर सायंकाळी ते नांदगावला येत असताना त्याचवेळी जळगांव खुर्द येथील विराज लॉन्स समोर नवीन राष्ट्रीय हायवेवरील वळणावर समोरून येणार्या अॅपेरिक्षाशी त्यांच्या बुलेटची धडक झाली. हा अपघात ईतका भीषण होता की लष्करी जविन दाणेकर यांचा जागेवरच मृत्यू झाला. सर्वत्र अंधार असल्याने अपघाता बाबत व जखमी बाबत सुरुवातीला कासी समजू शकले नाही. नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात दोघांना आणल्यावर पुढील सुत्री हलली.

Sunday, January 16, 2022

शोकवार्ता


नांदगाव येथील पत्रकार अनिल आव्हाड यांना पितृशोक महादू आबाजी आव्हाड वयांच्या ८३ व्या  वर्षी त्यांचे निधन  झाले. ते सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते.  त्याच्या पश्र्ताच  पत्नी , तीन मुले, दोन मुली, नातु,  त्यांचा मुलगा अरुण आव्हाड येवला येथे रेल्वे स्टेशन मास्तर आहे तर अनिल आव्हाड (पत्रकार),  सुनील आव्हाड हे  सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर नाशिक येथे नोकरीस रूजू असा परिवार आहे. त्यांच्या अत्ययात्रेस सर्वथरातील नांगरिक उपस्थित होते . नांगरिकाकडून श्रद्धाजली वाहण्यात आली.

नांदगावच्या जे.टी.कासलीवाल शाळेच्या मुलांचे स्कॉलरशिप परिक्षेत सुयश



नांदगाव ( महेश पेवाल ) - नांदगावच्या जे.टी. कासलीवाल इंग्रजी माध्यमिक शाळेच्या ईयत्ता ५ वी, ८ वी च्या मुलांचे स्कॉलरशिप परिक्षेत सुयश मिळवले. पाचवीतील विद्यार्थी आकाश अग्रवाल व आठवीतील सार्थक देशमुख या मुलांनी राज्य शासनाच्या गुणवत्ता लिस्टमध्ये स्थान प्राप्त केले. सर्व यशस्वी मुलांचे संस्थेचे चेअरमन सुनील कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, संस्थेचे पदाधिकारी , जे.टी.के. इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य मणी चावला,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले. 


Saturday, January 15, 2022

नांदगाव‌ तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ


नांदगाव ( महेश पेवाल ) - नांदगाव तालुक्यातील शुक्रवारी ( दि.१३ ) रोजी कोरोना रुग्णाची संख्याही २०० वर पोहोचली असून, प्रशासनाने तोडांवर  मास्क वापरणे , सोशल डिस्टनस राखणे यांच्या सुचना दिल्या. कोरोनाग्रस्त संख्येचा गुणाकार रोज वाढतो आहे. सांयकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एकुण ४५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये मनमाड ३५, नांदगाव ५, ग्रामीणमध्ये ६ बाधित रुग्ण आहेत. १४ दिवसात आता कोरानाग्रस्ताची संख्या १९७ वर जाऊन पोहोचली आहे. कोराना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढल्याने काळजी  वाढली आहे.

नांदगावमध्ये थंडीचा कडाका

नांदगाव ( परवेज शेख ) - नांदगाव तालुक्यासह थंडीची लाट संध्याकाळी सहा वाजेपासून कडाक्याची थंडीची सुरूवात पहाटे धुक्याची चादर पसरत आहे. रोजच तापमानाचा पारा घसरल्याने थंडीबरोबर गारठा आहे. हवातील गारठ्यामुळे माणूस असो व प्राणी सर्वानाच हुडहुडी भरली आहे. थंडीपासुन शरीराला उष्णता मिळण्यासाठी सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहे. शेकोट्या भोवती नांगरिक गर्दी करताच थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्याचा वापर वाढला. बाजारात उबदार कपडे घेण्यासाठी नांगरिकाची झुंबड उडाली . ज्या प्रदेशात बर्फवृष्टी झाल्याने येणार्या शीत लहरी आणि गारपीटमुळे  मागील आठ दिवस पासून महाराष्ट्राच्या काही भाग गारठला आहे . थंडीचा हा कडका कधी संपेल अशी चिंता नागरिक करीत आहे. 



नांदगावचे राजाभाऊ गांगुर्डे यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार




नांदगाव ( महेश पेवाल ) - नांदगावमधील राजाभाऊ गागुर्डे यांना अन्याय अत्याचार निमूर्लन समिती नाशिक जिल्हा आयोजित माता सावत्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुरस्कार विविध प्रकारच्या सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार २०२२ चा राजाभाऊ गांगुर्डे यांना देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील अन्याय अत्याचार समितीचे अध्यक्ष रविद्र जाधव , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रेमलता  जाधव, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Friday, January 14, 2022

नांदगाव तालुक्यातील बोलठाण ईथील जवान अमोल पाटील शहीद


नांदगाव (महेश पेवाल ) -  देशातील  नेपाळ सीमेवर बिरपुर येथे  कार्यरत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील जवान अपघातात  शहीद झाले .  बोलठाण येथील सुपुत्र अमोल हिम्मतराव पाटील वय वर्षे ३० या जवानाला नेपाळ सीमेवर कार्यरत असताना ११ हजार के. व्ही. विजेच्या तारेच्या धक्क्याने अपघाती निधन झाले. अमोल हिम्मतराव पाटील यांच्या निधनाची बातमी कळताच बोलठाण आणि बोलठाण घाटमाथा परिसर ,  नांदगाव तालुक्यात संक्रांतीचा गोडवा शोक सागरात बुडाला आहे. सशस्त्र सीमा बल नेपाळ जवळील बिरपुर कार्यरत असलेला अमोल पाटील हे सहकाऱ्या सोबत सीमेवर तैनात होते. त्याच वेळी सुरू असलेल्या कामात विजेच्या धक्क्याने अमोल पाटील यांना वीर मरण आले. या अपघातात अन्य दोन जणांना देखील वीरमरण आल्याचे समजते.  जिद्द आणि चिकाटीमुळे अमोल यांची गेल्या सहा वर्षापासून सशस्त्र सीमा बाला मध्ये निवड झाली होती. शहीद अमोल पाटील हे २०१५ मध्ये सशस्त्र सीमा बलाच्या ४५ व्या बटालियनमध्ये आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. नुकत्याच दिवाळी सणात अमोल पाटील हे बोलठाण येथे सुटीवर आले होते. कर्तव्यावर परत जाताना, आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्याची चिमुकलीला सोबत घेऊन गेले होते. 
      दरम्यान बिरपूर सीमेवर त्यांना वीर मरण आले ची माहिती बोलठाण येथे असणाऱ्या लहान भावाला मिळाली आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या जवान अमोल पाटील यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी,आई, आणि अविवाहित भाऊ असा परिवार आहे. शहिद जवान अमोल पाटील यांचे पार्थिव शरीर बोलठाण येथे आणण्यात येणार असुन केंद्र व राज्य सरकार यांच्या कोविड नियमांचे पालन करून शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नांदगाव तालुक्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिली.

Thursday, January 13, 2022

नांदगाव मध्ये राजमाता जिजाऊ जयंती साजरी


नांदगाव ( परवेज शेख ) - नांदगाव येथील माऊली मंदिरात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या शिवभक्त संगिता सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. छत्रपती शिवरायांना ज्ञान देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जीवनकार्य समजून घेऊन त्यांचा विचारांचे आचरण करावे,  असे प्रतिपादन विशाल वडघुले यांनी केले. यावेळी किरण पाटील, विशाल वडघुले, निलेश देवकर, सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते. 

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

नांदगाव  येथे नगरपालिकेच्या सभागृहात पत्रकादिनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विचार मांडताना जेष्ठ पत्रकार संजीव धामणे व नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी
छाया :- सुहास पुंतांबेकर


नांदगाव ( महेश पेवाल ) - स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी,अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची २४ बाय ७ पत्रकारिता…पेन ते काँप्युटर,ते डिजिटल प्रिंटिंग,मुद्रित माध्यमं,टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्सस देणारी पत्रकारिता बदलत राहिली आहे.पत्रकार हा एखाद्या घटनेबद्दल भाष्य करतो तर वार्ताहर वार्ता गोळा करण्याचे काम करतो.पत्रकारितेचं स्वरुप बदलत असले तरी पत्रकारितेतली मूळ मूल्यं कायम आहे पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकार संजीव धामणे यांनी व्यक्त केले.
   नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ [रजि.] संलग्न नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नांदगाव येथे नगरपालिकेच्या सभागृहात दर्पण'या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे 'बाळशास्त्री जांभेकर'यांचा जन्मदिवस(६.जानेवारी गुरुवारी)पत्रकार दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विजय चोपडा होते.सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ पत्रकार विजय चोपडा,संघाचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार संजीव धामणे,माजी तालुकाध्यक्ष बब्बूभाई शेख,तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम,सचिव अमीनभाई शेख यांनी केले.जनश्रध्दाच्या संपादिका श्रीमती शकुंतला गुजराथी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अध्यक्षस्थानीय भाषणात जेष्ठ पत्रकार विजय चोपडा आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले कि ज्या जेष्ठ पत्रकारांनी आपले आयुष्य पत्रकारिता खर्ची केले ते आता कोणत्याही वृत्तपत्रात काम करत नाही.पत्रकार संघाने त्यांना आपल्या संघात मानद सदस्य म्हणून घ्यावे आम्हाला आपल्यासोबत काम करण्यास आनंद वाटेल,पत्रकार हा कधी सेवानिवृत्त होत नाही.यावेळी जेष्ठ जेष्ठ पत्रकार संजीव धामणे,संघाचे माजी तालुकाध्यक्ष बब्बुभाई शेख,विद्यमान तालुका अध्यक्ष बाबासाहेब कदम उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव यांनी भावना व्यक्त केल्या संघाचे सचिव अमीनभाई शेख यांनी सूत्रसंचालन व आभार मानले यावेळीजेष्ठ पत्रकार संजीव धामणे,पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक संजीव निकम,विजय चोपडा माजी तालुका अध्यक्ष बब्बूभाई शेख,विद्यमान तालुकाध्यक्ष,बाबासाहेब कदम,सचिव,आमीन भाई शेख कार्याध्यक्ष,गिरीश जोशी,उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव,गणेश आहेर,भगवान हिरे,अमोल बनसोडे,मोहम्मद शेख,रईस भाई शेख अजय सोनवणे,किरण डोंगरे,सुहास पुतांबेकर, सचिन गायकवाड, महेश पेवाल, आजहर शेख परवेज शेख,पंकज वाले, विशाल पवार,विकास अहिरे,भारत देवरे आदी पत्रकार उपस्थित होते.





Tuesday, January 11, 2022

नांदगाव नगरपालिकेकडुन नायलॉन मांजा वापरण्यास बंदी


नांदगाव ( महेश पेवाल ) - सद्या सर्वीकडे पतंग उत्सव चालू असल्याने  जसजसा मकरसक्रांत सण जवळ येतोय तसा  नांदगांव शहरात सह ग्रामीण भागात पतंग उडविण्यास सज्ज झाले आहे. पतंग बरोबर आसरी ला मागणी दिसून येतंय. शहरातील विविध दुकानात पतंग लहान, मोठी, तिरकस अशा पतंगीना मोठी मागणी आहे. नांदगाव नगरपरिषदेला नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश आलेले आहे. त्यात सर्व नांगरिकाना सुचना दिली आहे की प्लास्टीक अथवा कृत्रीम वसतूंचा वापर करुन बनविण्यात आलेल्या व सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचीत धाग्यामुळे पक्षी व मानव जीवितेस इजा पोहचते, काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात. त्यामुळे पतंग उडविण्यास नायलॉन मांजा , धाग्यामुळे होणाऱ्या प्राणघातक इजापासून पक्षी व मानव जीवितेस संरक्षण करण्यासाठी गरज आहे.
           मांजाचे तुकडे जमिनीवर पडते, मांजा नायलॉनचा असल्याने त्याचे विघटन होत नाही. गटारी , नदी नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होत असतात. गायीना तत्सम प्राण्यांना खाद्यामध्ये मांजाचे तुकडे सेवन केल्यास त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. प्लास्टिकच्या धांग्याना अति वापर विजेच्या तारांवरील घर्षणामुळे होणाऱ्या ठिणग्यांनी आग लागून वीजप्रवाह खंडित होतात, वीजकेंद्र बंद होते. वन्य जीवांना जीवितहानी पोहोचण्याचा संभव असतो. 
    नांदगांव नगरपालिकेला नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश दिलेले की , पर्यावरण ( संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम ५ अन्वये , प्लास्टिक किंवा इतर कृत्रीम वस्तूपासून बनवलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचीत असलेल्या पक्क्या धांग्याचा वापर पतंग उडविण्याच्या मकरसंक्रांत सणाच्या वेळी तसेच इतर वेळी करण्यास त्याप्रमाणे नायलॉन मांज्याची  निमिर्ती, विक्री , साठवणूक व वापर करण्यास संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात येत आहे. जिल्ह्यातील घाऊक, व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांना नायलॉन मांजाची विक्री , साठवणूकीस प्रतिबंध करण्यात आले आहे. या आदेशांचे अनुपालन  करण्यास कसूर केल्यास संबंधित व्यक्ती , संस्था या पर्यावरण ( संरक्षण) कायदा , १९८६ चे कलम १५ मध्ये नमूद शास्तीस पात्र होतील .

नांदगावचे प्रसाद सोनवणे यांची नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस उपाध्यक्षपदी निवड

 नांदगांव ( परवेज शेख ) -  नांदगाव  तालुक्यातील प्रसाद सोनवणे यांची नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उपाध्यक्षपदी  निवड करण्यात आली. नाशिक येथे सोनवणे यांना निवडीचे पत्र पालकमंत्री छगन  भुजबळ यांचे हस्ते देण्यात आले.
       नांदगाव नाशिकमधील  प्रसाद सोनवणेंनी  विद्यार्थ्यांची मजबूत फळी तयार करत तत्कालीन फडणवीस सरकार विरोधात, अनेक विद्यार्थीहित लढे दिले. यात प्रमुख्याने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती समस्या, राज्यव्यापी कॉपीमुक्त अभियान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विरोधी अनेक लढे उभारले. कुलगुरु डॉ. करमाळकरांची भेट घेत, लढे यशस्वीही केले. या सर्व लढ्यांच्या, अंदोलनांच्या धर्तीवर सोनवणेंनी Nationalist of the year या दिल्लीत होणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या  कार्यक्रमातही नाशिक जिल्ह्याचे नेतृत्त्व केले. यावेळी तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस व आत्ताचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कांग्रेस  धिरज शर्मा यांची भेट घेत युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. "प्रसादभैया सोनवणे प्रतिष्ठानची" स्थापनाही सोनवणेंनी केली.
     कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अनेक गरजूंना मदत झाली, त्यावेळी प्रसादभैय्या प्रतिष्ठाणनेही नांदगावमध्ये जवळजवळ 3-4 महीने गरजूंना मोफत अन्नाचे वाटप केले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री  छगन भुजबळ च्या व समिर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमीत्त नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी जिल्हापरीषद गटात महिलांचा कार्यक्रम आयोजीत करत 100 बचत गट स्थापनेचा निर्धारही केला.
       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व समता परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीपआण्णा खैरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रसचे नाशिक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी कडलग , समता परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक व समता परिषदेचे प्रदेश प्रचारक डॉ .नागेश गवळी उपस्थित होते.
    

नांदगाव रेल्वे स्थानकात नवीन मेमू प्रवाशाच्या सेवेत, प्रवाशाची होणारी गैरसोय टळणार


नांदगांव ( महेश पेवाल ) -  नांदगांव रेल्वे स्टेशनवर नवीन भुसावळ - ईगतपुरी  मेमू एक्सप्रेस ( ११०२०)   या गाडीचा रेल्वे स्थानकात जंगी स्वागत करण्यात आले. यामुळे चाकरमान्यांसह सर्वसामान्यांना प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान, आता भुसावळ-इगतपुरी  मेमू  ट्रेनला सोमवार १० जानेवारीपासून सुरवात झाली .  ही मेमू सुरु झाल्याने प्रवाशामध्ये आनंद दिसून आले . या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार आहे. यावेळी मेमू चे लोकोपायलट एस.एस.निंबाळकर , रेल्वे गार्ड आर.बी.पारधी यांना शाल देऊन सत्कार करण्यात आला. नांदगांवच्या प्रवाशाना आरक्षण करून प्रवाश करावा लागत होता. रेल्वे प्रशासनाने भुसावळ - ईगतपुरी मेमू सुरु केल्याने प्रवाशाची गैरसोय टळणार आहे. अनेक वेळा प्रवाशी संघटना, प्रवाशीवर्ग मागणी करत होते.    कोरोनाची पहिली, दुसरी लाट आटोपल्यावरही गाडी सुरू होत नसल्याने सातत्याने गाडी सुरू करण्याची मागणी होत होती.  यापूर्वी अनेक एक्सप्रेस ,मेल ला थांबा होता तो पूर्ववत करावा अशी मागणी प्रवाशाची आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गुरुवारी नोटिफिकेशन काढले आहे.
     भुसावळ-देवळाली ऐवजी आता भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी चालणार आहे.  भुसावळ- इगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटेल.  तर नांदगाव ला  १०.१० येईल नंतर १२.०८ ला मनमाड पोहोचेल व   इगतपुरीला दुपारी तीनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी इगतपुरी येथून सकाळी ९ .५ वाजता सुटेल. तर  दुपारी १.१३ मनमाडला व  नांदगांवला १. ४३ पोहोचेल. भुसावळ जंक्शनवर ही गाडी सायंकाळी ५. १० वाजता पोहोचेल. ही गाडी आठ डब्यांची असणार आहे. नांदगावच्या ग्रामीण भागाच्या जनतेला यांचा फायदा मिळणार आहे. यावेळी रेल्वे संघटनेचे तुषार पांडे, हनिफ शेख, भाजप व्यापारी आघाडीचे दत्तराज छाजेड, शहराध्यक्ष उमेश उगले, भाऊराव निकम, कुसुम सावंत , राजीव गागुर्डे ईत्यादी जण मेमूच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
पुढील पॅसेंजरचे हे थांबे रद्द
यात पिंपरखेड, पांझण, हिसवळ,  शिखर या स्थानकांवर ही गाडी थांबणार नाही.


Sunday, January 9, 2022

नांदगावात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ माईना श्रद्धाजली अर्पण

 नांदगांव (महेश पेवाल ) -   नांदगांव शहरातील महात्मा गांधी चौक येथे शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थे तर्फे ज्येष्ठ समाजसेविका  सिंधुताई सपकाळ माईना श्रद्धाजंली म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी दत्तराज छाजेड़, पत्रकार मारुती जगधने, संतोष आण्णा गुप्ता, रोहिणी मोरे, पत्रकार भगवान सोनवणे, प्रशांत खैरनार, वामन पोतदार, सुनिल जाधव, सचिन साळवे, राजू गुडेकर यांनी आपल्या मनोगतातून माईंच्या जीवनप्रसंगावर प्रकाश टाकत माईंच्या कार्याची माहिती देत त्यांनी केलेल्या संघर्षातून त्या पुढे अनाथांची माय कशा झाली याबाबत बोलून शब्दसुमनांनी    माईना श्रद्धाजंली अर्पण केली. तदनंतर  विद्या देवरे मॅडम आणि खानदेशी आजी यांनी श्लोक पठनकरुन हार अर्पण करून  सर्व नागरिकांनी माईंना श्रद्धाजंली अर्पण केली.या प्रसंगी सुमित गुप्ता, दिनकर आहेर, सोमनाथ दुसाने, आकाश पानकर, हेंमत पवार, बापू जाधव, महेश पेवाल, अनिल धामने, अभिषेक इंगे, ऋषिकेश डोबाले, अविद्र पारखे, परेश सिसोदिया, मुकुंद खैरनार, राजकुमार संत, मंसूरी सर, प्रविण सोमसे, संगिताताई सोनवणे, खुशाली सोनवणे, कुसुमताई सावंत, सोनाली पाटिल,  आदि सदस्य उपस्थित होते.सूत्रसंचालन शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी केले.


Friday, January 7, 2022

सोमवारपासून नांदगाव, मनमाड ला मेमू एक्सप्रेस धावणार


नांदगांव/ मनमाड ( परवेज शेख ) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च २०२० पासून भुसावळ-देवळाली पेंसेजर बंद करण्यात आली. यामुळे चाकरमान्यांसह सर्वसामान्यांना प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान, आता पॅसेंजर ऐवजी मेमू एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय भुसावळ  रेल्वे प्रशासनाने घेतला असून देवळाली ऐवजी आता भुसावळ-इगतपुरी  मेमू  ट्रेनला १० जानेवारीपासून सुरवात होणार आहेत. या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार आहे. भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील सात स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही.
सध्या देशभरात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोनाची पहिली, दुसरी लाट आटोपल्यावरही गाडी सुरू होत नसल्याने सातत्याने गाडी सुरू करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गुरुवारी नोटिफिकेशन काढले आहे.
भुसावळ-देवळाली ऐवजी आता भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी चालणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून ही गाडी १० जानेवारीपासून सुरू केली जाणार आहे. भुसावळ- इगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटेल.  तर नांदगाव ला  १०.१० येईल नंतर १२.०८ ला मनमाड पोहोचेल व   इगतपुरीला दुपारी तीनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी इगतपुरी येथून सकाळी ९ .५ वाजता सुटेल. तर  दुपारी १.१३ मनमाडला व  नांदगांवला १. ४३ पोहोचेल. भुसावळ जंक्शनवर ही गाडी सायंकाळी ५. १० वाजता पोहोचेल.
ही गाडी आठ डब्यांची असणार आहे. मेल, एक्स्प्रेस गाडीचे दर आकारले जाणार आहे. मेमू ट्रेनची ट्रायल काल गुरुवारी (दि 6) घेण्यात आली. भुसावळहून या गाडीचा आलेला रेक रात्री साडेआठ वाजता मनमाड रेल्वे स्थानकामधून इगतपुरीकडे रवाना झाला. तर शुक्रवारी या गाडीचा रिकामा रेक इगतपुरीहून भुसावळ येथे रवाना रवाना होणार आहे.
पुढील पॅसेंजरचे हे थांबे रद्द -

भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील पुढील स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही. यात पिंपरखेड, पांझण, हिसवळ,  शिखर या स्थानकांवर ही गाडी थांबणार नाही.



Wednesday, January 5, 2022

नांदगाव वकील संघाचे अध्यक्षपदी अॅड. विजय रिढे यांची बिनविरोध निवड


नांदगांव ( महेश पेवाल ) - नांदगांव वकील संघाच्या बैठकीत वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. विजय रिढे बिनविरोध निवड झाली. नांदगाव नविन कार्यकारिणी निवडण्यासाठी बैठकीचे  निवडी संदर्भात आयोजन करण्यात आले. बैठकीत सर्वाची चर्चा करून अंतिम नवीन कार्यकारिणी अध्यक्षपदी - अॅड. विजय रिढे, उपाध्यक्ष - अॅड. सचिन साळवे, सरचिटणीस - अॅड. उमेश सरोदे, खजिनदार- अॅड. पंकज साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. अधिकारी सुमंत  पाटील यांनी  निर्णय जाहिर केला. यावेळी मावळते अध्यक्ष अॅड. गजाजन सुरसे यांच्यासह वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.  


नांदगांवचे वकील संघाचे नवीन अध्यक्षपदी अॅड. विजय रिढे याच्या निवडीबद्दल मनपुर्वक अभिनंदन 💐💐💐💐

शुभेच्छुक:- साप्ताहिक नांदगांव दुनिया 

संपादक - मोहमद नवाब शेख

नांदगांवमधील शिवस्मारकांसाठी आ.सुहास कांदे कडुन २० लाखांचा निधी मंजुर

नांदगांवमधील शिवस्मारकांसाठी आ.सुहास कांदे कडुन २० लाखांचा निधी मंजुर 

नांदगांव ( महेश पेवाल ) - नांदगांव मधील शिवस्फुर्ती मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन शिवस्मारकांसाठी शिवभक्त संगिता सोनवणे यांनी सोमवारी ( दि.३ ) ला उपोषण केले. तालुक्याचे आमदार सुहास कांदेनी तात्काळ उपोषण स्थळी भेट दिली. संगिता सोनवणे यांनी केलेली मागणी आ.कांदेनी नवीन शिवस्मारकासाठी  तब्बल वीस लाखांचा निधी मंजुर केला. 
      संगिता सोनवणे हे दररोज येथे साफसफाई, स्वच्छता करून सामाजिक कार्य करत असतात. शिव स्मारकांसाठी मंगळसूत्र दागिने मोडुन खर्च करण्यासाठी पुढाकार दर्शवला होता. काही दिवसापूर्वी सोनवणे यांनी पत्राद्वारे मी दि. ३ ला उपोषणास बसणार आहे, यांची माहिती मिळताच आ.सुहास कांदे हे शहरातील शिवस्फुर्ती मैदानावरील संगिता सोनवणे उपोषणात बसलेल्या ठिकाणी पोहचले. यावेळी नवीन शिवस्मारकासाठी प्रशासकीय पातळीवर  तातडीने २० लाख रुपये निधी मंजूर करत दुरुस्ती मार्ग मोकळा करून दिला. या उपोषणाला संगिता सोनवणे, अखिल भारतीय मराठा महासंघ, फुले, शाहु, आंबेडकर समितीसोबत नांदगांव तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजासह नांगरिक  उपस्थित राहिले. यावेळी  आ.कांदेनी संवाद साधत, आपण यापूढे कोणते पण स्मारकांचे दुरुस्ती , नुतनीकरणाचे काम आजपासून हाती घेत असल्याचे जाहिर केले. उपोषणात भास्कर झाल्टे, भीमराज लोखंडे,  विशाल वडघुले, बाळासाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, मुस्लीम आरक्षण समितीचे शेख, मुख्याधिकारी विवेक धांडे, पोलीस निरिक्षक गाढे साहेब, गुलाब भाबड, किरण देवरे, राजाभाऊ देशमुख, सुनील जाधव, सागर हिरे,  भावराव बागुल, आदीसह मराठा समाज व नांगरिक उपस्थित होते.

Tuesday, January 4, 2022

सर्पमित्र विजय बडोदेने दुर्मिळ पांढऱ्या डोळ्यांचा बाज पक्ष्याला दिले जीवदान

सर्पमित्र विजय बडोदेने  दुर्मिळ पांढऱ्या डोळ्यांचा बाज पक्ष्याला दिले जीवदान 


नांदगांव ( महेश पेवाल ) - नांदगाव पोलिस स्टेशन जवळील वड चिंच चे झाड  असून,  झाडावर  काही कावळ्यांनी एका पक्षी वर हल्ला केला आणि तो जखमी  अवस्थेत खाली पडला. जवळील गुप्ता झेरॉक्स मनीष गुप्ता यांच्या नजरेत येतातच त्यांनी ताबडतोब पक्ष्याला ताब्यात घेतले पक्षाचा जीव वाचवावा म्हणून सर्पमित्र विजय बडोदे यांना फोन वरून कळवले.  बडोदे वेळेवर पोहोचले आणि हा पक्षी ताब्यात घेऊन थोडक्यात माहिती दिली, " हा पांढऱ्या डोळ्याचा बाज दुर्मिळ पक्षी आहे याला इंग्लिश मध्ये White-eyed Buzzard असे म्हणतात.
     पांढऱ्या डोळ्याचा बाज हा पक्षी साधारणपणे  डोमकावळ्याएवढा असून त्याची लांबी सुमारे ४५ सेमी. असते. पाठीचा रंग तपकिरी असून नर आणि मादी दिसण्यात सारखीच असतात. हे पक्षी झुडपे असलेल्या खुल्या प्रदेशात व लागवडीखाली असलेल्या शेतांमध्ये हा राहतो. डोंगर आणि दमट व दाट अरण्यात राहणे त्याला आवडत नाही. हे पक्षी एकेकटेच असतात. हा हिंस्र पक्षी असूनदेखील स्वभावाने सुस्त आहे. वठलेली झाडे, तारायंत्राचे खांब इ. ठिकाणी हा बसलेला असतो आणि तेथूनच भक्ष्यावर झडप घालतो. उंदीर, सरडे, बेडूक, टोळ, नाकतोडे आणि इतर मोठे कीटक याचे भक्ष्य होतात.
     पांढऱ्या डोळ्याचा बाज या पक्ष्यांच्या प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून मेपर्यंत असतो. नर व मादी काटक्याकुटक्या आणून गर्द पालवी असलेल्या एखाद्या झाडाच्या फांदीच्या दुबेळक्यात कावळ्याच्या घरट्यासारखे एक ओबडधोबड घरटे बांधतात. मादी त्यात तीन अंडी घालते, त्यांचा रंग हिरवट पांढरा असतो. उबविते, पण पिल्लांचे संगोपन दोघेही करतात, 
अशी माहिती सर्पमित्र विजय बडोदे यांनी देऊन पशुवैद्यकीय डॉ. एन ताठे , कर्मचारी शेळके अण्णा पवार,  यांनी उपचार करून आणि वनविभागाच्या  स्वाधीन करून पक्षाला जीवदान दिले.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...