Wednesday, November 29, 2023

गारपीटग्रस्तांना मदतीचा हात, आमदार सुहास कांदे यांच्याकडून नुकसानग्रस्त कुटुंबाला संसारपयोगी साहित्य वाटप,





नांदगाव ( प्रतिनिधी )- गारपीट वादळ वाऱ्या पावसामध्ये संसाराची नास धुस होऊन रस्त्यावर आलेल्या कुटुंबाला तात्काळ पत्रे अन्नधान्य कपडे देऊन खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुखाची जबाबदारी  आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पार पाडली. ८०% समाजकारण हे धोरण ठेऊन आण्णा निरंतर गरजवंतांच्या मदतीला धावून येताना मतदारसंघ पाहत आहे. आज पुन्हा याचा प्रत्यय आला. धोटाने खुर्द ( जोंधळवाडी) येथील सरूबाई भिवसन पिंपळे या मोठी मुलगी संगीता बाई , कौतिक गांगुर्डे सह राहतात. मुलगा व सून ऊस तोडीला गेले आहेत. रात्री अचानक वादळासह पाऊस आला आणि यात घराचे पत्रे उडाले भिंती पडल्या‌. कशीबशी त्यांनी रात्र काढली, व त्याचे नव्हते झाले. मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच आमदार सुहास अण्णा कांदे आणि सकाळी सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाकडे धाव घेतली. सरुबाई भीमसेन पिंपळे यांच्या घरी भेट दिल्यावर सर्व उध्वस्त झालेल्या घराची परिस्थिती पाहून आण्णा भावूक झाल्याचे दिसले. तात्काळ स्वखर्चातून घराचे पत्रे धान्य किराणा आणि कपडे पोहोच करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. 
     या सर्व लोकांना ५० किलो गहू ,५० किलो तांदूळ, तेल साखर सह सर्व किराणा, पत्रे अँगल धान्य व चार साड्या अशी मदत घरी जाऊन त्यांना सुपूर्द करण्यात आली.
         गारपिटीची माहिती मिळताच आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तत्काळ शासकीय यंत्रणा कामाला लावली. स्वतः सकाळी नुकसानग्रस्त भागात जाऊन शेतकरी बांधवांची व कुटुंबीयांची भेट घेतली. परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत त्यांना धीर दिला. या गारपीटीत मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान झाले. सर्व परिस्थिती पाहता तात्काळ मुख्यमंत्री महोदयांची बोलून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकरी बांधवांना दिले. या प्रसंगी प्रतिनिधी भाऊराव  बागुल, शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ  गिडगे, राजाभाऊ पवार , राजाभाऊ देशमुख, अंकुश तात्या कातकडे ,योगेश पाटील, किशोर लहाने, अनिल तात्या रिंडे, रफिक भाई पठाण , बापूसाहेब जाधव राजेभाऊ सांगळे , दत्तू आबा पवार, संतोष सांगळे, भाऊसाहेब पवार, दतू काळे, अनिल काळे, रोहिदास पिंपळे, सुरेश काळे, आप्पा गुंडगळ, आदी उपस्थित होते.

Tuesday, November 28, 2023

नांदगाव महाविद्यालयाचे सहा मुलींचे बॉक्सिंग स्पर्धेत राज्यस्तरावर निवड,

                 छायाचित्रकार - सुहास पुलतांबेकर


नांदगाव ( प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या  संयुक्त विद्यमाने रविवारी दि. २६ रोजी संपन्न झालेल्या विभागीय स्तर बॉक्सिंग स्पर्धा मध्ये नांदगाव येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय 
 मुलींचा संघ सहभागी झाला होता . या स्पर्धेत एकूण तेरा मुलीचा सहभाग होता. यापैकी आशा कांदे (अकरावी आर्ट्स ),योगेश्वरी गुंजाळ (अकरावी विज्ञान), ज्योती बुरकुल (अकरावी आर्ट्स), कावेरी औशीकर (बारावी आर्ट्स), श्रुती आहेर (अकरावी विज्ञान) नीलम मोकळ (अकरावी आर्ट्स)इत्यादी सहा मुलींची राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा अकोला येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे ,अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब श्रीसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नांदगाव चे संचालक अमित बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे उपप्राचार्य संजय मराठे व सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थिनींना तांत्रिक व योग्य मार्गदर्शन क्रीडा संचालक लोकेश गळदगे आणि उपप्राचार्य दयाराम राठोड यांचे लाभले.

नांदगाव तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची भाजपच्या वतीने पाहणी दौरा,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील  झालेल्या गारपीट आणि तुफान वादळ पाऊसाने, आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात बऱ्याच शेतकरी बांधवांच्या शेतीचे, घरांचे, जनावरांचे बरेच नुकसान झाले. निसर्गाच्या झालेल्या अशा प्रकोपाची तत्काळ दखल घेत  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ.भारती  पवार यांचे स्वीय सहायक प्रवीण रौंदळ यांनी नांदगाव तालुक्यातील नुकसानाची पाहणी केली.  शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले. नांदगाव तालुक्यातील गारपीट ग्रस्त जामदरी, आदी भागांना या वेळी भेटी देण्यात आल्या. या वेळी पाहणी दौऱ्यात भा.ज.पा च्या जेष्ठ नेत्या ॲड. जयश्री ताई दौंड, भा.ज.पा किसान मोर्चा चे नाशिक जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे, भा.ज.पा नांदगाव तालुका अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे, भा.ज.पा नांदगाव शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, तालुका सरचिटणीस संदिप पगार, नांदगाव शहर सरचिटणीस राजेंद्र गांगुर्डे, ओ.बी.सी मोर्चा चे शहर अध्यक्ष दिनेश दिंडे सर आणि भा.ज.पा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ॲड. जयश्रीताई दौंड यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व सरसकट पंचनामे करावे अशा सूचनाही उपस्थित सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांना दिल्या. आणि कोणत्या ही अधिकाऱ्याने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात कसूर केला त्याची गय केली जाणार नाही अशा सुचना त्या वेळी दिल्या.  केंद्रीय मंत्री भारती  पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे नुकसान भरपाई मिळुन देण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रौंदळ व भा.ज.पा पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगुन आश्वस्त केले व धीर दिला. या पाहणी दौरा वेळी भा.ज.पा चे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्कल, तलाठी, ग्रामसेवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, November 27, 2023

नांदगाव तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची आमदार सुहास कांदे यांच्याकडून पाहणी,





नांदगाव ( प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे यांनी  गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी सोबत प्रांत गाढवे साहेब, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, बीडीओ दळवी साहेब, संबंधित ग्रामसेवक, तलाटी सोबत होते.
   जोंधळवाडी शास्त्रीनगर व धोटाने नागापूर या परिसरातील झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी यावेळी करण्यात आली. काल झालेल्या गारपिटी मुळे शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतमाल उध्वस्त झाल्याचे दिसून आले.
   आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शेतात बांधावर जाऊन शेतमालाचे नुकसान झालेल्या संबंधित शेतकऱ्यांना व कुटुंबीयांना भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधला घटनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी लवकरात लवकर आपणास नुकसान भरपाई मदत मिळून देण्याचे आश्वासन दिले.  मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगून तात्काळ नुकसान भरपाई मंजूर करून घेणार असल्याचे शेतकरी बांधवांना सांगितले.
  याप्रसंगी सर्व शिवसेना पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

Sunday, November 26, 2023

नांदगाव येथे आधार बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे संविधान दिन साजरा,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील आधार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला .या प्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविक वाचणं करण्यात आले. लहान मुलाना सोप्या भाषेत संविधाना चे महत्त्व सांगण्यात आले. या प्रसंगी दिव्यानी राजू पवार, कादंबरी सरोदे,  रुही अभ्यंकर,  भूमिका सोनवणे,  पूर्वा सोनवणे ,धनश्री सोनवणे ,भारती सोनवणे, प्रणव सोनगिरे,  जयेश सोनवणे,  दुर्गा सिरसाट, आरोशि कुमावत,  आरोही कांबळे, सोहम मुळे आदी लहान मुले उपस्थित होते. आधार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने विद्या कसबे यांनी संविधान दिनानिमित्त लहान मुलाना मिठाई वाटप केले.

नांदगाव मधील शनी चौक येथे शहर भाजपकडून संविधान दिवस कार्यक्रम,





नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव मध्ये संविधान दिन कार्यक्रम तसेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम आणि २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना व निर्दोष नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या विचारांना जन सामान्य नागरिकांना पर्यंत पोहचवण्यासाठी शनी मंदिर येथे भाजप नांदगाव शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी आयोजन केले होते. सदर कार्यक्रमात भा.ज.पा च्या नेत्या ॲड. जयश्रीताई दौंड यांनी सर्व उपस्थितांना संविधान दिनाची माहिती दिली. तसेच सर्वांनी संविधानातील प्रस्तावनेचे वाचन केले.  कार्यक्रमास भा.ज.पा जिल्हा सरचिटणीस संजय सानप, भा.ज.पा तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, भा.ज.पा शहर उपाध्यक्ष दिपक पाटील, ॲड. बी.आर चौधरी साहेब, बबनराव मोरे, भा.ज.पा शहर सरचिटणीस सोमनाथ घोंगाणे, राजेंद्र गांगुर्डे, सतिष शिंदे, संजय पटेल, ॲड. उमेश सरोदे, दिनेश दिंडे सर, भा.ज.पा महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ.अन्नपूर्णाताई जोशी, सौ.मीनाताई शर्मा, सौ.वर्षाताई शर्मा, सौ.मनिषाताई पाटील, बाळासाहेब बनबेरू, योगेश परदेशी, राजेंद्र कुटे, कोशाध्यक्ष धम्मवेदी बनकर, डॉ.कारभारी आहेर, अनिल बुरकुल, ज्ञानेश्वर बोरसे, नंदकिशोर शर्मा, शाम पांडे, राहुल शर्मा, किरण मोरे, वंश पटाईत, सतिष आहिरे, शिवाजी देवरे, सनी देवरे आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी भारतीय राज्य घटनेचे पूजन केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Saturday, November 25, 2023

किसान विद्यालयात माजी विद्यार्थी व शिक्षकाचा जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा साजरा,





नांदगाव (प्रतिनिधी ) - इयत्ता दहावी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. असा हा टप्पा ओलांडून आज आम्हांला २३ वर्षे झाली, अर्थातच ते साल होते २००० नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे किसान माध्यमिक विद्यालय, वाखारी ता.नांदगांव जि. नाशिक इथून दहावीची परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांशी मित्र, मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले. करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं. पण व्हॉट्सअँप ग्रुपने आमच्या मैत्रीचा पुर्नजन्म घडवला.
    आमच्या दहावीच्या १९९९-२००० च्या दहावीच्या बॅच चा माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ११ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत किसान माध्यमिक विद्यालय येथे साजरा करण्यात आला. गुरुजनांचे आगमन झाल्यानंतर वेलकम ड्रिंक काॅफी देऊन स्वागत करण्यात आले.जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्व गुरुजनांचा सुचनेनुसार दहावीच्या वेळेचा नित्यक्रम सुरूवातीला कचरा गोळा करून, नंतर मांडवडेसर, वाघसर व   बागुलसर यांचा आज्ञेनुसार राष्ट्रगीत,"हे परमात्म " प्रार्थना, व प्रतिज्ञा झाली. त्यानंतर ओळीने वर्गात जाऊन वर्गशिक्षक नावरकरसर यांनी हजेरी घेतली. मग कोणत्याही कार्यक्रमासाठी अध्यक्षांची निवड ही गरजेची असते मग आयोजकांनी नियोजन केल्यानुसार अध्यक्ष विजयजी चोपडा यांच्यासह सर्व गुरुजन मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. KMV 1999-2000 X CLASS या व्हाटसप ग्रुप ला पाचवा वर्धापनदिन केक कापून साजरा करण्यात आला. सर्व गुरुजनांचा सन्मान शेला, सन्मानचिन्ह, व मिठाई देऊन करण्यात आला.तसेच विघालयाला छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर फोटोफ्रेम देण्यात आली.प्रास्तविक प्रमोद बोडके, सुत्रसंचलन जीवन ठाकरे व प्रदीप बोडके यांनी केले. नंतर अनिल गोटे,सुनिता गोटे, सुवर्णा काकळीज,मच्छिंद्र बोडके,किरण पाटील, हेमंत जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर सर्व गुरुजनांनी मार्गदर्शन पर भाषण करीत काही जुन्या आठवणी व जीवनात यशस्वी कसे व्हावे,मैत्री, यावर विचार व्यक्त केले.व अतिशय सुदंर नियोजनाचे कौतुक केले. शालेय समितीचे अध्यक्ष  विजय चोपडा सरांनी मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थी जरी असले तरी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासत केले. नंतर सर्वांनी चवीष्ट स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. गुरूजनांचा हस्ते विघालयात वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख उपस्थिती विजय चोपडा सर(शालेय समिती अध्यक्ष) ,दीपक गणपत बाकळे ( प्रमुख पाहुणे), नरेंद्र रामभाऊ नावरकर,भागचंद भाऊराव मांडवडे,सुभाष विश्वासराव लाड,संजय रघुनाथ वाघ,गोरक्षनाथ रघुनाथ बागुल,विलास यादव काकळीज,राजेंद्र दशरथ भगत,पोपट भीमजी चव्हाण,रमण दादा गोटे,मधुकर माधवराव बोबडे,केसर ससे बटाला,विजय श्रावण नागपुरे,शेखर एकनाथ ढेपे,भाऊसाहेब लक्ष्मण गडाख,वृषाली रामकृष्ण भट,स्वाती दिनकर जोशी,अलका काशिनाथ महाजन,गायत्री समाधान बच्छाव आदी मान्यवर गुरू जन उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सुवर्णा काकळीज व निलेश डोंगरे यांनी खुप मेहनत घेऊन विद्यार्थ्यी व शिक्षकांशी संपर्क करून कार्यक्रमाची रुपरेषा व नियोजनाचे मोलाचं कार्य केले.विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणांत नाचगाणी करत एकमेकांची खोडी काढत स्नेहमेळावा पुढचा वेळेस पुन्हा येईन या इराद्याने साजरा केला.

नांदगाव शहरातील नागरी समस्या आठ दिवसांत न सोडविल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा ठाकरे गटाचा इशारा,




नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील नागरी समस्या आठ दिवसांत न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला आहे. शहराचे  मुख्याधिकारी विवेक धांडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. नांदगाव शहरात काही महिन्यांपासून रोगराई, डासांचा प्रादुर्भाव, धुळीचे रस्ते, शौचालयाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याविरोधात नांदगाव शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांची भेट घेत चर्चा करून निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या सर्वच भागातील रस्ते धूळमुक्त करावे,
डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने उपाययोजना कराव्यात, महात्मा फुले चौकातील दाह ते बारा वर्षांपासून पडून असलेल्या गाळ्यांचे वितरण रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना त्वरित करावे, बंद शौचालये सुरू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
      यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, शहरप्रमुख श्रावण आढाव, महिला आघाडी शहरप्रमुख लता कळमकर, उपशहरप्रमुख चेतन शिंदे, दिलीप नंद, सुभाष कवडे, ज्ञानेश्वर पवार, अतुल कासलीवाल, राहुल दरगुडे, तेजस बोराळे, दिलावर इनामदार, संदीप पांडे, अंबादास कसबे, नाविद शेख, विजय बडोदे आदी उपस्थित होते.

Sunday, November 19, 2023

मांडवड येथे साडे पाच फूट लांबीचा कोब्रा विषारी सर्प,




नांदगाव (प्रतिनिधी) - मांडवड येथील अण्णा कारभारी आहेर यांच्या घरी एका पाळीव मोती नावाचं कुत्र्याने साडे पाच फूट लांबीचे कोब्रा जातीचा विषारी साप घरात प्रवेश करत असताना, कुत्र्याने त्याला घरात घुसू दिला नाही. त्याच आवाज ऐकून घरातील माणसे बाहेर आले. आणि बघितलं तर एक भला मोठा साप फन काढून घरा जवळ दरवाजा जवळ बसलेलं होतं आणि मोतीने त्याला घरात जवळ जोरात भुकू लागला . हा थरारक समक्ष बघून घाबरलेले आणि आण्णा आहेर हे बाहेर गावी अशा परिस्थितीत आण्काणा कारभारी आहेर यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला . बडोदे वेळेवर पोहोचले आणि कोब्रा सापाला वेवस्तीत पकडून भयमुक्त केले .  हा उदाहरण दिलं , घराजवळ कुत्रे - मांजरी पाहिजे हा मोती जर राहिला नसता तर कोब्रा घरात प्रवेश केलंच असता , त्यामुळे कुत्रे पाळला तो आपलं रक्षण करतोच अशी माहिती देऊन कोब्राला निसर्गमुक्त केले.

Saturday, November 18, 2023

शाळा भरली...२३ वर्षांनी...शाळा सुटली... २३ वर्षांनी,




अक्षराज : निवृत्ती शिंदे 
नांदगाव,  नाशिक -  तब्बल २३ वर्षानंतर पुन्हा भरणार शाळा या मथळ्याखाली दैनिक अक्षराजच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. तीच शाळा ..किसान माध्यमिक विद्यालय वाखारी येथे १७ नोव्हेंबर २०२३रोजी विद्यालयाच्या आवारात सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आयोजकांनी उत्तम नियोजन करत २३ वर्षानंतर पुन्हा शाळा भरवली. त्या क्षणाचा आनंद घेत/ देत शाळेतील साफसफाई पासून ते प्रार्थना, वर्गातील हजेरी ते शाळेची सुट्टी होईपर्यंत वर्गशिक्षक व विषय शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी या शालेय दिवसाचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थी आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत भाऊक मनाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांप्रती असलेला आदर व्यक्त करत शालेय जीवनातील आपल्या आठवणी प्रसंग सांगत आपले मनोगत व्यक्त केले‌.
कडक स्वभाव व शिक्षकांच्या शिस्तप्रियतेचा फायदा मुलांना आयुष्यात कसा झाला, म्हणून या बॅचचे आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत, म्हणून आज खऱ्या अर्थाने घडलेले विद्यार्थी हेच शिक्षकांची संपत्ती आहेत असे
  शिक्षक व विद्यार्थी व्यक्त झाले. 
विद्यार्थ्यांबरोबरच वाखारी गावा सोबत आपली नाळ कशी घट्ट झाली, गावात आपले संबंध सर्वांसोबत कसे चांगले स्वरूपात होते, याबाबत सर्व शिक्षकांनी शाळा, विद्यार्थी व गावाप्रती आपले प्रेम व्यक्त केले. 
     विद्यार्थ्यांच्या या स्नेह मेळाव्या मागील कल्पकता बघून आपण भारावून गेलो आहोत अशी प्रतिक्रिया देत शिक्षक व्यक्त होत होते. सर्वांनी स्नेहभोजन तसेच फोटो सेशन करत खूप खूप आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. १९९९/२००० बॅचच्या स्नेह मेळाव्याची आठवण म्हणून वृक्ष लागवड देखील करण्यात आली
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष विजय चोपडा सर हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते, विद्यार्थी जीवण ठाकरे व प्रदीप बोडके यांनी सूत्रसंचालन केले. आपण सर्व मित्र यापुढे प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी राहून एकमेकांना नेहमी सहकार्य करू, मन मोकळे करण्यासाठी मित्र ही एकच जागा आहे अशा भावना व्यक्त करत, पुन्हा भेटू म्हणत कार्यक्रमाची सांगता केली.

नांदगावात शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन,





नांदगाव( प्रतिनिधी ) - हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदगाव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे येथील मालेगाव रोडजवळील शनिमंदिर उद्यानामध्ये प्रतिमापूजन करण्यात येऊन अभिवादन केले. तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, शहराध्यक्ष श्रावण आढाव, शिवसैनिक तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते.

Monday, November 13, 2023

नांदगाव येथे शिवसंस्कार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतिने एक हात मदतीचा !!






नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगांव शहरातील शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने गरजूंना दिवाळीचा फराळ व गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. नांदगाव येथील ढासे मळा, जतपुरा रोड येथे आपल्या बहिन-भाऊना दिवाळीची भेट म्हणून फराळ व गोड पदार्थ देण्यात आले. या कार्यक्रमात आलेल्या मान्यवरानी दिवाळीच्या नागरिकांना शुभेछ्या दिल्या. यावेळेस् शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे नूतनअध्यक्ष प्रकाश ढगे, उपाध्यक्ष नरेंद्र पारख, जगन्नाथ सालुंके, गरुड़ नाना, राजेंद्र दुसाने, वामनदादा पोतदार, बळवंत शिंदे, संजय पटेल, प्रसाद बुरकुल, सामाजिक कार्यकर्ते संजय मोकळ, सुमित गुप्ता, सुशिल बागुल, नारायण वाघ आदि सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
     सूत्रसंचालन व कार्यक्रमाची रूप-रेखा सुमित गुप्ता यांनी सांभाळलं होतं.

Friday, November 10, 2023

दुष्काळग्रस्त तालुका आणि दुष्काळसदृश्य महसूल मंडळ ह्यातील तफावत प्रशासनाने स्पष्ट करावी - महेंद्र बोरसे








 नांदगाव (प्रतिनिधी) - केंद्र सरकारच्या दुष्काळ सहिंतेनुसर ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत मिळणार असून ह्या तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे आणि फळबागांचे नुकसान ह्यांचे पंचनामे करण्यासाठी गावनिहाय समिती नेमून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त जाहीर तालुक्यांना मिळणारे हेक्टरी अनुदान, पिक कर्ज माफ व अनुषंगिक सर्व सवलती दुष्काळसदृश्य महसूल मंडळांना मिळणार आहेत का? हा खुलासा प्रशासनाने करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केले आहे.जेणे करून जनतेच्या मनातील संभ्रम दूर होतील. कारण केंद्राच्या यादीत समाविष्ट ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळणारे लाभ जर राज्य पातळीवर घोषित दुष्काळसदृश्य मंडळांना मिळणार नसतील तर मदतीच्या आकड्यामध्ये असणारी मोठी तफावत जनतेचे नुकसान करणारी असेल.
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि ट्रिगर -१ ट्रिगर-२ चे सर्व निकष नांदगांव तालुक्याला तंतोतंत लागू होत असतानाही तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त जाहीर ४० तालुक्यात झाला नाही, राज्यातील ९५९ मंडळातील काल घोषित दुष्काळसदृश्य महसूल मंडळांमध्ये नासिक जिल्ह्यातील ४६ मंडळांचा समावेश असून त्यात नांदगांव तालुक्यांतील ८ पैकी ५ मंडळ पात्र ठरले आहेत .वगळलेल्या तिन महसूल मंडळांचा समावेश यथावकाश होईलच ही अपेक्षा आहे.
    राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या नासिक जिल्ह्यातील ४६ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यात नांदगाव तालुक्यांतील एकूण ८ महसूल मंडळापैकी नांदगांव, मनमाड, जातेगाव, वेहेळगाव, हिसवळ बुद्रूक या ५ महसुली मंडळात दुष्काळ सदृश्य उपाययोजना लागू करण्यात आल्या असून उर्वरीत न्यायडोंगरी, बाणगाव व भार्डी महसूल मंडळांचा समावेश काही तांत्रिक बाबीमुळे झाला नाही असे समजते. नव्याने अस्तित्वात आलेली महसुली मंडळे जिथे पर्जन्यमापक बसविले नाहीत, तसेच नादुरूस्त पर्जन्यमापके असलेली महसुली मंडळे येथून देखील नव्याने माहिती मागवून वगळल्या गेलेल्या महसूल मंडळांचा फेर आढावा जिल्हाधिकारी  अध्यक्षतेखाली गठीत समिती घेणार असल्याचे समजते. खरे तर जुन्या महसूल मंडळांचा आधार घेऊन नव्याने तयार झालेल्या मंडळाबाबत सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते. पण तसे काही घडले नाही आणि तीन मंडळातील जनतेत सध्या तरी वेठीस धरल्याची भावना निर्माण झाली आहे.
दुष्काळसदृष्य घोषित महसुली मंडळाना ४० तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले आहे.
केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती घोषित ५ महसुली मंडळामध्ये देण्यात येतील असे समजते.
पशू संवर्धन विभागामार्फत जनावरांसाठी चारा पिके आणि मुरघास योजना आखली गेली आहे, त्या संदर्भात प्रशासनाने आपल्या स्तरावरून प्रत्येक गावात ह्या संदर्भात विशेष मोहीम राबवून शेतकरी वर्गात योजनेची माहिती पोहचावावी. 
राज्य सरकारने घोषित केलेल्या सवलतीमध्ये हेक्टरी अनुदान आणि पीककर्ज माफी ह्या बाबतीत अजून तरी स्पष्टता नसल्याने यंत्रणेने ह्या बाबत अद्याप पर्यन्त खुलासा केला नाही, ह्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा आहे.
दुष्काळ संदर्भात करावयाच्या उपाययोजना आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने आपल्या स्तरावरून उचित खबरदारी घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे.


नांदगाव येथे शहर भाजपकडून चनाडाळचे वाटप,






नांदगाव( प्रतिनिधी) - भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि मार्केटिंग फेडरेशन तर्फे नागरिकांसाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर येथील भारतीय जनता पक्षा तर्फे उचित मूल्य केंद्रा तर्फे ६० ₹ प्रती किलो भारत डाळ या नावाने चना डाळ विक्री केली गेली या वेळी नागरिकांनी डाळ खरेदी करण्यासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवाळी निमित्त नागरिकांना स्वस्तात आणि चांगल्या दर्जाची चना डाळ मिळावी म्हणुन भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि मार्केटिंग फेडरेशन तर्फे ६०₹ दराने उचित मूल्य केंद्रावर भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस संजय सानप, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, युवा मोर्चा चे शहर अध्यक्ष अशोक पेंढारकर शहर सरचिटणीस सोमनाथ घोगांणे यांच्या हस्ते नागरिकांना स्वस्तात भारत डाळ या नावाने चना डाळ वितरित करण्यात आली. केंद्रावर डाळ खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली असता या उपक्रमाला शहरातुन मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. नांदगाव शहरातील प्रत्येक विभागात उचित मूल्य केंद्रा तर्फे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चना डाळ वितरित करण्यात येणार असुन नागरिकांनी डाळ खरेदी करते वेळी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड सोबत आणणे आवश्यक असुन एका व्यक्तीला एका आधार कार्ड वर ५ कीलो चना डाळ घेता येईल तसेच सदरची योजना हि स्टॉक उपलब्ध असे पर्यंत सुरु राहणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी केले. या वेळी शहर उपाध्यक्ष भगवान तात्या सोनवणे, मनोज शर्मा, बळवंत शिंदे, शहर सरचिटणीस सोमनाथ घोंगाणे, सतिष शिंदे, महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ.अन्नपुर्णा ताई जोशी, सौ.तारा ताई शर्मा, अनु जाती मोर्चा शहर अध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे, ॲड.हिरालाल गांधी, कोषाध्यक्ष धम्मवेदी बनकर, भा.ज.पा ओबीसी मोर्चा चे किरण पैठणकर, उद्योग आघाडी शहर अध्यक्ष यश सेठी, शंकर वाघमोडे, प्रशांत सोनवणे, वंश पटाईत आदी सह नागरीक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, November 9, 2023

नांदगाव तालुक्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर उपोषण करणाऱ्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण घेतले मागे,




नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील पाच महसूली मंडळाचा दुष्काळसदृश यादीत समावेश झाल्याने दुष्काळाच्या प्रश्नावर उपोषण करणाऱ्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपोषण मागे घ्यावे असा निरोप दूरध्वनीद्वारे दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणाला  तिसरा दिवस होता. नांदगावचे तहसीलदार डॉ .सिद्धार्थ मोरे, तालुका कृषी अधिकारी आर. जी. डमाळे 
यांनी उपोषणस्थळी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय पाटील यांना पाणी दिले. पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी दुष्काळ जाहीर होईपर्यंत उपोषण आंदोलन सुरु केले होते. उरलेली तिन्ही मंडळे लवकर जाहीर होतील असेही छगन भुजबळ यांनी कळविल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी संचालक अमित पाटील, विनोद शेलार, प्रसाद सोनवणे, सोपान पवार, राजेंद्र लाठे, बाळासाहेब देहाडराय. माजी नगराध्यक्ष अरुण पाटील माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर गौतम जगताप, दिगंबर सोनवणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

नांदगाव तालुका जाहीर करण्यासंदर्भात तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांनी बैठक घेण्याचे दिले आश्वासन,




नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्याची दुष्काळाची दहाकता व शेतकऱ्यांसह पशुधनाची अनावस्था पाहता नांदगाव तालुका दुष्काळी घोषित करावा यासाठी नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) वतीने नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर होत नाही , तोपर्यंत नांदगाव तहसील कार्यालया समोर मंगळवार दि. ७ नोव्हेंबर २०२३ पासून तालुकाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले होते . राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना रविवारी दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.  त्या अनुषंगाने मंत्री छगन भुजबळ  यांनी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत नांदगाव तालुका दुष्काळी व्हावा अशी मागणी केली. त्यानंतर गुरुवारी दि. ९ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची दुष्काळासंदर्भात खास बैठक झाली व या बैठकीत नांदगाव तालुक्यातील एकूण आठ मंडळांपैकी पाच मंडळे दुष्काळी जाहीर करण्यात आले त्यात मनमाड, नांदगाव, जातेगाव, वेहळगाव व हिसवाळ ही मंडळे दुष्काळी घोषित करण्यात आली. उर्वरित तीन मंडळे म्हणजेच बाणगाव, न्यायडोंगरी व भार्डी या मंडळात पर्जन्यवृष्टी मापक नसल्याकारणाने ही मंडळे अद्यापही दुष्काळी घोषित होणे बाकी आहेत.  परंतु लवकरात लवकर ही तिनही मंडळे दुष्काळी जाहीर होतील,  असे दूरध्वनी द्वारे मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व उपोषणकर्ते कार्यकर्त्यांना सांगितले.याचबरोबर मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीट झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मिळावे तसेच वाड्या वस्त्या व गावासाठी पिण्यायोग्य पाणीपुरवठा करणे, जनावरांसाठी चारा व पाणी उपलब्ध करून चारा छावणी सुरू करणे, शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करणे, तसेच २०२३-२४ च्या शेतीसाठी झालेल्या खर्चाचे नुकसान भरपाई मिळणे इत्यादी मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.  यासाठी नांदगाव तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी येत्या चार ते पाच दिवसात मीटिंग घेऊन सर्व डिपार्टमेंट च्या अधिकाऱ्यांना बोलवून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.
          नांदगांव तालुका तहसीलदार डॉ .सिद्धार्थ मोरे, तालुका कृषी अधिकारी आर .जी. डमाळे व गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, अरुण पाटील, विनोद शेलार, अमित पाटील, प्रसाद सोनवणे, सोपान पवार, राजेंद्र लाठे, बाळासाहेब देहाडराय, गौतम जगताप, दिगंबर सोनवणे, प्रताप गरुड, रामदास पवार, पंडित सूर्यवंशी, अशोक पाटील, देवदत्त सोनवणे, वाल्मिक टिळेकर, दत्तू पवार, किसन जगधने, सुशील आंबेकर, राजेंद्र सावंत, देविदास पगार, अतुल पाटील, प्रल्हाद मंडलिक, योगेश पाटील, घनश्याम सुरसे, विश्वनाथ बोरसे, प्रशांत बोरसे, हरिदास पाटील, तानसेन जगताप, शंकर शिंदे, जगदीश सुरसे, महेश पवार, शिवाजी जाधव, दारासिंग भिडे, चंद्रकला बोरसे, सुगंधा खैरनार, अलका आयनोर, सखाराम चव्हाण, बापू खैरनार, संतोष सरोदे, सचिन जेजुरकर, संपत पवार, बापू बिन्नर, भगवान मोरे, रमेश राठोड, सागर आहेर, संजय मोकळ, कृष्णा त्रिभुवन, अर्जुन खेमगर, मच्छिंद्र हिरे, जाहीर सौदागर, शुभम बोरसे, मंगेश देशमुख, बाळासाहेब महाजन लक्ष्मण बोगीर, सखाराम भुसनर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, November 8, 2023

दोन तरुणींची बंधाऱ्याच्या पात्रात बुडून मृत्यू , नांदगाव तालुक्यातील चिंचविहिर येथील घटना ,







नांदगाव (प्रतिनिधी ) -  नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथील  दोन तरुणींची बंधाऱ्याच्या पात्रात बुडून मृत्यू   झाल्याची घटना बुधवारी दि. ८ ला  घडली. यात  पूजा अशोक जाधव वय (१६), खुशी देवीदास भालेकर (१६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने चिंचविहिर गावात हळहळ व्यक्त होत आहे. 
           चिंचविहीर येथील पूजा जाधव, खुशी भालेकर, कावेरी भालेकर या तीन तरुणी कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या असताना ही घटना घडली. कावेरी भालेकर हिला पुढील उपचारासाठी  मालेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूजा व खुशी यांचा पाय घसरून पडल्यामुळे एकमेकांना वाचविण्यासाठी प्रयत्नात दोघी खोल पाण्यात बुडाल्या. काही तरुणांनी तातडीने मदत करत बंधाऱ्यात बुडालेल्या तरुणीना तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. राठोड यांनी दोघींना मृत घोषित केले. याप्रकरणी नांदगाव पोलिसात नोंद  करण्यात आली आहे.

Tuesday, November 7, 2023

नांदगाव मध्ये भाजप शहर कार्यकारणी घोषित !! शहरात विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू,




 
नांदगांव (प्रतिनिधी ) - नांदगाव मध्ये भाजपच्या कार्यकारिणीत नांदगांव शहर प्रमुख राजेश बनकर (माजी नगराध्यक्ष) यांनी विविध पदांच्या संघटनात्मक नियुक्तीची घोषणा केली.  या प्रंसंगी विविध पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी भाजपाच्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती देण्यात आली.यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष  राजेश बनकर ,जिल्हासरचिटणीस संजय सानप , युवा मोर्चा जिल्हा प्रमुख सुनिल पवार ,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आदेश सानप , ओबीसी मोर्चा शहर युवा अध्यक्ष अशोक पेंढारकर , ओबीसी प्रमुख  दिनेश दिंडे ,कोषाध्यक्ष धंम्म बनकर ,शहर सरचिटणीस सोमनाथ घोंगाणे  ,शहर उपाध्यक्षमनोज शर्मा , डाॅ बाळासाहेब आहेर, आदी मान्यवर उपस्थित होते .
        भाजप पक्षात या प्रसंगी उद्वव ठाकरे गटाचे सतिष अहिरे यांनी भाजपात प्रवेश केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लागू केलेल्या योजना राबविण्याचे काम नांदगांव शहरात चालू आहे .भविष्यात चांगले काम करणारे पदाधिकारी याची निवड करण्यात आली आहे .या वेळी मेरी मिट्टी मेरा अभिमान या सह योजनांची सविस्तर माहिती दिली.  संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्नात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच विश्वकर्मा संयोजक या साठी प्रशिक्षण देऊन कर्ज वाटप करणे , प्रशिक्षणार्थींना प्रत्येकी एक लाख रुपये कर्जाची शिफारस आदी योजना राबविण्यासाठी नांदगांव शहर भाजपा कडुन प्रयत्न चालू आहे .  तसेच दिवाळी सणाला स्वस्तदारात चनादाळ ६० रू किलो , १ का आधार कार्डवर ५ किलो चनादाळ , विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून १२ बलुतेदारासाठी प्रयत्न सुरु केले आहेत या सह सविस्तर माहिती देण्यात आली .
     नांदगाव शहराची कार्यकारणी शहराध्यक्ष राजेश बनकर  यांनी घोषित केली. यामध्ये उपाध्यक्षपदी भगवान सोनवणे , मनोज शर्मा,  दिपक पाटील , दिनेश जेजूरकर , संतोष शिदें , बळवंत शिंदे ,सरचिटणीस सोमनाथ घोगांणे , सतिष शिदें , मनिषा पाटील , चिटणीस शुभम सौदांणे , श्रावण पवार , गणेश देवरे , तुळशीराम भालेराव , कोषाध्यक्ष धम्मवेदी बनकर , युवा मार्चा शहर अध्यक्ष अशोक पेठांरकर '
, ओबीसी मोर्चा दिनेश दिडें , महिला मोर्चा शहर अध्यक्ष अन्नपुर्णा जोशी , अनु. जाती मोर्चा राजाभाऊ गांगुर्डे , ओबीसी महिला शहर अध्यक्ष सुनिता पवार , किसान मोर्चा योगेश परदेशी , उद्योग आघाडी यश सेठी , व्यापारी आघाडी मनोज कासलीवाल , वैद्यकीय आघाडी डॉ. तेजस परदेशी ,ओबीसी युवा मोर्चा पंकज जंगम ,निमंत्रीत सदस्य ,व शहर कार्यकारणी व सदस्यांची नियुक्तीची माहिती देण्यात आली . यावेळी  नांदगांव शहरात प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात माहिती घेऊन सादर करण्याचे सूचित करण्यात आले .

Monday, November 6, 2023

नांदगावच्या पंचायत समितीवर शालेय पोषण आहार समितीच्या महिलांचा मोर्चा,





नांदगाव (प्रतिनिधी) - शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना अत्यंत तुटपुंज्या स्वरुपात मानधन मिळते. यासह अन्न शिजवताना अनेकदा अपघात होऊन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना अपघाती विमा मिळावा यासाठी आधारवड महिला बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यात अध्यक्ष संगिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कोण म्हणतं देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही. एक रुपयाचा कढीपत्ता सरकार आमचे बेपत्ता आशा स्वरूपात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रभारी अधिकारी नंदा ठोके यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व वरिष्ठ स्तरावर आम्ही आपल्या मागण्या कळवतो असे आश्वासन दिले.  हा मोर्चा छोट्या स्वरूपात काढला आहे , भविष्यात याचे रुद्र रूप धारण करून सरकारला धारेवर धरू असे सोनवणे यांनी यावेळी सांगितले.नांदगाव तालुक्यातील शेकडो महिला  मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

भारतीय जनता पक्षाची वारियर आणि बुथ प्रमुखाची बैठक संपन्न,



नांदगाव (प्रतिनिधी) -  भारतीय जनता पार्टीची वारियर आणि बुथ प्रमुख बैठक जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. येथील हनुमान टेकडी येथे सदर बैठकिचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपिठावर जिल्हा नेत्या अॅड.जयश्रीताई दोंड, विधानसभा निवडणुक प्रमुख पंकज खताळ, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, जिल्हा विस्तारक दत्ताभाऊ सानप, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सजन कवडे, जि.चिटणीस डाॅ.राजेंद्र आहेर, एस.सी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबाजी शिरसाठ, शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषा काकड, युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक पेंढारकर उपस्थित होते. बैठकी दरम्यान ॲड हिरालाल गांधी, बळवंत शिंदे, सौ. अन्नपुर्णा ताई जोशी, किशोर शिंदे, यासह विविध पक्ष, संघटनाच्या महिलांनी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी पक्षात प्रवेश कर्त्यांचे स्वागत व सत्कार केला. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष वाघ यांनी केंद्र व राज्याच्या विविध योजनांची माहिती देऊन नियुक्ती करण्यात आलेल्या वारियर आणि बुथ प्रमुखांची जबाबदारी व उद्दिष्ट्ये त्यांनी विषेद केली दरम्यान जिल्हा अध्यक्ष वाघ यांची भारत सरकारच्या पी.एम विश्वकर्मा केंद्रीय शासकीय कमिटी वर जिल्हा संयोजक म्हणुन नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार नांदगाव शहराच्या वतीने भा.ज.पा. शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी केला. तर शहर उपाध्यक्ष मनोज शर्मा यांचा ही वाढदिवसा निमित्त केक कापून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष दिनेश दिंडे, व्दारकानाथ कलंत्री, भगवान सोनवणे, किरण पैठणकर, हेमा बनबेरू, मिना शर्मा, भुमिका शर्मा, वंदना मोरे, जान्वी शर्मा, तारा शर्मा, विद्या कुलकर्णी, आशा बनबेरू, शुभम सौंदाणे, कृष्णा देहाडराय, सोमनाथ घोगाणे, यश सेठी, सतिष शिंदे, संजय पटेल, पंकज जंगम, दर्शन शर्मा, प्रशांत सोनवणे, सतिष अहिरे, रितेश काकड, भिकन वाघ, भालचंद्र जोशी, गणेश सागर, शांताराम सागर, दिंगबर, कर्डे, अविनाश मगर, रविंद्र गवळे, भूमीका शर्मा यांसह भारतीय जनता पार्टिचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकिचे सूत्रसंचालन भा.ज.पा अनु. जाती शहराध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे व भरत काकड यांनी केले. तर आभार जिल्हा सरचिटणीस संजय सानप यांनी मानले. बैठकिचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आले.

Sunday, November 5, 2023

नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन,






नांदगाव(प्रतिनिधी ) - नांदगाव मतदारसंघात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रचंड दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी  नांदगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात भेट घेत निवेदन दिले.
   यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय चव्हाण पाटील, विनोद शेलार, अमित बोरसे, प्रसाद सोनवणे, नगरसेवक वाल्मिक टिळेकर,सोपान पवार, राजेंद्र लाढे, दत्तू पवार, देवदत्त सोनवणे, अशोक पाटील, जगदीश सुरसे, विश्वनाथ बोरसे, शंकर शिंदे, शुभम बोरसे, सुशील आंबेकर, उमाकांत थेटे, रामसिंग पिंगळे,दत्तात्रय निकम, विजय आहेर, खंडू थेटे, प्रवीण मोहिते,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

नांदगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदगाव तालुका दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच,




नांदगाव (प्रतिनिधी) -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदगाव तालुका दुष्काळाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनात  चौथ्या दिवशीही तोडगा निघाला नाही. सुट्टीच्या दिवशीही महसूल व कृषि विभागाची कागदपत्रांची पूर्तता करण्याची धावपळ सुरू होती. तालुका प्रशासनाच्या वतीने अधिकारी वर्गाने उपोषणकर्त्याशी चर्चा करून आजपावेतो तयार केलेले रेकॉर्ड व सुरू असलेले काम ह्या बाबत अवगत केले. जे नुकसान होऊन गेले ते भरून निघणे अवघड आहे मात्र ह्या पुढील उपाययोजना,अनुषंगिक सवलती व अनुदान मिळणेकामी यापुढे तरी हयगय व्हायला नको आणि ऐनवेळी परत येरे माझ्या मागल्या असे होऊन तालुका वंचित राहू नये म्हणुन यंत्रणेने सर्व कागदपत्रांची जमवाजमव करून तत्पर असले पाहीजे ह्या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम आहेत.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त ४० तालुक्यांना मिळणारे अनुदान व सवलती नांदगांव ला लागू होणार का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने दुष्काळग्रस्त ४० तालुक्यात ३ हेक्टर क्षेत्रावर हेक्टरी २२५०० रू.अनुदान देण्याची घोषणा केली आहे. तसेच दुष्काळग्रस्त जाहीर ४०तालुक्यांतील शेतकऱ्यांचे २ लाखा पर्यन्तचे पिक कर्ज राज्य सरकार माफ करणार असल्याचे प्रसार माध्यमातील बातमीनुसार समजते. दुष्काळग्रस्त जाहीर तालुक्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या निकषाप्रमाणे विविध सवलतींची मदत होत असते, त्यामुळें नांदगांव तालुका ह्या निर्णयापासून वंचित राहिल्यास फार मोठी आर्थिक झळ शेतकऱ्यांना बसणार आहे. त्याची जबाबदारी कोणाची? ह्या प्रश्नाचे उत्तर प्रशासन देणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी विचारला आहे.
   शासनाने घोषित केलेल्या सवलती मध्ये जमीन महसुलात सुट, शैक्षणीक फी माफी, पिक कर्ज सवलत, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंप वीजबिलात सूट, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, कृषि पंपांची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादि सवलती पासुन वंचित राहण्याची वेळ जनतेवर येणार आहे.
दुष्काळग्रस्त ४० तालुक्या व्यतिरिक्त राज्यभरातील उर्वरीत दुष्काळसदृश्य तालुक्यांचा आढावा मा.मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उपसमिती घेणार असून त्यात कुठल्या तालुक्यांतील कुठल्या मंडळाला टंचाईसदृश्य घोषित करायचे तो अहवाल मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करेल व त्यानंतर उपसमितीच्या शिफारसीनुसार शासन निर्णय घेणार आहे. १५ डिसेंबर ला अंतिम पैसेवारी जाहिर झाल्यावर राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या टंचाई सदृश्य उपाय योजनात तालुक्यातील एकंदरीत प्रतिकुल परिस्थीती बघता सदर अहवालात तालुक्यातील सर्वच्या सर्व ८ महसूल मंडळांचा समावेश होऊन संपुर्ण तालुक्याला न्याय मिळावा ह्या भूमिकेतून यंत्रणेने कामकाज करणे गरजेचे आहे. दुष्काळग्रस्त व टंचाईसदृश्य ह्या तांत्रिक फरकाचा फटका जनतेला बसू नये हि भावना नजरेसमोर ठेवून राज्य सरकारने नांदगांव तालुक्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
तालुक्यातील जनता व ग्रामपंचायत यंत्रणा ह्यांनी आपापल्या गावातील दुष्काळाची भीषणता प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतने मा. तहसिलदार नांदगाव ह्यांच्या नावे निवेदन सादर करावे असे आवाहन उपोषण कर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Saturday, November 4, 2023

नांदगाव तालुक्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करावा - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ .भारती पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी,






नांदगाव (प्रतिनिधी) - राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा परिणाम झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. खरीप हंगामातील सन २०२३ मधील दुष्काळग्रस्त राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे परंतु , नाशिक जिल्हातील केवळ तीन तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ठ असल्याने उर्वरीत दुष्काळी तालुक्यांचा समावेश करुन संपुर्ण नाशिक जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणुन घोषित करण्याबाबत शुक्रवार ( दि. ०३) रोजी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून केंद्रीय राजमंत्री डॅा. भारती पवार यांनी निवेदन देवुन मागणी केली आहे. यावेळी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॅा. राहुल हे देखील उपस्थित होते. 
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झालं असून अनेक गावांमध्ये आजमितीस टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अनेक तालुक्यांत अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. परिनामी कोरडवाहु शेती तसेच फळबागा व बागायती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतक-यांना कृषीविषयक अनुदान मिळणे गरजेचे आहे. त्यात नदीनाले, छोटे मोठे पाझर तलाव कोरडे ठाक पडली आहेत. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, तालुक्यात काही गावांत भर पावसाळ्यात देखील टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. आता यात आणखी भर पडली असून, प्रशासनाकडे टँकरचीमागणी सुरु झाली आहे. असे असतांना राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्यातील मालेगांव, येवला व सिन्नर हे तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होते मात्र देवळा, चांदवड व नांदगाव, निफाड, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ या तालुक्यांत देखील दुष्काळाची भयावह परिस्थिती असून, तालूक्यातील बहुतांश गावात दिवसाआड तर काही ठिकाणी दैनंदिन टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला असून, पशुपालक मिळेल तेथून व मिळेल त्या किमतीत चारा विकत घेत आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्यात जनतेत व शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचा सूर उमटला असलेयाची बाब मंत्री भारती पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणुन दिली. तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून देवळा, चांदवड व नांदगाव या तालुक्यांसह निफाड, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ या तालुक्यांचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांनी केली आहे.

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर न झाल्यास अजितदादा पवार गटाच्या वतीने उपोषणाचा इशारा,





नांदगाव (प्रतिनिधी )- नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत. यावर्षीच्या जून महिनापासून पाऊसाने दडी मारली तर आत्तापर्यंत अतिशय अल्प १८६.३ मिली पाऊस झाल्याने तालुक्याची आणेवारी ३६ पैशांपर्यंत आहे. तालुक्यात खरीप हंगामाची पीक जमिनीतून फक्त उगवली आहेत‌‌. पुढील वाढीसाठी पाऊसचं पडला नाही. ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान सलग महिनाभर पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम होरपळून गेला. त्यामुळे खरीप हंगामाचे हंगामाचे १००% टक्के नुकसान झाले आहे. जनावरांना चाराही राहिलेला नाही. जनावरं व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहेत. हातांना काम नाही‌. बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहेत.
           तालुक्यात सर्वात कमी पर्जन्यमान व सर्वात कमी पिकांची आणेवारी लागली आहेत. अशा प्रकारचे दुष्काळाची दाहकता नांदगाव तालुक्यात कधीही जाणवली नाही. अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना आजपर्यंत नांदगाव तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला नाही. तरी परिस्थितीचे अवलोकन करून तात्काळ नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा.
           नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास मंगळवार दिनांक- ७ नोव्हेंबर पासून नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (अजित दादा पवार गट) उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदन नायब तहसीलदार केतन कोनकर यांना देण्यात आले.
           यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक विलास राजुळे, महिला तालुकाध्यक्ष योगिता पाटील, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार, सामाजिक न्याय विभाग राजेंद्र लाठे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष वाल्मीक टिळेकर, देवदत्त सोनवणे, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, पंडित सूर्यवंशी, अशोक पाटील, अलका आयनोर, हेमंत देहाडराय, प्रशांत बोरसे, जगदीश सुरसे, शुभम बोरसे, जयवंत सुरसे, शंकर शिंदे, राजेंद्र सावंत, करूणा कासार, लक्ष्मण बोगीर, वाल्मीक वाघमारे, नितीन गांगुर्डे, पंढरीनाथ वाघमारे, संजय सोमासे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी तहसील कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा,



नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नांदगाव तहसील कार्यालयावर शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही अशा घोषणा देण्यात आल्या. नांदगाव तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. वीजबिल माफ झाले पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पिण्याचे पाणी, चारा छावण्या सुरू कराव्यात आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
   प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नांदगाव तालुका दुष्काळी झाला नाही, असा ठपका जिल्हा अध्यक्ष गणेश धात्रक यांनी लगावला आहे. तसेच काही पक्षाचे पदाधिकारी गावोगावी जाऊन दुष्काळाचा दौरा करत होते, तरीदेखील दुष्काळ जाहीर झाला नाही. मग इथे कोण कमी पडले, असेही धात्रक यांनी बोलताना म्हटले आहे.
परंतु आमचा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, प्रशासनाला दुष्काळ संदर्भात ज्या अडी-अडचणी आल्या असतील त्या त्यांनी पूर्ण करून नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यात छेडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नांदगाव  तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, कैलास भाबड , माधव शेलार,श्रावण आढाव, शशिकांत मोरे, संदीप जगताप, संतोष जगताप, शिवाजी वाघ, अनिल दराडे, बाळासाहेब चव्हाण, कविता छाजेड, रेणुका जयस्वाल, मुक्ताबाई नलावडे, लता कळमकर, प्रेरणा गायकवाड, वृषाली आहेर  यांच्यासह  शिवसैनिक, महिला तालुक्यातील आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Friday, November 3, 2023

वारसा हक्काने नोकरी देण्याबाबत कामगार संघटनांच्या नेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन,




नांदगाव (प्रतिनिधी)  - नांदगाव येथील वाल्मीकी, मेहतर, भंगी समाजातील बांधवांना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबत दिवाळीनंतर मुंबईला कामगार संघटनांच्या नेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. त्यामुळे दोन दिवसांपासून येथील पालिका कार्यालयाबाहेर सुरू असलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला.
वाल्मीकी, मेहतर, भंगी या समाजाला वारसाहक्काने नोकरी देण्यात यावी असा न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा नोकरी मिळत नसल्याने व प्रलंबित मागण्यांसाठी वारसदार, कुटुंबातील घटक, सर्व निवृत्त कर्मचारी
सेवानिवृत्त आमरण उपोषण सुरु होते. गुरुवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. त्यातील रणजित आहिरे, बापू भालेकर, प्रदीप भालेकर या तिघा उपोषणार्थीची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. नागसेन चव्हाण यांनीही उपोषणार्थीची भेट घेत त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेत पालिका प्रशासनाला तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करीत वाल्मीकी, मेहतर, भंगी समाजातील बांधवाना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबत दिवाळीनंतर तोडगा काढणार असल्याचे सांगितले. त्यानंतर नांदगाव नगरपरिषद मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी  पालिका कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणकर्ते यांची भेट घेत पालकमंत्री यांनी दिलेली माहिती उपोषणकर्ते यांना दिली. यानंतर आंदोलन रात्री दहा वाजेच्या सुमारात स्थगित करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वारसा हक्काने निवे नियुक्ती मिळण्यासाठी पालिकेला तत्व मार्गदर्शन करण्याचे पत्रच दिले नसल्याने उपोषणावर व आतापावेतो झालेल्या त्याग आंदोलनातून तोडगा निघू शकलेला गोड नाही. यावेळी नांदगाव शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, न.पा.चे राहुल कुंटे , संजय सानप, आनंद शिंदे, सोनू पेवाल,   राजाभाऊ गूढेकर, किरण फुलारे, विकी पेवाल, सचिन गुढेकर, अरबाज बेग, यांन राहुल गुढेकर, सुजित जगताप, हरिभाऊ भालेकर, समाधान सूर्यवंशी, रवी सानप, लखन भालेकर, नंदू ससाणे, दिगंबर  गुढेकर, सुनील गुढेकर उपस्थिती होती.  येथील अरुण पाटील, संतोष गुप्ता, मनोज चोपडे, दिपक सोनवणे,  समाजसेविका संगिता सोनवणे, राकेश चंडाले, प्रदिप थोरात यांनी उपोषणाला पाठींबा दिला.

Wednesday, November 1, 2023

नांदगाव येथील आमरण उपोषणास मनसेचा जाहीर पाठिंबा, सरकारने आरक्षणासंदर्भात लवकर तोडगा काढावा,




नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषण व आमरण उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठींबा देतांना नांदगाव तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा रेखा शेलार,शहराध्यक्ष अभिषेक विघे, शहरसचिव कुणाल सौंदाने आदीची उपस्थिती होती. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी शांततेत आंदोलन, उपोषण चालू आहे. नांदगाव मध्ये साखळी उपोषणाची आमरण उपोषणात रुपांतर होत आहे. तरी सरकार या विषयावर जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे, यांची शासनाने गंभीर विचार करुन मराठा समाजास योग्य तो न्याय द्यावा व मनोज जरांगे पाटील यांचा जीव धोक्यात न घालता यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदगाव तालुक्याच्या वतीने देण्यात आले. मनसेकडून या साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला.

समता परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मूळडोंगरी तांडा येथे शिधापत्रिका वाटप,





नांदगाव (प्रतिनिधी) - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर-एंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ३२ वा वर्धापन दिनानिमित्त मूळडोंगरी तांडा (पांढरावड वस्ती) येथील गोरगरीब महिला व शेतमजूर यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आले.
          यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे, समता परिषद तालुकाध्यक्ष अशोक पाटील, समता परिषद शहराध्यक्ष शिवा सोनवणे, समता परिषद शहराध्यक्षा सुगंधा खैरनार, रा. काँ. सामाजिक न्याय विभाग राजेंद्र लाठे, नगरसेवक वाल्मिक टिळेकर,सोजरा चव्हाण, वैशाली चव्हाण , शोभा चव्हाण, जनाबाई चव्हाण, छकुली चव्हाण ,वैशाली चव्हाण, गिता चव्हाण, ज्योती चव्हाण  वनिता राठोड , अंजना चव्हाण ,सुरेखा चव्हाण, सुनिता चव्हाण, मनीषा चव्हाण, शालू चव्हाण, मोनाली चव्हाण, योजना चव्हाण , वसुनंदा चव्हाण, अनिता चव्हाण, प्रतिभा चव्हाण , वैशाली चव्हाण, सुनिता चव्हाण, सिंधुबाई चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...