Monday, August 29, 2022

उद्या नांदगाव रेल्वे स्टेशनला आरक्षण खिडकी दुपारनंतर बंद राहणार,


नांदगाव(  प्रतिनिधी) - नांदगाव रेल्वे स्टेशनला दि‌ . ३१ अॉगस्ट ( गणेश चतुर्थी) व  २४ अॉक्टोबर ( (दिपावली) रोजी  रेल्वे आरक्षण दुपारनंतर  केंद्र बंद ठेवण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरवर्षी दिवाळी च्या दिवशी रेल्वे आरक्षण केंद्र दुपार सत्रात बंद ठेवण्यात येते. नांदगाव रेल्वे स्टेशनला गाड्या थांबा मिळाल्याने  प्रवाशी ही आरक्षणाचा लाभ घेत आहे. सण-  उत्सव असल्याने प्रत्येक जण आरक्षणासाठी रांगा लावुन प्रवाशी टिकट काढत आहे. पण उद्या रेल्वे आरक्षणाची खिडकी दुपारी बंद राहणार असून, प्रवाशांना टिकट काढण्यासाठी आज आणि उद्या सकाळी वेळ द्यावी लागणार आहे.‌ रेल्वे प्रवास अनेक जण करतात  त्यामुळे सण असल्याने गाड्यामध्ये गर्दी वाढणार  आहे.

नांदगांव शहरातील हुतात्मा स्मारक येथील चौकात चबूतरा सुरक्षेविना,


नांदगाव (प्रतिनिधी )-   नांदगांव शहरातील हुतात्मा स्मारक येथील चौकात  चबूतरा तोडल्याची घटना समोर आली आहे. या रस्त्यावरून नेहमी अवजड वाहने ये - जा होत असते. शहीद जवानाना अभिवादन करणारे स्मारक केव्हा सुरक्षा साखळी ने बनवण्यात येईल असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.  दर वर्षी या स्मारक जवळ काही ना काही अड़चण येऊन ह्या स्मारकला तड़ा जातो किंवा येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्याच्या धड़केने तूटून पड़ते. ह्या स्मारक ची सुरक्षा वाढवली गेली पाहिजेत , अश्या प्रकारे माजी सैनिक, सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक आणि नांदगांव शहरातील नागरिक मागणी करत आहे.

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात साजरा,


 नांदगाव (प्रतिनिधी)  - नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि. २९ अॉगस्ट रोजी  राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना जे.टी. कासलीवाल विद्यालयातील शालेय क्रिडा मंत्री अनुष्का सोनवणे या विद्यार्थ्यीनीच्या हातून प्रतिमा पूजन व पुष्पहार आर्पन करून अभिवादन करण्यात आले. खेळल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते म्हणून आपण दररोज भरपूर खेळलेच पाहिजे. असा संदेश यावेळी देण्यात आला. या निमित्ताने शाळेत खो-खो, कबड्डी सामन्यांचे आणि रिले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेक विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.
   शाळेचे मुख्याध्यापक  मनी चावला सर यांनी या कार्यक्रमानिमित्त विविध खेळांची माहिती दिली. क्रीडा शिक्षक अशोक बागुल यांनी हॉकी खेळाचे नियम समजावून मेजर ध्यानचंद यांची हॉकी खेळातील जागतिक कामगिरीची माहिती दिली.
     सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन श्री. सुनीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल,सर्व पदाधिकारी, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता, प्रिन्सिपल मनी चावला सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Sunday, August 28, 2022

मनमाड बस स्थानकात अधिकृत नाथजल फिरते विक्रेते कडुन वाढीव भावाने विक्री सुरू, प्रवाशांनी दिली तक्रार


  मनमाड ( प्रतिनिधी) - मनमाड शहरातील  मनमाड बस स्थानकात अधिकृत नाथजल पाणी ची चढ्या भावाने विक्री सुरू आहे . एसटी महामंडळ ने प्रवाशांच्या सेवेसाठी नाथजल हे पाणी १ लिटर १५ रू हे भाव असून एसटीमध्ये फिरते विक्रेता कडून १५ चे २० रुपये हे घेण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ बसत आहे. मनमाड बस स्थानकात अनेक प्रवाशी बसने प्रवास करण्यासाठी येत असता, या ठिकाणी वर्दळ कायम असते. वाढीव दराने नाथजल विक्री होत असल्याने अशी तक्रार प्रवासांनी मनमाड बस स्थानक येथे दिली आहे.  जास्त किमतीत पाणी विकत असल्याने त्या फिरते विक्रेत्यावर लोकांवर कठोर कारवाई करून ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी प्रवाशा तर्फे करण्यात येत आहे .

Monday, August 22, 2022

नांदगाव नगरपरिषद शहरात मोकाट जनावरे दिसली तर कडक कारवाई करणार ,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ठिय्या मांडून बसत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.  मुक्या प्राण्यांमुळे शहरात नागरिकांना पायी रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. दिवसभर रस्त्यावरील पादचारी, वाहनधारक यांची कोंडी होत असताना मध्येच होते. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नगर परिषदेने पशुधारकांनी आपल्या मालकीच्या जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा परिषद कडक कारवाई करेल, अशी जाहीर सूचना रिक्षावर लावलेल्या ध्वनिक्षेपकावरून देण्यात येत आहे.
   मालक बिनधास्त जनावरे गावात सोडून देतात व गायीला वासरू झाले की मगच घेऊन येतात दुधाला. अन्यथा ही जनावरे मोकाटच असतात. या भटक्या जनावरांची ठरावीक ठिकाणे आहेत. ती घरे व दुकाने बिनधस्त ते टिपतात. तेथे त्यांना घास, गूळ, दाळ मिळते किवा रात्रीची उरलेली भाजी-भाकर, चपाती मिळते.
एखादा वळू बेकाबू झाला की पळापळ मालक
आहेत. तर पायी चालणारे त्रस्त झाले आहेत. त्यांच्या शेणामुताच्या वासाने नागरिक वैतागले आहेत. अनेकदा नगर परिषद, शाकांबरीचा पूल, शनिमंदिर पेट्रोलपंपासमोर, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, ओटे, बाजारपेठ आदी ठिकाणी ठिय्या मांडून बसतात. नगरपरिषदेने रस्त्यावरील मोकाट जनावरे हटविण्याची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला यश मिळो, अशी सदिच्छा नागरिक व्यक्त करत आहेत. मागच्या महिन्यात विश्वासराव कवडे यांच्या शेतातील मक्याचे उभे पीक या मोकाट जनावरांनी फस्त केले.
तीन दिवसांत मोकाट जनावरे ज्याची असतील त्यांनी घेऊन जा अन्यथा कोंडवाड्यात किंवा गोशाळेत दाखल केली जातील याची सर्वस्वी जबाबदारी मोकाट जनावरांच्या मालकाची राहील, असे नगर परिषदेने कळवले आहे.

शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे जेष्ठ नागरिक संघातील जेष्ठाचा सत्कार,




  नांदगाव ( प्रतिनिधी) -    नांदगांव शहरातील शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे जेष्ठ नागरिक संघातील जेष्ठाचा सत्कार करण्यात आला होता.   जेष्ठ नागरिक संघाचा दिनांचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला होता . या  कार्यक्रमाचे अध्यक्ष कुदरत अली शहा आणि सूरजमल संत यांनी भारत मातेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली. शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थे तर्फे जेष्ठानसाठी सत्कार, भाषण आणि चहा-अल्पहार ठेवण्यात आले होते.  नरेंद्र नगर मधील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रावण आढव यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सत्कार मूर्ति व संस्थेचे पदाधिकारी यानी आप-आपले मनोगत व्यक्त केले. नंतर जेष्ठाचे आशिर्वाद घेऊन कार्यक्रमाचे निरोप घेतले.

मनमाड शहरात अत्याचाराच्या घटनांचा निषेध ,


मनमाड (प्रतिनिधी)-   मनमाड शहरात रविवारी  दि. २१ अॉगस्ट रोजी  निषेध मोर्चा ,  आ‌ंदोलन करण्यात  आले होते.   गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणातील आरोपीना माफी देणाऱ्या  भारतीय जनता पक्षाचे सरकार व राजस्थान येथील इंद्र मेघवाल हत्याकांड हे वरील प्रकरण १५ ऑगस्ट अमृत महोत्सव दिवशी घडल्याने त्याचा  गुजरात येथिल बिल्कीस बानो प्रकरण, राजस्थान येथिल इंद्र मेघवाल प्रकरण, तर महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली येथे आदिवासी महिलेवर झालेला अत्याचारांच्या याविरोधात मनमाड शहरात सर्व स्तरातून निषेध करण्यात आला . शहरात भव्य अशी निषेध रॅली काढून राजस्थान सरकार, गुजरात सरकार, प्रशासन ,मनुवादी प्रवृत्ती यांचे विरोधात घोषणा देत परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी पोलीस प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले.   या आंदोलनात सहभागी सर्व सामाजिक संघटना , सर्व समाजाचे लोक, संस्था, महिला, मित्रमंडळ शहरातील, राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

नांदगाव महाविद्यालयात सर्प-समज गैरसमजयावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्पमित्र तसेच एन.एस.एस.यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान संपन्न,


नांदगाव (  प्रतिनिधी ) - साधा साप दिसला की तो मारायचा हे सर्व सामान्य लोकांच्या मनावर बिंबले गेले आहे साप म्हणजे शत्रू हीच शिकवण पिढ्यानपिढ्या मिळत केली साप ही समाज मानवी अप्रचाराने बदनाम झाला आहे विषारी आणि बिनविषारी साप कोणता हे ओळखताना आल्याने माणूस घाबरतो त्याच्या या अज्ञानामुळे सापाला मारले जाते सापाच्या जाती न ओळखता आल्यामुळे अनेक सापांचा जीव जातो तेव्हा हे थांबविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन नांदगाव तालुका आणि सर्पमित्र नांदगाव तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगाव च्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नांदगाव महाविद्यालयात सर्पाची ओळख आणि समज गैरसमज डिजिटल चित्रफिती द्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा उपक्रम घेण्यात आला.
सर्पतज्ञ सुशांत रणशूर यांनी विद्यार्थ्यांना सुंदर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस.एन.शिंदे कासार साहेब ,वन विभाग,आर.एफ.ओ नांदगाव, उपप्राचार्य एस.ए.मराठे, सुनील महाले वन परिमंडळ, डॉ.सौ.ख्याती तुसे,ग्रासित रुग्णालय, नांदगाव, प्रभाकर निकुंभ, वन्यजीव संरक्षण, बहुउद्देशीय संस्था, नांदगाव, तालुका, सुरेश नारायणे अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदगाव तालुका सर्पमित्र अमोल सोनवणे,प्रमोद महानुभाव,मंगेश चारोस्कर, मंगेश आहेर, पंकज शर्मा, संदिप जाधव, महेश आहेर,पवन झाडगे,वैभव गायकवाड,सागर विसपुते,मयुर बागुल एन.एस.एस.प्रमुख प्रा.बालाजी मोरे, डॉ.अतुल मदने आदी उपस्थित होते. 
साप हा शेतकऱ्यांचा जसा मित्र आहे तसा तो मानवाचा देखिल मित्र आहे.कारण अनेक औषधात सर्पाचे विष वापरले जाते.अंगदुखी, कॅन्सर,भूल आदी इंजेक्शन मध्ये वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. 
धामण,गवत्या,तस्कर,अजगर,मांडुळ,दिवड, पट्टेरी,पानसर्प,कुकरी हे साप बिनविषारी आहेत तर मण्यार घैणस,फुरसे,नाग हे अतिविषारी साप आहे.हे सर्व साप कसे ओळखाल या बाबतची माहिती रणशूर यांनी विद्यार्थ्यांना दिली शिवाय साप चावल्यास अंगारे-धुपारे किंवा तांत्रिक- मांत्रिक यांच्याकडे न जाता जवळच्या सरकारी रुग्णालयात त्या रुग्णाला दाखल करण्याची त्यांनी सूचना दिली. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होते असे रणशुर म्हणाले. तसेच प्राथमिक स्वरुपात कोणती काळजी घ्यावी  ही माहिती दिली प्रात्यक्षिके द्वारे विद्यार्थ्यांना दिली. यावेळी डॉ.सौ.ख्याती तुसे व प्रा. सुरेश नारायणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बालाजी मोरे व डॉ.अतुल मदने यांनी केले. सूत्रसंचालन के.टी.बागुल यांनी केले तर आभार प्रा.एस.पी. दौंड व प्रा. पी. एम. अहिरे यांनी मानले कार्यक्रम सिनियर व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांना स्वतंत्र वेळेत दोन सत्रात घेण्यात आला. व सापा विषयी विद्यार्थ्यांचे समज व गैरसमज दूर करण्यात आले.

Friday, August 19, 2022

नांदगावच्या जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव,


नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगावच्या   जे.टी.कासलीवाल इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. आज दि. १९ ऑगस्टला  येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रागंणात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सवात संपन्न झाला.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, श्लोक पठन तसेच नृत्याविष्कारातून विविध श्रीकृष्णाच्या लिला सादर केल्या. श्रीकृष्ण व राधेच्या विविध वेशभूषेतील चिमूरड्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर ठेकाधरीत आपल्या नृत्यविष्काराची प्रचिती उपस्थित पालक व शिक्षकांना दिली. लहानग्या बालगोपालांनी मोठ्या जल्लोषात दहीहंडी फोडली तसेच आठवी नववीचे विद्यार्थी या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा ,प्रिन्सिपल मणी चावला उपस्थित होते. फोडलेल्या दहीहंडीतील प्रसाद गोपालकाला म्हणून सर्व विद्यार्थ्यांना वाटण्यात आला.
      सर्व विद्यार्थ्यांना श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्ताने संस्थेचे चेअरमन  सुनिलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबकाका कासलीवाल, महेंद्र  चांदीवाल,सर्व पदाधिकारी, प्रशासक गुप्ता सर प्रिन्सिपल मनी चावला सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र दामले सर यांनी तर आभार प्रदर्शन रिटा उबाळे यांनी केले.

Tuesday, August 16, 2022

नांदगाव रेल्वे स्टेशनवरील थांब्याकरीता नांदगावकर मागणीवर ठाम, धरणे आंदोलनाने वेधले सगळ्यांचे लक्ष,

नांदगाव ( प्रतिनिधी) - आज नांदगाव मध्ये रेल्वे थांब्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. मुख्य बाजारपेठ असल्याने प्रत्येकाचे या आदोलनाकडे लक्ष वेधले होते. शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ  नांदगाव रेल्वे स्थानकावरील गाड्याच्या थांब्या करीता   "आम्ही नांदगावकर, प्रश्न-माझ्या गावाचा " यांच्या तर्फे  सकाळी ११ ते दुपारी १  वाजेपर्यंत   धरणे आदोलन करण्यात आले.  नांदगाव रेल्वे थांबे , पादचारी पुल  तसेच अशा अनेक समस्या सुटण्यासाठी यावेळी अनेक मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या.  सर्व गाड्याचा  थांबा  नसल्याने  पेशेंन्ट,  नागरिक, व्यापारी, विद्यार्थी यांचे हाल होत आहे. यासाठी कोविड-19 काळापूर्वी थांबणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन्स ला नांदगाव स्टेशनवर पुन्हा थांबे बहाल करावे  , नांदगावकर अशी मागणी करत आहे .‌    रेल्वे प्रशासनाने फक्त काशी , महानगरी एक्स्प्रेसला दोन गाड्याना थांबा दिला आहे. तर जनता, कुर्शीनगर, झेलम, कामायनी, शालीमार, हुतात्मा एक्सप्रेस गाड्याना थांबा मिळावा अशी मागणी आहे. आता बाकी गाड्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे .प्रवांशाच्या सोयी होईल अशा रेल्वे गाड्याना थांबा मिळणे गरजेचे आहे . नांदगावकरांची मागणी मान्य  झाली नाही तर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल,  प्रशासनाने  मागणीची दखल घ्यावी असाही ईशारा देण्यात आला आहे. 

Monday, August 15, 2022

उद्या नांदगाव शहरात रेल्वे थांब्यासाठी धरणे आंदोलन,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव रेल्वे स्थानकावरील गाड्याच्या थांब्या करीता   "आम्ही नांदगावकर, प्रश्न-माझ्या गावाचा " या आशयाचे फलक लावत काही  दिवसापूर्वी सर्वाचे लक्ष वेधले होते. रेल्वे प्रशासनाचे पुन्हा लक्ष  वेधण्यासाठी उद्या दि. १६ अॉगस्टला सकाळी ११ ते दुपारी १  वाजेपर्यंत नांदगाव शहरातील  महात्मा गांधी चौक येथे धरणे आदोलन करण्यात येणार आहे.  नांदगावकरांनी उपस्थित राहुन गाड्या थांबा मिळून देण्याकरीता सहभाग नोंदविण्यास सांगण्यात आलेले आहे. नांदगाव रेल्वे थांबे , पादचारी पुल  तसेच अशा अनेक समस्या सुटण्यासाठी या शांततामय व कायदेशीर आदोलन असेल,  तहसिलदारांना दिलेल्या परवानगीच्या पत्रात विनंती करण्यात आलेली आहे.  सर्व गाड्याचा  थांबा  नसल्याने यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी यांचे हाल होत आहे. विकासात रेल्वे गांड्याचे थांबे महत्वाचे तरच शहराची कनेक्टीविटी वाढते, यामुळे प्रगती चालना मिळते असते. प्रवाशी ही रेल्वेतून प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. यासाठी कोविड-19 काळापूर्वी थांबणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन्स ला नांदगाव स्टेशनवर पुन्हा थांबे बहाल करावे  , नांदगावकर अशी मागणी करत आहे .‌  रेल्वे थांबा मिळावा यासाठी शहरात बॅनरबाजी , रिक्षाला भोंगा लावून‌ नांदगावकरांना माहिती दिली जात आहे.  रेल्वे प्रशासनाने फक्त काशी , महानगरी एक्स्प्रेसला दोन गाड्याना थांबा दिला आहे. तर जनता, कुर्शीनगर, झेलम, कामायनी, शालीमार, हुतात्मा एक्सप्रेस गाड्याना थांबा मिळावा अशी मागणी आहे.  नांदगावकर बाकी गाड्यासाठी मागणी लावून धरत आहे.  प्रवांशाच्या सोयी होईल अशा रेल्वे गाड्याना थांबा मिळणे गरजेचे आहे .  नांदगावकर  मागणीसाठी काय भूमिका मांडतात यासाठी  धरणे आदोलनांकडे  बघितले जात आहे.                  

नांदगावतील लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल व रेंनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा,


नांदगाव ( प्रतिनिधी) - आज रोजी दि. 15 ऑगस्ट "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अर्थातच स्वातंत्र्य दिन नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल  नांदगाव व रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव या दोन्ही शाळां मिळून संयुक्तीकरित्या उत्साहात संपन्न झाला. आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल , उपाध्यक्ष सरिता बागुल ,तसेच कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे .
प्रभाकर काकळीज (माजी मुख्याध्यापक छाजेड हायस्कूल), जगन्नाथ साळुंखे ,
(सेवानिवृत्त शिक्षक N.C.C होमगार्ड ऑफीसर), बबनराव साळी (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी), योगेश भाऊसाहेब गायकवाड (रायफल मॅन् नागालँड),  अनिल धामणे (रिपोर्टर शिवसत्ता टाईम्स), दिपक थोरात (पालक शिक्षक समिती सदस्य), बाबासाहेब कदम (पालक शिक्षक समिती उपाध्यक्ष,सकाळ वर्तमान पत्र) , महेश पेवाल  (सा . नांदगाव दुनिया,   दैनिक  लोकरत्न) , लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल  मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा खांडेकर  व  रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी  या सर्वानी  राष्ट्र ध्वजाचे पूजन करून  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  ध्वज फडकविण्यात आला, आणि मार्च पास्ट करून ध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर लगेचच समुहगायन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शानदार भाषणांनी कार्यक्रमास जोरदार सुरुवात झाली.यानंतर चिमुकल्यांनी देशभक्ती पर गितावर ताल धरत नृत्याविष्कार केला. बागुल सर आणि सौ. बागुल मॅम यांनी सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिता जगधने यांनी केले.आणि उपस्थितांचे आभार मानले आणि वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यात लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूलच्या शिक्षिका इंगोले , नूतन खैरनार , अहिरे , सोमासे , न्याहारकर, पिलके , सुरेखा गायकवाड , नेहा पाटील , ज्योती सुरसे , वर्षा नगे , संदीप पांडे ,राहुल उपाध्याय , मोहन सुरसे तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी , रूपाली शिंदे , एडना फर्नांडिस , मोनाली गायकवाड , सुषमा बावणे , रोहिणी पांडे , चैताली अहिरे  तसेच डान्स टिचर आदित्य सूर्यवंशी ,म्युझिक टिचर अभिजित अहिरे ,क्रीडा शिक्षक मयुरी खैरनार  आणि मदतनीस श्रीमती अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पाटील यांनी आतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम छान प्रकारे पार पडला.

नांदगावात भारतीय बौद्ध महासभा व संग्राम महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध स्पर्धा ,


नांदगाव (प्रतिनिधी) -  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आज सोमवारी दि. १५ ऑगस्ट रोजी भारतीय बौद्ध महासभा व संग्राम महिला बचत गटाच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर नगर येथे बौद्ध विहार येथे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये देशभक्तीपर गीत डान्स संगीत खुर्ची - लिंबू चमचा भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट विद्या कसबे, प्रज्ञानंद जाधव , शबाना मंसुरी, नेहाताई कोळगे उपस्थित  होते.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका संगीता जगताप होत्या. सर्व विजेत्या स्पर्धकांना वही पेन  बक्षीस म्हणून देण्यात आले . कार्यक्रमाला माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष रंजना हिरे संग्राम बचत गट अध्यक्ष जयश्री जगताप ,उषा बागुल ,कमल पवार ,उषा पगारे, सुंदराबाई गरुड ,आशा जगताप, कमलाबाई कोतकर, सुमनबाई अहिरे, मीना काकळीज,  सत्यभामाबाई जगताप, लक्ष्मीबाई बागुल,  वैशाली पवार, रंजना जगताप,  लहानुबाई हिरे, रेखा जगताप, शीला जगताप, बेबीबाई जगताप ,चंद्राबाई पवार सुपारी बाई, महीरे बाई ,केराबाई पवार आदी उपस्थित होते, तर सूत्रसंचालन जयश्री जगताप यांनी केले.

नांदगांवच्या गणेशवाडीत हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक, हिंदु आणि मुस्लीम महिलांनी मिळुन केला अमृतमहोत्सव साजरा..!


नांदगांव(प्रतिनिधी):-   आज दि. १५ अॉगस्ट रोजी  स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.   नांदगाव शहरात स्वतंत्र भारताचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या मोहिमेला देखील ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक देखील अनेक ठिकाणी बघावयास मिळाले आहे.‌ नांदगाव तालुक्यातील गणेशवाडी येथील मोमीनवाडा मधील मुस्लिम महिला व हिंदू महिलांनी मिळुन आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवभक्त सांगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज इमारतीवर 20 फुटाचा तिरंगा ध्वज लावण्यात आला तर या भागातील सर्व घरावर आकर्षक विद्युत रोषणाई करत रांगोळ्या काढून फुले लावून सजवण्यात आले होते. पालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे, अभियंता राहुल कुटे सौ कुटे यांनी या ठिकाणी येऊन ध्वजारोहण करून सलामी दिली या भागांतील सर्व धर्माच्या महिलांनी यावेळी सहभाग नोंदवला होता. यावेळी सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर मिठाई वाटप करून लहान मुलांना खाऊ वाटण्यात आला. आजच्या या छोटेखानी कार्यक्रमामुळे हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक बघावयास मिळाले.

नांदगावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तिरंगी लाडू वाटप,


नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगाव शहरामध्ये स्वतंत्रदिनाच्या अमृत महोत्सव साजरा करताना शासनाच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचे पालन करत शाळांनी तसे नियोजन केलेही या सर्वात विदयार्थी हा महत्वाचा घटक असतो. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये जे संस्कार आपण देवू राष्ट्रनिष्ठेची, देश भावनेची, एकात्मतेची जी भावना त्यात रुजवू तेच या देशाचे भवितव्य घडविणारं आहे. १५ ऑगस्ट हा आपणा सर्व भारतीयांचा राष्ट्रीय सन आहे आज आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाली असून, याचा आनंद साजरा करताना गोडवा निर्माण होवून तो कायम टिकून राहवां आपला सर्वांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने नांदगाव नगरपालिकेच्या  शाळेतील विद्यार्थ्यांना तिरंगी लाडू वाटप करण्यात आले.   या प्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष सईद हाजी, आयाज शेख, रियाज पठाण, अमजद पठाण, अक्रम शेख , नईम भाई, इम्रान भाई, फहीमभाई, नसिरभाई, तन्वीर भाई, आरीफ भाई ई. तसेच मुस्लीम समाज समन्वय समिती चे हाजी जहीर, चिराग सेठ, गयास टेलर, खलील जनाब, नदीमभाई  साजीद तांबोळी, अख्तर शेख, सोहेलभाई, वजीर बाबा,लतिफ सुपर,महमूद टेलर, असगर पठाण, मुश्ताक फीटर, फिरोज मुल्ला, अन्सारभाई तसेच असंख्य मुस्लीम तरुण उपस्थित  होते.

Sunday, August 14, 2022

नांदगावात मदरशांच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी, राष्ट्रप्रेमाचा दिला संदेश,



नांदगाव (प्रतिनिधी) -    आज संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना, नांदगाव शहरातही जामा मस्जिद ट्रस्ट संचालित मकतब फलाहुल मुस्लीम मदरशाच्या शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज मिरवत "दिल दिया हैं जान भी देंगे ए वतन तेरे लिये" या गाण्यावर ताल धरत प्रभात फेरी काढली. प्रभात फेरीचे आयोजन मुफ्ती फहीम, रियाज पठाण सर आणि रहेनुमा फाउंडेशनचे आयाज भाई यांनी केले. धार्मिक शिक्षण घेत असताना या विद्यार्थ्यांना आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा, राष्ट्रहिताचा, आणि प्रत्येकाने आपण भारतीय आहोत याचा अभिमान बाळगावा, देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक स्वतंत्र सेनानीनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मुस्लीम समाजाच्या अनेक उलमा (मौलाना) निही बलिदान दिलेले आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून आपण ज्या धर्माचे आचरण करतो त्यांच्या धर्मगुरूंनी देशहितासाठी आपले सर्वस्वी बलिदान केले. अशा उलेमांच्या नावाचे बॅनर हातात घेवून त्यांना एकप्रकारे श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालकांनीही प्रभात फेरीत सामील होऊन प्रोत्साहन दिले. नांदगाव शहरात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांनी आपल्या शरही लिबास (गणवेशात)मध्ये मदरशांच्या विद्यार्थ्याना प्रभातफेरी काढल्याने सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरला. प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी  मुस्लीम तरुणांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. हाजी मुनव्वर, साजीद तांबोळी, लाला चाचा, न्याजू उस्ताद, सलमान पठाण, जावेद कुरैशी, खलील जनाब, मकतबचे माजी विद्यार्थ्यांनी व सर्वच मौलानानी  मेहनत घेतली.

Saturday, August 13, 2022

मांडवडच्या जनता विद्यालयात अमृत महोत्सवा निमित्त "हर घर तिरंगा " अभियान जनजागृतीसाठी राष्ट्रीय ध्वजारोहण व रॅली





मांडवड (प्रतिनिधी) -   मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील  जनता विद्यालय मांडवडमध्ये  भारतीय स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत" हर घर तिरंगा " हे अभियान राबविले जात आहे त्या निमित्ताने जनता विद्यालय  मांडवड मध्ये राष्ट्रीय ध्वजाचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस.  एस. यांच्या हस्ते तर शालेय पंतप्रधान कु. वैष्णवी पिंगळे हिच्या हस्ते  ध्वजारोहन   करण्यात आले. शालेय गीत मंचाने राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीत सादर केले.
 विद्यालयाच्या प्रांगणापासून मांडवड गावात जनजागृती बाबत रॅली काढण्यात आली या रॅलीचे उद्घाटन  शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस. एस. यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री आहेर एस. जे. यांनी केले. तसेच विद्यालयाच्या 
मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस. एस. यांनी आपल्या मनोगतात   भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना व क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण व्हावे व हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभाग व्हावे असे आवाहन केले. या वेळी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा समूह गायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा  विविध स्पर्धां घेण्यात आल्या होत्या. सकाळी   ८.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन तिरंगी ध्वज, घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन ढोल ताश्यांच्या गजरात घोषणा देत गावातील विविध  चौकात " हर घर तिरंगा " याबाबत जनजागृती करण्यात आली.
 क्रीडा शिक्षक श्री. आहेर एस. जे. व सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच कला, क्रीडा,सांस्कृतिक समितीतील सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व  शिक्षक शिक्षकेतर सेवक  उपस्थित होते.

मनमाड शहरात आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन


 मनमाड ( प्रतिनिधी) - आज मनमाडमध्ये  आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन मनमाड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष  अफजल शेख यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली दि. १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. शहरातील काँग्रेस भवन येथून पदयात्रेची सुरवात मोठ्या दिमाखात करण्यात आली. भारत माता कि जय, वंदे मातरम, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांनी पदयात्रा जाऊन मालेगाव रोड येथे पदयात्रेचा समारोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. या पदयात्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष अफजल शेख, रमेशभाऊ कहांडोळे, सुभाष नहार, भीमराव जेजुरे, ऍड. शशिकांत व्यवहारे, मा. नगरसेवक संजय निकम, नाजीम शेख, कॉ. रहमान शाह, अशोककाका व्यवहारे, प्रेमराज बेदमुथा, पारसशेठ बरडिया,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपकभाऊ गोगड, मा. नगराध्यक्ष बबलू पाटील, नाना शिंदे, हबीब शेख, अमोल बोथरा,अक्षय देशमुख, कोमल निकाळे, दिपा कोरडे, फकीराशेठ शिवदे,ऍड. पाटील, अनिल देवरे, बाळासाहेब साळुंके, ऍड. वाल्मिक जगताप, अन्सार शाह, जाहिद शेख,अजीज पठाण,  इलियास पठाण, सईद दादा, हिरामण कुसमाडे, संसारे, ऍड. फरीदा मिठाईवाला, मुमताज आपा, फातेमा आपा,समिना आपा,राहत फौंडेशनचे कयाम सैय्यद, सोहेल जाफरी, आबिद शेख, हुजेफा खान, रिजवान कुरेशी, फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे अध्यक्ष बेग चाचा, कार्याध्यक्ष फिरोज शेख, मुश्ताक सर, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे भीमराज लोखंडे,रमेश आव्हाड, विष्णू चव्हाण, गायकवाड गुरुजी यासह प्रमुख पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Friday, August 12, 2022

नांदगावमध्ये मुस्लीम बांधवाकडून "आझादी का अमृत महोत्सव" मध्ये सामील होण्यासाठी जनजागृती,


नांदगाव (प्रतिनिधी) - आज नांदगाव शहरातील जामा मस्जिद नांदगाव येथे  जुम्माच्या सामुहिक नमाज नंतर असंख्य मुस्लीम बांधवांनी दोन्ही हाताने तिरंगा आपल्या छातीशी धरून  मस्जिद च्या आवारात तसेच मुख्य प्रवेश द्वारा समोर "आझादी का अमृत महोत्सव"  मध्ये सामील होण्यासाठी जनजागृती केली, मुस्लीम बांधवानी मोठ्या संख्येने एकत्रीतपणे राष्ट्रध्वज हातात घेऊन एकसाखळी तयार करून  देशभक्तीचे दर्शन घडवून दिले. मुस्लीम समाजामध्ये तसेच संपुर्ण शहरात भारत देशाच्या एकात्मतेचा संदेश यामुळे दिला गेला. देशाच्या स्वतंत्र लढ्यात अनेक मुस्लीम उलेमानी बलिदान दिलेले आहे, देशहिताचे, एकात्मतेचे, आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीशी एकनिष्ठ राहण्याचे धडे मुस्लीम जामा मस्जिदचे पेश इमाम मुफ्ती फहीम सहाब हे नेहमीच आपल्या प्रवचनातून देत असता याप्रसंगी मुफ्ती फहीम, जमातचे अमीर हाजी मुनव्वर पठाण, हाजी युसुफ (जमजम), रहेनुमा फाऊंडेशन चे अध्यक्ष हाजी सईद शेख, आयाज भाई शेख तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक या प्रसंगी आवर्जून उपस्थित होती

नांदगावच्या नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये "एक राखी जवानों के नाम' हा उपक्रम राबवला





नांदगाव (प्रतिनिधी) - नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव शाळेमध्ये एक राखी जवानों के नाम हा उपक्रम राबविण्यात आला   . 
     आज  विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 
 नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल   ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी मॕम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात ८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी राखी आणली होती. सुषमा बावणे  यांनी सैनिकांचे महत्त्व सांगितले. नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. देशाचे संरक्षण करणारे सैनिक विविध सण उत्साह आपल्या कुटुंबियांसोबत साजरे करू शकत नाही. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यातील राखी बंधनातही बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही. अशा अनेक सैनिक  भावांसाठी "एक राखी जवानों के नाम" या उपक्रमाद्वारे राख्या सीमेवरील सैनिकांना पाठविण्यात आल्या. सर्वप्रथम शाळेचे अध्यक्ष  बागुल सर तसेच उपाध्यक्ष  बागुल   यांनी पुढाकार घेऊन राखी दिली. त्यानंतर प्रिन्सिपल मॅम तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांनी राख्या जमा करून  "ये धागा हे आस का, ये धागा हे विश्वास का, ये धागा प्यार का रक्षाबंधन के त्योहार का" अशा प्रकारे सर्व सैनिक बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यात सकाळ न्युज पेपर चे पत्रकार बाबासाहेब कदम यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन आणि त्या सर्व राख्या आपल्या बॉर्डरवरील सैनिकांपर्यंत  पोचवण्याची जबाबदारी उचलली. 
          हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यात  रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका रूपाली शिंदे , सुषमा बावणे  ,एडना फर्नांडिस  ,मोनाली गायकवाड   , चैताली अहिरे , रोहिणी पांडे , तसेच  मदतनिस वैशाली बागूल, छाया आवारे, अनिता नेमणार,  रवींद्र पटाईत तसेच ड्रायव्हर मंगेश शिंदे, विनोद चौधरी, बाळू गायकवाड, सागर कदम, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल, गजानन पवार यांनी  अतोनात मेहनत घेऊन हा नवीन उपक्रम राबविण्यात आला .

Thursday, August 11, 2022

मनमाड पोलीस स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने " रक्षाबंधन " कार्यक्रम उत्साहात साजरा,


मनमाड ( प्रतिनिधी) - मनमाड शहरातील   मनमाड पोलीस स्टेशन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदैव जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना  राखी बांधून  महिलांनी रक्षाबंधन साजरे केले. यावेळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते, ईतर पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्याची   उपस्थिती होती. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष आम्रपाली निकम उपस्थित होत्या.         राखी बांधण्यासाठी सुनीता सिरसाठ,  ताराताई पगारे, उषा गायकवाड, नंदा लोंढे, बेबीताई निकम, जोत्सना घुसाळे, माया त्रिभुवन, मिराताई उबाळे, जिजा बाई जाधव ई. महिला उपस्थित होत्या. वंचित चे पदाधिकारी राकेश भाऊ पगारे, नीलेश निकम यांनी सहकार्य  लाभले होते.

नांदगावच्या व्ही.जे.हायस्कूल मध्ये शाडूमातीपासून गणपती तयार करणे कार्यशाळा संपन्न,



नांदगाव (   प्रतिनिधी  ) - नांदगाव शहरातील  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक संचलित आयोजित  येथील व्ही.जे.हायस्कूल या शाळेत शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा नुकतीच पद्धतीने संपन्न झाली.या विद्यालयात गेल्या १४ वर्षांपासून शाडूमातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. कलेच्या माध्यमातून पर्यावरण पुरक उत्सव साजरा करण्याच्या मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून तसेच मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी   विद्यालयातील दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.या वर्षी या कार्यशाळेत १७५  विद्यार्थी सहभागी झाले .
  या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे  पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री.डॉ.गणेश चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते सुमित सोनवणे ,मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड ,पर्यवेक्षक मनोहर शिंदे,भैय्यासाहेब चव्हाण उपस्थित होते  प्रमुख पाहुण्याच्या हस्ते  गणेशाच्या मूर्तीचे व शाडू मातीचे पूजन करून कार्यशाळेचे  उद्घाटन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैय्यासाहेब चव्हाण  यांनी केले.प्रस्ताविकात त्यांनी संस्थेने या चालविलेल्या उपक्रम राज्यातील इतर संस्था व शाळा नीही हाती घेतला आहे असे सांगून त्यांनी शाळेत आयोजित केल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली.डॉ.गणेश चव्हाण यांनी  विद्यार्थ्यांना इकोफ्रेंडली गणेश उत्सव साजरा करून पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असे सांगून विद्यालयाने सर्व गावापुढे आदर्श निर्माण करणारा उपक्रम १४ वर्षापासून राबविल्या बद्दल कौतुक केले. मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड यांनी कार्यशाळेसाठी उपस्थित विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या व उपस्थित  सर्व प्रमुख पाहुण्याचा सत्कार  केला.
      कार्यशाळा प्रमुख कलाशिक्षक विजय चव्हाण ,चंद्रकात दाभाडे,ज्ञानेश्वर डंबाळे यांनी ग्रुप करून शाडूमातीची गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्षिक दाखवून गणेश मूर्ती तयार करून दाखविल्या .माती मळण्यापासून तर गणपतीचे सर्व भाग कशा पद्धतीने बनवायचे याचे बारकावे हि सांगण्यात आले यानंतर संपुर्ण दिवसभर कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध आकाराच्या व विविध भावमुद्रा असलेल्या आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेत एकूण १७५  मूर्ती तयार झाल्या .बनविलेल्या मूर्ती सुकल्यावर विद्यार्थांना रंगकाम कसे करायचे याची माहिती देऊन रंगकाम करून घेणार आहेत विद्यार्थी तयार झालेल्या मूर्तीची स्थापना आपल्या घरी करणार आहेत .
या कार्यशाळे साठी उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर ,भास्कर मधे,गुलाब पाटील ,प्रियंका पाटील,संगीता शिंदे,सुनिता देवरे  तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Wednesday, August 10, 2022

नांदगावात झळकले रेल्वे थांब्यासाठी आशयाचे फलक,

      नांदगावात लागले रेल्वे थांब्यासाठी                    आशयाचे फलक


नांदगाव ( प्रतिनिधी) -  काहीदिवसा पूर्वी नांदगावकर   नांदगावच्या रेल्वे थांब्याकरीता रेल्वे स्टेशनजवळ  बसले होते . " आम्ही नांदगावकर - प्रश्न माझ्या गावाचा" असे घोषवाक्य  म्हणत नांदगावकर यांची  दि. ७ अॉगस्ट रोजी एक सामुहिक बैठक करण्यात आली.  नांदगाव शहरात याच मागणीसाठी बॅनर लावत नांदगावकर जागे व्हा... आपल्या हक्काच्या गाड्या थांबवण्यासाठी संघर्ष करा अशा आशयाचे फलकातुन मागणी जोर धरू लागली. रेल्वे थांब्यासाठी अनेक निवेदने दिली गेली. तरीही स्टेशनला थांबा पूर्वी सारखा नसून  प्रवाशीवर्गाचे हाल व ते नाराजी व्यक्त करत आहे.   लोकसभा मतदार संघाचे खासदार व केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी संसद भवनात नांदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे थांब्याबद्दल मागणीला दिड वर्ष होत आहे . कोराना संपला तरी रेल्वे प्रशासनाने खा. डॉ. भारती पवार यांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. नांदगाव करांची रेल्वे थांब्याची मागणी पण खासदार, केद्रींय मंत्री राज्यमंत्री यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयही मान्य करीत नाही , यांचे आश्चर्य वाटू लागले आहे. कोवीड -१९ कोरोनाचे कारणे देत रेल्वेने नांदगावच्या प्रवाशाचे जाणीवपूर्वक हाल केलेले आहे. रेल्वेने ईतर स्थानकावर गांड्याचे थांबे जैसे थे ठेवले आहे. गाडी क्रमांक - काशी एक्सप्रेस 15017/15018 ही गाडी सर्व थांबे ( लासलगावसह)  घेत असून, 
फक्त नांदगावचा थांबा काढण्यात आला आहे. पुढे जनता एक्सप्रेस - 13201/02 ही गाडी सर्व थांबे ( निफाडसह) नांदगावलाच थांबा काढला आहे. यामुळे प्रवाशाचे हाल होणार नाही यासाठी रेल्वेने या गाड्या पुणे - भुसावळ हुतात्मा - 11025/26 एक्स, जनता एक्स- 13201/02, झेलम एक्स.- 11077/78, महानगरी एक्स - 22177/78, कामायनी एक्स- 11071/72, काशी एक्स- 15017/18, कुर्शीनगर एक्स- 22537/38, शालीमार एक्स-18029/30 या गाड्या नांदगाव स्टेशनला सर्व थांबे पूर्ववत झालेच पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे असे आशयाचे फलक लागल्याने नांदगावकर कोणती भूमिका घेतात हे पहावे लागेल.  
    आम्ही नांदगावकर यांनी रेल्वे संर्दभात बैठक घेतली होती  . यात बैठकीत   कोरानाचे  कारण देत रेल्वेने नांदगावचे थांबे बंद केले होते.  कोरोना  -19 चे कोविड स्पेशल गाडीला नांव देण्यात आले होते. आता ते  पूर्वी प्रमाणे सुरळीत झाले आहेत. तरीही नांदगावचे थांबे रेल्वेने खोटे आश्वासन देत गेले . रेल्वेवरीष्ठ अधिकारी पर्यंत रेल्वे थांब्याच्या समस्या पोहचवणे गरजेचे आहे . म्हणुन त्या सर्दभात एक सामुहिक बैठक घेण्यात आली होती . थांब्यासाठी  पुढचे पाऊल आम्ही लवकरात लवकर उचलणार आहोत . आम्हाला पूर्वी होते ते थांबे परत मिळावे, अशी सर्व नांदगाव प्रवाशी यांची आहे. अशी मागणी तुषार पांडे , बबलु सय्यद, हनीफ शेख , दिनेश पिंगळे , प्रशांत साळवे,  कलीम तडवी,  सचिन महिराल ,संतोष गुप्ता, उमेश उगले ,चंदु संगवे आदीनी केलेली होती.

Tuesday, August 9, 2022

यौमे आशुरा


यौमे आशुरा -          
 
इस्लामी वर्षाचा मोहरम हा पहिला महिना असून या महिन्याच्या दहा तारखेला यौमे आशुरा म्हणतात.मोहरमच्या एक तारखेपासून नवीन इस्लामी हिजरी वर्षाचा प्रारंभ होतो.आशुराचे महत्व फार पूर्वीच्या काळापासून आहे. त्यामुळे या महिन्याला खूप महत्त्व आहे.हजरत प्रेषित पैगंबर यांनी म्हटले आहे कि मोहर्रम हा अल्लाहचा महिना आहे. 
मोहरमच्या दहा तारखेला जगातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. या सृष्टीची निर्मिती मोहरमच्या दहा तारखेला म्हणजे आशुराच्या दिवशी झाली.हजरत आदम अलैसलाम यांची माफी याच दिवशी स्वीकारली गेली. हजरत नुह अलैसलाम यांची नौका तूफानातून सुखरूप याच दिवशी जुदी पर्वताला टेकली. हजरत युनुस अलैसलाम यांची याच दिवशी माशाच्या पोटातून सुटका झाली. हजरत आयुब अलैसलाम यांचा आजार याच दिवशी बरा झाला. हजरत मुसा अलैसलाम यांना याच दिवशी फिरऔनच्या जाचातून मुक्ती मिळाली. हजरत युसुफ अलैसलाम यांची आपल्या भावंडांशी भेट याच दिवशी झाली. या जगाचा शेवट म्हणजे कयामत देखील याच दिवशी होणार आहे. अशा अनेक महत्त्वाच्या घटना या आशुराच्या दिवशी घडल्या आहेत. मोहरम अलीकडे लक्षात राहतो तो हजरत पैगंबरांचे नातू हजरत इमाम हुसेन (रजि.) व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बलिदानाच्या घटनेमुळे. याच दिवशी त्यांच्यात व सरदार यजीद यांच्यात जे धर्मयुद्ध झाले त्यात हजरत इमाम हुसेन यांच्या कुटुंबातील जवळपास बहात्तर लोक शहीद झाले.ही घटना इराकमधील करबला या ठिकाणी घडली.मोहरम मधील प्रमुख घटना म्हणून करबलाच्या घटनेचा उल्लेख केला जातो.आजचा दिवस हा जगाच्या प्रमुख घडामोडींचा महत्त्वाचा दिवस आहे. इस्लामपूर्व काळात आजच्या दिवसाचे रोजे सुन्नत होते. रमजान महिन्यातील रोजे नंतर अनिवार्य झाले.तरी सुद्धा हजरत  पैंगंबरांनी मोहरमच्या दहा तारखेचा रोजा आशुराचा रोजा म्हणून धरण्यास सांगितले आहे. जगभरातील महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असा हा दिवस असून या दिवशी आपल्या कुटुंबातील लोकांसह जास्तीत जास्त लोकांना अन्नदान केले जाते. 
करबलाच्या घटनेची आठवण म्हणून शिया लोक मोहरमच्या दिवशी ताजिया म्हणजे ताबुतांची मिरवणूक काढतात.सवाऱ्या बसवतात.ताजिया व सवाऱ्याची परंपरा भारतात तैमूरलंग च्या काळात सुरू झाली. लखनऊ व हैदराबाद आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ताबूत व सवाऱ्या बसवल्या जातात.अहमदनगर मधील सवाऱ्या या देखील त्याच काळापासून सुरू झाल्या आहेत.आशुराचा हा दिवस हजरत इमाम हुसेन(रजि.) यांच्या बलिदानाचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी अन्नदान केले जाते.सरबत वाटप ही करतात . 
     हजरत इमाम हुसेन (रजि.) व त्यांच्या कुटुंबीयांनी करबलाच्या मैदानामध्ये धर्माच्या रक्षणार्थ जे बलिदान दिले,ती घटना सुद्धा दहा मोहरमला घडलेली असल्याने तिला वेगळे महत्त्व आहे. अलीकडच्या काळात मोहरम हा हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी शुभेच्छा दिल्या जात नाहीत, तर दुःखाचा सण म्हणून मोहरम ओळखला जातो.

Sunday, August 7, 2022

नांदगावला रेल्वे थांब्यासाठी ठिय्या

                      
 नांदगाव ( प्रतिनिधी) -     नांदगावच्या रेल्वे प्रवाशी यांची काल दि. ७ अॉगस्ट रोजी एक सामुहिक बैठक झाली. यात  सर्व रेल्वे प्रवाशी दररोज रेल्वे थांबा नसल्याने हाल होत आहेत. कोरानाचे  कारण देत रेल्वेने नांदगावचे थांबे बंद केले होते.  कोरोना  -19 चे कोविड स्पेशल गाडीला नांव देण्यात आले होते. आता ते  पूर्वी प्रमाणे सुरळीत झाले आहेत. तरीही नांदगावचे थांबे रेल्वेने खोटे आश्वासन देत गेले . रेल्वेवरीष्ठ अधिकारी पर्यंत रेल्वे थांब्याच्या समस्या पोहचवणे गरजेचे आहे . म्हणुन त्या सर्दभात एक बैठक घेतली. पुढचे पाऊल आम्ही लवकरात लवकर उचलणार आहोत . आम्हाला पूर्वी होते ते थांबे परत मिळावे, अशी पूर्ण नांदगाव प्रवाशी यांची आहे. यावेळी  तुषार पांडे , बबलु सय्यद, हनीफ शेख , दिनेश पिंगळे , प्रशांत साळवे,  कलीम तडवी,  सचिन महिराल ,संतोष गुप्ता, उमेश उगले ,चंदु संगवे आदीची उपस्थिती होती.

Saturday, August 6, 2022

ग्रांमपंचायतीत पाच वर्ष " महिलाराज " दिसणार,

  ग्रांमपंचायत निवडणूकीत निवडून आलेले             सदस्य विक्टरी साईन दाखवताना

 नांदगाव ( प्रतिनिधी) -    नांदगाव तालुक्यातील ग्रांमपचायत निवडणूकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात सहा ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर
असलेल्या मात्र मुदत संपल्यामुळे व वर्षभरापासून प्रशासकीय राजवट असलेल्या सहा ग्रामपंचायतीत आता लोकप्रतिनिधींचा कारभार पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला,  असला तरी मल्हारवाडी, क्रांतीनगर, फुलेनगर, श्रीरामनगर, गिरणानगर, हिंगणवाडी या सर्व ठिकाणी यापुढे पाच वर्षासाठी महिलाराज दिसणार आहे. निवडणूक झाल्याने उर्वरित पाच ठिकाणी गुरुवारी (ता. ४) ७८ टक्के मतदान झाले. त्याची शुक्रवारी मतमोजणी झाली. विजयी उमेदवारांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय असून, याशिवाय सरपंच पद पाच वर्षासाठी महिलांसाठी आरक्षित झाले आहे. सहाही ग्रामपंचायतीत ३३ महिला निवडून आल्या आहेत.
       विजयी उमेदवार पुढीरप्रमाणे  : १)  गिरणानगर ग्रामपंचायतीत प्रभाग एकमधून प्रमिला अहिरे (१००), प्रभाग दोनमधून अनिल आहेर (३१२), कोमल आहेर (२८४), पल्लवी सोमासे (२५८), प्रभाग तीनमधून सुनंदा सोनवणे (१३६), सुनील सोनवणे (१२०), प्रभाग चारमधून अॅड. उमेशकुमार सरोदे (१२१), वैशाली कुटे (१६९) निवडून आले. याच ग्रामपंचातीच्या प्रभाग एकमधून योगेश दळवी, अनिता पवार तीनमधून, तर सुमन ठाकरे प्रभाग चारमधून यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
 २) मल्हारवाडी ग्रामपंचायतीमध्ये :- 
प्रभाग एकमधून मिना भागिनाथ (२०९), शोभा पिठे (१५८), सरला काकळीज (१७४), दोनमधून सारिका जेजुरकर (२६४), अश्विनी खैरनार (२६२), सुनंदा झेंडे (२२६), तीनमधून दीपक खैरनार (२६७), चित्रा इघे (२१९ ) विजयी झाले. प्रभाग तीनमधून राहुल पवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
३) हिंगणवाडी :- येथील प्रभाग एकमधून अनुसया गायकवाड (१७९), मनोहर खंबायत (१७९), जन्याबाई शिंदे श्रीरामनगर येथे बिनविरोध (१८८), प्रभाग दोनमधून कांताबाई खंबायत (१००), संभाजी बच्छाव (९६), तीनमधून रामभाऊ बागूल (१२४) विजयी झाले. मनीषा डोळे यापूर्वीच तीनमधून बिनविरोध विजयी झाले आहेत.
४)क्रांतीनगर :- येथे प्रभाग दोनमधून प्रियंका पाटील (२०१), बेबीताई पाटील (२१२), तीनमधून सचिन मोकळ ( १९५), पूनम जेजूरकर (२२८), मंगल मोकळ (२१५) हे उमेदवार विजयी झाले. यापूर्वी संगीता नरोटे, कडूबाई काळे व इंदुबाई गायकवाड प्रभाग एक, तर युवराज डोळे प्रभाग दोनमधून बिनविरोध निवडून आले आहेत.
 ५)फुलेनगर :- येथे प्रभाग एकमधून शितल जगधने (१५५), रामदास जगधने (१३८) विजयी झाले. प्रभाग एक व तीनमधीलजागा रिक्त राहिल्या आहेत. हिराबाई माळी व मिना माळी प्रभाग दोन, तर प्रभाग तीनमधून उषाबाई पाटील यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.
६)श्रीरामनगर :- यात सर्व सातही सदस्य हे बिनविरोध निवडून आलेले आहे . प्रभाग १ मधून गायकवाड अर्चना सुभाष , महाजन शुभांगी विजय , महाजन शुभम सुनील, प्रभाग २ मधून राऊत कमलाबाई सुधाकर, राऊत सागर वाल्मिक, प्रभाग ३ मधून खैरणार नंदा बाळासाहेब , निकम अतुल विष्णु .

Wednesday, August 3, 2022

नांदगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य पोस्ट खात्याचा ३९९ रुपयात अपघात विमा शिबीर

नांदगाव ( प्रतिनिधी) -    अन्याय आत्याचार  समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नांदगावच्या सारनाथ बौद्ध विहार, औरंगाबाद रोड ईथे अपघात विमा शिबीर  पार पडला. यात  भव्य पोस्ट खाते यांचा  ३९९ रुपयात अपघात विमा शिबीर रवींद्र  जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  व तालुका प्रमुख राजु गांगुर्डे यांच्या नियोजनाने आयोजित केले होते.  या कार्यक्रमाच्या उद्घघाटना साठी माजी नगरसेवक अनिल जाधव, नितीन  जाधव, पोस्ट अॉफिसचे दिलीप पवार  , पोस्ट मास्तर भगवान सेठ (जामदरी), भाजपचे नेते उमेश उगले, सखाराम चव्हाण, डी.एन कटारे , प्रकाश भाऊ निकम,  वंचित बहुजन आघाडीचे नेते अविनाश केदारे  ,  मिनाक्षी  झोडगे, समिती तालुका संपर्क प्रमुख मनिषा गांगुर्डे, सुरेखा ढाके, शिला  सांगळे, ज्योती ठाकूर, रोहिणी व्हडगळ (मनमाड) , शुभांगी देवरे, गौरी कुलकर्णी, चेतना परमार्थ, पोस्ट ऑफिस कर्मचारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  या वेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महामानवाच्या प्रतिमीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी प्रास्तासाविक तालुका प्रमुख राजु गांगुर्डे यांनी केले की,  समिती ही संपुर्ण महाराष्ट्र मध्ये आहे व राज्या बाहेर ही आहे. नोंदणीकृत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत असते. एक लाख पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे आज पोस्ट विमा हा सर्वांना न्यायक आहे . सर्व धर्मिंयासाठी खुला आहे याचा लाभ घ्यावा असे म्हटले  आहे. प्रमुख पाहुणे   नितिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत पवार यांनी केले व यासाठी किरण गवळे , तालुका सचिव वसंत मोरे , तालुका संघटक बबलू गवळे, विकी मराठे, किरण फुलारे, बापू खरे, गणपत मुकणे, पिंटू मेंगल ठाकरवादी , यांनी परिश्रम घेतले. यावेळी   सर्व मान्यवरांचे अन्याय अत्याचार निर्मलुन समिती तालुका प्रमुख राजु गांगुर्डे तर्फे खुप खुप आभार व्यक्त करण्यात आले. 

Tuesday, August 2, 2022

मनमाडमधील रिक्षा चालकांची मुलगी डी - फार्मसी अंतिम परिक्षेत आली प्रथम, रिक्षा युनियन केला सत्कार

        सत्कार करताना रिक्षा युनियन                       पदाधिकारी

    
 मनमाड ( प्रतिनिधी) - महाराष्ट्र बोर्ड तंत्रशिक्षण तर्फे - २०२२ घेण्यात आलेल्या डी- फार्मसी अंतिम वर्षाच्या परिक्षेचा नुकताच निकाल काही दिवसापूर्वी लागला.     
यात मनमाडमधील  रिक्षाचालक असद खान यांची मुलगी पठाण सुफिया असद खान हीने डी - फार्मसी अंतिम परिक्षेत प्रथम क्रमांक  ८५.५० % गुण मिळवत यश संपादन केले.  कन्नड तालुक्यातील कुंजखेडा येथील उमर बिन खत्तीब वेरफॉल ट्रस्टीच्या डी - फार्मसी महाविद्यालयात प्रथम क्रमांकांनी पास झाली.
रिक्षा चालकांच्या मुलीने ईतके मोठी गरूड झेप घेतल्याने मनमाड शहरात निकालाची वृत लागताच  प्रत्येक जण कौतुकाचा वर्षाव करत आहे. मुलीच्या यशाबद्दल मनमाडच्या बस स्टॅन्ड रिक्षा युनियनतर्फे असद खान यांचा व  त्यांच्या मुलीचा सत्कार करण्यात आला. काबाळकष्ट करत  रिक्षा चालकांने मुलीला फार्मसी मध्ये प्रवेश मिळवून दिला. मुलीने संधीचे सोने करत  प्रचंड मेहनतीने , अभ्यास करत तीने या परिक्षा यशस्वी पास करत नावलौकीक केले. मुलीच्या यशाबद्दल वडिलांनी आनंदाने शाबासकी देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

नांदगावमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अंजुम कांदे यांच्या हस्ते ६२० वह्यांचे संच वाटप


नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरात  लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अंजुम कांदे यांच्या हस्ते वह्यांचे संच वाटप करण्यात आले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंजुम कांदे यांच्या संकल्पनेतून सोमवारी  पालिका शिक्षण मंडळातील सर्वच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. पालिका शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसोबत राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी पालिका शिक्षण मंडळाच्या नांदगाव व मनमाड शहरातील शाळांच्या मोडकळीला आलेल्या इमारती व वर्गखोल्या नूतनीकरणासाठी अंजुम कांदे यांनी पती आमदार सुहास कांदे यांच्यामार्फत पाठपुरावा केला. त्याची दखल घेत आमदार कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नगरविकास विभागातून दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच उपलब्ध करून दिल्याबद्दल नांदगाव शिक्षण मंडळातील 
शाळांच्या वतीने आमदार  सुहास कांदे यांचा सत्कार  करण्यात आला. अंजुम कांदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आम्ही लोकांप्रती कर्तव्य म्हणून काम करीत असतो, असेही श्रीमती कांदे म्हणाल्या. आपण सर्व एक कुटुंब आहोत. कुटुंबप्रमुख या नात्याने हे आमचे कर्तव्यच आहे. आज या स्तुत्य उपक्रमाची सुरवात केली आहे. यापुढे विद्याथ्र्यांसोबतच शिक्षकांनाही गणवेश उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या वेळी जवळपास ६२० विद्यार्थ्यांना वह्यांचे संच वाटप करण्यात आले.  यावेळी मुख्याधिकारी विवेक धांडे, प्रशासनाधिकारी चंद्रा मोरे, उज्वला खाडे, संगीता बागूल, विद्याताई जगताप, रोहिणी मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक साहेबराव घुगे, केदु जाधव, ईश्वर ठाकूर,   शाहिद अख्तर, लिपिक अनिल पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...