Tuesday, May 31, 2022

परवानगी मिळताक्षणी मंदिर उभारण्याचे काम सुरू होईल - लोखंडे



नांदगाव (प्रतिनिधी)-  नांदगाव नगरपरिषदेने केलेल्या ठरावाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर उभारून पुतळा स्थापित करण्यासाठी मराठा महासंघ कटिबद्ध आहे. सदर मंदिराचे डिझाईन फायनल करण्यासाठी आणि जयंतीनिमित्त व्याख्यानासह इतर कार्यक्रम घेण्यासाठी दोनवेळा बैठकीचे आयोजन करून सुद्धा प्रचंड राजकीय दबावामुळे कोणीही हजर राहू शकले नाही. या परिस्थितीमुळे व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे यांनी दिली. नांदगाव नगरपरिषदेने केलेल्या ठरावाप्रमाणे मराठा महासंघाने अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर उभारणीसाठी पालिका प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी मिळताक्षणी मंदिर उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल. आमचे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील, असेही श्री. लोखंडे यांनी सांगितले.
यावेळी मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाप्रमुख अशोक कदम, जिल्हा कार्याध्यक्ष कपील निफाडकर,तालुका प्रमुख भिमराज लोखंडे, उपाध्यक्ष बापुसाहेब जाधव,उप तालुका प्रमुख विशाल वडघुले,गणेश काकळीज,चिटणीस सुनील म्हस्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Saturday, May 28, 2022

नांदगाव शहरास आज महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट


नांदगाव ( प्रतिनिधी) :-  महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे  आज नांदगाव मध्ये नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या घरी भेट द्यायला गेले होते . आज संध्याकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस ने आले, त्यांच्या सोबत कार्यकर्ते ही होते. नांदगाव रेल्वे स्थानकावर  रेल्वेने प्रवास उतरले  होते. पोलीसही त्याच्या सुरक्षेसाठी हजर होते.

Thursday, May 26, 2022

खून करणारे दोन संशयितांना पोलीसांनी घेतले ताब्यात,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील नाक्या - साक्या  धरणा सांडव्याजवळ मंगळवारी दुपारच्या सुमारास मृतदेह तरंगताना आढळला होता. नांदुर येथील अमोल धोडीराम व्हडगर ( वय २२) यांचा  मृतदेह असल्याचे निष्पन्न झाल्याने नांदगाव पोलीसानी तपास चक्रे फिरवली.  पोलीसांनी चोवीस तासाच्या आत या खुनाचा उलगडा लावण्यात यश आले. या तरुणाची अनैतिक संबंधातुन हत्या करण्यात आली हा पोलीसाचा अंदाज खरा ठरला. खुन करणार्या दोन संशयितांना पोलीसांनी  ताब्यात घेतले. 
          मंगळवारी नांग्या- साक्या धरणाच्या सांडव्याजवळ मृतदेह तरंगत असताना काही लोकांनी पाहिला. मृत अमोल व्हडगर रविवारी सांयकाळी घरातुन निघून गेला. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. मृत अमोल च्या नातेवाईकांनी  दोन शोध घेण्याचा प्रयत्न केला, नंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दिली. पोलीसांनी  या प्रकरणी तपास सुरु केला असता मंगळवारी काही महाविद्यालयातील विद्यार्थी नाक्या- साक्या धरणाकडे फिरत असताना सांडव्याजवळ एक मृतदेह तंरगताना दिसला. त्यांनी यांची खबर पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळी येत लगेच पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला . पोलीस उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे आदीनी भेट देत तपासाची चक्रे फिरवत  खुन झालेल्या तरूणाचे संशयिताच्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन मृत तरुणाच्या वरातीतून बोलावुन त्याला दारू पाजून दोरीने गळा आवळला. त्याला ठार करून दोरीने हातपाय बांधून त्याला धरणात फेकुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मृत अमोल व संशयित नांदूर ईथील रहिवासी आहेत. पोलीसाना मिळालेल्या माहितीआधारे अमोल व्हडगर यांचे संशयित गोविंदा वाळुबा केसकर, चैतन्य ( सोनू) साहेराव केसकर   यांच्या नात्यातील महिलेशी जबरदस्तीने अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून खुन झाला आहे. 
         अमोलला वेळोवेळी समज देऊन तो जुमानत नव्हता , लग्नाच्या वरातीतून बोलावुन नाग्या- साक्या ईथे दारु पाजली दोरीने गळा आवळून व दोरीने हातपाय बांधून धरणात फेकले. या प्रकरणी पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे , रामेश्वर गाढे, दिपक सुरडकर यांनी संशयिताना ताब्यात घेत खुनाचा उलगडा चोवीस तासात लावला.

Friday, May 20, 2022

रस्त्यावर,दुचाकी व कारचा भीषण अपघात एक ठार तर दोन जखमी,अपघातानंतर दुचाकीने घेतला पेट


नांदगांव (प्रतिनिधी ) : रस्त्यावर,दुचाकी व कारचा भीषण अपघात एक ठार तर दोन जखमी,अपघातानंतर दुचाकीने घेतला पेट
 नांदगाव शहराजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाहय वळण रस्त्यावर उड्डाणपूलाजवळ शुक्रवार (ता.२०) दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास  दुचाकी व कार चा भीषण अपघात  होऊन दुचाकी वरील समाधान जगलू गायकवाड (वय २८) रा. इंदिरानगर कळमदरी ता .नांदगाव ठार तर विलास संजय धोत्रे व कार चालक असे दोन  जखमी झाले. 

अधिक माहिती अशी शुक्रवारी ( ता.२० ) दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास, नांदगांव वरुन जात असताना साकोराहुन नांदगावच्या बाजुने  येणारी  इटोस कार  M H 15  D S 9330, व दुचाकी  बजाज प्लटीना  मोटार सायकल यांच्यात  भीषण अपघात झाला, अपघात इतका भंयकर होता कि अपघातानंतर मोटर सायकलने जागेवर  पेट घेत  जऴुन,खाक झाली. कार व दुचाकी यांच्या मध्ये समोरा -समोर  धडक झाली कि कार ने दुचाकी ला पाठीमागून धडक दिली याबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरू होती. अपघात झाल्यावर  मोटर सायकल,चालक समाधान जगलू गायकवाड़ व, विलास धोत्रे, रस्त्यावर अवस्थेत पडले त्यांना उपस्थितानी त्वरित  उपचार करीता रुग्णवाहिकाने  नांदगांव ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले,त्यांची प्रकुती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी मालेगावला हलविण्यास आले मालेगावला जात असताना  समाधान गायकवाड या जखमी युवकाचा  मृत्यू झाला तर  दुसरा गँभीर जखमी विलास धोत्रे वर उपचार सुरू आहे. कार चालक नाशिक येथील असून त्यात तीन प्रवाशी होते त्यांना दुखापत झाली नाही. समाधान हा इंदिरानगर, कळमदरी तालुका. नांदगाव येथील रहिवाशी असून त्याची घरची आर्थिक परिस्थिती हालखची असून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे त्याचे मागील वर्षी लग्न झाले होते समाधानचा स्वभाळ मनमिळाऊ होता मेन उमेदच्या कळात समाधानचा अपघातात मृत्युची बातमी गावात पसरतात सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात आली . नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये अपघातात ची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजु मोरे आदी तपास करीत आहे.

मराठा महासंघ पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर उभारणार


नांदगाव  (प्रतिनिधी)  - नांदगाव शिवस्फूर्ती मैदानावरील शिवस्मारकाचे जीर्णोद्धाराचे कार्य अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि आमदार सुहास अण्णा कांदे यांचे कार्य तत्परतेमुळे मार्गी लागले. अखेर 03 जानेवारी 2022 रोजी भुमीपुजन करीत एका नयनरम्य सोहळ्यात दि 13 मार्च 2022 रोजी *युवराज संभाजीराजे छत्रपती* यांच्या शुभहस्ते शिव मंदिराचे लोकार्पण झाले. 

आणि तेव्हा पासून मराठा महासंघाकडून जनतेच्या अपेक्षा वाढू लागल्या. याच भावनेतुन तालुक्यातील अनेक प्रलंबित विषयांवर मराठा महासंघा सोबत लोक चर्चा करू लागले,या चर्चेदरम्यान सन 1992 पासून प्रलंबित असलेला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा विषय मराठा महासंघाने हाती घ्यावा अशी आग्रही मागणी होऊ लागली.
 मागणी रास्त आणि प्रलंबित असल्याने मराठा महासंघाने विषय हाती घेतला,

अत्यंत कमी कालावधीत विविध ठिकाणाहून या विषयावरील संपूर्ण माहिती गोळा करून शासन निर्णयामध्ये उल्लेख असल्या प्रमाणे पुतळा मराठा महासंघ स्वखर्चाने बसवणार असे जाहीर केले,परंतु या बातमीने संपूर्ण तालुक्‍यात खळबळ झाली,अनेकांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या की पुतळ्यास लागणाऱ्या लाखो रुपयांचा खर्च मराठा महासंघ कसा करणार. एक अविश्वासाचे वातावरण तयार झाले. त्यामुळे मराठा महासंघाने तातडीने मुर्तीकार यांचा शोध घेऊन अत्यंत कमी कालावधीत शासन निर्णयातील निष्कर्ष प्रमाणे ब्राँझ धातूची आकर्षक पुतळा तयार करून दि 1 मे 2022 या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुतळा बहुजन समाजा समोर प्रदर्शित करून समाजामध्ये विश्वास निर्माण केला, 

पुतळा उभारण्याच्या परवानगीच्या प्रस्तावासाठी शासन निर्णया प्रमाणे एक वर्षाच्या आतील ठरावाची आवश्यकता होती. यामुळे नांदगाव नगरपालिकेचे 1992 पासून वेळोवेळी केलेले सर्व ठराव कुचकामी ठरले, आम्ही नांदगाव नगरपरिषदेकडे नवीन ठराव मागितला असता. त्यांनी सांगितले की नांदगाव नगर परिषद बरखास्त झालेली आहे,आता प्रशासकीय राजवट असल्याने धोरणात्मक विषयावरील ठराव आम्ही देऊ शकत नाही.

आमच्याकडे माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेले दस्त ऐवज एक वर्षाच्या आतील व नियोजित ठिकानाचे असेच आहे परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीवरून मंदिरासाठी आमच्या परवानगीची गरज नाही,असे आम्हाला संबंधित  विभागाकडून सांगण्यात आले आहे, सकल धनगर समाजाने निर्णय घेतल्यास नांदगाव नगरपरिषदेच्या दस्तऐवजा प्रमाणे अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल धनगर समाज बांधव एकत्र मिळून लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम काम करु शकतात.

लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती  निमित्ताने दि 28 मे रोजी इतिहास तज्ञ प्राध्यापक *डॉ.यशपाल भिंगे* सर (नांदेड) यांचे *व्याख्यान*, *महाप्रसाद* व दि 31 मे रोजी जयंतीची तयारी या सर्व नियोजित विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आम्ही दि 17 मे 2022 रोजी हनुमान मंदिर नांदगाव येथे बैठक आयोजित केली होती, परंतु बैठकीस समाजातील अनेक मान्यवर सन्माननीय व्यक्ती उपस्थित राहू न शकल्याने ठोस निर्णय घेता आलेला नाही.

समाजाच्या कृतिशील सहभागाशिवाय हे सत्कार्य सिद्धीस जाणे अशक्य आहे.                          अखिल भारतीय मराठा महासंघ छत्रपतींच्या विचारांवर चालणारी शंभर वर्षांची परंपरा लाभलेली संघटना आहे,मराठा महासंघाला कोणत्याही प्रसिद्धीची आवश्यकता नाही,पुतळा नियोजित ठिकाणी विराजमान व्हावा या एकमेव प्रामाणिक हेतूने आम्ही काम करीत आहोत. मंदिर बांधकाम करण्याची जबाबदारी कोणी धनगर समाज बांधव घेणार असतील तर आम्ही पुतळा त्यांच्याकडे सुपूर्द करण्यास तयार आहोत,आणि लागेल ती मदत करण्यास तयार आहोत, त्यामुळे कोणीही कोणताही गैरसमज करून घेऊ नये.       

शासन निर्णया प्रमाणे *आम्ही स्वखर्चाने पुतळा उपलब्ध करून मराठा महासंघाने दिलेला शब्द पूर्ण केला आहे* आता पुढील कार्य समाजाच्या कृतिशील लोकसहभागातून व्हावे,हिंदू धर्म संस्कृती प्रमाणे कोणत्याही मंदिराचे संपूर्ण काम एका व्यक्तीने किंवा एका संस्थेने करू नये असे म्हटले जाते तेच योग्यही आहे,*मराठा महासंघ कोणत्याही परिस्थितीत शासकीय नियमांचे उल्लंघन करणार नाही,अधिकृत व कायदेशीर रीत्या व सर्व नियमांचे पालन करीत अहिल्यादेवी यांच्या मंदिर व पुतळ्याची स्थापना करेल,* तरी आम्ही येत्या रविवार दि 22 मेला
रोजी सकल धनगर समाजासोबत व बहुजन बांधवांसोबत पुन्हा एकदा जाहीर बैठक घेण्याचा प्रयत्न करून या संदर्भात चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
सकल धनगर समाज बांधवांना सोबतीला घेऊन पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांदगाव येथे मंदिर बांधन्याची  जबाबदारीचा स्विकार करणार आहोत,असे प्रसिद्धी पत्रक मराठा महासंघाचे तालुका प्रमुख,भिमराज लोखंडे यांनी जाहीर केले.

Tuesday, May 17, 2022

मटण मार्केट अखेर जमीनदोस्त....गेल्यावर्षी लेंडी आणि शाकंबरी नदीला पूर आल्यामुळे केली कारवाई... केवळ मटण मार्केट व काही अतिक्रमण काढल्याने नागरिकांनी केली नाराजी व्यक्त...

नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगांव शहरातील  लेंडी आणि शाकंबरी नदीवर असलेले अतिक्रमण आज जमीनदोस्त करण्यात आले.नांदगांव मनमाड नगरपालिका कर्मचारी पोलीस तसेच महसूल विभागाने सामुहिक कारवाई करत आज हे वादग्रस्त मटण मार्केट पाडले मुळात ज्या वेळी रेल्वेच्या वतीने अंडरपास बनविले त्यावेळी या मटण मार्केट का हटविण्यात आले नाही याउलट ज्या गोष्टी अंडरपास साठी अडथळा वाटत होत्या त्या सोडून देण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.मटण मार्केट सोबत अनेक छोटेमोठे दुकाने समता मार्ग आणि भाजीपाला मार्केट जवळील अतिक्रमण व्यवसायिक दुकाने देखील हटविण्यात आल्याने अनेकांना आता व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी सांगितले.तर मुळात 2004 नंतर मटण मार्केट व कत्तलखाने हे गावाच्या बाहेर बनविण्यासाठी अद्यादेश असताना नांदगांव नगर पालिकेच्या वतीने 2008 साली तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या इमारतीच उद्घाटन केलेच कसे असे विचारले असता याबाबत माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले. तर रात्री उशिरापर्यत कारवाई सुरु होती.
व्हीवो:- नदीपात्रात अतिक्रमण आहे तर ते पावसाळ्यात काढून पुन्हा बाकीचे 8 महिने का बसवले जाते पालिकेच्या वतीने व्यवसायिक गाळे उपलब्ध करून या नागरिकांचे पुनर्वसन का केले जात नाही अशा अनेक प्रश्न स्थानिक पातळीवर आहेत या मध्ये स्थानिक राजकारण आडवे येत असल्याचा आरोप देखील स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे.

Saturday, May 14, 2022

नांदगाव तालुका खादी ग्रामोद्योग विविध कार्यकारी सहकारी संघाच्या च्या अध्यक्षपदी शिवाजीराव कवडे तर उपाध्यक्षपदी संजय कदम यांची बिनविरोध निवड


नांदगांव / बाणगाव बुद्रुक (प्रतिनिधी)-  नांदगाव तालुका खादी ग्रामोद्योग विविध कार्यकारी सहकारी संघाच्या च्या अध्यक्षपदी शिवाजीराव कवडे तर उपाध्यक्षपदी संजय कदम यांची बिनविरोध निवड झाली.
शुक्रवारी (ता.१३) रोजी येथील प्रशासकीय  संकुलातील सहकार विभागाच्या कार्यालयात अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा झाली.
अध्यक्षपदासाठी शिवाजीराव रामराव कवडे तर उपाध्यक्ष पदासाठी नांदगाव तालुका विश्वकर्मा सुतार संघटनेचे अध्यक्ष संजय पंढरीनाथ कदम यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत विघ्ने यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.अध्यक्ष पदासाठी शिवाजीराव कवडे यांना सूचक म्हणून बाबासाहेब कदम तर अनुमोदक म्हणून दिपक मोरे यांनी स्वाक्षरी केली उपाध्यक्ष पदासाठी संजय कदम यांना सूचक म्हणून डिंगबर गवळे तर अनुमोदक म्हणून विलास बोरसे यांनी स्वाक्षरी केली. 
 विशेष सभेसाठी संस्थेचे संचालक,शिवाजीराव कवडे,संजय कदम, चंद्रशेखर कवडे,डिंगबर गवळे,दिपक मोरे,विलास बोरसे,बाबासाहेब कदम,भाऊसाहेब काटकर,सुवर्णा काकळीज,मीना बोरसे,आदी उपस्थित होते निवड जाहिर होताच कार्यकर्तेनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.निवडणूक कामी संस्थेचे सचिव शरद उबाळे यांनी मदत केली.,नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीराव कवडे उपाध्यक्ष संजय कदम यांचे निवडीबद्दल विलास, बोरसे, मधुकर खैरणार, नंदलाल आहिरे यांनी सत्कार केला तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्षचे जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे,आमदार सुहास कांदे,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,माजी सभापती तेज कवडे,शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गुलाब भाबड यांनी अभिनंदन केले यावेळी मधुकर,खैरणार,नंदलाल आहिरे,संग्राम कवडे, बाळासाहेब जाधव,कैलास जाधव,सुभाष पेंढारकर,अशोक कदम, सोपान कदम आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती संभाजी राजे यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करावी....! सौ.सोनवणे यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी


नांदगाव  ( प्रतिनिधी ):- राज्यात सध्या शिवशाहीचे राज्य आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचे तसेच मित्रपक्ष अर्थात महाआघाडी सरकार हे शिव फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे आहेत तरीही या राज्यांमध्ये स्वराज्य स्थापनेत महत्वाचे योगदान असणाऱ्या युवराज छत्रपती संभाजी राजे यांची जयंती शासकीय कार्यलयात साजरी केली जात नसल्याची खंत नांदगांव येथील शिवकन्या सौ संगीता सोनवणे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली असुन त्वरित राज्य सरकारने अध्यादेश काढून शासकीय परिपत्रकात युवराज छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी करण्यात यावी असे आदेशच परित करावे व हे खरोखरच रयतेचे राज्य असल्याचे दाखवून द्यावे अशी मागणी केली आहे.
               संगिता सोनवणे या गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची रोज न चुकता मनोभावे व स्वखर्चाने स्वच्छता व आरती करतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर जर स्वराज्याची लढाई कोणी लढली असेल तर ती युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी याची इतिहासात नोंद असतांना देखील राज्य सरकारने संभाजी राजे यांची जयंती अद्यापही शासकीय कार्यलयात साजरी करण्यासाठी आदेश दिलेलं नाहीत याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  पत्र लिहले आहे, पत्रात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य हे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे राज्य आहे.महाराष्ट्रात राज्य सरकारचे काम  आपल्या नेतृत्वाखाली अगदी उत्तम सुरू असुन शिव फुले शाहू आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुष जयंती आपण शासकीय कार्यलयात साजरे करण्यासाठी परिपत्रक काढले आहे.महोदय मला आपणास सांगण्यास खेद वाटतो की छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर महराष्ट्रात स्वराज्याची पताका फडकविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा थोर महायोध्दा ज्याचे कार्य साता समुद्रा पार आहे त्या राजांची जयंती आपण शासकीय कार्यलयात साजरी करत नाही हा अन्याय असुन आपण आपल्या स्तरावर त्वरित छत्रपती संभाजी राजे यांची जयंती सर्व शासकीय कार्यलयात साजरी करण्यासाठी परिपत्रक काढावे व राज्याच्या जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.तसे निवेदन देखील त्यांनी नांदगांव नगर पालिकेला दिले आहे.
--------------------------------------------------------------
राज्यात शिवशाही असतांना असे होणे अपेक्षित नाही...!
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मित्र पक्षाचे सरकार आहे थोडक्यात राज्यात शिवशाही आहे तरीही स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीचा साधा उल्लेख शासकीय परिपत्रकात नसल्याने वाईट वाटते मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन जयंती साजरी करण्यासाठी अद्यादेश काढण्याची मागणी केली आहे.ठाकरे सरकार नक्की न्याय देईल अशी आम्हाला खात्री आहे.
-सौ. संगीता सोनवणे, शिवकन्या नांदगांव

नांदगाव येथील काळे वस्तीत एका महिलेस सर्पदंश

नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगाव येथील  काळे वस्तीत राहणारे शरद काळे हे जवळील रेनबो कलर फॅक्टरी मध्ये कामगार खूप गरीब परिस्तिथी मध्ये आपलं कुटुंब संगोपन करत असे शरद काळे यांची पत्नी वैशाली शरद काळे रात्री एक वाजून वीस मिनिटं च्या सुमारास सर्पदंश झालं वैशाली काळे (वय ३१ ) त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे घर जवळ आजूनबाजू पूर्ण शेती परिसर घरात खाली झोपलेले होते रात्री एक वाजून वीस मिनिटं च्या सुमारास त्यांच्या पायाला सर्पदंश झालं त्यांनी उठून पायाजवळ बघितलं तर एक सर्प जातांना दिसलं आणि पायाला त्रास जाणवलं पायाला बघितलं तर दोन दातांचे निशाण दिसलं त्यांनी त्यांचे पती शरद काळे यांना लगेच उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला शरद काळे यांनी शेजारी त्यांचे पुतणे सचिन काळे यांना संपर्क केला आणि घटना माहीत पडताच सचिन काळे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना रात्री दीड वाजेच्या सुमारास संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितलं बडोदे यांनी वेळ न घालवता ताबडतोब काळे वस्तीत घटनास्थळी पोहोचले आणि घरात साप शोधले आणि घरात किचन जवळ भांड्यांची मांडणी खाली कोब्रा जातीचे विषारी सर्प दिसले बडोदे यांनी वेळ न घालवता तो सर्प वेवस्तीत पकडून बरणीत बंद केला व पेशंड वैशाली शरद काळे धीर दिले आणि त्यांच्या पायाला दंश झालेल्या जागेला डेटॉल नि स्वछ धुतले आणि पाय च्या थोड आवळपट्टी बांधले आणि नांदगाव आरोग्य रुग्णालय सरकारी दवाखाना संपर्क केला व झालेला प्रकार सांगितला आणि पेशंड वेळेवर पोहोच केले रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले व महिलेला जीवदान मिळाले आता प्रकृती स्थिर आहे सर्पमित्र विजय बडोदे यांनी सर्पदंश होण्याचे व प्रथम उपचार वर थोडक्यात माहिती दिली पहल जमिनीवर झोपणे टाळा कारण खाली जमिनी रात्रीच्या वेळेस साप भक्ष शोधता शोधता साप घरात प्रवेश करतात आणि जमिनीवर झोपलेल्यावर सर्पदंश चे जास्त चान्सेस असतात दुसरं सर्पदंश झाल्यावर तांत्रिक मांत्रिक यांच्या कडे न जाता आरोग्य रुग्णालय घेऊन जाणे तिसरं सर्पदंश झाल्यावर त्या जागेला ब्लेडने कापू नका आपली नस कट होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे ती जागा डेटॉल किंवा साबणाने स्वछ धुवा अवळपट्टी करा आणि दवाखान्यात घेऊन जाणे हे महत्वाचे अशी माहिती दिली आणि काळे कुटुंब यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांचे कौतुक केले आभार मानले आणि सर्पमित्र च्या कार्यला शुभेच्या दिले आणि सर्प वनविभागात नोंद करून लांब निसर्गमुक्त करण्यात आले.

Wednesday, May 11, 2022

नांदगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेमुद शेख, माजी आमदार पंकज भाऊ भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद युवा संवाद यात्रा संपन्न


 नांदगाव ( प्रतिनिधी) -   युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे कार्यकर्ता जोडला तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल यात शंका बाळगण्याचे कारण नाही. मात्र आपण निवडणूक लागली तरच तिची तयारी पंधरा दिवसात करतो असे न करता आतापासूनच तयारीला लागा असे आवाहन याप्रसंगी  प्रदेशअध्यक्ष श्री मेहबूब शेख यांनी केले. शंभर वर्ष शेळी म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा तुम्ही किती दिवस जगले यापेक्षा कसे जगले ते लोकांनी नाव घेतले पाहिजे चिल्लर चा आवाज केला तर तो मोठा असतो तर नोटांचा आवाज होत नाही मात्र किंमत मोठी असते आपल्या माणसाची किंमत मोठी आहे आपला माणूस सुशिक्षित आहे त्यामुळे युवकांनी न घाबरता अंगावर आले तर शिंगावर घेण्याचे काम युवक राष्ट्रवादी काँग्रेसने करावे असे प्रदेशाध्यक्ष शेख यांनी सांगितले. यावेळी मा.आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक जिल्हाअध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार,तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
  व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार,युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, डॉ वाय.पी.जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी युवक शहराध्यक्ष गौतम जगताप,हबीब शेख, नगरसेवक वाल्मीक टिळेकर,नारायण पवार,  राजू लाठे,दत्तू पवार, सचिन जेजुरकर, अशोक पाटील,डॉ. भरत जाधव, किसनराव जगधने,प्रताप गरुड, शिवा सोनवणे, दया जुन्नरे, निलेश पवार, संपत पवार, संतोष बिन्नर, शिवा माळी, अक्षय पवार, गणेश चव्हाण, शुभम शिंदे, विशाल काळे, यश चव्हाण, विकास उशिरे,राहुल आहिरे, पंढरीनाथ गायकवाड, आकाश शेलार, किशोर महाजन, नरेंद्र महाजन, बापू रौंदळ,अक्षय देशमुख दिलीप निकम,महेश पवार, योगिता पाटील, सुगंधा खैरनार, जयश्री जुन्नरे, कविता राऊत आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शेलार यांनी केले.

Saturday, May 7, 2022

कोब्रा ने चक्क कोब्रा सापाला जिवंत गिळले

नांदगाव (प्रतिनिधी ) - हिंगणवाडी विजय जीवन स्टाईल या ठिकाणी स्टाईल गाडी मध्ये भरण्याचे काम चालू होतं स्टाईल उचलत असताना एक कोब्रा जातीचे विषारी साप स्टाईल मध्ये अडकलेलं लेबर ला दिसलं  त्या ठिकाणी वेल्डिंग चे काम चालू होते वेल्डर मोहन शिलावट पप्पू देवरे दीपक नंन्नावरे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केलं बडोदे वेळेवर पोहीचले आणि कोब्रा सापाला वेवस्तीत पकडत असताना कोब्रा ने ओमींटिंग केली तर चक्क कोब्रा जातीचे साप बाहेर काढले अशी घटना खूप दुर्मिळ आहे कोब्रा साप सापाला खाते हे ऐकलं आहे पण बघायला मिळत नाही हे दुर्मिळ दृश्य बघायला मिळालं आणि उन्हाचे उष्णतेमुळे साप गारव्याचे ठिकाणी साप येऊन बसतात म्हणून हा साप येऊन बसला असेल अशी माहिती देऊन वनविभागात नोंद करून निसर्गात सोडण्यात आले.

Sunday, May 1, 2022

गंगाधरी ईथील खैरनार वस्ती ते आहेरवाडा पर्यंत रस्त्यासाठी उपोषण,


नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील  मौजे ग्रामपंचायत गंगाधरी खैरनार वस्ती ते आहेरवाडा पर्यंत रस्ता मिळावा या मागणी  साठी दि.१ मे रोजी नादंगाव येथील नवीन तहसीलदार कार्यालय समोर महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच नागरिक , महिला, लहान  शाळेची मुले आमरण उपोषण साठी बसणार होते.  व आम आदमी पार्टी च्या मार्गदर्शन व सक्रीय सहभागी होत जिल्हा उपाध्यक्ष मी स्वता विशाल शिवाजी वडघुले हे उपोषणात सहभागी होऊन नागरिकांच्या न्यायासाठी हक्का साठी सहभागी होणार अशी ग्वाही दिली होती.   तहसिलदार  सिध्दार्थ मोरे यांच्या सोबत चर्चा नतर  आदोलन स्थगित करण्यात आले व  दि. ५ मेला सकाळी १०:३० वाजेला ग्रामपंचायत गंगाधरी येथे स्वता तहसीलदार व गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरंपच व नागरिक यांच्या मधे रस्ता प्रश्न मार्गी लावून देण्याचे आश्वासन  तहसीलदार  यांनी दिले.
या उपोषणात अरूण यंशवत दाभाडे, शिवाजी पंढरीनाथ आहेर, संजय काशीनाथ आहेर, बाळू गंगाधर आहेर,बळीराम तानाजी आहेर, मनोज शामराव आहेर, सुनील आशोक सोनवणे, सुरज शिवाजी आहेर, स्वप्नील आरूण दाभाडे, महेंद्र शामराव आहेर, योगेश संजय आहेर, आक्षय शांताराम आहेर, संदिप  आहेर, मच्छिंद्र आहेर, अजंनाआहेर, इदुबाई  आहेर, मंदा आहेर, विजया आरूण दाभाडे,  रजंनासंजय आहेर, रंजना सुनिल सोनवणे, प्रमिला बाळू आहेर, सरु आहेर , अनिता शांताराम आहेर,  मदा तुकाराम आहेर हे उपस्थित होते.‌

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...