Tuesday, November 30, 2021

नांदगाव शहरात मेडिकल दुकानातून रोख रक्कमेसह साहित्य चोरीला

 नांदगाव शहरात मेडिकल दुकानातून रोख रक्कमेसह साहित्य चोरीला 

नांदगांव ( प्रतिनिधी - महेश पेवाल ) - नांदगाव शहरामधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दोन मेडीकल  व एका घरांचे कूलूप तोडून चोरांनी रोख रक्कम चोरून फरार झाले. रविवारी मध्यरात्री दुकानात शिरून महाग असलेले संगणक संच, ईतर किमती वस्तूंना चोरांनी स्पर्श केला नाही. चोरट्यानी मेडिकल दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे सह  विडीयो सेव्ह करणारे डीव्हीआर मशीनची वायर काढून चोरांनी पळ काढला. ईथे चोरी घटना घडल्याने पोलीसांची गस्त  वाढविण्याची गरज निर्माण झालेली आहे.

      शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले आंबेडकर चौक जवळ विकी हरिभाऊ गायकवाड यांची संजीवनी मेडीकल असून चोरांनी ईथून रोख रक्कमेसह कॅमेरे , डिव्हीआर चोरल्याने यांचा हेतू काय होता ते समजू शकले नाही , येवला रोड जवळील विघ्नहर्ता मेडीकल स्टोर ईथे असाच प्रकार घडल्याने नांदगाव केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने चोरांना अटक करण्याची मागणी पोलीसांकडे  निवेदनांद्वारे करण्यात आली . नांदगाव पोलीस सीसीटिव्ही ची मदत घेत चोरांचा शोध घेत आहे. 




Monday, November 29, 2021

मोटारी दुरुस्त केल्याने मनमाडचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार




मोटारी दुरुस्त केल्याने मनमाडचा  पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार

मनमाड( प्रतिनिधी- परवेज शेख ) - वाघदर्डी धरणाच्या जलशुध्दीकेंद्रावर  तीनही मोटारी बसवल्याने बंद झालेला पाणी पुरवठा पुन्हा सुरू होणार आहे.   मनमाड शहरातील पाणीपुरवठा सुरु झाल्याने नांगरिकांना दिलासा मिळाला आहे . शहराला आता सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या नगराध्यक्षा   पद्मावती धात्रक यांनी  दिली. 
              जलशुध्दीकरणाच्या तीनपैकी दोन मोटारी जळाल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. ईथील नांगरिकांना पाणी  १५ ते १८ दिवसांनी पाणी येत होते, यांवर नांगरिकांनी संताप व्यक्त केला.  शहराला महिन्यातून चारवेळा पाणी पुरवठा होणार,  आठवड्यातून एकदा पाणी मिळेल . वाघदर्डी धरण तिसरे वर्षीही भरलेले असून तरी नांगरिकांना पंधरा दिवसानंतर पाणी पुरवठा सुरु होता. मोटारी दुरूस्त केल्याने पाणी पुरवठा सातदिवसाआड करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने शिवसेना गटनेते गणेश धात्रक यांनी सांगितले. यावेळी माजी आ.जगन्नाथ धात्रक, नगरसेवक महेंद्र सिरसाट, पिंटु कटारे, सनी फसाटे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्तार  शेख व ईतर कर्मचारी उपस्थित होते. 


Sunday, November 28, 2021

मनमाड मध्ये शिवसेना शिष्टमंडळाने केली अश्पाक तांबोळी यांच्या घरांची पाहणी


मनमाड (  प्रतिनिधी - परवेज शेख ) -      मनमाड मध्ये      शुक्रवार (दि .26) रोजी खाकीबाग येथे अश्पाक तांबोळी यांच्या घरात गॅस सिलेंडरने पेट घेऊन आग लागली. त्यात त्यांच्या घराचे प्रचंड नुकसान होऊन,घरातील सर्व सामान जळून खाक झाले. या घटनेची दखल घेऊन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आदेश देऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ त्वरित भेटीसाठी पाठवले व त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले या शिष्टमंडळात शिवसेनेचे जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड,उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद,तालुका उपप्रमुख सुभाष माळवतकर,दिनेश केकान,शहर संघटक कृष्णा जगताप,राहुल आहिरे,हे उपस्थित होते.

मनमाड-नांदेड डेमो पॅसेंजर सुरू




मनमाड-नांदेड डेमो  पॅसेंजर सुरू

रेल्वे प्रशासनाने २६ नोव्हेंबरपासून मनमाड-नांदेड डेमो स्पेशल पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०७७७७ ही नांदेड-मनमाडपर्यंत तर गाडी क्रमांक ०७७७८ ही मनमाड ते नांदेड अशी धावणार आहे. नांदेड-मनमाड ते डेमो पॅसेंजर सायंकाळी ७.२५ वाजता मनमाडसाठी मार्गस्थ होईल. ही गाडी पहाटे ५.५० ला मनमाड येथे पोहोचणार आहे. तर सकाळी ६.१० ला ही गाडी पुन्हा मनमाडवरून नांदेड येथे मार्गस्थ होईल. ही गाडी चालु झाल्याने प्रवासानी समाधान व्यक्त केले. 

तपशील खालीलप्रमाणे-

या गाडीला १० डेमू (DEMU) कोच असतील. 

पुढील थांबे अशी : नगरसोल, तरूर, रोटेगाव, परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूल, दौलताबाद, औरंगाबाद, मुकुंदवाडी, चिखलठाण, करमाड, बदनापूर, जालना, कोडी, रांजणी, परतूर, उस्मानपूर, सतुना, सेलू, मानवत रोड, देवळगाव अवचार, पेरगाव, परभणी, पिंगळी, मिरखळ, पूर्णा, चुडावा आणि लिंबगाव.या विशेष गाड्या अनारक्षित एक्स्प्रेस शुल्कासह चालतील. प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९शी संबंधित सर्व नियमांचे, SOP चे पालन करण्याची विनंती आहे

Friday, November 26, 2021

स्थांनिकाना गिरणा धरणाचा मच्छिमार ठेका देण्याची मागणी


नांदगाव ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - गिरणा धरणा च्या मच्छिमार  बेकायदेशीर ठेक्या विरोधात नादगाव मध्ये गुरुवारी ( दि.२५) ला  तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.   बेकायदेशीर ठेका रद्द करण्यात यावा,  शासनाची फसवणुक करणार्या ठेकेदारावर विरोधात  कारवाई करण्यात यावी, आदिवासी मच्छिमारावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, या अनेक मागण्यासाठी प्रहार संघटनेतर्फे तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

  यावेळी प्रहार संघटनेतर्फे जोरदार घोषणा देण्यात आल्या.  विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निवेदनात गिरणा धरणाचा  कंपनीच्या नावाने ठेका घेतला तो मी. ब्रिज कंपनीनुसार कायद्यानुसार स्थापन झाली नाही.

         गिरणा धरणावरील ठेकेदाराने  मच्छिमारांचे मासे पकडण्याचे जाळे  फाडल्याने आदिवासी बांधवानवर ऊपासमारीची वेळ आली असुन आदिवासी बांधवांना एक वेळचे चुल पेटवणे ही कठीण  झाले आहे . कारण गिरणा धरणावरील आदिवासीनकडे मासेमारी सोडुन दुसरा कोणताही व्ययसाय नसुन ना शेती ना स्वताचे घरदार पहिलेच कोरोना महामारीमुळे बेरोजगारी वाढली आहे.  अशातच आदिवासींचे पोट भरण्याचे साधन होते तेही ह्या ठेकेदाराने हिरावुन घेतले आहे.  आदिवासींनी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे आदिवांसीचे जाळे फाडुन फेकुन देणे असा प्रकार ठेकेदारा कडुन सुरू आहे तसेच बेकायदेशीर ठेक्याच्या विरोधात आंदोलन करणार्या आदिवासी विरोधात खोट मारहाणीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. गिरणाधरणावरील ठेकेदार हा पोलीस प्रशासनाला खोटी माहीती देऊन बेकायदेशीर ठेक्या विरोधात आंदोलन करणार्या मच्छिमारांवार मारहाणीचे खोटे गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासनाची दिशाभुल करत आहे . याच कारणास्तव मालेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवानमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन, गावा गावातील शांतता भंग होत आहे .आणि कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे . तसेच ऊपासमारीची वेळ आली असतांना आदिवासींनी आपल्या घरावर काळे झेंडे लावुन काळी दिवाळी साजरी केली वर्षातुन एकदा येणारा दिवाळी सारखा सणही आदिवासींना साजरा करता आला नाही. तरी अशा मुजोर व गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदारावर ठाकरे सरकार कारवाई करेल का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. या मोर्चात शेखर पगार , संदीप सुर्यवंशी, बाबाजी पवार,  संजय शिवडे, भुरा जावरे , योगेश गर्दे, उमेश पाटील, बापु कोळी, शांताराम नाईक ईत्यादी गिरणा धरण प्रकल्पग्रस्त व स्थानिक मच्छिमार  सहभागी झाले




Wednesday, November 24, 2021

मनमाडच्या जनतेला पंधरा दिवसानंतरही पाणीपुरवठा खंडित !!

.                       वाघदर्डी धरण


मनमाड ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - मनमाडला धरणाला पाणी , नळाला नाही अशीच परिस्थिती ईथील जनतेवर  आली. वाघदर्डी धरण भरले असल्याने मनमाडच्या जनतेला मात्र कृत्रीम पाणीटंचाईमुळे त्रास सोसावा लागतोय. पंधरा दिवस उलटले तरी मनमाड जनतेला नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामूळे पाणीपासून वंचित रहावे लागते. सव्वा लाख लोकसंख्या असलेले शहर आज बोअरवेलचे पाणी पिण्याची वेळ ईथील जनतेवर आली.  हे पाणी प्याल्याने विविध आजाराचा धोका  झालाय . नगरपरिषदे प्रशासन कडून  सांगितलं की , धरणावरील पंपिग मोटारी जळाल्याने पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे , कारणामूळे जनतेस पाणीपासून वंचित रहावे लागते.

             यासाठी जाब विचारणारे लोकप्रतिनीधी, राजकीय पुढारी आणि सामाजिक संघटना पूढे येत नसल्याने नांगरिकांनी रोष व्यक्त केला. सद्या पालिकेवर शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेस , आरपीआय चारही पक्षाची सत्ता असून, नांगरिकांनी  टँकरने पाणीपुरवठा व्यवस्था करण्याची अपेक्षा व्यक्त केली.  कोरोना आटोक्यात आल्याने लग्नसोहळे सुरु आहे. लग्नसोहळे असल्याने पाहूणाना अंगोळीचे पाणी सोडा प्यायला पाणी व्यवस्था  नाही.  नगरपरिषदे कडून सांगण्यात आले की तीन पैंकी दोन पंपिग मोटारी जळाल्याने पाणी पुरवठास विलंब  होतोय, ढिसाळ कारभाराचा त्रास आम्हाला का असाही प्रश्न नांगरिकाकडून केला गेला. 




             

Monday, November 22, 2021

संस्थेच्या माध्यमातून निराधार परिवारास दीपावली निमित्त मदतीचा हात








नांदगावप्रतिनिधी- महेश पेवाल) -       नांदगांव शहरातील श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्वर्गीय सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने निराधार व्यक्तिस दीपावली निमित्ताने मदत करण्यात आली.
                 स्वराज्यात शिवा काशी यांनी स्वताचे बलिदान देवुन श्री छत्रपति शिवाजी महाराज यांना वाचविले आज रयत आदराने बोलते की शिवा काशिद अमर हे ..असाच एक प्रकार नांदगांव येथील नविन तहसिल कार्यालयाच्या मागे किशोर मधुकर चव्हाण गाई चारत असतांना त्याच्या समोर एक व्यक्ति पाण्यात बुडत असतांना दिसला त्या व्यक्तिस वाचविण्यात यश आले , परंतु स्वंताचा प्राण गमवावा लागला अश्या वीराच्या धर्मपत्नीस ललिता चव्हाण यांच्या परिवारास दिपावलीची भेट म्हणून धान्य साडी चोऴी कपडे मिठाई व रोख रक्कम देण्यात आली या वेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल धामणे , प्रतिष्ठित व्यापारी शाम पारख , महिला बहुउद्देशीय संस्थेच्या उपाध्यक्षा सुशिला पारख , कामगार यूनियन सेना अध्यक्ष वामन पोतदार, मंत्रांल्यातील अमोल पारखे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, रमाकांत सोनवणे ,जटा चॅनलचे धनंजय गोजरेकर, सोमन जोशी ,व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालूकाध्यक्षपदी बाबासाहेब कदम तर सचिवपदी मनमाडचे आमिन शेख बिनविरोध




















नांदगाव ( प्रतिनिधी - परवेज शेख) - नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलंग्न असलेल्या नांदगाव तालुका  मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी दैनिक सकाळचे बाबासाहेब कदम यांची तर सचिवपदी मनमाडचे आमिन शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. 
      जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक यशवंत पवार , प्रभारी जिल्हाध्यक्ष अण्णा बोरगुडे पाटील, जिल्हा समन्वयक संजीव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष बब्बुभाई शेख  यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारिणीची निवडीसाठीची विशेष बैठक आज संपन्न झाली. निवडणुक निर्णय अधिकारी लक्ष्मण घुगे यांनी नव्या कार्यकारिणीची  घोषणा केली. 
             या बैठकीत नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक सन २०२२/२०२४ साठी पदाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण घुगे यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडली या बैठकीत खालील बिनविरोध कार्यकारणी निवडण्यात आली.
           कार्यध्यक्षपदी गिरीश जोशी , उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव, निलेश दायमा , गणेश आहेर, सरचिटणीस अमिन नवाब शेख सहसरचिटणीस विलास आहिरे खजिनदार भगवान हिरे सहखजिनदार भारत देवरे संघटक मोहम्मद नवाब शेख सहसंघटक अमोल बनसोड अझहर शेख समन्वयक रईस चांद शेख कार्यकारणी सदस्य महेश पेवाल, किशोर डोंगरे , सचिन गायकवाड , विशाल पवार , परवेज शेख , जुनेद शेख, मार्गदर्शक संजीव धामणे, गौतम संचेती, अजय सोनवणे, बब्बु शेख, शशिकांत पाटील आदी पदाधिकारीची बिनविरोध निवडणुक करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगाव नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात पटकावला ५२ वा स्थान


  स्वच्छता सर्वेक्षणासाठी स्थान मिळालं त्यासाठी  जागरुक नागरिक
    कर्मचारी विविध भागात जाऊन नांगरिकांना कचरा गाडीत टाकायला ध्वनिनिक्षेपक द्वारे सांगतात.



नांदगाव ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - नांदगाव नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात ५२ वा स्थान पटकावले . केंद्रीय नगरविकास व गृहनिर्माण मंत्रालयाने जाहिर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण - २०२१ च्या निकालात  नांदगाव शहराने भारतातील संपुर्ण पश्चिम क्षेत्रात ५७७ शहरांमधे ५२ स्थान मिळण्यात यश आले. शहराला कचरामुक्त मानांकनात एक स्टार मिळालं.   नगरपालिकेचे मुख्यधिकारी विजय धांडे यांनी सांगितलं की, नांदगावकरांच्या सहकार्याने अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तराचे वरचे स्थान प्राप्त करू शकते.  
     केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने देशभरात स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविली होती. यात जानेवारी ते ३१ मार्च २०२१ दरम्यान भारतामधे सर्व शहराचा समाविष्ठ करण्यात आला होता. विविध शहराचे स्वच्छतेच्या स्थितीचे मुल्यांकन करण्यात आले. देशातील स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी ४३२० शहरांचा सहभागी झाले होते. शहरांची निवड करताना स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत सर्वात स्वच्छ शहरासाठी रेंटीग स्टार दिले गेले. दिल्लीमध्ये शनिवारी ( दि.२०) विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या तर्फे स्वच्छ शहरासाठी स्वच्छ सर्वेक्षण पूरस्कार देण्यात आली.



Sunday, November 21, 2021

हैबियस कॉर्पस म्हणजे काय ?

Habeas Corpus म्हणजे काय?

 Habeas corpus हा लॅटिन शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे - शरीर सादर करणे, म्हणजे शरीरात व्यक्ती सादर करणे.  Habeas Corpus चा शाब्दिक अर्थ शरीराशी संबंधित आहे.  कायदेशीर भाषेत सांगायचे तर, एखाद्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करणे.  जय भीम या चित्रपटात पीडितेच्या वकिलाने पोलीस कोठडीतून हरवलेल्या व्यक्तीला प्रेतामध्ये न्यायालयात हजर करण्याची विनंती केली होती, जी पोलिसांची जबाबदारी आहे.  आता आपण या याचिकेबद्दल थोडे चांगले समजून घेऊ.

 हेबियस कॉर्पस याचिका म्हणजे काय?

 आपल्याला हे आधीच माहित आहे की आपल्याला घटनेत मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत, माणूस म्हणून आपल्याला मानवी हक्क आहेत आणि आपल्याला काही कायदेशीर अधिकार देखील आहेत.  या अधिकारांची पायमल्ली होत असेल, तर त्यासाठी देशात कायदा आहे, कायद्याचा आश्रय घेऊ शकतो.  संविधानाच्या अनुच्छेद २१ मध्ये आपल्याला जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क आहे, म्हणजे स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.  अशा अधिक अधिकारांचे उल्लंघन झाल्यास आम्ही न्यायालयात याचिका दाखल करू शकतो.

केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत ते कार्य करते?

 हे फक्त अशा प्रकारे समजून घ्या की जेव्हा पोलिस एखाद्या व्यक्तीला चौकशीच्या नावाखाली किंवा इतर कोणत्याही बाबींच्या नावाखाली बेकायदेशीरपणे ताब्यात घेतात, त्याला अनेक दिवस कैद किंवा नजरकैदेत ठेवतात किंवा अनेक दिवस/महिने त्या व्यक्तीचा ठावठिकाणा असल्यास. माहीत नाही, तर अशा परिस्थितीत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली जाऊ शकते.  असा विचार करा-

 जेव्हा एखाद्याला बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकले जाते.
 २४ तासांच्या आत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले नाही.

वकिल  कुमार सानू स्पष्ट करतात की अशी अटक किंवा पोलिस कोठडी बेकायदेशीर आहे आणि व्यक्तीला सुरक्षितपणे घरी जाण्याचा अधिकार असेल.  अटक झाल्यास, कायद्यानुसार त्या व्यक्तीला कारण सांगणे, त्याच्या कुटुंबीयांना कळवणे आणि त्याला त्याच्या वकिलाशी बोलू देणे आवश्यक आहे.  कारण न देता एखाद्याला अटक करणे, त्याला त्याच्या वकिलाशी बोलू न देणे, त्याला २४ तासांच्या आत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर न दाखवणे… हे कलम २२ चे उल्लंघन मानले जाते.

 कलम ३२ आणि २२६ अधिकार देतात

 अॅडव्होकेट सानू यांनी सांगितले की, जेव्हा कोणत्याही मूलभूत, घटनात्मक किंवा कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन होत असेल, तेव्हा तो न्यायालयात जाऊ शकतो.  राज्यघटनेत 2 महत्त्वाची कलमे आहेत.  कलम ३२ नुसार जर तुमच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता.  त्याच वेळी, अनुच्छेद 226 हे यापेक्षा अधिक व्यापक आणि महत्त्वाचे आहे, जे म्हणते की एखादी व्यक्ती त्याच्या मूलभूत, घटनात्मक आणि कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालयात जाऊ शकते.

 खासगी पक्षाविरुद्धही खटला चालवला जाऊ शकतो

 एखाद्याला पोलिसांनी उचलले, ताब्यात घेतले, तर सुखरूप घरी परतणे ही पोलिसांची जबाबदारी ठरते, हे उघड आहे.  हेबियस कॉर्पस याचिका सरकारच्या विरोधात आणि कोणत्याही खाजगी पक्षाविरूद्ध केली जाऊ शकते.  जसे कोणी गिरणी/कारखान्यात/कंपनीत काम करत असेल आणि तेथून अचानक गायब झाले आणि घरी पोहोचले नाही.  दोन्ही परिस्थितींमध्ये, न्यायालय पोलीस/सरकारी किंवा खाजगी पक्षाला बेपत्ता व्यक्तीला प्रत्यक्ष हजर करण्यास सांगू शकते.

 रिट कसे चालते, याचिका कशी दाखल करावी?

 हेबियस कॉर्पस म्हणजेच हॅबियस कॉर्पस रिटमध्ये पोलिसांनी किंवा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने अटक केलेल्या व्यक्तीला संशयावरून न्यायालयात हजर करावे आणि त्याला ताब्यात घेण्याचे वैध कारण द्यावे अशी मागणी केली जाते.  अनेकदा न्यायालय अशा प्रकरणांची तातडीने आणि गांभीर्याने सुनावणी करते.  खटल्यादरम्यान, कैदी/कैदी आणि सरकार दोघेही एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यासाठी काही कायदेशीर आधार आहे का याचा पुरावा सादर करू शकतात.

 कुमार सानू स्पष्ट करतात की कोणतीही सामान्य व्यक्ती थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून हेबियस कॉर्पसची विनंती करू शकते.  सरन्यायाधीश या पत्राची दखल घेऊ शकतात.  वकिलामार्फत हॅबिअस याचिका रिट दाखल करणे हा एक चांगला मार्ग आहे.  या याचिकांवर तातडीने सुनावणी सुरू होते आणि लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.

 अशा प्रकरणांमध्ये, न्यायालय त्या व्यक्तीचे शारीरिक उत्पादन पोलिस किंवा सरकारला आदेश देऊ शकते.  जर अटक बेकायदेशीर असेल किंवा सांगितलेली व्यक्ती बेकायदेशीरपणे तुरुंगात असेल, तर पोलिसांची चौकशी करून कारवाई होऊ शकते.  न्यायालय सरकारला पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊ शकते.  जय भीम चित्रपटाप्रमाणे.

मनमाडला २६ नोव्हें. रोजी " संविधान गौरव दिन " साजरा करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक

मनमाड ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - आज मनमाड मध्ये असोसिएशन कार्यालयात शनिवारी (दि.२१) रोजी " संविधान गौरव दिन "  साजरा  करण्यासंर्दभात बैठकीचे आयोजन करण्यात  आलं होतं. या बैठकीत "संविधान गौरव दिन " २६ नोव्हें. रोजी  साजरा करण्याचे ठरवण्यात आले.  यावेळी कार्यक्रम कसा यशस्वी होईल, याविषयी सर्वानी आपापली मते मांडली. संघटन अधिअधिक मजबुत होण्यासाठी चर्चा  करण्यात आली. 
           तसेच मा. मिनाजी ( ADRM सर) , भुसावळ मंडळ, भुसावळ. मनमाड ईथे भेटीसाठी आले असता अॉल इंडिया एससी / एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओ/ ला शाखेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. रेल्वे कामागाराच्या समस्येविषयी निवेदन दिलं. या निवेदनात रेल्वेचे रूग्णालय दिवसा चालु असते पण रात्री वेळेस बंद असल्या कारणाने , कर्मचारी नाईट शिफ्ट मध्ये कार्य करतात जर एखादा कर्मचारी अपघातग्रस्त  झाला  तर त्याला वेळीच उपचार मिळत नाही म्हणुन  रेल्वे रुग्णालय रात्रीच्या वेळेस सूरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली. यावेळी असोसिएशन चे अध्यक्ष - आयु. प्रदीपजी गायकवाड, सचिव - आयु. चेतन डी. आहिरे, उपाध्यक्ष - आयु. सम्राट ए. गरुड, उपाध्यक्ष- आयु. अजित ई. जगताप, सहसचिव- आयुष्मती . सौ. दीपाली बी. लौंढे, सहसचिव- आयु.  राहुल केदारे,  आदि पदाधिकारी  तसेच  सन्मानीय कमिटी मेंबर आयु. दीपक बागुल, आयु. मंगेश चव्हाण , आयु. आकाश शिंदे, आयु. विकी आहिरे, आयु. अंबादास मोरे, आयु. सागर बिडवे, आयु. भीमराव धीवर  आदीची उपस्थिती होती. 





Saturday, November 20, 2021

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी बैठकीत घेतला विविध कामाचा आढावा, जनतेची कामे वेळेत करण्याच्या सूचना









नांदगाव (प्रतिनिधी - परवेज शेख) :-   नांदगाव तालुक्याच्या विविध कामाच्या आढावा घेण्यासाठी शुक्रवारी(दि.१९)  केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी तहसिल कार्यालयात बैठक घेऊन जनतेच्या  कामे वेळेत करण्याच्या सुचना दिल्या. शासकीय अधिकार्यामध्ये समन्वय नसल्याने रेशन कार्ड देण्यास ३ वर्ष लागले. जनतेला ३ वर्षे लागत असेल तर त्यांना न्याय कोण देणार, संबंधित रेशन वाटप पूर्ण न केल्यास अधिकार्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली.

       आढावा बैठकीत  पुरवठा विभाग, कृषी, आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम  अनेक विभागाचा कामे वेळेत पूर्ण न  केल्याने नाराजी सूर दिसून आला. अधिकार्यामध्ये समन्वय असेल  तर जनतेची  पूर्ण होतील.  नांदगाव तालुक्यात इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थीं कमी असल्याने यांची मला माहिती मिळाली. यात लाभार्थींची संख्या वाढवण्याची सूचना केल्या.

आकडेवारी कमी आहे म्हणजे काम कमी आहे, असा आक्षेप त्यांनी नोंदविला. त्यांनी इतर राज्यात यंत्रणा जलद काम करते, असे सांगितले. योजनेच्या लाभापासून लोक वंचीत राहता कामा नये, ती वेळेत पूर्ण करा . मनरेगाची कामे वाढवा. त्या माध्यमातून जे अनुदान दिले जाते ते गरजूंसाठी मोठे असते, हे लक्षात घ्या,असे आवाहनही त्यांनी केले.

        नांदगाव - मालेगाव, मनमाड - येवला रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याच्या कामाचा आढावा घ्यावा लागतो,  खड्डे कधी बुजविणार तारीख,वार सांगा अर्धवट रस्त्याची कामे कधी पुर्ण करणार यावर अधिकाऱ्यांची विचारणा केली. बैठकीत तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चोधरी, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, पोलिस निरीक्षक अनिल कातकडे, नितीन पांडे, संजय सानप, सजन कवडे, तालुकाध्यक्ष बापू जाधव, मूनवर सुलतान आदी उपस्थित होते. 
        आरोग्य विभागात समन्वय नसल्याने मनमाडच्या लसीकरणसंदर्भात माहिती देता आली नाही. त्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवण्यात आले. आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, असे खुद्द ना. पवार यांनाच नमूद करावे लागले. शेवटी कामकाजात सुधारणा झाली नाही तर थेट कडक  कारवाई करण्याचा इशारा पवार यांनी दिला.

Friday, November 19, 2021

आमदार स्थानिक विकास निधीतून पिंपराळे गावाच्या विकासासाठी दहा लाख मंजूर

नांदगाव ( परवेज शेख ) :-   आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपराळे गावातील मंदिरासमोर सभागृहासाठी सुमारे 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या सभागृहाचे भूमिपूजन शिवसेना नांदगाव शहरप्रमुख सुनील भाऊ जाधव तसेच आदिवासी समाज व संघटक भाऊराव भाऊ बागुल यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह पिंपळे गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...