नांदगाव (प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यातील जि.प.शाळा इंदिरानगर तळवाडे येथे परमचैतन्य फाउंडेशन नांदगाव यांचेकडून सर्व विद्यार्थ्यांना शालेय शुज वाटप करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शालेय ध्वजारोहन फाउंडेशन चे सदस्य सागर फाटे यांनी केले. याप्रसंगी गावातीलच प्रतिष्ठित नागरीक सुभाष घुगे यांनी सर्व मुलांना कोरोना महामारीपासुन बचावासाठी मास्कचे वाटप केले.कार्यक्रमास परम चैतन्य फाउंडेशनचे महेश गायकवाड, राकेश राखेचा ,सरपंच नामदेव सोनवणे,शालेय व्य.समिती अध्यक्ष योगिता साताळे,बाळनाथ चकोर,गोविंद निकम,भाऊसाहेब साताळे,हरि घुगे,ञंबक आव्हाड,संदीप कांदे ,विजय घुगे मुख्याध्यापिका कल्पना बच्छाव,संभाजी घुगे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचलन महेश थोरे सर यांनी केले. तसेच सागर फाटेसर यांनी विद्यार्थ्यांची पाणी पिण्याची समस्या समजून घेऊन शालेय आवारात टाकी बांधून देण्याचे आश्वासन आपल्या अध्यक्षीय भाषणात दिले. शाळेतर्फे महेश थोरे सरांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले, तर आभार संभाजी घुगे यांनी मानले.
No comments:
Post a Comment