नांदगाव(प्रतिनिधी): - रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील डायनॅमिक युथ स्पोर्ट अकॅडमी तर्फे देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय " अभिमान महाराष्ट्राचा जीवन गौरव" पुरस्कार नांदगाव येथील समाजसेविका व शिवभक्त सौ संगीता सोनवणे यांना जाहीर झाला असुन येत्या २७ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पनवेल येथे होणार आहे त्याठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
नांदगांव येथील संगीता सोनवणे या समाजसेवक म्हणून कार्य करत आहेत.शिवकार्याची विशेष आवड असलेल्या संगीता सोनवणे या गेल्या अनेक वर्षांपासून रोजच्या नित्यक्रम सुरू करण्यापूर्वी शिवस्फूर्ती मैदानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला स्वच्छता करून मनोभावे पूजा करतात.तसेच समाजसेवक म्हणून देखील त्या अनेक कामात अग्रेसर असतात.कोव्हिडं काळात विशेष कार्य केले व आजही करत आहे.या कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे.नुकतेच विश्व हिंदू परिषदच्या वतीने त्यांना आदर्श समाजसेवक म्हणून गौरविण्यात आले आहे.त्यांच्या या कामाची दखल स्वता खासदार संभाजीराजे व खासदार डॉ अमोल कोल्हे यांनीदेखील घेतली असुन मराठा समाजाच्या कार्यात देखील त्या अग्रेसर आहेत.या कामांची रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील डायनॅमिक युथ स्पोर्ट अकॅडमीने दखल घेत नुकतेच त्यांचे नाव या पुरस्कार सोहळ्यासाठी जाहीर केले आहे.येत्या २७ जानेवारीला मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.त्यांच्या या कामामुळे नांदगांव तालुक्याचे नाव लौकिक झाले असुन विविध स्तरावर त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment