नांदगाव (प्रतिनिधी) - आगामी होणाऱ्या नवरात्र उत्सवात दुर्गा मंडळांनी शासनाने नियम पाळून साजरे करावे असे आव्हान दुर्गा मित्र मंडळ पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्या शांतता बैठकित नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी केले. नवरात्र उत्सव, दसरा पार्श्वभूमीवर नांदगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी (ता.२३) रोजी शांतता समिती सदस्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी नवदुर्गा उत्सव समितीच्या मंडळांना सुचना केल्या आहेत. या पूर्वी परवानगी घेतलेल्या मंडळांना मुर्तीं बसवण्यासाठी व मिरवणुकीला परवानगी दिली जाईल नव्या मंडळांना मुर्ती बसविण्यास परवणगी दिली जाणार नाही. ऑनलाईन अर्ज केलेल्या मंडळांना परवानगी दिली जाईल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डी जे, डॉल्बी ला बंदी आहे. त्यामुळे असे वाद्य लावु नये व कायद्यानचे उल्लंघन करु नये, असे झाल्यास संबधीतावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच शासनाने जारी केलेल्या नियमानुर हा नवरात्र उत्सव साजरा करावा , उत्सवात ध्वनिक्षेपक चा आवाज ५५ डेसिंबल च्या आत असावा रात्री १० वाजेपर्यंत वाद्य वाजण्यास परवानगी आहे. धार्मिक सण हे धार्मिक परंपरेने साजरे करावे आपल्या पासून चुकीची पध्दत पडता कामे नये ही काळजी मंडळींनी घेतली जावी. कोणतेही धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्ये वक्तव्य करु नये . दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या वेग वेगळ्या रांगेची व्यवस्था करावी , दांडिया नृत्य दरम्यान महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं सुचनाही केल्या. कोणीही गैरवर्तन करत असेल तर समजावुन सांगा, ऐकत नसेल तर तत्काळ पोलीसांना माहिती देऊन पोलीस तात्काळ तेथे पाचारण होतील. अशा ठिकाणी वर्दीतील व सिव्हिल मध्ये पोलीस बंदोबस्तात राहणार आहे. नवरात्र उत्सव काळात व विसर्जन मिरवणुकी वेळी वीजपुरवठा सुरळीत राहण्यायासाठी वीज मंडळास आम्ही पत्र देणार आहोत. मिरवणूक मार्गात रस्त्यावरील खड्डे बजविण्यासाठी नगरपालिका मुख्यधिकारी यांना कळविले आहे.यावेळी पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी उत्सवकार्यक्रमात ,मिरवणुकीत पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान केले व उपस्थितांचे आभार मानले . या बैठकीस तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील दुर्गा मंडळांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी,पत्रकार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते, बैठकीसाठी गोपनीय शाखेचे दत्ता सोनवणे यांनी नियोजन केले. नांदगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये आयोजित शांतता समिती बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील,समवेत उपनिरीक्षक मनोज पाटील,गोपनीय शाखेचे दत्ता सोनवणे ,पत्रकार, नवदुर्गा मंडळांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,
नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment