नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव रेल्वे स्टेशन वर रेल्वे थांब्यासाठी आम्ही नांदगावकर यांनी रेल्वे
प्रशासनास निवेदन दिले होते. रेल्वे कडून अजूनही या संदर्भात चर्चा न झाल्याने आम्ही नांदगावकर यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे.रेल्वेने यावर उत्तर देणे अनिवार्य आहे. निवेदनात करण्यात आलेल्या ६ गाड्याचे थांबे अजूनही प्रलंबित आहेत. जो पर्यंत थांबे पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही नांदगावकर शांततामय मार्गाने रेल्वे प्रशासनाला जाग येई पर्यंत शांत बसणार नाही , अशी भुमिका घेतली आहे. रेल्वे च्या स्टेशन मास्तर व्दारे रेल्वे प्रबधक मध्य रेल्वे यांना निवेदन देत आहेत तरी आम्हाला लवकर न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनात पुढीलप्रमाणे गाड्या थांब्यासाठी - १) झेलम एक्स्प्रेस - ११०७७/७८, २ ) कामायनी एक्स्प्रेस- ११०७१/७२ ३) ११०२५/२६- हुतात्मा एक्स्प्रेस, ४)जनता एक्स्प्रेस- १३२०१/०२, ५) कुर्शीनगर एक्स्प्रेस, ६) शालीमार एक्स्प्रेस- १८०२९/३०.
आम्ही नांदगावकर यांनी येत्या ८ दिवसांत वरील गाड्याचे थांबे मिळावे , अन्यथा उपोषणे, आंदोलने या गोष्टीला भाग पाडायला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील , यांची नोंद घ्यावी इशारा देण्यात आला.
No comments:
Post a Comment