नांदगाव (प्रतिनिधी) - काल बुधवारी दि . १९ आक्टोबर रोजी ‘नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल नांदगाव आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव या ठिकाणी शालेय परिसरात "दिपावली महोत्सव" अतिशय उल्हास दायक वातावरणात पार पडला.
गेल्या तीन दिवसापासून शालेय परिसरात दिवाळी सजावटीची लगबग सुरू होती.
नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्ष सरिता बागुल ,लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर ,आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका .स्मिता सुर्यवंशी यांच्या हस्ते वसुबारस पूजन , धन्वंतरी पूजन ,लक्ष्मी पूजन,बलिपूजन करण्यात आले.
यानंतर मुलांना दिवाळी का साजरी केली जाते?दिवाळीतील पाचही दिवसांचे महत्व पटवून देण्यात आले.याबद्दल सविस्तर माहिती ज्योती सुरसे आणि जयश्री चौधरी यांनी सांगितली .यानंतर मुलांना दिवाळी सणाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच वर्गसजावट बघण्यासाठी मुलांना संगणक कक्षात घेऊन जाण्यात आले.त्याठीकाणी जणू बोलका चित्रपटच मुलांना दाखविण्यात आला.मुलांचे संस्थापक तसेच वर्गशिक्षकांसोबत फोटो काढण्यात आले.सर्व मुलांना बागुल आणि बागुल यांनी मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मुलांनी सुंदर असे आकाश कंदिल बनविले होते. त्या आकाश कंदिलांनी शालेय परिसर सुशोभित करण्यात आला होतो.त्याचप्रमाणे दिव्यांची रोशनाई करण्यात आली होती.तसेच रांगोळी काढण्यात आली होती.सर्व शालेय परिसर अतिशय आकर्षक रित्या सजविण्यात आला होता.यानंतर मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले.
सर्वानी या दिवाळी सणाचा मनमुराद आनंद लुटला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सुरसे आणि पिलके व जयश्री चौधरी यांनी केले. सरतेशेवटी सर्वाचे आभार मानण्यात आले.
हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यात लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले नूतन खैरनार प्रतिभा अहिरे पूनम सोमासे धनश्री न्याहारकर सुरेखा गायकवाड नेहा पाटील वर्षा नगे संदीप पांडे राहुल उपाध्याय मोहन सुरसे अनिता जगधने क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका सुषमा बावणे एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड,जयश्री चौधरी चैताली अहिरे रोहिणी पांडे अश्विनी केदारे ,तसेच मदतनीस अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पाटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम सुंदर रित्या पार पाडला.
No comments:
Post a Comment