Sunday, October 9, 2022

नांदगाव शहरात ईद मिलादुन्नबी निमित्ताने भव्य जुलूस, विविध उपक्रमांनी मोहम्मद पैगंबर जयंतीत शांततेचा संदेश,



नांदगाव (प्रतिनिधी) - संपूर्ण  जगाला 
शांती, सदभावना व बंधुभावचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मुहम्मद  (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांचा जन्मदिवस अर्थात ईद- ए-मिलादुन्नबी नांदगाव शहरात आज (रविवार) पारंपरिक पद्धतीने  अभूतपूर्व जल्लोषात साजरा करण्यात आला.या निमित्त शरबत,हलवा,पेढे, आईस्क्रीम,मिठाई वाटपा सोबत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून भव्य जुलुस काढण्यात आला होता. त्यात  मुस्लिम बांधवा सोबत इतर धर्मीय नागरिक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे पैगंबर जयंतीत राष्ट्रीय एकात्मता दिसून आली.
         ईद-ए-मिलाद निमित्त तरुणांनी मस्जिदचे मौलाना  यांच्यासह शहरातील इतर सर्व प्रमुख मौलानांच्या नेतृत्वाखाली सकाळी भव्य जुलूस काढण्यात आला.नारा-ए-तकबीर अल्लाह हु अकबर,हुजूर का दामन नही छोडेंगे यासह इतर घोषणा देत जुलूस एच आर हायस्कूल कलंत्री गल्ली, शनी मंदिर रोड, पोलीस स्टेशन मार्ग ,रेल्वे गेट, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी पुतळा या मार्गे  मशिदीजवळ एच आर हायस्कूल जवळ संपन्न झाले. यावेळी जगात व देशात शांतता नांदावी,भारतात सर्व जाती धर्मांच्या लोकामध्ये सलोख्याचे कायम संबध रहावे.सर्व क्षेत्रात देशाची भरभराट व्हावी यासाठी विशेष दुवा करण्यात आली.  तालुक्यातील आमदार सुहास आण्णा कांदे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा  यावेळी दिल्या होत्या.  ईद-ए-मिलाद निमित्त यासह इतर ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुप तर्फे पाणी,शरबत, आईस्क्रीम, मिठाई,चॉकलेट  वाटप करण्यात आले तर नांदगाव ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेला जुलूस यात सहभागी मुस्लिम धर्मीय बांधव  लहान बालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....