नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद प्रशासन तर्फे प्लास्टिक पिशव्या न वापरण्यास सांगितले जात असताना, नांदगाव नगरपरिषदेच्या पथकाने आज दि. २ नोव्हेंबर रोजी शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांस ५०००₹ रूपयांचा दंड केला आहे. तसेच ३ किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. यापुढे शहरात प्लास्टिक बंदीची कारवाई सुरु राहणार आहेत असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नांदगाव नगरपरिषद प्रशासन ने आवाहन केले की नागरिकांनी प्लास्टिक विक्री व वापर टाळावा अशा सुचना केल्या आहेत. प्लास्टिक बंदीच्या कारवाई साठी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक राहुल कुटे, विजय कायस्थ, रामकृष्ण चोपडे, निलेश देवकर, सुनिल पवार, अंबादास सानप, श्रीमती विजया धनकट यांच्या पथकाने केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment