Saturday, December 24, 2022

नांदगाव मध्ये इकबाल दादा फाऊंडेशन तर्फे एकदिवसीय हृदयरोग तपासणी शिबीर संपन्न, अनेक रुग्णांनी शिबीराचे घेतला लाभ,



नांदगाव ( प्रतिनिधी)
-  दिवंगत इकबाल दादा शेख यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त  इकबाल दादा फाऊंडेशन, लोकमान्य हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबीराचे आयोजन आज शनिवारी दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ते दुपारी ३ वाजेपर्यंत नांदगाव शहरातील न्यु महाराष्ट्र टॉकीज कंपाऊंड ईथील माजी नगरसेवक दिवंगत इकबाल दादा शेख कोंचीग क्लास सेंटर इथं संपन्न झाले. या मोफत शिबीरात रुग्णांसाठी इ.सी.जी, शुगर व ब्लड प्रेशर तपासणी, २ डि. इको, अॅन्जिओप्लास्टी , अॅन्जिओग्राफी, बासपास तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. या सोबतच हृदयरोग संबंधित ( कार्डियाक) - छातीत दुखणं, हार्ट अटॅक आलेल्या रुग्ण, हायपर टेन्शन मधुमेह, दम लागणे, अॅन्जिओप्लास्टी अॅन्जिओग्राफी, पायांवर सूज येणे, धडधड होणे, बायपास सर्जरी रुग्ण, हृदयातील छिद्र व झडपांचे आजार इत्यादी तपासणीची सुविधा रुग्णांसाठी होती. रुग्णांच्या तपासणीसाठी नाशिक च्या लोकमान्य हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटल मधील कार्डियोलॉजिस्ट डॉ. निलेश तायडे, कार्डियोलॉजिस्ट डॉ. रोहीत ठाकरे, कार्डीअॅक सर्जन डॉ. निलेश पूरकर, कार्डीअॅक सर्जन डॉ. नितीन ठाकरे, स्त्री- रोग तज्ञ व फॅमिली फिजीशियन डॉ. सौ. किर्ती शिवम आहेर यांनी केले. नांदगाव शहरातील रुग्णांची आधी केस पेपर सह नांव नोंदणी करण्यात आली. यात एकुण ११८ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यात १५ रुग्णांना  पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलविण्यात आले. या रुग्णांना मोफत १२५०० रुपयाांच्या   हृदयरोग तपासण्या करण्यात येणार आहे. हे सर्व आयोजन इकबाल दादा फाऊंडेशन, दाऊद अ. गणी शेख व मित्र परिवारा तर्फे करण्यात आले होते. रुग्णांसाठी नांदगाव मध्ये अशा प्रकारचे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...