हिसवळ बु. नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु. येथे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत माध्यमिक विद्यालय असून या विद्यालयामध्ये हिसवळ बु., शास्त्रीनगर, धोटाने खु., काळेवस्ती, तसेच परिसरातील अनेक गावांमधून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. परंतु सकाळी १०:३० वाजता शाळा भरण्याच्या वेळेत व सायंकाळी ०४:३० वाजता शाळा सुटण्याच्या वेळेत बस नसल्याकारणाने बऱ्याच विद्यार्थ्यांना घरीच राहावं लागतं किंवा प्रयत्न करून शाळेत आल्यानंतर घरी जाण्यास लवकर गाडी मिळत नसल्यामुळे रात्री उशिरा घरी जावं लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. प्रवास साठी विद्यार्थ्यांना एस. टी. चा रितसर पासही काढला आहे. शाळेत जाण्यासाठी ७० मुली व ४० मुलं असे एकूण ११० विद्यार्थी आहेत. या सर्व मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा महत्त्वाचा प्रश्न असून ते शिक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो. यापूर्वी पालकांनी, स्थानिक ग्रामपंचायतींनी, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी आगार प्रमुख यांना वेळोवेळी विनंती केली असून, परंतु त्यांनी त्यांची कुठलीही दखल आपल्या स्तरावरून घेतली गेलेली नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी त्वरित बस सेवा सुरू करण्यात यावी. मागणी मान्य न झाल्यास नांदगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलने छेडण्यात येतील व त्यांच्या होणाऱ्या परिणामास बस आगार जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असा ईशारा नांदगाव आगार प्रमुख यांना देण्यात आला आहे. निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय पाटील, युवक अध्यक्ष सोपान पवार, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, सोशल मीडिया अध्यक्ष वाल्मिक टिळेकर, महात्मा फुले समता परिषद अध्यक्ष अशोक पाटील,दत्तू पवार, दारासिंग भिडे, बाळासाहेब देहाडराय,अरूण अप्पर,डगळे सर, देशमुख सर,सनी पवार इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment