Saturday, January 28, 2023

मनमाडच्या मुश्ताक शेखने पटकावला नाशिक श्री मास्टर किताब....!



मनमाड(विशेष प्रतिनिधी) - नाशिक जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने हबीब क्लब यांच्या तर्फे भरविण्यात आलेल्या नाशिक श्री मास्टर या जिल्हा स्तरीय स्पर्धेत मनमाडच्या मुश्ताक शेखने अजिंक्यपद पटकावले असुन तब्बल एक तपांनंतर नाशिक श्री हा किताब मनमाडला मुश्ताकच्या रुपांने मिळाला आहे.या कामगिरी बद्दल मुश्ताकचे मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.
          नाशिक जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन व हबीब क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मास्टर श्री हा जिल्हास्तरीय किताब मुस्ताक शेख या मनमाडच्या 44 वर्षीय युवकांनी पटकावला असून भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या मुस्ताकने याआधी देखील मोठ्या मेहनतीने अनेक किताब मिळविले आहेत दिवसभर सरकारी कार्यालयात कर्मचारी म्हणून काम केल्यानंतर रात्रीच्या वेळी आपल्या शरीराला वेळ देऊन व्यायाम करत मोठ्या मेहनतीने मुस्ताकने आपले शरीर बनविलेले आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात तसेच इतर राज्यात देखील मुस्ताकने अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये यश मिळविलेले आहे. नाशिक येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मास्टर श्री या किताबासाठी जवळपास 18 स्पर्धक सहभागी झाले होते . या सर्वांना मागे सोडत मुस्ताकने यश संपादन केले व तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर नाशिक जिल्हा श्री हा किताब पुन्हा एकदा मनमाड चे नावे केला आहे. या कामगिरीबद्दल मनमाड शहरातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक यासह इतर सर्व थरातून मुस्ताकचे अभिनंदन करण्यात येत आहे. याही पुढे मेहनत सुरूच ठेवून राज्यस्तरावर खेळण्यासाठी तसेच इतर तरुणांना बॉडी बिल्डिंग कडे आकर्षित करून त्यांना देखील स्पर्धेसाठी तयार करणारा त्याचे मत मुस्ताक शेख यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...