नांदगाव (प्रतिनिधी) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आली होती . यात इयत्ता 12 वी परीक्षेच्या पर्यवेक्षक अंतर्गत बदल केल्यानंतरही नांदगाव महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम राखण्यात यश आले आहे. कला शाखेचा निकाल 82.60%, वाणिज्य शाखेचा निकाल 98.93% व विज्ञान शाखेचा निकाल 99.57% लागला असून , कला शाखेत प्रथम कु. शिंदे मनीषा भास्कर 79.50% , द्वितीय कु. गीते जयश्री अनिल 73.83% तृतीय कु. शिंदे मेघा पुंडलिक 73.33% वाणिज्य शाखेत प्रथम कु. कलंत्री पार्थ महेंद्र 85.17%, द्वितीय-जोशी अथर्व दिनेश 82.50%, तृतीय कु. साळुंखे रोहिणी श्रावण 78.67% तर विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थ्यांनी कुमावत दर्शनी विनायक 82.17%, द्वितीय सोनवणे श्रुती रावसाहेब 80.67% तर तृतीय शेख सिमरन शफिक 77.67 % मिळून उत्तीर्ण झाले आहेत. या महाविद्यालयात एकूण एच. एस.सी. परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2025 साठी 533 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 495 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे . महाविद्यालयाचा एकूण निकाल 92.87% लागला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज नांदगाव तालुका संचालक श्री अमितभाऊ बोरसे (पाटील) व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन. भवरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment