नांदगाव ( प्रतिनिधी) - कृषी विभागाचे प्रक्षेत्रावर शासकीय फळ रोपवाटिका प्रस्तावित करण्यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कडून पाठपुरावा करण्यात आला होता.फळ रोपवाटिका क्षेत्र मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना आंबा कलमे , डाळिंब कलमे इत्यादी फळझाडांचे कलमे रोपे उपलब्ध होणार असून यासाठी आता तालुका किंवा जिल्हा बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. शिवाय फळझाडांची लागवड क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
भविष्यात शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण, शेती प्रशिक्षण गृह प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय पद्धतीने उत्पादन वाढ करण्यासाठी मदत होईल . नांदगाव तालुका बीज गुणन केंद्र या प्रक्षेत्रावर अंशतः रूपांतर करून शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करणे मान्यता मिळणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागा कडून शासन निर्णय काढण्यात आला आहे.
नांदगाव तालुका बीज गुनन केंद्र या प्रक्षेत्रावर अंशतः रूपांतर करून शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालक नाशिक यांच्याकडून प्राप्त झाला आहे . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड विषयाचा आढावा घेताना कलमी रोपे उपलब्ध न झाल्यामुळे प्रशासकीय मान्यता दिलेल्या क्षेत्रांपैकी कमी क्षेत्राची लागवड झाल्याचे दिसून आले आहे . त्याकरिता भविष्यात कलमे रोपांची उपलब्धता होण्यासाठी तालुका बीजगुणन केंद्र नांदगाव येथील प्रक्षेत्राचे रोपवाटिकेत रूपांतर करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment