नांदगाव ( प्रतिनिधी) - शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे हे उद्या मंगळवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनला शेतकरी संपर्क दौऱ्या निमित्त नांदगांव च्या जैन धर्मशाळा येथे येत आहे. त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही शिव सेनेच्या अनेक मान्यवरासोबत उपस्थितीत राहणार आहेत. शेतकरी संवाद दौऱ्याची अशी माहिती तालुक्यातील पदाधिकार्यांनी दिली आहे. शेतकरी प्रश्नावरून सरकार चे लक्ष वेधणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा यानिमित्ताने नांदगाव दौरा महत्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्रा तील बंडखोरी केलेल्या आमदारांचा मतदार संघ ते पिंजून काढत आहे. शेतकरी मेळाव्यातून बंडखोर आमदारांवर काय भाष्य करता अख्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतील .
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment