पिंपरखेड, नांदगाव ( प्रतिनिधी) - आज शुक्रवारी दि. ३ मार्च रोजी विद्यालयात 'जागतिक वन्यजीव दिनाचे' औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे 'पक्षी वाचवा' अभियानाला सुरुवात झाली. या प्रसंगी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी प्लॅस्टिकच्या डब्यापासून तयार केलेले कृतिम पाणवठे विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी सर यांचे हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात लावलेल्या झाडांच्या फांद्यांवर टांगण्यात आले. त्यात पाणी व बाजूला असलेल्या कप्प्यात पक्षांसाठी धान्य टाकण्यात आले. धान्य तेही विद्यार्थ्यांनी घरून आणले होते. सध्या नैसर्गिक पाणवठे आटले असून पाण्या अभावी पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे असे उपक्रम महत्वाचे आहेत.
या उपक्रमात मुख्याध्यापक काशिनाथ गवळी सर यांच्या संकल्पनेतून २०१४ पासून ते आजतागायत म्हणजे सलग ९ वर्षांपासून चालू आहे. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी देखील अनुकरण करत आपापल्या घरी, वाडी वस्तीवर असे कृतिम पाणवठे तयार केले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांबद्दल, प्रेम, आपुलकी व जिव्हाळा निर्माण होऊन भूतदया हा सद्गुण वाढीस लागेल व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाबद्दल त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण होईल, विद्यार्थी संस्कारक्षम होतील अशी आशा मुख्याध्यापक काशिनाथ गवळी यांनी यावेळी व्यक्त केली. असा उपक्रम सर्वत्र राबवला गेल्यास येत्या काळात घटत जाणाऱ्या पशुपक्षांबाबत आशादायक वातावरण निर्माण होईल असेही ते म्हणाले. संस्थेच्या संचालक मंडळाने या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गोकुळ बोरसे, संजय कांदळकर, अलका शिंदे, कैलास पठाडे, उत्तम सोनवणे, लक्ष्मण जाधव संदीप मवाळ आबा सोनवणे ई. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment