नांदगाव( प्रतिनिधी) - मालेगाव तालुक्यातील डाबली या गावी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने रविंद्र शंकर चौधरी याने वाळु माफिया रितेश भाऊसाहेब निकम यास तलावातील मुरूम अनाधिकृतपणे नेण्या संदर्भी विचारणा केली असता, सदर माफिया रितेश निकम व त्याच्या साथीदारांना त्याचा राग येऊन त्यांनी चौधरी वर खुनी हल्ला चढविला,दंडक्यांनी मारहाण केली. आणि त्यात रविंद्र चौधरी चा मृत्यु झाला व त्याचा अवघा परिवार पोरका झाला. कुटुंबाची आधारवड हरपली आणि या घटनेच्या तिव्र निषेध म्हणून आज नांदगाव तालुक्याच्या व नाशिक जिल्हा तैलिक समाजाच्या वतीने नायब तहसिलदार प्रमोद मोरे यांना निवेदन सादर करण्यात आलं. गुन्हेगारास कठोरात कठोर शासन होऊन न्याय मिळावा ही विनंती करीत निवेदन सादर करतांना नाशिक विभाग अध्यक्ष ऍड.शशिकांत व्यवहारे,जिल्हा उत्तर ग्रामीण अध्यक्ष समाधान चौधरी,वकील आघाडी अध्यक्ष ऍड.बी.आर.चौधरी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय बत्तासे,उपाध्यक्ष विनोद महाले,जिल्हा संघटक मनोहर चौधरी,सहसचिव गोरख नेरकर,शहराध्यक्ष दिलीप सौंदाणे,उपाध्यक्ष दिलीप देहडराय,सचिव संजय वाघ, तालुका युवा आघाडी अध्यक्ष संतोष गायकवाड,उपाध्यक्ष राम देहाडराय,शहर युवा आघाडी अध्यक्ष कुणाल सौंदाणे,उपाध्यक्ष सोमनाथ उडकूडे सह बळवंत चौधरी,बाळासाहेब वाघ,बाळासाहेब देहाडराय,मनोज वाघ,रमेश खंडू,राजेंद्र चौधरी,सुभाष चौधरी,वाल्मिक टिळेकर नगरसेवक नांदगाव नगरपरिषद,विनोद चौधरी,ऋषिकेश चौधरी,महेश देहाडराय, मनीषा चौधरी, अल्काबई चौधरी इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment