८९.००%
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगावच्या एच.आर. हायस्कूल उर्दू माध्यमाच्या एसएसी ९७.६१% निकाल अॉनलाईन पध्दतीने संकेतस्थळावर जाहीर झाला. या हायस्कूल मधील विद्यार्थी आफिया जावेद खाटीक ८९.००% मिळवून शाळेत प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाली. नांदगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी संचलित एच.आर. हायस्कूल नांदगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी ही कायम ठेवली आहे. शाळेचा एकत्रित निकाल ९७.६१ % लागला. यावर्षी परिक्षेत एकुण ४२ विद्यार्थी बसले होते. त्यात २० विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये, तर १५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत आणि ६ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेतील आफिया जावेद खाटीक हीने ८९.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक जुबीया रफीक अन्सारी ८७.२०% , तृतीय क्रमांक जुफीन शेख साबीर ८६.८०% मिळवला आहे. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख सईद सर, आरीफ खान सर, इस्राईल सर, इर्शाद सर, जेबा मॅडम, समरिन मॅडम , सज्जाद खान सर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या तर भविष्यात चांगल्या निकालाची इच्छा व्यक्त केली.
No comments:
Post a Comment