नांदगाव( प्रतिनिधी) - नांदेड पासुन ३ की मी अंतर असलेल्या बोंढारहवेली, जि. नादेंड या गावात बौध्द तरुण अक्षय भालेराव यांचा खुन करण्यात आला. अधिक वृत्त, असे की नांदगाव शहरातील सर्व पक्षीय व बौध्द समाज बांधवांनी तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना भारतीय स्वतंत्रचा अमृत महोत्सव भारतभर साजरा केला जात असतांना आज ही मानसिक विकृतीने लोक ग्रासलेले असुन त्यांना जातीयतेची लागण झाल्याचे वारंवार दिसून येत त्याचीच प्रचीती नांदेड जिल्ह्यातील बोंढारहवेली या गावात रहात असलेल्या बौध्द तरुण अक्षय भालेराव यांचा (हत्याकांड घडले)खुन करण्यात आला.!
या गावात पहिल्यांदाच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. याचा राग मनात धरून या गावातील बौध्द तरुण अक्षय भालेराव याला काही जातीयवादी गाव गुंडयांनी त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे. अशा विकृत व्यक्तींना कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच हे फरार आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहे त्या संघटनेवर कारवाई करण्यात यावी तसेच पिडीत व्यक्ती व बौद्ध वस्तीला संरक्षण मिळावे शिवाय ॲट्रॉसिटी अॅक्ट 302 अंतर्गत झालेल्या कारवाई 120 ब चा समावेश करावा व अशा गावगुंड्यांना फाशीची शिक्षा करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.तसेच जातेगाव नांदगाव येथील जमिनीच्या वादातून प्राथमिक शिक्षक शरद पवार व त्यांनी आणलेल्या गावगुंडांची तुकाराम लाठे व त्यांच्या परिवारास भ्याड हल्ला करून तुकाराम यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.! त्यांच्यावर व त्यांनी आणलेल्या गावगुंड्यावर कारवाई व्हावी व लाठे कुटुंबीयांना संरक्षण मिळावे त्यात दिरंगाई झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंबेडकर अनुयायी यांनी दिला निवेदनात त्या निषेधार्थ आज नांदगाव शहरातील आंबेडकर अनुयायींनी नायब तहसिलदार मोरे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे (पाटिल) यांना निवेदन देण्यात आले अक्षय भालेराव याला गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत भाग घेतल्यानं गावातील काही जातीयवाद लोकांनी त्याचा खुन केल्याचा आरोप करण्यात येतोय.! त्या संदर्भात आज नाशिक जिल्ह्यातील तालुका नांदगाव या शहरात अक्षय भालेराव यांना न्याय देण्यासाठी आंबेडकर अनुयायी एकवटले होते त्यांनी जन आक्रोश मोर्चा काढुन सरकारला धारेवर धरले होते सरकाराचा निषेध व्यक्त केला यावेळी उपस्थित असलेल्या समाजबाधवांनी आक्रोश करत भाषणे ही केली होती यावेळी अरुण साळवे, वाल्मीक जगताप, भास्कर निकम,विलास कोतकर, माजी नगरसेवक नितिन जाधव, देविदास मोरे. अनिल जाधव ,विश्वास आहिरे, महाविर जाधव, अनिल कोतकर, संदीप पवार, सचिन साळवे, नाना जगताप,अविनाश केदारे फिरोज शेख, कपिल तेलुरे, राज पवार, निर्मला केदारे,अलका रूपवते,संगिता वाघ, विद्या कसबे,जयश्री डोळे तसेच ग्रामीण भागातील वयोवृद्ध महिला पुरुष आणि तरुण आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने या जन आक्रोश मोर्चेत सहभागी झाले होते. बौध्द पध्दतीने अक्षय भालेराव याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून वंदना घेण्यात आली.
No comments:
Post a Comment