नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव नगरपालिका प्रशासनाला २१ तारखेला इंद्रायणी नगर परिसरातील समस्यांचे तिसर्यांदा उपोषणाचे निवेदन दिले होते. परंतु परिसरातील समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित पडलेली वरील नागरिकांच्या समस्यांचे तीन वेळा निवेदन उपोषण करुन सुध्दा नांदगाव नगरपालिका प्रशासनाने या नागरिकांनाच्या समस्यांना केराची टोपली दाखवल्याने अखेर एकत्रीत येऊन रिपाइंचे शहराध्यक्ष महाविर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा चौथ्यांदा ठाम भूमिका घेऊन इंद्रायणी नगर,जयभोले नगर, करीमचाळ नागरिकांनी नाराजी व्यक्त करुन रस्ता मागणीसाठी चर्चा करत उपोषणास रात्री उशिरापर्यंत निर्णयावर ठाम राहिल्याने आजचा दुसरा दिवस होउन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने महिलांनी जेष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षांनी या उपोषणास बसलेले महाविर जाधवसह स्थानिक रहिवाशांना जाहीर पाठिंबा दर्शविला असून नांदगाव नगरपालिका प्रशासनाचे अयशस्वी कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.! या वेळी शहरातील ठाकरे गटाचे संतोष गुप्ता,काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे, वंचितचे तालुका सचिव, विलास केतकर, राष्ट्रवादीचे युवा शहराध्यक्ष, गौतम जगताप, समाजिक कार्यकर्ते अॅड विद्या कसबे,नेहा कोळगे भाजपाचे व्यापारी जिल्हाअध्यक्ष दत्तराज छाजेड,उमेश उगले, राहुल आहेर,प्रहार जनशक्तीचे डॉ पगार,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ घोंगाने,विवेक गोदावरी दवाखान्याचे संस्थापक डॉ सुनिल तुसे यादींनी मत व्यक्त करत जाहिर पाठिंबा दर्शवला आहे.
आज दुपारी नगरपालिका कर्मचारी राहुल कुटे,बंडू कायस्थ यांनी उपोषणकर्ते महावीर जाधव यांना उपोषणास बसलेले तीन मागणी पैकी शहरातील मध्यवर्ती नागरीभागातून रेल्वे पुलाचे तिसर्या लाईनचे काम सुरु असल्याने इंद्रायणी नगर,जयभोले,नगर,करीम चाळ, रहदारीस अडथळा निर्माण होत असून तसेच आगामी पावसाळ्यात, शांकबरी लेंडीनदीला पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे शहरातील चांडक प्लॉट, एस,टी कॉलनी, जय भोले नगर,या भागात जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. आपली उपोषण स्थळी झालेले चर्चेनुसार परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या पाठीमागील बाजुस लेंडीनदीवर बांधलेल्या पुलाचा वापर करुन सदर भागातील नागरिकांच्या सोयीसाठी गेट उघडा ठेवण्यासाठी आवश्यक पत्र प्रज्ञानंद व्यवहार केलेला आहे.तसेच नांदगाव रेल्वे लाईनच्या बाजूला लक्ष्मी टॉकीजवळ नदीपात्रात तात्पुरता पुल करुन तयार करण्यात आला आहे. तसेच इतर कायमस्वरूपीच्या योजनेसाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे तरी सदरील बाबींचा विचार करून उपोषण मागे घेण्यात यावे असे लेखी पत्र नगरपालिका प्रशासनाने उपोषण करते महावीर जाधव यांना दिल्या नंतर आहे काल दुपारी मागे घेण्यात आले.
No comments:
Post a Comment