नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील हुतात्मा स्मारकावर कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भारत-पाकिस्तान यांच्यात १९९९मध्ये झालेल्या युध्दाचा शेवट २६ जुलै १९९९ ला भारताच्या जवानांनी प्राणांची बाजी लावुन भारताला विजय मिळवून दिला व आपल्या देशाचे संरक्षण केले. या युध्दात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करण्यासाठी हुतात्मा चौकात तहसीलदार डॉ.सिध्दार्थ मोरे, नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी व सेवानिवृत्त ,मेजर, व सैनिक यांनी सर्व प्रथम संविधान प्रतिकृतीला पुष्पहार घालून वंदन केले. व त्यानंतर हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी मेजर नानासाहेब काकळीज यांनी कारगिल युध्दाच्या आठवणी जागवल्या व युध्दप्रसंगातील अनुभव कथन केले. तसेच यावेळी मेजर जगन्नाथ साळुंखे यांनी देखील कारगिल युध्दाची माहिती देऊन येथील हुतात्मा स्मारक निर्मिती कशी झाली याबाबत माहिती सांगितली व शहीद जवानांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे संयोजन शिवसंस्कार संस्था,व माजी सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसंस्कार संस्थेचे अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी केले. याप्रसंगी सुभेदार बाजीराव मोहिते, हवालदार शंकर थेटे, सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष नानासाहेब काकळीज, संजय खैरनार, दै.आवाजचे संपादक भगवान सोनवणे,बापू जाधव, मुस्ताक शेख, भावराव जाधव, मधुकर पवार, प्रभाकर पगारे, योगेश जाधव, संदिप बोरसे, श्रावण आढाव, अनंत शेवरे,शामभाऊ पारख, मनोज शर्मा, शिवाजी निकम, शिवाजी गरुड, प्रा. सुरेश नारायणे, गंगाधर औंशिकर,विजय बोरसे, किसन जगधने, वामन पोतदार, सुमित गुप्ता, अकाश पानकर, जेष्ठ नागरिक, व्यापारी, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित माजी सैनिक व जेष्ठ नागरिक यांचा सत्कार नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी केला.व शहरातील सामाजिक स्वास्थ टिकविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment