नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - पिंपरखेड येथे काल सोमवारी दि. ३ जुलै २०२३ रोजी विद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी प्रमुख अतिथी सौ. निता चव्हाण यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी हे होते.गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कु. चांदणी चव्हाण हिच्या पालकांना व्यास पूजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कु. चांदणीच्या हस्ते तिचे पहिले गुरू तिच्या मातापित्यांचे पूजन करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. उत्तम सोनवणे, संजय कांदळकर व मुख्याध्यापक काशिनाथ गवळी यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले. कु. प्रतिक्षा मवाळ हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक गोकुळ बोरसे, श्रीमती अलका शिंदे, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, संदीप मवाळ, आबा सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय कांदळकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment