नांदगाव (प्रतिनिधी) - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रीय युवक कॉंग्रेस पक्ष नांदगाव तालुका यांच्यातर्फे अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या बद्दल अत्यंत अवमान कारक विधान करून त्याचां अपमान केला आहे.संभाजी भिडे सारखे व्यक्ती राष्ट्रपित्या बद्दल टीका टिप्पणी करतो हि गोष्ट संपूर्ण देशासाठी लाजीरवाणी आहे.सर्व धर्म समभाव हि आपल्या देशाची खरी ओळख आहे.पण ही ओळख पुसण्याचा संभाजी भिडे सारख्या मनुवादी प्रवृत्तीचा प्रयत्न आहे.भिडेच्या या मणूवादी वक्तव्याचा तिव्र निषेध नांदगाव तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.संभाजी भिडे यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी व तसेच मणिपुर येथील महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचार विरोधात कठोर कार्यवाही करणे बाबतचे निवेदन मा.आमदार अनिलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनखाली कॉंग्रेस पक्षा तर्फे निवेदन तहसिलदार डॉ,सिद्धार्थ मोरे यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे ,शहरअध्यक्ष मनोज चोपडे,कृ.उ.बा समितीचे संचालक दर्शन आहेर,अय्युब शेख ,राजेंद्र लाठे,डॉ.सागर भिलोरे,पुंडलिक सदगिर,सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष निरंजन आहेर,सागर साळुंके,राहुल परदेशी ,सागर आडकमोल,फैसल शेख साजिद शेख ,अमित आहेर ,अभिजीत सूर्यवंशी, आदी उपस्थीत होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment